।।श्वान खाद्य पुराण।।

केडी's picture
केडी in पाककृती
11 Oct 2016 - 8:08 pm

Image-1

ऑक्टोबर १२, २०१६ पासून असोसिएशन फॉर पेट ओबेसिटी प्रिव्हेंशन (APOP), त्यांच्या दाहाव्या वार्षिक पाळीव प्राणी लठ्ठपणा जागरूकता सर्वेक्षणाची सुरुवात करत आहे. त्यांच्या २०१५ च्या अमेरिकेतल्या सर्वेक्षणानुसार सरासरी ५३.% पाळीव कुत्रे हे अतिस्थूल आहेत तर ५८.% पाळीव मांजरी ह्या त्याच श्रेणीत मोडतात.

त्या निम्मिताने ह्या आणि पुढच्या लेखाचा हा सगळा प्रपंच.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"ते काही नाही, बाबा यंदा आपण कुत्रा पाळायचाच!" इति आमचे चिरंजीव, वय वर्ष ११! गेले कित्येक वर्ष मी हा किल्ला लढवत होतो . मी स्वतः श्वान प्रेमी असूनही, मला माझ्या वडिलांनी कधीही कुत्रा पाळू दिला नाही. त्यांना लहापणी चावलेल्या कुत्र्याच्या भीती पोटी (आणि नंतर ती १२ का १४ इंजेक्शन घ्यावी लागल्यामुळे) कि काय, त्यांना कुत्र्याची प्रचंड भीती मनात बसलेली. मग मी दुधाची तहान ताकावर ह्या उक्ती नुसार आमच्या शाळेत आजूबाजूला असेलेले कुत्र्याची पिल्लं ह्यांना बिस्किटं किंवा आई ची नजर चुकून छोट्या बाटलीतून शाळेत आणलेलं दूध देऊन त्यांच्याशी खेळत असे.

बायकोच्या घरी मात्र त्यांनी लहानपणी पाळलेला गावठी कुत्रा आणि असंख्य मांजरी घरी वास्तव्यास असत, त्यामुळे तिला पाळीव प्राण्यांची चांगलीच सवय होती.

माझा विरोधाचा मुद्दा एकाच होता, फ्लॅट सिस्टिम मध्ये कुत्र्याचे हाल होतात, त्यांना मोकळी जागा लागते. पण सरते शेवटी, माझ्या लक्षात आलं, कि कुठेतरी ह्या बाबतीत मी माझ्या वडिलांच्या वळणावर चाललोय, मुलगा अजून २ ते ३ वर्षात शाळा कॉलेज मध्ये बिझी होईल, आणि हि एक त्याची इच्छा आपल्या सारखीच अपूर्ण राहील! मग बराच काथ्याकूट करून, त्याच्याकडून "मी त्याच सगळं करीन" हि पोकळ वचनं घेऊन शेवटी एकदाचा मी हिरवा कंदील दिला. यथावकाश बायको आणि मुलाने ओळखीत विचारून, इतर श्वानप्रेमींची भेट घेऊन शेवटी एका ब्रीडर कडून ४५ दिवसांचे लॅब्रेडोर पिल्लु घरी आणले.

हा आमचा बोल्ट, घरी आणला तेव्हा.

Bolt1 Bolt2

ब्रीडर आणि बोल्टच्या व्हेट (पशुवैद्य) च्या सल्ल्या नुसार त्याला आम्ही बाजारू जेवण (कमर्शियल डॉग फूड) द्यायला लागलो. त्याच्या जेवणात कॅल्शियम आणि व्हायटॅमिन ड्रॉप्स टाकून दिवसातून ४ वेळेला एक छोटी वाटी डॉग फूड त्याचे फीडिंग होऊ लागले.

हे सुरु असताना लॅब बद्दल आंतरजालावर भरपूर वाचून काढले. आता पर्येंत बघितलेले सगळे लॅब हे अतिशय थुलथुलीत, स्थूल असे बघितल्यामुळे ह्या बद्दल आपल्याला काय करता येईल हा विचार मनात आला, आणि इथून पुढे जे कळले, समजले आणि नंतर स्वतः करून पहिले ते इथे मांडतोय. अर्थातच ह्यात मी नवखा असल्याने, इतरांनकडून त्यांचे अनुभव नक्कीच वाचायला अथवा ऐकायला आवडतील.

तर वाचताना रोख हा जास्ती करून कुत्र्याला काय खायला घालावे, काय घालू नये ह्यावर होता. ह्या सगळ्या मधून एकच गोष्ट प्रखर्षाने जाणवली ती म्हणजे आपण जे "उत्तम" प्रतीचे डॉग फूड त्याला देतोय, हेच आपल्या श्वानाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहे!

हे नीट खोलवर समजून घेण्यासाठी, आपल्याला थोडं मागे जाऊन, कुत्र्याची वंशवेल जरा बघावी लागेल. कुत्रा हा खरा तर लांडग्या च्या नात्यातला. डीनए परीक्षणानुसार सध्याचा कुत्रा हा पूर्वीच्या ग्रे वूल्फ (लांडगा) आणि लोप झालेल्या तयमर वूल्फ ह्यांचा वंशज आहे.

[फोटो आंतरजालावरून साभार]
Image4

मग ह्या लांडग्यांचा आहार असतो तरी काय?
जंगली कुत्री, किंवा लांडगे हे लहान प्राणी, पक्षी, उंदीर पकडून मारून खातात. शरीराला लागणाऱ्या इतर खनिज आणि व्हिटॅमिन ची कमतरता ते इतर प्राण्यांची विष्ठा खाऊन पूर्ण करतात. हे सगळे ते कसे पचवतात ह्या साठी थोडी कुत्र्याची शरीर रचना समजून घेऊयात. त्यांची शरीर रचना आणि एकंदर खाण्याच्या पद्धती समजावून घेतल्या कि मग त्यांना योग्य आहार काय, आणि कसा द्यावा हे आपल्याला जाणून घेता येईल.

इतर मांसभक्षी प्राण्यांप्रमाणे कुत्र्यांचे आतडे हे आकाराने लहान असते. मात्र आतड्यांमध्ये रसायन मात्र अतिशय जहाल असते, जेणेकरून हे मांसभक्षी प्राणी अगदी सहज मांस, हाडे आणि चरबी पचवू शकतात. छोट्या आतड्यां आणि जहाल रसायनामुळे, कच्च्या मांसात असणारे जंतू (बॅकटेरिया) देखील त्याच्यावर विपरीत परिणाम करू शकत नाहीत. या उलट, तृणभक्षी प्राण्यांचे आतडे हे लांब असते, जेणेकरून खाल्लेला झाडपाला ते नीट पचवू शकतात.

कुत्र्याला कच्चे मांस दिल्यास ते साधारण ८ तासात त्याच्या पचन संस्थे मधून बाहेर पडते, पण त्याच कुत्र्याला तुम्ही धान्य (फूड ग्रेन) सदृश खायला घातले तर मात्र ते पचायला दुप्पट वेळ लागू शकतो आणि हे नक्कीच अपायकारक आहे. एक गैरसमजूत अशी आहे कि कुत्रा हा ओम्निवोर प्राणी आहे, पण हे चुकीचे आहे. अश्या प्राण्यांची शरीर रचना, दातांची ठेवण आतड्यांची लांबी हि वेगळी असते, उदाहरण द्यायचे झाले तर डुक्करं किंवा मनुष्यप्राणी!

आता हि प्राथमिक माहिती मिळाल्यावर आपण आपला मोर्चा डॉग फूड कडे वाळवूयात. "पण मी तर माझ्या कुत्र्याला उत्तम प्रतीचे ऑरगॅनिक फूड देतो? त्याने त्याला फायदाच होतो!"

तुमच्या कुत्र्याला दातांच्या दुर्गंधीचा त्रास, गॅस आहे? त्याच्या शरीराला सारखी खाज सुटते का? त्याला नियमितपणे अंघोळ घालून देखील त्याचा शरीराची दुर्गंधी कमी होत नाहीये का?

ह्या आणि अश्या अनेक तक्रारी जर का तुमच्या पाळीव प्राण्याला असतील, तर नक्कीच ह्या त्रासांचे मूळ कारण त्याला तुम्ही देताय त्या चुकीच्या डॉग फूड मुळे आहे!

मग हे बाजारू डॉग फूड वाईट का?
तुमच्या कुत्र्याला देताय त्या डॉग फूड च्या पिशव/कॅन वरचे घटक पदार्थ नीट वाचून पहा. बहुदा सर्वच डॉग फूड मध्ये आपल्याला धान्य (ग्रेन) वापरलेलं दिसेल. (बहुतेक वेळेला कॉर्न किंवा कॉर्नमील). आधीच बघितलेल्या माहितीनुसार ह्या धान्याचा कुत्र्यांना पोषणाच्या दृष्टीने काहीही उपयोग नसतो, आणि बऱ्याचदा ह्यामुळे त्यांना ऍलर्जी आणि इतर समस्यां होऊ शकतात. ह्या व्यतिरिक्त, त्यात कृत्रिम रंग, मीठ, साखर, प्रिझर्व्हेटिव्ह असे देखील अपायकारक घटक आढळू शकतात. ह्या डॉग फूड चे शेल्फ लाईफ वाढवविण्या करिता ते अति उच्च तापमानाला शिजवले जाते, जेणेकरून त्यातली पोषक मूल्य, व्हिटॅमिन्स आणि एकंदर नुट्रीशनल व्हॅल्यू हि अतिशय कमी होते. ह्या अश्या अतिरिक्त प्रोसेस केलेल्या डॉग फूड मुळे कुत्र्यांच्या आतड्यांवर अतिरिक्त ताण पडतो आणि ते आजारला बळी पडतात.

ह्या डॉग फूड ची तुलना आपण खाणाऱ्या फास्ट फूड शी करू शकतो. आपण खातो ते बर्गर पिझ्झा ह्यावर आपण जगू शकतोच कि, पण आपण ते नित्यनियमाने खाल्लं तर त्याचे परिणाम आपल्याला माहिती आहेतच! तसे पहिले तर रस्त्यावरची भटकी कुत्री हे काहीही खाऊन जगतातच, पण तुम्ही एखाद्या पाळीव प्राण्याची जवाबदारी जेव्हा घेता, तेव्हा तो प्राणी घरचा एक सदस्य होऊन जातो, आणि त्या मुक्या प्राण्याची चांगली काळजी घेणे हे आपले कर्तव्य होते.

अहो पण आमचा कुत्रा आणि इतर अनेक पाळीव प्राणी आता इतकी वर्ष खातायत कि हे?
डॉक्टर इयान बिलिंगहर्स्ट हे ऑस्ट्रेलियातले नामांकित पशुवैद्य आहेत. ह्यावर त्यांनी अनेक माहितीपूर्ण पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या संशोधनानुसार पाळीव प्राण्यांना आपण गेल्या ७० वर्षांपासून हे डॉग फूड देत आलोय. त्यांच्या मते, हा काळ कुत्र्यांना ह्या प्रोसेस केलेल्या फूडशी जुळवून घायला पुरेसा नाही. त्यांनी BARF (बोन्स अँड रॉ फूड) अश्या एका डाएट वर जास्ती भर द्या असं सुचवलंय. ह्यात पाळीव कुत्र्याला जास्तीत जास्त नैसर्गिक अन्न कसे देता येईल ह्यावर भर दिला आहे. त्यांच्या मते पाळीव प्राण्यांना शक्यतो कच्च मांस आणि हाडे द्या, आणि कर्बोदकांपासून शक्यतो त्यांना दूर ठेवा.

मग नक्की आपल्याला पाळीव प्राण्याला द्यायचा तरी काय?
जर का पाळीव प्राण्यांना द्यायचा आदर्श (आयडीयल) डाएट चा विचार केला, तर त्यात खालील प्रमुख घटक यायला हवेत.
१. अधिक प्रमाणात आणि उच्च प्रतीचे कच्चे मांस
२. थोड्याश्या प्रमाणात चरबी
३. थोड्या प्रमाणात कापलेल्या ताज्या भाज्या किंवा फळं (जंगलातल्या भक्षाच्या पोटातले अन्नाची नक्कल)

पाळीव प्राण्याचा एक संतुलित आहार म्हणजे साधारणपणे ७५% टक्के मांस [ह्यात मसल आणि इतर अवव्यव (ज्याला आपण डार्क मीट म्हणतो) आणि हाडे] तर २५% ताज्या भाज्या आणि फळे इत्यादी.

एक लक्षात घ्या, हा सगळं संतुलित आहार आपण आपल्या पाळीव प्राण्याला एखाद्या बाजारू डॉग फूड मधून देऊ शकत नाही. (अश्या प्रकारचे पेट फूड जर का घायचे झाले तर त्याची किंमत हि सध्याच्या पेट फूड पेक्षा किमान तिप्पट किंवा चौपट असेल (अर्थातच ती कोणाला परवडणारी नसेल). म्हणूनच मग ह्या सगळ्या कंपन्या इतर अनावश्यक पदार्थ वापरून, आकर्षक मार्केटिंग करून हे त्यातल्या त्यात परवडणारे डॉग फूड आपल्या माथी मारत असतात, आणि आपण त्याला बळी पडतोय.

आता थोडं आपण निरोगी किंवा फिट पाळीव प्राणी किंवा श्वान म्हणजे नक्की काय हे बघू. निरोगी, ह्याचा रोख इथे त्याच्या आकारमान ह्या बद्दल आहे. हा खाली दिलेला तख्ता पाहिला कि तुम्हाला साधारण अंदाज बांधता येतील कि आपल्या कुत्र्याचे वजन हे योग्य आहे कि नाही. [इतर निरोगीपणाची लक्षणे वर आधीच नमूद केलेली आहेत, दातांची दुर्गंधी, गॅस इत्यादी).

[फोटो आंतरजालावरून साभार]
image6
व्यवस्थित आहाराच्या जोडीला पाळीव प्राण्यांना नियमित व्यायाम हा देखील हवाच. सकाळ संध्याकाळ त्याला फिरवून आणणे, थोडे फार पळवणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

बरं आता हे सगळं समजलं, पण मग कुत्र्याला द्यायचा तरी काय?

ह्या बद्दल, मी पुढच्या भागात सविस्तर पाककृती देणार आहे. घरच्याघरी तुम्ही पौष्टिक आणि बाजारात उपलब्ध असलेल्या डॉग फूड पेक्षा किफायतशीर फूड कसे बनवू शकता, त्यात घातलेले घटक पदार्थ, त्यांचे महत्व आणि होणारे फायदे, ते कसे साठवून ठेवावे, तसेच हे डॉग फूड आपल्या कुत्र्याला कसे, किती द्यावे ह्या बद्दल लिहिणार आहे.

गेले ५ महिने मी आमच्या बोल्टला हि पाककृती करून देतो आहे. त्याचे फायदे अर्थातच आम्हाला सगळ्यांना दिसत आहेत. हा खाली त्याचा सध्याचा फोटो आणि व्हिडिओ.
Bolt1 Bolt2

क्रमश:

प्रतिक्रिया

रातराणी's picture

11 Oct 2016 - 8:29 pm | रातराणी

छान आहे भुभु!

chitraa's picture

11 Oct 2016 - 8:34 pm | chitraa

मांजर सोपे असते संभाळायला

कौतुकास्पद आणि माहितीपर. पुभाप्र.

बोल्टचे फोटो दिसत नाहीयेत. लेख आवडला.

बरोबर लिहिलंय.नवीन चांगला विषय आहे.

चांगलाय लेख.. माहितीपूर्ण.. कॅट फूड बद्दलही अशी माहिती शोधून काढायला हवी आणि पाककृत्या देखील..

शैलेन्द्र's picture

11 Oct 2016 - 10:08 pm | शैलेन्द्र

सुरेख लेख, अजून एक फुकटचा सल्ला देतो, प्रत्येक प्रजाती काही शे वर्ष एखाद्या भागात राहिलेली असते, जसं लॅब हे समुद्रकिनारी वाढलेले श्वान, तर त्यांच्या जेवणात, अगदी हलक्या का होईना पण कच्या माश्यांचा समावेश ठेवावा. बहुदा ते त्या अन्नाला सरावलेले असतात.

माम्लेदारचा पन्खा's picture

11 Oct 2016 - 10:21 pm | माम्लेदारचा पन्खा

बरेचसे विचार पटले या लेखातले.....आमचा बोल्ट कधी येतोय देव जाणे...

अजया's picture

12 Oct 2016 - 4:15 pm | अजया

माहितीपूर्ण लेख.

प्रयोगिका's picture

15 Oct 2016 - 12:26 pm | प्रयोगिका

लवकर नवीन रेसिपीस टाका. कुत्र्याणा पण तेच तेच खाऊन कंटाळा येत असेल. आमचे भू भू सध्या मुगाची खिचडी, pedigree che dog food, पोलि आवडीने खाते आहे. पण त्याला अजुन nutritious food द्यायला हवे.
नविन रेचिपेस च्या प्रतिक्शेत !!

संदीप डांगे's picture

21 Oct 2016 - 12:41 am | संदीप डांगे

आमची मार्गी घासफुस खाते आणि स्लिम ट्रिम आहे, तरी तुमचे सर्व मुद्दे पटले, रेसिपीची वाट बघतोय

जीवनयात्री's picture

13 Feb 2017 - 1:55 pm | जीवनयात्री

माहितीपूर्ण लेख. लवकर नवीन रेसिपीस टाका. रेसिपीची वाट बघतोय...