प्रवास

जॉनी's picture
जॉनी in जनातलं, मनातलं
28 Oct 2016 - 6:54 pm

शरीराने तो बसला होता खडकावर...
पण मन कुठेतरी भूतकाळात रमलं होतं...

"भें**, कुछ नही होता यार एन सी सी एंट्री से. आना है फौज में तो युपीएससी क्लिअर करो और फिर आओ"
टाय ची गाठ सोडत आशुतोष बोलला. हि चौथी वेळ होती अलाहाबाद एस एस बी सेंटर मधून त्याला नाकारलं गेल्याची.
"तो भाई कर ना क्लिअर युपीएससी, रोका किसने है?"
समदुखी सुमित कुमार वैतागून बोलला.
"नहीं हो रही यार...वही तो लफडा है ना"
"कोई नै यार..देअर इस ओलवेज ए नेक्स्ट टाईम. चल फिर, मिलते है किस्मत में होगा तो"

सर्वसाधारण कुटुंबातून लहानाचा मोठा झालेल्या आशुतोष ने मोठंच स्वप्न पाहिलं होतं तसं. वडील कारकून आणि आई गृहिणी. सैन्यात अधिकारी होणे हे आपलं काम नाही असा सूर दिसायचा कधी कधी त्याच्या घरी, पण त्याला कधी कुणी अडवून धरलं नाही. कॉलेज मध्ये एन सी सी च्या माध्यमातून महत्त्वाकांक्षेला खतपाणीच मिळालं. इंजिनिअरिंग ला चांगला परफॉर्मन्स असून प्लेसमेंट्स अटेंड न करता आर्मीतच जायचं ठरवलेलं. असं असलं तरी चार वेळा परीक्षा देऊन सुद्धा युपीएससी क्लिअर करू शकला नव्हता. आणि आता एज बार झाल्यामुळे एन सी सी एंट्री हा एकच पर्याय होता. आणि पुढच्या अटेम्प्ट ला आर या पार हा निश्चय च झाला होता.

"शाब चाय चाहिये?"
"हांजी जगजीत, प्लिज गेट वन"
"इन अ व्हाईल, सर"

आशुतोष बरोबर राहून मुळातच स्मार्ट असलेला जगजीत इंग्रजी पण शिकू लागला होता..आशुतोष ला कौतुक वाटलं त्याचं. आणि इन अ व्हाईल ऐकून हसु फुटलं..

पण परत मागच्या गोष्टी पुढे आल्या..

बेंगलोर बोर्ड मधून स्क्रीनिंग, साईक, जीटीओ, इंटरव्ह्यू, मेडिकल असे सर्व टप्पे पार करून आय एम ए मध्ये दाखल झाला ट्रैनिंग साठी. एन सी सी एंट्री ने च तारलं त्याला शेवटी. यथावकाश ट्रेनिंग सुद्धा पूर्ण झालं. पण ह्या ट्रेनिंग ने त्याच्या अंगात एक आग भरली गेली होती. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर सतत काहीतरी नवीन करायची उर्मी त्याला खुणावत होती. मग काय, मनाने कौल दिला-पॅरा कमांडोज. असंख्य शारीरिक, मानसिक वेदना, यातना सहन करत सशक्त शरीर आणि कणखर मनाचा कमांडो तयार झाला..

"सर, टी"
"जगजीत, अंग्रेजी अच्छी सिख रहा है तू. चक्कर क्या है?"
"आपही कि क्रिपा शाब, आप जैसे अफसर होंगे तो हम भी कुछ सिख लेते है"
"चल अच्छा है" आशुतोष हसत म्हणाला. इतक्यात मेजर अकबर सिद्दीकी त्याच्याकडे येताना दिसले.
"जय हिंद सर" आशुतोष आणि जगजीत दोघांनी मेजर ला सलाम केला.
"जयहिंद लेफ्टनंट यादव, सब ठीक? आज तो तुम्हारा खाता खुलते खुलते रेह गया यार..कोई नै, देअर इज ओलवेज ए नेक्स्ट टाईम..एन्जॉय द टी"
आशुतोष ला हसू आलं आणि सुमित कुमार ची आठवण हि आली. आज आशुतोष चा लेफ्टनंट आशुतोष यादव झाला होता पण सुमित कुमार ची काही खबर नव्हती.

चार काउंटर इंसर्जन्सी ऑपरेशन्स मध्ये सहभागी झाला होता आत्तापर्यंत आशुतोष, पहिली तीन तर अशीच गेली. ट्रॅप लावल्याचे खबर अतिरेक्यांना मिळत होती. आणि काश्मीर खोऱ्यात हे काही नवीन नव्हतं.
आज मात्र दोन अतिरेकी ठार झाले होते. छोट्या टेकडी वजा पठारावर दहा सैनिकांच्या तुकडीने वर्तुळाकार ट्रॅप लावला होता. नेतृत्व अर्थातच मेजर सिद्दीकी करत होते. तुकडीचा बेस सोबत सतत संपर्क होता. रात्री 2.30 च्या सुमारास बेस च्या रेडिओवर दोनच गोळ्यांचा आवाज आला आणि काम तमाम. रायफल च्या दहा बारा फैरींचे आवाज यायला तो काही पिक्चर नव्हता. सुभेदार विकास आणि मेजर सिद्दीकी ह्यांनी अतिरेक्यांची देवाशी गाठ घालून दिली होती. अतिरेक्यांच्या कपड्यांच्या आतमध्ये चार फुल्ली लोडेड एके 47 सापडल्या. थोड्याच वेळात मेजर सिद्दीकीने सीओ ला डिटेल रिपोर्ट दिला आणि आदल्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून चा ट्रॅप उठवला..

आशुतोषनं मात्र आज पहिल्यांदा पन्नास फुटावरच्या माणसाला दोन भुवयांच्या मध्ये गोळी लागून मरताना पाहिलं होतं. कितीही स्ट्रॉंग असला तरी थोडंसं फील झालंच होतं त्याला. आणि त्याचाच विचार करत तो कॅम्प च्या बाहेर खडकावर बसला होता.

क्रमश:

अवांतर: मिपा वर लिहायचा पहिलाच प्रयत्न आहे. पण तरी सांभाळून वगैरे नका घेऊ, चुका असल्यास दाखवून द्या प्लिज, म्हणजे नेक्स्ट टाईम सुधारायचा प्रयत्न करेन.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

28 Oct 2016 - 8:18 pm | यशोधरा

वाचते आहे..

पद्मावति's picture

28 Oct 2016 - 8:47 pm | पद्मावति

जबरदस्त सुरूवात.
पुढचा भाग लवकर टाका प्लीज़

एस's picture

28 Oct 2016 - 10:02 pm | एस

वाचतोय.

पैसा's picture

28 Oct 2016 - 10:41 pm | पैसा

छान सुरुवात. टाईप करायची सवय असेल तर जरा मोठे भाग टाका.

चित्रगुप्त's picture

28 Oct 2016 - 10:45 pm | चित्रगुप्त

वा. वेगळ्या विषयावरील मालिका. सुरुवात छान झालीय. पुभाप्र.

स्वाती दिनेश's picture

9 Nov 2016 - 3:33 pm | स्वाती दिनेश

सुरूवात आवडली.
स्वाती

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Nov 2016 - 7:31 am | कैलासवासी सोन्याबापु

आज प्रवास वाचायला घेतला, शैली उत्तम अन ओघवती आहे तुमची, आता बाकी भाग वाचून त्यावर प्रतिक्रिया देतो. एक सल्ला आहे, स्वतःला मला तो फिल होतो, जिथे सिनिअर ज्युनिअरला भेटतो तिथे 'सलाम' करवून घेऊ नका 'सॅल्यूट' करवून घ्या, सलाम व्हॅले पार्किंग करणारा ताज हॉटेलचा बैरा करतो, सॅल्यूट आर्मीमॅन करतो, तुलना फक्त शब्दातील फरक समजून द्यायला करतोय बैरा कमी लेखणे उद्देश्य नाही. बाकी, तुमचे 'जॉनी' हे नाव जर गोरखा रेजिमेंटच्या भोळ्या चिवट अन अत्यंत शूर जॉनीबॉइज उर्फ गोरख्यानवर बेतलेले असेल तर प्रचंड आवडले आहे. मुश्किल वखत जॉनी सखत! पुढील लेखानांस शुभेच्छा.

जॉनी's picture

14 Nov 2016 - 3:09 pm | जॉनी

त्या वेळी सॅल्यूट हा शब्द सुचायला हवा होता.
काळजी घेईन.
धन्यवाद :)

दखलमध्ये बघून लक्ष गेले.वाचायला घेते.

Ranapratap's picture

1 Jan 2017 - 6:32 pm | Ranapratap

उत्तम लिखाण, पुढील लेखनास शुभेच्छा

राजाभाउ's picture

2 Jan 2017 - 6:36 pm | राजाभाउ

मस्त आहे. पुभाप्र.

ज्योति अळवणी's picture

3 Jan 2017 - 9:44 pm | ज्योति अळवणी

छान लिहिलं आहे. पुढचा भाग लवकर टाका