आम्ही व्ही एस एल वाले

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
9 Jan 2016 - 8:39 am

आम्ही व्ही एस एल वाले
मी गेली २ वर्षे मिपा चा वाचक आहे.पण लिहितो पहिल्यांदाच आहे. काही चुकलं तर सांभाळून घ्या.
शीर्षकातून काही बोध झाला नसल्यास उलगडून सांगतो.व्ही एस एल म्हणजे Visual spatial Learner (याला मराठीत काय म्हणतात?)

शिकण्याच्या ३ शैली आहेत.

कोणतीही व्यक्ती एखादी गोष्ट शिकताना खालील ३ पैकी एका शैलीद्वारे शिकत असते.

व्हिज्युअल स्पेशिअल: यांना कोणत्याही संकल्पनेचं,माहितीचं आकलन द्रुश्य माध्यमाद्वारे सर्वात चांगलं होतं.

ऒडिटरी सिक्वेंन्शिअल: यांना कोणत्याही संकल्पनेचं,माहितीचं आकलन ऎकण्याच्या माध्यमाद्वारे सर्वात चांगलं होतं.

कायनेटीक: यांना कोणत्याही संकल्पनेचं,माहितीचं आकलन ती क्रुती स्वत: करुन पाहिल्यावर सर्वात चांगलं होतं.

मी स्वतः VSL असल्यामुळे त्या संबंधी थोडसं लिहायचा प्रयत्न करतो.

VS शैलीने शिकणा-या लोकांना वाचलेलं,ऎकलेलं समजण्यासाठी ते मनातल्या मनात चित्रात (स्थिर किंवा हलत्या) रूपांतर करावं लागतं(पहावं लागतं) किंवा ते होतं.
खाली दिलेल्या चित्रावरून ते लक्षात येईल.

http://www.nailthatpaper.com/wp-content/uploads/2012/05/Visual-spatial-l...

http://www.visualspatial.org/images/cartoons/phonics.png

अशाच प्रकारे जेव्हा काही सांगायचं,लिहायचं असतं तेव्हाही ते आधी मनात चित्ररुपाने पाहून इतरांना समजण्यासाठी परत शब्दात रूपांतरीत करावं लागतं.

चित्र स्वरूपात असणारं कोणतंही माध्यम जसे की टि.व्ही,संगणक,मोबाईल फोन,कोमिक्स यांचं आवडतं असतं.
यांना चित्रकला,शिल्पकला यात चांगली गती असू शकते.
फोनेटीक भाषेत वाचलेलं यांच्या जास्त लक्षात राहतं.

हे visual sense बद्दल. त्याचबरोबर यांना अवकाशासंबंधीची(स्पेशिअल)चांगली समज असते.त्यामुळे वास्तुरचना,फर्निचरची रचना,त्यांची खोलीतील मांडणी हे यांचे आवडते विषय असतात.थोडक्यात,
शब्दांऐवजी चित्रं हीच त्यांची भाषा असते.

VSL ची ही फक्त तोंडओळख आहे.विस्तारभयाने थोडक्यात लिहितो आहे. जिज्ञासूंनी खालील संकेतस्थळे जरूर पहावीत.

http://www.dyslexia.com/library/silver1.htm

www.visualspatial.org

longleaf.net/wp/wp.../WriteVisual.pdf

मिपावर असे कोणी VSL आहेत का? त्यांना आलेल्या,येणा-या समस्या त्यावर त्यांनी शोधलेले उपाय याबाबत त्यांनी आपले अनुभव जरूर सांगावेत.

थोडसं अवांतरः मिपावर विविध क्षेत्रात काम करणा-या अनेक तज्ञ व्यक्ती आहेत.व्हि म्हणजे काय याचा थोडा अंदाज आला असेल.मी इलेक्ट्रोनिक वस्तू निर्मितीच्या क्षेत्रात काम करतो.तर या नैसर्गिक वरदानाचा इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रात कुठे,कसा उपयोग होऊ शकेल हे कोणी सांगू शकेल का?
भारतात व्हि एस एल चा एखादा फोरम, ग्रुप, व्होटसअप, हाईक ग्रुप आहे का?

जीवनमान

प्रतिक्रिया

"मिपावर विविध क्षेत्रात काम करणा-या अनेक तज्ञ व्यक्ती आहेत."

ह्याबद्दल प्रचंड सहमत...

फारच ओझरतं झालं की हो साहेब.. उत्कंठा वाढीला लावून सोडून देउ नका ही विनंती. इतर साइट वर बघणं त्रासदायक होइल. जमल्यास आपणच थोडं अजून लिहायचा विचार करा...

मार्मिक गोडसे's picture

9 Jan 2016 - 1:02 pm | मार्मिक गोडसे

आपण दिलेल्या लिंकावरून मला फारसे काही कळले नाही. बहुतेक मी VSL असणार.

संदीप डांगे's picture

9 Jan 2016 - 1:24 pm | संदीप डांगे

यांना अवकाशासंबंधीची(स्पेशिअल)चांगली समज असते
>> असे असणारे मिपावर एकमेव आहेत. ;-)

मी पण वीएसएल वाला आहे असं वाटतं... पण शब्दही आवडतात हो खूप.

उपयोजक's picture

9 Jan 2016 - 2:05 pm | उपयोजक

अकौंटंट,डांगे साहेब, मार्मिक आणि मुवि यासंबंधी नक्की लिहिन.

बोका-ए-आझम's picture

9 Jan 2016 - 2:19 pm | बोका-ए-आझम

पण माझ्या समजुतीनुसार माणूस या तिन्ही प्रकारे शिकतो - उदाहरणार्थ लेखन किंवा वर्णन हे VSL, क्रमिक शिक्षण घेताना Auditory Sequential आणि पोहणे किंवा तत्सम खेळ खेळताना Kinetic अशा तिन्ही पद्धती कामाला येतात. पोहायला शिकत असताना instructor ज्या सूचना देतो, त्या आपण करुन पाहतो. म्हणजे दोन पद्धती एकत्र वापरल्या जातात.

आदूबाळ's picture

9 Jan 2016 - 3:13 pm | आदूबाळ

काही समजलं नाही. कृ० आणखी तपशिलात लिहिणे.

आणि तुम्ही म्हणता ती `व्हिज्युअल स्पेशिअल' नाही, पिक्टोरियल मेमरी आहे. तद्वत, तुमची टेक्स्ट्युअल मेमरी वीक आहे, त्याचा ऑडिटरी सिक्वेंन्शिअलशी फारसा संबंध नाही.

ऑडिटरी सिक्वेंन्शिअ मेमरी हा अत्यंत दुर्मिळ प्रकार आहे आणि ती असेल तरच संगीतकार निर्माण होतो किंवा व्यक्तीची सांगितीक प्रगती होऊ शकते.

त्याचप्रमाणे कायनेटीक मेमेरी ही माइंड-बॉडी को-ऑर्डिनेशनशी संबधित आहे आणि ती उत्तम असेल तर स्पोर्ट्समन तयार होतो किंवा निष्णात सर्जन अथवा उत्तम वाद्यवादक तयार होतो. कायनेटीकचा लर्निंगशी संबंध आहे पण एखादे कौशल्य प्रत्यक्ष करून आत्मसात होण्यासाठी पिक्टोरियल आणि काही प्रमाणात ऑडिटरी सिक्वेंन्शिअल स्ट्राँग लागते. उदाहरणार्थ, तेंडूलकर उत्तम बॅटसमन होतो याचं कारण बोलरनं बॉल टाकतांनाच तो नक्की कसा येणार आहे ते त्याला कळतं (पिक्टोरियल मेमरी), त्यासरशी त्याची ऑडिटरी सिक्वेंन्शिअल अ‍ॅक्टीवेट होते (म्हणजे ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, गुगली वगैरे) आणि अक्षरशः क्षणार्धात त्याची कायनेटीक मेमरी सक्रिय होऊन, त्या बरहुकूम शारीरिक हालचाली होऊन तो हवा तिथे आणि हवा तसा बॉल मारू शकतो.

थोडक्यात, तुमची पिक्टोरियल मेमरी चांगली पण टेस्कट्युल मेमरी असावी आणि हे फारसं चांगलं नाही कारण व्यावहारात या दोन्ही मेमरीज सायमल्टेनीयस काम करणं गरजेचं असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयडेंटीफिकेशनसाठी नुसता चेहरा आठवून उपयोग नाही तर नांव पण आठवलं तर स्मृती योग काम करते आहे असं म्हणता येतं.

त्यामुळे तुम्ही पिक्टोरियल बरोबर टेक्स्ट्युअल मेमरी वाढवण्याचा सराव करावा हे उत्तम.

या व्यतीरिक्त गंधस्मृती आणि स्पर्शस्मृती (जी अंध व्यक्तीत अत्यंत प्रगल्भ असते ) अशा दोन फॅकल्टीज आहेत.

व्हिज्युअल स्पेशिअल हा स्मृतीचा किंवा लर्निंगचा भाग नाही ते दृष्टीचं म्युटेशन आहे आणि ते करोडोत एखाद्याचं भाग्य आहे.

विवेक ठाकूर's picture

9 Jan 2016 - 3:29 pm | विवेक ठाकूर

थोडक्यात, तुमची पिक्टोरियल मेमरी चांगली पण टेस्कट्युल मेमरी वीक असावी आणि हे फारसं चांगलं नाही कारण

रोजच्या जगण्यात, ती फॅकल्टी असणार्‍याचं कौशल्य म्हणजे तो निराकारात (स्पेसमधे) आकार पाहू शकतो. उदाहरणार्थ, ताजमहाल निर्माण करणारा यमुनेच्या तीरावर असलेल्या विस्तीर्ण मोकळ्या प्रांगणावर, निर्मितीपूर्वीच ताजमहालची समग्र कल्पना करू शकतो. काही लाख क्युबिक फीटच्या संपूर्ण मोकळ्या स्पेसमधे आर्किटेक्ट अत्यंत देखण्या मॉलची कल्पना प्रत्यक्षात उतरवतो. एखाद्या ओबडधोबड डोंगरात, शिल्पकार वेरूळ सारखं धन्य लेणं साकारु शकतो. थोडक्यात, व्हिज्युअल स्पेशिअल सुद्धा दुर्मिळ क्वालिटी आहे. व्हिज्युअल स्पेशिअलमधे दृष्टीचं म्युटेशन हा अंतीम चरण आहे.

मार्मिक गोडसे's picture

9 Jan 2016 - 6:20 pm | मार्मिक गोडसे

ओरिगामी व बांबूपासून अनेक प्रकारच्या वस्तू बनवणारेही व्हिज्युअल स्पेशिअल मध्येच मोडतात का?

मार्मिक गोडसे's picture

9 Jan 2016 - 4:45 pm | मार्मिक गोडसे

I hear and I forget.
I see and I remember.
I do and I understand.

उपयोजक's picture

9 Jan 2016 - 7:15 pm | उपयोजक

या विषयात उत्सुकता दाखवल्याबद्दल धन्यवाद.विशेषत: श्री विवेक ठाकूर यांचे.वर्कलोड असल्याने अजून कंपनीतच आहे.विस्त्रुत प्रतिक्रिया लवकरच देतो.

कंजूस's picture

9 Jan 2016 - 8:13 pm | कंजूस

सगळेच मोझार्ट ,रेहमान,गायतोंडे का होत नाही याचं हे उत्तर आहे.

पैसा's picture

9 Jan 2016 - 8:28 pm | पैसा

तुम्हाला शाळेतून वगैरे शिकताना काही खास प्रॉब्लेम्स आले होते का? अभिषेक बच्चनला dyslexia असल्याचं वाचलं आहे. तसाच 'तारे जमीन पर' हा विषयावरचा उत्कृष्ट सिनेमा आठवला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2016 - 8:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण लिहित राहा. शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

उपयोजक's picture

11 Jan 2016 - 1:18 pm | उपयोजक

प्रतिसाद द्यायला खूप उशीर झाला;त्याबद्द्ल क्षमस्व.
ज्यांना अजूनही समजलं नसेल त्यांच्यासाठी थोडा अधिक प्रयत्न करतो.जेव्हा आपण स्वत:हून काही शिकतो;किंवा कोणीतरी आपल्याला शिकवतं तेव्हा काहीतरी माहिती आपल्याकडे येते.ही येणारी माहिती लिखित(पुस्तकं,वर्तमानपत्र इ.)स्वरूपात किंवा चित्ररूपात (पुस्तकं,वर्तमानपत्र,संगणक,मोबाईल फोन इ.)किंवा ध्वनीच्या रूपात(बोलणारी व्यक्ती,रेडीओ,फोनवरील संभाषण इ.) आपल्याकडे येते.आता वर तीन शैलींबद्दल सांगितलं आहेच.त्यातील व्हि एस एल बद्दल बोलू.व्हिज्युअल स्पेशिअल लर्नर व्यक्तींच्या बाबतीत जेव्हा एखादी माहिती त्यांच्याकडे येते तेव्हा काय होतं ते पाहू.

उदाहरणार्थ "मुलगा आंबा खातो" ही माहिती VSL ने वाचली/ऎकली तर काय होतं तर कुणीतरी मुलगा हातात आंबा घेऊन खातो आहे असं चित्र कल्पनेत(मनाच्या पडद्यावर)दिसतं.आता हे चित्र स्थिर(Still) किंवा हलतं(Movie) असू शकतं.कुणीतरी मुलगा आंबा खात असतानाची छोटी व्हिडीओ क्लिपच मनाच्या पडद्यावर दिसते.अशाप्रकारे चित्ररूपाने त्या माहितीचं आकलन आणि साठवण होते.
म्हणजेच लिखित किंवा ध्वनीरूपाने येणारी कोणतीही माहिती समजण्यासाठी,स्मरणात ठेवण्यासाठी आधी त्या माहितीचं रुपांतर हे चित्ररूपात व्हावं लागतं;कारण माहिती साठवण्याचा मोड मुळातच चित्रं हा आहे.VSL वाल्यांना त्यांना मिळणारी माहिती स्म्रुतीत साठवण्याआधी अशी चित्रात रूपांतरीत व्हावी/करावी लागते;आणि VSL व्यक्तीच्या मेंदूत हे पटकन होतं;पण ही चित्ररूपात साठवलेली माहिती जेव्हा दुसर्या कुणाला सांगायची/लिहायची वेळ येते तेव्हा ही स्म्रुतीत साठवलेली चित्ररुपातील माहिती परत शब्दांमध्ये रुपांतरीत करावी लागते.म्हणजे मुलगा आंबा खातो या वाक्याचे चित्ररूप परत शब्दांमध्ये करण्यासाठी मुलगा,आंबा आणि खातो हे तीनही शब्द माहित असावे लागतात.म्हणजे कोणत्याही VSL ला त्याच्याकडे आलेली माहिती स्वत:च्या स्मरणात साठवण्यासाठी चित्रभाषा आणि ही माहिती इतरांना सांगण्यासाठी शब्दभाषा अशा दोन्ही भाषा याव्या लागतात.(इथेच त्यांची खरी कसरत होते.)
VSL वाचलेली/ऎकलेली माहिती माहिती चित्ररूपात साठवतो पण;ही चित्र येतात कुठून? तर अगदी लहान असल्यापासून हा चित्रांचा संग्रह VSL च्या मेदूतल्या स्म्रुतीकोषात होत आलेला असतो.(तो प्रकारसुध्दा खुप इंटरेस्टींग आहे.त्याबद्दल परत कधीतरी!)त्याच संग्रहातील चित्रं वापरून त्यांची आभासी व्हिडीओ क्लीप बनवून माहितीचे आदान प्रदान केले जाते.

आता थोडं स्पेशिअल सेन्सबद्दल. विवेक ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे तसा स्पेशिअल सेन्स असणार्‍या व्यक्तीला जी वास्तु उभारायची आहे तीचं चित्र जिथं ती वास्तु उभी करायची आहे त्या मोकळ्या जागेत ती वास्तु कल्पनेने पाहता येते.
अगदी हेच माझ्याबाबतीत होतं. अर्थात शहाजहान, लिओनार्डो द व्हिन्सी यांच्याएवढा जिनियस मी मुळीच नाही.
चौथीत असल्यापासून इमारतींच्या मिनिएचर प्रतिकृती बनवण्याचा मला छंद आहे.आणि हे जे काही मी बनवतो ते सुंदर,उत्कृष्ट असल्याचा अभिप्राय नातेवाईक,मित्र,अनोळखी व्यक्ती यांच्याकडून (अगदी या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीकडूनही) मिळालेला आहे.
सांगण्याचा मुद्दा हा की एखाद्या वास्तुची,गावाची,शहराची मिनिएचर स्वरूपात उभारणी करायच्या आधीच ते कसं दिसेल त्याची एक आभासी प्रतिमा मनात दिसते;आणि त्या मनातल्या प्रतिमेप्रमाणेच त्या वास्तुची प्रत्यक्ष रचना माझ्याकडून केली जाते.
ही टाऊन प्लेनिंगची क्षमता चांगल्या स्पेशिअल सेन्समुळेच येते;आणि हा दुर्मिळ नाही बर्याचश्या चांगल्या आर्किटेक्टकडे तो असतो.

पैसा यांना - हो हा Dyslexia चाच प्रकार असावासं वाटतयं; पण मला तारे जमीं पर मधल्या ईशान सारखं आकडे उलट सुलट दिसणं,बुटाच्या नाड्या बांधताना गोंधळणं,क्रिकेट खेळताना बोल आपल्याकडे येताना त्याचा अंदाज न येणं असा काही प्रकार घडला नाही. शाळेत शिकताना काही फार समस्या आल्या नाहीत मात्र डिप्लोमा करताना मार्कांच्या घसरणीचा शोध घेताना याबद्दल आंतरजालावर माहिती मिळाली;आणि या समस्येची जाणीव झाली.आंतरजालावर ही Learning Style असल्याचे समजले म्हणून तशी संज्ञा वापरली आहे.

विवेक ठाकूर यांनी दिलेल्या माहितीबद्दल खरंच धन्यवाद.पण माझ्याबाबतीत टेक्सट्युअल मेमरीचं कामसुध्दा ही पिक्टोरियल मेमरी करत असावी.कारण एखाद्या व्यक्तीचं नाव सुध्दा छापल्यासारखं मला मनाच्या पडद्यावर दिसतं.त्यामुळे व्यक्तीचं नाव आठवताना मला प्रोब्लेम येत नाही.लिहीलेलं/छापलेलं नाव हे सुध्दा एक व्हिज्युअल रिप्रेझेंटेशनचं नाही का?

ही अशीच समस्या(की वरदान!)असणार्या बर्याच व्यक्ती जगात आहेत.काही जणांना त्याची जाणीव होते.काहींना नाही होत.
या समस्येची(कि वेगळेपणाची?)जाणीव लहान वयातच झाली,त्यावर योग्य उपाय केले गेले,प्रोत्साहन आणि या वरदानाला योग्य असा वाव मिळाला तर गायतोंडे,मोझार्ट,रेहमान निर्माण व्हायला काहीच हरकत नाही.
अशाच शब्द,वाक्यांश,वाक्य मनाच्या पडद्यावर चित्रपटाच्या रूपात दिसणार्या एका व्यक्तीबद्दल इथे सांगावसं वाटतं.त्यांच नाव आहे टेंपल ग्रान्डिन.
त्यांनी अमेरिकेत यासंबंधी भरपुर कार्य केलं आहे.स्वत: टेंपल ग्रान्डिन यांनी आपल्या या समस्येबद्दल तसेच स्वमग्नता(Autism)या विषयावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत.

https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://en.m.wiki...

त्यापैकी 'Thinking in pictures' या पुस्तकातून त्यांनी आपल्या या चित्ररूपात माहिती साठवण्याबद्दलचा संपुर्ण प्रवास खुप छान मांडला आहे
ज्यांना हा विषय अजूनही समजला नसेल आणि उत्सुकता असेल त्यांनी थिंकींग इन पिक्चर्स नक्की वाचावं
www.nazarenemedia.net/uploads/8/1/0/5/8105580/temple_grandin-_thinking_i...

शेवटी एक सांगावसं वाटतं कि कोणताही व्हिज्युअल लर्नर हा स्वत:ची न बदलता येणारी चित्रभाषा घेऊन शब्दरुपी जगात वावरत(की लढत?) असतो.

विवेक ठाकूर's picture

11 Jan 2016 - 4:09 pm | विवेक ठाकूर

कोणताही व्हिज्युअल लर्नर हा स्वत:ची न बदलता येणारी चित्रभाषा घेऊन शब्दरुपी जगात वावरत(की लढत?) असतो.

तुम्ही जे वर्णन केलंय त्याला फोटोजेनिक मेमरी म्हणतात. कारण तुम्ही लिहीलंय की :

माझ्याबाबतीत टेक्सट्युअल मेमरीचं कामसुध्दा ही पिक्टोरियल मेमरी करत असावी.कारण एखाद्या व्यक्तीचं नाव सुध्दा छापल्यासारखं मला मनाच्या पडद्यावर दिसतं.त्यामुळे व्यक्तीचं नाव आठवताना मला प्रोब्लेम येत नाही.लिहीलेलं/छापलेलं नाव हे सुध्दा एक व्हिज्युअल रिप्रेझेंटेशनचं नाही का?

अगदी मान्य. सामान्य व्यक्तीला टेक्स्ट्युअल मेमरी ध्वनीरुपात ऐकू येते. पण तुम्हाला चक्क दिसत असेल तर यू आर ब्लेस्ड कारण ऐकू येण्यापेक्षा दिसणं जास्त प्रभावी आणि भरोश्याचं आहे. त्यामुळे तुमचा प्रश्न फक्त संभाषणातल्या टाइम-लॅगचा आहे.

यावर एक सोपा उपाय सुचवतो. तुम्ही समोरच्याच्या चेहर्‍याकडे पाहून बोलण्याऐवजी तुम्हाला दिसणार्‍या टेक्स्टकडे पाहून बोला. लोकांना ते थोडं अणखर वाटेल (कारण बोलणार्‍यात दृष्टीदोष आहे असं वाटतं), पण त्यानं काहीएक फरक पडत नाही. तुमचा प्रश्न मात्र कायमचा सुटेल. सो, एंजॉय योर युनिक फॅकल्टी. तुमच्या लर्निंग स्कील्समधे काहीही प्रॉब्लम नाही तस्मात कोणताही उपाय शोधू नका. मजेत जगा.

उपयोजक's picture

11 Jan 2016 - 6:49 pm | उपयोजक

ठाकूर साहेब उपायाबद्द्ल धन्यवाद!
विवेक ठाकूर आणि असंका स्म्रुतीसंचयनात येणार्या समस्यांबद्द्ल नक्की लेख लिहिन;पण ते थिंकींग इन पिक्चर्स जरुर वाचा.

आणि सांगितलेल्या उपायाचा काय उपयोग झाला ते पण लिहा.

उपयोजक's picture

12 Jan 2016 - 1:14 pm | उपयोजक

उपयोग होतोय.स्मरणसाठा वाढतो या उपायाने.

विवेक ठाकूर's picture

13 Jan 2016 - 9:56 am | विवेक ठाकूर

चालू ठेवा.

कळल्यासारखं वाटतंय..पण अजून काही उदाहरणं दिलीत तर बेष्ट होइल. किंवा सरळ एक नवीन लेख लिहा..?

मन हा इतका व्यापक विषय आहे की त्यावर लेख लिहीण्यापेक्षा प्रश्नाची सोडवणूक उपयोगी ठरते.

उपयोजक's picture

11 Jan 2016 - 6:56 pm | उपयोजक

मन हा इतका व्यापक विषय आहे की त्यावर लेख लिहीण्यापेक्षा प्रश्नाची सोडवणूक उपयोगी ठरते.
+++१

वरच्या प्रतिसादात तेच तेच परत कॉपी पेस्ट झालंय का?