एक -प्रेक्षणीय- पहेली लीला

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
10 Apr 2015 - 3:11 pm

.

१९६६ साली वैजयन्तीमालाची प्रमुख भूमिका असलेला 'आम्रपाली' हा चित्रपट. शंकर जयकिशनचे संगीत, एम.आर.आचरेकरांचे कलादिग्दर्शन, भानू अथय्या यांनी केलेली वशभूषा, गोपीकृष्ण यांचे नृत्य दिग्दर्शन, वैजयंतीमालाचे सौंदर्य आणि या सर्वांतून साकारलेली एकाहून एक सरस नृत्य-गीते, यामुळे तो त्याकाळी चांगलाच गाजला होता.
... अर्थात त्यावेळी मी पंधरा वर्षांचा असल्याने तेंव्हा हा चित्रपट बघता आला नव्हता, मात्र इंदूरच्या 'रीगल' टॉकीज वर वैजयंतीमालाचे एक अतिभव्य, सुंदर कट-आऊट लागले होते, ते बघत भान हरपून उभे रहाणार्‍यात मी पण असायचो.
........ हे सर्व आज आठवण्याचे कारण म्हणजे आजच प्रदर्शित झालेला, सनी लिओनीची प्रमुख भूमिका असलेला 'एक पहेली लीला' हा चित्रपट. जणू ६६ साली राहून गेलेली इच्छा इतक्या वर्षांनी पूर्ण करण्यासाठी, जन्मात प्रथमच मी या पिच्चरचा 'फर्स्ट डे फर्स्ट शो' बघून आलो.
या चित्रपटाचे कथानक लंडन मधील एका नृत्यापासून सुरू होते, ते पुढे राजस्थान मधील अप्रतिम स्थळे, तेथिल ठाकुर मंडळींच्या अलिशान हवेल्या, वेगवेगळी नृत्य-गीते, रोमांचक प्रणय प्रसंग, हळूहळू आकार घेणारे रहस्य, नाडी-ग्रंथ वगैरेतून भविष्यवाणी वगैरे वळणावळणाने पुढे वाढत जाते, आणि अगदी शेवटी अनपेक्षित वळण घेऊन संपते.
सुंदर छायाचित्रण, बर्‍यापैकी संगीत - नृत्ये, उत्कंठावधक कथानक, यथायोग्य पात्र-निवड आणि दिग्दर्शन, उतमोत्तम वस्त्राभूषणात नटलेली नायिका या सर्वामुळे चित्रपट अजिबात कंटाळवाणा वाटत नाही. सनीताईंकडून उत्तम अभिनयाची कुणीच अपेक्षा करणार नाही, मात्र तिने सुंदर रंगबेरंगी भारतीय वेशभूषेत आपल्या कमनीय रूपवैभवाची जी उधळण केली आहे, त्याबद्दल तिला सलाम.

. ..
एकदा तरी सिनेमागृहात जाऊन बघाण्यालायक असलेल्या या चित्रपटात आणखी एक गंमत आहे. आपण किती सरधोपटपणे विचार करत असतो, आणि समोर उलगडत जाणार्‍या घटना-क्रमातून जो तार्किक निष्कर्ष आपण काढत असतो, त्याचा व्यत्यास सुद्धा तितकाच खरा असू शकतो, हे चित्रपट संपता-संपता जाणवते, आणि आपण स्वतःशीच काहीसे खजील होत बाहेत पडतो.

संस्कृतीकलानृत्यसंगीतज्योतिषमौजमजाचित्रपटछायाचित्रणआस्वादअनुभवमतशिफारसविरंगुळा

प्रतिक्रिया

सनीताईंकडून उत्तम अभिनयाची कुणीच अपेक्षा करणार नाही,

आणि हो.. बादवे, सनी (तुमच्याच तै) चांगला अभिनय करु शकते याबद्दल तुम्हास असलेला डाउट्ट पाहून अंमळ आश्चर्य वाटले. ;)

प्रथम म्हात्रे's picture

11 Apr 2015 - 9:36 pm | प्रथम म्हात्रे

???

पॉइंट ब्लँक's picture

10 Apr 2015 - 3:22 pm | पॉइंट ब्लँक

यथायोग्य पात्र-निवड

ह्म्म्म ;)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Apr 2015 - 5:19 pm | अत्रुप्त आत्मा

हम्म्म्म्म...!
---------------
http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing007.gif
अती समांतरः- कॉलिंग गिरिजा काssssss काssssss!!!
http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing007.gif

प्रसाद गोडबोले's picture

10 Apr 2015 - 7:26 pm | प्रसाद गोडबोले

अती समांतरः- कॉलिंग गिरिजा काssssss काssssss!!!

हॅल्लो ... आलो मी !!

कोणी काहीही म्हणा मी सनी लिऑनचा फॅन आहे ! ती सुंदर आहे आणि तिला ते चांगलेच ठावुक आहे ! तिच्या सौंदर्यप्रदर्शनात आजवर तरी मला कोठेच बीभत्सपणा दिसलेला नाहीये ... सनी कायम रुपगर्विताच वाटते ! सनीला पहाणे ही एकदम व्हिज्युअल ट्रीट असते ... जसे की क्यॅट्रीना कैफ , सलमा हायेक वगैरेंना पाहताना वाटते तसे !

अगदी संस्कृत साहित्यातील सौंदर्य वर्णनेही आठवतात काही वेळा

तन्‍वी श्‍यामा शिखरिदशना पक्‍वबिम्‍बाधरोष्‍ठी
मध्‍ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणा निम्‍ननाभि:।
श्रोणीभारादलसगमना स्‍तोकनम्रा स्तनाभ्‍यां
या तत्र स्‍याद्युवतिविषये सृष्टिराद्येव धातु:।।

कोणी काहीही म्हणा - सनी मला आवडते ... एव्हन कित्येक मुलींच्याकडुनही सनी सुंदर आहेच असे कौतुक ऐकले आहे. .

जे जसे आहे त्याचा तसा स्वीकार करावा , सुंदर तर सुंदर ! , दांभिकपणा करुन काही खास लाभ होत असेल तर मला तो माहीत नाही ( प्रवचनकारबुवांना विचारावे लागेल ;)!)

समांतर : चित्रपट आवर्जुन पाहणार !

चित्रगुप्त's picture

10 Apr 2015 - 7:28 pm | चित्रगुप्त

तिच्या सौंदर्यप्रदर्शनात आजवर तरी मला कोठेच बीभत्सपणा दिसलेला नाहीये

शंभर टक्के सहमत. मी तर असेही म्हणेन, की वयाच्या चौतिसाव्या वर्षीपण तिच्या चेहर्‍यावर बालपणीची निरागसता टिकून आहे. या सिनेमातील तिची दृष्ये सुरुचीपूर्ण आहे.

उगा काहितरीच's picture

11 Apr 2015 - 8:07 am | उगा काहितरीच

तन्‍वी श्‍यामा शिखरिदशना पक्‍वबिम्‍बाधरोष्‍ठी
मध्‍ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणा निम्‍ननाभि:।
श्रोणीभारादलसगमना स्‍तोकनम्रा स्तनाभ्‍यां
या तत्र स्‍याद्युवतिविषये सृष्टिराद्येव धातु:।

म्हणजे ? अर्थ सांगा की राव !

अत्रुप्त आत्मा's picture

11 Apr 2015 - 3:57 pm | अत्रुप्त आत्मा

हे उगा काहितरीच बघा तुमचं!

नगरीनिरंजन's picture

10 Apr 2015 - 6:15 pm | नगरीनिरंजन

आपल्या कमनीय रूपवैभवाची जी उधळण केली आहे, त्याबद्दल तिला सलाम.

अक्षरशः फुटलो हे वाक्य वाचून! आजकाल कोणी कोणाला कशाबद्दल सलाम करेल सांगता येत नाही. बाकी सलामे ईश्क असतो किंवा लाल सलाम असतो तसा हा कुठला सलाम म्हणायचा हो चिगुकाका? आणि कसा सलाम केला त्याबद्दलही लिहा की.

खरेतर सनीलिओनी असल्याने आणि या नावामुळॅ हा सिनेमा पाहणार नव्हतो .. पण तुम्ही चांगला म्हणाताय म्हंटल्यावर पहावा काय असे वाटत आहे.. थोडे आनखिन विश्लेषण हवे होते.

बाकी मी त्या आमच्या दगडु च्या पिक्चर च्या वेटींग वर होतो

चित्रगुप्त's picture

10 Apr 2015 - 7:14 pm | चित्रगुप्त

@गणेशा:

बाकी मी त्या आमच्या दगडु च्या पिक्चर च्या वेटींग वर होतो

हा दगडू कोण बुवा ? कोण हा दगडू ? हा कोण दगडू ? (चिमणरावाचे चर्‍हाट आठवून डोळे पाणावले आमचे)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2015 - 7:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मात्र तिने सुंदर रंगबेरंगी भारतीय वेशभूषेत आपल्या कमनीय रूपवैभवाची जी उधळण केली आहे, त्याबद्दल तिला सलाम.

तपशिलवार लिहिलं असतं तर कशाला सलाम आहे कळलं असतं बाकी कै नै. :)

-दिलीप बिरुटे
(रंगबेरंगी भारतीय वेशभूषेची आवड असलेला)

Leela

हि रंगीबेरंगी वेशभूषा भारतात कोणत्या ठिकाणी आढळते हे जाणून घ्यायला नक्की आवडेल. पुढची photography टूर तिकडेच

चित्रगुप्त's picture

14 Apr 2015 - 11:00 pm | चित्रगुप्त

हि रंगीबेरंगी वेशभूषा भारतात कोणत्या ठिकाणी आढळते

.........अहो, कुठे काय विचारता ??? सोप्पे आहे, बालीवुडात.

चित्रगुप्त's picture

10 Apr 2015 - 7:05 pm | चित्रगुप्त

आमचा सलाम 'सलामे फनकार' आहे, म्हणा हवेतर.

वैताग आला काकूंना बघून!! पदरचे पैसे टाकून बघायला जायचं म्हणजे तर कहरच!!

जेपी's picture

10 Apr 2015 - 8:01 pm | जेपी

पदरचे पैसे>>>
ख्याक हे काय भलतच...

सूड's picture

10 Apr 2015 - 8:03 pm | सूड

बरं सदरचे पैसे!!

जेपी's picture

10 Apr 2015 - 8:28 pm | जेपी

परत एकदा ख्याक..

नगरीनिरंजन's picture

10 Apr 2015 - 7:54 pm | नगरीनिरंजन

सलामे फनकार!

__/\__. नमन स्विकारा!

आज तात्या (मिपावर) हवे होते ;-)

आज तात्या (मिपावर) हवे होते ;-)

हो तर!! "ही आमची सनी, आमचा हिच्यावर भारी जीव" टाईप लेख आला असता. ;)