नाही देखिले पंचानना

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in विशेष
3 Sep 2014 - 12:06 am
श्रीगणेश लेखमाला २०१४

हि गोष्ट मी गोव्यात असतानाची आहे. गोव्याच्या वास्को येथील नौदलाच्या रुग्णालयात काम करीत होतो. मी तेथील अधिकाऱ्यांच्या वसाहतीत राहत असे. दाबोळी विमानतळाच्या अगदी जवळ असलेली हि वसाहत अतिशय सुंदर आहे. दोन मजली इमारतीत चार घरे. खालच्या घरांना पुढे आणि मागे अंगण आहे. बाजूला मोटारीसाठी गैरेज आणि वरच्या मजल्यावर राहणार्यांना गैरेजच्यावर एक गच्ची. घरे सुद्धा सुटी सुटी आहेत. वसाहतीत रहदारी अशी नाहीच. त्यामुळे मुले फार सुखात आपल्या छोट्या सायकलींवर फिरत असत. त्यांची शाळा पण त्याच वसाहतीत आहे. त्यामुळे मुले दोन मिनिटात शाळेत पोहोचत. संध्याकाळी तेथिल रस्त्यांवर बायकोसह चालण्याचा व्यायाम करणे हा एक रोजच उद्योग असे. गोव्यात दाबोळी येथे नौदलाचा सर्वात मोठा वैमानिक तळ आहे. त्यामुळे आमच्या वसाहतीत अनेक वैमानिक आपल्या कुटुंबासह राहत असत. त्यातुं मी विक्रांतवर दोन वर्षे असल्याने माझ्या बर्याच वैमानिकांशी ओळखी होत्या. या वसाहतीतील साडे चार वर्षाचे माझे वास्तव्य हा माझ्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा काळ होता.

या वसाहतीत एक वैमानिक आपल्या कुटुंबासह राहत असे. त्याची चार वर्षाची मुलगी सिमरन अतिशय छान होती. मोठे गाल, मोठे डोळे, इतक्या लहान मुलीची छान कमरेपर्यंत वेणी यामुळे ती मुलगी फारच छान दिसत असे. या मुलीची आई निर्मल( नाव बदललेले आहे) तेथे आपल्या वैमानिक नवर्याबरोबर चालताना संध्याकाळी दिसली. मी तिच्या नवर्याला विक्रांत पासून ओळखत होतोच. त्यामुळे ओळखही झाली यानंतर बर्याच वेळेस तिला आम्ही वसाहतीत पाहत होतो.

एक दिवस निर्मल आमच्या रुग्णालयात माझ्या विभागात मुलीला घेऊन आली. सिमरनच्या पोटात दुखत असल्याने तिला बाल रोग तज्ञाने सोनोग्राफीसाठी पाठविले होते. पण आता निर्मलला पाहून लामा धक्काच बसला. कारण तिने घातलेला पोशाख एखाद्या नटी सारखा होता. अर्धी अधिक छाती उघडी होती. मला जर आश्चर्यच वाटले. पण मी तिच्याकडे दुर्लक्ष करून तिच्या मुलीकडे लक्ष पुरवले. तिची सोनोग्राफी झाल्यावर मी रिपोर्ट लिहित होतो. तेंव्हा ती माझ्या टेबल समोर बसली होती. आपले उरोज टेबलावर टेकवून ती माझ्याशी रिपोर्ट बद्दल बोलू लागली. टेबलवर ठेवल्यामुळे उरोज तिच्या बळूज्मधून अधिकच बाहेर आले होते.

मला फारच विचित्र वाटत होते. मी तिच्या मुलीकडेच पाहत तिला सर्व गोष्टी सांगितल्या आणि रिपोर्ट घेऊन बालरोग तज्ञाकडे पाठविले.

असाच अनुभव परत एकदा तिचा पाय मुरगळला होता तेंव्हा ती एक्स रे काढायला आली असताना मला आला.
दोन दिवसांनी मी त्या बाल रोग्ताज्ञाकडे सहज फिरत फिरत गेलो तेंव्हा हि निर्मल परत मुलीला दाखवायला आलेली होती. परत कपडे तोकडे आणी अर्धी छाती उघडी असा वेष. मी परत एक चक्कर मारून आलो. तोवर ती गेलेली होती. मी त्या बालरोग तज्ञाला विचारले कि हि बाई तुला विचित्र वाटत नाही काय? मी हिला जेंव्हा जेंव्हा रुग्णालयात पाहतो तेंव्हा हिचे कपडे तोकडे असतात. यावर तो मला तेच म्हणाला. कि सर हि बाई आपण चालायला जातो तेंव्हा अगदी सती सावित्रीसारखी कपडे घातलेली असते. आणी रुग्णालयात हे असे कपडे काय घालते. काहीतरी विचित्रच आहे. हाच अनुभव आमच्या आणखी एका मित्राला (कान नाक घसा तज्ञाला) आला होता. अर्थात या गोष्टी आम्ही चहापानाच्या खोलीत बोलताना आम्हाला कळले. तिथे सर्वांचे म्हणणे हेच पडले कि सर्व साधारणपणे बायका फिरायला जाताना झकपक कपडे घालतात आणी रुग्णालयात मात्र सोज्ज्वळ कपड्यात असतात.

हि मनोवृत्ती काय ते कोणालाच विश्लेषण करता येत नव्हते. पुढे जेंव्हा जेंव्हा आम्ही निर्मलला रुग्णालयात पहिले तेंव्हा ती तोकड्या कपड्यात होती. आणी गंमत म्हणजे यातील एकही डॉक्टर लघळ किंवा अशा स्त्रीला प्रोत्साहन देणारा नव्हता.( म्हणजे संशयाचा फायदा निर्मलला देता यावा).

काही महिन्यानंतर मी तातडीच्या कामावर( इमर्जन्सी ड्युटी) संध्यकाळी कैज्यूअल्टी मध्ये बसलो होतो आणी येणारे रुग्ण पाहत होतो. एवढ्यात नवर्याबरोबर निर्मल आली. यावेळेस तिचे कपडे पूर्ण होते. आणी तिच्या पोटात प्रचंड दुखत होते. तिला मी तपासले तेंव्हा तिच्या ओटीपोटात डावीकडे खूप दुखत होते आणी तिचा चेहरा पांढरा पडला होता. तिची परिस्थिती पाहून मी तिला कैज्यूअल्टी सोडून सरळ तिला सोनोग्राफीसाठी घेऊन गेलो. सोनोग्राफी करताच मला लक्षात आले कि तिला टयूबल एकटोपिक प्रेग्नन्सी ( म्हणजे गर्भ गर्भाशयात असण्या ऐवजी स्त्रीबिजवाहक नलिकेत आहे) आणी ती स्त्रीबिजवाहक नलिका फुटली आहे आणी त्यातून रक्तस्त्राव होत आहे. तच्या पोटात जवळ जवळ एक लिटर रक्त साठले होते. मी तेथूनच आमच्या स्त्रीरोग तज्ञाला फोन केला आणी सांगितले कि मी गाडी पाठवतो आहे तुम्ही ताबडतोब य़ा. त्यावर त्यांनी मला उलटे शस्त्रक्रिया गृह तयार कर आणी भूल तज्ञाला सुद्धा बोलावून घे म्हणून सांगितले. मी त्यांना म्हटले सर तुम्ही रुग्णाला बघून तर घ्या. त्यावर ते म्हणाले कि माझा तुझ्या सोनोग्राफीवर पूर्ण विश्वास आहे. तेंव्हा वेळ घालवू नको.

आता निर्मल आणी तिच्या नवर्याला तिची ताबडतोब शल्यक्रिया करणे आवश्यक आहे असे समजावून सांगण्याची जबाबदारी माझीच आली. मी त्यांना समजावून सांगितले आणी तिच्या नवर्याला सांगितले कि चार ते पाच बाटल्या रक्त लागेल तर त्याची सोय कर. मी आमच्या रक्तपेढीला तसे सुचित ही केले. शिवाय तेथल्या नौदलाच्या मुख्यालयात तसा बिनतारी संदेशही पाठविला. अर्ध्या तासात सर्व तयारी पूर्ण करून तिला शस्त्रक्रियेसाठी घेतले. सुमारे एक तासाने तिची शस्त्रक्रिया पूर्ण झाली. तिला तीन बाटल्या रक्त चढवावे लागले होते. ती शस्त्रक्रिया गृहाच्या बेहर आली आणी तिला अधिकारी कुटुंबाच्या कक्षात हलवले. मी थोड्यावेळाने जाऊन तिला पाहून आलो. तिने अर्धवट झोपेत कृतज्ञतापूर्वक स्मित केले. तिचा नवरा मला धन्यवाद देत होता. तीन दिवस ती रुग्णालयात होती. जातांना परत एकदा भेटून ती मला आणी स्त्रीरोग तज्ञाला धन्यवाद देऊन गेली. पुढे मी दोन वर्षे ए एफ एम सी पुणे येथे बदली होईपर्यंत त्या रुग्णालयात होतो. त्या दोन वर्षात मी तीला सात आठ वेळा रुग्णालयात कुणाला भेटायला किंवा स्वतःला आणी मुलीला दाखवायला आलेले पाहिले. पण आता तिने कधीही रुग्णालयात तोकडे कपडे घातलेले आमच्यापैकी कोणीहि पाहिले नाही.

ती परत मला चार वर्षांनी मी नौदल सोडल्यावर केरळ च्या सहलीला गेलो असताना मुन्नारला कानन देवन चहाच्या कारखान्यात भेटली. ती आणी तिच्या नवर्याने आमची आस्थेने विचारपूस केली.

ती आधी तसे का वागत होती याबद्दल आमच्या डॉक्टर मित्रांमध्ये चर्चा झाली होती परंतु नक्की असे काही कुणाला सांगता येत नव्हते. exhibitionism चा एक भाग असावा असे वाटले. मात्र खरे कारण कधीच कोणाला कळले नाही. तिचे तिलाच माहिती.

नंतर कदाचित मृत्यू फार जवळून पहिल्याने तिची डॉक्टरांकडे पाहण्याची नजर बदलली असावी. म्हणूनच म्हणतात ना

नाही देखिले पंचानना( सिंह)
तोवरी जंबुक( कोल्हा) करी गर्जना.

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

3 Sep 2014 - 5:55 am | खटपट्या

लेख आवडला.
काय बोलावे कळत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Sep 2014 - 8:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सारांश : काही डॉक्टर लोकांचं मनावर चांगलं कंट्रोल असतं आणि ते फक्त रुग्णाच्या व्याधिकडेच लक्ष देतात अन्यत्र नाही.

गणेश लेख मालेसाठी डॉक्टर साहेबांनी काही वेगळ प्रासंगिक लिहायला पाहिजे होतं असंही वाटलं.

-दिलीप बिरुटे

अनुप ढेरे's picture

3 Sep 2014 - 10:10 am | अनुप ढेरे

गणेश लेख मालेसाठी डॉक्टर साहेबांनी काही वेगळ प्रासंगिक लिहायला पाहिजे होतं असंही वाटलं.

सहमत.

प्यारे१'s picture

4 Sep 2014 - 1:56 pm | प्यारे१

+१

अनुभव म्हणून वेगळा असला तरी प्रासंगिक नसल्याचं प्रकर्षानं जाणवलं.

नेहमी प्रमाणेच मानवी मनाचा वेध घेणारी कथा.
पण

गणेश लेख मालेसाठी डॉक्टर साहेबांनी काही वेगळ प्रासंगिक लिहायला पाहिजे होतं असंही वाटलं.

प्रभाकर पेठकर's picture

3 Sep 2014 - 8:51 am | प्रभाकर पेठकर

ही मनोविकार तज्ञाची केस असावी. असा कोणी तज्ञच वागण्यामागील गूढ उकलू शकेल.

आयुर्हित's picture

3 Sep 2014 - 12:08 pm | आयुर्हित

जोश ए जवानी हाये रे हाये.....
दुनिया का मेला, मै हू अकेला, कितना अकेला हू मै? (हे तिच्या आवाजात, बरंका)

अशीच एक घटना वात्स्यायन ॠषींसमोर घडली होती, त्यावर त्यांना "कामसुत्र" लिहिवेसे वाटले होते.
पोटाच्या भुके सारखीच शरिराची भुक भागणे ही तेव्हढेच गरजेचे आहे. ते नैसर्गिक रित्या झाले नाही म्हणुन असे वागणे असते. तिच्या नवर्‍याला कामसुत्र वाचायला सांगणे गरजेचे होते.

पोटाच्या भुके सारखीच शरिराची भुक भागणे ही तेव्हढेच गरजेचे आहे.

पण बाहेरचे खाल्ल्यावर अपचन होते, ते या केस मध्ये झाले आहे.

चैदजा's picture

14 Sep 2014 - 8:01 pm | चैदजा

व एकदा बरे झाल्यावर, जसे बाहेरचे खाण्याची इच्छा उडते, तसे झाले असावे.

बाहेरचे खाल्ल्यावर अपचन होते, ते या केस मध्ये झाले आहे व एकदा बरे झाल्यावर, जसे बाहेरचे खाण्याची इच्छा उडते, तसे झाले असावे.

+१००...सहमत.

अर्धवटराव's picture

4 Sep 2014 - 2:33 am | अर्धवटराव

स्त्री/व्यक्ती स्वारंत्र्याच्या नावाने आणि सनातनी पुरुषी मानसीकतेच्या नावाने अजुन एकही शंख वाजला नाहि या धाग्यावर??? तुमची पुण्याई थोर हो डॉक्टर साहेब.

बॅटमॅन's picture

4 Sep 2014 - 11:08 am | बॅटमॅन

असेच म्हणतो. असे निराश केल्यामुळे आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

मदनबाण's picture

4 Sep 2014 - 11:40 am | मदनबाण

मला वाटत नाही की हा काही मानसिक आजार असावा ! निदात हल्ली आजुबाजुच्या वातावराण झालेला बदल पाहुन तरी असे वाटत नाही.स्त्रीमुक्ती आणि समानतेच्या नावाखाली शरीराचे प्रदर्शन करणार्‍या स्त्रीयांची कमतरता नाही.एक काळ होता जेव्हा सॅटेलाईट चॅनलचे पर्व नुकतेच सुरु झाले होते, त्यावेळी एमटीव्ही,चॅनल व्ही इं वर बोल्डगाणी लागली तरी ती पहाताना त्यातल्या नग्नतेची जाणीव व्ह्यायची, पण आता डोळे निर्ढावले की मन निर्ढावलय तेच कळत नाही !"लज्जा" हा स्त्रीयांचा अलंकार असतो.. छाप वाक्ये / सुविचार कधीच काळाच्या पडध्याआड गेले आहेत.पुरुष ६ पॅक्स दाखवतात ना ? मग आम्ही उरोज दाखवु. आयटी क्षेत्रात अशा नमुन्यांची कमतराता नाही, २ दिवसांपूर्वीच मी माझ्या सहकार्‍यांना माझा एक किस्सा सांगितला, कॅंटिन मधुन परत येत होतो,शुक्रवारचा दिवस... हव्या त्या पद्धतीचे कपडे घालायची मुभा. माझ्या समोरुन नुकतीच जॉइन झालेली मुलगी येत होती,माझी नजर माझ्या हातातल्या घडाळ्याकडे गेली... लवकर डेस्कवर पोहचुन कामाला सुरुवात करायला हवी असा विचार मनात सुरु होता... तो पर्यंत ती मुलगी माझ्या बर्‍यापैकी समोर आली... तिने बहुतेक सॅटिन {नक्की कुठले कापड असावे ते ठाकुन नाही... एक अंदाज} चा टी-शर्ट घातला होता, त्यातुन तीची स्तनाग्रे स्पष्ट दिसत होती,मलाच कसेतरी वाटले आणि नजर परत घडाळ्याकडे वळवुन मी चालण्याचा वेग वाढवला ! हल्ली लोकांच्या मनाच्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत काय असा प्रश्न अनेकदा पडतो... असो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way
{We are now in a post-crisis period.}:- NASDAQ.com

प्रभाकर पेठकर's picture

4 Sep 2014 - 11:46 am | प्रभाकर पेठकर

>>>> त्यातुन तीची स्तनाग्रे स्पष्ट दिसत होती

असे होऊ नये पण, कधी तिच्यावर कुठे बलात्कार झालाच तर ती मात्र बुरसटलेली पुरुषी मानसिकता असेल.

विचार स्वातंत्र्यापेक्षा देह प्रदर्शन स्वातंत्र्यालाच 'व्यक्ती स्वातंत्र्याचा' सन्मान मिळायला लागला आहे.

विचार स्वातंत्र्यापेक्षा देह प्रदर्शन स्वातंत्र्यालाच 'व्यक्ती स्वातंत्र्याचा' सन्मान मिळायला लागला आहे.

लिबरल लोक तुटून पडणार बगा यावर.

कधी तिच्यावर कुठे बलात्कार झालाच तर ती मात्र बुरसटलेली पुरुषी मानसिकता असेल.

"असं कसं...असं कसं, काका? दुधाचं पातेलं उघडं दिसलं म्हणून बोक्याला लगेच दुध पिण्याचा हक्क कुणी दिला?"

यावर अश्या प्रतिक्रिया आल्या तर नवल वाटून घेऊ नका. :)

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Sep 2014 - 5:08 pm | llपुण्याचे पेशवेll

अशा गंभीर धाग्यावर पुरुषप्रधान मानसिकतेचे क्रूर प्रदर्शन पाहून वाईट वाटले.
;)

बॅटमॅन's picture

4 Sep 2014 - 5:10 pm | बॅटमॅन

च्च च्च...

वाईट नाही, रोचक. हा शब्द अलीकडं फ्याषनमध्ये आहे म्हंटात. ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Sep 2014 - 5:42 pm | llपुण्याचे पेशवेll

खरंय 'रोचकचा' जहाल पंच वाईट मधे अगदीच नेमस्त होऊन जातो. अर्थात ते ह्या प्रतिसादानंतर आठवले.

सौंदाळा's picture

4 Sep 2014 - 1:47 pm | सौंदाळा

ग्रो अप बेब्ज..!! आठवला.
असे बरेच नमुने हल्ली दिसतात. मी बघुनही न बघितल्यासारखे करुन अवघडुन मान दुसरीकडे फिरवतो.

वेगळाच प्रसंग. लेखन आवडले

पैसा's picture

4 Sep 2014 - 10:16 am | पैसा

माणसाचं मन कोणाला वाचता आलंय? कधी कधी अगदी जवळची माणसे सुद्धा एखादा माणूस असा का वागतो हे सांगू शकत नाहीत. त्या बाईंना कदाचित त्या काळात काही प्रॉब्लेम असावेत आणि त्या डॉक्टरांपर्यंत कशातरी पोचायचा प्रयत्न करत असाव्यात. मात्र ऑपरेशन झाल्यानंतर या लोकांनी आपला जीव वाचवला एवढीच भावना शिल्लक राहिली असावी.

तुमचे अनुभव मात्र खूप वेगवेगळे आणि कधी कधी अनाकलनीय असे आहेत!

>>माणसाचं मन कोणाला वाचता आलंय? कधी कधी अगदी जवळची माणसे सुद्धा एखादा माणूस असा का वागतो हे सांगू शकत नाहीत.

लाख बोललात!! त्याहीपेक्षा एखादा माणूस असाही वागू शकतो हे एखादा तसाच प्रसंग आला की मगच कळतं. कोण कोणत्या वेळी कसं रिअ‍ॅक्ट करेल हे कितीही जवळचं नातं, मैत्री असली तरी सांगणं कठीण.

किसन शिंदे's picture

4 Sep 2014 - 3:46 pm | किसन शिंदे

लाख बोललात!! त्याहीपेक्षा एखादा माणूस असाही वागू शकतो हे एखादा तसाच प्रसंग आला की मगच कळतं. कोण कोणत्या वेळी कसं रिअ‍ॅक्ट करेल हे कितीही जवळचं नातं, मैत्री असली तरी सांगणं कठीण.

सूड आणि पैसाताईंशी बाडिस.

आत्ता काही महिन्यांपुर्वी याचा वाईट अनुभवही आलाय.

प्यारे१'s picture

4 Sep 2014 - 6:20 pm | प्यारे१

+१११

सहमत.

एस's picture

4 Sep 2014 - 8:08 pm | एस

कुठल्याही प्रश्नाला दोन बाजू असतात. त्यातील दुसरी बाजू निदान असू शकते हेही मान्य करणं एरवीच्या रापलेल्या मनांना मान्य करणे अवघड जाते. पैताईंनी निदान तिचाही विचार केलाय आणि त्यामागील शक्य असलेल्या गुंतागुंतीचाही, हे फार आवडले.

आसल एक करेक्टर आजकाल रोज दिसत.
काही लोक स्वातंत्राच्या अर्थ स्वैराचार असाही घेतात.बाकी एक्सबिशन मानसिकतेचा चा प्रकार ही असु शकतो

मार्क ट्वेन's picture

4 Sep 2014 - 5:33 pm | मार्क ट्वेन

'श्री गणेश लेखमाले'च्या निमित्ताने आलेला अत्यंत औचित्यपूर्ण धागा आणि त्यावरची उद्बोधक चर्चा आवडली.
चालू द्या.

औचित्यपूर्ण त्यातल्यात्यात ठीक मानलं तरी त्यावरची उद्बोधक चर्चा? नक्की?

अहो, हिकडं ही फ्याषन पसरायला वेळ आहे सूडपंत. ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Sep 2014 - 5:43 pm | llपुण्याचे पेशवेll

कथा छान. पण या बदलामध्ये आजारपण या येवढ्याच एका गोष्टीने इतका बदल घडला असेल?

मुक्त विहारि's picture

4 Sep 2014 - 9:24 pm | मुक्त विहारि

तुमचे अनुभव बर्‍याच वेळ जगावेगळे असतात.

सुबोध खरे's picture

4 Sep 2014 - 10:14 pm | सुबोध खरे

निर्मल अगोदर तसे का वागली याचे कोणतेही स्पष्टीकरण माझ्याकडे नाही. आम्ही इतर डॉक्टरनि तिचे असे वागणे का होते याची नंतर चर्चा सुद्धा केली परंतु नक्की असा कोणताच निष्कर्ष निघू शकला नाही. कदाचित मनोविकार तज्ञ यावर प्रकाश टाकू शकला असता. पण तेंव्हा रुग्णाच्या व्यक्तिगत आयुष्याची चर्चा आम्हाला इतर कोणाबरोबरही करायची नव्हती. नाव न घेत जरी बोललो असतो तरी ते वैमानिकाची बायको आणि तातडीची शस्त्रक्रिया इ मुळे उघड झाले असते.
नंतरचे वागणे हे थोडेफार कृतज्ञतेचे होते. कारण जेंव्हा ती माझ्याकडे आली होती तेंव्हा पोटात प्रचंड दुखत होते आणि ती अंतर्गत रक्तस्त्रावाने पांढरी पडली होती. शिवाय आपल्याला काही तरी गंभीर आजार झाला आहे हे तिला आतून समजले असावे. त्यामुळे भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. शल्यक्रियेनंतर मी तिला जेंव्हा पहिले तेंव्हा तिचा चेहरा शान्त होता. मृत्यू जवळून पाहिलेल्या माणसांच्या विचारसरणीत आमुलाग्र बदल होतो हे मी कित्येक कर्करोगातून बर्या झालेल्या रुग्णात पाहिलेले आहे.
असो. यात मला एवढेच सुचवायचे होते कि माणसाच्या वागणुकीचे वेगवेगळे नमुने आपल्याला पहावयास मिळतात. त्या त्या परिस्थितीत ती व्यक्ती तसे का वागते याचे कोणतेही स्पष्टीकरण आपल्याला मिळत नाही. असंगत आचरण म्हणून ( संशयाचा फायदा देऊन) आपण ते सोडून द्यावे असे माझे सुचवणे आहे. कारण तेवधी परीस्थिती/ वागणूक सोडली तर ती व्यक्ती व्यवस्थित वागताना आढळते
हा लेख इथे(गणेश लेख मालेसाठी) अप्रस्तुत आहे असे काही मित्रांचे म्हणणे आहे. मी त्यांच्या मताचा आदर करतो.पण यात कोणताही सेक्स किंवा तत्सम भाग आणणे हा त्यातील हेतू नसून माणसाचे वर्तन याचा एक पैलू पुढे आणणे हा होता.
exhibitionism (http://en.wikipedia.org/wiki/Exhibitionism) दाखवणे हा हेतू नाही कारण असे बरेच रुग्ण मी पाहिले आहेत/ पाहतो आहे. पण त्याबद्दल पुन्हा केंव्हा तरी.

प्रभाकर पेठकर's picture

5 Sep 2014 - 11:11 am | प्रभाकर पेठकर

>>>> कदाचित मनोविकार तज्ञ यावर प्रकाश टाकू शकला असता.

माझ्या प्रतिसादात मी हेच मत मांडले आहे.

>>>>मृत्यू जवळून पाहिलेल्या माणसांच्या विचारसरणीत आमुलाग्र बदल होतो

मृत्यूची चाहूलही माणसात बदल घडविते. क्षणैक लोभापेक्षा सुखाच्या कल्पना बदलतात.

कवितानागेश's picture

4 Sep 2014 - 11:07 pm | कवितानागेश

मृत्यू जवळून पाहिलेल्या माणसांच्या विचारसरणीत आमुलाग्र बदल होतो>>
हे अगदी खरं आहे. आधी नव्हती ती maturity नंतर आली, असं फारतर म्हणता येइल.

स्वप्नांची राणी's picture

5 Sep 2014 - 1:56 pm | स्वप्नांची राणी

या लेखावरची पैसा ताईची प्रतिक्रीयाच फक्त औचित्यपुर्ण आहे...बाकी सगळ्या लिहिणार्‍यांना सो कॉल्ड सर्कास्टीक ई.ई. वाटत असल्या तरी संधीसाधू प्रतिक्रीया आहेत. स्त्रिचा चेहेरापण पुरुषांसारखाच खांद्याच्या वर असतो. पण एका नजरेत मापं काढणार्‍यांना काय म्हणावं..?

बाकी exhibitionism बद्दल सहमत. याचं एक भयंकर उदाहरण अगदी शालेय वयात पाहिलय आणि खोल आघात करुन गेलय त्या तसल्या नकळत्या वयात. एक पुरुष साधुचे कपडे घालून, पाय पोटाशी घेऊन लेडिज डब्ब्याच्या अगदी पुढे बसायचा आणि दारात कोणी मुलगी आली की हळूच दोन्ही गूढगे विलग करायचा. त्त्याविषयी आणि मग भगव्या कपड्यातल्या कोणाहीविषयी तिडिकच बसली. (अर्थात तो पुरुष असल्यामुळे बलात्कारातून सुटला असावा... :) ) (हा माझा प्रतिसाद पण अनाउचित्यपुर्णच..)

डॉ. साहेबांची माफी मागून....तसा हा लेखही या मालिकेसाठी औचित्यपुर्ण नाहीये...(गंडलाय असं म्हणायची फ्याशन आहे.. :) )

यशोधरा's picture

5 Sep 2014 - 3:10 pm | यशोधरा

+१

अर्थात तो पुरुष असल्यामुळे बलात्कारातून सुटला असावा

'लग्नाच्या अमिषाने बलात्कार' असा गुन्हा दाखल करुन तरुंगात खितपत पडलेल्या पुरुषांबद्दल काय?

दोन्ही बाजुने (स्त्री, पुरुष) असे संधीसाधु लोक असतातच.
पण स्त्रीया पुरुषांबद्द्ल आणि पुरुष स्त्रीयांबद्दल बोलणार. असो

स्वप्नांची राणी's picture

5 Sep 2014 - 2:47 pm | स्वप्नांची राणी

काही विदा आहे का असे किती खितपत पडलेत त्यांच्याबद्दल...सिरियसली विचारतेय.

सौंदाळा's picture

5 Sep 2014 - 3:02 pm | सौंदाळा

नाही ब्वा.
वर्तमानपत्रातल्या असंख्य बातम्या हाच आमचा स्त्रोत

प्रसाद१९७१'s picture

5 Sep 2014 - 4:46 pm | प्रसाद१९७१

खितपत नसले तरी पोलिस केस झाली, म्हणुन नोकरी गेली. समाजात तोंड दाखवता येत नाही. अश्या हजारो केसेस असतील. दर दिवसा आड पेपर ला एक बातमी असते. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार म्हणे. तेंव्हाच सांगायचे ना, "आधी लग्न कर, मग काय करायचे ते कर" म्हणुन.

पिलीयन रायडर's picture

5 Sep 2014 - 5:18 pm | पिलीयन रायडर

हा लेख आणि अत्यंत रोचक चर्चा श्रीगणेश लेखमालेत नसावा असं मनापासुन वाटलं.. ह्यावर उद्या धागा पेटलाच तर लेखमालेला गालबोट लागु नये अशी इच्छा...

बाकी एरवी डॉक्टरांचे लेख आवडतात्च, पण ह्या लेखात नक्की काय म्हणायचे आहे ते नीटसे कळाले नाही.. अगदी लेख लिहून सांगण्यासारखा प्रसंग मला तरी वाटला नाही..

आणि उरली सुरली बलात्कार.. बुरसटलेले पुरुष आणि संधीसाधु स्त्रिया (Vice Versa) ह्याला कितीही प्रतिवाद केला तरी त्याचा काडीमात्र फायदा नाही.. एक दोन उदाहरणांवरुन समाजाबाबत निष्कर्ष काढता येत नसतो हे एक कारण.. आणि काहीही झालं.. अगदी एखादी स्त्री एकही कपडा न घालता रस्त्यावरुन चालत असेल तरी तिच्यावर बल्त्कार करण्याचा अधिकार कुणालाच नसतो, त्यामुळे तोकडे कपडे, त्यातुन दिसणारे अवयव नी अजुन काय काय मुद्दे मांडलेत तरी बल्त्काराचे समर्थन होऊ शकत नाही... त्यामुळे "बलात्कारी पुरुषांची मानसिकता" कशीच जस्टिफाय होत नसते.. ती बुरसटलेलीच असते...

असो... गणेसोत्सवात अशा चर्चा होऊ नयेत असं वाटतं... मंगल प्रसंगी रक्त खवळवणार्‍या चर्चा न वाचलेल्या बर्‍या...

साती's picture

5 Sep 2014 - 5:29 pm | साती

आणि या लेखाचा काय संबंध असे वाटले.
असो.
कदाचित दिवाळी अंकात फक्त दिवाळीच्याच गोष्टी नसतात तसे गणेशलेखमालेत गणेशोत्सवासंबंधी काही असावे असे नाही अशी इथे समजूत असावी.

ता क- अगदी गणेशचतुर्थीच्या दिवशी माझ्याकडे एक एक्टॉपिक प्रेग्नन्सी आली तीही शॉकमध्ये आणि २.५ एच बि घेऊन.
तिच्या गडबडीत आमच्या हॉस्पिटलची गणेशस्थापना यावर्षी रात्री आठला झाली कारण प्रत्येकजण बिझी होता.
मला आता या लेखाने आणि यावर्षीच्या आमच्या पेशंटमुळे गणेशोत्सव म्हटले की एक्टॉपिक प्रेग्नन्सी आठवेल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2014 - 2:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

दीपिका पदुकोणबद्दल आत्तापर्यंत फार प्रेम वाटलं नव्हतं; पण इथले काही प्रतिसाद वाचून तिच्याबद्दल अंमळ जास्तच प्रेम निर्माण झालं -

I have breasts, you got a problem? Deepika Padukone tweets reaction to ‘news’ post

असो मी एखाद्या स्त्रीच्या स्माइल वर जितके मन्मोकळे प्रशंसोदगार काढेन तितके कोम्प्लिमेंट एखादी स्त्री/ दीपिका तिच्या ब्रेस्ट व क्लीवेज बद्दल ऐकून घेइल काय हां प्रश्न मात्र तिने उभा केला आहे. आहे का कोणी समोर येउन अशी स्तुति ऐकायला तयार ?

@डोक्टर साब
लेखात उल्लेख केलेल्या स्त्रीच्या इतिहासात नक्कीच उत्तर उपलब्ध आहे. मानसोपचार तज्ञ गाठायची घाई तर नकोच

मदनबाण's picture

15 Sep 2014 - 11:43 am | मदनबाण

स्त्रिचा चेहेरापण पुरुषांसारखाच खांद्याच्या वर असतो. पण एका नजरेत मापं काढणार्‍यांना काय म्हणावं..?

अगदी असेच वाटते,पण स्त्री देह हा पुरुष देहा पेक्षा रचनेमधे वेगळा आहे हे अमान्य देखील करता येणार नाही.

याचं एक भयंकर उदाहरण अगदी शालेय वयात पाहिलय आणि खोल आघात करुन गेलय त्या तसल्या नकळत्या वयात. एक पुरुष साधुचे कपडे घालून, पाय पोटाशी घेऊन लेडिज डब्ब्याच्या अगदी पुढे बसायचा आणि दारात कोणी मुलगी आली की हळूच दोन्ही गूढगे विलग करायचा. त्त्याविषयी आणि मग भगव्या कपड्यातल्या कोणाहीविषयी तिडिकच बसली. (अर्थात तो पुरुष असल्यामुळे बलात्कारातून सुटला असावा... ) (हा माझा प्रतिसाद पण अनाउचित्यपुर्णच..)
अगदी मुलांनाही / पुरुषांनाही असा अनुभव स्त्रीयांकडुन येउ शकतो / येतो.

अगदी एखादी स्त्री एकही कपडा न घालता रस्त्यावरुन चालत असेल तरी तिच्यावर बल्त्कार करण्याचा अधिकार कुणालाच नसतो, त्यामुळे तोकडे कपडे, त्यातुन दिसणारे अवयव नी अजुन काय काय मुद्दे मांडलेत तरी बल्त्काराचे समर्थन होऊ शकत नाही... त्यामुळे "बलात्कारी पुरुषांची मानसिकता" कशीच जस्टिफाय होत नसते.. ती बुरसटलेलीच असते...
सहमत.
मनुष्य प्राण्याचा एकंदर इतिहास पाहिला तर त्यात सर्वात स्त्रीयां बलात्कारांचा बळी होउन जाताना आपल्याला अनेक ठिकाणी दिसेल, मग ते मुघलांचे आक्रमण असो, फाळणी असो वा सध्या गाजणारा लव्ह जिहाद असो... या ठिकाणी कोणत्याही देशातली, कोणतीही भाषा बोलणारी,कोणत्याही धर्मातली अथवा जातीतली असो, बळी स्त्रीचा जातो.
स्त्री-पुरुष समानता असा कितीही टाहो फोडला तरी सुद्धा निसर्गाने जो भेद ठेवला आहे त्यावर मनुष्य प्राण्याला मात करता येणे शक्य नाही.बलात्कार करण्यासाठी लागणारी जी शारिरीक आणि मानसिक ताकद पुरुषांमधे आहे ती स्त्रीयांमधे नाही,पुरुष स्त्रीवर बलात्कार करु शकतो पण स्त्री पुरुषावर बलात्कार करु शकत नाही.
आता पुरषी मानसिकतेचा विचार केला तर पुरुषांच्या मेंदुचा देखील विचार केला पाहिजे.जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला आकर्षक,सुंदर वाटते तेव्हा त्याचा मेंदु रिअ‍ॅक्ट होत असतो.त्याच प्रमाणे एखादी स्त्री त्याला कामुक वाटणे किंवा हवीहवीशी वाटते ते का ? आणि त्यावेळी त्याचा ब्रेन नक्की कसा रिअ‍ॅक्ट होतो याचा देखील विचार करुन पाहिला पाहिजे.
शाळेमधे शिकवले जाते की माणसाच्या मूलभुत गरजा या अन्न-वस्त्र आणि निवारा या होत. यातल्या वस्त्रांचा उपयोग हवामानापासुन रक्षण तसे लज्जा रक्षण हा होता. आता काळानुरुप वस्त्रे लज्जा झाकण्यासाठी होत नसुन ती दाखवण्यासाठी केला जात आहे हे वावगे ठरु नये !नैसर्गिक दॄष्ट्या स्त्री आणि पुरुष यांचे शरीरभाव वेगवेगळे आहेत आणि त्यांच्या भावना देखील.सलमान खान स्टेजवर उभा राहुन समोर उभ्या असलेल्या लोकांसमोर स्वतःचा शर्ट काढुन दाखवु शकतो पण तीच कॄती त्याच्या बाजुला उभी असलेली कुठल्याही वेषभुषा परिधान केलेली स्त्री करु शकते का ? अर्थातच नाही, कारण तीचा देहभाव आणि स्त्रीसुलभ लज्जा असे करण्यास धजावणार नाहीत. आता दुसरे उदाहरण देतो. पुरुषांसाठी थोडीका होइना निदान शहारात तरी मुत्रालये आहेत पण स्त्रीयांसाठी ही गरज गॄहीतच घेतली गेलेली नाही त्यामुळे त्यांची कुंचबणा होते,आता पुरुष मुत्रालय नसेल तर तो ताण असह्य झाल्याने पुरुष सार्वजनिक ठिकाणी कुठेही लघुशंका करताना आढळतील पण तीच कॄती स्त्रीया करु शकतात का ? अर्थातच नाही. कारण अर्थातच तीचा देहभाव आणि स्त्रीसुलभ लज्जा.म्हणजे कितीही स्त्री-पुरुष समानतेचा टाहो फोडला तरी ज्या कॄती पुरुषांकडुन सहज केल्या जाउ शकतात त्या स्त्रीयांकडुन होणे शक्य नाही.
पुरुषांचा मेंदु नक्की कसा रिअ‍ॅक्ट होते त्या बद्धल काही दुवे :-
Bikinis Make Men See Women as Objects, Scans Confirm
men can't read female feelings
Inside ‘The Male Brain’
Women And Objectification: Brain Sees Men As Whole, Women In Parts (STUDY)

I have breasts, you got a problem? Deepika Padukone tweets reaction to ‘news’ post
देशातील एका नामवंत वॄत्तपत्रात ही बातमी आली होती त्यात दिलेल्या एका वृत्तपत्रानं एका व्हिडिओमध्ये गाऊनमध्ये असलेल्या दीपिकाचे स्तन आणि त्यातील 'क्लीवेज' दाखवलंय. त्यामुळे ती आनंदीत झाली नसुन ती उद्विग्न झाली आणि तीने हे ट्वीट केले आहे, या ट्वीट वरुन मी कसेही कपडे घातले तरी मला फरक पडत नाही,स्त्रीयांनी बिनधास्त उत्तन कपडे घालावेत,मी एक पुढारलेली स्त्री आहे अशा प्रकारचा कुठलाही अर्थ काढता येत नाही, उलट स्त्रीयांचे { इथे सेलिब्रीटी / अभिनेत्री }'क्लीवेज' चे फोटो व्हिडीयो नेटवर किती सहज उपलबध होउ शकतात आणि व्हायरल होउ शकतात याचे उदा. दिसते तेव्हा आपण काय तो बोध घेण्यास सक्षम असावे.

या विषयावर अधिक वाद घालण्याची माझी इच्छा नाही, स्त्री-पुरुष यांनी त्यांच्या मर्यादांचे भान ठेवुन सार्वजनिक आयुष्यात वावरावे या मताचा मी आहे. ही मर्यादा आपल्या संस्कॄतीतुन आणि संस्कारातुनच आपल्याला कळते असे मला वाटते. मर्यादा ओलांडली की त्याच्या होणार्‍या परिणामांचा देखील विचार केला पाहिजे.

*बलात्कार करणार्‍यास फाशी दिली जावी किंवा ठार मारले हे माझे व्यक्तिगत ठाम मत आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2014 - 10:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

देशातील एका नामवंत वॄत्तपत्रात ही बातमी आली होती त्यात दिलेल्या एका वृत्तपत्रानं एका व्हिडिओमध्ये गाऊनमध्ये असलेल्या दीपिकाचे स्तन आणि त्यातील 'क्लीवेज' दाखवलंय. त्यामुळे ती आनंदीत झाली नसुन ती उद्विग्न झाली आणि तीने हे ट्वीट केले आहे

थ्यँक्यू.

इथे ज्या कोणा स्त्रियांच्या कपड्यांबद्दल गप्पा सुरू आहेत, (वर पुन्हा बलात्काराचं नागवं समर्थन सुरू आहे), ते वाचून हेच म्हणायचं होतं. त्या स्त्रियांनी कोणत्या हेतूने असे कपडे घातलेले आहेत हे माहीत आहे का?

कोणाकोणाची स्तनाग्रं दिसतात म्हणून एवढ्या गप्पा सुरू आहेत. अॅथलीट्स, रस्त्यावर धावणाऱ्या सामान्य स्त्रिया, टेनिसपटू यांची स्तनाग्रं दिसतात हे माहीत नाही का? कष्टाचं काम न करूनही हॉर्मोन्स आणि विचारांमुळे स्तनाग्रं दिसू शकतात हे कोणाला माहीत्ये? तसंही "त्या बाईने अमुक एक गोष्ट केली ती माझं लक्ष वेधून घेण्यासाठीच केली", असा पुरुषांचा गैरसमज होणं हे नॉर्मलच आहे, पण ते तसं असतंच असं नाही.

आणि हो, स्त्रीसुलभ लज्जा ही फक्त संस्कृतीजन्य आहे. ते डोक्यावर आदळलं जातं म्हणून आत्मसात केलं जातं. अनेक संस्कृतींमध्ये स्त्रिया आणि पुरुष फक्त कमरेला वस्त्रं गुंडाळतात.

इथे ज्या कोणा स्त्रियांच्या कपड्यांबद्दल गप्पा सुरू आहेत, (वर पुन्हा बलात्काराचं नागवं समर्थन सुरू आहे),
बलात्काराचे समर्थन केल्याचे मला कोणत्याही प्रतिसादात आढळुन आलेले नाही !

ते वाचून हेच म्हणायचं होतं. त्या स्त्रियांनी कोणत्या हेतूने असे कपडे घातलेले आहेत हे माहीत आहे का?
हॅहॅहॅ... बाई त्यांनी तुम्हाला त्यांचा हेतू कळवला असेल तर कळवा बरं का इकडेच. ;) आम्हाला तरी कळु द्या उत्तान कपडे आणि स्तनाग्रे दिसणारे कपडे , लो वेस्ट जीन्स घालणार्‍यांचा उद्दात हेतू. ;) तेव्हढीच आमच्या ज्ञानात भर पडेल ! ;)

कोणाकोणाची स्तनाग्रं दिसतात म्हणून एवढ्या गप्पा सुरू आहेत.
कोणाकोणाची ? मी तर माझ्या अनुभवातले एकच उदाहरण सांगितले ! बाकीचे कुठे दिसले तुम्हाला ?

अॅथलीट्स, रस्त्यावर धावणाऱ्या सामान्य स्त्रिया, टेनिसपटू यांची स्तनाग्रं दिसतात हे माहीत नाही का? कष्टाचं काम न करूनही हॉर्मोन्स आणि विचारांमुळे स्तनाग्रं दिसू शकतात हे कोणाला माहीत्ये?
हो का ? आम्हाला नाही माहित बॉ... तुम्हाला बरीच माहिती दिसतेय.बाकी आपण हेच मोजकाम करता का ? ;) कारण आम्ही तर दुर्लक्ष करतो हे आमच्या पहिल्या प्रतिसादातुन स्पष्ट केलेले आहे.

तसंही "त्या बाईने अमुक एक गोष्ट केली ती माझं लक्ष वेधून घेण्यासाठीच केली", असा पुरुषांचा गैरसमज होणं हे नॉर्मलच आहे, पण ते तसं असतंच असं नाही.
हो का ? तसं म्हंटल स्त्रीयांकडे नुसत पाहिल तरी हिरव्या नजरेने पाहतो म्हणुन कांगावा करणार्‍या स्त्रीयांची मानसिकता काय असावी बरं ?

आणि हो, स्त्रीसुलभ लज्जा ही फक्त संस्कृतीजन्य आहे. ते डोक्यावर आदळलं जातं म्हणून आत्मसात केलं जातं.
हॅहॅहॅ... तुमच्या डोक्यावर काही आदळलय का ? तुम्हाला लज्जा या भावनेचा कधी अनुभव झाला नाही का ? मला वाटतं ज्याला मन आहे त्याला कधी तरी लज्जा या भावनेचा अनुभव होतोच ! त्यासाठी आदळ-आपट नाही हो करायला लागत. ;)

अनेक संस्कृतींमध्ये स्त्रिया आणि पुरुष फक्त कमरेला वस्त्रं गुंडाळतात.
हॅहॅहॅ... आपले पुर्वज म्हणे निर्वस्त्र संचार करायचे ! आपण आजच्या घडीला करतो का ? नाही ते सुद्धा जरा नीट स्पष्ट करा बरं का... म्हणजे विषयाचे नीट आकलन करता येइल असे म्हणतो. काय ? ;)

जाता जाता :- बोला पुंडलिक वरदे हरी विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ! ;)

आजची स्वाक्षरी :- सा रे ग म प... { अभिनेत्री }

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2014 - 1:22 am | प्रभाकर पेठकर

*good* . *good*

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2014 - 3:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी बरंच मोजकाम करते आणि बरंच करतही नाही. इतर शास्त्रज्ञ वगैरे लोक मोजकामं करतात, मी त्यांचं लेखन फक्त वाचते. स्तनाग्रांच्या बाबतीत आरसा असला तरीही मला पुरतं ... मी चिक्कार व्यायामबियाम करते आणि आरसेबिरसे वापरते. त्याशिवाय मी ज्या ज्या शहरांमध्ये राहिले आहे तिथल्या स्त्रिया व्यायाम करताना, खेळायला जाताना बुरखे वगैरे घालून जात नाहीत.

उदा: दळणवळणाची साधनं फार प्रगत नसताना जपानमध्ये (होय, पुरुषप्रधान संस्कृती असणारा, आपल्यासारखाच आशियाई देश) स्त्रियांच्या स्तनांचा आकार, स्तनांकडे पाहून चाळवणे हा संस्कृतीजन्य भाग नव्हता. जपान कशाला, आपल्याच देशात स्त्रियांचे स्तन, स्तनाग्रं आणि क्लीव्हेजकडे बघण्याचा निकोप दृष्टीकोन होता. जुनी शिल्पं वगैरे पाहिलीत तर त्यातूनही हे दिसेल. त्या शिल्पांमधल्या स्त्रिया व्यवस्थित आनंदी वगैरे दिसतात.

माझ्यासकट अनेक मुली, स्त्रिया फक्त स्वतःला आनंद व्हावा म्हणून ठराविक प्रकारचे कपडे घालतात, नटतात, मुरडतात, केस कापतात, इ. त्यातून स्त्रिया आकर्षक दिसत असतील, पुरुषांना आकर्षक दिसाव्या म्हणूनही हे सगळं करत असतील तरीही त्यांना संभोग नाकारण्याचा अधिकार असतो. काही पुरुष तिच्या नकार-होकाराला किंमत देत नाहीत कारण त्यांची "बुरसटलेली पुरुषी मानसिकता". त्याबद्दल किमान सहानुभूती बाळगणं सोडाच उलट पीडीत व्यक्तीबद्दलच खवचटपणे बोलणं, जिवंत स्त्रीची तुलना दूध वगैरे वस्तूंशी करणं हे बलात्काराचं नागवं समर्थन आहे; खाप पंचायतींच्या बातम्यांपेक्षा हे काहीही निराळं नाही.

आपले पुर्वज म्हणे निर्वस्त्र संचार करायचे ! आपण आजच्या घडीला करतो का ? नाही ते सुद्धा जरा नीट स्पष्ट करा बरं का..

याचा इथे काय संबंध? वस्त्रं गुंडाळणं, स्त्रीसुलभ लज्जा ही (थोर्थोर?) संस्कृतीची देणगी आहे, त्यात नैसर्गिक काहीही नाही एवढाच मुद्दा आहे.

तुमच्या डोक्यावर काही आदळलय का ? तुम्हाला लज्जा या भावनेचा कधी अनुभव झाला नाही का ?

व्यक्तिगत रोखाचा असला तरीही या प्रश्नाबद्दलही थँक्यू.

दुर्दैवाने होय. लज्जा या (लो-ग्रेड) भावनेची लागण मला एकेकाळी झाली होती; ती बऱ्यापैकी काळ टिकलीसुद्धा. सुदैवाने त्यातून बाहेर पडायला मदत करणारे असंख्य लोक, अगदी मिसळपाववरही भेटले. त्यातून मनुष्य हा स्खलनशील प्राणी असतो याची कल्पना असल्यामुळे मी स्वतःला माफही केलं. आणि ही भावना आता नगण्य प्रमाणातच उरल्यामुळे स्वतःचा, एकेकाळचा बावळटपणा असा जाहीर करायलाही मला लाजबिज वाटत नाही.

या जाहीर कन्फेशनची संधी दिल्याबद्दल सदस्य मदनबाण यांचे मनःपूर्वक आभार.

टवाळ कार्टा's picture

17 Sep 2014 - 11:31 am | टवाळ कार्टा

जियो...मी टोपी काढली \m/

स्पा's picture

17 Sep 2014 - 11:44 am | स्पा

__/\__

सूड's picture

17 Sep 2014 - 11:51 am | सूड

__/\__

कवितानागेश's picture

17 Sep 2014 - 12:56 pm | कवितानागेश

त्रियांच्या स्तनांचा आकार, स्तनांकडे पाहून चाळवणे हा संस्कृतीजन्य भाग नव्हता. जपान कशाला, आपल्याच देशात स्त्रियांचे स्तन, स्तनाग्रं आणि क्लीव्हेजकडे बघण्याचा निकोप दृष्टीकोन होता. जुनी शिल्पं वगैरे पाहिलीत तर त्यातूनही हे दिसेल. त्या शिल्पांमधल्या स्त्रिया व्यवस्थित आनंदी वगैरे दिसतात. >>>
हे बरोबरच आहे.
पण.... ते पूर्वी होतं... आज नाहीये. काळ बदलतोय. पण तो बदल घडवणं हे प्रत्येक समजूतदार व्यक्तीनी स्वतःला सांभाळून करावं लागतं. दुर्दैवानी, अजून तरी मला हवं ते मी घालेन, असं प्रत्येक ठिकाणी म्हणून चालत नाही.आजूबाजूला अनेक लोक, जर स्त्रिया, मुलं यांच्याकडे vulnerable objects म्हणून बघत असतील, तर स्वतःला सांभाळणं अपरिहार्य आहे. अम्ग सम्पूर्न नीट झाकूनही काही वेळेस कितीतरी ठिकाणी सुरक्षित वाटत नाही.
मला वाटतं की लज्जेपेक्षा सुरक्षितता हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे.

अजया's picture

17 Sep 2014 - 4:19 pm | अजया

माऊशी तीव्र सहमती.

स्पा's picture

17 Sep 2014 - 4:30 pm | स्पा

तीव्र सहमती

बराच हिट गेलाय आमचा नवीन शब्दप्रयोग ;)

शब्दाबद्दल अती तीव्र सहमत रे!!

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2014 - 4:35 pm | प्रभाकर पेठकर

>>>> सुरक्षितता हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे.

१०० टक्के सहमत.

स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही इतर पुरुषांपासून धोका असतो. (स्त्रियांना जास्त असतो). १९७९ साली कांजूरमार्ग-दादर मार्गावर रेल्वेने प्रवास करताना पुरुषांच्या डब्यात दूसर्‍या पुरुषाकडून मला स्वतःला त्रास झालेला आहे. सर्र्कन वळलो आणि त्याच्या अशी कानफटात हाणली की पुढचं स्थानक येईपर्यंत माझ्या हाताच्या झिणझिण्या गेल्या नाहीत. (तो बहिराच झाला असावा) पुढच्या स्थानकावर तो उतरून गेला. आजूबाजूच्या लोकांना काहीच कळलं नाही. ते, 'पाकिट मारायचा प्रयत्न करीत होता का?' असे मला विचारू लागले. पण सत्यपरिस्थिती समजल्यावर तिथे अत्यंत संताप पसरला. 'कानाखाली एकच आवाज काढून सोडून का दिला? चांगला खाली पाडून तुडवला असता साल्याला.' अशी त्यांची प्रतिक्रिया होती.
अशा वेळी, गर्दीत स्त्रियांना काय त्रास होत असेल ह्याची कल्पनाही करवत नाही.
ह्याचीच दुसरी बाजू, जेंव्हा अत्यंत गर्दीच्या वेळीही स्त्रिया आपल्या प्रियकरासोबत (कदाचित तेव्हढाही दुरावा सहन होत नसल्याने) पुरुषांच्या डब्यात येतात आणि जरा धक्का लागला तर आजूबाजूच्या लोकांकडे असे काही बघतात की जणू त्याने बलात्कारच केला आहे. अशा बायकांचाही अत्यंत संताप येतो. असो. गेली ३५ वर्षे लोकल प्रवासाचा त्रास वाचल्याने स्वतःला नशिबवान समजतो आहे.

मदनबाण's picture

17 Sep 2014 - 5:06 pm | मदनबाण

स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही इतर पुरुषांपासून धोका असतो. (स्त्रियांना जास्त असतो). १९७९ साली कांजूरमार्ग-दादर मार्गावर रेल्वेने प्रवास करताना पुरुषांच्या डब्यात दूसर्‍या पुरुषाकडून मला स्वतःला त्रास झालेला आहे.
हा अनुभव मी सुद्धा ट्रेन मधे घेतला आहे,मी माझ्या उजव्या हाताच्या ढोपराने जोरात त्याच्या मागे फाईट मारली, एक वयस्क दिसणारा माणुस होता, त्याच्याकडे वळालो... आता जर अजुन जवळ आलास तर या चालत्या ट्रेन मधुन तुला खाली फेकुन देइन असे जोरात त्याच्या आंगावर ओरडलो.

असाच एक अनुभव एका स्त्रीकडुन देखील आला आहे, मी ऑनसाईटला क्लायंटकडे होतो, तिथे अ‍ॅना नावाची मुलगी होती {नाव मुद्दामुन बदलले आहे}ती आमच्या कामात आम्हाला मदत करत असे,नॉलेज ट्रान्सफरसाठी केल्या जाणार्‍या कामाच्या भागात तिची मदत होत होती, अनेकदा आम्हाला काही गोष्टी तिच्याकडुन समजुन घ्याव्या लागत होत्या. ती बर्‍यापैकी दणकट होती,दिसायला देखील ठीक ठाक होती... परंतु काही दिवसांनी तिच्या वागण्याचे तंत्र अचानक बदलले, ती जवळ येउन बोलु लागली,कामाचे विषय सोडुन इतर गोष्टींवर मोकळेपणाने बोलु लागली,इतपर्यंत ठीक आहे, पण मग हळु हळु ती व्यक्तीगत गोष्टी सांगु लागली. माझा बॉयफ्रंड सोल्जर आहे, तो सध्या इराक मधे आहे. मला फार कंटाळा येतो... मला हॉर्स रायडिंग करायला फार आवडतं इ. पण या काळात तीचा स्वतःचे उरोज दाखवण्याचा प्रयत्न लक्षात आला होता, लॅपटॉप वगरै हाताळताना स्पर्ष करण्याचा तिचा प्रयत्न कळुन येत होता... पण मग रोज माझ्या बसण्याच्या जागी मुद्दामुन {तिथे एक खिडकी होती ज्यातुन माझी बसण्याची जागा दिसायची} वाकुन जितके उरोज दाखवता येतील तितका ती प्रयत्न करायची... एकदा मिटींगला बसलो असताना समोर बसुन तीने माझ्या पायांना तीचे पाय लावुन चाळा करायला सुरुवात केली... मला वाटले की चुकुन पाय लागत असेल्...पण तिचा हा चाळा काही थांबेना ! शेवटी थोडे खाली वाकुन नीट तिचा पाय कुठे आहे ते पाहिले आणि योग्य वेळी माझ्या बुटांनी जमिनीवर तिचा पाय चांगला दाबला आणि तिच्याकडे रागाने बघत डोळे वटारले ! त्या दिवसा नंतर ती कधीही माझ्या नादी लागली नाही.
पुरुष असो वा स्त्री वासना सगळ्यांनाच असतात... आणि त्याचा राग आणि किळस दोघांनाही वाटते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारले

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2014 - 5:11 pm | प्रभाकर पेठकर

तुम्ही तर 'मदनबाण'.
पण आमच्या सारख्यांनाही स्त्रियांकडून वाईट अनुभव आले आहेत. सर्व मिपावर देता येत नाहीत.
एक खाजगी कट्टा करावा लागेल नाहीतर 'अनाहूत' असा एक स्वतंत्र विभाग पुरुषांसाठी सुरू करावा लागेल.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Sep 2014 - 6:55 pm | अत्रुप्त आत्मा

@नाहीतर 'अनाहूत' असा एक स्वतंत्र विभाग पुरुषांसाठी सुरू करावा लागेल.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif य्याय्याय्याय्या...ह्हाह्हाह्हाह्हाह्ह्हा! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

अनुप ढेरे's picture

17 Sep 2014 - 5:12 pm | अनुप ढेरे

तंग कपडे घालून गेला होतात का हपिसात? किंवा लो नेक शर्ट वगैरे?
नाही, "असले कपडे घातल्याने वासना उद्दिपित होतात आणि समोरचे चाळावले जातात" असं काही लोकं म्हणतात म्हणून विचारलं?

मदनबाण's picture

17 Sep 2014 - 5:18 pm | मदनबाण

वन्स ब्लॅक नेव्हर कम बॅक... अशी काहीशी म्हण आहे, गोर्‍या मुलींना काळ्या मुलांचे आकर्षण असते.आणि आम्ही त्यांच्यासाठी काळेच !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारले

मदनबाण's picture

17 Sep 2014 - 5:22 pm | मदनबाण

once you go black, you never go back
मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारले

लंबूटांग's picture

17 Sep 2014 - 5:27 pm | लंबूटांग

ती म्हण कशासंदर्भात आहे ते इथे सांगण्यासारखे नाही.

बॅटमॅन's picture

17 Sep 2014 - 5:28 pm | बॅटमॅन

हा हा हा, अगदी अगदी =)) =)) =))

शिद's picture

17 Sep 2014 - 5:29 pm | शिद

हाहाहा...सहमत.

=))

सुहास पाटील's picture

17 Sep 2014 - 5:29 pm | सुहास पाटील

आयला खर कि काय ?

बाणा बर्याच जणांनी इनो घेतले असेल रे बाबा तुझ्याबाब्तीतले अनुभव वाचून

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Sep 2014 - 11:59 am | विश्वनाथ मेहेंदळे

योग्य वेळी माझ्या बुटांनी जमिनीवर तिचा पाय चांगला दाबला आणि तिच्याकडे रागाने बघत डोळे वटारले ! त्या दिवसा नंतर ती कधीही माझ्या नादी लागली नाही.

हा खरा, मध्यमवर्गीय पापभीरू मराठी माणूस. लक्ष्मी टिळा लावायला आली असताना तोंड धुवायला जायची मनोवृत्ती. इथे तर पार हाकलून दिले राव :-)

हाय कंबख्त, तूने पीही नहीं ;-)

(टी टोट्लर) विमे

प्रसाद१९७१'s picture

18 Sep 2014 - 2:30 pm | प्रसाद१९७१

शेम ऑन यु, मदनबाण. :-(

आधी तुझे नाव बदल अजिबात शोभत नाही.

मदनहाण (बुटाने हाणणारा मदन) हे कसे वाटते ?

रमणीच्या लत्ताप्रहाराने अशोक फुलतो.. इथे मदनाच्या लत्ताप्रहाराने एक वेल कोमेजली..

बॅटमॅन's picture

18 Sep 2014 - 3:04 pm | बॅटमॅन

मदनहाण =)) =)) =))

बादवे याचा समासविग्रह फक्त तिसर्‍याच नाही, तर दुसर्‍या अक्षरावरही करता येईल. कसें? ;)

ब्याट्या !! दंडवत घे रे !! =))))

आदूबाळ's picture

18 Sep 2014 - 3:26 pm | आदूबाळ

:)) फुटलो!

--/\--

अनुप ढेरे's picture

18 Sep 2014 - 4:41 pm | अनुप ढेरे

=))
कहर
__/\__

इरसाल's picture

18 Sep 2014 - 3:16 pm | इरसाल

मर्दनबाण ही चालुन जावे.

गवि's picture

18 Sep 2014 - 3:21 pm | गवि

उष्ण पडेल.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Sep 2014 - 4:37 pm | अत्रुप्त आत्मा

@मदनहाण (बुटाने हाणणारा मदन)>>> http://www.sherv.net/cm/emo/happy/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif
आयायायायायायायायाय.... http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif गवि गवि..तुंम्हीच खरे महा कवी! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif
===========
त्याच प्रमाणे त्या हलकट खाटुकम्यानास साष-टांग दंडवत! http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-hysterically-smiley-emoticon.gif

प्रसाद१९७१'s picture

18 Sep 2014 - 5:25 pm | प्रसाद१९७१

"मदन" हे नकोच त्यांच्या नावात.

काळा पहाड's picture

18 Sep 2014 - 3:05 pm | काळा पहाड

हा पळपुटेपणा पाहून एक मिपाकर म्हणून मला शरम वाटते.

आपल्याच देशात स्त्रियांचे स्तन, स्तनाग्रं आणि क्लीव्हेजकडे बघण्याचा निकोप दृष्टीकोन होता. जुनी शिल्पं वगैरे पाहिलीत तर त्यातूनही हे दिसेल. त्या शिल्पांमधल्या स्त्रिया व्यवस्थित आनंदी वगैरे दिसतात.
मग दिपीका पडुकोन का रागावली बरं ? तिला तिच्या स्तनांचा / 'क्लीवेज'चा व्हिडीयो बनवणार्‍या लोकांचा दॄष्टीकोन निकोप वाटला नाही ? ती आनंदी सुद्धा झाली नाही !

लज्जा या (लो-ग्रेड) भावनेची लागण मला एकेकाळी झाली होती ती बऱ्यापैकी काळ टिकलीसुद्धा.
लज्जा ही लो-ग्रेडची भावना आहे, हा निष्कर्ष तुम्ही कसा काढलात ?
कामातुराणां न भयं न लज्जा
मला समजलेल्या वरच्या सुभाषिताचा अर्थ :- विषयासक्त माणसांना लाज किंवा भीती वाटत नाही.
अर्थात लाज/लज्जा ही गरज देखील आहे,हा अर्थ काढला तर ते चूक ठरु नये.

सुदैवाने त्यातून बाहेर पडायला मदत करणारे असंख्य लोक, अगदी मिसळपाववरही भेटले.
मिपावर भेटले ? आम्हाला पण सांगा कोण ? नाही म्हणजे लाज काढायची असेल सॉरी आपल लाज सोडायची गरज भविष्यात भासलीच तर त्यांची मदत घेता येइल असे वाटते,म्हणुन इथेच विचारुन ठेवतो.

त्यातून मनुष्य हा स्खलनशील प्राणी असतो याची कल्पना असल्यामुळे मी स्वतःला माफही केलं.
चला मनुष्य हा स्खलनशील प्राणी आहे याची तुम्हाला कल्पना आहे तर... मग एखाद्या पुरुषाचा स्खलनशीलपणा लो वेस्ट घालणारी स्त्री पाहुन सुटला {अर्थात त्याने लाज / लज्जा /भय सोडुन अविचार करुन विवेकाला टाटा बिर्ला केल्यावर बरं का.}तर त्याचा धोका त्या स्त्रीलाच आहे ना ? का त्यांनी पण त्या स्खलनशील पुरुषाला माफ करायच ?

जाता :- जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारले

स्त्रियांना 'पाखरु' वैगरे म्हणणाराने लज्जेच्या वार्ता केलेल्या बघून अंमळ मौज वाटली.

बाकी चालू द्या..

जाता जाता: आमेन!!

मदनबाण's picture

17 Sep 2014 - 2:38 pm | मदनबाण

स्त्रियांना 'पाखरु' वैगरे म्हणणाराने लज्जेच्या वार्ता केलेल्या बघून अंमळ मौज वाटली.

ह्म्म... कुण्या गावाचं आलं पाखरू हे जगदीश खेबुडकरांनी लिहलेल गीत तुम्हाला ठावुक दिसत नाही असं वाटत नाही.
बाकी चालू द्या..
हेच म्हणतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारले

जेम्स बॉन्ड ००७'s picture

18 Sep 2014 - 5:05 pm | जेम्स बॉन्ड ००७

लैच भारी.. *good*

लंबूटांग's picture

17 Sep 2014 - 1:05 am | लंबूटांग

पुरुष स्त्रीवर बलात्कार करु शकतो पण स्त्री पुरुषावर बलात्कार करु शकत नाही

https://www.google.com/search?q=can+a+women+rape+a+man&oq=can+a+women+ra...

फार जुनी नाही आत्ताच १४ तासापूर्वीचीच एक बातमी आहे https://www.google.com/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=3&cad=rja&...

मदनबाण's picture

17 Sep 2014 - 2:26 pm | मदनबाण

हो... मी सुद्धा कालच अशा स्वरुपाची बातमी काल झी-न्यूज मराठीवर वाचली होती.
२६ वर्षीय महिलेनं पुरुषाचे हात-पाय बांधून केला रेप
पाशवी शक्ती असलेल्या निर्लज्य स्त्रीया...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारले

प्रकाश घाटपांडे's picture

15 Sep 2014 - 1:17 pm | प्रकाश घाटपांडे

अशा वेळी श्रीराम श्रीराम! जगदंब! जगदंब! असे म्हणावे व मेंदुवरील ताण कमी करावा. (म्हणताना रिदम पाहिजे नाही तर मग काही उपयोग होत नाही)

मदनबाण's picture

15 Sep 2014 - 1:29 pm | मदनबाण

हा.हा..हा... ;)
आम्ही नारायण ! नारायण ! म्हणतो ते सुदिक रिदम मंदी ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2014 - 8:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वरच्या अनेक प्रतिसादांमध्ये मुद्दा काय आणि चाललंय काय असं दिसल्यामुळे स्वतंत्र प्रतिसाद लिहीत आहे -

विशेषतः स्त्रियांना त्यांच्या शरीराची लाज वाटावी अशा प्रकारचं सोशल कंडीशनिंग होतं. स्वतःच्या शरीराची लाज न वाटल्यामुळे स्वतःला आनंद होतील, आवडतील (आणि एसी नसेल तर हवापाण्यापासून रक्षण होईल) असेच कपडे घालणारा स्त्रियांचा एक मोठा वर्ग आहे. दीपिका पदुकोण ही त्यांची एक प्रतिनिधी.

टाईम्स ऑफ इंडियाने दीपिकाच्या शरीराचं, तिला नको असलेलं वस्तूकरण केलं त्याचा धिक्कार करण्यासाठी तिने ट्वीट केलं आहे.

लोकांची स्त्रीकडून लाजेची अपेक्षा असते म्हणून लाज बाळगावी, असा दृष्टीकोन दीपिकाने ठेवलेला नाही. मला त्याबद्दल तिचं कौतुक वाटतं. किंबहुना माझा स्वतःच्या शरीराकडे बघण्याचा दृष्टीकोन असाच आहे. (हवापाण्याचा त्वचेवर होणारा परिणाम) आणि सामाजिक संकेतांचं उल्लंघन अंगावर घातलेल्या (किंवा न घातलेल्या) कपड्यांमधून न करणं म्हणजे स्त्रीसुलभ लज्जा नव्हे. माझ्या निरोगी शरीर आणि त्वचेबद्दल मला लाज वाटत नाही. (अगदी काही रोग, विकार असतील तरीही मला माझ्या शरीराबद्दल लाज वाटणार नाही. तशी ती कोणालाही वाटू नये.) त्याशिवाय बलात्काराचं, गुन्ह्यांचं समर्थन करत पीडीतांनाच "तुम्ही का नाही धड कपडे घालत" अशा विचारांना पुष्टी देऊन मला माझ्या विचारांबद्दल लाज वाटावी असं माझ्याकडे काहीही नाही.

त्यापुढे बुरसटलेली पुरुषी मानसिकता प्रत्येक पुरुषाने स्वतःवर ओढवून घेणं हे हास्यास्पद आणि अज्ञानमूलक आहे. (बहुसंख्य पुरुष हे करत नाहीत, ही आनंदाची गोष्ट आहे.) आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती माणूस आहे, त्यापुढे स्त्री किंवा पुरुष. प्रत्येकातच काही स्त्रियांचे टिपिकल म्हणावेत असे गुणधर्म आहेत आणि काही पुरुषांचे म्हणावेत असे. अगदी माझ्यातही काही टिपिकल पुरुषी गुणधर्म आहेत. पण "बुरसटलेली पुरुषी मानसिकता" म्हणताना काही विशिष्ट आणि त्याज्य गुणधर्मांचाच संबंध असतो, उदाहरणार्थ सूड यांनी उल्लेख केला आहे ते "स्त्रियांना 'पाखरु' वैगरे म्हणणे". (जगदीश खेबूडकर प्रसिद्ध गीतकार होते म्हणून बुरसटलेल्या पुरुषी मानसिकतेच्या रोगातून मुक्त झाले होते अशातला भाग नाही.)

दुसऱ्याचं नाक सुरू होतं तिथे माझा हात फिरवायचा अधिकार संपतो; ते दुसऱ्याचं नाक असेल अथवा लो-वेस्ट जीन्सच्या आतली कंबर असेल, याची जाणीव वेळोवेळी करून द्यावी लागते. अशी जाणीव करून देणं, आपल्यातला बुरसटलेला, त्याज्य लज्जास्पद भाग काय आहे तो काढून टाकण्याचं काम यांसारख्या चर्चा करतात. त्याजागी एक ठराविक व्यक्ती, उदा: दीपिका काय विचार करत होती, यात मला काहीही रस नाही. आणि माझ्या दिशेने आलेल्या व्यक्तिगत प्रश्नांबद्दल केलेल्या चर्चेतून जर काही व्यापक मुद्दा मांडता येत नसेल तर त्यातही मला काहीही रस नाही.

(संपादित)

डोक्टरांचा लेख मुळ अनुभव या अवांतरात भरकटायला नको असे वाटते.

मदनबाण's picture

17 Sep 2014 - 10:09 pm | मदनबाण

स्वतःच्या शरीराची लाज न वाटल्यामुळे स्वतःला आनंद होतील, आवडतील (आणि एसी नसेल तर हवापाण्यापासून रक्षण होईल) असेच कपडे घालणारा स्त्रियांचा एक मोठा वर्ग आहे. दीपिका पदुकोण ही त्यांची एक प्रतिनिधी.
टाईम्स ऑफ इंडियाने दीपिकाच्या शरीराचं, तिला नको असलेलं वस्तूकरण केलं त्याचा धिक्कार करण्यासाठी तिने ट्वीट केलं आहे.
लोकांची स्त्रीकडून लाजेची अपेक्षा असते म्हणून लाज बाळगावी, असा दृष्टीकोन दीपिकाने ठेवलेला नाही. मला त्याबद्दल तिचं कौतुक वाटतं.

मुळात दिपिका पडुकोनच्या क्लीवेजच्या व्हिडीयो प्रसारण झाल्या नंतरच्या टिप्पणीचा उल्लेख तुम्ही उल्लेख वारंवार केला आहे त्याच दिपिका पडुकोनने या आधी सुद्धा अंगप्रदर्शन केले आहे आणि आणि उघडपणे क्लीवेज दाखवले आहेत.
कॉकटेल चित्रपटात तीच्यावर टु-पीस बिकीनी घालुन दॄष्य दिले आहे. शरीराची लाज-वाटता स्वतःला आनंद होइल असे कपडे घालुन झाल्यावर त्यातुन दिसणार्‍या स्वतःच्याच अंगाचेचे फोटो व्हिडीयो प्रसारित झाल्यावर कांगावा करायचा हे कुठल्या प्रकारच प्रतिनिधीत्व ? रामलीलाच्या प्रमोशन मधे सुद्धा क्लीवेज दिसेल असे कपडे घालुन तिने मुलाखती दिल्या आहेत. तेव्हा पेज थ्री बातमी या पलिकडे तिच्या विधानाला किम्मत नाही !
हे सिद्ध करण्याची मला गरज नाही तरी सुद्धा व्हिडीयो देउन ठेवतो. { हे व्हिडीयो पल्बिक डोमेन मधे आहेत, यू-ट्युबवर आहेत}

तेव्हा असल्या पोकळ स्त्रीवादाचे उदा. देउन तुम्ही फक्त तुमचेच मनोरंजन करत बसा.

बलात्काराचे समर्थन ? कोणी केले आहे ? माझ्या वाचनात तरी तसा कोणताही प्रतिसाद या धाग्यात कुठेही नाही. स्वतः नागवेपणाच समर्थन करुन कोणत्या बुरसटलेल्या विचारांबाबत तुम्ही बोलत आहात ? तुमचेचे विचार बुरसटलेले आहेत असं आता दिसुन येत आहे.

(जगदीश खेबूडकर प्रसिद्ध गीतकार होते म्हणून बुरसटलेल्या पुरुषी मानसिकतेच्या रोगातून मुक्त झाले होते अशातला भाग नाही.)
हे विधान म्हणजे सूर्यावर थुंकण्या सारखे आहे, आणि तुमच्याच स्त्रीवादी बुरसटलेली विचार सरणीचे उत्तम उदा. आहे. तेव्हा कॄपा करा इथे विनाकारण पोकळ स्त्रीस्वातंत्र्याची टिमकी वाजवायला येउ नका.
इथले कोणते पुरुष सदस्य बलात्कारी मानसिकतेचे आहेत ? ते स्पष्ट करा. माझी हा धागा वाचणार्‍या सर्व पुरष मंडळींनाही एक विचारणा आहे की ते एव्हढे घाणेरडे आरोप इथल्याच पुरुषांवर होत असताना पाहुन मूग गिळुन गप्प तरी कसे काय बसु शकतात ? २ शब्दांचाही निषेध व्यक्त करण्याची क्षमता तुमच्यात नाही ?
(संपादित)

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2014 - 10:46 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद मदनबाणा.

'पुरुषी मानसिकता' हा शब्दप्रयोग बलात्काराच्या संदर्भात सर्व पुरुषवर्गाला उद्देशून आहे. हे म्हणजे समाजात कांही स्त्रिया वेश्या व्यवसाय करतात म्हणून स॑मस्त स्त्रीवर्गाला वेश्या वृत्तीच्या/मानसिकतेच्या संबोधण्याइतके मूर्खपणाचे विधान आहे. कांही सदस्य स्वतःवर ओढून घेतात म्हणजे काय? पुरुषी मानसिकता म्हंटली की जे जे पुरुष आहेत त्या सर्वांनाच लागू होते. कांही पुरुष (?) गप्प बसतात, कांही जणं मूर्ख म्हणून सोडून देतात तर कांही जणं प्रतिवाद करतात. प्रतिवाद करतानाही संयम न सोडणं हे सभ्यपणाचं लक्षण असतं. बलात्काराचं कोणीही समर्थन केलं नसताना 'बलात्काराचे समर्थन करणारी मानसिकता' अशी सतत शेरेबाजी करून सदस्यांना भडकविण्याचे काम करण्याच्या उद्योगांना संपादक मंडळ पायबंद घालीत नाहीत हे आपलं दुर्दैव आहे.

'बलात्काराचे समर्थन' हा शब्दप्रयोग माझ्या एका प्रतिसादाला उद्देशून आहे. तो प्रतिसाद पुन्हा खाली उद्घृत करतो:

>>>> त्यातुन तीची स्तनाग्रे स्पष्ट दिसत होती

असे होऊ नये पण, कधी तिच्यावर कुठे बलात्कार झालाच तर ती मात्र बुरसटलेली पुरुषी मानसिकता असेल.

विचार स्वातंत्र्यापेक्षा देह प्रदर्शन स्वातंत्र्यालाच 'व्यक्ती स्वातंत्र्याचा' सन्मान मिळायला लागला आहे.

ह्या प्रतिसादात बलात्काराचं कुठेही समर्थन नसून कोणी माथेफिरू, संस्कारांचा अभाव असलेला, स्त्री लंपट माणूस जर बलात्काराला उद्युक्त झाला तर त्यात त्या बलात्कारी पुरुषा इतकाच दोष त्याला उद्युक्त करणार्‍या स्त्रीचाही असतो पण स्त्री स्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पनांनी प्रेरीत महिला त्या स्त्रीला कुठल्याही प्रकारचा दोष न देता 'पुरुषी मानसिकता' हे लेबल चिकटवून आपलेच विचार किती अज्ञानमूलक आहेत ह्याचा ढिंढोरा पिटतात.
त्याच वाक्या पुढचे वाक्य 'विचार स्वातंत्र्यापेक्षा देह प्रदर्शन स्वातंत्र्यालाच 'व्यक्ती स्वातंत्र्याचा' सन्मान मिळायला लागला आहे.' हे सोयिस्कर रित्या दुर्लक्षिले आहे. देह प्रदर्शन स्वातंत्र्यापेक्षा विचार स्वातंत्र्याचे समर्थन करा हेच मला म्हणायचे आहे.
मिपावर दहा वेळा उदाहरण दिले आहे पण ते (मूद्दामहून) दुर्लक्षिले जाते (कारण ते स्विकारणे सोयिस्कर नसते) तेच पुन्हा पुन्हा सांगतो. बाहेर पडताना आपण चपला घालतो कारण रस्त्यात कुठे काचा, साप, विंचू, घाण असेल तर आपल्याला त्याचा उपसर्ग होऊ नये. आपण आपले रक्षण करीत असतो. तसेच, समाजातही साप, विंचू, काचा, घाण अशी माणसं असतात त्यांच्या पासून ही सतत आपले रक्षण करणे ह्यातच शहाणपणा असतो. जिकडे तिकडे 'पुरुषी मानसिकता' 'पुरुषी मानसिकता' अशी लेबलं चिकटवत फिरण्याने समस्येचे समाधान होत नसते. स्वतःलाच काळजी घ्यावी लागते.
राहाता राहिला स्त्रियांच्या कपड्याचा प्रश्न. मुंबईत भयंकर म्हणजे भयंकर उकाडा असतो म्हणून काय स्त्रियांनी (किंवा पुरुषांनीही) कपडे उतरवून फिरायचं? हवापाण्यच्या कारणाने दिपिका अंगावरील सर्व कपडे उतरवून फिरली तरी आपल्या मिपावरील कोणीही पुरुष तिच्यावर बलात्कार करायला धावणार नाही. जे तशा वृत्तीचे असतात ते अंगभर कपडे घातलेतरी बलात्कार करतीलच. जन्माला आलेल्या प्रत्येकाला कधी न कधी मृत्यू हा येणारच आहे म्हणून कोणी रेल्वेवर जाऊन झोपला तर तो मूर्खपणाच असेल. असा मूर्खपण कांही जणं (आयुष्याला कंटाळलेले) करतात म्हणून समाजातील प्रत्येकव्यक्ती 'आत्महत्येची मानसिकता' जोपासणारी नसते.
खरंच हल्ली मिपावर जीव घुसमटतो. मिपावर खूप जीव जडला आहे पण मिपाचा असा उकिरडा होणार असेल तर त्यापासून दूर राहिलेलंच बरं.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2014 - 11:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कोणी माथेफिरू, संस्कारांचा अभाव असलेला, स्त्री लंपट माणूस जर बलात्काराला उद्युक्त झाला तर त्यात त्या बलात्कारी पुरुषा इतकाच दोष त्याला उद्युक्त करणार्‍या स्त्रीचाही असतो

स्तन न फुटलेल्या दोन-चार वर्षांच्या मुलींपासून हॉर्मोनल सिक्रीशन कधीचं थांबलेल्या वृद्ध स्त्रिया कोणत्या प्रकारे स्वतःवर बलात्कार उद्युक्त करतात? वरच्या प्रतिसादांतला आरडाओरडा पाहून न राहवून विचारते आहे, तुमच्यासोबत जो प्रसंग घडला, तेव्हा तुम्ही असं काय जगावेगळं, रीतभात सोडून वर्तन केलं होतंत म्हणून तुमच्याशी असं विकृत वर्तन घडलं? मला नाही वाटत तुम्ही काही मुद्दामून त्याला आमंत्रण दिलेलं होतंत.

स्वतः अशा विकृतींचा अनुभव घेऊनही बलात्कार पीडीत व्यक्तींबद्दल असे कोरडे, शहामृगासारखे वाळूत डोकं खुपसून कसे राहू शकता तुम्ही?

---

स्त्रीवाद ही ज्ञानशाखा सोडाच, एखाद्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार नाकारला जातो आणि तरीही त्यात चूक त्या व्यक्तीचीही असते, हे म्हणण्यासाठी आधी लैंगिकता, उत्क्रांती, मानसशास्त्र, गुन्हेगारांचं मानसशास्त्र यांचा कोणी किती अभ्यास केला आहे? हे सगळं शिकायला, समजून घ्यायला खूप वेळ लागतो. तेवढा वेळ सगळ्यांनी घालवावा अशी अपेक्षाही नाही. पण ज्यांना थोडक्यात काहीतरी समजून घ्यायचं आहे त्यांनी हा चार्ट जरूर बघावा. हा प्रकाशित करण्याचं तत्कालिक कारण वेगळं होतं तरीही लैंगिकता, नकाराधिकार आणि व्यक्तिस्वातंत्र्य समजून घेण्यासाठी हा पुरेसा आहे -

when does a woman owe you sex?

मूळ स्रोत -
When Does a Woman Owe You Sex? Check This Chart

प्रभाकर पेठकर's picture

18 Sep 2014 - 12:54 am | प्रभाकर पेठकर

>>>>स्तन न फुटलेल्या दोन-चार वर्षांच्या मुलींपासून हॉर्मोनल सिक्रीशन कधीचं थांबलेल्या वृद्ध स्त्रिया कोणत्या प्रकारे स्वतःवर बलात्कार उद्युक्त करतात?

चला म्हणजे वरील दोन वर्गवारीत न मोडणार्‍या, स्तन फुटलेल्या आणि हार्मोनल सिक्रिशन अजूनही चालू असलेल्या कांही बायका बलात्कार उद्युक्त करू शकतात हे मानण्यापर्यंत तुम्ही आलात हेही नसे थोडके. हीन वृत्तीचे पुरुष वय पाहात नसतात. म्हणूनच त्यांना नराधम म्हणतात.
माझा स्वसंरक्षणाचा मुद्दा (चप्पल घालून फिरावं की अनवाणी) हा तुमच्या पर्यंत पोहोचू शकत नाहीए हे दुर्दैव. नाहीतर वरचा उथळ प्रश्न मनास पडलाच नसता. आपण जगातले सर्व साप, विंचू मारायचे, काचा नष्ट करायच्या की आपल्या पायाला संरक्षण द्यायचं हे तुमचं तुम्हीच ठरवा.

>>>>वरच्या प्रतिसादांतला आरडाओरडा पाहून....

दूसर्‍यांचा तो आरडाओरडा आणि आपला तो अभ्यासपूर्ण प्रतिसाद. व्वा! स्वत:च्याच चेहर्‍याभोवती आरतीचं तबक फिरवायची तुमची जुनी खोड ठाऊक आहे.

हे आंतरजालावरून उतरविलेले अभ्यासपूर्ण चार्ट एखाद्या माथेफिरू, स्त्रीलंपट, असंस्कृत बलात्कारी पुरुषाला दाखविले तर स्त्रीवर होणारा बलात्कार थांबेल का? मी बलात्कारी नसल्याने मला दाखविण्याचे प्रयोजन कळले नाही.
प्रत्यक्षातल्या घटना, कृती ह्या वरील चार्टच्या विपरीतच असल्याचे दिसून येते. थिअरी आणि प्रॅक्टिकल ह्यात खूपवेळा जमीन अस्मानाचा फरक असतो. अन्यथा सरकारने हा चार्ट नाक्यानाक्यावर लावून निदान भारतातून तरी बलात्काराचे समूळ उच्चाटन करावे.

हा प्रतिसाद हे कुठल्याही प्रकारच्या बलात्काराचे समर्थन नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Sep 2014 - 3:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सर्वप्रथम मनुष्यांचं वस्तूकरण, पशूकरण थांबवा. स्त्रिया दूधासारखी वस्तू नाहीत आणि पुरुष साप, विंचू किंवा काचा नाहीत. मनुष्यांना आधी मनुष्याप्रमाणे, मनुष्यांच्या मानसशास्त्रानुसार बघायला सुरूवात करू या आणि मग मानवी वर्तनाची चिकीत्सा. माणसांना बुद्धी आणि भावना असतात ज्या काच आणि दूधाला नसतात.

दुसरं, "स्तन न फुटलेल्या दोन-चार वर्षांच्या मुलींपासून हॉर्मोनल सिक्रीशन कधीचं थांबलेल्या वृद्ध स्त्रिया कोणत्या प्रकारे स्वतःवर बलात्कार उद्युक्त करतात?" हा तिरकस प्रश्न आहे. कोणतीही स्त्री स्वतःवर बलात्कार व्हावा यासाठी अजिबात प्रयत्न करत नाही; उलट जमेल तितका त्याचा प्रतिकार करत राहते. किंबहुना तिचा नकाराधिकार डावलला जातो म्हणून त्याला बलात्कार असं म्हणतात.

हेच उत्तान कपडे आणि तथाकथित 'स्त्रीसुलभ लज्जा रहित वर्तन' आणि बलात्कार या संदर्भात, एका सत्यघटनेवर जोडी फॉस्टरचं मुख्य काम असलेल्या 'अक्यूज्ड' नावाच्या चित्रपटाची शिफारस करेन. स्त्रीने संभोगाला दिलेला नकार हा नकारच असतो, तिच्या होकाराशिवाय संभोग केल्यास तो बलात्कारच असतो आणि त्यात तिची काहीही चूक नसते, याबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज उरणार नाही. त्यातून जोडी फॉस्टरसारख्या गुणी अभिनेत्रीचा चित्रपट पाहण्याचा आनंद निराळा.

चार्ट लावून लैंगिक बलात्कार थांबत नाहीत; तशी अपेक्षा मी तरी धरत नाही. कदाचित थांबलं तर पीडीत व्यक्तीलाच दोषी मानून त्यांच्या दुःखांवर डागण्या देण्याचे असंवेदनशील प्रकार कमी होतील अशी आशा आहे. त्याहीपुढे जाऊन मूळ प्रश्न काय आहे, काय चुकतं आहे याचं आकलन धड केल्याशिवाय उपाय शोधता येणार नाहीत. ते आकलन करून देण्या-घेण्याचा हा प्रयत्न आहे.

---

बलात्कार फक्त स्त्रियांवर होतात असं नाही, बलात्कार फक्त पुरुषच करतात असंही नाही. पुरुषही पुरुषांवर बलात्कार करतात, स्त्रिया स्त्रियांवर करतात, क्वचित प्रसंगी स्त्रिया पुरुषांवरही करतात. बलात्काराचा पीडीत पुरुषांवर होणारा परिणाम बऱ्याच वेगळ्या प्रकारचा आणि तरीही वाईटच असतो.

आजूबाजूला पाहता, साधारणतः बलात्कारपीडीत व्यक्ती स्त्रिया असतात आणि गुन्हेगार पुरुष. म्हणून याला 'बुरसटलेली पुरुषी मानसिकता' म्हणण्याचा प्रघात आहे. ज्या पुरुषांची ती नाही, त्यांनी ते स्वतःच्या अंगाला लावून घेण्याचं कारण नाही. नेतृत्त्वगुण, त्रिमितीय वस्तू फिरवली तर कशी दिसेल याचा विचार पुरुषांना जास्त चांगला करता येतो, आणि त्याला पुरुषी गुणच समजतात. मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या लोकांची ही भाषा आहे. तेव्हा सगळेच पुरुष नेते म्हणून चांगले असतात, त्रिमितीय वस्तू फिरवली तर कशी दिसेल याचा विचार करू शकतात असंही नाही.

तेव्हा मुळात शब्दसमूह नक्की काय आहे, त्याची व्याख्या काय आहे हे समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे.

पुरुष लेखक-कवींनी बायकांचं केलेलं वस्तूकरण, male gaze हे अभ्यासाचे खोल विषय आहेत. त्याचा अभ्यास न करता 'सूर्यावर थुंकणं' वगैरे पृष्ठभाग खरवडणत नावं ठेवण्यापेक्षा काही जास्त अभ्यासपूर्ण लिहिल्यास सगळ्यांचाच फायदा होईल.

---

थोडंसं लेखनशास्त्राबद्दल - आरडाओरड्याचं म्हणाल तर, मोठ्या फॉंटमध्ये लिहिणं, इंग्लिशमध्ये लिहीताना सगळं कॅपिटलमध्ये लिहिणं याला लेखनातला आरडाओरडा समजलं जातं; धमकी देणं हा आरड्याओरड्याच एक प्रकार.

प्रभाकर पेठकर's picture

18 Sep 2014 - 8:49 am | प्रभाकर पेठकर

सर्वप्रथम मनुष्यांचं वस्तूकरण, पशूकरण थांबवा. स्त्रिया दूधासारखी वस्तू नाहीत आणि पुरुष साप, विंचू किंवा काचा नाहीत.

ह्याला मनुष्याचं वस्तुकरण नाही म्हणत. मराठी साहित्यात 'रुपक' हा एक अलंकार आहे. त्याचाच वापर वरील साप, विंचू, काचा ह्या शब्दप्रयोगांमध्ये आहे. साप, विंचू किंवा काचा ह्या वस्तू म्हणून नाही तर 'वृत्ती' ह्या अर्थाने वापरलेल्या आहेत. अशा वृत्तीची माणसं समाजात (फक्त भारतातच नाही तर तुमच्या अमेरिकेतही) असतात. त्यांच्या पासून इतर सामान्यजनांना त्रास होऊ शकतो/होतो. अशा वृत्तींपासून आपल्याला कांही त्रास होऊ नये, आपले आयुष्य उद्ध्वस्त होउ नये म्हणून प्रत्येकाने (स्त्री आणि पुरुष दोघांनीही) काळजी घ्यायची असते.

दुसरं, "स्तन न फुटलेल्या दोन-चार वर्षांच्या मुलींपासून हॉर्मोनल सिक्रीशन कधीचं थांबलेल्या वृद्ध स्त्रिया कोणत्या प्रकारे स्वतःवर बलात्कार उद्युक्त करतात?" हा तिरकस प्रश्न आहे. कोणतीही स्त्री स्वतःवर बलात्कार व्हावा यासाठी अजिबात प्रयत्न करत नाही; उलट जमेल तितका त्याचा प्रतिकार करत राहते. किंबहुना तिचा नकाराधिकार डावलला जातो म्हणून त्याला बलात्कार असं म्हणतात.

तुम्हाला स्वतःला साप, विंचू, काचा आणि पादत्राणं ह्यांचा परस्पर संबंध इतकं सोपं करून सांगितलेलंही समजत नाही (किंवा समजून घ्यायचं नाहीए) आणि दुसर्‍यांना मात्र 'तिरकस' प्रश्न टाकता आहात. 'कोणतीही स्त्री स्वतःवर बलात्कार व्हावा ह्यासाठी प्रयत्न करीत नाही' ह्याचा अर्थ 'बायका स्वतःवर बलात्कार करण्यासाठी प्रयत्नशील असतात' असे मी म्हंटल्यासारखे होते. मी तसे कुठेच म्हंटलेले नाही. शरीर प्रदर्शनाने बलात्कारी पुरुषाच्या भावना चाळवून बलात्काराची शक्यता वाढते असा माझा मुद्दा आहे. ह्याचा अर्थ, 'दिसली कमी कपड्यातली बाई की कर बलात्कार असाही होत नाही'. हे बलात्काराचे समर्थनही होत नाही. आपण घराबाहेर जाताना आपल्या घराला कडी-कुलूप लावतो. कारण समाजात वाईट प्रवृत्तीची माणसे आहेत आपल्या मौल्यवान वस्तूंची चोरी होऊ शकते ह्या विचारांनीच तसे करीत असतो. पण कधी कडी लावली नाही तर चोरांना चोरी करण्याचा हक्क प्रदान केला असे होत नाही पण शक्यता वाढते. पोलीसात तुम्ही जेंव्हा चोरीची तक्रार नोंदवायला जाल तेंव्हा पोलीसही प्रथम तुम्हाला हेच विचारतात, 'चोरी होऊ नये म्हणून तुम्ही काय संरक्षक उपाय योजले होते?' त्यांना सांगून पाहा, 'मी घराला कडी-कुलूप लावलं नव्हतं म्हणजे चोरांना चोरी करायचा हक्क नाही मिळत.' ह्यात सत्यांश असला तरी ते व्यवहाराला धरून होत नाही.

तथाकथित 'स्त्रीसुलभ लज्जा रहित वर्तन' आणि बलात्कार या संदर्भात, एका सत्यघटनेवर जोडी फॉस्टरचं मुख्य काम असलेल्या 'अक्यूज्ड' नावाच्या चित्रपटाची शिफारस करेन. स्त्रीने संभोगाला दिलेला नकार हा नकारच असतो, तिच्या होकाराशिवाय संभोग केल्यास तो बलात्कारच असतो आणि त्यात तिची काहीही चूक नसते, याबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज उरणार नाही.

संभोगाची आणि बलात्काराची व्याख्या समजण्यासाठी मला कुठला चित्रपट पाहण्याची आवश्यकता नाही. आपल्याला आवश्यकता वाटत असेल तर जरूर पाहावा.

कदाचित थांबलं तर पीडीत व्यक्तीलाच दोषी मानून त्यांच्या दुःखांवर डागण्या देण्याचे असंवेदनशील प्रकार कमी होतील अशी आशा आहे.

पीडीत व्यक्तीलाच कोणी दोषी मानत नाहीए. बलात्काराचा विरोध, मिपावर माझ्यासह, अनेकांनी अनेक वेळा केला आहे. 'बलात्कारी नराधमाला फाशी इतकी कठोर शिक्षा द्यावी' ह्याचाही उच्चार अनेकांनी अनेकदा मिपावर केला आहे. बलात्काराचे समर्थन कोणत्याही कोनातून कधीच केलेले नाहीए. तुम्ही तसा अर्थ लावता आहात कारण तेच तुम्हाला सोयिस्कर आहे. 'स्वतःची काळजी घ्या' सांगणे म्हणजे दु:खावर डागण्या देणे नाही. कोणाही स्त्रीच्या वाट्याला अशा प्रकारचे दु:ख येऊ नये म्हणून दिलेला एक संरक्षक सल्ला आहे. तो तुम्हाला 'डागण्या' वाटतो? दु:खावर डागण्या देणे कशाला म्हणायचे? ज्या स्त्रीवर बलात्कार झाला आहे तिलाच 'तूच जबाबदार आहेस आता कशाला रडत बसली आहेस' असे म्हणणे म्हणजे डागण्या देणे आहे. अशा वेळी तिला दोष देण्याऐवजी (तिचा दोष असला तरीही) तिचे सांत्वन करणे आणि गुन्हेगाराला शोधून कठोरात कठोर शिक्षा देण्याची गरज असते.

साधारणतः बलात्कारपीडीत व्यक्ती स्त्रिया असतात आणि गुन्हेगार पुरुष. म्हणून याला 'बुरसटलेली पुरुषी मानसिकता' म्हणण्याचा प्रघात आहे.

असा प्रघात वगैरे अजिबात नाहीए. जेंव्हा 'बुरसटलेली पुरुषी मानसिकता' असा शब्द तुम्ही वापरता तेंव्हा सर्व पुरुषजातीला तो उद्देशून असतो. अगदी तुमचे जवळचे नातेवाईकही त्यात आले. त्यामुळे असा शब्दप्रयोग करण्या ऐवजी 'गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पुरुषांची मानसिकता' किंवा 'बलात्कारी पुरुषाची मानसिकता' असा मर्यादित शब्द प्रयोग जास्त योग्य होतो.

ज्या पुरुषांची ती नाही, त्यांनी ते स्वतःच्या अंगाला लावून घेण्याचं कारण नाही.

पण मी असंच म्हणणार. हा हेकेखोरपणा झाला. तो तुम्हालाच लखलाभ होवो. जेंव्हा जेंव्हा अशा विधानांमध्ये माझा ही समावेश असेल तेंव्हा तेंव्हा मी विरोध करणारच. (ह्या विषयात सर्व पुरुषांनी करायला हवा होता पण दुर्दैवाने तसा झाला नाही.) आपण एक गंभीर आरोप करीत आहोत. आपल्या नकळतही कोणी निष्पाप दुखावला जाऊ नये एव्हढी काळजी, निदान गंभीर आरोपांबाबत तरी नेहमीच घ्यावी. मी तरी घेतो. म्हणजे माझ्याकडून चुका होत नाहीत असे अजिबात नाही पण चुक झाली आणि कोणी निदर्शनास आणून दिली तर ती स्विकारून दिलगिरी व्यक्त करतो.

आरडाओरड्याचं म्हणाल तर, मोठ्या फॉंटमध्ये लिहिणं, इंग्लिशमध्ये लिहीताना सगळं कॅपिटलमध्ये लिहिणं याला लेखनातला आरडाओरडा समजलं जातं; धमकी देणं हा आरड्याओरड्याच एक प्रकार.

'हे कुठल्याही बलात्काराचे समर्थन नाही' हे साध्या अक्षरामध्ये तुमच्या डोक्यात शिरत नव्हतं. त्यामुळे असे उपद्व्याप करावे लागतात. त्याचा उपयोगही लगेच झाला. म्हणजे त्या विधानाशी सहमती किंवा असहमती तुम्ही तुमच्या सोयीने दाखवालच पण निदान ते विधान डोक्यात तरी शिरले. मोठ्या अक्षरांची तुम्ही दखल घेतली हे त्याचेच निदर्शक आहे.

दूसर्‍यांचा तो आरडाओरडा आणि आपला तो अभ्यासपूर्ण प्रतिसाद. व्वा! स्वत:च्याच चेहर्‍याभोवती आरतीचं तबक फिरवायची तुमची जुनी खोड ठाऊक आहे.
याच्याशी १००% सहमत ! तसेच वरील संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हिंदी-चिनी.. नेमके काय?

बाळ सप्रे's picture

18 Sep 2014 - 10:26 am | बाळ सप्रे

अदितीचे सगळे मुद्दे मान्य पण पेठकर काकांच्या या मुद्द्यात विरोध करण्यासारखं काहीच नाही

शरीर प्रदर्शनाने बलात्कारी पुरुषाच्या भावना चाळवून बलात्काराची शक्यता वाढते असा माझा मुद्दा आहे

कारण वरचा फ्लोचार्ट मान्य नसलेले लोक जगात आहेत हे सत्य आहे!!

आजानुकर्ण's picture

18 Sep 2014 - 1:29 am | आजानुकर्ण

सर्वांनी आपापली काळजी घेतली पाहिजे याच्याशी सहमत आहे. फक्त खालील वाक्याबाबत माफक शंका आहे

कोणी माथेफिरू, संस्कारांचा अभाव असलेला, स्त्री लंपट माणूस जर बलात्काराला उद्युक्त झाला तर त्यात त्या बलात्कारी पुरुषा इतकाच दोष त्याला उद्युक्त करणार्‍या स्त्रीचाही असतो

बलात्कारी पुरुष माथेफिरु, संस्कारहीन, स्त्रीलंपट असूनही त्याच्या इतकाच दोष 'उद्युक्त करणाऱ्या' स्त्रीचा? असा बलात्कारी पुरुष माथेफिरु, संस्कारहीन, स्त्रीलंपट पुरुष 'उद्युक्त' होऊ नये यासाठी आमच्या बायकांपोरींनी काय करावे बॉ?

मंदार कात्रे's picture

18 Sep 2014 - 6:20 am | मंदार कात्रे

बाहेर पडताना आपण चपला घालतो कारण रस्त्यात कुठे काचा, साप, विंचू, घाण असेल तर आपल्याला त्याचा उपसर्ग होऊ नये. आपण आपले रक्षण करीत असतो. तसेच, समाजातही साप, विंचू, काचा, घाण अशी माणसं असतात त्यांच्या पासून ही सतत आपले रक्षण करणे ह्यातच शहाणपणा असतो. जिकडे तिकडे 'पुरुषी मानसिकता' 'पुरुषी मानसिकता' अशी लेबलं चिकटवत फिरण्याने समस्येचे समाधान होत नसते. स्वतःलाच काळजी घ्यावी लागते.

+१०००

लंबूटांग's picture

18 Sep 2014 - 3:27 am | लंबूटांग

स्वतःच्याच अंगाचेचे फोटो व्हिडीयो प्रसारित झाल्यावर कांगावा करायचा

मी जे काही वाचले त्यातून असे दिसले की तिचा विरोध त्या व्हिडीओच्या प्रसाराबद्दल नाही आहे हो त्या टाईम्स ऑफ ईंडियाने जी काही click bait असावी अशी बातमी दिली होती त्याला आहे. या या दीपिका पदुकोणचा क्लिव्हेज शो बघा अशी काहीशी. ती तिथे कोणत्याशा फॅशनशो ला गेली होती. तिथे फॅशन शो बद्दल बोलायचे सोडून क्लिव्हेजचीच बातमी चालू होती त्यामुळे तिने ते ट्वीट केले होते. तिने चित्रपटांत कसले कपडे घालायचे ते बहुधा फॅशन डिझायनर ठरवत असावा. आणि तो तिच्या व्यवसायाचा भाग मानता येऊ शकतो. असो.

स्तनाग्रे वगैरे दिसण्याचे म्हणाल तर बर्‍याच कारणांनी स्तनाग्रे ताठरू शकतात पुरूषांचीही. जी बरेचदा टी शर्ट मधून वगैरे दिसतातही. बर्‍याचदा ते बायकांच्या लक्षातही येत नाही असे वाटते (अर्थात हा माझा तर्क झाला). तिने ती स्तनाग्रे दाखवण्यासाठीच तसले कपडे घातले हा निष्कर्ष काढणे चूक वाटते.

चपलांचे उदाहरणच घेतले तर चपला घातल्या आहेत म्हणून साप विंचू चावतच नाहीत असेही नाही आणि नाही घातल्या म्हणून अगदी येऊन चावतातच असेही नाही. तसेच ते बलात्कार करणार्‍या व्यक्तीचेही असते. There is no direct corelation.

बरं आता वैयक्तिक मत. मला स्वतःला उगाचच अंगप्रदर्शन केलेले आवडत नाही. इथे उन्हाळ्यात काही ललना शॉर्ट शॉर्ट्स घालतात तेही अति वाटते वैयक्तिकरित्या. पण केवळ बलात्कार होतील या भितीने बीचवरही जीन्स आणि टी शर्ट घालून फिरावे अशीही अपेक्षा नाही. जिथे जे योग्य दिसेल तिथे ते कपडे घालावे.
त्यांनी केवळ ते तसले कपडे घातले म्हणून काही इतरांना बलात्कार करायचे आमंत्रण दिले असे नाही.

मदनबाण's picture

18 Sep 2014 - 9:28 am | मदनबाण

तिने ती स्तनाग्रे दाखवण्यासाठीच तसले कपडे घातले हा निष्कर्ष काढणे चूक वाटते.
कोणताही निष्कर्ष मी काढण्याची घाई करत नाही,ज्या प्रकारचा टी-शर्ट तिने घातला होता त्यावरुन तरी तिला स्वतःला आपली स्तनाग्र व्यवस्थीत दिसत आहेत याची कप्लना होती. हे एकच उदा. दिले अशी अनेक उदा. पाहिली आहेत आणि पाहतो.बर्‍याचदा पुरुषाची आपल्या उरोजाकडे किंवा आपल्या देहाकडे नजर गेल्यावर ओढणी नीट करणार्‍या स्त्रीया देखील मी पाहिल्या आहेत आणि ओढणी असुन सुद्धा उरोजाचे प्रदर्शन करणार्‍या स्त्रीया पाहिल्या आहेत. तेव्हा कोण कसे आणि का वागते याचा योग्य निष्कर्ष काढण्यास मी बर्‍यापैकी समर्थ आहे,अर्थात प्रत्येकवेळी स्त्रीया मुद्दामुनच करतात असे माझे अजिबात म्हणणे नाही.

मला स्वतःला उगाचच अंगप्रदर्शन केलेले आवडत नाही.
माझे सुद्धा हेच मत आहे.

पण केवळ बलात्कार होतील या भितीने बीचवरही जीन्स आणि टी शर्ट घालून फिरावे अशीही अपेक्षा नाही. जिथे जे योग्य दिसेल तिथे ते कपडे घालावे.
जिथे योग्य दिसेल तिथे म्हणजे नक्की कुठे ? परदेशात न्यूड बीच असतात,म्हणुन आपल्या देशातल्या स्त्रीया दादर चौपाटीवर त्या अवस्थेत झोपलेल्या मी तरी पाहिल्या नाहीत.

केवळ ते तसले कपडे घातले म्हणून काही इतरांना बलात्कार करायचे आमंत्रण दिले असे नाही.
ह्म्म... चोरांना देखील या माझ्या घरी आणि चोरी करा असे आमंत्रण कोणी देत नसते, तरी चोर्‍या होतातच ना ? तसे नसते कुलुप आणि तिजोर्‍या यांचा खप झाला नसता. त्यामुळे कोणी चोरीचे समर्थन करत आहे असा निष्कर्ष काढु शकेल काय ? की ही चोरट्यांची मानसिकता आहे असे कोणी म्हणते ? एव्हढे सगळे उपाय करुन देखील चोर्‍या थांबतात का ? आणि चोर्‍या थांबत नाहीत म्हणुन कोणी सुरक्षतेतेचे उपाय करणे टाळतात का ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हिंदी-चिनी.. नेमके काय?

>>परदेशात न्यूड बीच असतात,म्हणुन आपल्या देशातल्या स्त्रीया दादर चौपाटीवर त्या अवस्थेत झोपलेल्या मी तरी पाहिल्या नाहीत.
'जिथे जे योग्य दिसेल तिथे ते कपडे घालावे.' यातून तुम्ही जे लिहीलंय तोच अर्थ निघतोय. बाकी तुमची संस्कृतीरक्षकाचा आव आणण्याची पद्धत प्रचंड आवडली आहे.

जाता जाता: पाड पडो !! ;)

बाकी तुमची संस्कृतीरक्षकाचा आव आणण्याची पद्धत प्रचंड आवडली आहे.
हॅहॅहॅ... असाच आव आम्ही आम्हाला अभिनय कळतो ते दाखवण्यासाठी आणला होता बरं का... ;)
प्रिय माधुरीस

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हिंदी-चिनी.. नेमके काय?

तेच तेच जूने प्रतिसाद मला "नविन" असे का दिसत आहेत? मोठया अपेक्षेने मी धागा उघडतो आणि जुनाच प्रतिसाद नविन म्हणून दिसला की पदरी* निराशा पडते.

*शब्दशः अर्थ घेऊ नये. नाही तर हल्ली बायकांच्याही कपडयांना पदर नसतो वगैरे म्हणत सन्माननिय मिपाकर सुरु होतील...

जगदीश खेबुडकरांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारे बिनडोक प्रतिसाद पाहून धड मनोरंजनही झालं नाही. ओरडायचा मक्ता घेतला की केजरीवालसारखं दिसेल त्याला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे ह्या फ्याशनमुळेच या स्यूडोस्त्रीवाद्यांना कोणी भाव देत नाही.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Sep 2014 - 9:04 am | विश्वनाथ मेहेंदळे

तो tangent मारण्याचे श्रेय सूड ला :-)

प्यारे१'s picture

18 Sep 2014 - 1:38 pm | प्यारे१

जगदीश खेबुडकरांनी 'पिंजरा' चित्रपटाची गाणी लिहीलेली होती एवढंच ठाऊक आहे.

अर्धवटराव's picture

18 Sep 2014 - 1:02 am | अर्धवटराव

अपेक्षेप्रमाणे शंखनाद झालेला बघुन अत्यानंद झाला :)

अवांतरः बलात्कार करण्याची मानसीकता हि "पुरुषी" मानसीकता आहे हा नविन बोध या (आणि इतर तत्सम) धाग्यातुन झाला. जर रोगाचं निदानच चुकीचं असेल तर त्यावर उपचार तरी कसे करता येतील??

बॅटमॅन's picture

18 Sep 2014 - 1:26 am | बॅटमॅन

स्यूडोस्त्रीवाद्यांची धाव पुरुषांना शिव्या घालण्यापर्यंतच.

बाहेर पडताना आपण चपला घालतो कारण रस्त्यात कुठे काचा, साप, विंचू, घाण असेल तर आपल्याला त्याचा उपसर्ग होऊ नये. आपण आपले रक्षण करीत असतो. तसेच, समाजातही साप, विंचू, काचा, घाण अशी माणसं असतात त्यांच्या पासून ही सतत आपले रक्षण करणे ह्यातच शहाणपणा असतो. जिकडे तिकडे 'पुरुषी मानसिकता' 'पुरुषी मानसिकता' अशी लेबलं चिकटवत फिरण्याने समस्येचे समाधान होत नसते. स्वतःलाच काळजी घ्यावी लागते.

ह्या सारखं साधं, सरळ व चपलख उदाहरण देखील समजून घेण्याची तयारी नसेल तर पुढचं बोलणचं खुंटलं.

असो, मला वाटतं की ह्या धाग्यात किंवा मिपावर आधी झालेल्या चर्चांमधून देखील कोणीही बलात्काराचं अथवा बलात्कार करण्यार्‍यांचं समर्थन केलेलं आठवत नाही.

बलात्कार करण्यार्‍या लोकांची विकृत मनोवृत्ती ठेचून त्यांना कायद्याप्रमाणे अतिशय कडक शिक्षा (ती सुद्धा लवकरात लवकर) झालीच पाहीजे. मगच बाकीच्या हरामखोरांना असली निच कृत्य करण्यापासून जरब बसेल.

ह्याबद्दल येथे कोणाचेही दुमत नसेल अशी आशा बाळगतो.

नानासाहेब नेफळे's picture

18 Sep 2014 - 10:34 am | नानासाहेब नेफळे

एक चुटका आठवला
एका वर्तमानपत्रात "५० टक्के स्त्रीया मुर्ख असतात" असे छापून येते ,लागलीच स्त्रीवादी संघटनांचा संपादकांना घेराव पडतो व बातमीविषयी माफी मागावी अशी तंबी त्या संपादकांना भरतात.
दुसर्या दिवशी वर्तमानपत्रात "५० टक्के स्त्रीया मुर्ख नसतात "अशी बातमी येते ,ती वाचून मग स्त्री संघटनांचा राग शांत होतो.
.
.
या चर्चेतल्या काही स्त्री आयडींचे लॉजिक पाहून उपरोक्त चुटका खरा असावा यावर विश्वास ठेवावा लागत आहे.

विलासराव's picture

18 Sep 2014 - 10:54 am | विलासराव

चुटका आवडेश.

बाकी कोण कीती मुर्ख आहे याच्याशी काहीही घेणेदेणे नाही.

तरीही दासबोधातील मुर्खांची लक्षणं वाचुन मीच मुर्ख आहे असा बोध झाला होता.

स्पा's picture

18 Sep 2014 - 11:11 am | स्पा

१००

यो डॉक, यु रॉक !!!

सुबोध खरे's picture

18 Sep 2014 - 1:26 pm | सुबोध खरे

मी निर्मल तशी का वागली याचे कोणतेही समर्थन किंवा स्पष्टीकरण दिले नाही. किंबहुना ती तशी का वागत होती हे आम्हालाच( काही डॉक्टर ना) नक्की कळले नव्हते. जसे होते तसे यथातथ्य लिहिले आहे.
हा लेख लिहिण्याचे साधे कारण हे आहे कि मृत्यूचे दर्शन झाल्यावर माणसाची वृत्ती बदलते.
येथे मला एक स्वामी विवेकानंदांचे उदाहरण द्यावेसे वाटते. एक अत्यंत लोभी अशा कलकत्याच्या मारवाड्याची भेट झाली असता स्वामीजी त्याला म्हणाले, "अरे तू काय करतो आहेस याला लुट त्याला पिळून काढ काय तुझे जीवन? तू एक आठवड्यात मरणार आहेस. यावर त्या मारवाड्याचा चेहरा एकदम उतरला. तो घरी गेला. रात्रभर विचारामुळे तो झोपला नाही. सकाळी उठून पुढचे चार पाच दिवस त्याने ज्या ज्या माणसाना लुबाडले होते त्यांना त्यांचे पैसे परत केले. आपली व्यवहाराची सर्व निरवा निरव केली. आणी तो शांतपणे मृत्यूची वाट पाहू लागला. सात दिवस गेले अथवा दिवस गेला आणी तो मेलाच नाही. तो थोड्याशा रागाने स्वामीजींना भेटायला गेला आणी म्हणाला आपण म्हणालात तसा मी काही ७ दिवसात मेलो नाही. स्वामीजी हसून त्याला म्हणाले आता तू जो जिवंत आहेस तो पुनर्जन्मच नाही का म्हणजेच जुना मारवाडी मेला आणी तुझा पुनर्जन्म झाला.
उद्या आपला मृत्यू होणार आहे असे समजून जो माणूस वागतो तो आपल्या जीवनाचे सार्थक करू शकतो.
exhibitionism च्या केसेस मी पुष्कळ पहिल्या आहेत विशेषतः वन्ध्यत्व विभागात. जेथे पुरुषाच्या तपासणीत काही वैगुण्य आढळत असे तेंव्हा त्यांच्यापैकी काही बायकांची वागण्याची पद्धत बदललेली दिसून आली होती पण तो या लेखाचा विषय नव्हता.
असो विषय फार भरकटला.

दुदैवानी काही उथळ प्रवृत्तिनी प्रतिसादुन धाग्याचा विचका केला. :(

मृत्युन्जय's picture

18 Sep 2014 - 3:59 pm | मृत्युन्जय

स्त्रियांच्या कपड्यांबद्दल आणी बलात्कार्‍यांच्या मानसिकतेबद्दल एकमत झाल्यावर कृपया अंतिम निर्णय कोणीतरी गोषवारा करुन इथे सांगावा.

पैसा's picture

18 Sep 2014 - 4:09 pm | पैसा

एक जण हिब्रूत बोलतोय अन दुसरा तमिळमधे बोलतोय असं समज. दोघांनाही एकामेकांची भाषा येत नसेल तर? किंवा "मी याला धोपटून काढणारच" असं कोणी ठरवलं असेल तर?

प्रभाकर पेठकर's picture

18 Sep 2014 - 4:16 pm | प्रभाकर पेठकर

'बैल डोळा' छेदला आहे.