ll गंगास्मरण ll

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
26 Sep 2015 - 1:11 am

सप्टेंबर महिन्यातला शेवटचा शनिवार हा जगभरात 'सरिता दिन' म्हणून साजरा केला जातो.
(जगभरातील नद्यांचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहेच.) पण आजच्या दिवशी, परमपावन मानल्या गेलेल्या गंगेचे, तिच्या नितळ स्वरूपात केलेले स्मरण समयोचित ठरावे!

तू कावेरी तूच नर्मदा, गोदा भद्रा सरस्वती
तुझीच सारी अनंत रूपे, कृष्णा पद्मा शरावती

तू कल्याणी, नीरदायिनी
तुलाच नमितो सांबसदाशिव,
हरहर गंगे तुलाच स्मरती
भगिरथाचे पुत्र चिरंजीव

प्रकटयोगिनी बिकटगामिनी
तुझ्या तटाचे कडे निसरडे….
कितीक आले गेले भुलले
तुझ्या किनारी शांत निमाले

प्रयागसंगम अलख निरंजन
तुझ्यात फिरते चक्र चिरंतन
विशालसुंदर तरल निरंतर
तुझ्यात विरते माझे अंतर

पुण्यसलिला, मुक्ता माता
ये वेगे, जा घेऊन मजला
तव तीर्थाचा एक दिलासा,
जीवास थकल्या तोच विसावा

तू कावेरी, तूच नर्मदा........................

1

"Ganga Aarti at Varanasi ghats" by http://www.flickr.com/photos/u-suke/ - http://www.flickr.com/photos/u-suke/3156784664/. Licensed under CC BY 2.0 via Commons - https://commons.wikimedia.org/wiki/File:Ganga_Aarti_at_Varanasi_ghats.jp...
(छायाचित्र विकि वरून साभार)

कविता माझीभावकवितासांत्वनाकरुणमांडणीवावरसंस्कृतीइतिहासवाङ्मयकवितामुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमानराहणीप्रवासभूगोल

प्रतिक्रिया

शिव कन्या's picture

26 Sep 2015 - 1:21 am | शिव कन्या

संपा मंडळास विनंती..... जमल्यास या गंगेला साजेसा फोटो लावावा. माझ्याकडे स्वतःच्या संग्रहातील आहे. पण तांत्रिक अडचणीमुळे जमत नाहीये.

बहुगुणी's picture

26 Sep 2015 - 6:00 am | बहुगुणी

व्यनि पाठवला आहे

शिव कन्या's picture

26 Sep 2015 - 9:47 am | शिव कन्या

पाहिला.

शिव कन्या's picture

2 Oct 2015 - 4:56 pm | शिव कन्या

संपादक मंडळाचे आभार.

बहुगुणी's picture

26 Sep 2015 - 5:59 am | बहुगुणी

प्रकटयोगिनी बिकटगामिनी
तुझ्या तटाचे कडे निसरडे….
कितीक आले गेले भुलले
तुझ्या किनारी शांत निमाले
प्रयागसंगम अलख निरंजन
तुझ्यात फिरते चक्र चिरंतन
विशालसुंदर तरल निरंतर
तुझ्यात विरते माझे अंतर

यातला ताल सुंदर!

मांत्रिक's picture

26 Sep 2015 - 7:35 am | मांत्रिक

सुंदर, अप्रतिम!!! लय तर झक्कासच आहे!!!
बाकी कविता गंगाजलाइतकीच पवित्र!!!

चांदणे संदीप's picture

26 Sep 2015 - 7:47 am | चांदणे संदीप

वा! खूपच आवडली!
सकाळी सकाळी छान वाचायला दिलत त्याबद्दल धन्यवाद! :)

एस's picture

26 Sep 2015 - 11:18 am | एस

फारच छान लिहिलंत!

नदी ह्या विषयावर एकच गाणं स्मरणात लख्ख राहिलं आहे, ते म्हणजे

'संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुखदु:खांची जाणीव तिजला नाही!'

नदीला एकीकडे 'माता' म्हणायचं, आणि तिच्यातच सर्व प्रदूषण लोटून द्यायचं असा तर आपला दांभिकपणा!

आपला दांभिकपणा हा काय वर्णावा! घाण त्यातच करतो, ज्याची पूजा करतो. घाणच करायची तर किमान माता, देवी म्हणू नये. पूजा करू नये. पण तसे होत नाही.
बरे, कुठल्या निसर्गाच्या घटकाकडे निव्वळ शास्त्र शुद्ध नजरेने पहावे, त्या नुसार प्रदूषण टाळावे, हे हि आपणास जमत नाही.
पलायनवादी लेखन म्हणजे ही कविता, हे मी या कवितेपुरते तरी मान्य करते.
वाचत असल्याबद्दल धन्यवाद.

प्रचेतस's picture

26 Sep 2015 - 11:34 am | प्रचेतस

अतिशय सुंदर

इमं में गंगे यमुने सरस्वति शुतुद्रि स्तोमै सचता परूष्ण्या।
असिवक्न्या मरूद्वृधे वितस्तयार्जीकीये श्रणुह्या सुषोमया

शिव कन्या's picture

26 Sep 2015 - 4:18 pm | शिव कन्या

:-) अहंम संस्कृतम नैव जानामि!
वरील श्लोक मराठीत केला तर वाचायला आवडेल.
वाचत असल्याबद्दल धन्यवाद.

ऋग्वेदातल्या १० व्या मंडलात असलेले हे सरितास्तोत्र आहे.

गंगे, यमुने, सरस्वती, शतुद्रि, परुष्णी, मरुतवृद्धे, असिक्नी, आर्जिकिया, वितस्ता आणि सुसोम ऐका, माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करा.

यातली शतुद्रि म्हणजे सतलज, परुष्णी म्हणजे रावी, असिक्नी म्हणजे चिनाब, वितस्ता म्हणजे झेलम, सुसाम म्हणजे सोहम.

शिव कन्या's picture

26 Sep 2015 - 10:53 pm | शिव कन्या

सुंदर ! म्हैती नव्हती ही नावं!
आभार.

एक एकटा एकटाच's picture

26 Sep 2015 - 11:39 am | एक एकटा एकटाच

वाह!!!!!!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Sep 2015 - 11:47 am | ज्ञानोबाचे पैजार

फारच सुरेख अतिशय आवडले गंगागीत
त्यातली लयबद्धता आणि गेयता फारच आवडली

पैजारबुवा,

शिव कन्या's picture

26 Sep 2015 - 4:21 pm | शिव कन्या

होय, नदीच्या कवितेला ताल, लय पाहिजेच कि! तर ती नदी शब्द होऊन समोर वाहते.
वाचत असल्याबद्दल धन्यवाद.

विवेकपटाईत's picture

26 Sep 2015 - 9:31 pm | विवेकपटाईत

सुंदर काव्य. प्रदूषण हे गेल्या १०० किंवा गेल्या 3० एक वर्षातच जास्त झाले आहे. सन १९८०च्या आधी मी दिल्लीत यमुनेत कित्येकदा अंघोळ केली असेल, पण आज पाण्याला स्पर्श करण्याची हिम्मत हि होत नाही.

यशोधरा's picture

26 Sep 2015 - 10:35 pm | यशोधरा

सुरेख लिहिलेय. खूप आवडले.

शिव कन्या's picture

26 Sep 2015 - 11:00 pm | शिव कन्या

यशोधरा... तुमचा गंगेचा धागा अतिसुंदर! इकडे पेष्टा कि!

शिव कन्या's picture

26 Sep 2015 - 11:01 pm | शिव कन्या

यशोधरा... तुमचा गंगेचा धागा अतिसुंदर! इकडे पेष्टा कि!

शिव कन्या's picture

26 Sep 2015 - 11:01 pm | शिव कन्या

यशोधरा... तुमचा गंगेचा धागा अतिसुंदर! इकडे पेष्टा कि!

पद्मावति's picture

26 Sep 2015 - 11:46 pm | पद्मावति

फार सुंदर. सुरेख कविता रचलीत.
चाल लावली तर अजुन किती छान वाटेल.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Sep 2015 - 5:03 am | अत्रुप्त आत्मा

__/\__

प्राची अश्विनी's picture

27 Sep 2015 - 7:36 am | प्राची अश्विनी

वा! लय ताल न प्रवाही!

पैसा's picture

27 Sep 2015 - 4:15 pm | पैसा

सुरेख लिहिलंय!

मनीषा's picture

29 Sep 2015 - 1:38 pm | मनीषा

सुंदर कविता.

काही वर्षांपूर्वी हरिद्वार येथे झालेले गंगादर्शन अजून स्मरणात आहे.

स्वतःची ७ पोरं नदीत टाकलेल्या बाईला का मान द्यायचा ?

--- नोकरी करून माहेरी पगार देण्यात अडथळा होतो म्हणून अ‍ॅबॉर्शन करून मूल टाकलेल्या आधुनिक गंगामैय्याचा शंतनूराजा !

शिव कन्या's picture

1 Oct 2015 - 9:44 pm | शिव कन्या

हितं बाई कुठून आली?

dadadarekar's picture

2 Oct 2015 - 3:58 pm | dadadarekar

गंगानदीमैय्याने महाभार्तात शंतनूशी विवाह केला व नंतर स्वतःची सात मुले नदीत सोडून दिली.

शेवटी आठव्या वेळेला शंतनू बिचारा रडला व मैय्याने तो पुत्र जिवंत ठेवला. तो म्हणजे भीष्म

स्वतःच्या प्रवाहात गंगेने आपली अपत्ये सोडली हे माहिती आहे म्हणजे का सोडली हेही वाचलं असेलच की. अगदी हल्लीच्या मिडियासारखं वागून र्‍हायले राव तुम्ही, सोयीचं तेवढं बोलता, आणि पूर्ण तर नाहीच बोलत. असो.

dadadarekar's picture

2 Oct 2015 - 5:47 pm | dadadarekar

पण असली फडतूस कारणं मान्य कराअची तर खुनी लोकानाही सोडून द्यावे लागेल.

तुमच्या दौदला आत्तापरेंत सोडलेत तसे?

dadadarekar's picture

2 Oct 2015 - 6:21 pm | dadadarekar

गंगा आमची नाही

हे आम्ही म्हटले की

दाउद आमचा झाला का ?

तुम्हीच नेहमी म्हणता तसे ना. :) असो. गंगेसारखा चांगला धागा वाया जायला नको.

शिव कन्या's picture

2 Oct 2015 - 5:49 pm | शिव कन्या

गंगा-शंतनू-भीष्म ही चावून चोथा झालेली बाळबोध कथा कुणाला माहित नाही?

शंतनूचे इतकेच पुत्रप्रेम होते तर, एकापाठोपाठ एक सात पुत्रांचा वियोग मुकाट्याने पाहायचाच नव्हता. थांबवायचे पहिल्या पुत्रापाशीच! पण थांबवले, तर गंगा निघून जाणार ही भीती. बिचारा शंतनू! बरे, विवाहापूर्वी गंगेने घातलेली अटही मान्य करून बसला होता. स्त्रीपाश आणि अपत्यप्रेम या दुहीत अडकलेला राजा! गंगेला मानवरूपात गृहीत धरले तर ती नक्कीच शंतनूपेक्षा वेगळ्या ज्ञातिकुळातील!स्वतःच्या अटींवर एखाद्या राजाशी लग्न करण्या इतपत आत्मविश्वास असलेली! तिचे पुत्र तिने स्वतःच्या प्रवाहात सोडले म्हणजे, स्वतःच्या ज्ञातिकुळात, माहेरी पाठवून दिले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिला तिच्या मुलांचे काय होते, ते नक्की माहित असणार! प्रश्न शंतनूचा! पुढे राज्याला वारस नाही, आणि गंगा तर पुत्र ठेवत नाही! म्हणून रडला शेवटी! तिनेही पुत्र दिला, आणि कुठल्याही वैभवाचा लोभ न धरता, अटीनुसार निघूनही गेली! कुठे काय ..... पुढे काही माहित नाही! कि स्वतःच्या प्रवाहात, कि माहेरी, कि अरण्यात राहून भीष्माला पहात राहिली, भेटत राहिली .. ........ अनेक शक्यता! जाणकारांनी आणखी प्रकाश टाकावा.

पुराणातील कथा अनेक बाजूंनी पाहता येतात ! ज्याची जशी दृष्टी, तशी तो पाहणार!
अशा बाईला मान का द्यायचा..... म्हणून आपण आपले कोतेपण मांडणार? कि आपल्या अभ्यास, विचारांची व्याप्ती वाढवून बघणार? हा ही परत ज्याच्या त्याच्या कुवतीचा, मनोवृत्तीचा प्रश्न!

आपल्या प्रतिसादाने लिहिते केले. धन्यवाद दादा!

मांत्रिक's picture

2 Oct 2015 - 6:24 pm | मांत्रिक

वाह सुंदर स्पष्टीकरण!

होबासराव's picture

8 Oct 2015 - 3:41 pm | होबासराव

पण बाटग्याने मांडायचा तो उच्छाद मांडलाच ह्याही धाग्यावर. मला त्याला सांगाव वाटतय कि " तु गेलायस ना एकदचा हिंदु धर्म सोडुन ! तर मग नको इतकी चिंता करुस आमचि किंवा आमच्या धर्माचि. आम्हि ज्या धर्माचे आहोत तो काळानुसार आपल्यात बदल घडवतो, अयोग्य अशा गोष्टि त्याजतो आणि नविन चांगल्या गोष्टि अनुसरतो. you keep continue following the medieval or stone age rituals रानटि. शेख अपनि देख"

हिंदु हा फक्त धर्म नसुन ति एक जिवन पध्दति आहे असे मानणारा
सचिन कुळकर्णि उर्फ होबासराव

मी इथे फक्त हे लिहिले / व्यक्त केले तर तुमचे पोट का दुखते ?

तुमच्या नदीची तुम्ही आनंदाने पुजा करा.