मराठी अस्मिता … जपली बरं का !

सवंगडी's picture
सवंगडी in राजकारण
6 Dec 2014 - 7:38 pm

बरेच दिवस झाले राजकारणाबद्दल कोणी लेख लिहिला नाही. विधानसभा निवडणुका झाल्या,त्यानंतर भरपूर आडवणुका पण झाल्या. पण त्यावर कुणी काही लिहेना "राजकारण" हा सगळ्यांच्या आवडीचा विषय जरी असला तरी तो जरा संवेदनशील पण आहे त्यामुळे त्याकडे वळताना थोडी भीतीच वाटते.
निवडणुकांनंतर तर या लोकांनी सर्कसच सुरु करून सामान्य लोकांची काही दिवस करमणूक केली खरी,पण नंतर मात्र "रोजच मरं,त्याला कोण रडं ?" अशी तऱ्हा झाली आणि मग सगळेच त्या चर्चेकडे दुर्लक्षच करू लागले. त्यात राष्ट्रवादीने आपला विदुषकाचा खेळ करून दाखवला. उद्धवरावांनी लहान मुल जसं हातपाय झाडून रडून - पडून दाखवतं तस करून पाहिलं.याच काळात शिवसेनेनी मात्र "मराठी अस्मिता" हा त्यांच्या पणजोबांपासून चालत आलेला शब्द काढला लोकांना पेटवण्याचा प्रयत्न केला,'शेठजी आणि भटजींच्या हाती सत्ता देणार का ?' असा प्रचार करणारी शिवसेना जातीच राजकारण खेळली.
त्यामुळे त्यांनी त्यांच्या वरचा विश्वास मात्र गमावला. इकडे राष्ट्रवादीवाल्यांनी 'सत्ता आमच्या हाती आम्ही प्रचंड आशावादी' असा प्रचार करून साहेबांना वर उचललं (परवा शिवसेना सहभागी होणार अशी अंतर्गत माहिती कळल्यावर साहेब पडले असावेत.)
भा.ज.प.वाले आणि त्यांना मत देणारे लोक तर रोज बी.पि.च्या गोळ्या खात होते. या सगळ्यात एक मात्र छानच झालं,लोकांनी ज्या उत्साहात सत्ताधाऱ्याना निवडून दिलं त्याच्या एकदम उलट सत्ता स्थापनेच झालं,तेवढाच ढिसाळपणा लोकांची कामे करण्याला झाला आणि त्यासाठी कारणही ठरलेलं होतं "मंत्रिमंडळाचे खातेवाटप राहिले आहे"!
आता काल अचानक शिवसेना सत्तेत सहभागी झाली, अगदी अचानक ! यात विशेष करून कमी आणि साधी खाती मिळाली.
"युद्धात जिंकले अन तहात हारले "! हि म्हण सार्थ ठरवत शिवसेनेनी मराठी बाणा आणि अस्मिता मात्र टिकवली. आता या सत्ता सहभागामागे काय काय 'अर्थ' आहे हे सांगणे न लागे.
एक मात्र खर कि माझ्यासारख्या राजकारणाकडे अपेक्षेने पाहणाऱ्याचा म.न.से. भ्रम निरास झाला आहे आणि माझी अवस्था कोणीच आईकून घेत नाही आणि कोणी लक्षही देत नाही अश्या उद्द्वीघ्न अश्या काँग्रेस सारखी झाली आहे.

-एक अपक्ष माणूस

प्रतिक्रिया

अस्मिता जपणे महत्वाचे.
मग ती मराठीची असो किंवा झि टिवी ची .
काय *wink*

खेकडताणीसिंह's picture

8 Dec 2014 - 5:23 pm | खेकडताणीसिंह

शिवसेनेने ६३ जागा जिंकून देखील मुत्सद्दी पणाच्या अभावी स्वतःची 'सत्तेसाठी लाचार' अशी प्रतिमा करून घेतली. बाळासाहेबांची बेधडक व धाडसी निर्णय घेत असत, त्यांची उणीव पदोपदी जाणवली.

बॅटमॅन's picture

8 Dec 2014 - 5:29 pm | बॅटमॅन

रोचक आयडी आहे. त्यामागची कहाणी काय आहे ती ऐकायला आवडेल.

खेकडताणीसिंह's picture

9 Dec 2014 - 5:25 am | खेकडताणीसिंह

शाळेतील मित्र "वाणी वाणी गुळाचं पाणी, ओढ्या ओढ्यानी 'खेकडं ताणी' " अस चिडवायचे व माझी रास 'सिंह' ...सो 'खेकडताणीसिंह'
काहीतरी वेगळा आयडी हवा होता म्हणून हा खटाटोप ... "काय तो 'आयडी' ..." म्हणून बायको कडून शिव्या खाल्ल्या ती गोष्ट वेगळी :)

स्वागत आहे खेकडताणीसिंहसाहेब !!

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कुणी खालील लेख वाचले नसतील तर कृपया वाचणे. विनोदी (असे माझे मत आहे :-) ) राजकीय लेख लिहायचा प्रयत्न केला आहे.

भाग – १
http://www.misalpav.com/node/27735
भाग -२
http://www.misalpav.com/node/27763
भाग – ३
http://www.misalpav.com/node/27793
भाग - ४
http://www.misalpav.com/node/27859

भाग ५
http://www.misalpav.com/node/27911

'तिकडे' बसणारा कोणीही येवो तो डल्ला मारतोच हे त्यांचे इंकमटैक्स रिटर्न दरवर्षी कसे गुणाकार पध्दतीने (पद्धतीने ?) वाढतात हेच सांगतात. सेनेला सामावून घेतले नसते तर १)भाजपवाले नाराज २)सेनावाले नाराज +३)पुन्हा मतदानाचे हजारो कोटी गटारात गेले असते.
आता अस्मिता जपण्यात कोण कार्लसन आणि कोण विश्वजेता आनंद झाला ते सांगायला नकोच.
राजकारणावर धागे निघाले नाही की तोफखाना पुण्याकडे का वळतो ते मात्र अनाकलनीय आहे.

जयन्त बाबुराव शिम्पी's picture

18 Mar 2015 - 12:41 am | जयन्त बाबुराव शिम्पी

आम्ही अशी टिकवितो " मराठी अस्मिता " . वर्षातून एकदाच शिवजयन्ती म्हणा वा गुढीपाडवा म्हणा, कपाळावर शेंदूरी रंगाचा टिळा , डोक्यावर पागोटे, अंगावर भगवा झब्बा , पायजामा आणि हातात ' भगवा झेंडा , मुखातून अधुन मधुन " जय शिवाजी , जय भवानी ' ची ललकारी, आणि पुढे ढोल ताशाची मिरवणूक ! ! झाली आमची " शिवजयंती वा गुढीपादवा " ! !