कुणी तयार आहे का माझ्यासोबत खो कथा ( chain fiction Story) लिहायला ?

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in काथ्याकूट
15 Mar 2017 - 12:20 am
गाभा: 

दोन किंवा त्यापेक्षा जास्त लेखकांनी लिहलेल्या कथांना chain fiction असं म्हणतात. ही कथा कशी लिहली जाते ते सांगतो –

एका लेखकाने कथा लिहायला सुरुवात करायची आणि अर्धवट सोडून द्यायची, दुसऱ्याने त्याच्या पुढचा भाग लिहायचा, तिसऱ्याने त्याच्या पुढचा वगैरे वगैरे. परत दुसरा round, तिसरा round. अशापद्धतीने कथा पुर्ण करायची. (थोडक्यात एकमेकांना खो देत पुढे जायचं) कथालिखाण करतांना भिडूंनी एकमेकांशी चर्चा करायची नाही. प्रत्येक पोस्टमध्ये किती शब्द असावेत आणि अंदाजे किती पोस्टमध्ये कथा संपवायची एवढंच फक्त आधी ठरवून ठेवायचं.

गेल्यावर्षी मी आणि रविंद्र भयवाल आम्ही दोघांनी मिळून दुहेरी खेळी नावाची विज्ञानकथा लिहली होती. (प्रकाशन: धनंजय २०१६) मराठीतील कदाचित ही पहिलीच प्रकाशित खो कथा असावी.

मिपा परिवारातील लेखक उत्साही आहेत, नवनवीन आव्हानं पेलायला तयार असतात. म्हणून इथेही लेखकांनी मिळून कथा लिहावी अशी मनापासून इच्छा आहे.

पण वरील कथाप्रकार मी अजून थोडा अवघड आणि मजेदार केला आहे.

उदाहरणार्थ: समजा खो कथा लिहायला तीन लेखक तयार आहेत (अ, ब, क) कथेची लांबी सहा पोस्ट असावी आणि प्रत्येक पोस्टमध्ये ५०० ते हजार शब्द असावेत हे त्यांनी आधीच ठरवलंय.

कथेची सुरुवात अ करतोय. पण तो नेहमीप्रमाणे पहिल्या पोस्टने सुरुवात करणार नाही तर मधूनच कुठूनतरी करेल. समजा अ ने तिसरी पोस्ट लिहली. आता तो पुढच्या भिडूला खो देईल.

भिडू ....लिहलेली पोस्ट ....... खो

अ ........३ ............ क तू सहावी पोस्ट लिह

क ........ ६............ ब तू पाचवी पोस्ट लिह

ब ........ ५ ............ क तू पहिली पोस्ट लिह

क ........ १ ............ अ तू दुसरी पोस्ट लिह

अ ......... २ ............ आता उरला ब. त्याने चौथी पोस्ट लिहून कथा संपवावी

challenging प्रकार आहे. डोकं भंजाळून जाईल पण मजा येईल. खात्री बाळगा.

सांगा मग. कुणी आहे का तयार ??

प्रतिक्रिया

निशदे's picture

15 Mar 2017 - 1:55 am | निशदे

करा सुरुवात..... मी लिहीन. 'खो' कधी देताय सांगा......

मी तयार आहे, पण मला सध्या लय काम आहे. एप्रिल मध्यावर मोकळा होईन तेव्हा लिहू शकेन.

प्राची अश्विनी's picture

15 Mar 2017 - 7:18 am | प्राची अश्विनी

मला पण आवडेल. अर्थात जमेल की नाही माहित नाही.

हायला कमाल आहे, माणसं समान परिस्थीतीमधे समान विचार करतात अस म्हणतात ते काय चुक नाही, ते मागं जव्हेरगंज न मोजी ची १ कथा स्वतः परत लिहीली तेव्हा पासुन माझ्याही मनात होतं कि मिसळपाव च्या जबराटकथा लेखकांची १ जुगलबंदी व्हावी, कोणीतरी १ जण सुरुवात करेल अन दुसरे भर घालत जातील, प्रत्येकाची शैली वेगळी आहे, त्यामुळे वाचायला फार मज्जा येईल. सुरेख कल्पना.

विनिता००२'s picture

15 Mar 2017 - 10:35 am | विनिता००२

आवडेल असे लिहायला :)

पैसा's picture

15 Mar 2017 - 12:04 pm | पैसा

आम्ही अनाहितातर्फे हा प्रयोग केला होता. तो सुरू ठेवणे नंतर जमले नाही. पण २०१४ दिवाळी अंकात ऐलमा पैलमा आणि कथा या दोन कथा अशा खो खो प्रकाराने लिहिल्या होत्या आणि त्याना उत्तम प्रतिसाद मिळाला होता. नेहमी न लिहिणार्‍यांनाही सवय व्हावी या हेतूने आणि सलग वेळ देणे महिलांना सहसा जमत नाही यामुळे हा प्रयोग तेव्हा आम्ही केला होता. बर्‍याच जणी मिळून बरेच दिवस लिहीत होत्या! आणि अमूक शब्द मर्यादा किंवा असे काही नियम अर्थातच केले नव्हते.

तुमच्या प्रयोगाला भरपूर शुभेच्छा! रिझल्ट उत्तमच असणार.

राजाभाउ's picture

15 Mar 2017 - 2:13 pm | राजाभाउ

मस्त आयडियाय पण भाग क्रमान नाय आले तर वाचकांना संपे पर्यंत थांबाव लागेल ना

असा कवितेचा प्रयत्न मागे झाला होता. विशेष उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला नाही त्याला.
बाकी उत्तम कल्पना.

५० फक्त's picture

15 Mar 2017 - 6:13 pm | ५० फक्त

भारी यार आयडिया, मी पण तयार आहे.

अभ्या..'s picture

15 Mar 2017 - 6:25 pm | अभ्या..

जानी,
जब हम लिखते है, तो खुद लिखते है,
जब खुद लिखते है तो बस खुदही लिखते है.
ऐसे गर्दीमें टांगा नही चलाया करते है

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Mar 2017 - 5:45 pm | कैलासवासी सोन्याबापु

ये हिकडं तू शेजारी बस बाबा, लगी उठून दांडपट्टा फिरवाय लागतंय, कसं होणार ह्या पोराचं.

आलो, चुनाडबी हाय का बाप्या?
बसतो निवांत जरा

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Mar 2017 - 6:44 pm | कैलासवासी सोन्याबापु

.

चुना पुडीतच ठिवलाय, मळ जरा डबलिंग मदी

५० फक्त's picture

16 Mar 2017 - 6:56 pm | ५० फक्त

अबे, त्या उसेन बोल्ट्ला पण चार चौघात पळावं लागतंय बे. तेच्या २०-२२ मेडलातले ५-६ असं गर्दित पळापळी करुन मिळलेत तेला.

सचिन काळे's picture

17 Mar 2017 - 6:25 am | सचिन काळे

संवाद लई भारी!!! आवडला.

सचिन काळे's picture

17 Mar 2017 - 6:28 am | सचिन काळे

टांगाचा संवाद लई भारी!

जव्हेरगंज's picture

15 Mar 2017 - 6:44 pm | जव्हेरगंज

स्टोरी बघून आपल्यातर्फेही मसाला टाकला जाईल!!!

सूड's picture

15 Mar 2017 - 6:46 pm | सूड

तयार आहे.

मला द्या खो, मी लगेच लिहायला घेतो.

स्रुजा's picture

15 Mar 2017 - 8:05 pm | स्रुजा

तयार आहे.

पिलीयन रायडर's picture

15 Mar 2017 - 9:39 pm | पिलीयन रायडर

कथा लिहायला आवडत नाही पण कल्पना उत्तम. वाचायला आवडेल.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

15 Mar 2017 - 10:33 pm | अॅस्ट्रोनाट विनय

तर आता मी पकडून नऊजण तयार आहेत. नियम ठरवू आणि सुरू करून देऊ. आता नियम ठरवून घ्यावे लागतील. माझ्या मनातील प्रश्न मांडतो.

१. कथा किती पोस्ट्स मध्ये संपवावी ? ही मर्यादा नसेल तर कथा हनुमानाच्या शेपटीसारखी लांबत जाईल.

२. प्रत्येक पोस्टची शब्दमर्यादा काय असावी?

३. प्रत्येक पोस्ट लिहण्यासाठी वेळमर्यादा काय ठेवायची? म्हणजे एकाने खो दिल्यानंतर दुसऱ्याने किती वेळेत पुढची पोस्ट टाकायची ? कारण रंगत तेव्हाच वाढते जेव्हा फटाफट पोस्ट टाकल्या जातात.

कुणाच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर मांडावेत. उत्तरं शोधू आणि नियम बनवू. कारण एकदा खो कथेचा महासंग्राम सुरू झाला की मग लेखक भिडूंनी आपापसात चर्चा बंद करायची आहे.

निशदे's picture

16 Mar 2017 - 12:23 am | निशदे

अॅस्ट्रोनाट विनय,
पुढची चर्चा व्हॉट्सअ‍ॅप वर ग्रुप करून करता येईल. त्यामुळे वाचकांनाही यप्रोसेस्म्मधून वेगळे ठेवता येईल. तुमच्या प्रश्नांना खाली उत्तरे देत आहे.
१. माझ्या मते कथा कधी संपवावी हे लेखकच ठरवतील. उत्तम लेखन जोवर होत आहे तोवर चालू ठेवायला काहीच हरकत नाही. उदा. George R. R. Martin (चा लेखक) याने इतर लेखकांबरोबर लिहिलेली Wild Cards ही सिरीज. तसे वाटल्यास आपापसात ठरवून थांबता येईल.
२. जितकी जास्त तितके चांगले हे.मा.वै.म. (पण माझे आधीचे लेखन पाहून हे मत का आले हे तुम्हाला कळेलच) ;)
३. पूर्ण सहमत. लेखकांमध्ये जितके coordination असेल तितके हे सोपे जाईल.
" एकदा खो कथेचा महासंग्राम सुरू झाला की मग लेखक भिडूंनी आपापसात चर्चा बंद करायची आहे. "
मी याच्याशी अंशतः असहमत आहे. जितकी चर्चा होईल तितके लेखन उत्तम होत जाईल असे मला वाटते.

संयुक्त व्यनि करा. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शिळोप्याच्या गप्पा वाढतात.

स्रुजा's picture

18 Mar 2017 - 1:07 am | स्रुजा

+१ व्यनि करु. मला वाटतं, की आपापसात न ठरवता गोष्ट लिहीताना खो देऊ / घेऊ. उत्स्फुर्तपणे कुठे जातेय कथा ते बघायला मजा येईल.

दीपक११७७'s picture

15 Mar 2017 - 10:36 pm | दीपक११७७

मी पण तयार आहे

अॅस्ट्रोनाट विनय's picture

15 Mar 2017 - 10:38 pm | अॅस्ट्रोनाट विनय

@ आदुबाळ

तुम्ही असते तर अजून मजा आली असती.
पण कामांपुढे कुणाचे न चले. त्यामुळे हरकत नाही.
या कथेत प्रतिसाद आणि मार्गदर्शनरूपी सहभाग मात्र जरूर नोंदवावा.

पुढच्या खो कथेत तुम्ही भाग घ्यावा अशी इच्छा.

अहो मला फार इच्छा आहे हो, पण एप्रिलमध्यापर्यंत बराच काळ मी संपर्कातच नसेन बहुतेक. फुडल्या टायमाला नक्की.

सुखी's picture

15 Mar 2017 - 10:54 pm | सुखी

9 10 जण असतील तर 2 टीम करा, अन लिहायला सुरु करा..

पिलीयन रायडर's picture

16 Mar 2017 - 12:16 am | पिलीयन रायडर

हो. खुप लोक असतील तर दोन टिम असाव्यात असे मलाही वाटले. खुप मोठी साखळी नको. खास करुन पहिल्यांदाच तुम्ही असा प्रयोग करताय तर.

पहिली ५-६ जणांची कल्पना चांगली आहे.

राबवा पटकन. घ्या एकाने पुढाकार आणि मांडा नियमांचा प्रस्ताव. बाकीचे हो किंवा नाही सांगतील.

वाचायला अत्यंत उत्सुक!

चॅट्सवूड's picture

16 Mar 2017 - 12:49 am | चॅट्सवूड

१. कथा जर नऊ लोक लिहिणार असतील तर, प्रत्येकी एक म्हणजे निदान नऊ पोस्ट झाल्या पाहिजेत.

२. शब्द मर्यादा: शंभर ते पाचशे शब्दापर्यंत असावी, वर्ड पेज ची जास्तीत जास्त तीन पाने

३. वेळ मर्यादा: "खो" दिल्यानंतर तीन दिवस, (बहात्तर तास ), एका महिन्यात कथा पूर्ण होऊ शकते, जितक्या लवकर पोस्ट टाकता येईल तितक्या लवकर टाकावी.
जर तीन दिवसात पोस्ट पूर्ण झाली नाही तर, तो लेखक बाद होईल आणि मग पुढच्या कोणत्याही लेखकाला "खो" देता येईल.

विनिता००२'s picture

16 Mar 2017 - 1:03 pm | विनिता००२

वर्ड पेज ची जास्तीत जास्त तीन पाने >>> एका पेजमधे अंदाजे ४००० शब्द बसतात

विनिता००२'s picture

16 Mar 2017 - 1:03 pm | विनिता००२

बाकी अटी मान्य :)

चॅट्सवूड's picture

16 Mar 2017 - 8:42 pm | चॅट्सवूड

४००० शब्द? मी १००० शब्दांची कथा लिहिली होती, संवादांना परिच्छेद देऊन, तेव्हा वर्ड पेजची पाच पाने लागली होती.

चॅट्सवूड's picture

16 Mar 2017 - 8:47 pm | चॅट्सवूड

कदाचित तुम्ही लहान फॉन्ट साईज वापरात असाल, मी नेहमी फॉन्ट साईज ११ वापरतो

विनिता००२'s picture

17 Mar 2017 - 1:30 pm | विनिता००२

मी नेहमी फॉन्ट साईज ११ वापरतो >>> मी पण
असो

आषाढ_दर्द_गाणे's picture

16 Mar 2017 - 4:35 am | आषाढ_दर्द_गाणे

वाचतोय!
:D

संजय पाटिल's picture

16 Mar 2017 - 6:50 am | संजय पाटिल

लवकर होउदे सुरवात. उत्सुकता ताणलिये

अॅस्ट्रोनाट विनय's picture

16 Mar 2017 - 8:03 am | अॅस्ट्रोनाट विनय

दोन टीम पाडून लिहायचं म्हणजे कसं लिहायचं ?
की पाचपाच जणांच्या दोन टीम पाडून दोन्ही टीमने वेगवेगळ्या कथा लिहायच्या ? वाचकांचाही आनंद द्विगुणित होईल

५ ५ च्या दोन टीमा पडून २ गोष्टी लिहायचा

जव्हेरगंज's picture

16 Mar 2017 - 10:05 am | जव्हेरगंज

एकच टीम असावी. सगळ्यांना सगळं सुचेल असं थोडीच होणार आहे. पुन्हा वेळेचा प्रश्न आहेच.
खो देण्याची पद्धत नसावी. इच्छुकांनी आपणहून खो घ्यावा. म्हणजे चांगलं सुचलं तेच पुढे येईल.

पोस्टची शब्दमर्यादा पाच ते दहा ओळी असू द्यात. म्हणजे जास्त वेळ घेतला जाणार नाही!

चॅट्सवूड's picture

16 Mar 2017 - 12:25 pm | चॅट्सवूड

मला ही वाटत, एकच ग्रुप असावा म्हणजे परत "या टीम ने वेगळी पद्धत वापरली" असे काही होणार नाही, प्रतिसाद जर चांगला मिळाला तर पुढच्या वेळी, दोन टीम्स ठेवता येईल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Mar 2017 - 5:52 pm | कैलासवासी सोन्याबापु

लिहिलेला त्याच्या वाट्याचा कथाभाग त्याच धाग्यात अपडेट करणार आहे का संपादक/साहित्य संपादक मंडळी? असल्यास वाचायला मजा येईल,

नपेक्षा स्व-खो पद्धतीत मेनबोर्ड फ्लड होऊन जाईल, अशी शक्यता वाटते, जे तितकेसे स्वागतार्ह नसेल, असे माझे वैयक्तिक मत पडते आहे.

अर्थात, नाट लावणे हा उद्देश नसून तांत्रिक मुद्दा म्हणून मांडतो आहे, बरंका विनय भाऊ, बाकी होल वावर इज आवर :)

प्रसाद गोडबोले's picture

16 Mar 2017 - 8:42 pm | प्रसाद गोडबोले

खतरनाक कन्सेप्ट !

एकदम इन्सेप्शन्न चित्रपटातील शेयर्ड ड्रीम आठवले ...

गणामास्तर's picture

17 Mar 2017 - 10:55 pm | गणामास्तर

बाकी काहीही बोल भावड्या तू, पण त्या इन्सेप्शनची आठवण नको करून देऊ बाबा. ;)

मिडास's picture

16 Mar 2017 - 9:17 pm | मिडास

एक सूचना. एकच कथा सगळ्यांनी थोडी थोड़ी लिहिन्या पेक्षा सर्वांनी मिळुन एक विषय ठरवा आणि त्याच्या अनुषंगा ने प्रत्येकाने स्वतंत्र कथा लिहावी.

पिलीयन रायडर's picture

17 Mar 2017 - 1:16 am | पिलीयन रायडर

त्यात काय मजा आहे आणि?

मला मूळ कल्पनाच जास्त आवडली आहे. क्ष लेखकांनी एकमेकांशी न बोलता क्ष भागांमध्ये एकच कथा लिहायची. पण वेगवेगळ्या सिक्वेन्सने.

अत्यंत चॅलेंजिंग गोष्ट आहे ही.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

17 Mar 2017 - 5:49 pm | अॅस्ट्रोनाट विनय

सही पकड़े है

आनंदी गोपाळ's picture

17 Mar 2017 - 9:04 pm | आनंदी गोपाळ

स्पिन द यार्न.

अर्थात लपेट्ते जाओ.

मायबोलीवर हा प्रकार गेली कित्येक वर्षे खेळला जातो. अन भन्नाट स्टोर्‍या तयार होतात. मिपावर हा प्रकार नवा दिसतोय हे पाहून आश्चर्य वाटले.

आनंदी गोपाळ's picture

17 Mar 2017 - 9:08 pm | आनंदी गोपाळ

हे पहा.

किंवा ही कथा : कथा ३. सेव्ह द अर्थ

*

तिकडची जाहिरात म्हणून कृपया माझ्या पोस्टकडे पाहू नये. हा प्रकार खूप जुना आहे, इतकेच निदर्शनास आणायचे होते.

आनंदी गोपाळ's picture

17 Mar 2017 - 9:13 pm | आनंदी गोपाळ

मराठीतील कदाचित ही पहिलीच प्रकाशित खो कथा असावी.

↑ या संदर्भाने.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

17 Mar 2017 - 10:22 pm | अॅस्ट्रोनाट विनय

स्पिन दी यार्न हा basic आणि फारसा challenging नसणारा प्रकार वाटला. ज्या लेखकाने पहिली पोस्ट लिहली तो पुढे काय लिहायचं याच्या सगळ्या सुचना स्वतःच देऊन ठेवतोय. यात मजा ती काय. अजिबात चुरस नाही, खेळाच्या व्याख्येत ते बसत नाही.

इथे आपण पुढे काय लिहायचं हे पुर्णपणे पुढील लेखकावर सोपवणार आहोत. पुर्ण स्वायत्तता. दुसरी गोष्ट प्रत्येक पोस्ट लिहायला शब्द आणि वेळेची मर्यादा असणार आहे ( जशी खेळात असते.) शिवाय random sequence आहे म्हणजे मजाच मजा. या अर्थाने मिपावरील हा प्रयोग unique आहे हे मी अभिमानाने सांगू शकतो.

अजून एक गोष्ट म्हणजे, मी काही ठिकाणी असं पाहिलेलं (स्पिन दी यार्नपण यात येतं ) आहे की एकजण एक भाग लिहतो, दुसरा त्याच्या पुढचा वगैरे वगैरे पण... एकच round खेळला जातो. म्हणजे प्रत्येकजण एकच पोस्ट लिहतो. असं केल्याने जास्त मजा येत नाही. आम्ही दोघांनी मिळून जी कथा लिहली होती त्यात आम्ही तब्बल १६ round खेळलो. कधीकधी एकाने लिहलेलं दुसरा पुर्ण पलटायचा, डोकं भंजाळून जायचं. प्रत्येकाला पुन्हा नव्याने विचार करावा लागायचा. पुढेपुढे तर कोण कमी वेळेत पोस्ट टाकतो यावरून चुरस निर्माण झाली होती. एका दिवसात एक मग दोन आणि शेवटी शेवटी तीनतीन पोस्ट पडायला लागल्या. दोनदोन वाजता झोपेतून उठून पोस्ट लिहल्या आहेत. थोडक्यात एखाद्या खेळासारखी चुरस, अनपेक्षित वळणं, challenge आणि थरार असल्यामुळे ही क्ष लोकांनी मिळून लिहलेली समूहकथा बनली नाही, त्यापेक्षा हटके काहीतरी बनलं. याअर्थाने मी आम्ही पहिली खो कथा लिहली असं म्हटलं. तुम्ही म्हणता त्याला खो कथा म्हणता येणार नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Mar 2017 - 9:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता खूपच कुतुहल जागे झाले आहे ! करा लवकर सुरुवात, सगळेजण वाट पाहत आहेत.

सध्या भाग घेणे शक्य नाही परंतु वाचायला नक्कीच आवडेल..वाट बघतोय! :)

पिलीयन रायडर's picture

17 Mar 2017 - 11:47 pm | पिलीयन रायडर

फार ताणु नका उत्सुकता. लवकर सुरु करा. मी रोज येऊन बघुन जातेय की काही ठरलं का ते.

धागाकर्त्याने झटपट नियम मांडावेत. ज्यांना मान्य असतील त्यांनी सहभाग घ्यावा. पहिला प्रयत्न आहे. ज्या काही सजेशन्स असतील त्या पुढच्या राऊंडमध्ये घ्या. पण सुरुवात तर करा.

वर कुणी तरी व्हॉटसॅप ग्रुप बद्दल बोल्लय. त्यात अति चर्चा होईल हो. शिवाय अनेकांना खरे नाव नंबर द्यायचा नसतो. तेव्हा व्यनि मधुन लेखक काय ते बेसिक ठरवुन घेतील. पण पुन्हा त्यांच्यात चर्चा नको!

अॅस्ट्रोनाट विनय's picture

18 Mar 2017 - 12:33 am | अॅस्ट्रोनाट विनय

जास्त उत्सुकता ताणत नाही. उद्या ( दि. १८ ) खो कथेला सुरुवात होईल याची खात्री बाळगावी.
कथाप्रकार हटके असणार आहे.

मोदक's picture

18 Mar 2017 - 2:03 am | मोदक

शुभेच्छा....!!