हवा हवाई कुसकूस- किनवा टिक्की

Primary tabs

लीना कनाटा's picture
लीना कनाटा in पाककृती
11 Jan 2017 - 7:54 am

उपकरण : एयर फ्रायर

कृती :

कुसकूस (गरम पाण्यात भिजवून), किनवा (शिजवून), मॅश्ड पोटॅटो, हिरवे वाटणे, मक्याचे दाणे, धने - जिरे पूड, लाल तिखट, मीठ स्वादानुसार, कोथंबीर एकत्र मळून घ्यावे. त्यात चवी प्रमाणे थाई रेड चिली सॉस आणि किसलेले चीज टाकावे.

आता या मिश्रणाच्या टिक्क्या कराव्यात. त्या ब्रेड क्रम्प्स मध्ये घोळवून घ्याव्यात.

तेलात तळण्या ऐवजी हवेवर एका बाजूने १५ मिनिटे तर दुसऱ्या बाजूने साधारणतः १२ मिनिटे तांबूस सोनेरी होई पर्यंत तळाव्यात.

बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट हवा हवाई कुसकूस- किनवा टिक्कीज तयार.

मोबल्याने एक, दोन फटू खेचावेत आणि टिक्क्यांचा गिल्ट फ्री फन्ना उडवावा.

यथावकाश फटू येथे शेअर करावेत.

हवा हवाई  कुसकूस- किनवा टिक्की

प्रतिक्रिया

कैवल्यसिंह's picture

11 Jan 2017 - 11:06 am | कैवल्यसिंह

मस्त दिसतायत टिक्क्या.... फोटू पण मस्त आलाय..

संजय पाटिल's picture

11 Jan 2017 - 11:40 am | संजय पाटिल

मस्त आनि हेल्दि...
कुसकूस म्हणजे काय?

केडी's picture

11 Jan 2017 - 12:11 pm | केडी

एयर फ्रायर चा छान उपयोग करून घेताय .....

कुसकुस आणि किनवा म्हणजे काय नक्की? बाकी पाकृ छान आहे.

केडी's picture

12 Jan 2017 - 4:21 pm | केडी

कुसकूस चा जन्म उत्तर आफ्रिकेतला, तिथून हे मोरोक्को, ट्युनिशिया आणि इतर ठिकाणे पसरले. कुसकूस हे गव्हा पासून किंवा इतर धान्य पासून (ज्वारी, कॉर्न, बार्ली इत्यादी) पासून बनवलेला एक प्रकारचा जाडसर रवा.
किनव्हा हे देखील एक प्रकारचे धान्य, हे पेरू, बोलिव्हिया देशांमध्ये प्रामुख्याने उगविले जाते. हे सध्या तरी अमेरिकेत (आणि हल्ली भारतात सुद्धा) सुपर फूड म्हणून प्रसिद्ध झाले आहे. (मुख्यतः ह्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात म्हणून.).

सुपर फूडस बद्दल बरेच उलट-सुलट विचार आहेत. पण हि जागा त्या चर्च साठी न्हवे, त्यामुळे इथेच थांबतो.

धन्यवाद केडी या माहितीबद्दल! या गोष्टी भारतात मिळत नसाव्यात सहजपणे.

लीनाताई भारतात राहत नाहीत म्हणजे. (एक अंदाज फक्त.)

नूतन सावंत's picture

11 Jan 2017 - 3:51 pm | नूतन सावंत

सुरेख दिसताहेत टिक्क्या.

पद्मावति's picture

11 Jan 2017 - 3:57 pm | पद्मावति

मस्तच.

रेवती's picture

13 Jan 2017 - 5:08 pm | रेवती

छान दिसतायत.

पैसा's picture

14 Jan 2017 - 10:48 am | पैसा

छान!

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jan 2017 - 11:32 am | अत्रुप्त आत्मा

मला हवा हवाई.

आत्मुबुवा,

हवाई बेटावर जायचे वेध लागले वाट्टं :)