जीवन डोर तुम्ही संग बांधी..! (अवांतर - रौशनी, पुढची पिढी!)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
16 Feb 2009 - 11:22 pm

पूर्वसंदर्भ -१) रौशनी..१
रौशनी..२
रौशनी..३
रौशनी..४
रौशनी..५
(अपूर्ण..)

२) ए मालिक तेरे बंदे हम! (रौशनी - अवांतर..!)

खूप वर्ष झाली फोरास रोड सोडल्याला! तेथील मी नौकरी करत असलेला झमझम देशी दारू बार, रोजच्या मारामार्‍या, गुंड, पोलिस, दारुवाले, मटकेवाले, आसपासच्या रांडा अन् त्यांचे भडवे, ती रौशनीची चाळ, ती रौशनी, रौशनीच्याच परिचयातली अजून एक कुणीशी मावशी (आम्ही तिला परवीनदिदी म्हणत असू,) आणि परकर पोलक्यात पाहिलेली आमच्या रौशनीची मुलगी नीलम!

एकदा केव्हातरी फॉकलंड रोडवरील दिल्ली दरबार हॉटेलच्या बाहेर मन्सूर भेटला होता. रांडांकरता बिर्याणी पॅक करून घेऊन चालला होता! मला तिथे पाहताच,

"अरे तात्यासाब आप? कैसे है?"असं ओरडत आनंदाने गळ्यात पडला होता.

"साला भोसडिके मन्सूर तू! कितने सालो बाद मिल रहा है?! चल, बिर्यानी खायेंगे..!" असं म्हणून मी मन्सूरला बिर्याणी खिलवली. रौशनीच्या आठवणी निघाल्या.

"तात्यासाब, नीलम अब परवीनदिदीके कोठेपे नाचती है. अपने बनारसी चालमैइच लगता है परवीनका कोठा!"

"अल्ला की मेहेरबानीसे नीलम अब बडी हो गई है, अच्छी खानेखिलाने लायक हो गई है! गातीभी अच्छा है!" असं म्हणून भडवा छद्मीपणे हसला होता!

"और ठुमकेभी भोत सही लगाती है! साला, यू पैसा उडता है..!" मन्सूर.

अच्छी खानेखिलाने लायक हो गई है! ??

पण दोष मन्सूरचा नव्हता! तो अजून त्याच वस्तीत रांडांच्या पाठीला साबण चोळण्याचं काम करत होता. मी तेथून बाहेर पडलो होतो! पुन्हा माझ्या पांढरपेशा, सुसंस्कृत, सभ्य समाजात!

नीलम!

आमच्या रौशनीची पोर. एका जमान्यात मी त्या पोरीचे खूप लाड केले होते! लहानपणीची "तात्यासाब..." म्हणून गळ्यात पडणारी नीलम मला आठवली. तेव्हा मन्सूरपासून ते रौशनीपर्यंत सर्वजण मला "तात्यासाब" याच नावाने ओळखत असत. त्यामुळे भाबडी लहानगी नीलमही मला 'तात्यासाब'च म्हणे! :)

आज काही कामानिमित्त मुंबई सेन्ट्रलला गेलो होतो आणि अचानक जुन्या आठवणी जाग्या झाल्या! डेअरी मिल्कचं एक चॉकलेट खरेदी केलं आणि सरळ एक टॅक्सी पकडली आणि म्हटलं,

"चलो बनारसी चाल. फोरास रोड!"

बनारसी चाळ जवळच होती. माझं सुसंस्कृत, पांढरपेशा मन पुन्हा एकदा चरकलं! आज कित्येक वर्षांनी पुन्हा त्या कोठ्याच्या पायर्‍या चढत होतो! बनारसी चाळ हा कोठा आहे, जिथे मुजरा होतो, गाणंबजावणं होतं. तिथे शरीरविक्रय तेव्हाही होत नसे, आजही होत नाही!

पहिल्या मजल्यावरील परवीनदिदीच्या कोठ्यावर गेलो. परवीनही आता हयात नसल्याचं समजलं.

खोलीत शिरलो. दोनचार तरण्याताठ्या नर्तिकांनी माझं स्वागत केलं, या बसा म्हटलं! त्यांना वाटलं कुणी पाहुणा आला आहे मुजरा बघायला!

"नीलम कहा है? यहीपे रेहती है ना?"

असं विचारलं तितक्यात आतल्या खोलीतून नीलमच बाहेर आली! रौशनीची मुलगी! खूप वर्षांनी तिला पाहात होतो. रंगरुपाने रौशनीसारखीच गोरी दिसत होती, सुरेख दिसत होती!

"पेहेचाना??"

क्षणभर विचार करून "तात्यासाब.." असं म्हणत तेव्हा जशी पडायची तशी आताही गळ्यात पडली! मीच क्षणभर हबकलो. तेव्हाची नीलम खूप लहान होती, परकर-पोलक्यातली होती!

खूप आनंद झाला होता पोरीला. मी खिशातनं डेअरी मिल्कचं चॉकलेट काढलं आणि तिला दिलं! पाणी आलं पोरीच्या डोळ्यात!

चहा झाला.

"तात्यासाब क्या सुनोगे?"

"मन्सूर बोल रहा था की तुम बहोत अच्छा गाती हो!"

मी तिला थोडं गायचा आग्रह केला. मलाही तिथे फार वेळ बसायचं नव्हतंच! तसं म्हटलं तर आता तिथे काय संबंध माझा??

"बस मुझे अब जाना है दो-पाच मिनिटमे. कुछभी सुनाओ, लेकीन पुराना..!"

"पुराने गाने तो मै बहोत कम जानती हू. फिरभी आपके लिये एखाददुसरा गा दुंगी! अभी मुजरा शुरू होनेमे वक्त है. बाजिंदे-साजिंदे नही है!"

अस म्हणून 'जीवन डोर तुम्ही संग बांधी..' या लतादिदीच्या एका सुरेख गाण्याची दोन कडवी तिने गुणगुणली! आपल्या उत्सुकतेकरता लतादिदीचं मूळ गाणं इथे ऐकता येईल. छान गायली पोरगी. आईने तिला थोडंफार गाणं शिकवलं होतं!

"बस अब चलुंगा!"

"तात्यासाब दुबारा कब आओगे? आओगे ना? जरूर आना..!"

तिच्या त्या 'आओगे ना?' या प्रश्नाच्या टोनमध्ये मला तिची ममत्वाची भूक जाणवली! अगदी विलक्षण जाणवली! कारण तिच्या ठुमक्यांकडे हावरेपणाने बघणारा मी कुणी तिचा गिर्‍हाईक नव्हतो! मी तिथे गेलो होतो तो तिच्या आईच्या ओळखीचा कुणीतरी होतो म्हणून..!

असो..

काय साला जमना असतो पाहा! काही वर्षांपूर्वी मी त्याच खोलीत रौशनीकडून 'ए मालिक तेरे बंदे हम..' ऐकलं होतं आणि आज तिच्या पोरीकडून त्याच खोलीत 'जीवन डोर तुम्ही संग बांधी..' ऐकलं!

पुन्हा तिथे जाईन की नाही हे मला माहीत नाही!

-- तात्या अभ्यंकर.

वाङ्मयअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

17 Feb 2009 - 12:42 am | पिवळा डांबिस

कुठे उलथला होतास रे मेल्या इतके दिवस?
आम्हाला वाटलं की ह्या सरपंचगिरीमध्ये तुझ्यातला लेखक मेलाबिला की काय!!!!
:)
छान लिहिलंयस!!!!
शॉर्ट, सॉफ्ट ऍन्ड स्वीट!
जियो....

दशानन's picture

17 Feb 2009 - 7:20 am | दशानन

सहमत.

खरोखर तात्या... मनामध्ये एकदमच काही तरी झालं शब्दात व्यक्त नाही करु शकत.. पण सलाम!!!

ह्या जगात जगणं सोपं कधीच नसतं !

सुंदर !

अभिनंदन तात्या.

परिकथेतील राजकुमार's picture

17 Feb 2009 - 8:33 am | परिकथेतील राजकुमार

अगदी असेच म्हणतो.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

छोटा डॉन's picture

17 Feb 2009 - 9:26 pm | छोटा डॉन

खरं तर खुप आधीपासुन मी प्रतिक्रीया लिहायचा विचार करतो आहे, नेमकं काय लिहावं हे शब्दात सापडत नाही.
बर्‍याच जणांच्या प्रतिक्रीयेची वाट पाहिली पण मनात जे आहे ते चपखलपणे व्यक्त होईल अशी एकही प्रतिक्रीया मला दिसली नाही की पर्टकन "+१, सहमत" म्हणुन मोकळं होऊ ...
शब्दशः सुन्न झालो ...!

लहानपणी पुस्तकात भरपुर वाचायचो के शापीत राजकन्या थवा अप्सरा असतात व त्यांच्या अंगात भरपुर गुण असुनसुद्धा त्यांना कुठेतरी कष्टात व दर्जाच्या मानाने कमी मानसन्मानात, हालअपेष्टात व सामाजीक अहवेलना असनारे जीवन जगायला लागायचे. "रौशनी + रौशनी - अवांतर " वाचुस्तोवर ह्या खरोखरीच "पुस्तकी कल्पनाच" वाटायच्या, पण आज हे सर्व तात्यांच्या शब्दात व नजरेने पाहुन मन सुन्न झाले ...
छे, देव एखाद्यावर फारच अन्याय करतो वा भविष्य वाटताना जरासे माप चुकीच्या बाजुला झुकवतो असे वाटायला लागले आहे ...

सर्व आयुष्य अगदी आरामात एखाद्या गर्भश्रीमंत घरात सुनबाई म्हणुन टेचात राहुन अथवा फिल्मइंडस्ट्रीत आरामात झकपक रोल मिळवण्याची पात्रता असताना काय आयुष्य जगायला लागते हे पाहुन खरेच कसेकसेच झाले. अर्थात तात्या म्हणतात त्याप्रमाणे अगदीच "वाईट" जरी नसले तरी ह्यापेक्षा भारी आयुष्य नक्कीच तिच्या पदरात पडु शकते / शकले असते असे राहुन राहुन वाटते ...

>>तो सूर्यही जरासा लाचार पाहिला मी..!
निशब्द ..!

तात्या, खरच अप्रतिम उतरलं आहे, असे पहायला व ते तेवढ्याच ताकदीने कागदावर उतरवायला जीगर लागते, ते आपल्यात आहे हे नक्की ...!
असेच लिखाण येऊ देत , त्या शिंच्या मिपा संपादक / मालकाच्या धांदलीत असे "काळीज चिरत जाणारे" लेखन कॄपया बाजुला ठेऊ नका ...!
बाकी काय लिहु, शब्दसंपदा अतिच तोकडी वाटत आहे आज.

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

चतुरंग's picture

17 Feb 2009 - 1:03 am | चतुरंग

अगदी लक्कन काळिज हललं बघ! कुठे कुणाचे ऋणानुबंध असतात ते सांगता येत नाही!
जियो!!

तू असं काही लिहिलंस ना की तुझ्यात मला भाईकाकांच्या रावसाहेबांची काही लक्षणं अगदी प्रकर्षाने दिसतात.
जे काय आहे ते सरळसरळ, आडपडदा नाही! मला तुझ्या अशा स्वभावाचा हेवा वाटतो.
लिहीत रहा. आणि भरपूर लिही रे आजच्या सारखं चटका लावून जाणारं थोडंसंच नको!

चतुरंग

संदीप चित्रे's picture

17 Feb 2009 - 3:38 am | संदीप चित्रे

>> तिच्या त्या 'आओगे ना?' या प्रश्नाच्या टोनमध्ये मला तिची ममत्वाची भूक जाणवली! अगदी विलक्षण जाणवली! कारण तिच्या ठुमक्यांकडे हावरेपणाने बघणारा मी कुणी तिचा गिर्‍हाईक नव्हतो! मी तिथे गेलो होतो तो तिच्या आईच्या ओळखीचा कुणीतरी होतो म्हणून..!

मानलं तात्या.... इतकं प्रामाणिकपणे राहणं अवघड असतं.

मनिष's picture

17 Feb 2009 - 3:40 pm | मनिष

आवडले....भरपूर लिहीत रहा!

प्राजु's picture

17 Feb 2009 - 1:13 am | प्राजु

लेखणीला धार लागली तात्या.
जे लिहिलं... अगदी पार उतरलं काळजात.
निलम.. नावाप्रमाणेच परीसारखी आहे. ती तिथे आहे तिचं दुर्दैव. आणि तुम्ही मायेने भेटायला गेलात, हे तिचं सुदैव.
मस्त लेखन झालंय.
खूप बरं वाटलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

17 Feb 2009 - 1:14 am | मुक्तसुनीत

लिखाण आवडले . "रौशनी"वर लिहा असे तात्यांना अनेकांनी सांगून झालेले मी पाहिले आहे. त्यांची ही लेखमाला वाचकांना नक्की आवडेल. गावकुसाबाहेरच्या जीवनावरचे फर्स्ट हॅन्ड , झगझगीत लिखाण.
असेच लिखाण येत राहो ही शुभेच्छा.

बेसनलाडू's picture

17 Feb 2009 - 1:39 am | बेसनलाडू

"रौशनी"वर लिहा असे तात्यांना अनेकांनी सांगून झालेले मी पाहिले आहे. त्यांची ही लेखमाला वाचकांना नक्की आवडेल.
(सहमत)बेसनलाडू

सर्किट's picture

17 Feb 2009 - 11:21 pm | सर्किट (not verified)

अत्यंत सहमत आहे. रौशनी हा तात्याचा मास्टरपीस आहे. त्याने तू पूर्णतेस न्यावा ही आग्रहाची विनंती.

-- सर्किट

मृण्मयी's picture

17 Feb 2009 - 3:48 am | मृण्मयी

तात्या, मी प्रतिक्रीयेसाठी वापरलेले कुठलेही शब्द तुमच्या 'जीवन डोर' ला न्याय देऊ शकणार नाही!
शब्द खुंटले! बस्स इतकंच!

पक्या's picture

17 Feb 2009 - 4:47 am | पक्या

फारच सुंदर लिहीलयं तात्या. शब्द अपुरे आहेत प्रतिक्रिया देण्यासाठी.
रौशनी चे ही ५ हि भाग वाचून काढलेत. खूपच उत्कंठा वाढली आहे पुढचा भाग वाचण्यासाठी. रौशनीचे ही पुढचे भाग लवकर येऊ द्यात हि विनंती.
नीलम त्या माहोलमधून बाहेर पडू शकली नाही ह्याचे वाईट वाटत आहे.

सहज's picture

17 Feb 2009 - 5:44 am | सहज

लेख खूप आवडला.

नीलम तिथे कशी काय अडकली. रौशनी नक्कीच खंबीर वाटली होती जी नीलमचे आयुष्य ह्याही पेक्षा चांगले करु शकली असती. असो.

आता एक वेगळीच शंका डोक्यात "रौशनी" मालीका अपूर्णच राहणार का? कृपया खुलासा करा.

विसोबा खेचर's picture

17 Feb 2009 - 6:07 am | विसोबा खेचर

जी नीलमचे आयुष्य ह्याही पेक्षा चांगले करु शकली असती.

कोणाच्या मदतीनं? कुठे? नीलमचं रूप पाहिलंस का? अरे त्या महोलमध्ये असतांनादेखील लोकं डोळे फाडफाडून अधाश्या भुकेल्या वाघासारखे बघत असतात! मग बाहेरची तर बातच सोडा!

जशी आपल्या लोकांना त्या वस्तीतल्या अंधाराची कल्पना नसते तशी त्या बायकांनाही बाहेरच्या जगाची काहीच माहिती नसते! कुणाकडे जाणार होती रौशनी त्या मुलीला घेऊन? कुणी ठेऊन घेतलं असतं? पोटापाण्याचं काय? धुण्याभांड्यांची कामं रौशनी करू शकली असती का? तिनं केली असती का? प्रश्न अनेक आहेत..! महिन्याला हजार-दोन हजार कमावणारा एक तात्या अभ्यंकर रौशनी आणि तिच्या मुलीकरता कुठवर पुरी पडणार होता? अशक्य होतं ते, आजही आहे!

आज तरी शक्य आहे का मला त्या मुलीला घेऊन माझ्या घरी येणं किंवा अन्य कुठल्या चांगल्या जागी ठेवणं? आणि काय गॅरेंटी तिला ते पटेल? खर्चाचं काय? उदरनिर्वाहाचं काय? बरं, परत लोकांना काय सांगू? घरी काय सांगू? लोक असंच म्हणणार ना की तात्याने एक बाई ठेवली आहे?! :)

प्रश्न अनेक आहेत..!

त्या माहोलबाबत,

तो सूर्यही जरासा लाचार पाहिला मी..!

हेच खरं!

तात्या.

सहज's picture

17 Feb 2009 - 6:16 am | सहज

मुलीला हॉस्टेल/परगावी उच्च शिक्षण, पैसा व्यवस्थीत जोडून, लग्न लावून, कुठल्या संस्थेची मदत घेउन इ इ ह्या स्थितीतुन बाहेर देउ या. पण ते सोडून देउ या.. बर बॉ असेल अशक्य तिला. मान्य.

पण "लोकांना काय सांगू?" असा प्रश्न कधी तुमच्याच तोंडून ऐकायला मिळेल असे कधीच वाटले नव्हते ;-)

तो सूर्यही जरासा लाचार पाहिला मी..!

बरं रौशनी मालीका चालू रहाणार की अपूर्णच हे नाही सांगीतलेत :-(

ते जे खातेरे आहे, तिथून त्या दुर्दैवी स्त्रीया सहजपणे बाहेर येऊ शकतील असे वाटते काय तुम्हाला? तिथे त्यांच्या जीवावर रहाणारे अनेक आहेत, त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. ते कुठल्याही स्त्रीला (ती त्यांच्या पोटापाण्याच्या दृष्टिने पूर्णपणे 'टाकाऊ' होत नाही, तोपर्यंत) बाहेर जाउ देणारच नाहीत. ती जे ते 'जीवन डोर तुम्हीसंग बांधी, क्या तोडेंगे इस बंधन को, जग के तूफां, आँधी रे आँधी' म्हणत होती ते कुठल्याही राजकुमाराला उद्देशून नव्हते, तर त्या खातेर्‍याला उद्देशून होते. तेच तिचे जीवन आहे, त्यातून तिची व तिच्यासारख्या अनेक स्त्रीयांची सुटका कठीण आहे.

आपण नुसते 'वो सुबह कभी तो आएगी' म्हणतच बसायचं!

सुनील's picture

17 Feb 2009 - 6:57 am | सुनील

जशी आपल्या लोकांना त्या वस्तीतल्या अंधाराची कल्पना नसते तशी त्या बायकांनाही बाहेरच्या जगाची काहीच माहिती नसते!
१००% सहमत.

कोणाच्या मदतीनं?
तात्या, मदत हे नेहेमीच पैशाचे असते असे नाही. ज्याला पाण्याबाहेर यायचयं त्याला एका हाताचा आधारदेखिल पुरेसा असतो!

असो. नेहेमीप्रमाणेच अगदी डोळ्यासमोर चित्र उभे करणारे लिखाण. सुंदर.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसुनाना's picture

17 Feb 2009 - 11:51 am | विसुनाना

आणि काय गॅरेंटी तिला ते पटेल? खर्चाचं काय? उदरनिर्वाहाचं काय? बरं, परत लोकांना काय सांगू? घरी काय सांगू? लोक असंच म्हणणार ना की तात्याने एक बाई ठेवली आहे?!

यावरून एक घडणारं उदाहरण डोळ्यासमोर आलं. पोटच्या पोरीच्या वयाच्या मुलीलाही जर एक पुरुष मदत करत असेल तर त्याच्या हेतूबद्दल वाईट शंका हमखास घेतली जाते हे प्रत्यक्ष पाहतोय.

तात्या, धाडस करा असं इथून लांबून सांगणं फार फार सोपं आहे.
सूर्य लाचार असला तरी निदान अंधारापर्यंत प्रकाश घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय हे अगदी उच्च आहे.

रेवती's picture

17 Feb 2009 - 6:01 am | रेवती

बर्‍याच प्रतिक्षेनंतर रौशनीचा भाग आल्यामुळे उत्सूकता होतीच.
लेख चांगला झालाय. असे असले तरी नीलमबद्दल अनेक प्रश्न मनात येत राहतात.
एकूण, त्या वेगळ्याच दुनियेतले प्रश्न भरपूर आणि उत्तरं फारशी नाहीतच असं वाटतं.

रेवती

अनिल हटेला's picture

17 Feb 2009 - 6:15 am | अनिल हटेला

आजचा दिवस चांगला जाणार बहुधा !!
सकाळी -सकाळी रोशनीचा भाग वाचायला मिळाला !!
साधं पण ह्रदयस्पर्शी लिखाण !!
सिंपली ग्रेट !!! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Feb 2009 - 6:43 am | llपुण्याचे पेशवेll

वाह वाह. छान तात्या. नि:शब्द.
(सूर्यही जरासा लाचार पाहीला मी अक्षरशः पटले रे )
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

तात्या , तुमचा प्रामाणीकपणा मला नेहेमीच आवडतो.
या सगळ्या अनुभवांना अलंकृत न करता छोट्या छोट्या वाक्यात केलेलं लिखाण त्यामुळे बटबटीत न वाटता एक अस्सल अनुभव वाचल्याचा आनंद येतो.
असं सगळं आयुष्य बघूनही एखाद्या सुडो सोशालीस्टासारखं यांचं लाइफ सुधारायला काय करता येईल याची चर्चा नसते.

पुन्हा तिथे जाईन की नाही हे मला माहीत नाही!

खोट्या भूमीका घेणं हे तुमच्या स्वभावात नाहीच असं वाटतं.

डॉ.प्रसाद दाढे's picture

17 Feb 2009 - 7:00 am | डॉ.प्रसाद दाढे

असेच म्हणतो..
जिन्हे नाझ है हिन्दपर वो कहा॑ है? खूप कळवळत॑ हो, काय करू शकतो
आपण त्या॑च्यासाठी कृपया सा॑गा..

मीनल's picture

17 Feb 2009 - 7:06 am | मीनल

प्रथमच पण सर्व भाग वाचून काढले.
नुसत ऐकून असलेली ती दुनिया तुम्ही तुमच्या लिखाणाने नजरेसमोर उभी केली.

मीनल.

आनंदयात्री's picture

17 Feb 2009 - 7:15 am | आनंदयात्री

तिच्या त्या 'आओगे ना?' या प्रश्नाच्या टोनमध्ये मला तिची ममत्वाची भूक जाणवली! अगदी विलक्षण जाणवली! कारण तिच्या ठुमक्यांकडे हावरेपणाने बघणारा मी कुणी तिचा गिर्‍हाईक नव्हतो! मी तिथे गेलो होतो तो तिच्या आईच्या ओळखीचा कुणीतरी होतो म्हणून..!

खुप छान लिखाण. नेहमीची तात्या स्टाईल वाक्यरचना. स्वगत, कथन अन संवाद यांची उत्तम सरमिसळ !! लिखाणाला प्रवाही वाचनीय ठेवणारी.

अवांतरः एकेकाळी तात्यांचे असे लिखाण निरनिराळी व्यक्तीचित्र भरभरुन वाचायला मिळायची, सकाळी आंतरजालावर आले की तात्या अभ्यंकराचा असा एखादा लेख अन खाली प्रतिसादाची जंत्री असे चित्र काहे विरळा नसायचे. आता मात्र आहे. काल परवाच प्राजुला "संपादकगिरीच्या ओझ्याखाली तुझा सचिन झाला नाही हे छान" असे शब्द्शः म्हटले होते, तात्यांचीही लेखणी चालत रहावी. आम्हीही आंतरजालावर दर्जेदार लिखाण वाचत रहावे.

यशोधरा's picture

17 Feb 2009 - 7:17 am | यशोधरा

सुरेख लिहिलय! नीलम पण किती सुंदर दिसतेय!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Feb 2009 - 8:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तात्या, खूपच सुंदर लिखाण.

(आजच रौशनीचाही फोटो पाहिला आणि खूप वाईट वाटलं. म्हणे, यक्षांना शाप असतात, पण अप्सरांनाच्याही वाट्याला काही कमी भोग नाहीत.)

अदिती

ढ's picture

17 Feb 2009 - 1:27 pm |

तात्या,

सुरेख लिखाण!!!

(अप्सरांच्याच वाट्याला जास्त भोग असतात बरेचदा.)

चित्रा's picture

17 Feb 2009 - 7:53 am | चित्रा

लेखन आवडले.
नीलमचे वय कळले नाही. तिच्याबद्दल बोलताना रौशनीचा उल्लेख "होती" वगैरे असल्याने नक्की काय झाले असावे असा प्रश्न पडला.
वाचून वाईट वाटले, पण याबद्दल नंतर कधीतरी.

स्मिता श्रीपाद's picture

17 Feb 2009 - 9:00 am | स्मिता श्रीपाद

तात्या,

तुमच्या या लेखावर प्रतिक्रिया देण्याइतकी माझी कुवत नाहीये...
फक्त इतकच म्हणेन....

तुम्हाला सलाम.................!!!
असेच लिहिते राहा ...

-स्मिता

त्रास's picture

17 Feb 2009 - 7:14 pm | त्रास

+१
"तुमच्या या लेखावर प्रतिक्रिया देण्याइतकी माझी कुवत नाहीये..."

मलाही हेच वाटले.

ब्रिटिश's picture

17 Feb 2009 - 12:27 pm | ब्रिटिश

बहोत आच्छे ! बढीया ! बाल्या खुश हुवा |

मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

साती's picture

17 Feb 2009 - 12:47 pm | साती

तात्या, अतिशय प्रामाणिक अनुभव खूप छान लिहिला आहे.
असेच लिहित रहा.
साती

प्रमोद देव's picture

17 Feb 2009 - 1:11 pm | प्रमोद देव

अतिशय प्रामाणिक! ..ह्या सातीच्या मताशी सहमत आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Feb 2009 - 1:36 pm | बिपिन कार्यकर्ते

अतिशय प्रांजळ लिखाण. नेहमीप्रमाणे सिक्सर.

बिपिन कार्यकर्ते

शाल्मली's picture

17 Feb 2009 - 3:11 pm | शाल्मली

अतिशय प्रांजळ लिखाण. नेहमीप्रमाणे सिक्सर.
असंच म्हणते.

तात्या, फारच छान!

--शाल्मली.

साती's picture

18 Feb 2009 - 3:45 pm | साती

प्र.का.टा.

नाटक्या's picture

17 Feb 2009 - 1:09 pm | नाटक्या

तात्या,

अहो संत नामदेवांच्या वेळेस एक वेश्या होती. आख्या गावाला तिने वेड लावले होते. एकदा ती असे म्हणाली होती कि नामदेव जेव्हा तिच्याकडे बघायचे तेव्हा तिला त्यांच्या डोळ्यात कधी 'पुरुष' दिसत नाही तर त्यांच्या डोळ्यात तिला कायम अथांग करूणेचा झराच दिसला. या गोष्टीची आज आठवण झाली.

- नाटक्या

विसोबा खेचर's picture

17 Feb 2009 - 3:15 pm | विसोबा खेचर

एकदा ती असे म्हणाली होती कि नामदेव जेव्हा तिच्याकडे बघायचे तेव्हा तिला त्यांच्या डोळ्यात कधी 'पुरुष' दिसत नाही तर त्यांच्या डोळ्यात तिला कायम अथांग करूणेचा झराच दिसला. या गोष्टीची आज आठवण झाली.

नि:शब्द..!

परंतु मी मात्र नामदेव नाही. माझेही पाय मातीचेच आहेत रे! नीलमला लहानपणापासून पाहिलं आहे म्हणून तसं काही वाटलं नाही. तिच्या जागी अन्य कुणी अशी देखणी मुलगी असती तर माझं मन चाळवलं नसतं असं नाही..! खिशात पैसेही होते..!!!!

असो..

नामदेव एकच असतात..! परक्या तरूण पोरीत आपल्या मातोश्रींचा चेहेरा पाहणारे शिवछत्रपती एकच असतात..! खर्‍या अर्थाने एकमेवाद्वितीय...!

बाकी तुम्हाआम्हा मंडळींचे पायही मातीचेच रे!

आपला,
(प्रांजळ) तात्या.

नाटक्या's picture

17 Feb 2009 - 9:42 pm | नाटक्या

तात्या,

माझे पाय मातीचे आहेत हे अगदी मान्य.

तिच्या जागी अन्य कुणी अशी देखणी मुलगी असती तर माझं मन चाळवलं नसतं असं नाही..
ते चाळवलं नाही यामध्येच सारं काही आलं. आपल्या पोटच्या पोट्च्या पोरीवर, सख्ख्या पुतणीवर/भाचीवर, शेजारच्या लहानग्या पोरींवर अत्याचार करणारे महाभाग पाहीलेत तर या कशावरच विश्वास उरत नाही. त्या पार्श्वभूमीवर तुमचे हे वागणे देखील डोळ्यातं अश्रू उभे करतात आणि या जगात माणूसकी शिल्लक आहे असे पुन्हा वाटायला लागते.

काय लिहू.. शब्दच संपले....

- नाटक्या

विसोबा खेचर's picture

17 Feb 2009 - 10:49 pm | विसोबा खेचर

आपल्या पोटच्या पोट्च्या पोरीवर, सख्ख्या पुतणीवर/भाचीवर, शेजारच्या लहानग्या पोरींवर अत्याचार करणारे महाभाग पाहीलेत तर या कशावरच विश्वास उरत नाही.

खरं आहे! असतात असे काही नराधम!

तात्या.

अप्पा जोगळेकर's picture

19 Jun 2010 - 4:22 pm | अप्पा जोगळेकर

तात्या, छान लिहिलं आहेत. आणि ह्या नीलम बाई पण फारच सुंदर आहेत. डोळे निवले.

नामदेव जेव्हा तिच्याकडे बघायचे तेव्हा तिला त्यांच्या डोळ्यात कधी 'पुरुष' दिसत नाही तर त्यांच्या डोळ्यात तिला कायम अथांग करूणेचा झराच दिसला.
अहो हे काही तितकंसं खरं वाटत नाही. माझ्या मते या अशा कथा महापुरुषांबाबत नेहमीच रचल्या जातात. तात्यांनी प्रतिसादामध्ये शिवछत्रपतींबाबत जे लिहिले आहे तेदेखील तितकेसे पटले नाही. पण जाऊंदे अवांतर होतंय त्यामुळे तो विषय टाळतो. असंच छान लिवत र्‍हावा तात्या.

वल्लरी's picture

17 Feb 2009 - 1:14 pm | वल्लरी

खरचं खुप छान लिहीता तुम्ही तात्या.... :)
सगळे भाग वाचुन काढ्ले...
---वल्लरी

अवलिया's picture

17 Feb 2009 - 1:25 pm | अवलिया

छान लिहिले आहे तात्या...

--अवलिया

लवंगी's picture

19 Jun 2010 - 5:25 am | लवंगी

छान लिहिलय.. सरळ साध.. नीलम गोड आहे.. निरागस वाटतेय..

झेल्या's picture

17 Feb 2009 - 1:46 pm | झेल्या

सुरेख लिहिलं आहे खूप.

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

चाणक्य's picture

17 Feb 2009 - 1:46 pm | चाणक्य

सुंदर लेख तात्या
अवांतरः रोशनी-६ ची वाट बघतो आहे

शंकरराव's picture

17 Feb 2009 - 2:44 pm | शंकरराव

तात्या, अतिशय प्रामाणिक अनुभव खूप छान लिहिला आहे.
असेच म्हणतो
फोटो टाकल्या मुळे लिखाणाला वजन आलं

शंकरराव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Feb 2009 - 4:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या, लेखन केवळ अप्रतिम. अशाच लेखनाचे आम्ही आपले चाहते आहोत.

''अवांतरः एकेकाळी तात्यांचे असे लिखाण निरनिराळी व्यक्तीचित्र भरभरुन वाचायला मिळायची, सकाळी आंतरजालावर आले की तात्या अभ्यंकराचा असा एखादा लेख अन खाली प्रतिसादाची जंत्री असे चित्र काहे विरळा नसायचे.

आनंदयात्री प्रतिसादात जे म्हणतोय ते मला पटतंय...! तो तात्या हल्ली फार क्वचित दिसतो..तेव्हा तात्याने सतत लिहिते राहावे.

-दिलीप बिरुटे

विनायक प्रभू's picture

17 Feb 2009 - 6:42 pm | विनायक प्रभू

विखे शेठ उघडे पुस्तक आहात. लेख आवडला. एक पार्टी लागु माझ्याकडुन.

सर्वसाक्षी's picture

17 Feb 2009 - 6:52 pm | सर्वसाक्षी

धन्य आहेस रे

प्रकाश घाटपांडे's picture

17 Feb 2009 - 7:02 pm | प्रकाश घाटपांडे

पुन्हा तिथे जाईन की नाही हे मला माहीत नाही!

यासाठीच

"तात्यासाब दुबारा कब आओगे? आओगे ना? जरूर आना..!"

नीलम ने अस म्हटल होत.
तात्या ही जीवनाचा वेगवगळ्या रंगांचा आस्वाद घेणारी वृत्ती आहे. त्यातला हा प्रामाणिक पणा ज्यावेळी संपेल त्यावेळी तात्या ही व्यक्ती या जगात असणार नाही.
द्रष्टा
प्रकाश घाटपांडे

लिखाळ's picture

17 Feb 2009 - 7:11 pm | लिखाळ

वरील सर्वांनी केलेल्या कौतुकाशी सहमत आहे.
-- लिखाळ.

अनुजा's picture

17 Feb 2009 - 8:48 pm | अनुजा

ह्रदयस्पर्शी लिखाण.
रौशनीचे सर्व भाग वाचले. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

विसोबा खेचर's picture

18 Feb 2009 - 5:55 am | विसोबा खेचर

रौशनी लौकरच पूर्ण करतो..

प्रतिसाद देणार्‍या सर्व मायबाप वाचकांचा मी ऋणी आहे..

आपला,
(कृतज्ञ) तात्या.

मी-सौरभ's picture

21 Apr 2010 - 12:08 am | मी-सौरभ

ही गोष्ट संपावायला कसं जमवणार तात्या??

सौरभ

विजुभाऊ's picture

2 Jun 2009 - 10:59 am | विजुभाऊ

या लोकांचे आयुष्य काय असेल याची कल्पना करु शकत नाही.................
बालपण होरपळले की सगळेच करपून जाते

विसोबा खेचर's picture

2 Jun 2009 - 11:31 am | विसोबा खेचर

या लोकांचे आयुष्य काय असेल याची कल्पना करु शकत नाही.................

खरं आहे विजूभाऊ. मी या सर्व गोष्टी खूप जवळून पाहिल्या आहेत. या लोकांच्यात उठलो-बसलो आहे. कधी कधी मनाला खूप त्रास होतो..!

तात्या.

मराठमोळा's picture

2 Jun 2009 - 12:02 pm | मराठमोळा

सुंदर लेख आहे.. (अजुन सर्व भाग वाचलेले नाहीत, नक्की वाचेन )

जगात काही गोष्टी अशा का असतात, कुणामुळे, कशासाठी या प्रश्नांची उत्तरे सर्वांना सापडतीलच असे नाही.
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधत फिरणारा आणी शोधतानाच भक्ती, वात्सल्य, शांत, अद्भुत, वीरं, भयानकं, बीभत्स, करुणं, श्रुंगार, रौद्रं, हास्यं या आयुष्यातल्या सर्व ९+३ रसांचा भोग घेणारा "तात्यासाब" डोळ्यासमोर उभा राहिला माझ्या.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

शार्दुल's picture

2 Jun 2009 - 12:34 pm | शार्दुल

नि:शब्द केलत तुम्ही,,,,,,,,
तुमच्यासारखी प्रामाणिक माणसे खुप कमी आहेत जगात,,,,,

सुन्दर लेखतर आहेच आहे,,,, तुम्हाला सलाम.................!!!

नेहा

sur_nair's picture

21 Apr 2010 - 12:00 am | sur_nair

गुलजारचा 'मौसम' पाहून नेहमी मन चरकायचे. तुमची तर ही अशी सत्यकहाणी. तुमच्या लिहिण्यातून मनातली कळकळ लगेच जाणवते.

मीनल's picture

21 Apr 2010 - 2:37 am | मीनल

किती सुंदर आहे ती!
तोंडावर मेक अपची अनेक रंगीत पुटं चढवलेल्या आताच्या सर्व नट्या हिच्यापुढे फिक्या पडतील.

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

निरन्जन वहालेकर's picture

21 Apr 2010 - 7:18 am | निरन्जन वहालेकर

हट्स ऑफ ! ! !
काय लिहिलं तात्या ! ! ! टचकन डोळ्यांत पाणी आल ! ! !

लॉरी टांगटूंगकर's picture

27 May 2010 - 12:18 am | लॉरी टांगटूंगकर

तुमि अग्दि वेड लिहिल आहे.

विसोबा खेचर's picture

10 Jun 2010 - 9:10 pm | विसोबा खेचर

पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार..

तात्या.

शशिकांत ओक's picture

19 Jun 2010 - 3:00 am | शशिकांत ओक

तात्या,
मानल तु्हाला.
मनाने फोरासरोडवर फिरणारे व प्रत्यक्षात जाऊन येणारे यात जमीन आसमानाचा फरक आहे.
मात्र तो फोटोतून सादर करायला गट्स लागतात.
आधी मी आपला फोटो पाहिला नव्हता. स्थूल आहात असे वाटले होते इतकेच.
मात्र गूढ प्रेमळपणाची व आनंदाची लकेर फोटोतही जाणवते. माणसांवर अनेक प्रसंग येतात. स्त्रियांवर जास्त.
... पण क्या तोडेंगे इस बंधन को जग के तूफाँ आँधी...
शशिकांत

मृगनयनी's picture

19 Jun 2010 - 3:49 pm | मृगनयनी

तात्या, तुम्ही खरोखर एक अजब रसायन आहात! __/\__
:)

चिखलात, दलदलीत राहूनही कमळा'सारखं अलिप्त आणि त्यागी आयुष्य जगणारे खूप कमी लोक असतात.... आणि तात्या... तुम्ही त्यातलेच एक आहात! :|

तुम्हाला सलाम!

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

नि३'s picture

19 Jun 2010 - 5:15 pm | नि३


आणि तात्या... तुम्ही त्यातलेच एक आहात!

तुम्हाला कसे माहीत???

---(त्यातला) नि३.

विसोबा खेचर's picture

19 Jun 2010 - 6:56 pm | विसोबा खेचर

नव्याने प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांना धन्यवाद..
तात्या.