महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

निळावन्ती

Primary tabs

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
11 Jan 2017 - 2:46 pm

मग निळ्या दरीतुन हाक
येताच काफिला उठला
नक्षत्रजडित रात्रीला
हु॑दका अनावर फुटला

त्या निळ्या दरीच्या गर्भी
घननीळ गूढसे काही
नि:शब्द काफिला भोगी
ती पिठुर रानभुल देही

काफिल्यात विरघळताना
गारूड निळेसे पडले
की स्वप्न निळावन्तीचे
मी माझ्यावर पा॑घरले

कविताअद्भुतरस

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

11 Jan 2017 - 3:23 pm | यशोधरा

वा!
गारूड निळेसे पडले > पडले ऐवजी झाले म्हटले तर?

चांदणे संदीप's picture

11 Jan 2017 - 11:24 pm | चांदणे संदीप

कविता आवडली

Sandy

चाणक्य's picture

12 Jan 2017 - 9:28 am | चाणक्य

कळली नाही. रात्र सरून सकाळ होण्याचे वर्णन आहे काय ?

देशप्रेमी's picture

12 Jan 2017 - 5:50 pm | देशप्रेमी

उत्कृष्ट रचना ! आवडली !

शार्दुल_हातोळकर's picture

12 Jan 2017 - 10:25 pm | शार्दुल_हातोळकर

छानच आहे कविता !!

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Jan 2017 - 2:59 pm | ज्ञानोबाचे पैजार

"चांदणे शिंपित जाशी" मधे ही निळावंति भेटली होती. त्या नंतर बर्‍याच दिवसांनी तिच्याशी गाठ पडतीय.
आवडली तुमची निळावंती.
पैजारबुवा,

अनन्त्_यात्री's picture

13 Jan 2017 - 3:54 pm | अनन्त्_यात्री

पैजारबुवा,
राजा बढ्यान्ची चा॑दण॑ शि॑पत जाणारी निळावन्ती मेघडम्बरीत अवगुण्ठित आहे. तिच॑ "मेघांविण मोकळे सौंदर्य" पाहाण्यासाठीची विराट धडपड चालू आहे!

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Jan 2017 - 11:37 am | ज्ञानोबाचे पैजार

दोघींची नावे सारखी आहेत इतकेच...
पैजारबुवा,

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Jan 2017 - 12:22 pm | हतोळकरांचा प्रसाद

खूप छान! आवडली कविता!

माहितगार's picture

1 Feb 2017 - 10:02 am | माहितगार

कवितेची गुढता अद्याप पुरेशी उलगडली नाही; 'मनुष्य मनाची अनाकलनीय धाव' असे काही ? या कवितेतून कविला सुचवायचे आहे का ?

पैसा's picture

1 Feb 2017 - 10:53 am | पैसा

सुंदर रचना

विशाल कुलकर्णी's picture

2 Feb 2017 - 11:53 am | विशाल कुलकर्णी

आह..
आवडलीच !