उत्तुंगतेचा प्रवास ||१||

ओ's picture
in भटकंती
16 Mar 2017 - 8:39 am

आम्ही दोघे बद्रीनाथ हुन चोपता कडे जायला निघालो,चोपता बद्दल वाचून होतो की तीथे वीज नाही,

बद्रीनाथ ते चोपता हा प्रवास तर आमच्या डोळ्यांसाठी एक पर्वणीच होती
शुष्क हिमालयाच्या रंगानं पासून गर्द दाट हिमालयाच्या झाडीतला तो प्रवास,आज ही त्याचा गारवा अंगावर जाणवतो,आमची गाडी त्या पर्वत रंगानं मधून जात होती आणि आम्ही निसर्गाच्या एक अद्भुत रचनेचा प्रवास करत होतो

ती जंगल जणू काही आम्हाला त्यांच्या कुशीत विसावा घेण्यासाठी आमंत्रण देत होती, आमचा प्रवास आता चोपता पाशी येऊन थांबला,आणि तेव्हा कळलं की दुपार चे अडीच झाले आहेत

फारशी भूक नव्हती पण तरी आम्ही जेवलो,आम्हाला वाटलं होतं की चोपता हे छोटेखानी गाव असेल,पण तिथे गेल्यावर कळलं की मोजून दहा घराची जंगलातली वस्ती होती ती,आणि त्या लोकांनीच यात्रेकरू साठी छोटी घर बांधली होती आम्ही हि एक रूम बुक केली,आणि पलंगावर यादव होऊन जरा श्रम परिहार केला,तिथे वीज नव्हती पण तिथल्या लोकांनी सौर ऊर्जेचा वापर करून निदान रात्री तरी वीज असेल ह्याची व्यवस्था केली होती,हे पाहून त्या लोकांचं मला जरा कौतुकच वाटलं

चोपता ला भारताचं मिनी स्वित्झर्लंड म्हणतात ह्याचा प्रत्यय आम्हाला त्याची दिवशी संध्याकाळच्या भटकंती वेळी आला
तिथून सूर्य मावळताना चित्रकाराचे रूप घेतो कि काय असाच भास होत होता,मावळत्या सूर्याच्या प्रकाशात तो परिसर असा काही न्हाऊन निघाला होता,कि प्रत्येक वेळी माझं मन त्या सुंदर चित्रात गुरफटून जायचं,ते सर्व चित्र मनात साठवायला दोन डोळे कमी पडतील कि काय असा वाटायची वेळ आली

असो ,मावळत्या सूर्या बरोबर चहा चा आस्वाद घेऊन आम्ही पुन्हा आमच्या रूम वर आलो,आता तयारी करायची होती उद्याच्या तुंगनाथ आणि चंद्राशीला ट्रेक ची

---- ओंकार जोशी

प्रतिक्रिया

बद्रीनाथ ते चोपता रस्त्याचे वर्णन येऊदेत की. जोशीमठ, औली, पिपलकोटी वगैरे मार्गाने आलात का? किती देखणा रस्ता आहे..
प्रयाग लागले असतील - त्यांचे फोटो टाका प्लीज. किती सुरेख आहेत हे प्रयाग..
दुगलबिट्टा पाहिलेत का?

नमस्कार,आपण माझा लेख वाचलात ह्या बद्दल आभार
हा लेख 3 भागाचा आहे आणि ट्रेक च्या वर्णनाचा आहे,
तूम्ही सांगीतलेले मुद्दे लक्षात घेतले आहेत व त्या बद्दल हि
लिहीनच तो पर्यंत लोभ असावा

पैसा's picture

16 Mar 2017 - 10:52 am | पैसा

छान लिहिताय. फक्त जरा मोठे भाग असावेत आणि फोटो असते तर जास्त छान वाटले असते.

धन्यवाद मी फोटो अप लोड करण्याचा प्रयत्न केला पण नाही जमल,पण करीन लवकर

इथे फोटो कसा टाकावा ते बघा. फ्लिकर ऐवजी आता postimage.org पण वापरु शकता. पायरी ४ ला फक्त शेअर बटन दाबुन तिथली डायरेक्ट लिहिलेली लिंक कॉपी करा आणि मग पायरी ५ पासुन पुढे सेमच आहे.

पुढील प्रवास वर्णनाच्या प्रतिक्षेत.

निशाचर's picture

16 Mar 2017 - 11:32 pm | निशाचर

वर्णन आवडलं.
पण इतर प्रतिसादांत म्हटलंय तसंच वाटतं, फोटो हवे होते.

शित्रेउमेश's picture

17 Mar 2017 - 2:28 pm | शित्रेउमेश

वाह!!
पण फोटो का नाहि टाकले???

ओ's picture

17 Mar 2017 - 8:49 pm |

Sunset

मी मोबाईल वरून फोटो अपलोड करण्याचा प्रयत्न केला पण होत नाही…..मला ही फोटो टाकायला आवडले असते पण कसे करावे काळात नाही,पोस्ट इमेज हि site देखील वापरून पहिली पण प्रयत्न असफल झाला,माझा लॅपटॉप सध्या माझ्या कडे नाही तो आला की सर्व फोटो अपलोड करेन….तो पर्यंत क्षमस्व ,
….लोभ असावा
----ओंकार जोशी