बेळ्ळी

ऊध्दव गावंडे's picture
ऊध्दव गावंडे in दिवाळी अंक
29 Oct 2015 - 11:51 pm

.
.
जोळी डंगर्‍या बैलाची
झालं कचूमचू गाळं
वाटं उतरेलं चाकं
असे जिंदगी चे हालं

जो येते तो बोलूनचं
निर्‍हा गामनं ठेवते
होनं जानं काई नाई
फक्त चकोन्या दाखोते

कायं कोनाच्या पोटातं
नाई होटावरं दिसे
जातो भरळल्या आमी
दाने जात्यातले जसे

कई फुटीलं भोपया
निंगतीलं ह्या झापळा
भिता सारोल्या जातीलं
कई खचूनं पोपळा

आमी बापा साधे सुधे
नाई समजतं कावा
नोका चितं पाऊ आता
बेळ्ळी लागली रे बावा
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

मितान's picture

11 Nov 2015 - 7:37 am | मितान

यातले बोली भाषेतले अर्थ सांगाल का प्लीज ?
वाचायला गोड वाटतंय पण बरेच शब्द समजेनात :(

ऊध्दव गावंडे's picture

11 Nov 2015 - 1:42 pm | ऊध्दव गावंडे

बेळ्ळी- बैलगाडी ला बैल जुंपतांना त्याच्या गळ्या खालुन बांधलेला पट्टा जेव्हा बैलगाडीच्या मागील भागात पुढील भागा पेक्षा अति जास्त ओझे होते तेव्हा बैलाचा गळा त्या पट्ट्या (बेळ्ळी ने)आवळल्या जातो याला बेळ्ळी लागणे असे म्हणतात
डंगर्या - म्हाताऱ्या
वाटं-बैलगाडी च्या चाकाभोवती असलेली लोखंडी पट्टी ती ढिली होणे म्हणजे वाट उतरणे परिणाम चाक मोडणे
चकोन्या- चकवणे
पोपळा- मातीच्या भिंतीवर कालांतराने धरनारा थर पोपडा

व्वा ! आता पूर्ण कविता समजली. आवडली. लिहीत रहा :)

पैसा's picture

11 Nov 2015 - 1:46 pm | पैसा

बेळ्ळी शब्दाचा अर्थ माहीत नसल्याने गाडी अडली होती. आता नीट समजली! कविता छान आहे. लिहीत रहा.

प्रतीकात्मक काव्य आवडले!

आनंद कांबीकर's picture

11 Nov 2015 - 2:29 pm | आनंद कांबीकर

आवडली

मधुरा देशपांडे's picture

11 Nov 2015 - 2:29 pm | मधुरा देशपांडे

मस्त.

अजया's picture

11 Nov 2015 - 4:22 pm | अजया

वा! आवडली कविता.

नीलकांत's picture

11 Nov 2015 - 4:25 pm | नीलकांत

कविता एकदम आवळ्ळी राजेहो... असंच साजरं लिवत रा...

यशोधरा's picture

11 Nov 2015 - 6:45 pm | यशोधरा

सुरेख कविता..

नूतन सावंत's picture

12 Nov 2015 - 5:35 pm | नूतन सावंत

कविता आवडली.शेतकऱ्यांच्या दुःखाचा प्रत्यय देणारी कविता.असेच लिहित रहा.

ऊध्दव गावंडे's picture

12 Nov 2015 - 8:28 pm | ऊध्दव गावंडे

मिपाकरांचा अत्यंत आभारी आहे. आपण च प्रोत्साहन दिले आपणां मुळेच दिवाळी अंकात समाविष्ट होऊ शकलो. दिवाळी अंकाचे संपादक,रसिक मित्रांनो धन्यवाद!

नीलकांतजी, धन्यवाद !

चांदणे संदीप's picture

26 Nov 2015 - 1:39 pm | चांदणे संदीप

सुरेख कविता! काय बोलीभाषेतल्या साध्या शब्दांनी मनाचा ठाव घेतला राव!

धन्यवाद,
Sandy

नीलमोहर's picture

26 Nov 2015 - 2:21 pm | नीलमोहर

भाषा खूप छान वाटतेय,
समजायला थोडी कठिण मात्र आशयपूर्ण कविता.

राही's picture

26 Nov 2015 - 3:27 pm | राही

सुंदरच आहे कविता.
कुठल्या जिल्ह्याची/पट्ट्याची बोली म्हणायची ही?

कंजूस's picture

26 Nov 2015 - 3:40 pm | कंजूस

कुणीकडची भाषा म्हणायची?

वास्तववादी , मनाला भिड़नारी कविता खुप काही बोलून गेली लिहित रहा :)

रातराणी's picture

26 Nov 2015 - 8:38 pm | रातराणी

सुरेख!