युती संपली, पुढे काय?

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
28 Jan 2017 - 3:27 pm
गाभा: 

जे होणे अटळ होते, जे व्हायलाच हवे होते, जे होणार हे नक्की होते परंतु कधी होणार हा फक्त काही काळाचाच प्रश्न होता, जे व्हावे अशी अनेकांची मनापासून इच्छा होती . . . ते अखेर घडून आलेले आहे. भाजप-शिवसेना यांच्यात मागील २७-२८ वर्षांपासून असलेली महाराष्ट्रातील युती अधिकृतरित्या संपुष्टात आली आहे. २६ जानेवारीला उद्धव ठाकरेंनी युती संपल्याची अधिकृत घोषणा केली. ही घोषणा करतानाच आम्ही आता एकटे लढून महाराष्ट्रावर स्वतःच्या जीवावर भगवा फडकावणार, युतीत आम्ही २५ वर्षे सडलो, आता यापुढे युतीसाठी भिकेचा कटोरा घेऊन कोणाच्या दारात जाणार नाही, तुमची वज्रमूठ मिळाली तर समोरच्याचे दात पाडून टाकू, मुंबईत ११४ जागा मागून आमचा अपमान केला . . . अशी नेहमीचीच फुशारक्या मारणारी विनोदी वाक्ये होतीच.

तशी यांची युती विधानसभा पातळीला २०१४ मध्येच संपुष्टात आली होती. महाराष्ट्रात भाजपचा जनाधार पक्षाच्या स्थापनेपासूनच, म्हणजे १९८० पासून, शिवसेनेच्या तुलनेत जास्त असताना व तो एखाद्या विशिष्ट भागात साचलेला नसून महाराष्ट्राच्या सर्व भागात अस्तित्वात असताना, १९८४ च्या लोकसभेत फक्त २ जागा मिळविलेल्या भाजपने, पक्षविस्तार करण्यासाठी पडती भूमिका घेऊन १९८९ मध्ये शिवसेनेशी युती केली. वास्तविक पाहता ही युती म्हणजे स्कूटरला पुढचे चाक स्कूटीच्या चाकाच्या आकाराचे व मागचे चाक मोटरसायकलच्या चाकाच्या आकाराचे अशी विपरीत जोड होती. शिवसेचेची १९६६ मध्ये स्थापना झाल्यावर १९८५ पर्यंत महाराष्ट्रात ५ वेळा विधानसभा निवडणुक झाली. यापैकी १९६८, १९७३, १९७८ व १९८० च्या निवडणुकीत शिवसेनेला एकही आमदार निवडून आणता आला नव्हता, तर १९८५ मध्ये फक्त १ आमदार निवडून आला होता. नाही म्हणायला १९६८ मध्ये मुंबईत कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांचा खून झाल्यावर (ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय हत्या समजली जाते व यात हत्येचा आरोप शिवसेनेवर होता) झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक निवडून आले होते. म्हणजे ५ विधानसभा निवडणुकीत फक्त २ आमदार ही शिवसेनेची कामगिरी. याउअट भाजपने आपल्या पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या अवतारात १९७७ पर्यंत प्रत्येक निवडणुकीत थोडेसे आमदार निवडून आणले होते. अगदी थोडे आमदार निवडून आणले असले तरी पक्षाचे अस्तित्व त्यातून दिसत होते. १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यावर केवळ दीड महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसची मोठी लाट असतानासुद्धा भाजपने महाराष्ट्राने प. महाराष्ट्र वगळता इतर सर्व भागातून आपले एकूण १२ आमदार निवडून आणले होते. त्या निवडणुकीत शिवसेनेला आधीच्या सर्व निवडणुकांप्रमाणे भोपळा मिळाला होता.

मुंबई व ठाणे हा आपला बालेकिल्ला आहे या भ्रमात अगदी सुरवातीपासून सेना होती. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे २ तुकडे झालेले होते. इंदिरा काँग्रेस व यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटिल, यशवंतराव मोहिते इ. चा समावेश असलेल्या काँग्रेस नेत्यांची रेड्डी काँग्रेस असे दोन्ही तुकडे एकमेकांविरूद्ध लढले. केंद्रात बहुमताने सत्तेवर आलेला जनता पक्ष हा तिसरा पक्ष निवडणुकीत होता. बहुसंख्य मते या ३ पक्षातच विभागली जाणार हे उघड होते. अशा परिस्थितीत आपला बालेकिल्ला समजला जाणार्‍या निदान मुंबई-ठाण्यात तरी सेनेला किमान १०-१२ ठिकाणी विजय मिळायला हवा होता. सेनेने एकूण ३५ उमेदवार उभे करून एकही आमदार निवडून आला नाही. सेनेला मुंबई-ठाण्यातील काही ठराविक वॉर्डांपलिकडे स्थान नाही हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. परंतु ही वस्तुस्थिती सेनेने किंवा सेनेबद्दल सुरवातीपासूनच सॉफ्ट कॉर्नर असलेल्या मराठी माध्यमांनी कधीच उघडपणे मान्य केली नाही.

१९८० च्या लोकसभा निवडणुकीत देशभर इंदिरा गांधींची प्रचंड लाट होती. भारतातील ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी तब्बल ३५५ मतदारसंघात इंदिरा काँग्रेसने विजय मिळविला होता. महाराष्ट्रात सुद्धा इंदिरा काँग्रेसला ४८ पैकी ३९ जागी विजय मिळाला होता. या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने शिवसेनेबरोबर युती करून शिवसेनेला मुंबईतील २ जागा सोडल्या होत्या. महाराष्ट्रात व देशात इंदिरा गांधींची प्रचंड लाट असताना व याच पक्षाबरोबर युती करून आपल्या तथाकथित बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुक लढविणार्‍या सेनेने मुंबईतील दोन्ही जागा खरं तर मोठ्या मताधिक्याने जिंकायला हव्या होत्या. प्रत्यक्षात दोन्ही जागांवर सेनेचा पराभव झाला. मुंबईत फक्त आपलाच आवाज चालतो व मुंबई हा आमचा बालेकिल्ला आहे हा शिवसेनेचा भ्रम पुन्हा एकदा सिद्ध झाला होता.

शिवसेनेने १९७३ मध्ये ठाणे महापालिकेत सत्ता मिळविली होती व नंतर १९७४ मध्ये मुंबईत सत्ता मिळविली होती. ती सत्ता अर्थातच सेनेने पुढील निवडणुकीत गमावली. मुंबई-ठाणे हा आपला बालेकिल्ला आहे हा भ्रम तेव्हापासूनच उराशी बाळगलेला आहे. मुंबई-ठाण्याच्या बाहेर तर सेनेला हिंग लावून कोणी विचारत नव्हते. १९८५ मध्ये सुद्धा सेनेने स्वबळावर विधानसभेच्या काही जागा लढविल्या होत्या. परंतु माझगाव मधून निवडून आलेल्या छगन भुजबळांचा अपवाद वगळता इतर सर्व जागांवर सेनेचा पराभव झाला होता. या निवडणुकीत भाजपने जनता पक्ष, पवारांची समाजवादी काँग्रेस व शेकाप यांच्या युतीत निवडणुक लढवून १६ जागा जिंकल्या होत्या. भाजपला जरी युतीचा फायदा मिळाला होता तरी १९८० मध्ये भाजपने पूर्णपणे स्वबळावर इंदिरा काँग्रेसच्या लाटेत १२ आमदार निवडून आणले होते हे विसरता येणार नाही.

एकंदरीत १९८९ मध्ये युती होण्यापूर्वी आधीच्या निवडणुकीवरून जे चित्र दिसत होते ते असे होते की शिवसेनेला मुंबईत थोडेसे स्थान आहे तर भाजपला सेनेच्या तुलनेत मुंबईसकट इतर सर्व भागात जास्त जनाधार आहे. त्यामुळे युती होताना भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत हवा होता.

परंतु १९८४ च्या लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाच्या अनुभवावरून, प्रसंगी पडती भूमिका घेऊन, स्थानिक पक्षांशी युती करून आपला पक्षविस्तार करायचा असे पक्षाध्यक्ष अडवाणींनी ठरविले होते. त्या धोरणानुसार तामिळनाडूच्या धर्तीवर शिवसेनेशी युती करण्याचे ठरविले गेले. लोकसभेत भाजप ३२ व सेना १६ व विधानसभेत याच्या बरोबर उलटे जागावाटप असे ठरविले गेले. या युतीचे प्रमुख शिल्पकार होते बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन. विधानसभेसाठी भाजप १०५ व सेना १८३ असे विषम जागावाटप भाजपने का मान्य केले हे अनाकलनीय आहे. युतीत पहिल्यापासूनच शिवसेना दादागिरीच्या भूमिकेत होती. आपल्यापेक्षा सेनेचा जनाधार कमी आहे हे स्पष्ट असूनसुद्धा भाजपने दुय्यम भूमिका का स्वीकारली हे एक गूढच आहे. सेनेने फारशी शक्ती नसूनसुद्धा २८८ जागांमधील मोठा वाटा मिळविला व त्याचबरोबरीने भाजपने जोपासलेले व बांधलेले काही मतदारसंघ घशात घातले. १९८० व १९८५ मध्ये पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भाजपच्या अण्णा जोशी यांनी निसटता विजय मिळविला होता. भाजपचा हा हक्काचा मतदारसंघ सेनेने घशात घातला. १९९० ते २००९ या काळात सलग ५ निवडणुकीत या मतदारसंघातून सेनेचा उमेदवार विजयी झाला. मते होती भाजपची पण उमेदवार शिवसेनेचा. हा मतदारसंघ आपलाच आहे हा आधी शिवसेनेचा दावा होता आणि नंतर आपल्या उमेदवाराला मिळालेली मते ही आपलीच आहेत असा भ्रम शिवसेनेला झाला. मतदारांनी शिवसेनेचा भ्रम दूर केला तो २०१४ मध्ये. यावेळी दोघेही एकमेकांविरूद्ध लढले व त्या लढतील भाजपच्या मेधा कुलकर्णींनी आपल्या सेना प्रतिस्पर्ध्यावर तब्बल ६५००० मतांच्या फरकाने विजय मिळविला.

सेनेने जसा शिवाजीनगर ढापला तसाच ठाणे व कल्याणही ढापला. शिवसेनेची ही ढापाढापी २००९ पर्यंत सुरु होती. २००९ मध्ये गुहागरमधून १९८० पासून सातत्याने निवडून येणार्‍या डॉ. नातू पितापुत्रांना डावलून सेनेने हा मतदारसंघ आपल्या घशात घातला. भाजप नेते, आधी महाजन, नंतर मुंडे व गडकरी असहायपणे सेनेसमोर मान तुकवित होते.

यात बदल झाला तो एकदम २०१४ मध्ये. २०१३ मध्ये मोदी-शहा जोडगोळीच्या हातात भाजपची सूत्रे गेल्यावर त्यांनी सेनेची दादागिरी मोडून काढण्याचे ठरविले. समान जागावाटप होत असेल तरच युती नाहीतर स्वबळावर लढण्याची ताठर भूमिका घेऊन सेनेसमोर नमते घेण्यास त्यांनी नकार दिला. महाराष्ट्रात आपणच भारी हा भ्रम तोपर्यंत सेनेच्या मनात ठाम रूजला होता. त्यामुळे सेनेनेही नमते घेण्यास नकार देऊन स्वबळावर निवडणुक लढविली. शेवटी भाजपने १२२ जागा जिंकताना सेनेला फक्त ६३ जागाच जिंकता आल्या व महाराष्ट्रात कोण भारी यावर शिक्कामोर्तब झाले. तसेही यापूर्वीच्या सर्व निवडणुकात भाजपचा स्ट्राईक रेट हा कायमच सेनेपेक्षा जास्त होता. १९९० मध्ये भाजप १०५ पैकी ४२ तर सेना १८३ पैकी ५२, १९९५ मध्ये भाजप ६५ तर सेना ७३, १९९९ मध्ये भाजप ५६ सेना ६९, २००४ मध्ये भाजप ५४ सेना ६२ अशी परिस्थिती होती. भाजपपेक्षा किमान ५० जागा जास्त लढवूनसुद्धा सेनेला भाजपपेक्षा जेमतेम ८-१० जास्त मिळायच्या. २००९ मध्ये तर भाजपने ११९ जागा लढवून ४६ जागा जिंकल्या तर सेनेने तब्बल १६९ जागा लढवून फक्त ४४ जागाच जिंकल्या. चित्र अगदी स्पष्ट होते. परंतु स्वत:च्या ताकदीच्या भ्रमात गर्क असणार्‍या सेनेची वस्तुस्थिती मान्य करण्याची तयारी नव्हती.

२००९ मधील विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ जागांपैकी ६ जागा मनसेने, ५ सेनेने व ४ भाजपने जिंकल्या होत्या (भाजपने अर्थातच सेनेपेक्षा खूप कमी जागा लढविल्या होत्या). सेनेचे मुख्यालय 'मातोश्री' ज्या मतदारसंघात आहे, त्या मतदारसंघात सुद्धा सेनेचा पराभव झाला होता. २०१४ मध्ये भाजप व सेना या दोघांनीही स्वतंत्र लढून अनुक्रमे १५ व १४ जागा जिंकल्या. भाजप सेनेपेक्षा मुंबईत सुद्धा जास्त ताकदवान आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

अशा परिस्थितीत २०१७ च्या महापालिका निवडणुकीत युती करायची असेल तर आम्ही ११४ जागा व सेना ११३ जागा ही भाजपची मागणी योग्यच होती. परंतु याहीवेळी सेनेने अहंकार व वस्तुस्थिती मान्य न करण्याचा हेकेखोरपणा यामुळे हे वाटप मान्य केले नाही आणि आता शौर्याचा आव आणून युती स्वतःहून तोडण्याची घोषणा केली आहे.

भाजपने सेनेबरोबर युती अजिबात करू नये किंवा केल्यास स्वतःच्या अटींवर करावी असे माझे पूर्वीपासूनच मत होते. त्यामुळे सेनेने स्वतःहून युती तोडल्यामुळे मला आनंद झाला आहे.

माझ्या मते फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार्‍या ११ महापालिकांच्या निवडणुकीत खालील चित्र असेल.

१) मुंबई: भाजप ८०-९०, शिवसेना ४०-५०, काँग्रेस ५०-६०

२) ठाणे: मला ठाण्यातील फारशी माहिती नाही. परंतु इथे राष्ट्रवादीसुद्धा प्रबळ आहे. माझ्या मते ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष असेल. भाजप व सेनेला किती जागा मिळतील हे सांगता येणे अवघड आहे.

३) पुणे: भाजप ६०-७० जागा मिळवून सर्वाधिक मोठा पक्ष असेल. त्याखालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेस व तिसर्‍या क्रमांकावर काँग्रेस असेल.

४) नाशिकः भाजप प्रथम क्रमांकावर व शिवसेना द्वितीय क्रमांकावर असेल.

५) पिंपरी-चिंचवडः राष्ट्रवादी काँगेस सर्वाधिक मोठा पक्ष असेल.

६) नागपूरः भाजपला बहुमत मिळेल.

७) अकोला: बहुजन महासंघ, काँग्रेस व भाजप या तीन पक्षात जोरदार चुरस असेल.

८) अमरावती: अमरावतीबद्दल फारशी माहिती नाही.

९) सोलापूरः काँग्रेस प्रथम क्रमांकावर व भाजप दुसर्‍या क्रमांकावर असेल.

१०) उल्हासनगर: इथे कलानी घराण्याची मोनोपॉली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी प्रथम क्रमांकावर असेल.

११) भिवंडी: फारशी माहिती नाही.

भाजप महापालिका पातळीवर अजूनपर्यंत तरी कच्चा खेळाडू आहे. महाराष्ट्रातील २१-२२ महापालिकांपैकी फक्त नागपूरमध्ये भाजप सत्तेवर आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस प्रत्येकी ४-५ महापालिकेत सत्तेवर आहेत. नाशिकमध्ये मनसे, वसई-पालघर मध्ये बहुजन विकास आघाडी, अकोल्यात बहुजन महासंघ, कोल्हापूरमध्ये स्थानिक आघाडी सत्तेवर आहेत. २०१७ मध्ये भाजप नागपूरव्यतिरिक्त पुणे, मुंबई व नाशिकमध्ये सत्तेवर येण्याची शक्यता आहे. शिवसेनेला मुंबई व ठाणे या दोन्ही महापालिकात सत्ता गमवावी लागेल. या दोन्ही महापालिका म्हणजे शिवसेनेचा प्राणवायू आहे व प्राणवायूचा पुरवठा बंद झाला की मृत्यु अटळ असतो. शेकाप, मनसे, मगोप अशा स्थानिक पक्षांप्रमाणेच शिवसेना देखील पूर्णपणे irrelevant होणार आहे. त्याची सुरूवात २०१४ मध्ये झाली, २०१७ मध्ये त्यावर शिक्कामोर्तब होईल व २०१९ मध्ये शिवसेना पूर्णपणे अस्तित्वहीन झालेली असेल. निदान २०१७ च्या निकालानंतर तरी शिवसेनेच्या फुशारक्या व बढाया थांबाव्यात अशी अपेक्षा आहे. शिवसेना लगेचच फडणवीस सरकारचा पाठिंबा काढून घेईल असे वाटत नाही. परंतु तशी चूक केल्यास चांगले काम करणारे सरकार अस्थिर केल्याचा व मध्यावधी निवडणुकीचा दोष शिवसेनेच्या माथ्यावर येऊन त्यांना किंमत द्यावी लागेल.

प्रतिक्रिया

का भाजप बेस्ट असं आडून सांगताय ? असो कोणताही पक्ष अस्तित्वहीन होत नसतो . मोदी शहा जोडगोळी ह्यातले शहा तर उदात्त विचारसरणीचे आहेत त्यामुळे झपाट्याने हाव वाढली आहेच पक्षाची तिट्यानंच भारी पडणारे . अजूनही मोदींच्या नावावर पक्ष जोरदार चालतोय त्याची कर्ण वेगळी तो हा विषय नाही.
उल्हासनगर मध्ये ओमी कलानी ला आपल्यात घ्यायला भाजप धडपडत आहे ज्या कलानी वर आरोप भाजप जीव तोडून करत होती . छान इनकमिंग चालू आहे पक्षाचं. परवाच एन डी तिवारी पावन झाले पक्षात येऊन .ठाण्यात शिवसेनेच्या जागा जास्त येणार भाजप ला अजून सगळ्या जागांवर उमेदवार सापडलेले नाहीत ठाण्यात . कल्याण डोंबिवली मधील २०१० चा निकाल पहा २०१५ ला मोदी असताना म्हणजे सेने भाजप वेगवेगळे लढले तेव्हा फडणवीसांनी अफाट योजना जाहीर केल्या त्या योजना आणि मोदीलाट होऊन परत २०१५ चा निकाल पहा . ह्या उप्पर त्यातली एक तरी योजना चालू झाली का ह्याची हे पहा .नागपूर भाजप तर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी फिक्स आहे .नाशिक सेने च आणि मनसे चा गणित जुळलं तर भाजप प्रथम क्रमांकावर नाही येणार . पुणे पॅटर्न काहीच सांगू शकत नाही काय होईल .सोलापूर काँग्रेस किंवा आघाडी . भिवंडी कपिल पाटील ह्यांच्यामुळे भाजप च्या जागा निश्चित वाढणार आहेत .तिथे युती करावी लागेल नाही केली तर काय हा प्रश्नच आहे कारण सेनेची हि वोट बँक आहे तिथे .मुंबई बद्दल मनसे काय स्टॅन्ड घेतेय ते पाहावं लागेल . अकोला भाजप वाटतंय पण अकोला अमरावती तिकडचेच सांगू शकतील .

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2017 - 2:35 pm | श्रीगुरुजी

का भाजप बेस्ट असं आडून सांगताय ? असो कोणताही पक्ष अस्तित्वहीन होत नसतो . मोदी शहा जोडगोळी ह्यातले शहा तर उदात्त विचारसरणीचे आहेत त्यामुळे झपाट्याने हाव वाढली आहेच पक्षाची तिट्यानंच भारी पडणारे . अजूनही मोदींच्या नावावर पक्ष जोरदार चालतोय त्याची कर्ण वेगळी तो हा विषय नाही.

पक्ष प्रवाही नसले, त्यात नवीन नेतृत्व निर्माण झाले नाही, काळानुसार पक्षाने आपल्यात बदल घडविला नाही, पक्षवृद्धीसाठी प्रयत्न केले नाहीत तर पक्ष अस्तित्वहीन होतात. भारतात यापूर्वी अनेक पक्ष अस्तित्वहीन झालेले आहेत. जनता पक्ष, जनता दल, शेकाप, मनसे, निजद, मगोप, कर्नाटकमधील कै. रामकृष्ण हेगडे यांचा जनशक्ती पक्ष असे अनेक पक्ष अस्तित्वहीन झाले आहेत. डावे पक्ष अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर आहेत. रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट अस्तित्वहीन आहेत. अजितसिंगचा रालोद त्याच मार्गावर आहे. शिवसेना देखील त्याच मार्गावर आहे.

फेदरवेट साहेब's picture

29 Jan 2017 - 3:48 pm | फेदरवेट साहेब

पक्षवृद्धी ! कसले गोग्गोड शब्द वापरता हो!

इतिहास अन आकडेवारी मांडता आहात तर एक सांगा. इतिहासात ज्यांना शिव्या देतच भाजपने राजकारण चालवले आज त्यांना लाल रुजामे अंथरून पक्षात प्रवेश देणे म्हणजेच पक्षवृद्धी का हो महाराज?

कोणाला नाव पण माहिती नाही असे असतील त्यांच्याबाबत असे विधान केले तर चालेल . पण ज्या पक्षांना अनेक वर्षांचा इतिहास आहे अश्याना तुम्ही डायरेक्ट अस्तित्वहीन केले ह्याचे सखेद आश्चर्य वाटते .१९८५ ला भाजप अस्तित्वहीन होता आज ३० वर्षाने झाला का?? काहीतरी निवडणुकांचे निकाल आले ज्याला २-३ वर्ष नाही झाली त्याला आपण डायरेक्ट अस्तित्वहीन होणार म्हणतात . फारतर प्रभाव कमी जास्त होत असेल शेकाप आजही रायगड मध्ये आहे आजही शेकाप चा आमदार आहे .निवडणुकांच्या तोंडावर निघालेले पक्ष ,वेगवेगळी दले आणि एखाद्या विचारसरणीवर आधारलेला पक्ष ह्यात आपली गल्लत होत आहे . त्यामुळे जे पक्ष विचारसरणी वर आधारलेले असतात ते अस्तित्वहीन होत नसतात . आणि शिवसेना हि अस्तित्वहीन होणार असा आपला आशावाद असेल तर शुभेच्छा. निकाल वर खाली होतात पक्ष नाही त्यामुळे वरील लाइन मध्ये सगळ्यांना आपण एकाच रेषेत बसवलाय असो .

औरंगजेब's picture

28 Jan 2017 - 5:05 pm | औरंगजेब

खरतर ठाण्यानै शिवसेनेला तेव्हाच २०१४-विधानसभा ला फाटकारले होते नौपाड्यात संजय केळकर निवडून आले होते आणी आहेत
ठाणे नौपाडा हा भाग कायमच भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे पण ठाण्यात भाजप सेनेला एकहाति सत्ता मिळणे अशक्य आहे.

वरुण मोहिते's picture

28 Jan 2017 - 9:34 pm | वरुण मोहिते

बाजूला कोपरी पाचपाखाडी ला सेनेचा आमदार आहे ,पुढे ओवळा माजिवडा ला सेनेचा आमदार आहे २००९ पासून.२०१४ ला पहिल्यांदा नौपाड्यात भाजपाची सीट आली त्या आधी १९९० पासून ती जागा शिवसेनेकडे आहे . नौपाड्यात २-३ नगरसेवक म्हणजे बालेकिल्ला नाही ते हि आपण सांगताय तेव्हा आनंद दिघे ठाण्यात होते २००१ पर्यंत तेव्हा आणि आणि पुढेही नौपाड्याची जागा सेनेकडेच होती .

गॅरी ट्रुमन's picture

30 Jan 2017 - 11:47 am | गॅरी ट्रुमन

ठाणे नौपाडा हा भाग कायमच भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे

१९९७ मध्ये ठाण्यात शिवसेना आणि भाजप युती नव्हती. त्यामुळे शिवसेना आणि भाजप उमेदवार एकमेकांविरूध्द लढले होते. मागे एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे आमच्या वॉर्डातून शिवसेनेचे विलास सामंत निवडून आले होते. तर आमच्या शेजारच्या वॉर्डातून भाजपच्या विमल दाते निवडून आल्या होत्या (माझ्या आठवणीप्रमाणे तो वॉर्ड महिलांसाठी राखीव होता). विशेष म्हणजे याच वॉर्डात ठाण्याचे खासदार प्रकाश परांजपे आणि आमदार मो.दा.जोशी (दोघेही शिवसेनेचे) या दोघांचीही निवासस्थाने होती. किंबहुना विमल दाते आणि मो.दा.जोशी यांची निवासस्थाने चालत दीड मिनिटाच्या अंतरावर होती*. खासदार आणि आमदार हे दोघेही राहात असलेल्या वॉर्डातून शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला ही त्यावेळी मोठी बातमी झाली होती. १९९७ नंतर ठाणे सोडल्यामुळे या भागात नंतर काय झाले हे विशेष ट्रॅक केले नव्हते.

नौपाड्यात संजय केळकर निवडून आले होते आणी आहेत

हो बरोबर. पण तरीही विधानसभा आणि महापालिका निवडणुकांचे डायनॅमिक्स पूर्ण वेगळे असल्यामुळे असेच निकाल महापालिका निवडणुकांमध्ये लागतील असे म्हणता येणार नाही. तरीही नौपाड्यातील सुशिक्षित मराठी आणि बहुतांशी उच्चवर्णीय सुशिक्षित भागात शिवसेनेला पूर्वीइतका सहज विजय मिळेल असे वाटत नाही. १९९२ च्या महापालिका निवडणुकांच्या वेळी विलास सामंत आमच्या घरीही प्रचारासाठी आले होते. आमच्या बिल्डिंगमध्ये त्यांना "इथे प्रचारातला वेळ फुकट घालवायची काही गरज नाही-- आमची मते तुम्हालाच मिळणार आहेत" असेही सांगितले गेले होते हे पण लक्षात आहे. आता परिस्थिती काय आहे याची कल्पना नाही. आणि नौपाड्यात फार तर मनपामध्ये ३-४ वॉर्ड असतील त्यामुळे एकट्या नौपाड्यावरून निवडणुकांचे निकाल ठरणार नाहीत.

ठाणे मनपा भागात कळवा, मुंब्रा हे पण येतात आणि तिथे राष्ट्रवादीचे बळ बरेच आहे आणि त्यामानाने शिवसेना तिथे कमकुवत आहे. हा जितेंद्र आव्हाड आणि वसंत डावखरेंचा प्रभाव असलेला भाग आहे. तेव्हा ठाण्यातील निकाल बघणेही रोचक ठरेल.

*: मो.दा.जोशी सगळ्यात पहिल्यांदा १९९० मध्ये विधानसभेवर निवडून गेले. २००३ मध्ये त्यांचे निधन होईपर्यंत ते आमदार होते. १३ वर्षे आमदार असूनही शेवटपर्यंत ते एका लहान बोळातील दोन खोल्यांच्या चाळीतील घरातच राहात होते. विमल दातेही कमीतकमी ५ (बहुदा १० सुध्दा) वर्षे नगरसेवक असूनही अशाच एका दोन खोल्यांच्या साध्या घरातच राहायला होत्या. त्या काळी आपण किती साधे याचे ढोल पेपरमध्ये जाहिराती देऊन पिटायची फॅशन आली नव्हती. आणि तशी फॅशन आली असती तरी या दोघांनी तसे ढोल नक्कीच पिटले नसते याची खात्री आहे.

मो.दा.जोशी १९८६ मध्येही ठाणे मनपावर निवडून गेले होते. १९८६ मध्ये शिवसेनेला मनपामध्ये निसटते बहुमत मिळाले होते. १९८९ मध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा एका मताने पराभव झाला होता.याचे कारण शिवसेनेचे एक मत फुटले होते आणि एका शिवसेना नगरसेवकाने काँग्रेसच्या बाजूने मत दिले होते. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना राजीनामा द्यायचा आदेश दिला होता. त्यात मो.दा.जोशींनीही राजीनामा दिला होता. शिवसेनेचे लुईसवाडीतील नगरसेवक श्रीधर खोपकर यांनी शिवसेनेच्या भाषेत 'गद्दारी' केल्यामुळे नंतर त्यांचा खून झाला आणि त्या प्रकरणात आनंद दिघेंनाही काही दिवस तुरूंगात जावे लागले होते.

गामा पैलवान's picture

28 Jan 2017 - 5:41 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

तुमच्या लेखातलं हे वाक्य कळीचं आहे :

२००९ मध्ये गुहागरमधून १९८० पासून सातत्याने निवडून येणार्‍या डॉ. नातू पितापुत्रांना डावलून सेनेने हा मतदारसंघ आपल्या घशात घातला.

हा मतदारसंघ शिवसेनेला मिळालेला नसून भाजपने सोडलेला आहे. भाजपमधल्या कोणीतरी दलाली करून नातूंचा पत्ता कापला हे उघड आहे. त्याचा दोष शिवसेनेकडे कसा येतो?

राबणाऱ्या कार्यकर्त्याची शिवसेनेला कधीच कमतरता पडली नाही. भाजपला पडतेय. नातूंसारख्या हाडाच्या कार्यकर्त्याच्या तोंडाला पानं पुसली तर मतदारांनी भाजपला मतं का द्यायची, असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणूनंच भाजपला संघाच्या कार्यकर्त्यांवर अवलंबून राहावं लागतं. कारण ते नि:स्वार्थ वृत्तीने कार्य करतात. भाजप जसा राजकीय पक्ष आहे तशी शिवसेना नाही. शिवसेनेचं मूळ स्वरूप (म्हणजे स्थापनेमागचं उद्दिष्ट) राजकीय पक्ष बनणे नसून एक चळवळ चालवणे अशा प्रकारचं आहे. शिवसेना स्वत:चा कार्यकर्ता स्वत:च बनवते. हा दोहोंत फरक आहे.

जाताजाता : शिवसेनेच्या ५ आमदारांच्या हत्या राजकीय समजल्या जात नाहीत. त्या खंडणीसाठी झाल्या. अगदी तशीच कृष्णा देसाईची हत्याही टोळीयुद्धात झालेली आहे. तिला राजकीय रंग फासला गेलाय.

आ.न.,
-गा.पै.

फेदरवेट साहेब's picture

28 Jan 2017 - 6:41 pm | फेदरवेट साहेब

युती संपली, पुढे काय?

भाजप भक्त शिवसेना कशी हलकट आहे अन आता कशी खड्ड्यात जाणार आहे ते कोकलत बसणार (जे वरती दिसलेच) अन सेनेचे बोके अंगावर पिवळा रंग फासून काळे पट्टे ओढून आम्हीच कसे वाघ अशी म्याव म्याव (त्यांच्यालेखी डरकाळ्या) फोडत बसणार.

बाकी रस्त्यावरचे खड्डे, सांडपाणी निचरा, सार्वजनिक वाहतूक वगैरे जाऊ दे खड्ड्यात.

mayu4u's picture

28 Jan 2017 - 7:51 pm | mayu4u

गेल्या कित्येक पालिका निवडणूक त्याच त्या मुद्द्यांवर लढवतायत...

पुंबा's picture

30 Jan 2017 - 1:25 pm | पुंबा

++११११

वरुण मोहिते's picture

28 Jan 2017 - 10:55 pm | वरुण मोहिते

कलानी गट आणि भाजप ची युती झाली बर का . जेव्हा विद्यमान मुख्यमंत्री पारदर्शकतेवर भाषण ठोकत होते. काय गुंड आयात करत आहेत नागपूरपासून ते मुंबई पर्यंत चालू द्या . २ -३ वर्षात छान प्रगती आहे .कुठल्या तोंडाने शिवसेना राष्ट्रवादी वर आरोप करतात हाच मोठा प्रश्न आहे .
बाकी वर म्हटलंय भाजप महापालिकेत अजून तरी कच्चा खेळाडू आहे परत सेनेसोबत तुलना करताना म्हटलंय कि भाजप कसा मोठा होता, स्ट्राईक रेट ,हक्काचे मतदारसंघ , म्हणजे नक्की काय मोठा होता तर पालिकेत कच्चा खिलाडू कसा क्काय ?? लॉजिक काय आहे ?

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2017 - 2:27 pm | श्रीगुरुजी

अगदी सोपे लॉजिक आहे. भाजपचा जनाधार सेनेपेक्षा सुरवातीपासूनच जास्त आहे. शिवसेना जो भाग स्वतःचा बालेकिल्ला वगैरे समजते, तिथे प्रत्यक्षात भाजपच्या मदतीने भाजपची मते सेनेला मिळाली आहेत. युती तुटल्यामुळे ही मते आता सेनेला मिळणार नाहीत व सेना उडवित असलेले फुगे फटकन फुटतील.

वरुण मोहिते's picture

29 Jan 2017 - 4:55 pm | वरुण मोहिते

आहे . पूर्वीपासून भाजप मोठा होता तरी महापालिकेत कच्चा होता . भाजप मुळे सेनेला मत मिळाली १९९० पासून .तरी हि औदार्य दाखवून भाजप झुकती बाजू घेत होता . सेनेचा प्रभाव नव्हता तरीही डबल औदार्य दाखवून जास्त जागा सोडत होता . सत्ता अली तेव्हापण मुख्यमंत्रीपद आनंदाने सेनेला दिलं. प्रभाव जास्त असून . थोडक्यात लॉजिक मला पटले आहे . रामराज्याचा मी सुखात आहे .
अवांतर -फुगे कोणीही कितीही उडवले तरी फुटतोच नंतर . वेळ आणि काळाचा काय तो फरक

फेदरवेट साहेब's picture

28 Jan 2017 - 11:02 pm | फेदरवेट साहेब

'सोय' असे आहे

धन्यवाद.

संदीप डांगे's picture

29 Jan 2017 - 1:15 am | संदीप डांगे

क ह र हास्यास्पद लेख! =)) =)) श्रीगुरुजी कधी महाराष्ट्रात फिरले आहेत की नाही काय माहित!

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2017 - 2:25 pm | श्रीगुरुजी

यात हास्यास्पद काहीच नाही. मी दिलेली आहे ती घडलेली आकडेवारी आहे व त्यातून वस्तुस्थिती स्पष्ट दिसून येत आहे. आकडेवारी आणि वस्तुस्थिती मान्यच करायची नसेल तर इलाज नाही.

'शिवसेना हा जय नावाचा इतिहास आहे' (नुकत्याच संपलेल्या जवळपास २०० नगरपालिकांच्या निवडणुकीत ४ था क्रमांक मिळविल्यावरसुद्धा असली स्वस्तुती अत्यंत दयनीय व हास्यास्पद आहे.), 'भाजपसारख्या ढेकणाच्या संगतीने शिवसेनेसारखा हीरा कदापि भंग पावणार नाही', 'अमित शहा म्हणजे कल्लूमामा', 'अमित शहा म्हणजे गब्बरसिंग', 'आम्ही स्वबळावर महाराष्ट्रात सर्वत्र भगवा फडकावणारच' इ. बढाया आणि फुशारक्याच हास्यास्पद आहेत.

महाराष्ट्रात आजवर ज्या निवडणुका पार पडल्या त्यातील निकाल, २०१४ ची विधानसभा निवडणुक, नुकत्याच संपलेल्या जवळपास २०० नगरपालिकांच्या निवडणुका इ. चे निकाल पुरेसे बोलके आहेत.

संदीप डांगे's picture

29 Jan 2017 - 3:36 pm | संदीप डांगे

गुरुजी, आजचा महाराष्ट्रातील भाजप व सेना दोहोंचा स्वतंत्र प्रभाव आणि पंचवीस वर्षाआधीचा भाजप व सेनेचा स्वतंत्र प्रभाव यात जमिनआस्मानचा फरक आहे. पण तुम्ही इतिहासाची मोडतोडच करायचे ठरवले आहे त्यामुळे तुम्हाला काहीच मान्य नसणार ते गृहित धरत आहे. बाकी वाचकांना तुमचे तोडलेले तारे बोट ठेवून दाखवणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ, तुमच्या लेखातला खालील उतारा:

युतीचे प्रमुख शिल्पकार होते बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन. विधानसभेसाठी भाजप १०५ व सेना १८३ असे विषम जागावाटप भाजपने का मान्य केले हे अनाकलनीय आहे. युतीत पहिल्यापासूनच शिवसेना दादागिरीच्या भूमिकेत होती. आपल्यापेक्षा सेनेचा जनाधार कमी आहे हे स्पष्ट असूनसुद्धा भाजपने दुय्यम भूमिका का स्वीकारली हे एक गूढच आहे.
का बुवा अनाकलनीय व गूढ आहे? काहीतरीच. ज्याचा प्रभाव जास्त तो जास्त जागा घेतो हे स्पष्ट आहे. आज भाजप देईल काय जागा? नाहीच देणार कारण आता पारडं फिरलंय. जो दादा असतो तोच दादागिरी करतो, युती तयार होण्याच्या आधीच्या काळात भाजपाला महाराष्ट्रात तळागाळात फार ओळख नव्हती. एक राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष एवढीच ओळख, भाजप मोठा झाला तो सेनेच्या खांद्यावर बसून. सेनेने तळागाळात मशागत केली, हिंदुत्वाची पाळेमुळे रुजवली त्याचा आयता फायदा घेत भाजप मोठी झाली. तुमची वक्तव्ये पूर्णपणे भाजपप्रेमी आहेत व एकतर तुम्हाला इतिहासच माहित नाही किंवा तुम्ही जाणीवपूर्वक मोडतोड करत आहात हे वरच्या वाक्यांतून दिसून येते.

गूढ व अनाकलनीय म्हणे! हसणार नाही तर काय अशा वाक्यांवर...

सेनेने फारशी शक्ती नसूनसुद्धा २८८ जागांमधील मोठा वाटा मिळविला व त्याचबरोबरीने भाजपने जोपासलेले व बांधलेले काही मतदारसंघ घशात घातले.
हा हा हा! सेनेची फारशी ताकत नसूनसुद्धा मोठा वाटा द्यायला भाजपचे धुरिण गांजा पिऊन पडले होते की काय? काहीही. कुठेतरी जगाच्या इतिहासात ज्याची ताकत कमी त्याला जास्त वाटा देण्याच्या घटना घडल्या असतील तर जाणकारांनी नक्की सांगावे. अहो हे अटीतटीचे राजकारण आहे, कर्तृत्व नसून फुकट द्रौपदी मिळायला युधिष्ठिराचे महाभारत नव्हे.

१९८० व १९८५ मध्ये पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भाजपच्या अण्णा जोशी यांनी निसटता विजय मिळविला होता. भाजपचा हा हक्काचा मतदारसंघ सेनेने घशात घातला. १९९० ते २००९ या काळात सलग ५ निवडणुकीत या मतदारसंघातून सेनेचा उमेदवार विजयी झाला. मते होती भाजपची पण उमेदवार शिवसेनेचा.
किती तो आटापिटा, हसायला नही येणार तर काय? माझे ते माझे आणि तुझे तेही माझेच???? मते भाजपची होती शिवसेनेला मिळाली, अजून काही...?

हा मतदारसंघ आपलाच आहे हा आधी शिवसेनेचा दावा होता आणि नंतर आपल्या उमेदवाराला मिळालेली मते ही आपलीच आहेत असा भ्रम शिवसेनेला झाला. मतदारांनी शिवसेनेचा भ्रम दूर केला तो २०१४ मध्ये. यावेळी दोघेही एकमेकांविरूद्ध लढले व त्या लढतील भाजपच्या मेधा कुलकर्णींनी आपल्या सेना प्रतिस्पर्ध्यावर तब्बल ६५००० मतांच्या फरकाने विजय मिळविला.

२०१४ ला मोदीलाटेच्या प्रभावात पुण्यात गाढव उभे केले असते निवडणुकीला तरी ते निवडून आले असते, तेव्हा भाजपचे लाळघोटू कौतुक करणारे लेख छापले म्हणजे वस्तुस्थिती आहे असे समजणे हास्यास्पद आहे.

संपूर्ण लेखात एक पन्नास वर्षाच्या मोठ्या लांबलचक काळात दोन पक्षांच्या उदयाचा, त्याच्या कारणांचा, प्रभावनिर्मिती, निवडणुकांचे निकाल, तत्कालिक कारणे, विविध बदलांचा, आर्थिक-सामाजिक बदलांचा राजकारणावर झालेला प्रभाव, महत्त्वाच्या घटना ह्यांचा प्रभाव ह्या सगळ्या आणि अनेक छोट्यामोठ्या गोष्टींचा अजिबात विचार न करता, केवळ सोयीची तेवढी मांडणी करुन भाजपच कसा श्रेष्ठ व शिवसेना कशी फालतू हे दाखवण्याचा हास्यास्पद प्रयत्न ह्याशिवाय ह्या लेखाची फारशी किंमत नाही.

सेना भाजप युती ही जणू मागच्या पाच वर्षातच तयार झाली आणि संपली असा वाचकांच समज करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.

सेनाभाजप संबंध हे वाळूच्या घड्याळाप्रमाणे झाले आहेत. आधी सेना वर होती, भाजप खाली, आता भाजप वर आहे सेना खाली. बाकी एवढं समजून घ्यायला कोणाचही समर्थक-विरोधक असायची गरज नाही. पुणे-मुंबई सोडून जरा प्रत्यक्ष फिरले व जाणून घ्यायची खरी जिज्ञासा असेल त्याने जाणून घ्यावे. पुण्यात बसून नुसत्या आकडेवारीवर गप्पा हाणणे सोयिस्कर आहे, पण खरेच असेल असे नव्हे.

समांतरः नाशिकमधे मनसेतून निवडून गेलेले नगरसेवक धडाधड एकामागोमाग एक भाजपात सामील झालेत. ह्यात माझ्या भागातल्या दोन अतिशय चांगले काम करणार्‍या नगरसेवकांचाही समावेश आहे. आता जनता यांनी केलेल्या चांगल्या कामांमुळे यांनाच निवडून देणार आणि श्रीगुरुजींसारखे निवडणुकीचे निकालात निवडून आलेली भाजपचे चिन्हे मोजून पाठ थोपटून घेणार... निर्जीव आकडेवारी आणि जीवंत जमीनी सत्य ह्यात फरक असतो. मान्य व अमान्य करण्याचा पर्याय वस्तुस्थितीत नसतो.

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2017 - 4:06 pm | श्रीगुरुजी

का बुवा अनाकलनीय व गूढ आहे? काहीतरीच. ज्याचा प्रभाव जास्त तो जास्त जागा घेतो हे स्पष्ट आहे. आज भाजप देईल काय जागा? नाहीच देणार कारण आता पारडं फिरलंय. जो दादा असतो तोच दादागिरी करतो, युती तयार होण्याच्या आधीच्या काळात भाजपाला महाराष्ट्रात तळागाळात फार ओळख नव्हती. एक राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष एवढीच ओळख, भाजप मोठा झाला तो सेनेच्या खांद्यावर बसून. सेनेने तळागाळात मशागत केली, हिंदुत्वाची पाळेमुळे रुजवली त्याचा आयता फायदा घेत भाजप मोठी झाली. तुमची वक्तव्ये पूर्णपणे भाजपप्रेमी आहेत व एकतर तुम्हाला इतिहासच माहित नाही किंवा तुम्ही जाणीवपूर्वक मोडतोड करत आहात हे वरच्या वाक्यांतून दिसून येते.

गूढ व अनाकलनीय म्हणे! हसणार नाही तर काय अशा वाक्यांवर...

ज्याचा प्रभाव जास्त तो जास्त जागा घेतो!!!! १९ वर्षात ५ निवडणुकीत फक्त १ जागा मिळविणार्‍या पक्षाचा प्रभाव दोनच निवडणुकीत १२ व १६ जागा मिळविणार्‍या पक्षापेक्षा जास्त?????? गंमतच आहे. युती तयार होण्याचा आधीच्या काळात भाजप थोड्या प्रमाणात का होईना पण महाराष्ट्राच्या सर्व भागात होता. १९८० च्या व १९८५ च्या निवडणुकीत भाजपने कोकण, पुणे, मुंबई, ठाणे, मराठवाडा, खानदेश, विदर्भ इ. वेगवेगळ्या भागातून मोजकेच असले तरी स्वतःचे १२ व नंतर १६ आमदार निवडून आणले होते. शिवसेनेला मात्र ठाणे व मुंबईतील काही वॉर्डांपलिकडे ओळख नव्हती. शिवसेनेला मुंबईत सुद्धा एकमेव आमदार निवडून आणता आला तो थेट १९८५ मध्ये. १९८० मध्ये तर प्रचंड लाट असलेल्या इंदिरा काँग्रेसशी युती असूनसुद्धा सेनेचे खासदारपदाचे उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते. आणि म्हणे मुंबई आमचा बालेकिल्ला. त्यापूर्वी उर्वरीत महाराष्ट्र तर सोडाच, मुंबईत व ठाण्यातही सेनेला विजय मिळाला नव्हता. शिवसेना हा आयता बिळावरचा नागोबा आहे. भाजपमुळे सेना मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रात ओळखीची झाली ही वस्तुस्थिती होती. मी अजिबात मोडतोड केलेली नाही. जी वस्तुस्थिती होती व आकडेवारी होती तीच सांगितली आहे. आकडे स्पष्ट बोलत असूनही शिवसेनाच भाजपपेक्षा मोठी या भ्रमात रहायचे ठरविलेच असेल तर नाईलाज आहे.

हा हा हा! सेनेची फारशी ताकत नसूनसुद्धा मोठा वाटा द्यायला भाजपचे धुरिण गांजा पिऊन पडले होते की काय? काहीही. कुठेतरी जगाच्या इतिहासात ज्याची ताकत कमी त्याला जास्त वाटा देण्याच्या घटना घडल्या असतील तर जाणकारांनी नक्की सांगावे. अहो हे अटीतटीचे राजकारण आहे, कर्तृत्व नसून फुकट द्रौपदी मिळायला युधिष्ठिराचे महाभारत नव्हे.

भाजपच्या तत्कालीन नेत्यांना (महाजन, मुडे, अडवाणी) योग्य वाटाघाटी करता आल्या नव्हत्या ही वस्तुस्थिती मी मूळ लेखातच मांडली आहे. भाजपच्या सुदैवाने २०१४ मध्ये भाजपची सूत्रे मोदी-शहा यांच्यासारख्या खमक्या नेत्यांच्या हातात होती. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेची मुजोरी मोडून काढून शिवसेनेला त्यांची जागा दाखवून दिली. २०१६ मध्ये झालेल्या २०० नगरपालिकांच्या निवडणुकीतही त्याचे प्रत्यंतर आले आहे.

किती तो आटापिटा, हसायला नही येणार तर काय? माझे ते माझे आणि तुझे तेही माझेच???? मते भाजपची होती शिवसेनेला मिळाली, अजून काही...?

ती भाजपचीच मते होती. त्यात सेनेचा वाटा अत्यल्प होता. विश्वास बसत नसेल तर १९७७ पासूनची आकडेवारी बघा. १९७८ मध्ये शिवाजीनगरमधून जनता पक्षाच्या (आजचा भाजप हा त्यावेळी जनता पक्षाचाच भाग होता) शांती पटेल निवडून आल्या होत्या. १९८० मध्ये भाजप स्थापन झाल्यावर १९८० व १९८५ मध्ये भाजपचे अण्णा जोशी निवडून आले होते. जर शिवाजीनगरमध्ये सेनेकडे मते होती तर १९७७, १९८०, १९८५ या निवडणुकीत सेनेला का विजय मिळाला नव्हता? १९९० मध्ये सेनेने हा मतदारसंघ घशात घातल्यावर सलग ५ निवडणु़कीत सेनेचा उमेदवार युतीच्या तिकिटावर विजयी झाला. सेनेला मिळालेली मते ही सेनेची मते नसून भाजपचीच होती. युती असल्याने नाईलाजाने भाजपच्या मतदारांना सेना उमेदवाराला मते द्यावी लागत होती. २०१४ मध्ये युती तुटून सेना व भाजप स्वतंत्र लढल्यावर तब्बल ६५ हजार मतांच्या फरकाने भाजप जिंकला. ही सर्व वस्तुस्थिती असताना हा मतदारसंघ सेनेचाच होता असा दुराग्रह बाळगणार असाल तर नाईलाज आहे.

२०१४ ला मोदीलाटेच्या प्रभावात पुण्यात गाढव उभे केले असते निवडणुकीला तरी ते निवडून आले असते, तेव्हा भाजपचे लाळघोटू कौतुक करणारे लेख छापले म्हणजे वस्तुस्थिती आहे असे समजणे हास्यास्पद आहे.

मोदी नसताना सुद्धा इथून भाजपचाच उमेदवार विजयी होत होता. यात लोळघोटू कौतुक नसून ही वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती नाकारायचीच असेल तर नाईलाज आहे.

संपूर्ण लेखात एक पन्नास वर्षाच्या मोठ्या लांबलचक काळात दोन पक्षांच्या उदयाचा, त्याच्या कारणांचा, प्रभावनिर्मिती, निवडणुकांचे निकाल, तत्कालिक कारणे, विविध बदलांचा, आर्थिक-सामाजिक बदलांचा राजकारणावर झालेला प्रभाव, महत्त्वाच्या घटना ह्यांचा प्रभाव ह्या सगळ्या आणि अनेक छोट्यामोठ्या गोष्टींचा अजिबात विचार न करता, केवळ सोयीची तेवढी मांडणी करुन भाजपच कसा श्रेष्ठ व शिवसेना कशी फालतू हे दाखवण्याचा हास्यास्पद प्रयत्न ह्याशिवाय ह्या लेखाची फारशी किंमत नाही.

सेनेच्या तुलनेत भाजपला जास्त जनाधार आहे ही वस्तुस्थिती अनेकवेळा निकालांवरून सिद्ध झाली आहे. सर्व निकाल व आकडेवारी समोर असूनसुद्धा शिवसेनेचीच भलामण करणे हे अत्यंत हास्यास्पद आहे.

सेनाभाजप संबंध हे वाळूच्या घड्याळाप्रमाणे झाले आहेत. आधी सेना वर होती, भाजप खाली, आता भाजप वर आहे सेना खाली. बाकी एवढं समजून घ्यायला कोणाचही समर्थक-विरोधक असायची गरज नाही. पुणे-मुंबई सोडून जरा प्रत्यक्ष फिरले व जाणून घ्यायची खरी जिज्ञासा असेल त्याने जाणून घ्यावे. पुण्यात बसून नुसत्या आकडेवारीवर गप्पा हाणणे सोयिस्कर आहे, पण खरेच असेल असे नव्हे.

सेना मुळातच खुजी होती. सेना वर दिसत होती कारण भाजपने सेनेला खांद्यावर घेतले होते. २०१४ पासून भाजपने सेनेला खांद्यावरून खाली आपटल्यानंतर झालेल्या सर्व निवडणुकीत कोण उंच आणि कोण खुजा हे निर्विवाद सिद्ध झाले आहे. मागील २ महिन्यात महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात नगरपालिका निवडणुका झाल्या. त्याचे निकाल स्पष्ट आहेत. निव्वळ पुण्यामुंबईतच नव्हे तर सर्वत्र एकच कल आहे.

समांतरः नाशिकमधे मनसेतून निवडून गेलेले नगरसेवक धडाधड एकामागोमाग एक भाजपात सामील झालेत. ह्यात माझ्या भागातल्या दोन अतिशय चांगले काम करणार्‍या नगरसेवकांचाही समावेश आहे. आता जनता यांनी केलेल्या चांगल्या कामांमुळे यांनाच निवडून देणार आणि श्रीगुरुजींसारखे निवडणुकीचे निकालात निवडून आलेली भाजपचे चिन्हे मोजून पाठ थोपटून घेणार... निर्जीव आकडेवारी आणि जीवंत जमीनी सत्य ह्यात फरक असतो. मान्य व अमान्य करण्याचा पर्याय वस्तुस्थितीत नसतो.

इनकमिंग व आऊटगोईंग सर्व पक्षात सुरू असते. नाशिकचे इतर पक्षातील अनेक नेते भाजपप्रमाणे सेनेमध्ये सुद्धा गेले आहेत. मुंबईतही हीच परिस्थिती आहे. आजच मुंबई महापालिकेतील काँग्रेसचा माजी पक्षनेता रविंद्र आंबेरकर सेनेत गेला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सेनेने सुद्धा २८८ पैकी ५९ तिकिटे इतर पक्षातून आलेल्या आयारामांना दिली होती. 'सामना'तून किंवा शिवाजी पार्कवर आपल्या कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात फुशारक्या व बढाया मारणे खूप सोपे असते. परंतु ती वस्तुस्थिती असतेच असे नाही. निकालातून प्रत्यक्ष परिस्थिती समजते.

वरुण मोहिते's picture

29 Jan 2017 - 5:28 pm | वरुण मोहिते

त्यामुळे १९९० पासून बोला . तरीही आपण १२, १६ आमदार आल्याचे दाखले देत आहेत म्हणून सांगतो जनसंघाची स्थापना पूर्वीच झाली होती राजकारणात तो पक्ष होता त्यामुळे साहजिक आहे ह्या उलट शिवसेनेची स्थापना सामाजिक चळवळीतून राजकारणाकडे वळली . भाजपा कडे संघाचे काम करणारे आयते कार्यकर्ते होते जे आजही आहेत त्यामुळे तुलना चुकली आहे पुढे १९८५ ला एक आमदार होता असे आपण म्हणत आहात त्याचवेळी १९९० ला भाजपच्या ४२ आणि सेनेच्या डायरेक्ट ५२ झाल्या हा मुद्दा आपण टाळला. भाजप चा प्रभाव होता तर जागावाटप असा विषम का केला हे हि टाळला . म्हणजे भाजप वाटाघाटींमध्ये चुकला म्हणजे ज्यांनी भाजप वाढवली ते चुकले .पक्षाला जाग अली २०१४ ला खमके नेते असताना .ओके . अजून एक वाटाघाटी जितक्या झाल्या जागा सोडल्या ते राहूदे पण त्याकाळात सेनेला महाराष्ट्रभर पोचायचं होता त्यामुळे सर्व ठिकाणी अगदी काही ठिकाणी प्रभाव नसून सुद्धा सेनेने उमेदवार उभे केले. भाजपाला इतकी खात्री होती तर त्यांनी का नाही मागितले ते मतदारसंघ .आफ्टरऑल त्यांचा प्रभाव होता . त्यामुळे स्ट्राइक रेट हा मुद्दा हि गैरलागू होतो .
इनकमिंग करणे विरोधी पक्षातून इतक्या " स्ट्राईक रेट" ने आजवर पाहण्यात नाही आले .

गॅरी ट्रुमन's picture

29 Jan 2017 - 7:59 pm | गॅरी ट्रुमन

अजून एक वाटाघाटी जितक्या झाल्या जागा सोडल्या ते राहूदे पण त्याकाळात सेनेला महाराष्ट्रभर पोचायचं होता त्यामुळे सर्व ठिकाणी अगदी काही ठिकाणी प्रभाव नसून सुद्धा सेनेने उमेदवार उभे केले. भाजपाला इतकी खात्री होती तर त्यांनी का नाही मागितले ते मतदारसंघ .आफ्टरऑल त्यांचा प्रभाव होता

इतकी वर्षे पडती भूमिका घेऊन भाजप नेतृत्वाने शिवसेनेला जास्त जागा लढू दिल्या हे मुळातल्या लेखात लिहिले असूनही परत हा प्रश्न विचारायचे प्रयोजन काय?

बरं मग २०१४ मध्ये भाजपला खात्री होती म्हणून जास्त जागा मागितल्या त्या शिवसेनेनी का सोडल्या नाहीत?

वरुण मोहिते's picture

29 Jan 2017 - 9:03 pm | वरुण मोहिते

झाली ना खात्री . आधीच खात्री करायची होती मग भाजप ने . सातत्याने सेनेने दाबला पडती भूमिका घ्यायला लावली असा नाहीये . मुद्दा हा आहे कि मोदी लाट होती,काँग्रेस विरुद्ध रोष होता ,खुद्द भाजपच्या आजच्या आमदारांना विश्वास नव्हता आपण जिंकू असे .१२३ पैकी किती टक्के आमदारांचा इनकमिंग आहे पहा .त्यामुळे हे २०१४ नंतर चालू झालं हे मान्य केलं पाहिजे त्यासाठी भाजप कसा शक्तिशाली आधीच होता हा दाखल नकोय कारण तो नव्हता .
मुंबई महानगरपालिकेच्या धाग्यावरही मी सांगितलेलं आहे . त्यात भाजप च्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्याकडे आपण सोयीस्कर दुर्लक्ष करता . केवळ दोन्ही धाग्यांवर काहीतरी इतिहास आणि आकडेवारी. त्यामुळे भाजप समर्थक म्हणून तुमचे प्रतिसाद असतात . आणि गुरुजी भाजप समर्थक म्हणून इथे मी प्रतिसाद देतोय असं नाही . मी काही भाजप द्वेष्टा नाही पण जे आहे ते पण अमान्य आणि सगळंच भाजप बेस्ट असे प्रतिसाद येतात त्याला काय करावे बुवा .
शिवसेना हरावी आणि भ्रष्टाचार कमी होणार नाही सामान्यांना फरक पडणार नाही असाही आपला म्हणणे आहे यातच विसंगती आहे . त्यामुळे मग भाजप तरी कशाला काँग्रेस ला द्या पाठिंबा जसा पंजाब मध्ये देताय आपण . त्यामुळे आपण प्रतिसाद भाजप समर्थक म्हणून देत आहात .
अवांतर - मुंबईत शिवसेना हवी ह्या मताचा मी आहे . पण मी समर्थक नाही का हवी त्याचे संदर्भ फार वेगळे आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

29 Jan 2017 - 9:10 pm | गॅरी ट्रुमन

त्यामुळे आपण प्रतिसाद भाजप समर्थक म्हणून देत आहात .

ओक्के. मी कोणाचे समर्थन करावे आणि कोणाचे समर्थन करू नये हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे याविषयी कोणतेही भाष्य करायची गरज मला वाटत नाही.

वरुण मोहिते's picture

29 Jan 2017 - 9:24 pm | वरुण मोहिते

त्याबद्दल काही दुमत नाही . अथवा कोणाचं करावं हे हि मी बोलो नाही .

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2017 - 9:06 pm | श्रीगुरुजी

त्यामुळे १९९० पासून बोला . तरीही आपण १२, १६ आमदार आल्याचे दाखले देत आहेत म्हणून सांगतो जनसंघाची स्थापना पूर्वीच झाली होती राजकारणात तो पक्ष होता त्यामुळे साहजिक आहे

जसा जनसंघ पूर्वीपासून होता तशी शिवसेनाही १९६६ पासून होतीच. स्थापनेपासून पहिल्या १९ वर्षातील ५ विधानसभा निवडणुकीत फक्त १ जागा निवडून आणणार्‍या सेनेची ताकद ती किती?

ह्या उलट शिवसेनेची स्थापना सामाजिक चळवळीतून राजकारणाकडे वळली.

हा एक भ्रम आहे. सेनेने स्थापनेपासून अगदी २ वर्षांच्या आतच निवडणुक लढायला सुरूवात केली होती. सामाजिक चळवळ वगैरे म्हणजे शुद्ध थापेबाजी आहे.

भाजपा कडे संघाचे काम करणारे आयते कार्यकर्ते होते जे आजही आहेत त्यामुळे तुलना चुकली आहे पुढे १९८५ ला एक आमदार होता असे आपण म्हणत आहात त्याचवेळी १९९० ला भाजपच्या ४२ आणि सेनेच्या डायरेक्ट ५२ झाल्या हा मुद्दा आपण टाळला.

सेनेच्या १ वरून डायरेक्ट ५२ जागा झाल्या नव्हत्या. युती केल्यामुळे भाजपची मते त्यांना मिळाली होती. १८३ लढवून ५२ (त्यात भाजपचे शिवाजीनगरसारखे ढापलेले हक्काचे मतदारसंघ) आणि १०५ लढवून ४२ यात कोण सरस?

भाजप चा प्रभाव होता तर जागावाटप असा विषम का केला हे हि टाळला . म्हणजे भाजप वाटाघाटींमध्ये चुकला म्हणजे ज्यांनी भाजप वाढवली ते चुकले .पक्षाला जाग अली २०१४ ला खमके नेते असताना .ओके . अजून एक वाटाघाटी जितक्या झाल्या जागा सोडल्या ते राहूदे पण त्याकाळात सेनेला महाराष्ट्रभर पोचायचं होता त्यामुळे सर्व ठिकाणी अगदी काही ठिकाणी प्रभाव नसून सुद्धा सेनेने उमेदवार उभे केले. भाजपाला इतकी खात्री होती तर त्यांनी का नाही मागितले ते मतदारसंघ .आफ्टरऑल त्यांचा प्रभाव होता . त्यामुळे स्ट्राइक रेट हा मुद्दा हि गैरलागू होतो .

याचे उत्तर मूळ लेखातच दिले आहे.

इनकमिंग करणे विरोधी पक्षातून इतक्या " स्ट्राईक रेट" ने आजवर पाहण्यात नाही आले .

तुम्हाला पूर्वीची फारशी माहिती दिसत नाही. १९८० मध्ये हरयानात जनता पक्षाचे सरकार होते. त्यात भजनलाल मुख्यमंत्री होते. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसला देशात बहुमत मिळाल्यावर भजनलालसकट हरयानातील सर्व मंत्री व आमदार काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले होते. १९८६ मध्ये पद्मविभूषण डॉ. शरद पवार आपले सर्व ५६ आमदार काँगेसच्या गोठ्यात घेऊन गेले होते. या दोन घाऊक इनकमिंगच्या तुलनेत वर्तमानात होणारे इनकमिंग म्हणजे किस झाड की पत्ती.

संदीप डांगे's picture

29 Jan 2017 - 9:45 pm | संदीप डांगे

या दोन घाऊक इनकमिंगच्या तुलनेत वर्तमानात होणारे इनकमिंग म्हणजे किस झाड की पत्ती.

बरं, तेव्हाचे सांगितले, तर आताचे हे किस झाडकी पत्तीवाले इनकमिंगही कुठून कुठे होत आहे त्याचे डिटेल्स असतीलच तुमच्याकडे तेही द्या, अर्धसत्य बोलून दिशाभूल करु नका म्हणजे झालं. गोव्यातले भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या कोणाला सन्मानपूर्वक भाजपात घेतले, ते का? आणखीही बर्‍याच ठिकाणी गुंड, भ्रष्टाचारी, घराणेशाहीवाल्यांना आत घेतलंय भाजपने. २०१४ च्या आधी झालेले इन्कमिंग, राज्यांच्या निवडणूकांआधी झालेले इनकमिंग तेही काँग्रेसपक्षातून.

कॉन्ग्रेसमुक्त भारताचं स्वप्न कॉन्ग्रेसयुक्त भाजप होऊन पूर्ण होईल असं दिसतंय... =)) =))

मुद्दा कोणाचा इनकमिंग होतंय हा आहे .इनकमिंग कितीही होउदे होत राहत. पण पारदर्शकता म्हणायची आणि हे पण चालवून घ्यायचं. शिवसेनेचा स्थापनेचा उद्देश काय होता मला वाटत सगळ्यांना माहित असावं . राजकारणात सगळ्याच पक्षांना स्थिरस्थावर व्हायला वेळ लागतो . सगळ्यांना काँग्रेस ची परंपरा नसते किंवा संघ,जनसंघ ,मग भाजप असा पायाही नसतो .
बाकी परत तोच प्रश्न आहे भाजपच्या सगळ्या जागा होत्या प्रभाव होता तर सेनेला १८३ जागा का दिल्या ???साथ हवी होती तर ५०-५० का नाही केलं?मतदारसंघ ढापताना भाजप काय करत होती ? भाजप ला सेनेचा १% हि फायदा झाला नाही का?? असं असेल तर गोष्टच संपली .

गॅरी ट्रुमन's picture

29 Jan 2017 - 7:57 pm | गॅरी ट्रुमन

मजाच म्हणायची. मी दुसर्‍या चर्चेतील एका प्रतिसादात मांडलेले मुद्दे आणि श्रीगुरूजींनी या लेखात मांडलेले मुद्दे जवळपास सारखेच आहेत. तरीही श्रीगुरूजी "भाजपप्रेमी" आणि त्यांना इतिहास माहित नाही पण माझ्याविरूध्द मात्र काहीच कोणी बोललेले नाही. बहोत ही नाइन्साफी है :)

युती तयार होण्याच्या आधीच्या काळात भाजपाला महाराष्ट्रात तळागाळात फार ओळख नव्हती.

आणि तरीही भाजपला अगदी १९८० मध्येही ९.४% मते होती बरं का.

२०१४ ला मोदीलाटेच्या प्रभावात पुण्यात गाढव उभे केले असते निवडणुकीला तरी ते निवडून आले असते, तेव्हा भाजपचे लाळघोटू कौतुक करणारे लेख छापले म्हणजे वस्तुस्थिती आहे असे समजणे हास्यास्पद आहे.

ही गोष्ट २०१४ च्या लोकसभा नव्हे तर विधानसभा निवडणुकीची आहे. आणि त्यावेळी शिवसेना आणि भाजपचे उमेदवार एकमेकांविरूध्द उभे होते त्याची गोष्ट बोलली जात आहे. जर शिवाजीनगरमध्ये शिवसेनेची इतकी ताकद असती तर विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून जायला हवा होता तसे न होता भाजपचा उमेदवार आरामात निवडून गेला एवढाच मुद्दा आहे. बाकी आकड्यांकडे दुर्लक्षच करायचे असेल तर गोष्ट वेगळी.

संदीप डांगे's picture

29 Jan 2017 - 8:33 pm | संदीप डांगे

मजाच म्हणायची. मी दुसर्‍या चर्चेतील एका प्रतिसादात मांडलेले मुद्दे आणि श्रीगुरूजींनी या लेखात मांडलेले मुद्दे जवळपास सारखेच आहेत. तरीही श्रीगुरूजी "भाजपप्रेमी" आणि त्यांना इतिहास माहित नाही पण माझ्याविरूध्द मात्र काहीच कोणी बोललेले नाही. बहोत ही नाइन्साफी है :)

इतरांचे माहीत नाही पण सर्व लोकांचे सर्व धाग्यांवरचे सर्व प्रतिसाद मी वाचलेच असतील असे नव्हे. तेव्हा तसे समजणे ही बहूत नाइन्साफी आहे. :-)

आणि तरीही भाजपला अगदी १९८० मध्येही ९.४% मते होती बरं का.

कुठे, कधी, रेफरन्स प्लिज... :-)

ही गोष्ट २०१४ च्या लोकसभा नव्हे तर विधानसभा निवडणुकीची आहे. आणि त्यावेळी शिवसेना आणि भाजपचे उमेदवार एकमेकांविरूध्द उभे होते त्याची गोष्ट बोलली जात आहे.

कोणत्या निवडणुकीबद्दल बोलतायत ते इतकं कळतंय हो!
बाकी मोदीलाट लोकसभेच्यावेळेसच होती, विधानसभेला संपली किंवा वापरली नाही असे मत असेल तर असो. मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं काल, आता नगरपालिकेच्या निवडणुकिसाठीही राज्याचा मुख्यमंत्री मोदींच्या नावाने मते ओढण्याचा प्रयत्न करतोय.
हेच तर सगळ्याच पक्षात होतं, मग भाजपच कसा काय वेगळा म्हणावा?

जर शिवाजीनगरमध्ये शिवसेनेची इतकी ताकद असती तर विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून जायला हवा होता तसे न होता भाजपचा उमेदवार आरामात निवडून गेला एवढाच मुद्दा आहे.

शिवसेनेची खरी ताकद बाळासाहेबांसोबत गेली, आणि मोदीलाटेने त्याचे आणखी नुकसान केले, वरुन उधोजीराजेंना बाळासाहेबांची जागा घेणे जमले नाही. बाळासाहेबांची अ‍ॅक्टीवीटी थांबल्यापासून सेनेची ताकद कमी होत गेली आहे. राणे गेल्यापासून अवकळा यायला सुरुवात झाली.. बाकी आताची सेना आणि तेव्हाची सेना यांची तुलना होऊ शकत नाही.

बाकी आकड्यांकडे दुर्लक्षच करायचे असेल तर गोष्ट वेगळी.

सोयींच्या आकड्यांकडेच बघत बसायचे असेल तर गोष्टच वेगळी... प्रत्येक भूमिकेसाठी सोयीची आकडेवारी उपलब्ध असतेच. :-)

आकड्यांचीच गोष्ट करायची तर २०१४ लोकसभेत ३१% मते आहेत भाजपला. आणि कॉन्ग्रेसला १९.५%. मतांची संख्या अनुक्रमे 17,16,60,230 आणि 10,69,35,942. तरी निवडून आलेल्या खासदारांची संख्या २८२ विरुद्ध ४४. इतके घोटाळे करुन, भाजपचा इतका टेक्नोसॅव्ही प्रचार असूनही. दहा कोटींच्या वर मते मिळालीच कॉन्ग्रेसला, भाजपला मोदीलाटेची साथ असून सतरा कोटी. आकड्यांकडे बघून निष्कर्ष काढायचे कि कसे ते बघा!

गॅरी ट्रुमन's picture

29 Jan 2017 - 8:48 pm | गॅरी ट्रुमन

कुठे, कधी, रेफरन्स प्लिज... :-)

पान ११ . ही पी.डी.एफ फाईल निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरील आहे. आणि हो. या फाईलमध्ये कुठे शिवसेना हे नाव आढळले तर जरूर सांगा.

आकड्यांकडे बघून निष्कर्ष काढायचे कि कसे ते बघा!

तुम्ही काढू नका निष्कर्ष आकड्यांकडे बघून. पण म्हणून इतरही तसेच करतील असे अजिबात नाही.

रच्याकने अगदी १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकांमध्येही स्वातंत्र्यलढ्याची पूर्ण लीगसी असून, पंडित नेहरूंसारखा नेता असूनही काँग्रेसला ४५% मतेच मिळाली होती. म्हणजे अगदी तेव्हाही ५५% मते विरोधात गेली होती. इतकी वर्षे या वेस्टमिन्स्टर पध्दतीचा काँग्रेसला फायदा झाला पण नंतर नुकसान होत आहे एवढेच.

संदीप डांगे's picture

29 Jan 2017 - 9:49 pm | संदीप डांगे

संदर्भासाठी धन्यवाद.

बाकी आकड्यांकडे पाहून निष्कर्ष काढायला मी कोण थांबवणार, काढो बापडे.
असे निष्कर्ष वाचून त्यावर विश्वास ठेवणारांनी तेवढी खाली एक ओळ दिली आहे ती आधी कायम मनात कोरुन ठेवावी.

प्रत्येक भूमिकेसाठी सोयीची आकडेवारी उपलब्ध असतेच. :-)

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Jan 2017 - 1:25 pm | हतोळकरांचा प्रसाद

प्रत्येक भूमिकेसाठी सोयीची आकडेवारी उपलब्ध असतेच. :-)

हे बरोबर असले तरी प्रत्येकाने "सोयीच्या" भूमिकेला आकडेवारीची जोड दिली तर चर्चा तथ्याला धरून नाही का राहणार?

संदीप डांगे's picture

30 Jan 2017 - 1:38 pm | संदीप डांगे

तुम्ही प्रश्न विचारत आहात की प्रश्नाच्या आडून स्वतःचं मत मांडत आहात?

तथ्य काय असतं त्याबद्दल आपले विचार आधी मांडा चर्चेचं नंतर बघू....

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Jan 2017 - 2:45 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुम्ही प्रश्न विचारत आहात की प्रश्नाच्या आडून स्वतःचं मत मांडत आहात?

मी प्रश्न विचारत आहे.

तथ्य काय असतं त्याबद्दल आपले विचार आधी मांडा चर्चेचं नंतर बघू....

"तथ्य"ला इंग्रजी शब्द "फॅक्ट" आहे बहुतेक. वर ट्रुमन किंवा तुम्ही टाकलेली आकडेवारी हि तथ्ये आहेत (तुम्हाला ती तथ्ये वाटत नसतील तर तुम्ही खोडून काढूच शकता). आता या तथ्यांना सोबत घेऊन केली गेलेली चर्चा उगाच हवेत केली गेलीय असा नाही ना म्हणता येत. म्हणून जर एखाद्याची आकडेवारी सोयीस्कर वाटत असेल तर त्यातली "सोय" उघडी पाडायला तथ्येच मदत करू शकतात असे मला वाटते, बघा पटले तर!

संदीप डांगे's picture

30 Jan 2017 - 3:03 pm | संदीप डांगे

इंग्रजी प्रतिशब्द नव्हता विचारला ब्वॉ मी! ;-)

तथ्य घेऊन चर्चा करायला हरकत नाही. पण विशिष्ट भूमिका घेऊन मते मांडायची व त्याला अर्धसत्याची फोडणी द्यायची ह्याला दिशाभूल म्हणतात. आकडेवारी तोंडावर फेकली म्हणजे माणूस फार अभ्यासू वगैरे वाटतो पण ती आकडेवारी कोणत्या उद्देशाने फेकली आहे तेही ओळखणे आवश्यक असते. सामान्य माणसे आकडेवारी बघून गप्प बसतात, फार खोलात शिरुन बघत नाहीत. विशिष्ट अजेण्डा राबवणार्‍या आकडेबहाद्दरांचं त्यामुळेच फावतं. तेव्हढं होऊ नये हे जागरुक वाचकांनी बघावं, बाकी काही म्हणणं नाही आपलं तसं....

उदा. मागे नोटाबंदीच्या काळात एका निष्पक्ष म्हणवून घेणार्‍या सदस्यांनी ९०% एटीएमचे कॅलिब्रेशन पूर्ण झाल्याची बातमी मोठ्या जोशात टाकली होती. पण त्यांनी हे नाही सांगितले की ७८% एटीम त्यानंतरही कित्येक दिवस पैसे देत नव्हते. सामान्य माणसाला एटीएमचे कॅलिब्रेशन पूर्ण होणे म्हणजे एटीएम सुरु होणे वाटते. पण ते सत्य नसते. एटीएम सुरु झालेत असे कोणी म्हटलेले नसते त्यामुळे बातमी देणार्‍यावर बालंट येत नाही, पण दिशाभूल तर होतेच ना. बरं हे लोक आपली चूक झाली हे मान्य करतील तर शपथ!

सो आकडेवारी हे 'तथ्य' असली तरी मांडणार्‍याची भूमिका तपासणे व आकडेवारी कशी काढली हे पाहणेही महत्त्वाचे. आकडेवारी मतांच्या पुष्टीसाठी असते, तसेच जमीनी सत्य आकडेवारीत येईलच ह्याची शाश्वती नसते.

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Jan 2017 - 4:54 pm | हतोळकरांचा प्रसाद

इंग्रजी प्रतिशब्द नव्हता विचारला ब्वॉ मी! ;-)

मी "तथ्य"बद्दलचं माझं मत सांगितलं. तुम्हाला इंग्रजी शिकवायची आवश्यकता मला वाटत नाही.

पण ती आकडेवारी कोणत्या उद्देशाने फेकली आहे तेही ओळखणे आवश्यक असते.

हे तुमचं वैयक्तिक मत असू शकते, सगळ्यांनाच हे करण्याची आवश्यकता का पडावी? यालाच पूर्वग्रह म्हणत नसावेत का? कोणी कोणता अजेन्डा राबवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एखाद्याने दिलेल्या माहितीवरून त्याला आकडेबहाद्दर म्हणणे मला तरी पटत नाही. ते आकडे एखाद्याला खोटे वाटत असतील तर त्याने ते तसे आकडे खोडून काढावेत एवढाच माझा मुद्दा.

आणि कसे आहे डांगेंजी, माझ्यासारखे सामान्य वाचक फक्त तो आकडेवारीचा एकाच प्रतिसाद बघतात का? समजा त्या प्रतिसादाखाली ती आकडेवारी खोडून काढणारा प्रतिसाद दिसला कि तो पण बघणारच की! म्हणजे ९०% कॅलिब्रेशनच्या प्रतिसादाखाली ७८% तरीही चालत नाहीयेत असं दिसलं तर तथ्याच्या जास्त जवळ जाता येणार नाही का? शिवाय दोन्ही बाजूची तथ्ये बघून मग सामान्य माणसे ठरवतीलच की! जसे सामान्य लोक बँकेवरल्या दगडफेकीच्या एका व्हिडिओवरून देशात अराजक माजलंय असं मानत नाहीत तसेच नुसत्या आकडेवारीनेही भुलणार नाहीत असे मला वाटते.

संदीप डांगे's picture

30 Jan 2017 - 6:05 pm | संदीप डांगे

ते आकडे एखाद्याला खोटे वाटत असतील तर त्याने ते तसे आकडे खोडून काढावेत एवढाच माझा मुद्दा.

आकडे खोटे असतात हे मी केव्हा म्हटलं? उगाच माझ्या सरळ मुद्द्याला भलतीकडे फिरवण्याचा प्रयत्न करुन नको ते अर्थ चिकटवू नका.

माझ्यासारखे सामान्य वाचक फक्त तो आकडेवारीचा एकाच प्रतिसाद बघतात का? समजा त्या प्रतिसादाखाली ती आकडेवारी खोडून काढणारा प्रतिसाद दिसला कि तो पण बघणारच की!
काही प्रश्न उभे राहिलेत, जरा उत्तर देण्याचे कष्ट कराल काय? समजा असा खोडून काढणारा प्रतिसाद नाहीच दिसला तर तुमच्यासारखा सामान्य वाचक शोधून काढणार काय ही आकडेवारी खरी की खोटी की अर्धसत्य आहे ते? जसे खरिपाच्या पेरणीवर नोटाबंदीचा परिणाम झाला नाही असे धादांत खोटे इथे लिहिल्या गेले तेव्हा तुमच्या सारख्या सामान्य वाचकाने काय पवित्रा घेतला? एकाही नोटाबंदीसमर्थकाने पुढे येऊन ते खोटे आहे असे म्हणायचे धाडस दाखवले नाही. (ट्रक फिरवायला मात्र सगळी बच्चेकंपनी हजर असते ;-))

इथली प्रत्येक आकडेवारी तुम्ही स्वतः तपासून बघता? उदाहरण म्हणून आपण गॅरीसाहेबांचे घेऊया. गॅरी ट्रुमन यांनी आतापर्यंत टाकलेले वेगवेगळ्या निवडणुकांतले संदर्भ, घटना, आकडे तुम्ही सगळेच्या सगळे तपासून पाहिलेत? त्यांना कोणी क्रॉस केलं नाही म्हणून ते अखंड सत्य असेच मानाल काय?

दोन्ही बाजूची तथ्ये बघून मग सामान्य माणसे ठरवतीलच की!

"दोन्ही बाजूची तथ्ये" हे काय असतं? मतांच्या बाजू असतात, तथ्यांच्या नव्हे. ते पूर्ण मांडलं नाही तर फक्त एकतर्फी मतांचे अजेंडे राबवले जातात. सामान्य माणसांना आपले मत ठरवण्यासाठी पूर्ण सत्य पुढे येणे आवश्यक असते. तेच केले पाहिजे असे मी म्हणतो. तुमचे काही वेगळे मत आहे काय?

जसे सामान्य लोक बँकेवरल्या दगडफेकीच्या एका व्हिडिओवरून देशात अराजक माजलंय असं मानत नाहीत तसेच नुसत्या आकडेवारीनेही भुलणार नाहीत असे मला वाटते.
देशात कुठे जाळपोळ नाही, दंगल नाही, रोष नाही ह्या फुग्याला पिन मारायला मीच तो विडियो टाकला होता, तरीही 'हे विरोधकांचे कारस्थान असेल तर'.. इत्यादी मेरी मुर्गी की एकीच टांग म्हणणे सुरुच होते की... तसेच तो सार्‍या देशभरातून एकच विडिओ आणि एकच बातमी आहे असे तुम्हाला अजूनही वाटते ह्यातच तुम्ही किती भुलता आणि सत्यशोधन करता हे पुरेसं स्पष्ट होत आहेच. मला तरी अजून काही बोलायची गरज भासत नाही ह्यावर.. =))

बाकी 'तथ्य म्हणजे फॅक्ट्स' हे कुणाच्या मानण्या न मानण्यावर बदलत नसतात. त्यामुळे कोण काय मानतं ह्याने तथ्यांना फरक पडत नसतो.

तथ्यांची अजून एक गंमत असते बघा. मोहनदास करमचंद गांधी हा मनुष्य आजच्या दिवशी मेला. मी म्हटले की मेला, काही म्हणतील मारला. काही लोक 'गांधीहत्या' झाली म्हणतात तर तुमच्यासारखे काही लोक 'गांधीवध' झाला असे म्हणतात. दोघांपैकी कोणीही असत्य बोलत नाही. पण कोण काय बोलतं त्यावरुन बायस लक्षात येतो. तो बायस शोधणे व त्यापासून प्रभावित न होणे हे सामान्य वाचकाचे काम आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Jan 2017 - 8:49 pm | हतोळकरांचा प्रसाद

(श्रीगुरुजींनी राजकारणावर काढलेल्या या धाग्याचा "अभिव्यक्तिस्वातंत्र्य"धागा होऊ नये म्हणून मेगाबायटीचा मोह टाळून) एवढेच सांगतो -
१. जमलं तर (दुसर्यांना आकडेबहाद्दर म्हणून हिनवण्यापेक्षा) तुम्हीही तुमचे मुद्दे मांडण्यासाठी आकडे मांडलेत तर सामान्य वाचकांना फायदाच होईल.
२. इतर लेखकांनी टाकलेल्या लेखाचा/प्रतिसादांचा काय परिणाम होईल याची चिंता सोडा. इथले सामान्य वाचक देखील तुमच्याइतके हुशार आहेतच. ते त्यांना जे समजायचं ते समजतीलच!

बाकी एवढा मोठा प्रतिसाद टाकून सांगायचं काय होतं तर मी कसा प्रतिसादांना भुलतो! ह्याह्याह्याह्या - डांगेजी, शुभेच्छा!

संदीप डांगे's picture

30 Jan 2017 - 9:37 pm | संदीप डांगे

अर्रर्र... आजकाल उत्तरं नसली की मेगाबायटीचे कारण पुढे करुन हिनवण्याचा संसर्ग पसरत चालला आहे. =))

बाकी, तुमच्या १ आणि २ ह्या दोन्ही मुद्द्यांत जबरदस्त विसंगती आहे. त्यासाठीच वरचा मेगाबायटी होता. शुभेच्छांची गरज आपणास जास्त आहे. =)) =))

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Jan 2017 - 9:56 pm | हतोळकरांचा प्रसाद

उत्तरे नसतातच हो माझ्याकडे, त्यामुळे परत शुभेच्छा!! :):) ते फक्त आकडेवारीचं (कि भाजपच्या आकडेवारीचं) एवढं वावडं काय ते सांगा पुढे मागे कधीतरी! आणि ते विसंगती वगैरे सोडा हो, फायद्याची काळजी आणि तोट्याची काळजीतला फरक तर समजतच असेल तुम्हाला!

बाकी तो मेगाबायटीचा उल्लेख एवढा वर्मी का लागत असेल बुआ, मी दोन्हीवेळा माझ्या मेगाबायटी प्रतिसाबद्दल बोललेलो असतानाही?

संदीप डांगे's picture

30 Jan 2017 - 11:05 pm | संदीप डांगे

काय म्हणता... उत्तरे नसतात? फक्त प्रश्न असतात? जुदाई चित्रपटातला परेश रावल आठवला... =))...

बाकी सोयीचे अर्धसत्य मांडून दिशाभूल करु नये ह्या मागणीत वावगं काय ते कळले तर बरे होइल...

फायद्याची तोट्याची काळजी वगैरे गोलगोलराणी कायकू... वरच्या पहिल्या नंबरात म्हणता वाचकांना फायदा होईल म्हणून तथ्य द्या, आकडेवारी द्या. पुढच्या नंबरात म्हणता वाचक काय ते समजायला हुशार आहेत. जर हुशार आहेत तर आकडेवारी कशाला पाहिजे? आकडेवारी पाहिजे तर मग हुशारी कुठे जाते? एका विडियोबद्दल लगेच इथेही मत सांगितले तुम्ही, पण खरिपाबद्दल धादांत खोटं बोलल्या गेलं तिथे मूग गिळून होते सर्व हुश्शार वाचक... असं का होतं ह्याचं उत्तर वर विचारलं पण तुम्ही कलटी मारत आहात. असो.

बाकी मेगाबायटी चा उल्लेख वर्मी लागत नाही हो मला, ज्यांना माझे मेगाबायटी वर्मी लागतात तेच कळवळून 'मेगाबायटी... मेगाबायटी...' कण्हत असतात असा अनुभव आहे... ज्यांच्याकडे उत्तर असते ते मेगाबायटीची चिंता न करता नीट चर्चा करतात असाही अनुभव आहे. =))

हतोळकरांचा प्रसाद's picture

31 Jan 2017 - 10:54 am | हतोळकरांचा प्रसाद

एक छान मस्त धागा काढायला हवा अवांतर चर्चेसाठी!

बाकी सोयीचे अर्धसत्य मांडून दिशाभूल करु...

वावगं काहीच नाही पण अर्धसत्य काय ते तरी सांगा की, उगाच अर्धसत्य अर्धसत्य म्हणून ओरडले म्हणजे एखादी माहिती अर्धसत्य मानायची का?

पुढच्या नंबरात म्हणता वाचक काय ते समजायला हुशार आहेत....

(वैयिक्तक होण्याबद्दल माफी मागून..) तुम्हाला एकूणच वितंडवाद करण्यात खूप रस दिसतोय. सामान्य वाचक आकडेवारीचा अर्थ लावण्यात हुशार आहेत असे माझे मत मी वर मांडले. जर एकाच बाजूची (म्हणजे या चर्चेत भाजपची)आकडेवारी टाकली तर त्याचा योग्य तो अर्थ सामान्य वाचक लावतीलच की, तुम्ही त्याची व्यर्थ ढाल बनवण्याचं प्रयोजन काही कळलं नाही. तुम्हाला लोकांनी एका बाजूच्या सोयीच्या आकडेवारीवरून अर्थ काढू नये असे प्रामाणिकपणे वाटत असेल तर तुम्हीही दुसऱ्या बाजूची सोयीस्कर आकडेवारी मांडा की, इतरांना आकडेबहाद्दर म्हणून हिणवण्याने काय होणार?

मूग गिळून होते सर्व हुश्शार वाचक...

ओके, म्हणजे तुमच्या प्रतिसादाला प्रतिसाद दिला तरच तुमच्या मताला सहमती दिली असा होरा आहे आपला तर! छान आहे. बाकी हा प्रतिसाद, सहजच!

बाकी तुमच्याशी चर्चा बिर्चा ठीक आहे, पण ती धाग्याच्या विषयाला धरून असली तरच माझे मेगाबायटी दुसऱ्यांसाठी वाचण्यायोग्य असतील असे माझे मत आहे.

संदीप डांगे's picture

31 Jan 2017 - 11:27 am | संदीप डांगे

उगाच अर्धसत्य अर्धसत्य म्हणून ओरडले म्हणजे एखादी माहिती अर्धसत्य मानायची का?

ओरडले??? कोण ओरडतंय? डोन्ट लूज यु'अर कूल.... :-)
बाकी कोणाच्या मानण्या न मानण्यावर सत्य अवलंबून नसतं हे वरंच सांगितलंय.. वाचलं नाही की समजलं नाही?

तुम्हाला लोकांनी एका बाजूच्या सोयीच्या आकडेवारीवरून अर्थ काढू नये असे प्रामाणिकपणे वाटत असेल तर तुम्हीही दुसऱ्या बाजूची सोयीस्कर आकडेवारी मांडा की, इतरांना आकडेबहाद्दर म्हणून हिणवण्याने काय होणार?

जिथे गरज आहे तिथे मी योग्य ती आकडेवारी मांडत असतो. पण तुमच्या वरच्या वाक्यात "दुसर्‍या बाजूची सोयीस्कर आकडेवारी मांडा" हा शब्दप्रयोग आक्षेपार्ह आहे. एकांगी बाजू मांडणार्‍यांना आकडेबहाद्दर म्हणून हिणवले तर (वैयक्तिक होतोय माफ करा) तुम्हाला का मिर्च्या लागल्या? तुमची मघापासून चाललेली तणतण काय समजत नाही बुवा कशासाठी आहे ती? =))

तुमच्या प्रतिसादाला प्रतिसाद दिला तरच तुमच्या मताला सहमती दिली असा होरा आहे आपला तर! छान आहे

तुम्ही वाटेल तो अर्थ काढा, होरा काढा. कितीही तथ्य सांगा, स्पष्ट बोला पण ज्याला जे बघायचं तेच बघायचं असतं हे स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद!
तीन मोठ्या प्रतिसादांत एवढे स्पष्ट लिहूनही साधा विचार समजत नसेल तर समजून घ्यायचाच नाही व वितंडवाद घालायचा आहे तो कुणाला हे सामान्य वाचक समजून घेतील अशी आशा करतो.

तुमच्याशी चर्चा बिर्चा ठीक आहे, पण ती धाग्याच्या विषयाला धरून असली तरच माझे मेगाबायटी दुसऱ्यांसाठी वाचण्यायोग्य असतील असे माझे मत आहे.

आपल्याकडे मुद्दे असले की लोक मेगाबायटी वाचण्यासारखा आहे की नाही, धागाविषयाला धरुन आहे की नाही ह्याची चिंता करत बसत नाही असा मिपावरचा अल्पकाळाचा अनुभव आहे. उत्तर नसले की मेगाबायटी, वितंडवाद, वगैरे शब्द वापरतात...

बाकी, आपल्याकडून पूर्णविराम. सांगण्यासारखं सर्व स्पष्ट सांगून झालंय. धन्यवाद!

हतोळकरांचा प्रसाद's picture

31 Jan 2017 - 12:07 pm | हतोळकरांचा प्रसाद

हो, धन्यवादच!

एकांगी बाजू मांडणार्‍यांना आकडेबहाद्दर म्हणून हिणवले तर (वैयक्तिक होतोय माफ करा) तुम्हाला का मिर्च्या लागल्या? तुमची मघापासून चाललेली तणतण काय समजत नाही बुवा कशासाठी आहे ती? =))

यासाठी "डोन्ट लूज यु'अर कूल.... :-)". बाकी तुमच्या एका प्रतिसादवर (जरी मला उद्देशून नसल्या तरी) आक्षेप घेणे म्हणजे मिरची लागणे असते होय? छानच आहे की! बाकी तुम्हाला हवे तेव्हा माझ्याकडे किंवा समोरच्याकडे उत्तर नाहीये असे समजण्याची मोकळीक आहेच त्यामुळे, शुभेच्छा!

जसे खरिपाच्या पेरणीवर नोटाबंदीचा परिणाम झाला नाही असे धादांत खोटे इथे लिहिल्या गेले तेव्हा तुमच्या सारख्या सामान्य वाचकाने काय पवित्रा घेतला? एकाही नोटाबंदीसमर्थकाने पुढे येऊन ते खोटे आहे असे म्हणायचे धाडस दाखवले नाही.

तुम्ही दाखवले असेल तर ते पुरेसे नाही का..? दरवेळी कशाला पब्लीकचा सपोर्ट हवा असतो..? स्वत:च्या भूमीकेवर विश्वास असेल तर एकटेच ठाम राहिलात तरी सत्य काय ते वाचक बघतातच.

(ट्रक फिरवायला मात्र सगळी बच्चेकंपनी हजर असते ;-))

२० लाखाचे ट्रक तुम्ही फिरवले. "ती कल्पनाच बालीश होती" हे तुमचे आत्ताचे मत आहे का..?

आकडेवारी तोंडावर फेकली म्हणजे माणूस फार अभ्यासू वगैरे वाटतो पण ती आकडेवारी कोणत्या उद्देशाने फेकली आहे तेही ओळखणे आवश्यक असते. सामान्य माणसे आकडेवारी बघून गप्प बसतात, फार खोलात शिरुन बघत नाहीत. विशिष्ट अजेण्डा राबवणार्‍या आकडेबहाद्दरांचं त्यामुळेच फावतं. तेव्हढं होऊ नये हे जागरुक वाचकांनी बघावं, बाकी काही म्हणणं नाही आपलं तसं....

हे नक्की तुमचेच मत आहे ना..?

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2017 - 6:49 pm | श्रीगुरुजी

भूमिका काहीही असली तरी वस्तुस्थिती ही आकडेवारी (डेटा) मुळेच स्पष्ट होते. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे.

"In God we trust, everyone else brings data to the table."

आपण कंपनीत प्रचंड काम करतो, आपली कामगिरी इतकी उत्तम आहे इ. इ. दावे कोणत्याही कर्मचार्‍याने केले तरी, त्याने प्रत्यक्ष काय काम केले याची माहिती असल्याशिवाय त्याचे काम जोखता येणार नाही असे त्यांचे मत होते. पर्सेप्शन आणि रिअ‍ॅलिटी यात प्रचंड फरक असतो.

सेनाभक्तांना किंवा भाजपविरोधकांना कितीही वाटत असले की सेना भाजपपेक्षा प्रबळ होती/आहे व सेनेमुळे भाजप मोठा झाला, तरी हे पर्सेप्शन निकालांचा इतिहास पाहिला तर पूर्ण खोटे ठरते.

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Jan 2017 - 9:14 pm | हतोळकरांचा प्रसाद

कांग्रेसनंतर अगदी खेड्यापाड्यात पोहोचलेला आणि कार्यकर्ता तयार करू शकणारा शिवसेना हा एकमेव पक्ष त्याकाळात होता (अजूनही आहे). भाजपने ह्या कार्यकर्त्यांच्या फळीचा नक्कीच उपयोग करून घेतला आहे. भाजप अजूनही तळागाळातले कार्यकर्ते तयार करण्यात यशस्वी होत नाहीये म्हणूनच हा "इन्कमिंग"चा सोपा मार्ग स्वीकारला आहे असे मला वाटते.

भाजप अजूनही तळागाळातले कार्यकर्ते तयार करण्यात यशस्वी होत नाहीये

हाच कळीचा मुद्दा आहे. हळूहळू या दिशेने वाटचाल करत आहे म्हणावे तर भाजपाने सत्तेची चव पहिल्यांदा चाखुन आता १० वर्षे झाली आहेत.

वरुण मोहिते's picture

29 Jan 2017 - 4:49 pm | वरुण मोहिते

झोंबली हे वाचून खेद व्यक्त करतो . आजवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप कितव्या क्रमांकावर होता हो नक्की ??जरा कळू द्या . एकी कडे इतिहासाचे दाखले जनाधार दुसरीकडे कच्चा खिलाडू तिसरीकडे आकडे बोलके आहेत असा म्हणायचे आमचा गोंधळ होतो ना .
जो पक्ष सत्तेत असतो तो नेहमी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अव्वल असतो हे आजवरचा गणित आहे. तरीही मोदीलाट केंद्रात सत्ता महाराष्ट्रात सत्ता असूनही २०० नागरसेवकांपेक्षा कमी जागी काँग्रेस मागे आहे त्या खालोखाल ८०० च्या वर जागा राष्ट्रवादीच्या आहेत . स्थानिक आघाड्याच्या गणितात काँग्रेस राष्ट्रवादी पुढे आहे . नगराध्यक्ष थेट निवडणूक हा मुद्दा वेगळा आहे तिथे रुलिंग पार्टी च्या नावावर मतदान झाला . राहता राहिला विषय सेनेचं तर जागा कमी आल्या म्हणून २ वर्षात आकडे बोलके आहेत आणि काय काय मुद्दे . भाजप कशी भारी असा असेल तर सगळ्या महानगरपालिकांची जुनी आकडेवारी तपासून पहा. स्वबळावर भगवा फडकावणारच तर २ खासदार असताना भाजप काही फुशारक्या मारत नव्हता का?? का कुठलाच पक्ष असं सांगत नाही आपल्या पक्षातील लोकांना बळ देण्यासाठी /असं असेल आणि भाजप ने कधी सत्ता येणार अशी घोषणा केली नसेल आज वर तर जरूर सांगा . का सगळंच सोयीस्कर रित्या २०१४ नंतर चा घ्यायचा तर तसे प्रतिसाद देतो .हा का ना का .

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2017 - 8:52 pm | श्रीगुरुजी

अमित शहा किंवा मोदी यांच्यावर शिवसेनेने केलेली टीका झोंबली वगैरे असे काहीही नाही. शिवसेना आपल्याविरूद्ध असलेल्या प्रत्येकावरच अत्यंत खालच्या थराला जाऊन टीका करते. यापूर्वी भुजबळ आणि राणे यांच्यावरही बाळासाहेबांनी अत्यंत अर्वाच्य शब्दात टीका केली होती. मोदींनाही यापूर्वी आदिलशहा, अफझलखान इ. विशेषणे लावली होती.

बाळा नांदगावकर मातोश्रीवर दाखल झालेत. सेना मनसे एकत्र येण्याची हवासुध्दा भाजपासाठी धोक्याची घंटा ठरेल.

संदीप डांगे's picture

29 Jan 2017 - 7:32 pm | संदीप डांगे

कोणीही एकत्र येवो, वा दूर राहो, अंतिमतः भरडला जाणार तो सामान्य नागरिकांच्या समस्यांचा प्रश्नच. आता सगळे एकमेकांवर चिखलफेक करत प्रचार गाजवणार, खरे प्रश्न बाजूला राहणार. मुंबईत कोण जिंकणार ते माहित नाही पण हरणार ते मतदार. कारण बहुमत कोणालाच मिळणार नाही आणि ज्यांना आजवर शिव्या दिल्या त्यांनाच मिठ्या मारत लोकशाहीच्या नावाचा जागर करत सत्तास्थापना होणार. मुंबईकरांचे हाल मागच्या पानावरुन पुढे चालू राहणार.

केंद्रात, राज्यात आणि अगदी मुंबैतही सत्ता असून भाजपने मुंबैसाठी नक्की काय केलंय हा प्रश्न विचारला जावा.....

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2017 - 8:46 pm | श्रीगुरुजी

सेना मनसे एकत्र येणे ही भाजपसाठी नसून सेनेसाठी धोक्याची घंटा ठरेल. मनसे हा शेवटची घरघर लागलेला पक्ष आहे. एका वृत्तानुसार मनसेने स्वतः ५० व सेना १७७ असे सूत्र दिले आहे. सेनेबरोबर येण्याने मनसेला धुगधुगी मिळून मनसेचे मरण पुढे ढकलले जाईल व सेनेविरूद्ध मराठी मतांमध्ये एक वाटेकरी उभा राहील. राज ठाकरे अत्यंत अविश्वासार्ह आहेत. स्थापना झाल्यावर सुरवातीला ते काँग्रेसला मदत करीत होते. २००९ मध्ये सेना-भाजप युतीचे अनेक उमेदवार लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पाडण्याचे महत्कार्य त्यांनी पार पाडल्यावर काँग्रेसला असलेली त्यांची गरज संपली. त्यांनी नंतर ठाणे व कल्याण डोंबिवलीमध्ये सेनेला साथ दिली. नंतर नाशिकमध्ये सुरवातीला भाजपचा पाठिंबा घेतला व नंतर राष्ट्रवादीचा घेतला. नंतर त्यांनी नगर व पुण्यात राष्ट्रवादीला साथ दिली. म्हणजे सर्व चार प्रमुख पक्षांबरोबर त्यांची चुंबाचुंबी होऊन गेली आहे. त्यांच्या या धरसोड भूमिकेमुळे मतदारांनी त्यांच्या पक्षाला कचरापेटीत फेकून दिले. नुकत्याच झालेला नगरपरीषद निवडणुकीत अंदाजे ४७०० नगरसेवकांपैकी मनसेला ४७ पेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. आपल्याला आता महाराष्ट्रात स्थान राहिलेले नाही हे ओळखून ते आता स्वत:हून सेनेकडे जायचा प्रयत्न करीत आहेत. सेनेबरोबर महापालिकेसाठी युती केली तरी मनसे भविष्यात सेनेच्याच बरोबर राहील असे नाही.

मनसे पुन्हा उभारी धरणे सेनेसाठी तोट्याचे ठरेल. त्यामुळे विधानसभा व आता महापालिका निवडणुक एकट्याने लढविणे या दोन घोडचुका सेनेने केल्यानंतर मनसेशी हातमिळवणी करून मरणोसंपन्न मनसेला प्राणवायू पुरविणे ही सेनेची तिसरी घोडचूक ठरेल.

गॅरी ट्रुमन's picture

29 Jan 2017 - 7:48 pm | गॅरी ट्रुमन

महापालिका निवडणुकांमध्ये निकाल नेहमी स्थानिक पातळीवरच्या राजकारणावर अवलंबून असतात. माझा स्वतःचा या निवडणुकांमधला इंटरेस्ट इतकाच की शिवसेना हरली पाहिजे. इतर कोणीही आले तरी घंटा काही फरक पडणार नसला (रस्त्यावरचे खड्डे तसेच राहिले, मुंबई दरवर्षी पावसात बंद पडली, नगरसेवकांच्या कृपेने अनधिकृत बांधकामे उभी राहिली, कंत्राटदारांना कंत्राटे मिळवायला टक्केवारी द्यावी लागली अशा बातम्या कोणीही आले तरी तशाच चालू राहणार आहेत) तरी इंटरेस्ट फक्त शिवसेना हरण्यामध्ये. उधोजीरावांच्या फुशारकीचा स्त्रोत बंद व्हायला हवा. तशाही महापालिका निवडणुका या विधानसभा किंवा लोकसभा या माझ्या इंटरेस्टच्या दोन्ही निवडणुकांमधील कल अजिबात दाखवत नाहीत.

डिसेंबर १९८४ मध्ये इंदिरा गांधी हत्येनंतर आलेल्या सहानुभूती लाटेत इतर सगळे पक्ष वाहून गेले. काँग्रेसने मुंबईतील लोकसभेच्या ६ पैकी ५ जागा जिंकल्या आणि १ जागा दत्ता सामंतांनी जिंकली. त्यानंतरच दोन-अडीच महिन्यात झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबईतील ३४ पैकी २७ मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार जिंकले, २ ठिकाणी भाजप, १ ठिकाणी शिवसेना आणि उरलेल्या ३ ठिकाणी (गिरणगावातील परळ, शिवडी आणि वरळी) दत्ता सामंतांचे सहकारी जिंकले. पण त्यानंतर दोनेक महिन्यात झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मात्र शिवसेनेने जवळपास बहुमत मिळवले. १९८६ मध्ये ठाण्यातूनही शिवसेनेलाच जवळपास बहुमत मिळाले होते. १९८५ मध्ये ठाणे आणि बेलापूर या विधानसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. १९९२ मध्ये मुंबईत शिवसेना भाजप युती नव्हती. त्यामुळे काँग्रेस रिपब्लिकन आघाडीला यश मिळवायला त्रास झाला नाही.पण त्याचवेळी ठाण्यात शिवसेना भाजप युती होती. १९९० मध्ये शिवसेनेने ठाणे आणि बेलापूर या दोन्ही विधानसभेच्या जागा जिंकल्या होत्या, १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने ठाणे लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता तरीही युती आणि काँग्रेस या दोघांनाही समसमान म्हणजे ३५ जागा मिळाल्या होत्या. युतीला बहुमत मिळविण्यात अपयश आले होते. १९९७ मध्ये मुंबईतील महापालिका निकाल १९९५ च्या विधानसभा आणि १९९६ च्या लोकसभा निवडणुकांप्रमाणे लागले पण वर्षभरातच १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये युतीला लोकसभेच्या ६ पैकी तीनच जागा जिंकता आल्या. त्यापैकी एक जागा होती मोहन रावलेंची दक्षिण मध्य मुंबई-- १५३ मतांनी जिंकलेली. आणि ती पण जनता दलाच्या शरद रावांनी ४० हजार मते घेतली म्हणून!! २००२ मध्ये परत शिवसेना भाजप युतीला यश मिळाले तरी २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मात्र काँग्रेसने मुंबईतील ६ पैकी ५ जागा जिंकल्या होत्या. राम नाईक, मनोहर जोशी या दिग्गजांचा मुंबईत पराभव झाला होता आणि गोविंदासारखाही लोकसभेवर निवडून गेला. २००७ आणि २००९ मध्येही महापालिका आणि लोकसभा-विधानसभा निकालांमध्ये कोरिलेशन नाही.

गॅरी ट्रुमन's picture

29 Jan 2017 - 8:12 pm | गॅरी ट्रुमन

शिवसेना हरावी असे मनोमन वाटत असले तरी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला 'राईट ऑफ' करता येणार नाही. शेवटी महापालिका निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचे जाळे आणि लोकांबरोबर कनेक्ट महत्वाचा असतो. या दोन गोष्टींमध्ये शिवसेनेला मुंबईत इतर कोणताच पक्ष पुरा पडू शकणार नाही. अर्थातच शिवसेनेला स्वबळावर बहुमत वगैरे मिळणे फारच कठिण आहे.पण सर्वात मोठा पक्ष शिवसेना बनू शकेल आणि तसे झाल्यास उध्दव ठाकरेंची झाकली मूठच राहिल. वर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे महापालिका निवडणुका आणि विधानसभा-लोकसभा निवडणुकांच्या निकालात कोरिलेशन नसते. त्यामुळे महापालिकेत काय झाले त्यावरून २०१९ मध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये काय होईल याविषयी काहीही सांगता येत नसले तरी उध्दव ठाकरे मात्र सर्वात मोठा पक्ष झाल्यास 'जितं मया' असा दावा करतीलच.

या निवडणुकांमध्ये काहीही झाले (अगदी शिवसेना दुसर्‍या नंबरला जरी गेली) तरी शिवसेनेला राज्य पातळीवरही 'राईट ऑफ' करता येणार नाही. म.गो.पक्ष कोसळला कारण त्यांचे आमदार काँग्रेसवासी व्हायला लागले. त्यामुळे लोकांपुढे चित्र उभे राहिले की म.गो.पक्षाला मत देणे म्हणजे मागच्या दाराने काँग्रेसलाच मत देणे. म्हणून काँग्रेसविरोधी मतदार भाजपकडे वळले आणि म.गो.पक्षाची जागा भाजपने व्यापली. तसे शिवसेनेत होत नाही तोपर्यंत अगदी कितीही irrelevant झाली तरी शिवसेना किमान २५-३० जागा तरी विधानसभेत जिंकतच राहिल.

दुसरे म्हणजे सुरवातीला सगळे हेच म्हणत होते की शिवसेनेत नेते बाळासाहेबांविषयीच्या कृतज्ञतेमुळे राहतील पण बाळासाहेबांपश्चात उध्दव ठाकरेंना सगळा डोलारा टिकविणे कठिण जाईल आणि मनसेमध्ये जायला रिघ लागेल. तसे काही झाले नाही आणि राज जास्त आक्रमक वाटत असले आणि शिवसेनेची जागा मनसे व्यापेल असे कितीही बोलले जात असले तरी उध्दव ठाकरेंनी हा डोलारा व्यवस्थित सांभाळला आहे आणि उलट मनसेलाच हद्दपार व्हायची वेळ आली आहे हे श्रेय उध्दव ठाकरेंना द्यायलाच हवे.

फेदरवेट साहेब's picture

29 Jan 2017 - 8:16 pm | फेदरवेट साहेब

ट्रुमन आकड्याखाली स्वतःचा बायस लपवू नका. धन्यवाद.

हतोळकरांचा प्रसाद's picture

29 Jan 2017 - 8:46 pm | हतोळकरांचा प्रसाद

मला मुंबईत शिवसेना जिंकावी असे वाटत असले तरी त्यांना बहुमत मिळू नये असे मनोमन वाटते. जसे राज्यात भाजपवर चेक म्हणून मुंबईत शिवसेना असावी वाटते तसेच मुंबईत शिवसेनेच्या सत्तेवर कोणाचातरी चेक असावा. हा चेक मनसेचा ठरला तर खूपच उत्तम!

गॅरी ट्रुमन's picture

29 Jan 2017 - 8:52 pm | गॅरी ट्रुमन

अजून एक भाकित करतो. हे भाकित राजकारण्यांशी संबंधित नाही तर फेसबुक आणि इतर ठिकाणच्या बुबुडाविपुमाधविंविषयीचे आहे.

२०१९ मध्ये शिवसेना भाजप--पक्षी मोदींविरूध्द निवडणुक लढविणार असल्यामुळे सगळे बुबुडाविपुमाधवि शिवसेना किती चांगली याचा घोषा लावतील (जसा घोषा त्यांनी २०१५ मध्ये लालू किती चांगला असा लावला होता) आणि irony शंभर मरणे मरेल :)

गामा पैलवान's picture

29 Jan 2017 - 8:54 pm | गामा पैलवान

गॅरी ट्रुमन,

अर्थातच शिवसेनेला स्वबळावर बहुमत वगैरे मिळणे फारच कठिण आहे.पण सर्वात मोठा पक्ष शिवसेना बनू शकेल आणि तसे झाल्यास उध्दव ठाकरेंची झाकली मूठच राहिल.

अगदी अचूक निदान. नेमकं हेच धोरण उद्धव ठाकरे पुढे रेटत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था सरकार चालवंत नसतात. म्हणूनंच या निवडणुकीत बहुमताची गरज नसते. सर्वात मोठा पक्ष महापौर/नगराध्यक्ष वगैरे निवडतो.

आ.न.,
-गा.पै.

चावटमेला's picture

30 Jan 2017 - 3:07 am | चावटमेला

१९८० व १९८५ मध्ये पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भाजपच्या अण्णा जोशी यांनी निसटता विजय मिळविला होता. भाजपचा हा हक्काचा मतदारसंघ सेनेने घशात घातला. १९९० ते २००९ या काळात सलग ५ निवडणुकीत या मतदारसंघातून सेनेचा उमेदवार विजयी झाला. मते होती भाजपची पण उमेदवार शिवसेनेचा. हा मतदारसंघ आपलाच आहे हा आधी शिवसेनेचा दावा होता आणि नंतर आपल्या उमेदवाराला मिळालेली मते ही आपलीच आहेत असा भ्रम शिवसेनेला झाला. मतदारांनी शिवसेनेचा भ्रम दूर केला तो २०१४ मध्ये. यावेळी दोघेही एकमेकांविरूद्ध लढले व त्या लढतील भाजपच्या मेधा कुलकर्णींनी आपल्या सेना प्रतिस्पर्ध्यावर तब्बल ६५००० मतांच्या फरकाने विजय मिळविला.

तुम्हाला कोथरूड मतदारसंघ म्हणायचे आहे का? मेधा कुलकर्णी कोथरूड मधून निवडून आल्या आहेत. त्यांनी सेनेच्या मोकाटेंचा पराभव केला.

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2017 - 8:31 am | श्रीगुरुजी

बरोबर. २००९ पासून त्या मतदारसंघाचे नाव कोथरूड झाले.

अनुप ढेरे's picture

30 Jan 2017 - 10:28 am | अनुप ढेरे

शिवाजीनगरमध्ये विजय काळे आमदार आहेत ना?

संदीप डांगे's picture

30 Jan 2017 - 10:38 am | संदीप डांगे

अरे काय हे!

जिथे राहतात खुद्द तिथलीही नीट माहिती नाही की काय अभ्यासू गुरुजींना?
=)) =))

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2017 - 6:53 pm | श्रीगुरुजी

शिवाजीनगरचे नाव कोथरूड झाले आहे व पाषाण, बाणेर इ. भाग असलेल्या मतदारसंघाचे नाव शिवाजीनगर केले आहे हे मला पूर्वीपासूनच माहिती आहे. हा बदल २००९ मध्ये झाला. वरील प्रतिसादात १९७७ पासूनचे संदर्भ असल्याने मी मुद्दामच कोथरूड नाव न घेता शिवाजीनगर नाव लिहिले होते.

आणि अभ्यासाचंच म्हणाल तर २० लाख रूपये रोख घेऊन हिंडणार्‍या ट्रकचालकांच्या कहाण्या लिहिणार्‍या अभ्यासू व व्यासंगी सदस्यांपुढे आमचा अभ्यास म्हणजे किस झाड की पत्ती!

साहेब..'s picture

31 Jan 2017 - 9:57 am | साहेब..

आणि अभ्यासाचंच म्हणाल तर २० लाख रूपये रोख घेऊन हिंडणार्‍या ट्रकचालकांच्या कहाण्या लिहिणार्‍या अभ्यासू व व्यासंगी सदस्यांपुढे आमचा अभ्यास म्हणजे किस झाड की पत्ती!

गॅरी ट्रुमन's picture

30 Jan 2017 - 10:44 am | गॅरी ट्रुमन

शिवाजीनगरमध्ये विजय काळे आमदार आहेत ना?

हो शिवाजीनगरमध्ये भाजपचे विजय काळे आमदार आहेत. त्यांनी काँग्रेसच्या विनायक निम्हण यांचा पराभव केला. हे विनायक निम्हण नारायण राणेंच्या निकटवर्तीयांपैकी होते. २००५ मध्ये राणे शिवसेनेबाहेर पडल्यानंतरही निम्हण शिवसेनेतच होते. पण २००९ मध्ये ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले होते. या मतदारसंघात १९८० आणि १९८५ मध्ये भाजपचे अण्णा जोशी तर १९९० आणि १९९५ मध्ये शिवसेनेचे शशिकांत सुतार तसेच १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून विनायक निम्हण विजयी झाले होते. २०१४ मध्ये या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर होता आणि त्या उमेदवाराने आपले डिपॉझिटही गमावले होते.

वास्तविकपणे युती करताना कोणताही पक्ष आपण मागच्या वेळेस जिंकलेली जागा सोडत नसतो. पण प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनाच माहित असलेल्या कारणामुळे भाजपने हा मतदारसंघ १९९० मध्ये शिवसेनेसाठी सोडला आणि अण्णा जोशींना शिवाजीनगरहून कसबा पेठमधून उमेदवारी दिली गेली. ते १९९०-९१ मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष होते.तर १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेसच्या विठ्ठलराव गाडगीळांचा पराभव केला होता.

१९९१ मध्ये माझ्या आठवणीप्रमाणे पुण्यात पवारसाहेबांनी संभाजीराव काकडेंना उभे केले, आणि कोंग्रेसची मते फोडली, ज्यामुळे विठ्ठलराव गाडगीळांचा पराभव झाला आणि अण्णा जोशी विजयी झाले.

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2017 - 6:39 pm | श्रीगुरुजी

बरोबर. विठ्ठलराव गाडगीळ पवारविरोधी गटातले होते. त्यांना पाडण्यासाठी पवारांनी संभाजी काकडेंना जनता दलाच्या तिकिटावर उभे केले होते. १९८९ च्या निवडणुकीत अण्णा जोशींचा गाडगीळांविरूद्ध जेमतेम ८ हजार मतांच्या फरकाने निसटता पराभव झाला होता. त्या लढतील तिसरा उमेदवार जनता दलाचे अतुर संगतानी यांना ५७ हजार मते मिळाली होती. त्यापूर्वी १९८४ च्या निवडणुकीत जनता पक्षाच्या मोहन धारियांना ५३ हजार मते मिळाली होती. म्हणजे जनता पक्ष/जनता दल यांची एकूण मते ६०००० च्या आतच होती. परंतु १९८९ नंतर लगेचच दीड वर्षात झालेल्या निवडणुकीत काकड्यांनी ८०००० मते घेतली. ही वरची २०-२२ हजार मते पवारांनी फिरविली होती. त्यामुळे गाडगीळ १६ हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. अर्थात ते त्यापूर्वी लागोपाठ ३ वेळा निवडून आले होते. परंतु या पराभवानंतर काँग्रेसमध्ये त्यांचे महत्त्व लयाला गेले. नंतर मे १९९३ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांचे चिरंजीव अनंत गाडगीळ पुण्यात आपल्याला तिकीट मिळावे म्हणून प्रत्येक वेळी जोरदार प्रयत्न करतात. परंतु त्यांना पुण्यात हिंग लावून कोणी विचारत नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jan 2017 - 4:46 pm | llपुण्याचे पेशवेll

ण प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनाच माहित असलेल्या कारणामुळे भाजपने हा मतदारसंघ १९९० मध्ये शिवसेनेसाठी सोडला आणि अण्णा जोशींना शिवाजीनगरहून कसबा पेठमधून उमेदवारी दिली गेली.
याचे कारण युती मजबूत करणे हे होते. आण्णा जोशी खासदारकी ला उभे राहील्यावर शशिकांत सुतारांनी त्यांची (शिवसेनेची, कारण शशिकांत सुतार हे पुण्यात शिवसेना स्थापनेपासून कार्यरत असलेले व प्रभावशाली व्यक्तिमत्व होते) संपूर्ण ताकद आण्णांच्या पाठीशी उभी केली. त्या बदलात आण्णांच्या आग्रहामुळे हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला होता.
सुतार इथूनच निवडून जाऊन पुण्याचे पालकमंत्री व कृषि राज्यमंत्री झाले होते. नंतर शिवसेनेतल्या अंतर्गत कलहातून आण्णा हजारे प्रकरण उद्भवले व सुतार सक्रीय राजकारणातून बाहेर पडले. त्यानंतर ते कधीच कुठल्याही निवडणूकीत उभे राहीले नाहीत. परंतु शिवसेनेने मात्र हा मतदार संघ आपला असल्याच्या मिजाशीत आपल्याकडे ठेवला व हिंदुत्ववादी असलेलि कोथरूडकर जनता युतीमुळे मोकाटेंना मत देत राहीली. जेव्हा २०१५ ला संधी मिळाली तेह्वा सर्वांनी भाजपाला मत देऊन हा मतदारसंघ भाजपाचाच आहे हे सिद्ध केले.
शशिकांत सुतारांचे काम आणि जनसंपर्क दांडगा असला तरी जेव्हा युतीचे सरकार होते तेव्हा देखील सुतारांची पत्नी सौ. रसिका सुतार ह्या महानगरपालीका निवडणूकीत कोथरूड डेपो मतदार संघातून सुबराव कदम (काँग्रेस) यांविरुद्ध पडल्या होत्य.

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jan 2017 - 4:51 pm | llपुण्याचे पेशवेll

आण्णा जोशींचे दुर्दैव म्हणजे एकेकाळी पुण्यातल्या भाजपाचे चेहरा असलेले आण्णा जोशी २००९ च्या निवडणूकीत कोथरुड मधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढून दणदणीत पडले. युतीमुळे मोकटे निवडून आले.

गॅरी ट्रुमन's picture

30 Jan 2017 - 9:57 am | गॅरी ट्रुमन

आता यापुढे युतीसाठी भिकेचा कटोरा घेऊन कोणाच्या दारात जाणार नाही,

असे उध्दव ठाकरे म्हणाले. म्हणजे याचा अर्थ नक्की काय घ्यावा? इतकी वर्षे ते भिकेचे कटोरे घेऊन युतीसाठी इतरांच्या दारात जात होते का?

गामा पैलवान's picture

30 Jan 2017 - 1:07 pm | गामा पैलवान

गॅरी ट्रुमन, अहो असं कसं म्हणता तुम्ही! आत्तापर्यंत भाजपवाले भिकेचे कटोरे घेऊन शिवसेनेच्या दारात उभे होते. तसलं काही शिवसेना करणार नाही, इतकाच उद्धवोक्तीचा आशय आहे.
आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2017 - 6:44 pm | श्रीगुरुजी

असे उध्दव ठाकरे म्हणाले. म्हणजे याचा अर्थ नक्की काय घ्यावा? इतकी वर्षे ते भिकेचे कटोरे घेऊन युतीसाठी इतरांच्या दारात जात होते का?

"तुम्ही महाराष्ट्रात व देशात सत्तेवर आहात. निदान मुंबई तरी आमच्यासाठी सोडा." अशी उधोजींनी फडणविसांना विनंती केल्याचे वाचले. फडणविसांनी अर्थातच ही "विनंती" धुडकावून लावली. हे खरे असेल तर हा भिकेचा कटोराच म्हणावा लागेल.

संदीप डांगे's picture

30 Jan 2017 - 6:50 pm | संदीप डांगे

"तुम्ही महाराष्ट्रात व देशात सत्तेवर आहात. निदान मुंबई तरी आमच्यासाठी सोडा." अशी उधोजींनी फडणविसांना विनंती केल्याचे वाचले.

हे कुठे वाचले ह्याचा संदर्भ व ते खरे असल्याचा पुरावा द्याल काय.....?

मुंबईतही तुम्हाला जागा वाढवून पाहिजेत त्यातही तडजोड नको चर्चेची भूमिका नको पारदर्शकता वर असून बसलात ज्या सत्तेत आपण होतात तिथेच चिखलफेक केलीत वाजपेयींच्या काळात आम्ही सरकार चालावा म्हणून तडजोड केली होती जयललिता आणि ममता बॅनर्जींमुळे . कारण त्यावेळी युतीत असलेले उत्तम संबंध आणि नेते . असा एकंदरीत पूर्ण आशय होता त्या वाक्याचा . पण सोयीस्कर वाक्य तोडलं आणि लिहिलं.
अजूनपर्यंत भाजपचा भ्रष्टाचार किंवा नोटबंदी किंवा पालिकेत का राहिलात ,३ वर्ष गृहमंत्री पद आहे तरी का बघत बसलात , खडसेंच्या राजीनामा का घ्यावा लागला अश्या अनेक प्रश्नाचा उत्तर भाजपसमर्थकांकडे नाही . मुंबईत शिवसेना हरावी आणि उद्धव ठाकरे कसे चुकले यासाठी फक्त इच्छुक आहेत भाजपसमर्थक .वर कारभार बदलणार नाहीये पण सांगत आहेत . .तर्कसंगती छान आहे . भाजपच्या प्रभावाचा पण तसेच . जाऊदे भाजप चे पूर्वीचे नेते चुकीचे होते त्यांनीच ठरवलंय .

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2017 - 8:27 pm | श्रीगुरुजी

He leader said while Sena made the announcement that it was calling off talks for a BMC poll alliance on January 26, none other than Uddhav Thackeray had given indications to the CM on the possibility of such an outcome when he spoke to him a fortnight ago. "Uddhav made it clear to the CM, he said let BJP rule India and Maharashtra, but leave Mumbai for Shiv Sena. We were not surprised by the decision,'' he said.

http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/bmc-polls-2017-uddhav-tha...

वरुण मोहिते's picture

30 Jan 2017 - 8:55 pm | वरुण मोहिते

मी बाकीची पार्श्वभूमी सांगितली त्या वाक्याची . दोन्हीकडे शिवसेना पण सत्तेत आहे जितका त्यांना वाटा मिळायला हवा तितका मिळाला आहे . त्यामुळे मुंबई सोडा म्हणून कुठला दुसरा पक्ष ऐकेल का आणि कोणी असे सांगेल का सेनेलाही माहित आहे कदाचित भाजपाची गरज लागेल आणि भाजप लाही . प्रश्न केव्हा उद्भवला जेव्हा सत्तेत असून माफियाराज वैग्रे बाता चालू झाल्या . कारण सरळ आहे पैसा. शेलार आणि सोमैय्या काय आहेत सगळ्यांना माहित आहे . सोमैय्यांना तर आमच्या इथे कोण विचारातही नाही .

माझीही शॅम्पेन's picture

30 Jan 2017 - 1:11 pm | माझीही शॅम्पेन

बाकीच्याच काय व्हायच ते होवो , पण ही निवडणूक ही सेने साठी धोक्याची घंटा आहे हे नक्की ,
कारण
1) इतके वर्ष सतत निवडून देऊन ही ठाणे आणि मुंबई ह्यांची खस्ता हालात , आता वेगळे लढल्याने सहज सेनेवर त्याच खापर फुट्नार
2) सेनेला जर का ह्या वेळेस भाजपा वेगळी लढली तर अमराठी मत जी खूप प्रमाणात आहेत मुंबई मध्ये ती मिळन दुरपस्त आहे
3) मोदी ह्यांचा करिश्मा आज ही कायम आहे , भाजपा जर सेनेला समर्थ पर्याय म्हणून उभा राहिला तर सेनेची पंचायत होऊ शकते
4) फडणविस हे मुख्यमंत्री म्हणून जर ठाणे / मुंबई कारांसाठी ठोस आश्वासन देऊ शकले (जस की टोल बंद / कमी करू वैगरे) तर शेवटच्या क्षणी मतांचा स्विंग भाजपा कडे झुकु शकतो
5) अनेक धर सोड धोरणांमुळे उध्धव ठाकरे ह्यांच नेतृत्व फडणविस ह्यांच्या पेक्षा थोडस कमी अपीलिंग आहे

माझ्या मते मुंबईत भाजप प्रथम असेल आणि ठाण्यात निसटत्या फरकाने सेना पुढे असेल , जे काही होईल त्याचे परिणाम राज्याच्या राज करणावर दूरगामी असतील , जर सेनेच पानिपत झाल तर मात्र सेना पक्ष फुटू पण शकेल (शक्यता फार कमी आहे)

गॅरी ट्रुमन's picture

30 Jan 2017 - 3:35 pm | गॅरी ट्रुमन

बाकीच्याच काय व्हायच ते होवो , पण ही निवडणूक ही सेने साठी धोक्याची घंटा आहे हे नक्की

असे व्हावे हे फार फार वाटते. पण ते होईलच याची खात्री मात्र वाटत नाही. निवडणुका आल्यावर मराठीचे पंचवार्षिक उमाळे आणि इतर वेळी कमालीची अकार्यक्षमता, एकीकडे बोलताना समाजकारणाचा जप करायचा पण दुसरीकडे गुंडगिरी करायची असल्या सेनेचा पराभव व्हावा असे फार वाटत असले तरी तो होईल का याविषयी मात्र साशंकता वाटते.

कपिलमुनी's picture

30 Jan 2017 - 3:21 pm | कपिलमुनी

मुख्यमंत्रीच राष्ट्रवादीमधे ??

CM

पिंचिमधे ज्या प्रकारे सगळ्या भ्रष्ट लोकांना पावन करुन भाजपामधे घेणे चालले आहे ते बघता भाजपाला कोणतेही नितीचे सोयरसुतक नाही.
विलास लांडे वगळता सर्व राष्ट्रवादीचे नेते भाजपमधे आले आहेत. ईतक्या मोठ्या प्रमाणात आयात करून भाजप निवडनूक जिंकेल पण निवडून भ्रष्टवादीच येतील.

संदीप डांगे's picture

30 Jan 2017 - 3:45 pm | संदीप डांगे

=)) =))

महिन्याभरापूर्वीपर्यंत राष्ट्रवादी आणी पवारांविरुद्ध चालणारी इथली मुलूखमैदान तोफ गळून पडल्यासारखी शांत बसली आहे आता.

कपिलमुनी's picture

30 Jan 2017 - 4:10 pm | कपिलमुनी

काँग्रेस राष्ट्रवादी वाईट आहेतच पण सेना भाजपा त्याच वाटेवर आहेत. सेनेला खंडणीखोर म्हणणारे भाजपाचाच मुख्यमंत्री \ गृहमंत्री आहे ना ? मग टाका ना जेलमधे !
25 वर्षे महापालिका शिवसेनेच्या हातात दिल्याने मुंबईचं नुकसान होता पण सत्तेमधे वाटेकरी होताच ना ? मुंबईचा नुकसान होताना विरोध का केला नाहीत ?
निवडणूकीच्या तोंडावर एकमेकांवर आरोप करून सेना - भाजपा स्वतःची सामान्य मतदारांमधील विश्वासार्हता घालवत आहेत.आज सेना जात्यात असेल तर भाजपा सुपात आहे. आयारामांनी निवडणूका जिंकल्या तरी कार्यकर्ता / पारंपारीक मतदार दुरावतोच .
भाजपा मुंबईमधे आला तर फार बदल घडणार नाही हे कडोंमपा च्या बातमीवरून लक्षात येत आहेच

संदीप डांगे's picture

30 Jan 2017 - 4:27 pm | संदीप डांगे

ते ६५०० कोटी मामाच्या घरुन येणार नाहीत हे आता कळले असावे... =))

कदाचित. संदर्भः https://sabrangindia.in/article/lucknow-rally-pointed-the-finger-at-pm-modi

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jan 2017 - 5:10 pm | llपुण्याचे पेशवेll

सबरंग इंडीया म्हणजे बूच बसलेल्या सेटलवाड बाईंचे काय?

अनुप ढेरे's picture

31 Jan 2017 - 5:18 pm | अनुप ढेरे

बरोब्बर! ती लिंक पांचजन्य/ सामनाइतकी विश्वासार्ह मानावी

गामा पैलवान's picture

1 Feb 2017 - 12:55 pm | गामा पैलवान

हाहाहा! सामना वा पांचजन्यला आजून तरी बुच बसलेली नाहीये. वक्रोक्ती आवडली! :-)
-गा.पै.

संदीप डांगे's picture

1 Feb 2017 - 1:09 pm | संदीप डांगे

पेशवे, अनुप, लिन्क कोणाची आहे हे बघायचे की मोदी साहेब स्वतः काय म्हणाले ते बघायचं...? खाली विडियो बघून घ्यावा... माननीय मोदींजीच स्वमुखातून बोलले आहे.

श्रीगुरुजी's picture

1 Feb 2017 - 3:05 pm | श्रीगुरुजी

इथे नक्की इश्यू काय आहे? नक्की कोणत्या गोष्टीला विरोध आहे?

संदीप डांगे's picture

1 Feb 2017 - 3:29 pm | संदीप डांगे

ते मोदींना विचारा, तेच विरोध करत आहेत बॉ.... आता मोदींचे हिंदीही तुम्हाला समजत नसेल तर चिंताजनक आहे.

श्रीगुरुजी's picture

2 Feb 2017 - 2:23 pm | श्रीगुरुजी

मग करू देत ना विरोध. विरोध केला असला तरी नक्की इश्यू काय आह?

सर्वप्रथम लेख बराच एकांगी तसेच प्रचारकी झाला आहे हे स्पष्टपणे नमूद करू इच्छितो.

आता गोची अशी आहे कि मी भाजपेयी होतो (२००५ पर्यंत तरी निदान) पण माझे आवडते वाजपेयी जस-जसे सक्रीय राजकारणातून कमी होत गेले तसे मी शिवसेनेला मत द्यायला सुरवात केली.

मोदी कितीही चांगले काम करूदेत पण त्यांच्याबद्दल मनात १ अनामिक भीती सतत राहते कि हा माणूस संधी मिळाली तर नक्कीच हुकुमशहा होऊ शकतो.
अमित शहा बद्दल न बोललेलेच बरे कारण एक मोदी समर्थक सोडले तर या माणसाचे काहीही योगदान नाही.

राहता राहिला प्रश्न शिवसेनेचा तर विधानसभेला मोदी लाट जिवंत असून देखील शिवसेनेने ६३ जागा जिंकून दाखवल्या हे सुद्धा काही कमी नाही,

वरती गॅरी ट्रुमन व गुरुजी सतत बोलून दाखवत आहेत कि उद्धव फुशारक्या मारत आहेत फुशारक्या मारत आहेत मग मी त्यांना प्रश्न न कि भाजप चे नेते काय करत आहेत ? ते आशिष शेलार / किरीट सोमय्या ई. प्रभूती सतत शिवसेनेच्या खोड्या काढत आहेत. अगदी विधानसभेच्या निकालादिवशीपासून भाजपवाले राष्ट्रवादीच्या पाठींब्या बाबत स्पष्टपणे काही बोलत नाहीये असे का ?

ज्या पवारांना भ्रष्ट, भ्रष्ट करत भाजप सत्तेपर्यंत पोहोचली आहे तिचाच पाठींबा आता भाजप ला आता चालणार आहे ? त्याच पवारांना आता हे पद्मविभूषण देत आहेत ? मग आमच्या सारख्या सामान्य लोकांनी काय समजावे ?

साला मग ते उद्धव परवडले कि हो मला मान्य आहे कि मुंबई ची दुरवस्था व्हायला शिवसेना जबाबदार असेल पण मग या पापात भाजप देखील तितकाच वाटेकरी आहे असे नाही वाटत तुम्हाला?

मनसे ला तर मी कधीच गृहीत धरले नव्हते कारण राज ठाकरे नामक स्वमग्न माणूस स्वतः सोबत आपल्या सहकार्यांचे देखील वाटोळे करत आहे.

सध्या इतकेच पुरे.

संदीप डांगे's picture

30 Jan 2017 - 4:31 pm | संदीप डांगे

सहमत... लेखाचा उद्देश भाजपचा प्रचार करणे इतकाच आहे. संपादक असले धडधडीत प्रचारकी लेख मिसळपाववर राहू देतात याचे आश्चर्य वाटते.

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2017 - 8:33 pm | श्रीगुरुजी

२० लाख रूपये रोख घेऊन फिरणार्‍या ट्रकचालकांच्या सुरस कहाण्या असणारे लेख इथे प्रदर्शित होतात, आपण शय्यागृहात आनंदवृद्धीसाठी कोणती अतिरिक्त साधने वापरतो हे सांगणारे लेख प्रदर्शित होतात, मग याचे लेखाने काय घोडं मारलंय?

संदीप डांगे's picture

30 Jan 2017 - 8:56 pm | संदीप डांगे

चला म्हणजे एका अर्थी तुम्ही मान्य करताय तर हा लेख भाजपच्या प्रचारासाठी लिहिलाय... हे ही नसे थोडके.

माननीय संपादक-मालक,
श्रीगुरुजी स्वतः कबूल करत आहेत की ते इथे भाजपचा प्रचार करायला लिहितात. बघा बुवा....

बाकी, ना माझा २० लाखाचे ट्रक घेऊन फिरायचा धंदा आहे ना संक्षींचा रिंगा विकायचा धंदा आहे... तसेच आम्ही दोघे वीस लाख घेऊन फिरणार्‍या ट्रकांची किंवा रिगांची भलामण करायला सतत धागेही काढत नसतो.

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2017 - 9:12 pm | श्रीगुरुजी

नेहमीप्रमाणेच स्वतःला सोयिस्कर निष्कर्ष काढून मोकळे. माझा प्रतिसाद पुन्हा एकदा नीट वाचा. तुम्हाला जो धागा प्रचारकी वाटतो तो संपादक का चालून देतात असा तुमचा आक्षेप आहे. तुम्हाला मी वर उल्लेखलेले इतर धागे चालतात तर या धाग्यावर आक्षेप का असे मी विचारले आहे. माझ्या या प्रतिसादावर लगेच स्वत:ला सोयिस्कर निष्कर्ष काढून मोकळे.

तुमचा किंवा त्यांचा कसला धंदा आहे त्याच्याशी मला अजिबात घेणंदेणं नाही. तुमचे धंदे तुम्हालाच लखलाभ. तुम्ही ते फालतू धागे काढले ही वस्तुस्थिती आहे.

गॅरी ट्रुमन's picture

30 Jan 2017 - 4:31 pm | गॅरी ट्रुमन

मी गेल्या काही दिवसात लिहिलेले महापालिका निवडणुकांविषयीच्या सर्व चर्चांमधले प्रतिसाद वाचून मगच असे काही लिहा असे नमूद करू इच्छितो.

उपेक्षित's picture

30 Jan 2017 - 5:06 pm | उपेक्षित

गॅरीभाऊ आपला अभ्यासूपणाचा आणि आपल्या राजकीय लेखांचा इथे असलेल्यांपैकी मी एक चाहता आहे आणि आपल्याबद्दल आदरअसून देखील वरील प्रतिसाद मी लिहिला आहे.
वरती मी काही मुद्दे मांडायचा प्रयत्न केला पण तुमच्याकडून १हि मुद्द्याचे उत्तर आलेले नाहीये (गुरुजींकडून तशीही अपेक्षा नाहीये मला हे स्पष्ट करतो)

गॅरी ट्रुमन's picture

30 Jan 2017 - 5:12 pm | गॅरी ट्रुमन

एकाही मुद्द्याचे उत्तर आलेले नाही याचे कारण या मुद्द्यांविषयी मी आधीच लिहिलेले आहे.

शिवसेना जावी. सत्ता गेली तरी चालेल पण तिथे राष्ट्रवादी नको आणि तसे झाल्यास विधानसभा निवडणुकांमध्ये माझे मत भाजपला नसेल हे गेल्या दोन-तीन दिवसात कुठल्यातरी चर्चेत स्पष्टपणे लिहिलेले आहे. दुसरे म्हणजे महापालिका पातळीवर कोण सत्तेत येतो त्यामुळे खरोखरच काहीही फरक पडत नाही. रस्त्यावरचे खड्डे, अनधिकृत बांधकामे वगैरे गोष्टी कोणीही आले तरी तशाच चालू राहणार आहेत त्यामुळे माझा या निवडणुकांमधला इंटरेस्ट फक्त शिवसेना पराभूत व्हावी इतकाच हे पण लिहिलेले आहे. त्यामुळे तुमच्या मुद्यांविषयी नव्याने लिहिण्यासारखे माझ्याकडे काहीही नाही.

उपेक्षित's picture

30 Jan 2017 - 5:36 pm | उपेक्षित

तुम्ही या मुद्द्यावर आधी काय लिहिले आहे आणि कोणत्या संदर्भाला धरून लिहिले आहे ते मी वाचलेले नाहीये सो मला ते माहित नाहीये आणि नवीन धाग्यावर चर्चा नव्याने चालू झालेली आहे तुम्ही प्रतिसाद देत आहात तर हे म्हणणे सयुक्तिक नाहीये कि मी आधी दुसरीकडे यावर चर्चा केली आहे तर आता नाही करणार.
हे बरोबर नव्ह देवा....
हि सरळसरळ पळवाट झाली...
बाकी तुम्हाला शिवसेना हरलेली बघायची आहे हे समजले आहे पण ते का याचे नित उत्तर अजून आलेले नाहीये...

अटकेत असलेले नेते सुधाकर चव्हाण हि भाजप मध्ये .विशेष म्हणजे ४ नगरसेवकांना अटक झाली होती त्यातील राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला ह्यांना अजूनही राष्ट्रवादी ने बाजूला ठेवलय तर अपक्ष आणि मधेच मनसे मग अपक्ष असे असलेकल्या चव्हाणांना भाजप ने लगेच पक्षात घेतले . एकंदरीत भाजप चा खोटेपणा उघड सगळीकडेच होत आहे किती वर्ष अजून टिकणार कोण जाणे
राष्ट्रवादी विरुद्ध बोलायची तर ह्यांची बोलतीच बंद झालीये कायमची .
मुख्यमंत्री मूक संमती देत होते का सेनेच्या खंडणी ला जे काल मुख्यमंत्र्यांना कळलं . २५ वर्ष युतीत राहून भाजप ला कळलं आता कळलं .छान
भाजप धुतल्या तांदळासारखा आहे म्हणायचं तेवढेच भक्त खुश

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2017 - 8:34 pm | श्रीगुरुजी

सुधाकर चव्हाणांना भाजपमघ्ये घेतले या बातमीचा संदर्भ देता का?

वरुण मोहिते's picture

30 Jan 2017 - 8:40 pm | वरुण मोहिते

वरुण मोहिते's picture

30 Jan 2017 - 8:46 pm | वरुण मोहिते

चुकून लिंक आली नाही .फक्त 'सुधाकर चव्हाण ठाणे एबीपी माझा' इतकाच सर्च करा पहिलीच लिंक येईल गुगल वर .आणि निश्चित आहे हे तिकीट .

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2017 - 9:15 pm | श्रीगुरुजी

जेव्हा त्याला अधिकृत प्रवेश दिला जाईल तेव्हा मी माझे मत लिहीन. तोपर्यंत 'असे सूत्रांकडून समजते', 'असे बोलले जात आहे' असे संदिग्ध लिहिलेल्या बातम्यांवर मी विश्वास ठेवत नसतो.

संदीप डांगे's picture

30 Jan 2017 - 9:45 pm | संदीप डांगे

गोव्यात भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या (तो भ्रष्टाचार सिद्ध करण्यात स्वतः पर्रिकरांची मुख्य भूमिका होती म्हणे) मडकईकरांना सन्मानाने भाजपात घेतले आहे. त्याबद्दल सविस्तर विडियो टाकला होता, तेव्हा आपला काही प्रतिसाद तर आजवर आला नाही, तेव्हा वरच्या प्रतिसादात नमूद केलेल्या अ‍ॅटिट्युडवर कोणी विश्वास ठेवेल काय.. =))

श्रीगुरुजी's picture

31 Jan 2017 - 3:24 pm | श्रीगुरुजी

कोठे टाकला होता हा व्हिडिओ?

तुम्ही आमच्या अ‍ॅटिट्युडवर विश्वास ठेवता का नाही याची आम्हाला फिकीर नाही.

संदीप डांगे's picture

1 Feb 2017 - 1:14 pm | संदीप डांगे

काय गुरुजी... जणू तुम्हाला माहितीच नाही असं भासवताय.... ;-)

http://www.misalpav.com/comment/909964#comment-909964

घ्या लिन्क, तुमचाच धागा आणि आणि माझ्या विडियोवाल्या प्रतिसादाखाली पहिला प्रतिसाद तुमचाच आहे. स्वतःच्याच धाग्यावरचे प्रतिसाद आपण वाचत नाही का? तेही ताज्याघडामोडी सारख्या नावाच्या धाग्यावर तर प्रत्येक प्रतिसाद वाचायला हवा की नको?

श्रीगुरुजी's picture

1 Feb 2017 - 3:00 pm | श्रीगुरुजी

त्या चित्रफिती होय? मी त्या चित्रफिती बघितल्या. त्यातील पहिली इंग्लिश व कोकणीत आहे. उरलेल्या दोन्ही कोकणीत आहेत. मला कोकणी समजत नाही. त्यामुळे तो इश्यू नक्की काय आहे ते नीटसे समजलेले नाही.

त्या इश्यूबद्दल मराठी किंवा इंग्लिशमध्ये एखादी लिंक असेल तर पाठवा.

संदीप डांगे's picture

1 Feb 2017 - 3:26 pm | संदीप डांगे

काय गुरुजी.... पहिलाच विडियो संपूर्ण इश्यूबद्दल नीट स्पष्ट इंग्रजीत आहे. तुम्हाला इंग्रजी अजिबातच समजत नाही असं म्हणायचं आहे का?

याच विडियोत म्हटलंय हे प्रकरण इतकं स्पष्ट आहे की अगदी बालवाडीतल्या पोरालाही समजेल...

"पर्रिकरांनी स्वतःच ज्याचा भ्रष्टाचार सिद्ध केला त्याला स्वतःच सन्मानाने भाजपात घेतलं". इतका स्पष्ट आहे विषय. आता हे खोटं असेल तर तुम्हीच लिण्का शोधा आणि पाठवा....

श्रीगुरुजी's picture

1 Feb 2017 - 3:29 pm | श्रीगुरुजी

पहिल्या चित्रफितीत इंग्लिश व कोकणी या दोन्ही भाषांमध्ये संभाषण आहे. उर्वरीत दोन्ही चित्रफिती फक्त कोकणीत आहेत. तिन्ही चित्रफिती एकत्रित समजणे आवश्यक आहे.

संदीप डांगे's picture

1 Feb 2017 - 3:39 pm | संदीप डांगे

धडधडीत सत्य समोर असतांना आता ते आपल्या भूमिकेला सोयीचे नसल्याने समजत नसल्याची बालीश कारणे पुढे करत आहात गुरुजी....

सिलेक्टीव डंबनेस असा काही सायकॉलॉजीमध्ये/सायकॅट्रीमधे प्रकार असतो का?

अवांतरः ह्यावरुन सहज आठवले, काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक वेगळ्या प्रदेशात काही गुन्हा करतांना रंगेहात पकडले की 'आपल्याला तिथली भाषा समजत नाही' असा बनाव करतात, जेणेकरुन संशयाचा फायदा घेऊन सुटता यावे.

श्रीगुरुजी's picture

2 Feb 2017 - 2:26 pm | श्रीगुरुजी

सिलेक्टिव्ह डंबनेस कसला आलाय? तीन चित्रफिती आहेत. त्यातल्या दोन मला न समजणार्‍या भाषेत आहेत. एकीत मला समजणारी भाषा आहे, त्याच बरोबरीने मला न समजणार्‍या भाषेत सुद्धा काही संभाषण आहे. आपल्याला पूर्णपणे न समजलेल्या घटनांवर प्रतिक्रिया देऊन ठाम निष्कर्ष काढणे मला जमत नाही.

संदीप डांगे's picture

2 Feb 2017 - 4:14 pm | संदीप डांगे

सिलेक्टीव डम्बनेस? मडकईकर या इसमावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन ते सिद्धही करणारे पर्रिकर साहेब स्वतःच त्याला भाजपमधे घेते झाले, एवढेच नव्हे तर त्याने केलेला भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच नव्हे असेही मखलाशी करतायत, तरी बरे त्यांनी स्वतः इन्वेस्टीगेशन करुन तो उघडकीस आणला. ही घटना काही कोण्या वाहीनीचे स्टींग ऑपरेशन नव्हे एकाच विडियोवर अवलंबून राहायला, ढळढळीत घडलेली घटना आहे, महत्त्वाच्या वृत्तपत्रांमधे आली आहे, खुद्द विडियोत आरोप करणारे आणि बाजूला घेऊन बसणारे पर्रिकर दिसत आहेत, पहिला विडियो ही पूर्ण न्यूज आहे, दुसरे दोन विडियो हे त्याच वरच्या बातमीतले स्वतंत्र विडियो आहेत. हे सर्व बहुतेक राहूल गांधीएवढ्या आयक्यू असलेल्या माणसालाही कळेल... :-)

भाषा समजत नाही, तीन चित्रफीत आहेत, कोकणी मला समजत नाही इत्यादी जी नाटके चालली आहेत ह्यालाच सिलेक्टीव डंबनेस म्हणतात.

तिकडे सुधाकर चव्हाणला भाजपने घेतले नाही त्यावर हिरिरीने युक्तिवाद करनारे श्रीगुरुजी इथे मात्र कानात बोट घालून 'मला ऐकुच येत नाही हो' अशी नाटके करत आहेत. एवढेच उघडे पाडायचे होते. ते व्यवस्थित झाले आहे. =)) =))

श्रीगुरुजी's picture

3 Feb 2017 - 12:03 am | श्रीगुरुजी

काय बळजबरी आहे. भाषा समजत नाही असं सांगितलं म्हणे नाटके चालली आहेत. जगातील प्रत्येक भाषा प्रत्येकालाच समजायला हवी का? कोकणी भाषा भारतातल्या प्रत्येकालाच समजते किंवा समजायलाच हवी अशी तुमची बळजबरी दिसते. तुम्हाला जगातल्या सर्व भाषा येताहेत असं दिसतंय. साहजिकच आहे. ज्यांचे ट्रकवाले रोख २० लाख रूपये घेऊन हिंडतात त्यांना जगातलं सर्व काही येत असतं. दुसर्‍याला न समजणार्‍या भाषेत काहीतरी टाकायचं आणि नंतर कांगावा करायचा की बघा हो, यांना हे समजत नसल्याचं नाटक करताहेत. मराठी, इंग्लिश किंवा हिंदीतली चित्रफीत असेल तर टाका, नाहीतर कोठे जायचं ते वेगळं सांगायला नको.

संदीप डांगे's picture

3 Feb 2017 - 11:19 am | संदीप डांगे

कोणतीही बळजबरी करत नाहीए. दिलेला विडियो इंग्रजीत असून समजत नसल्याबद्दलची कारणे देत आहात हे खोटारडेपण नाही तर काय? तुम्हाला इंग्रजी समज्त नाही असे म्हणायचे आहे काय? मला जगातल्या सर्व भाषा येत नसल्या तरी जगातल्या सर्व बातम्या ज्या भाषेत मिळू शकतात ती भाषा कळते. आणि गोवा म्हणजे काय आफ्रिका खंडातले गाव नाही. तुम्ही पुरते उघडे पडलात गुरुजी... कितीही थयथयाट केला तरी तुमचा खोटेपणा लपणार नाहीए. भाजपने आपल्या पक्षात आपणच भ्रष्ट म्हणून सिद्ध केलेल्या माणसाला घेतले हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. तुम्हाला कोकणी न समजण्याचा ह्या 'तथ्या'शी काही-एक संबंध नाही. पण तुम्हच्याकडे आता बचावासाठी काहीच नसल्याने मला भाषा समजत नाही, लिन्काच द्या ह्याची नाटके करत आहात. बाकी, मिसळपाववर कोकणी समजणारे अनेक आहेत, मी काही-एक खोटं सांगत असेल तर कोणीही स्पष्ट करावे.

वीस लाखाच्या ट्रकची तुम्ही कितीही उजळणी कराहो.... त्याने तुमच्या उघड्या पडलेल्या खोटेपणावर पांघरुण घालता यायचे नाहीच. वीसलाख आणी ट्रक हा माझा पर्सनल मुद्दा आहे पण भाजप भ्रष्ट लोकांना पक्षात घेते हा कुणाचा पर्सनल मुद्दा नाहीये तरी तुम्ही त्या खोटेपणाला इतकं निर्बुद्ध डिफेण्ड करत हास्यास्पद आणि केविलवाणे होत आहात एवढं कळलं तरी पुरे....

बातमी समजत नसल्याचे गुरुजी खोटं बोलत आहेत हे स्पष्ट झालेले आहे तरीसुद्धा चमचा-फीडिंगः madkaikar parrikar एवढं गुगल केलं तरी हव्या त्या भाषेत बातम्या मिळू शकतील हे बालबुद्धीच्या इसमालाही कळेल... =)) =))

श्रीगुरुजी's picture

3 Feb 2017 - 2:43 pm | श्रीगुरुजी

परत तेच पालुपद. एक सोडून तीन तीन चित्रफिती टाकल्या. आणि म्हणताय की एकच पाहून रलेल्या न बघता प्रतिक्रिया द्या. हे म्हणजे कोणी 'ता' अक्षर उच्चारलं की तो शब्द पूर्ण न ऐकता 'ताकभात' हाच आहे हे मान्य केलंच पाहिजे अशी बळजबरी केल्यासारखं आहे. एखाद्याने म्हटलं तो शब्द पूर्ण ऐकू देत किंवा तो शब्द वेगळा असू शकतो, तर लगेच तुम्ही त्याच्यावर नाटकीपणाचे आणि खोटारडेपणाचे आरोप करून मोकळे होणार. थयथयाट करणे आणि खोटेपणा सातत्याने उघडकीला येणे हे तुमच्याच बाबतीत वारंवार घडतं. माझ्या नाही. मी जे लिहितो याचे पूर्ण संदर्भ देतो. उगाच २० लाख रूपये रोख खिशात घेऊन हिंडणार्‍या ट्रकचालकांचा सुरस कहाण्या सांगत नाही.

मिपावर कोकणी समजणारे अनेकजण असतील. त्यातील एकानेही प्रतिक्रिया दिलेली नाही यावरूनच काय ते समजा. अखिल मिपावरील जवळपास सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. यामागचे कारण उघडच आहे. २० लाखांच्या बाता मारणार्‍यांनी इतरांवर खोटेपणाचे दोषारोप करावेत हे अत्यंत हास्यास्पद आहे. बादवे, तो तुमचा पर्सनल मुद्दा राहिलेला नाही. ज्याक्षणी ती सुरस कहाणी तुम्ही सार्वजनिक केलीत त्याच क्षणी त्या बाता सार्वजनिक झाल्या आहेत.

संदीप डांगे's picture

3 Feb 2017 - 2:59 pm | संदीप डांगे

भाजप खोटारडा पक्ष आहे व त्याने भ्रष्ट लोकांना आत घेतले आहे हे मडकईकरांच्या बाबतीत गोव्यात घडले एवढे स्पष्ट आहे सगळे, तरी तुम्ही एका चित्रफितीवर अडून बसले आहात आणि तेच पालुपद उकळत आहात. बाकी तुम्हाला काय समजतं नाही समजत याच्या मला काही घेणे देणे नाही. मिपाकरांनी प्रतिक्रिया दिली नाही दिली ह्याचाही काही संबंध नाही. भाजप जो आहे तो आहे, पण तुमचे त्या पक्षाला अंधपणे डिफेन्ड करणे अधिकाधिक मनोरंजक होत चालले आहे...

'गुगल' केले का? का तेही आयतं करुन हवंय....? की तेही 'समजत' नाही तुम्हाला?

(सूचना: 'मेगाबायटीत वाचले नाही' अशी पळवाट काढू नये म्हणून फॉण्ट मोठा केलाय.. :-) )

श्रीगुरुजी's picture

3 Feb 2017 - 3:09 pm | श्रीगुरुजी

"भाजप खोटारडा पक्ष आहे व त्याने भ्रष्ट लोकांना आत घेतले आहे" असं तुमचं मत असेल तर ठीक आहे ना. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुमचे पुरावे म्हणून जे देता ते लोकांना नीट समजत नसतील व म्हणून ते प्रतिक्रिया देत नसतील तर लगेच त्यांना "नाटकी", "खोटारडे", "निर्बुद्ध" अशी शेलकी विशेषणे लावून त्यांचा उद्धार करण्याची गरजच काय?

हे मडकईकरांच्या बाबतीत गोव्यात घडले एवढे स्पष्ट आहे सगळे, तरी तुम्ही एका चित्रफितीवर अडून बसले आहात आणि तेच पालुपद उकळत आहात. बाकी तुम्हाला काय समजतं नाही समजत याच्या मला काही घेणे देणे नाही. मिपाकरांनी प्रतिक्रिया दिली नाही दिली ह्याचाही काही संबंध नाही. भाजप जो आहे तो आहे, पण तुमचे त्या पक्षाला अंधपणे डिफेन्ड करणे अधिकाधिक मनोरंजक होत चालले आहे...

कमाल आहे. मला काय समजतं किंवा समजत नाही याच्याशी तुम्हाला देणंंघेणं नाही. तुमचे जे मत आहे ते इतरांनी आंधळेपणाने मान्य करावे नाही तर ते "नाटकी", "खोटारडे", "निर्बुद्ध" असे बरेच काही असतात हा तुमचा अ‍ॅप्रोच दिसतो.

'गुगल' केले का? का तेही आयतं करुन हवंय....? की तेही 'समजत' नाही तुम्हाला?

आता तुम्ही चित्रफिती देण्याचे महान कार्य करता (वेगळ्या भाषेतल्या असल्या तरी), भाजपची यादी मेंटेन करता आणि एवढं सगळं करत आहात तर गुगलूनही द्या की. भीति अशी वाटतेय की देताना तामिळ, अर्धमागधी, पाली, तुळू, स्वाहिली असल्या भाषेतल्या लिंका द्याल आणि नंतर ठणाणा कराल की इतक्या लिंक देऊनसुद्धा समजत कसं नाही.

(सूचना: 'मेगाबायटीत वाचले नाही' अशी पळवाट काढू नये म्हणून फॉण्ट मोठा केलाय.. :-) )

मेगाबायटी प्रतिसाद देण्याची संधी घालविल्याबद्दल क्षमस्व.

हतोळकरांचा प्रसाद's picture

3 Feb 2017 - 3:31 pm | हतोळकरांचा प्रसाद

डांगेंजी, "भाजप खोटारडा पक्ष आहे व त्याने भ्रष्ट लोकांना आत घेतले आहे" यातील "त्याने भ्रष्ट लोकांना आत घेतले आहे" हे वाक्य आणि त्याचा अर्थ स्पष्ट आहे. शिवाय त्या वाक्याला पुष्टी देणारी उदाहरणेही डोळ्यासमोर आहेत. पण "भाजप खोटारडा पक्ष आहे" या वाक्याने तुम्हाला काय सूचित करायचे आहे? खोटारडे असणे आणि दुटप्पी असणे यात फरक नाहीये का? भाजपला सरसकट खोटारडा म्हणण्यामागचं तुमचं विश्लेषण सांगाल का?

संदीप डांगे's picture

3 Feb 2017 - 3:57 pm | संदीप डांगे

आधी भाजप किंवा कोणताही एक पक्ष म्हणजे काय हे स्पष्ट असू द्या.... नाहीतर परत अमूक कृत्य हे पक्षचे धोरण नव्हे, ते सदस्यांनी चूकून केले, पक्षनेतृत्वाला माहितीच नव्हते असली कातडीबचावू वाक्ये येतात...

खोटारडा की दुटप्पी असे शब्दांचे खेळ केल्याने नक्की साध्य काय होणार आहे? शब्द बदलल्यास घटना बदलतात?

हतोळकरांचा प्रसाद's picture

3 Feb 2017 - 4:51 pm | हतोळकरांचा प्रसाद

डांगेंजी, ते शब्दांचे खेळ बिळ राहूद्या हो! तुम्ही इतक्या ठळक अक्षरात एक विधान केलं आहे आणि मी फक्त तुम्हाला तुमचे त्यामागचे विश्लेषण विचारत आहे. भाजप हा स्वतःला एकीकडे भ्रष्टाचारविरोधी म्हणवतो आणि मग भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या लोकांना पक्षात घेतो असे आपल्याला म्हणायचे असेल तर याला दुटप्पीपणाने वागणे असे म्हणतात. तुम्ही त्याऐवजी खटारडेपणा म्हणत आहेत आणि तेही सरसकटीकरण करून.

बाकी ते कातडीबचाऊ वगैरे वाक्ये जिथे येतील तिथे खोडून काढा, आधीच व्हिक्टीम कार्ड कशाला खेळायला हवे?

संदीप डांगे's picture

4 Feb 2017 - 6:00 pm | संदीप डांगे

भाजप हा स्वतःला एकीकडे भ्रष्टाचारविरोधी म्हणवतो आणि मग भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या लोकांना पक्षात घेतो असे आपल्याला म्हणायचे असेल तर याला दुटप्पीपणाने वागणे असे म्हणतात.

ठिक आहे ना, दुटप्पीपणा म्हणा की खॉटारडेपणा, कि फर्क पैंदाये? जो गलत वो गलत... शब्दांचा खेळ तर तुम्हीच सुरु केलाय की.. दुटप्पी कि खोटारडे वगैरे वगैरे!
बाकी 'मला' काही 'म्हणायचे' नाही हो, जे 'घडले' ते 'मांडत' आहे, फार बेमालूमपणे नसलेले शब्द समोरच्याच्या वक्तव्यात घुसडणे आपली सवय आहे हे निरिक्षण नोंदवतो.

बाकी ते कातडीबचाऊ वगैरे वाक्ये जिथे येतील तिथे खोडून काढा, आधीच व्हिक्टीम कार्ड कशाला खेळायला हवे?

आधीच विक्टिम कार्ड?? बाकी विक्टीम कार्ड हा आपला आवडीचा शब्द झालेला दिसतोय..! असो. माझा रोख http://www.misalpav.com/comment/916789#comment-916789 ह्या प्रतिसादाकडे होता, आणि तो प्रतिसाद आल्यावरच मी वरची वाक्ये लिहिली आहेत, तेव्हा "आधीच विक्टिम कार्ड" वगैरे सर्व शब्दसमुच्चय बाद होत आहे.

बाकी, मूळ मुद्दा, भाजपने भ्रष्ट लोक पक्षात घेणे हाच व केवळ हाच आहे. त्यावरच राहिलेले बरे. =))

हतोळकरांचा प्रसाद's picture

4 Feb 2017 - 6:50 pm | हतोळकरांचा प्रसाद

शब्दांचे इमले बांधणार्यांना वरील दोन शब्दातील फरक कळत नाही हे पाहून कौतुक वाटले, असो. दुसऱ्यांच्या वाक्यातून स्वतःला हवा असलेला अर्थ काढण्याचे तुमचे कौशल्य काही लपून राहिलेले नाही, त्यामुळे माझी सवय वगैरे राहुद्या(खेदाने). वैयक्तिक होणे हे आपले आवडते शस्त्र असावे असे दिसते, त्यामुळे असोच!

श्रीगुरुजी's picture

1 Feb 2017 - 10:33 am | श्रीगुरुजी

खालील बातमी वाचावी.

http://www.loksatta.com/bmc-elections-2017-news/bjp-close-doors-to-gangs...

खोडसाळ अफवा, मुद्दाम पेरलेल्या संदिग्ध बातम्या यांवर मी का विश्वास ठेवत नव्हतो ते आता लक्षात आलं असेल.

मराठी_माणूस's picture

1 Feb 2017 - 11:34 am | मराठी_माणूस

ह्या बातमीत असे म्हटले आहे की , प्रवेशासाठी नेते प्रयत्नशील होते पण कार्यकर्त्यानी विरोध केला म्हणून तसे घडले नाही. म्हणजे आधीच्या बातमीत थोडेफार तथ्य होते.
दुसरे असे की, नेत्यांनी आदर्श ठेउन मार्गदर्शन करावे की कार्यकर्त्यांनी ?

श्रीगुरुजी's picture

1 Feb 2017 - 2:54 pm | श्रीगुरुजी

प्रवेशासाठी ते प्रयत्नशील असू शकतील. पण म्हणून लगेच भाजपने त्यांना घेतले, भाजप गुंडांना घेतो इ. निष्कर्ष काढणे योग्य नाही. २०१४ मध्ये पवारांनी भाजपने न मागता बिनशर्त पाठिंबा स्वतःहून जाहीर केला होता. ते पाठिंबा द्यायला उत्सुक असू शकतील, पण याचा अर्थ भाजपने त्यांचा पाठिंबा घेतला असा होत नाही.

मराठी_माणूस's picture

1 Feb 2017 - 2:57 pm | मराठी_माणूस

नेते घ्या म्हणताहेत , कार्यकर्ते नको म्हणताहेत त्याचे काय ?

श्रीगुरुजी's picture

1 Feb 2017 - 3:02 pm | श्रीगुरुजी

म्हणू देत की. शेवटी घेतले नाही हे महत्त्वाचे.

मराठी_माणूस's picture

1 Feb 2017 - 3:13 pm | मराठी_माणूस

नेत्यांच्या डोक्यात काय आहे हे समजते आणि ते घातक आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

1 Feb 2017 - 3:49 pm | हतोळकरांचा प्रसाद

भाजपने तात्पुरत्या फायद्यासाठी ह्या गोष्टी करणे खूप घातक आहे असे मला वाटते. मुळात अशी चर्चासुद्धा माध्यमांपर्यंत पोहोचू नये इतके सरळ धोरण ठेवावे. वादातील लोकांना सक्रिय राजकारणात घेण्याचा विचार सोडून दिला नाही तर भाजपच्या प्रतिमेची मोठी हानी होईल असे वाटते. वरील उदाहरणात पक्षात घेतले नसले तरी पुण्यातील उदाहरणे डोळ्यासमोर आहेतच.

मराठी_माणूस's picture

1 Feb 2017 - 4:00 pm | मराठी_माणूस

पुण्यातील उदाहरणे डोळ्यासमोर आहेतच.

हेच सांगण्याचा प्रयत्न आहे.
सध्या बहुतांश कं. मधे नवीन माणुस घेताना बीजीव्ही (back ground verification) केले जाते . इथे पक्षाच्या प्रतिमेचा प्रश्न असताना असे काहीही केले जात नाही हे आश्चर्यच आहे .

तसाही त्यांचा इतिहास अपक्ष राहून पाठिंबा देण्यातच आहे. त्यामुळे पालिकेत पाठिंबा भाजप लाच असणारे त्यांचा आणि २ नगरसेवकांचा जे त्यांच्या सोबत आहेत . आणि हे फक्त भाजप वर टीकेची झोड उठवली म्हणून एक बाहेरकरणी मुलामा दिलेला आहे .भाजप ला गुंडाना घेणार नाही हे जाहीर करावं लागले याचाच अर्थ भाजप घेत होत गुंडाना . सिम्पल लॉजिक .कारण बाकीच्या ३ आरोपीना वेगळ्या पक्षाने भाजूला ठेवलेले असताना भाजप ह्यांना घ्यायला धडपडत होती .त्यामुळे मानहानी नंतर घेतलेला निर्णय आहे . त्यालाच आता भाजप चा मोठेपणा म्हणायचं असेल तर ओक्के .

श्रीगुरुजी's picture

1 Feb 2017 - 2:50 pm | श्रीगुरुजी

तुमच्या मूळ प्रतिसादात खालील ठाम निष्कर्ष होते व ते एबीपी माझा ने दिलेल्या "असे बोलले जात आहे", "असे सूत्रांकडून समजते" अशा पद्धतीने दिलेल्या संदिग्ध वाक्यांवर आधारीत होते.

"अटकेत असलेले नेते सुधाकर चव्हाण हि भाजप मध्ये ."
"अपक्ष आणि मधेच मनसे मग अपक्ष असे असलेकल्या चव्हाणांना भाजप ने लगेच पक्षात घेतले ."

मुळात चव्हाणला भाजपमध्ये घेतलेच नव्हते. परंतु त्याला भाजपमध्ये घेतले आहे या गैरसमजूतीवरच तुमचा प्रतिसाद होता.

आता त्यांना भाजपने घेतलेले नाही हे मी दिलेल्या बातमीवरून दिसत असताना, तुमच्या नवीन प्रतिसादात "पालिकेत पाठिंबा भाजप लाच असणारे त्यांचा आणि २ नगरसेवकांचा", "आणि हे फक्त भाजप वर टीकेची झोड उठवली म्हणून एक बाहेरकरणी मुलामा दिलेला आहे .", ""बाकीच्या ३ आरोपीना वेगळ्या पक्षाने भाजूला ठेवलेले असताना भाजप ह्यांना घ्यायला धडपडत होती .त्यामुळे मानहानी नंतर घेतलेला निर्णय आहे ." अशी स्पेक्युलेटिव्ह वाक्ये आहेत. मुळात अजून निवडणुक झालेलीच नाही. निवडणुकीत चव्हाण व त्याचे साथीदार उभे राहणार का नाही हे अजून माहिती नाही. समजा ते उभे राहिले तर ते निवडून येणार का नाही हे अजून माहिती नाही. आणि समजा ते निवडून आले तर ते भाजपला पाठिंबा देतील का अजून कोणाला हे देखील अजून माहिती नाही.

सर्वच गोष्टी अजून अनिश्चित असताना स्पेक्युलेशन कशासाठी? भाजप यांना घ्यायला धडपडत होता या आरोपाचा काही संदर्भ आहे का?

भाजप ला गुंडाना घेणार नाही हे जाहीर करावं लागले याचाच अर्थ भाजप घेत होत गुंडाना . सिम्पल लॉजिक .कारण त्यालाच आता भाजप चा मोठेपणा म्हणायचं असेल तर ओक्के .

आम्ही गुंडांना घेणार नाही याचा अर्थ भाजप गुंडांना घेत होते असा कसा निघतो बुवा?

वरुण मोहिते's picture

1 Feb 2017 - 4:52 pm | वरुण मोहिते

का आधीपासून रोज भाजप म्हणत होती गुंडाना घेणार नाही असं .अंगाशी आलं म्हणून सांगावं लागलं . घ्या कि सगळ्याच पक्षात असतात पण आम्हीच पारदर्शक ,विकास करणारे, हि भूमिका सोडून द्या . सगळ्या पक्षांसारखा एक पक्ष आहे तो .
आमची गैरसमजूत झाली नाहीये भाजप ला डोळे मिटून दूध पिता येईल असं वाटलं पण जगजाहीर झाल्यावर भूमिका बदलावी लागली.
स्पेक्युलेशन आपण पण करता कि धागे काढून .
भाजप धडपडत होती याचा संदर्भ तुमच्याच लिंक मध्ये आहे आतले अनेक संदर्भ आहेत ठाण्यातच आहेत ते त्यामुळे माहित आहे आता सगळंच कसं सांगू?

श्रीगुरुजी's picture

2 Feb 2017 - 2:32 pm | श्रीगुरुजी

भाजप धडपडत नसून पक्षातील काही जण तसे करण्याच्या प्रयत्नात होते. ते मोजके स्थानिक नेते म्हणजे पक्ष नव्हे. पक्ष पातळीवर योग्य तो निर्णय घेतलेला आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांनी ट्रंपसारखीच भारतानेही मुस्लिम निर्वासितांवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. अजून एकाने असे जाहीररित्या सांगितले होते की हिंदूंनी किमान ४ मुले जन्माला घालावीत. असली वक्तव्ये ही पक्षाची अधिकृत भूमिका नसते व भाजपने या वकत्व्यांना पाठिंबाही दिलेला नाही. इथे सुधाकर चव्हाणला भाजपत आणण्यासाठी काही स्थानिक मंडळी प्रयत्न करीत होती. परंतुने भाजपने त्याला पक्षात घेतलेले नाही. इथेच तो विषय संपला.

मराठी_माणूस's picture

2 Feb 2017 - 3:29 pm | मराठी_माणूस

.....काही स्थानिक मंडळी प्रयत्न करीत होती

मग पक्ष नेत्रूत्वाने ह्या स्थानिक मंडळीना समज का नाही दिली ? पाठींबा दीला नाही म्हणजे विरोध केला असे होते का ?
का "..... with difference" हे आपले उगीच की ह्यात काही तथ्य आहे ?

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Feb 2017 - 3:38 pm | हतोळकरांचा प्रसाद

मग पक्ष नेत्रूत्वाने ह्या स्थानिक मंडळीना समज का नाही दिली ?

हे काही समजले नाही. भाजप हा एक राजकीय पक्ष आहे या पार्श्वभूमीवर नेमकी कशी समज अपेक्षित आहे (म्हणजे जाहीर समज असे आपल्याला अपेक्षित आहे का)?

मराठी_माणूस's picture

2 Feb 2017 - 4:32 pm | मराठी_माणूस

इतरत्र आणि वारंवार घडु नये यासाठी काय उपाय ?

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Feb 2017 - 5:19 pm | हतोळकरांचा प्रसाद

उपाय एकाच असू शकतो, पक्षाचे सरळसोट धोरण! पार्टी विथ डिफरंस यात कोणकोणते डिफरंस येतात याबतीत स्पष्ट धोरण! राजकीय पक्ष असल्यामुळे या ना त्या कारणाने अपरिहार्यता येते तेव्हा तोंडावर पडावे लागू नये असे धोरण!बाकी भाजपला धुतल्या तांदळासारखा समजला जाऊ नये आणि भाजपनेही असले घोंगडे पांघरणे बंद करावे असे माझे वैयक्तिक मत आहे.

श्रीगुरुजी's picture

3 Feb 2017 - 12:05 am | श्रीगुरुजी

समज काय तुम्हाला सांगून तुमच्या उपस्थितीत द्यायला हवी होती का?

मराठी_माणूस's picture

3 Feb 2017 - 3:54 pm | मराठी_माणूस

"राजधर्माचे पालन करा" हे सर्व खाजगी होते का ?

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2017 - 2:25 pm | श्रीगुरुजी

आता युती तुटल्याच्या चर्चेत हे कुठून आलं?

मराठी_माणूस's picture

6 Feb 2017 - 11:33 am | मराठी_माणूस

ते तुमच्या आधीच्य प्रश्नाला उत्तर होते .

संदीप डांगे's picture

2 Feb 2017 - 4:22 pm | संदीप डांगे

भाजपने त्याला पक्षात घेतलेले नाही. इथेच तो विषय संपला.

आणि भाजपात घेतले असते तर बातम्यांची भाषा समजण्याचे बंद झाला असते... =))

श्रीगुरुजी's picture

3 Feb 2017 - 12:07 am | श्रीगुरुजी

घेतलेच नसल्यामुळे विषय संपलेला आहे. तुमच्या दुर्दैवाने भाजपला शिव्या घालण्याची संधी गेलेली आहे.

संदीप डांगे's picture

3 Feb 2017 - 9:06 am | संदीप डांगे

हा हा हा, भाजपने गुंड व भ्रष्ट लोकांना घेतल्याची यादी देऊ का? मग तुम्हला कोठे जावे लागेल ते सांगायची गरज उरणार नाही.....

:-) =))

श्रीगुरुजी's picture

3 Feb 2017 - 2:32 pm | श्रीगुरुजी

द्या की, कोणी अडवलंय? तुम्ही असल्या याद्या मेंटेन करता हे सर्वांनाच माहिती आहे.

संदीप डांगे's picture

3 Feb 2017 - 2:39 pm | संदीप डांगे

हा हा हा.... =)) =)) याद्या कोण मेन्टेन करतं हे माहितीच आहे की सर्वांना.
भाजप सोडून सर्व पक्षांच्या सर्व नेत्यांच्या सर्व कुलंगड्या मिपावर मांडतांना कोणाच्या अभ्यासाला आणि भाषेला कसा ऊत येतो तेही सर्वांना माहित आहेच.