नवीन थीमबाबत चर्चा

नीलकांत's picture
नीलकांत in काथ्याकूट
1 Jan 2017 - 1:40 am
गाभा: 

नमस्कार,

आज मिपाला एक नवीन रूप आहे. याला नवीन थीम असं म्हणू या. या नवीन थीमबाबत तुमचं मत काय? यातील काय आवडलं? काय नाही आवडलं? ते नक्की लिहा.
या रंगरूपासोबत आपण मिपाची ठेवण बदलायला सुरुवात केलीये. एखादं नवीन लेखन करताना जोडायचे संबंधित टॅग आता सहज जोडता येतील. नवीनसुद्धा जोडता येतील.
आजपासून प्रत्येक सदस्याला आपला फोटो लावता येईल. सर्वांना विनंती आहे की त्यांनी 'माझे खाते'मध्ये जाऊन आपला फोटो लावून घ्यावा.

याशिवाय यापुढे काही काळ हे बदल होत राहतील, त्या बदलांबाबतसुद्धा येथेच चर्चा व्हावी.

आपल्या प्रतिक्रिया, सूचना, मत हे मिपाच्या जडणघडणीत खूप मोलाचं आहे. त्यामुळे आवर्जून आपलं मत मांडा.

- नीलकांत

प्रतिक्रिया

शार्दुल_हातोळकर's picture

1 Jan 2017 - 3:13 am | शार्दुल_हातोळकर

पण आमुलाग्र बदल झालेला असल्यामुळे सवय व्हायला थोडा वेळ लागेल. मात्र अशी अपेक्षा आहे की कमीत कमी "स्वगृह" मधे तरी पुर्वी जशी रचना होती तसे एखादे स्वतंत्र पान असायला हवे होते.

बाकी पुर्वी जसे धागे प्रतिक्रियांनुसार वर वर येत होते, तसेच आताही नव्या रचनेत असणार आहे का?

आणि प्रोफाईलमधे खरडवही वर टिचकी दिली असता एरर आला.

सर्व मिपाकरांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!

शार्दुल_हातोळकर's picture

1 Jan 2017 - 3:50 am | शार्दुल_हातोळकर

"नवे लेखन" च्या पानावर टिचकी दिली आणि "स्वगृह" बद्दलचा प्रश्न निकाली निघाला. नवीन थीममुळे थोडासा गोंधळ उडाला. आता फक्त कविता/लेख वगैरे विभागातील नेवीगेशनचा प्रश्न सुटला तर छानच होईल.

आशु जोग's picture

1 Jan 2017 - 6:38 pm | आशु जोग

कमेंटसच्या क्रमाने धागे दिसायला हवेत. तसेच ज्या क्रमाने धागे आले त्या क्रमानेही दिसायला हवे.

स्वगृहमधे नवे लेखन दिसायला हवे

शार्दुल_हातोळकर's picture

1 Jan 2017 - 3:22 am | शार्दुल_हातोळकर

आणि नेवीगेशन जर पुर्वीसारखे पान क्रमांकांप्रमाणे देता आले तर उत्तम होईल. आता next बटन वर टिचकी देऊन पुढे जावे लागत आहे, जे अडचणीचे वाटत आहे. एकदम विशिष्ट क्रमांकाच्या पानावर जाण्यासाठी पुर्वीची नेवीगेशन ची सुविधा जास्त चांगली होती.

खटपट्या's picture

1 Jan 2017 - 6:18 am | खटपट्या

मिपाचे नवीन रूप मोबाइल फ्रेंडली आहे. मोबाइल वर डावीकडे उजवीकडे स्क्रोल करावे लागत नाही.
बाकी नवीन रुपाची सवय होइल हळू हळू

स्वत:चा फोटो अपलोड करायची सोय आवडली

अनिरुद्ध.वैद्य's picture

1 Jan 2017 - 6:27 am | अनिरुद्ध.वैद्य

थीम फारच छान आहे. सोपी अन सुटसुटीत ...

अनिरुद्ध.वैद्य's picture

1 Jan 2017 - 6:52 am | अनिरुद्ध.वैद्य

मेनू बटन खाली स्क्रोल केल्यावर गायब होत न टॉपला जाऊन त्यातून नेव्हीगेट करावं लागत. त्याऐवजी जर मेन्यू बटनदेखील स्क्रोल करत खाली येत गेले तर छान होईल.
(कदाचित मी मोबाईलहुन बघत असल्याने असे होत असेल?)

कैवल्यसिंह's picture

1 Jan 2017 - 6:37 am | कैवल्यसिंह

मिपाचे नविन रुप खुपच झक्कास आहे... पन नविन मिपावर मला आजुनही शोध/शोधा हा पर्याय सापडलाच/दिसलाच नाही.. शोधा हा पर्याय नविन मिपात हवा आहे.. म्हणजे सर्व लेख, प्रतिसाद, व मजकुर शोधने सोप्पे जाईल..

- कैवल्यसिंह

मोबाईलवर वरती काळ्या पट्टीत "मिसळपाव" या अक्षरांशेजारी तीन आडव्या पांढऱ्या रेघा आहेत. त्यावर टॅप केलं की स्वगृह, साहित्य प्रकार वगैरे विकल्प असलेली खिडकी उघडते. त्याच्या डोक्यावर "शोध" ही सोय आहे.

कैवल्यसिंह's picture

1 Jan 2017 - 9:14 am | कैवल्यसिंह

मी मिपा ओपेरा मिनी वरुन बघतोय पन मला त्या काळ्या तीन रेघांच्या पर्यायामध्ये

स्वगृह
साहित्य प्रकार
नवे लेखन
मिपा विशेषांक
घोषणा
मदत पान

एवढेच पर्याय दिसतात... शोध हा पर्याय दिसतच नाही.. मी अँड्रॉइड ४.२.२ वर ओपेरा मिनी वापरतोय....

गामा पैलवान's picture

1 Jan 2017 - 6:51 pm | गामा पैलवान

आदूबाळ,

मोबाईलवर वरती काळ्या पट्टीत "मिसळपाव" या अक्षरांशेजारी तीन आडव्या पांढऱ्या रेघा आहेत.

या तीन आडव्या रेघांना हँबर्गर आयकन म्हणतात. आपण त्यास वडापावचिन्ह म्हणूया.

आ.न.,
-गा.पै

आदूबाळ's picture

1 Jan 2017 - 10:15 pm | आदूबाळ

धन्यवाद!

खेडूत's picture

1 Jan 2017 - 7:34 am | खेडूत

छान .
नव्या रूपाची सवय होईलच.
लॅपटॉपवरून अजून पाहिले नाही.
ऑफिसातून वाचणार्‍यांचा नक्की विचार व्हावा.
त्या दृष्टीने रंगाचा बटबटीतपणा कमी झालाय बहे चांगलेच.
खरं तर एक ऑफिस व्हर्जन असावे, ज्यात निव्वळ टेक्स्ट दिसेल. पण ते तातडीचे नाही.

धर्मराजमुटके's picture

1 Jan 2017 - 8:05 am | धर्मराजमुटके

काल मोदींनी भाषणातुन हवा तसा धक्का दिला नाही पण येथे मालकांनी 'पुरे घर के बदल डालुंगा' च्या धर्तीवर संपुर्ण कायापालट केला. मी सकाळी पहिल्यांदा मोबाईलवरुन संकेतस्थळ उघडले ते अतिशय छान दिसले. आता लॅपटॉपवरुन बघत / लिहित आहे.
नव्या वर्षात मालकांनी चांगली भेट दिली आहे. आपले आभार ! थोडा वापर केल्यावरच नवीन रुपाबद्द्ल अधिक लिहिता येईल.

आज्बात आवाडली नही थेम. येळ तारीख काय सम्जत नय. पैलंच चांगलं हुतं.

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jan 2017 - 9:27 am | ज्ञानोबाचे पैजार

नविन थिम अतिशय आवडली.
सतत बदलत रहाणे ही मिपाची प्रवृती आहे. आणि त्या मुळेच मिपा अजूनही तरुण आहे.
पैजारबुवा,

नविन थिम आवडली, पांढरा रंग थोडासा लाईट केल्यास रात्री वाचताना डोळ्यावर ताण कमी येइल. खरडवही दिसत नाहीये तसेच प्रतिसाद दिल्यावर धागे वर येत नाहीत.
स्मायलीज दिसण्याची सोय हवी होती...

मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- हम दोनो दो प्रेमी, दुनिया छोड़ चले जीवन की हम सारी रस्मे तोड़ चले... :- Ajnabee (1974)

खरडवही परत आली आहे पण त्यात आधीची एकही खरड नाही ! :(
शिवाय खरडवही असे दिसण्या ऐवजी चतुरानंद यांची खरडवही असे दिसत आहे ! :प

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Puli Urumudhu... :- Vettaikaaran

समाधान राऊत's picture

1 Jan 2017 - 10:28 am | समाधान राऊत

पण
मोबायलात प्रतिसाद of प्रतिसाद वाचताना झुम केल्यावर काळा मेन्युबार ४०% स्क्रीन माझीच असं म्हनतोय-(horizontal mode)
अन सर्च इंजान पायजे राव , नविन मिपाकराने सहा सात वर्षापुर्वीचे लेख कसे शोधायचे. एकं दोनं करायचं जिवावर येत कधीकधी. गुरुप केल्या मुळं फरक पडणार म्हणा

हतोळकरांचा प्रसाद's picture

1 Jan 2017 - 10:36 am | हतोळकरांचा प्रसाद

नवी थीम हाताळायला पहिल्या थिम पेक्षा थोडी अवघड वाटली, कदाचित सवय होईल. पण, मिपाचं सगळ्यात आवडतं वैशिष्ट्य असणारं प्रतीसादांचं लेवलिंग गायब झालेलं दिसतंय! म्हणजे दुसऱ्या प्रतिसादानंतरचे सगळे प्रतिसाद एकाच लेवलला दिसत आहेत. शिवाय प्रतिसादानंतर धागा वर येत नाहीये.

थीम फारशी आवडली नाही. मोबाईल फ्रेंडली अजिबात वाटली नाही. फिनेसही नाही.

श्रीरंग_जोशी's picture

1 Jan 2017 - 11:15 am | श्रीरंग_जोशी

मिपाची नवी थीम एकदम नेटकी वाटत आहे. संगणकावरून तर उत्तम दिसतच आहे पण चतुरभ्रमणध्वनीवर तर खूपच सोयीची वाटत आहे.

या बदलांसाठी अनेक धन्यवाद. अधिक वापरल्यावर काही सुधारणा सुचल्या किंवा समस्या जाणवल्या तर या धाग्यावर प्रतिसादाच्या रुपात आवर्जुन नोंदवीन.

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Jan 2017 - 12:04 pm | कैलासवासी सोन्याबापु

थीम प्रचंड जास्त आवडलेली आहे हो मालक. बेज्या झकास दिसू राहला सब्बन सेटप, मोकळंचाकळ स्वरूप आवडलेले आहे. रंग सुद्धा शांत अन डोयाले आल्हाददायक वाटतायत. तुम्ही घेत असलेल्या मेहनती करता तुमचे खूप आभार अन पुढील वाटचाली करता खूप शुभेच्छा.

चिगो's picture

2 Jan 2017 - 2:49 pm | चिगो

एकदम सुटसुटीत आहे थीम.. पानावर आल्याआल्या आपल्याले पाहीजे तिकडं जाता येते. उगाच गण्याच्या घरी जाले ग्यानबाच्या दारातुन जाची गरज नाही..

रुळल्यावर हळूहळू आणखी गुणावगूण कळतील थीमचे, त्यानुसार बोलेनच.. पण 'फर्स्ट इंप्रेशन' झक्कास.. धन्यवाद ! आणि हो, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

निरनिराळ्या ब्राउजरमध्ये वेबसाइट्स डेस्कटॅाप, रीडिंग व्ह्यु,सिंगल कॅालम व्ह्यु बघण्याची सोय नवीन फोन्समध्ये असतेच त्यामुळे मला काही अडचण जाणवली नव्हती. पण आता मिसळपाव साइट फक्त सिंगल कॅालम/रीडिं व्ह्यु ठेवली आहे का?
१) जुन्या आणि नव्या "नवे लेखन/स्वगृहचे अॅड्रेस बदलले आहेत ते पुन्हा बुकमार्क केलेत.
२) जुन्या आणि नव्या "नवे लेखन/स्वगृहचे कोड चेक केले तेव्हा नवीन कोड २० टक्के कमी झालेला दिसतोय.( ४००० >>३४०० शब्द).यामुळे सर्वरसाइड लोड कमी झाला असेल.
३) आइडी फोटो अपलोड करताना किती साइजचा हवा हे सूचना दिसली नाही. २ एमबीचा २०० केबी करून टाकलाय.
४) अनुक्रमणिकेतील धाग्याची मोठी शीर्षकं फुल व्ह्युमध्ये शेवटी कापली जाताहेत पण सिंगल कॅालम व्ह्युमध्ये पूर्ण दिसताहेत.

गॅरी ट्रुमन's picture

1 Jan 2017 - 12:11 pm | गॅरी ट्रुमन

नवी थिम बघून २००६ च्या सुमारास मनोगत होते त्याची आठवण झाली. नवे लेखन वर क्लिक केल्यानंतर पूर्वीप्रमाणेच सगळे लेख बघायला मिळत आहेत हे चांगलेच आहे.

बाकी मिपा हे आपलेच आंतरजालावरील घर आहे. त्यामुळे ते जसे आहे तसे, ज्या थिममध्ये आहे त्या थिममध्ये चांगलेच आहे आणि असेल.

मिपामधले काही बदल अजुन चालु असतील किंवा नंतर येणार असतील. पण मला लक्षात आलेल्या काही गोष्टी इथे नमूद करतो.
१) मुखपृष्ठावर वरती डाव्या कोपऱ्यात 'मिसळपाव' अशी अक्षरे दिसत आहेत. तिकडे मिपाचा लोगो अपेक्षित आहे. बॅनर सोडल्यास मुखपृष्ठावर इतर कुठेही मिपाचा लोगो दिसत नाही आहे.
२) मिपाच्या बॅनरचा आकार आणखी थोडा मोठा हवा होता. मिपा लोगोच्या वरचा मजकुर वाचायला त्रास होतो आहे.
३) मिपा विशेषांकवर टिचकी मारल्यावर मदत पान दिसते आहे. तिकडे मिपाचे सगळे मिपा विशेषांक दिसणे अपेक्षित आहे.
४) आधीच्या रचनेमध्ये ऊजव्या बाजुला असलेले दखल सदर नव्या रूपात गायब झाले आहे. ते पुन्हा आणता येईल का?
५) रात्रीच्या वेळी मिपावर आल्यावर पांढऱ्या रंगामुळे वाचायला त्रास होतो. मिपावर 'नाईट मोड' आणणे शक्य आहे का?

सध्या लक्षात आलेल्या गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत. नंतर त्यात योग्य ती भर घालेनच.

गॅरी ट्रुमन's picture

1 Jan 2017 - 12:31 pm | गॅरी ट्रुमन

पूर्वी सगळ्या लेखांची यादी यायची.त्या यादीत सर्वात नवीन प्रतिसाद आलेला लेख सर्वात वर दिसायचा. आता 'नवे लेखन' वर (लॉगिनच्या खाली) क्लिक केले तर पूर्वीप्रमाणे यादी येते. पण त्या यादीत सर्वात वर नक्की कोणता लेख आहे याचा निकष समजला नाही. दुसरे म्हणजे सर्वात वर असलेल्या काळ्या पट्टीत 'नवे लेखन' वर क्लिक केले तर तशी यादी न दिसता कविता, लेख, चर्चा इत्यादी गोष्टीप्रमाणे लेख दिसतात. नवीन लेखन या एकच नावावर क्लिक केल्यावर दोन वेगळ्या गोष्टी दिसतात. त्यामुळे थोडी दिशाभूल व्हायची शक्यता आहे. त्याविषयी काही करता येईल का?

दुसरे म्हणजे खरडवहीला पंख लावले गेले आहेत की काही दिवसांनी खरडवही परत येणार आहे?

वर म्हटल्याप्रमाणे मिपा जसे आहे तसे आपलेच आहे. पण या गोष्टी समजल्या नाहीत.

माम्लेदारचा पन्खा's picture

1 Jan 2017 - 1:57 pm | माम्लेदारचा पन्खा

मिपा तर मोदींच्याही दोन पावलं पुढे आहे....आधी केले मग सांगितले....सध्या थोडं गोंधळायला होतंय पण होईल सवय....मात्र सगळी शीर्षकं एकाच ठिकाणी दिसतील अशी एक तरी लिंक हवी....

माम्लेदारचा पन्खा's picture

1 Jan 2017 - 1:57 pm | माम्लेदारचा पन्खा

मिपा तर मोदींच्याही दोन पावलं पुढे आहे....आधी केले मग सांगितले....सध्या थोडं गोंधळायला होतंय पण होईल सवय....मात्र सगळी शीर्षकं एकाच ठिकाणी दिसतील अशी एक तरी लिंक हवी....

अनुप ढेरे's picture

1 Jan 2017 - 2:34 pm | अनुप ढेरे

ज्यांनी फोटो लावला नाहीये तिथे अमुक अमुक'स पिक्चर असं लिहून येतय. ते नावाबरोबर मिक्स होऊन खिचडी दिस्तय. फोटो नसेल तर रिकामा चौकोन चांगला वाटेल.

संदीप डांगे's picture

1 Jan 2017 - 2:42 pm | संदीप डांगे

सर्व सदस्र्यांना विनंती, कृपया आपल्या प्रोफाईल फोटोवर कोणता तरी फोटो टाकाच. प्रतिसाद दिल्यावर "सदस्यांचा नाव' 's picture" असं दिसतंय. परत सदस्याचं नाव आल्याने ते विचित्र दिसत आहे. फोटो टाकाल तर तसं दिसणार नाही.

नीलकांत, शक्य असेल तर अ‍ॅडमीनला प्लेसहोल्डर इमेज टाकता येईल काय सर्वांसाठी... ?

नीलकांत's picture

1 Jan 2017 - 2:55 pm | नीलकांत

सेट केलीये.

संदीप डांगे's picture

1 Jan 2017 - 4:58 pm | संदीप डांगे

अरेवा! धन्यवाद ! :-)

प्रोफाईल फोटो change करता येईना . प्लेसहोल्डर इमेज change होत नाहीय .

पुर्वी भटकंतीचे धागे पाहताना मी मुद्दामहून फोन ब्राउजरमधला रीडिंग /सिंगल कॅालम व्ह्यू करून चित्रे पाहात असे. त्यात ती मोठी आणि स्पष्ट दिसायची. आता थीमच तशी असल्याने काम झाले.

कंजूस's picture

1 Jan 2017 - 2:54 pm | कंजूस

मोठ्या आडव्या मॅानिटरवाल्यांना खाली स्र्कोल करत जावे लागत असेल.

rahul ghate's picture

1 Jan 2017 - 4:10 pm | rahul ghate

Nawin theme chan ahe wapartana saway hoyil halu halu .

sarw manywar sadasyanna nutan warsha bhinandan

सतिश गावडे's picture

1 Jan 2017 - 4:23 pm | सतिश गावडे

डीफॉल्ट इमेज कशी दिसते ते पाहतो.

आनंदी गोपाळ's picture

1 Jan 2017 - 4:30 pm | आनंदी गोपाळ

प्रतिसाद दिल्यानंतर धागा वर येत नाहीये का? का?

आनंदी गोपाळ's picture

3 Jan 2017 - 9:01 am | आनंदी गोपाळ

१. माझ्या मोबाईलवर असं दिसतंय :

मेन्यूबारची गिचमिड झालिये. मेन्यूचा आयकॉनही दिसत नाहीये.

२. प्रतिसाद टाईप करण्याच्या खिडकीतला फाँटसाईझ इतर साईटपेक्षा लहान आहे. तो मोठा करता आला, तर माझ्यासारख्या वाचण्याचा चष्मा उर्फ वृद्धदृष्टीता असलेल्या लोकांची सोय होईल.

३. मोबाईलवर लॉगिन करताना स्क्रॉल करून पानाच्या शेवटापर्यंत जावं लागतंय. ती सोय वर आली तर छान होईल.

कैवल्यसिंह's picture

3 Jan 2017 - 12:57 pm | कैवल्यसिंह

तुमच्या मोबाईलचा ब्राउजर चे नाव काय आहे? माझ्याकडे Opera mini android browser आहे. पन असे नाही दिसत थोडे वेगळे दिसतेय..

आनंदी गोपाळ's picture

3 Jan 2017 - 9:58 pm | आनंदी गोपाळ

हा मोबाईलचा फायरफॉक्स आहे. डेस्क्टॉपवर ठीक दिसतं, फाफॉत. मेन्यूबार गंडलेला आहेच पण बरा दिसतो.

निष्पक्ष सदस्य's picture

1 Jan 2017 - 4:37 pm | निष्पक्ष सदस्य

छान हा!!!
मोबाईलफ्रेंडली थीम आहे.

निष्पक्ष सदस्य's picture

1 Jan 2017 - 4:41 pm | निष्पक्ष सदस्य

नव्या थीममध्ये स्वतःचा प्रतिसाद संपादित करायची सर्वांना सोय दिली असती,तर बरे पडले असते.

समाधान राऊत's picture

1 Jan 2017 - 4:49 pm | समाधान राऊत

Displaying profile Picture's Rights' must be reserved...

चौकटराजा's picture

1 Jan 2017 - 5:04 pm | चौकटराजा

मिपाचे हे नवे फॉन्ट तर फारच देखणे आहेत. पण मिपाचे पान व पार्शवभूमी यांचा रंग एक नको. तो आता सफेदच आहे. पार्श्व भूमीचा रंग ग्रे किंवा ग्रे प्लस ग्रीन असाही चालेल.

संजय क्षीरसागर's picture

1 Jan 2017 - 6:21 pm | संजय क्षीरसागर

नवी थीम गैरसोयीची वाटतेयं .

गामा पैलवान's picture

1 Jan 2017 - 7:02 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागरांशी सहमत. फिरस्त्यावरून (=मोबाईल) बरीच अडचणीची आहे. मेन्यूबार बरीच जागा खातो. नवे लेखन पानावर आडवी उलगड (= हॉरिॆझाँटल स्क्रॉलिंग) वापरल्याशिवाय उजवीकडील मजकूर दिसंत नाही.

-गा.पै.

Ranapratap's picture

1 Jan 2017 - 6:55 pm | Ranapratap

नवीन थीम हाताळायला अवघड वाटते पण हळूहळू सवय होईल. रंग संगती थोडी वेगळी हवीय.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jan 2017 - 7:14 pm | अत्रुप्त आत्मा

मिपा स्मायली सुरु करा.

जव्हेरगंज's picture

1 Jan 2017 - 9:07 pm | जव्हेरगंज

बदल खूप चांगला आहे!!!

मोबाईलवरुन सध्यातरी अडचणीचे वाटत आहे. मोबाईलवरुन desktop view पाहण्याची व्यवस्था केल्यास उत्तम. mobile browser HTML5 Support करत नसेल तर फार विचित्र दिसत आहे. anyway HTML5 साठी जास्तीची bandwidth खर्चावी लागेल!!!

कथा विभाग कुठे दिसत नाही तो :(

प्रचेतस's picture

2 Jan 2017 - 8:35 am | प्रचेतस

थीम रुळायला जरा वेळ लागेल.
'नवे लेखन' प्रतिसादानुरुप अपडेट व्हायला हवे.

फोटो टाकून बघितला तर इमेजचे पिक्सेल आॅटो अॅडजस्ट झाले.आता क्लिकुन बघितले तर इमेज डिस्टाॅर्टेड दिसतेय.
फाइल साइज कमी केलाय दोन एमबीपेक्षा. काय करायला चुकतेय नेमके?

रघुनाथ.केरकर's picture

2 Jan 2017 - 9:59 am | रघुनाथ.केरकर

थोडसं बाचकायला होतय....

हळु हळु सवय होइल म्हणा....

पण मिपा आठवलं की डोळ्यासमोर तो पुर्वीचा देखावा यायचा.

मालक एक विणंती आहे.... ती जुन्या थीम ची लिंक पण ठेवा की काही दीवस

अनुप ढेरे's picture

2 Jan 2017 - 10:06 am | अनुप ढेरे

माझा सहभाग म्हणून जो टॅब यायचा ज्यात आपण प्रतिसाद दिलेल्या धाग्यांवर नवीन काही आलय का ते समजायच, ही सोय नव्या थीममध्ये आहे का?

प्रतिसादांचं ट्री स्ट्रक्चर दिसत नाहीये.

प्रतिसाद - उपप्रतिसाद- उपउपप्रतिसाद असं दिसायला हवं, ते न दिसता त्याच्या ऐवजी फक्त प्रतिसाद आणि उपप्रतिसाद एकाखाली एक असेच दिसताहेत.

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Jan 2017 - 11:42 am | हतोळकरांचा प्रसाद

सहमत! इतर संकेतस्थळांच्या तुलनेत हे प्रतिसाद-उपप्रतिसादाचं वैशिष्ट्य खूप आवडायचं! ते गायब झाल्याचं पाहून वाईट वाटलं!

फेदरवेट साहेब's picture

3 Jan 2017 - 8:05 am | फेदरवेट साहेब

ट्री स्ट्रक्चर मंदी, थोडा डिटेल प्रतिसादची लड लागली का देन, द लेटर्स युज्ड टू जंम्प डाऊन द व्हॅली सन, आपला व्हर्नाक्युलर पोरे लोक काय म्हणते ते कडेलोट होते. एका लाईन मंदी एकच अक्षर अन असा एक पॅराग्राफचा प्रतिसाद आला का 'मदर ऑफ कडेलोट' होतोनी साह्येब. त्येला आता येगले फिचर म्हणावे का सोडून द्यावे हेला मात्र पर्सनल चॉईस वर सोडले, फॉर मी जे हाय ते उत्तम हाय नी.

दीपक११७७'s picture

2 Jan 2017 - 10:22 am | दीपक११७७

ऊत्तम अवडलं

पियुशा's picture

2 Jan 2017 - 10:53 am | पियुशा

सुरेख , जरा वेळ लागेल हाताळयला , ख व दिसत नाही :(

नि३सोलपुरकर's picture

2 Jan 2017 - 10:55 am | नि३सोलपुरकर

नवी थीम हाताळायला पहिल्या थिम पेक्षा थोडी अवघड वाटली, हळु हळु होइल सवय .
वाचन खुणा पण हव्या होत्या .

जयंत कुलकर्णी's picture

2 Jan 2017 - 11:16 am | जयंत कुलकर्णी

मस्त आहे. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आता फालतू धागे (म्हणजे स्वतःला नको असलेले) धागे नजरेआड करण्याची मोठे सोय झाली. त्यासाठी धन्यवाद. शिवाय फाँटही मला आवडला. हा मंगल नाही आहे का? नसल्यास कुठला आहे ?

सस्नेह's picture

2 Jan 2017 - 12:01 pm | सस्नेह

खूपच सुटसुटीत आणि सोयीस्कर वाटते आहे ही थीम. पूर्वीपेक्षा हाताळायला सहज. आणि फाँट अतिशय मस्त.
धन्यवाद.
...लाल हेडरला फाटा दिल्याबद्दल विशेष धन्यवाद !

ग्रेंजर's picture

2 Jan 2017 - 12:06 pm | ग्रेंजर

नवीन थीम छान आहे. विशेषतः हापिसात वापरायला चांगली आहे. लांबून दिसत नाही स्क्रीन वर काय आहे ते ;)
पण काही अडचणी
१. वाचनखुणा दिसत नाहीयेत. शोधा हा पर्याय नसल्यामुळे वाचनखुणा साठवून ठेवल्या होत्या विशेषतः पा. कृ. साठी पण आता वा. खु. नसल्यामुळे ते पण अवघड झाले आहे.
२. मिपा विशेषांक वर टिचकी मारल्यावर – वारंवार विचारले जाणारे प्रश्न हा सरपंचांचा धागा उघडतोय.
३. वरच्या काळ्या पट्टीवर जिथे मिसळपाव, स्वगृह, साहित्य प्रकार वैगेरे लिहिले आहे त्यात बाकी हेडिंग एका रेषेत दिसतात पण "मिसळपाव" हे हेडिंग थोडे वर गेले आहे तिथे काही लोगो अपेक्षित आहे का? नसेल तर ते एका सरळ रेषेत चांगलं वाटेल आता गल्ली चुकल्यासारखं वाटत आहे.;)
४. हि काही प्राथमिक निरीक्षणं बाकी हाताळायला लागल्यावर समजतील तशी तशी इथे नोंदवेनच:)

राम राम मंडळी,

सर्व प्रथम सगळ्यांना सादर प्रणाम !

मिपा संपादक मंडळाने आम्हाला इकडे कट्ट्या सामावून घेतले आणि बोलण्याची अनुमती दिल्या बद्दल धन्यवाद.
एक छोटीशी विनंती 'भटकंती' प्रकारामध्ये जर भारतातील आणि भारताबाहेरील, सायकलिंग , रनिंग असे वेग वेगळे उपप्रकार करता आले. तर अजून सोईस्कर होईल.

धन्यवाद.

आभारी आहे,
नाजूक पाटील.

नीलमोहर's picture

2 Jan 2017 - 1:04 pm | नीलमोहर

मिपा आणि मिपा व्यसनी लोकांसाठी एवढी मेहनत कायमच घेत असल्याबद्दल मालकांचे अनेक आभार :)

थीम सुटसुटीत आहे, अजून नवीन आहे, हळूहळू सवय होईलच, याआधीही मिपाची थीम बदलली गेली तेव्हा वेगळं वाटलं होतं, याचीही वापराने सवय होईल.
बाकी खव गायबल्यामुळे वाईट वाटतंय, ती एक खूप छान सोय होती.

Vasant Chavan's picture

2 Jan 2017 - 1:06 pm | Vasant Chavan

खूपच सुटसुटीत आणि सोयीस्कर वाटते आहे ही थीम. पूर्वीपेक्षा हाताळायला सहज. आणि फाँट अतिशय मस्त.
धन्यवाद.मस्तच आहे.

मालक, वाचनखुणा परत आणल्यास बरे होईल. बाकी नवी थीम सुरेख आहे.

थीम बर्‍यापैकी बरी आहे, अजून एकदोन दिवसांनी काय ते सांगतो.

वापरायला सुटसुटीत वाटत्ये. बाकी रंगसंगती आकर्षक करायला वाव आहे.

सुधांशुनूलकर's picture

2 Jan 2017 - 2:43 pm | सुधांशुनूलकर

एक-दोन दिवस वापरून पाहिलं, मग प्रतिसाद देतोय.
नव्या रचनेबद्दल कोणतीही अडचण आली नाही.
फाँट आवडला.
प्रोफाइल फोटोही टाकलाय.
वरची आणि खालची पट्टी (जिथे स्वगृह साहित्य प्रकार आणि मूलभूत माहिती, नवीन सदस्यांकरिता... इ.) काळ्या रंगाची आहे, ती रंगीत होईल थोड्या दिवसात, असं वाटतं.

एकूण छान.

वरची आणि खालची पट्टी (जिथे स्वगृह साहित्य प्रकार आणि मूलभूत माहिती, नवीन सदस्यांकरिता... इ.) काळ्या रंगाची आहे, ती रंगीत होईल थोड्या दिवसात, असं वाटतं.

...लाल झाली नाही म्हणजे मिळवली.

अनुप ढेरे's picture

2 Jan 2017 - 3:19 pm | अनुप ढेरे

http://www.misalpav.com/latest.html

या पानवर प्रतिसाद संख्येवर किंवा आयडीवर धागे सॉर्ट करण्याची सोय गेली का?

नया है वह's picture

2 Jan 2017 - 4:01 pm | नया है वह

आवडलं

पिलीयन रायडर's picture

2 Jan 2017 - 8:20 pm | पिलीयन रायडर

ही थीम आवडली. सवय व्हायला वेळ जाईलच.

संदीप ताम्हनकर's picture

2 Jan 2017 - 8:21 pm | संदीप ताम्हनकर

बदल रिफ्रेशिंग आणि चांगला आहे.

डेस्कटॉपवर IE11 मधे मिपा व्यवस्थीत उघडत नाही. रिकामे कप्पे दिसत आहेत पण माहिती दिसत नाही. तसेच मिपाचे नेवीगेशनचे वरच्या काळ्या पट्टीतील लिंक्स पण दिसत नाहीत. डेस्कटॉपवर मिपाचा लोगो पडद्याचा जवळपास ५०% भाग व्यापत आहे.

पैसा's picture

2 Jan 2017 - 10:47 pm | पैसा

माझ्या विंडोज १० मोबल्याच्या आयी वर लॉग इन सुद्धा केले. काही प्रॉब्ळम नाही आला.

आनंदयात्री's picture

2 Jan 2017 - 10:59 pm | आनंदयात्री

आयी का एज (IE or EDGE)?

पैसा's picture

8 Jan 2017 - 6:47 pm | पैसा

त्याचं नाव एज आहे नाही का!

बबन ताम्बे's picture

2 Jan 2017 - 11:24 pm | बबन ताम्बे

.

लाल टोपी's picture

2 Jan 2017 - 9:11 pm | लाल टोपी

थीम आवडली, मात्र प्रतिसादांप्रमाणे धागा वर येणे, प्रतिसाद, उपप्रतिसाद एका खाली एक येणे ही वैशिष्ट्ये पुन्हा मिळावीत, आपला लेख आणि प्रतिसाद संपादीत करण्याची सुविधा देखील मिळावी ही विनंती
सर्वांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!!

बबन ताम्बे's picture

2 Jan 2017 - 11:22 pm | बबन ताम्बे

मी आज लॅप्टॉप वर लॉगिन केले पण मला सगळे ब्लँक दिसतेय मिपावर.
इंटरनेट एक्सप्लोर चा प्रॉब्लेम आहे का ? माझा IE 11 आहे.

बबन ताम्बे's picture

3 Jan 2017 - 3:19 pm | बबन ताम्बे

IE वर प्रॉब्लेम आहे.

कंजूस's picture

2 Jan 2017 - 11:36 pm | कंजूस

द्रश्य(active tab)>>
दृष्य?

नीलकांत's picture

3 Jan 2017 - 12:23 am | नीलकांत

नमस्कार,
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांसाठी धन्यवाद. आपणासर्वांच्या मताची दखल घेतली आहे. सध्या काही सुविधा उपलब्ध नाहीत त्या लवकरच कार्यरत करतो. इन्टरनेट एक्पलोरर मध्ये अडचण आहे हे लक्षात आलंय. मात्र विन्डोज १० वर एज ब्राऊजर मध्ये मिपा उत्तम चालतंय.

वाचनखुणा, खरडवही, प्रतिसादांसहीत वर खाली होत जाणारा नवे लेखनवाला विभाग आदी सर्व थोड्याच काळत ठीक होईल.

प्रतिक्रिया देत रहा त्याने मदत होते.

- नीलकांत

ते मात्र राहीलं पाहीजे. नायतर कोण कुणाशी बोलतोयं ज्याम कळत नाही.

आवडली नवी थीम. कवितांप्रमाणे कथा हा वेगळा विभाग केला तर अजून छान!

भटकंती अनलिमिटेड's picture

3 Jan 2017 - 9:06 am | भटकंती अनलिमिटेड

आधीच्या थीममध्ये "माझा सहभाग"वर क्लिक केलं ही आपण आधी केलेल्या कमेंट्स आणि त्यावर आलेली उत्तरं असलेल्या धाग्यांची यादी दिसत असे. विशेषतः तंत्रजगत विभागात काही प्रश्न विचारल्यास त्याचं उत्तर आलं की नाही हे बघायला ती सोय खूप उत्तम होती. ती सोय आता आहे का? असल्यास मार्गदर्शन कराल का?

वेल्लाभट's picture

3 Jan 2017 - 1:43 pm | वेल्लाभट

सहमत. ही सोय हवीय.

प्रतिक्रिया कोलॅपसेबल करता येतील का? म्हणजे एकाच पानात सगळ्या प्रतिक्रिया एकदम बघता येतील.

विभागवार दुव्यांवर क्लिक करून विभागात गेल्यासही धाग्यांचा क्रम हा ताज्या प्रतिसादांनुसार लागलेला वाटतोय. तो धागा काढल्याच्या दिनांकानुसार लागायला हवा. अन्यथा नवे, पण कमी प्रतिसाद असलेले धागे वाचले जाणारच नाहीत.

जाबाली's picture

3 Jan 2017 - 1:55 pm | जाबाली

खूप स्लो झालाय का हे ? multiple टॅब्स ओपन केले कि लोड होताना खूप वेळ घेतायत

वेल्लाभट's picture

3 Jan 2017 - 2:16 pm | वेल्लाभट

मिपा विशेषांक या बटणावर मदत पानाचा दिवा लागलाय. कृपया बदल करावा.

मित्रहो's picture

3 Jan 2017 - 2:17 pm | मित्रहो

मला जाणवलेला (आणि खटकलेला सुद्धा) मोठा बदल म्हणजे
- लँडींग पेजवर सर्वात वर शिफारस असने तीही फार मोठ्या स्वरुपात. शिफारसअसू नये असे नाही पण माझ्या मते मिपासारख्या मुक्त संकेतस्थळावर संपादकाचा एक कोपरा असावा आणि तेथे शिफारस आणि संपाकाची घोषणा असे काही असावे. नाहीतर पूर्वी सारखे नवे लेखन हेच लँडींग पेज असावे. User Based Free साइट असल्याने ती तशी राहावी असे माझे मत.
- मिपावर आधी अक थिम अशी होती ज्यात मिपावर आल्या आल्या विविध विषयावरील दहा धागे दिसयाचे. त्यावेळी नवीन लिखाणाचे आयुष्य तीन ते चार दिवस असायचे. एकदा धागा लँडींग पेजवरुन बाद झाला की काही अपवाद वगळता त्याला वाचने नाही प्रतिसाद सुद्धा नाही. आताची थीम काहीशी तशीच आहे पण फक्त पाच धागे दिसतात.

काही जुन्या समस्या नवीन कॉमेंटसवर क्लीक केले की पहील्या पेजवरील प्रतिसाद दिसनार दुसऱ्या पेजवरील दिसनार नाही.

प्रतिसादात +१ लिहिण्यापेक्षा असे काही करायची वेगळी सोय असावी.

आवडलेले बरेचसे
- मला मुळात बदल आवडतो. तेच तेच पणाचा कंटाळा येतो.
- मोबाइलवर व्यवस्थित वाचता येते.
- लेख, किंवा कविता वर क्लिक केल्यास लेखांची संक्षिप्त माहीती आहे.
- मला रंगसंगती सुद्धा आवडली.

नि३सोलपुरकर's picture

3 Jan 2017 - 2:48 pm | नि३सोलपुरकर

विभागवार लेखांमध्ये लेखकाचे नाव दिसत नाही .(दिसावे अशी आशा आहे )

पाटीलभाऊ's picture

3 Jan 2017 - 3:53 pm | पाटीलभाऊ

नवीन थीम आवडली.
आशा आहे कि येत्या काही दिवसांत ज्या थोड्या बहुत त्रुटी आहेत त्या दूर होतील.

मिसळपाव आणि स्वगृह यापैकी दोन्हीवर टिचकी मारल्यावर एकच पान उघडतंय...!
मिपा विशेषण आणि मदत पान याबद्दलही हेच सर्वेक्षण.

शंतनु _०३१'s picture

3 Jan 2017 - 4:08 pm | शंतनु _०३१

नवीन थीम सुटसुटीत आहे ....
मो ब ई ल फ्रेंडली आहे ....

लेखनास स्टार रेटिंग देण्याची सुविधा मिळु शकेल का ?

सई कोडोलीकर's picture

3 Jan 2017 - 5:41 pm | सई कोडोलीकर

छान दिसतोय मिपाचा मुखडा. आधीच्या एकाच पानापेक्षा हे जास्त सुटसुटीत वाटतंय. जास्तीत जास्त धागे दिसू शकतायत, तरी सगळा पसारा सॉर्ट करून, आवरून घराची रचना बदलून नीटनेटकं लावल्यासारखं दिसतंय :-) धन्यवाद नीलकांत.

निर्धार's picture

3 Jan 2017 - 5:59 pm | निर्धार

पण वाचनखुणा कुठे आहेत?

पिलीयन रायडर's picture

3 Jan 2017 - 6:50 pm | पिलीयन रायडर

वर म्हणल्याप्रमाणे प्रतिसादाला +१ द्यायचे असेल तर लाईक प्रमाणे सोय हवी. धाग्यांनाही रेटींग देण्याची सोय असेल तर चांगले धागे निवडायला मदत होईल.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

3 Jan 2017 - 7:01 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

नविन थिम आवडली नाही,मेसी आहे फार.

माधव's picture

3 Jan 2017 - 7:27 pm | माधव

साठवलेल्या वाचनखुणा कुठे सापडतील?

श्रीनिवास टिळक's picture

4 Jan 2017 - 8:30 am | श्रीनिवास टिळक

मिपाचे नवे रूप मला अजिबात आवडले नाही. कारण काय ते सांगता येत नाही. मुळात सुरवात झाली ती 'थीम' या शब्दाचा वापर बघून. अजून एकही सदर उघडले नाही. काही वाचायला मनच होत नाही.

गणामास्तर's picture

4 Jan 2017 - 9:17 am | गणामास्तर

मला तरी नवे रुपडे आवडले आहे.
उपप्रतिसादाला दिलेले प्रतिसाद मूळ प्रतिसादाखाली दिसत आहेत.
ते जर का पहिल्या फॉरमॅट प्रमाणे करता आले तर (प्रतिसाद- उपप्रतिसाद - उपउपप्रतिसाद) चांगले वाटेल.

प्रसाद गोडबोले's picture

4 Jan 2017 - 11:37 am | प्रसाद गोडबोले

अं हं

नवीन थीम आवडली नाही . माझ्या मोबाईल वरून झूम आउट करता येत नाहीये।
नवीन प्रतिसाद पाहायच्या लिंक चालत नाहीये
आणि एकदम स्क्रोल डाऊन केले तर शेवटचा प्रतिसाद दिसण्याचा ऐवजी अन्य माहिती दिसत आहे .

लॉरी टांगटूंगकर's picture

4 Jan 2017 - 1:16 pm | लॉरी टांगटूंगकर

नव्या रुपावर बरीच मेहेनत झालेली वाटते आहे. शिफारस मुख्यपानावर थेट मध्यभागी असणे खूप आवडले. यामुळे एक इन्ट्यूटीव फिल्टर आपसूकच येतो आहे. पडीक रहायचं असल्यास "नवे लेखन" वर जाण्यास एखाद्दुसरा क्लिक जास्त नाही.
पहील्या सर्विसिंगनंतर गाडी अजून स्मूथ होईल.
मालकांना धन्यवाद्स!

कपिलमुनी's picture

4 Jan 2017 - 5:06 pm | कपिलमुनी

लॉग इन चा बॉक्स वरती हवा होता . मिपा ओपन केल्यावर लॉग इन उजव्या बाअजूस हवे . सध्या लॉग इन साठी खालीपर्यंत स्क्रोल करावे लगते.

साईटवर आल्यावर लॉग इन हे सहज आणि स्क्रोल विना दिसला पाहिजे

सही रे सई's picture

4 Jan 2017 - 9:32 pm | सही रे सई

+१

कपिलमुनी's picture

5 Jan 2017 - 5:23 pm | कपिलमुनी

धन्यवाद

गामा पैलवान's picture

4 Jan 2017 - 6:17 pm | गामा पैलवान

माननीय प्रशासक,

माझ्या मोबाईल वरून झूम आउट करता येत नाहीये।

माझीही हीच तक्रार आहे. फिरस्त्यावर दृश्यविस्तार (= मोबाईलवर झूम इन) केल्यास डावी आणि उजवीकडे पांढरे प्रांत (=व्हाईट स्पेसेस) येतात.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

4 Jan 2017 - 6:19 pm | गामा पैलवान

झूम आऊट म्हणजे दृश्यसंकोच म्हणायचं होतं.
-गा.पै.

जुन ं ते सोनं , मला मला आधीची थीम सोपी वाटते , असो ! change is the name of life.

सही रे सई's picture

4 Jan 2017 - 10:08 pm | सही रे सई

मिपा वरच लिखाण शोधायला काही पर्याय आधीच उपलब्ध आहे का?म्हणजे मिपा वरील लेखन त्याच्या लेखाच्या नावाने, लेखकाच्या नावाने वगैरे शोधायचं असेल तर काही लिंक आधीच उपलब्ध आहे का?
असली तर कुठे आहे आणि नसली तर तशी सोय उपलब्ध करून देता येईल काय?

तसच सध्या (म्हणजे पूर्वी देखील) टंक लेखन करताना बॅक स्पेस देऊन (काही चुकले असेल तर) पुन्हा लिहायला सुरुवात केली कि आधी लिहिलेली अक्षरे गंडतात. त्यासाठी सध्या कामचलाऊ उपाय म्हणजे alt + tab दोनदा दाबून परत लिखाणाच्या ठिकाणी येणे व लिहायला सुरुवात करणे.
नवीन थीम मध्ये हे सुधारता येईल काय?

सही रे सई's picture

4 Jan 2017 - 10:29 pm | सही रे सई

अजून काही शिफारसी/ सुधारणा :
१. +१ असा प्रतिसाद देण्या ऐवजी लाईक सारख काहीतरी असाव.
२. शिफारस चा चौकोन पण सगळ्यात पहिले असू नये, तो उजव्या बाजूच्या पॅनेल मधे च असावा, किंवा खालच्या बाजूला असावा. कारण प्रत्येक वेळी मिपा उघडल कि तेच तेच लेख सगळ्यात पहिले दिसतात. त्या ऐवजी सगळ्यात पहिले एका चौकटीत नुकतेच नवीन लेखन झालेले (नवीन प्रतिसाद आलेले नव्हे) ५ लेख दिसले तर जास्त संयुक्तिक वाटेल.
३. नवीन प्रतिसादांवर टिचकी मारली कि जर पहिल्या व पुढील कुठल्या हि पानावर नवीन प्रतिसाद असतील तर पहिल्या पानावरचे नवीन प्रतिसाद खुण केलेले दिसतात. पण पुढच्या पानावर टिचकी मारून गेले कि त्या पानावरचे नवीन प्रतिसाद अधोरेखित अथवा तसे खूण केलेले दिसत नाहीत. हे जुन्या थीम मध्ये पण होतच होत. पण नवीन थीम मध्ये सुधारणा झाली तर आवडेल.
४. वाचकांना लेखाला मतदान करता आल किंवा शिफारस करता आली तर बर होईल. त्यामुळे वाचकांनीच निवडून दिलेल्या चांगल्या लेखाची यादी बनत जाईल जी नवीन आलेल्या वाचकाला उपयुक्त ठरेल. यात फक्त लेख वाचनीय आहे एव्हढेच TAG करता याव. यात श्रेणी असू नये. म्हणजे मुद्दामून कोणाला कंपुगिरी करून वाईट लेख अस मतदान करता येणार नाही.
५. मिसळपाव वरील आत्ता पर्यंत च्या चांगल्या लेखांचे संकलन करून तिमाही प्रमाणे वर्गीकरण करून त्याचे पण वेगळे पान द्यावे.

नवीन थीम मोबाईलमधून वाचताना छान वाटते. डेस्कटॉपवर तितकी आवडली नाही. पहिल्या पानावर खूप जास्त टेबल टेबल दिसतायत. मधला सुविचाराचा टेबल नसला तरी चालेल किंवा बॅनर नसेल तर सुविचार असं काही असावं. पहिल्या पानावर लेख, चर्चा, कविता, इत्यादी सर्व टेबल न दिसता फक्त शिफारस आणि ज्या विभागात नवीन लेखन झाले आहे तोच विभाग दिसला तर मुख्य पानावरील कन्टेन्ट कमी होईल.

बरीच माहिती योग्य त्या ठिकाणी ठेवली तर अजून सुटसुटीत दिसेल, जस की साहित्य संपादकांविषयी आणि अनाहिता सदस्यत्व ही माहिती नवीन सदस्यांकरिता महत्वाचे दुवे इथे ठेवली तरी चालेल. मिसळपावचे फेसबुक पान, ट्विटर, युट्युब चॅनेल या तिन्हीचा फक्त लोगो हेडर आणि फूटर दोन्हीमध्ये ठेवावा. अतिरिक्त माहिती मिसळपाव बद्दल मूलभूत माहिती किंवा नवीन सदस्यांकरिता महत्वाचे दुवे इथे दिली तरी चालेल. साहित्य प्रकार आणि नवे लेखन दोन वेगळे ओपशन करण्याऐवजी, नवे लेखनखालीच विविध साहित्य प्रकार हा मेनू सामावून घेतला तरी चालेल. स्वगृह खाली आवागमन, घोषणा, मदत पान हा छोटा मेनू ठेवला तरी चालेल. जेव्हा काही महत्वाची घोषणा असेल तेव्हा घोषणा या टेक्सटसमोर किंवा हेडरमध्ये एखादा दवंडी पिटणारा माणूस अशी अनिमेटेड इमेज टाकली तर वाचकांचे लक्ष वेधून घेता येईल. असेच युट्युब चॅनेल साठीही करता येईल. जेव्हा जेव्हा नवीन विडीयो अपलोड झाला असेल तेव्हा हेडर मधील युट्युब लोगो इमेज अनिमेट होईल असे काही.

पिलीयन रायडर's picture

5 Jan 2017 - 1:28 am | पिलीयन रायडर

खुप चांगल्या सजेशन्स आहेत. सईच्याही कल्पना आवडल्या.

मदत पान इथे खुप लिंक्स एकतर ठेवता येतील. मिपाचा साईट मॅप असला तर बरं होईल. मदत पानवर संपादक, साहित्य संपादक, वाविप्र, अनाहिता, सदस्य झाल्यावर वाचायचे दुवे इ. सर्व ठेवत येईल. आणि ती माहिती वर असणे आवश्यक आहे. पुर्ण पेज खाली गेल्यावर एकदम बरीच माहिती मिळतेय, त्याने नव्या माणसाला गोंधळायला होऊ शकतं.

सोशल मिडीयाचे फक्त लोगो फेडर - फुटरला असावेत असे माझेही मत आहे. शक्यतो असेच असते. म्हणजे साईटवर पहिल्यांदा आलेल्या माणसाला मिपाच्या शाखा कळतील. तातडीने लाईक / सबस्क्राईब / फॉलो करता येईल.

टेबल्स जास्त होत आहेत हे खरंय. त्यातही सई म्हणते तसं सतत शिफारस मधले तेच ४-५ लेख सतत दिसत आहेत. त्यामुळे मी तरी नवे लेखनवरच सतत जात आहे. मुख्य टेबल्स मधुन मी कोणताही लेख पाहिला नाहीये अजुन. तेव्हा शिफारसची जागा बदलावी असे मलाही वाटतेय.

बॅनर रोज असणारे का? कारण ती एक महत्वाची दृश्य जागा जातेय. डेस्कटॉपवर अर्धा भाग बॅनर आणि अर्धा शिफारस ह्यात जातोय.

रुपी's picture

5 Jan 2017 - 2:12 am | रुपी

थीम आवडली..

काही बाबी नजरेत आल्यात त्या:

लॉग-इन केल्यावर आणि लॉग-इन न करता वेगवेगळे सुविचार दिसत आहे. (खरं तर सुविचारांपेक्षा त्या दिवसाचे खास महत्त्व किंवा ट्रिव्हिया असलेलं जास्त आवडेल.)

स्वतःचे सर्व लेखन दिसत नाहीये. म्हणजे http://www.misalpav.com/user/me/authored यात काहीच दिसत नाही.
माझाच सदस्य क्रमांक वापरला तर मात्र दिसते. http://www.misalpav.com/user/11117/authored

याशिवाय आणखी काही मुद्दे सुचवते -
"हॉटेलात आलेली माणसं" लॉग-इन केलं नसल्यास दिसू नये असं मला आधीपासून वाटत आलं आहे. फक्त किती सदस्य आणि किती वाचक हजर आहेत यांचे आकडे असावेत.

एखाद्या सदस्याच्या सर्व लेखनात, विभागवार वर्गीकरण करता आले आणि ते फिल्टर म्हणूनही वापरता आले तर शोधायला सोपे पडेल. ज्यांचे वेगवेगळ्या विभागांत लेखन आहे, पण समजा त्यांची एखादी पाकृ शोधायची आहे, तर पाकृचा फिल्टर वापरता येईल. शिवाय बापाचा नैवेद्य/ श्रीगणेश लेखमाला यांतले लेखन दिसतच नाही, तेही दिसायला हवे.

सदस्याच्या प्रोफाइलवर गेल्यावर "Track" ऐवजी "सहभाग" / "प्रतिसाद" शब्द योग्य वाटतात.
यातही फक्त लेखाचा दुवा दिसतो. त्यात सदस्याच्या प्रतिसादांचेच दुवे दिसले तर जास्त बरे होईल.

वाचनखुणा सध्या दिसत नाहीयेत, पण पुढे दिसतील असे गृहीत धरुन - लेखाच्या खाली "वाचनखूण साठवा" हा पर्याय असतो, त्याऐवजी तो वरच देता आला तर? लेख नंतर वाचायचाय म्हणून खूण साठवण्यासाठी कधी कधी फार "स्क्रोल" करावे लागते.

एखाद्या लेखाला फार प्रतिसाद आले तर एकापेक्षा अधिक पाने लागतात, पण पुढच्या पानांवर लेख पुन्हा दिसतो, तो फक्त पहिल्या पानावर दिसला तर? प्रतिसाद पाहायला पुन्हा फार "स्क्रोल" करावे लागते.

एक-दोन सदस्यांनी सुचवले आहेच. तसे स्वतःच्या प्रोफाइलसाठी वर उजव्या कोपर्‍यात चित्र आणि ड्रॉपडाउन मेन्यु असावा असे वाटते.

फेरफटका's picture

5 Jan 2017 - 2:21 am | फेरफटका

मिसळपाव वर सर्च ईंजिन आहे का? एखादा लेख, लेखक कसा शोधायचा?

स्मिता.'s picture

5 Jan 2017 - 2:45 pm | स्मिता.

नवीन रचना आवडली, छान सुटसुटीत आहे. माझा +१

माझ्या काही सूचना:
१. फॉन्ट थोडा मोठा करता आला तर वाचायला सोपं वाटेल.
२. प्रतिसादात सदस्याचे नाव आणि त्याशेजारी लगेच प्रतिसादाचे शीर्षक दिसत असल्याने वाचताना गोंधळ उडतोय. सदस्याचे नाव त्याच्या फोटोखाली टाकता येईल का? किंवा सदस्यानाम आणि प्रतिसादाचे शीर्षक यांचा फॉन्ट/रंग वेगवेगळे ठेवता येतील का?
३. हेडर तात्पुरता आहे हे समजतेय पण काळया रंगाच्या जागी मिपाचा गडद लाल रंग कसा वाटेल?
४. सर्व लेखनप्रकारांना न्याय दिल्यामुळे मुखपॄष्ठ क्लटर्ड वाटतेय. धाग्यांची वर्गवारी करण्याकरता २-३ प्रकारचे क्रायटेरिया वापरून त्यानुसार मुखपॄष्ठावरचा डॅशबोर्ड असावा असं वाटतं.

श्रीगुरुजी's picture

5 Jan 2017 - 3:37 pm | श्रीगुरुजी

नवीन थीममध्ये बरेच जुने धागे गायब झाले आहेत. "ताज्या घडामोडी - ३" या धाग्यावर प्रतिसाद देऊनसुद्धा हा धागा अदृश्यच आहे. नोटाबंदीवरील अनेक हॉट धागे गायब आहेत. खरडवही सुद्धा गायब आहे. फॉन्ट खूप मोठा व ठळक आहे. एकंदरीत नवीन थीम फारशी आवडली नाही. अर्थात सवय झाल्यावर आवडायला लागेल असं वाटतंय.

प्रतिसाद पे प्रतिसाद , प्रतिसाद पे प्रतिसाद ....प्रतिसाद पे प्रतिसाद , प्रतिसाद पे प्रतिसाद ...और फिर उसपे 'कडेलोट होनेतक प्रतिसाद ' हे मिस होतंय ...
त्याशिवाय सदस्यांना भांडण्यात मजा कशी येईल ? आणि कुठे थांबायचं ते तरी कसं कळणार ना ?

बोले तो ट्री हवाच !!

संदीप डांगे's picture

5 Jan 2017 - 7:40 pm | संदीप डांगे

हा हा हा! आता कोणकोणाशी भांडतंय काय कळायला मार्ग नाही बॉ!

हतोळकरांचा प्रसाद's picture

6 Jan 2017 - 6:48 pm | हतोळकरांचा प्रसाद

हे वैशिष्ट्य परत आलोय! आत परत पोटभरून भांडूया आणि कडेलोट होईपर्यंत अंताक्षरीपण खेळता येईल. हे वैशिष्ट्य परत आणल्याबद्दल मिपामालकांचे खूप खूप आभार!!

मराठी कथालेखक's picture

9 Jan 2017 - 12:11 pm | मराठी कथालेखक

चला कडेलोट करुया :)

हतोळकरांचा प्रसाद's picture

9 Jan 2017 - 1:24 pm | हतोळकरांचा प्रसाद

:):) ह्या नवीन थीम मध्ये कडेलोट होणार कि नाही माहित नाही. एका कडेलोट झालेल्या जुन्या धाग्यावर जाऊन आलो तर तिथे आता प्रतिसाद व्यवस्थित दिसत आहेत! :):)

कैवल्यसिंह's picture

5 Jan 2017 - 11:01 pm | कैवल्यसिंह

लेख, प्रतिसाद, उप प्रतिसाद, खरडवही, खरडफळा व व्य नि यांवर जी वेळ दाखवतात ती २४ तासांची दाखवतात त्यात बदल करुन ती जर १२ तासाची केली तर बरे हेईल.. म्हनजे वेळेपुढे AM/PM आसले तर जरा बरे होईल...

लोनली प्लॅनेट's picture

6 Jan 2017 - 12:42 pm | लोनली प्लॅनेट

नवीन थीम फारच छान खूपच आवडली
लेखावर जेंव्हा प्रतिक्रिया दिली जाते तेंव्हा सर्वात शेवटची प्रतिक्रिया ( Latest comment ) लेखाखाली सर्वात पहिल्यांदा दिसायला हवी म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन प्रतिक्रिया वाचताना scroll करून खाली जावे लागणार नाही . चर्चा रुपी लेखांसाठी तर हे खूप सोपे जाईल.

रॉजरमूर's picture

7 Jan 2017 - 9:39 pm | रॉजरमूर

थीमचा पार्श्वभाग पांढरा असल्याने आवडली नाही तो फिकट रंगीत हवा होता . ज्यांना जुनी थीम वापरायची त्यांना ती थीम वापरायची सोय हवी होती .

 मुख्य पानावर शिफारस च्या दालनामध्ये "शिर्षक" च्या ऐवजी "शीर्षक" असा बदल करावा .शि र्हस्व च्या ऐवजी दीर्घ करावा.

रॉजरमूर's picture

7 Jan 2017 - 11:51 pm | रॉजरमूर

मागचे लेख दिसत नाहीये .

उदा. गुगल वरून मी http://www.misalpav.com/node/33244 हा लेख शोधला , त्यावर प्रतिक्रियाही दिली पण तो लेख प्रतिक्रिया प्रकाशित झाल्यानंतरही नवे लेखन या सदरात दिसत नाहीये .तसेच त्या लेखाची वाचनखुणही साठवता येत नाहीये .तसेच लिंक पण नाही देता येत आहे.

मिपाच्या नव्या रुपाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करून पाहिला पण नाही जमत, जुनंच मिपा परत आणा राव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2017 - 11:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर अजिबात जीव लागत नाहीहे. मिपा तंत्रज्ञाचा अजिबात अवमान करायचा नाही. पण पूर्वीच्या मिपात आपलं एक आपलेपण वाटायचं. सध्याच्या मिपा रंगसंगतीच्या बाबतीत अजिबात काही विशेष असं काहीच नाही. चारही बाजूंनी काळा पडदा मारुन निर्जन बेटावर एकट्याच माणसाने वावरावे असे स्वरुप आलेले दिसते. मोबाईलच्या दृष्टीकोनातून पूर्वीचं मिपाही नीट इंजॉय करताच येतं होतं. काही तरी करायचं म्हणुन केलेला प्रयोग अजिबात झेपला नाही, हे नम्रपणे आणि स्पष्ट सांगू इच्छितो. बाकी काय करायचं ते करा. आम्ही मिपावर प्रेम करतो म्हणुन हे सोसणं आलं असं समजून मन मारुन मिपावर लिहित राहू.

प्लीज प्लीज प्लीज. पूर्वीचं मिपा आणा भो............. !

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

8 Jan 2017 - 3:21 pm | यशोधरा

बाडीस.

मार्मिक गोडसे's picture

8 Jan 2017 - 4:14 pm | मार्मिक गोडसे

चारही बाजूंनी काळा पडदा मारुन निर्जन बेटावर एकट्याच माणसाने वावरावे असे स्वरुप आलेले दिसते.

असंच काहीसं वाटत होतं, फक्त शब्दात मांडता येत नव्हतं

पैसा's picture

8 Jan 2017 - 4:47 pm | पैसा

काही किरकोळ त्रुटी आहेत पण त्या लक्षात येतील तशा नीलकांत आणि प्रशांत दूर करत आहेत. घर किंवा गाव बदललं तर सवय होईपर्यंत जरा वेगळं वाटतं. मग त्याची हळूहळू सवय लागते. त्यासाठी पुन्हा जुन्या लहान पडणाऱ्या घरात जायची गरज नसते. आता वाचकांचा मोठा वर्ग मोबाईल वरून मिपा वाचणारा आहे. त्यांची डेटा कमी वापरण्याची गरज लक्षात घेऊन नीलकांतने theme बदलली त्याबद्दल धन्यवाद!

मोबाईलवरुनही साईटची स्क्रीन व्यवस्थित आणि पूर्ण दिसत नाही. लोड व्हायलाही वेळ लागतो. असो.

पैसा's picture

8 Jan 2017 - 6:44 pm | पैसा

प्रतिक्रिया देताना वरचा बार मोठा दिसतो ही एक अडचण येते आहे. पण माझी ती दुरुस्त होईपर्यंत थांबायची तयारी आहे. मला तो मिपा बंद असण्याएवढा मोठा प्रॉब्लेम वाटत नाही. होईल हळूहळू. नीलकांत आणि प्रशांत याना वेळ होईल तसे करतील एकेक. मोबाईलवर आधी उभे आडवे दोन्ही दिशाना स्क्रोल करावे लागत होते. आता ते नाही. बाकी प्रत्येक मोबाईलच्या डिस्प्ले सेटिंगमुळेही फरक पडत असावा. पेज लोड नक्कीच कमी वेळात होत आहे. आताचा फाँट अतिशय सुबक आहे हे एक लिहायचं राहिलं.

संदीप डांगे's picture

8 Jan 2017 - 6:48 pm | संदीप डांगे

फॉन्टबद्द्ल माझे अनुकूल मत नाही. तसे तपशिलात नीलकांतला कळवले आहे.

इथे सर्वांना विचारावे वाटते की आधीच्या आणि आताच्या फॉन्टमुळे वाचतांना काय बदल जाणवतो? चांगला किंवा वाईट कसाही..

नवा फॉण्ट जास्त सुस्पष्ट आणि क्रिस्पी आहे. मला आवडला.

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Jan 2017 - 7:20 pm | हतोळकरांचा प्रसाद

मला आधीचा आणि ह्या फॉन्टमध्ये मोबाईलवर फार काही विशेष फरक जाणवला नाही. डेस्कटॉप + IE11 वर मात्र खूप छान वाटला नवीन फॉन्ट. मोबाईलवर मोबाईल व्हर्जनपेक्षा डेस्कटॉप व्हर्जन वापरायला जास्त सोपे वाटले.

पैसा's picture

8 Jan 2017 - 8:03 pm | पैसा

प्रतिक्रिया देताना वरचा बार मोठा दिसतो ही एक अडचण येते आहे.

हे दुरुस्त झालेलं दिसतंय. चार सहा दिवसात मोबाईलवरून प्रतिक्रिया लिहायचा कंटाळा केला होता, त्यामुळे दुरुस्त झालेलं लक्षात आलं नव्हतं.

प्रचेतस's picture

8 Jan 2017 - 7:08 pm | प्रचेतस

वेगळं वाटणारच, पण डाटा जास्त जातोय असं मला वाटतं. शिवाय पेज लोड व्हायला खूप वेळ लागतोय. ही थीम काहीशी हेवी असावी.
मोबाईल वरून मिपा वाचण्याच्या बाबतीत मला जुनंच रुपडं साधं, सोपे ,सुटसुटीत वाटतं. नव्या थीम मध्ये स्क्रोलिंग जास्त करावं लागतंय. क्लिक्सचं प्रमाण तुलनेनं वाढलंय.

शिफारस दर २/३ दिवसांनी अद्ययावत व्ह्यायला हवी. होतं काय, कित्येक दिवस तेच ते लेख पहिल्या पानावर दिसत आहेत.
शिफारशीमध्ये काही गाजलेले जुने लेखही वर आणायला हवेत अधूनमधून. वपु/पुलं ह्यांचे सुविचार तर अगदी दवणिय वाटत आहेत.

अर्थात थीम आवडणे, न आवडणे हे व्यक्तिसापेक्ष आहेच. मला अजूनतरी हि थीम रुचली नाहीये.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2017 - 7:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> मोबाईल वरून मिपा वाचण्याच्या बाबतीत मला जुनंच रुपडं साधं, सोपे ,सुटसुटीत वाटतं.

खरंय रे वल्ली. फक्त दीर्घ लेखनासाठी डेस्कटॉपवर यायचो. गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी. (मिपाच्या रे भो)
नीलकांतसाठी सहन करा भो. ;)

>>>>> थीम आवडणे, न आवडणे हे व्यक्तिसापेक्ष आहेच. मला अजूनतरी हि थीम रुचली नाहीये.

थीम बदल होणारच आहेत. डोंटवरी आत्ताच माहिती कळली. बाकी. दोनपाच लोकांना थीम आवडणे आणि पाचपन्नास लोकांना थीम आवडणे ही गोष्ट वेगळीच असते.

" ए जिंदगी काश तू ही रुठ जाती मुझ से:ये रुठे हुये लोग मुझ से मनाये नही जाते. "

-दिलीप बिरुटे

पण डाटा जास्त जातोय असं मला वाटतं.

इतर धागे आणि नवे लेखन टेस्ट करताना पानाचा २५-३०% साईझ कमी आला होता. तेव्हा टेस्ट करताना स्वगृह पान जे आता आहे ते नव्हते त्यामुळे त्यात काय फरक पडला सांगता येणार नाही.

मार्मिक गोडसे's picture

8 Jan 2017 - 5:01 pm | मार्मिक गोडसे

embed video टाकता येऊ नये अशी सोय करता येईल का? मोबाईलवर लेख लवकर लोड होत नाही आणि scroll ही बरंच करावं लागतं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2017 - 7:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अपग्रेडेशनमुळे जुन्या व्हर्जनवर जाता येणार नाही, हे इथे येर्‍यागबाळ्यालाही कळलं आहे. नव्या व्हर्जनवर जुनं रुपडं आणताही येईल हेही मला माहिती आहे. मिपाला नव्या बदलावर जायचंय आहे. काळ मोबाईलचा आहे, तेव्हा व्यवस्थापन मिपा मोबाईल सदस्यांसाठी तशी सोय करु पाहात आहे. पण सध्याची थीम अजिबात युजरफ्रेंडली नाही, थीम बदलणे आणि त्यावर काम करणे आवश्यक आहे. मीपा मालकांना सध्या काम येऊन पडले आहे त्यामुले जरा रंगकाम, यंत्रकाम लांबणीवर पडलं आहे, हेही आम्हाला माहिती आहे. आम्हाला उगाच बळजबरी कशालाही चांगलं म्हणायची सवय नाही. नै लागत जीव, तर नैच लागत म्हणतो. बाकी, नीलकांतसाठी हे सर्व सहन करतो. मिपावर आम्ही एवढी नावडती माणसं सहन केली थीम क्या चीज है.

आवश्यक कामं अशी -

१) वरची काळी बॉर्डर [चौकट रंग] बदलणे आवश्यक. २) प्रतिसादातील हीडरवर काम करणे आवश्यक. ३) प्रतिसादातील बॉक्स बॅकग्राउंड कलर बदलणे आवश्यक. ४) मोबाईल व्ह्यू अजूनही व्यवस्थित झालेला नाही. ५) डेस्क्टॉप व्हर्जन आणि मोबाईल व्हर्जन यावर काही उदाहरणे पाहून तसे बदल आवश्यक आहेत. ६) मोबाईल व्ह्य मधे मेनूला क्लीक केलं की स्वगृह वैगरे उघडतं. तिथे एक एक गुणीलेचं चिन्ह असलं पाहिजे. म्हणजे विंडो जाग्यावर येईल. ( मोबाईलवरुन लोकसत्ता पाहा) ७) मोबाईल व्ह्य वरुन साइट कशी चालली पाहिजे. सॅम मोबाईल साइट पाहा. ८) फाँटवरही काम आवश्य्क आहे.

अजून बर्‍याच गोष्टी सांगतो. मदतनीस म्हणून काम करायची तयारी आहे. वार आणि वेळ कळवावा. कामधामं सोडून हजर होईन. हाय काय अन नाय काय. मिपाची रंगसंगती मिपाची जान आहे. एवढं विसरु नका भो. सध्या जड अंत:करणाने मिपावर वावरतोय. सदस्य म्हणून आमच्या भावना समजून घ्या भो.

-दिलीप बिरुटे
(जुनं काहीच सोडायची तयारी नसलेला)

जव्हेरगंज's picture

10 Jan 2017 - 1:33 pm | जव्हेरगंज

+१११

मोबाईल वरुन वापरताना ही थीम गंडलेली आहे असं दिसतय. अजीबात युजर फ्रेंडली नाही....

पिलीयन रायडर's picture

9 Jan 2017 - 11:49 pm | पिलीयन रायडर

प्रतिसादात रचना बदलली आहे. सवय नसल्याने पटकन प्रतिसादकर्त्याचे नाव लगेच लक्षात येत नाहीये.
वेळ - लेखक असं करण्यापेक्षा लेखक - वेळ असं करता येईल का? हे उर्दु सारखं उलटं वाचल्याप्रमाणे वाटतंय. वेळेत इतका इंटरेस्ट नाहीये. प्रतिसाद कुणी दिलाय ह्यात आहे..!