कस्टर्ड ड्रॅगन (Translated Poem)

शुचि's picture
शुचि in जे न देखे रवी...
12 Jan 2014 - 10:18 pm

इवल्याशा खेड्यातील इवल्याशा घरात
बेलिंडा रहात असे सुखात आनंदात
तिच्याकडे होता एक उंदीर, मांजर, कुत्रा
लहान लाल गाड़ी अन ड्रॅगन एक भित्रा
.
मांजराचे नाव तिने ठेवले होते इंक
कार्ड़याशा उंदराला ती हाक मारे ब्लिंक
पिवळा कुत्रा वागायला होता मोठा परखड़
त्याचे नाव मस्टर्ड अन ड्रेगनचे कस्टर्ड
.
कस्टर्ड दिसे भयंकर फार खूंखार
अंगावरती खवले त्याची नखे धारदार
मुख त्याचे आग ओके नाक धूर फेके
त्याला पाहताच सर्वांची उड़े फेफे फेफे
.
बेलिंडाच्या शौर्याला नव्हता पारावार
साहसी इंक-ब्लिंकही सिंहास पळवित पार
मस्टर्ड होता शूर त्याची वाघास वाटे भीती
कस्टर्डच्या मागे मात्र ब्रह्मराक्षस भीतीपोटी
.
बेलिंडा कस्टर्डला गुदगुल्या करून छळे
इंक-ब्लिंक-मस्टर्ड त्याची खोडी काढून पळे
मग सगळे हसत खो-खो बसून लाल गाडीत
कस्टर्ड रडवा होई, नसे समजूत कोणी काढीत
.
बेलिंडाचे हसून हसून पोट लागे दुखू
ब्लिंकला लोळण घेता आवरत नसे हसू
इंक अन मस्टर्ड त्याला टप्पल मारून पळत
बिच्चार्या ड्रॅगनला सगळे मिळून छळत
.
असेच दिवस चालले होते आले एकदा संकट
अचानक लाल गाडीवर झाली जोरात खटखट
इंक म्हटली म्याऊँ जेव्हा मस्टर्ड गुरगुरला
बेलिंडा हादरली समुद्री चाचा घरात शिरला.

डाव्या हातात पिस्तूल, उजव्या हातात पिस्तूल
दातात धरुन सुरा तो आला रागात चालून
दाढ़ी त्याची काली अन एक लाकडाचा पाय
विद्रूप किती त्याच्या मनात दडले होते काय?
.
बेलिंडाने केला मनात धावा देवाचा
मस्टर्डने गुपचूप पाय काढता घेतला होता
इंक मांजर घाबरून बघत बसली सोफ़्याखालॊन
ब्लिंक उंदीर केव्हाचा बसला बीलात शिरून
.
कस्टर्ड मात्र उथला, झेप त्याने घेतली,
खवलेदार मजबूत शेपूट रागाने आपटली
खाँणकण आवाज झाला त्याचा आवेश होता मोठा
चाचाला एका झेंपेत त्याने झोपवला
.
चाचा वाटले नव्हते होईल असे काही,
तोंडाला बाटली लावून औषध तो पीई.
गोळ्या त्याने झाडल्या केला प्रतिकार
पण ताबडतोब झाला तो कस्टर्ड चा आहार
.
बेलिंडा ने मारली मीठी आले तिला भरुन
मस्टर्डनेही आनंद व्यक्त केला शेपूट हलवून
इंक ब्लिंक बाहर आले, ते होते थरथरत
कसेबसे कस्टर्डला म्हटले thank You कापत
.
अजूनही गेलात तुम्ही त्या खेड्यात
दिसेल लाल लाल गाड़ी उभी मोठ्या झोकात
आजही बेलिंडा त्याला गुदगुल्या karun छळते
अजून इंक-ब्लिंक-मस्टर्ड खोड़ी काढून पळते
.
अजूनही भित्रा कस्टर्ड रडवेला होतो
अजूनही ब्लिंक हसत हसत loLaN घेतो
अशी आहे गंमत आपल्या भित्र्या ड्रॅगन ची
बिचार्याच्या मागे ब्रह्मराक्षस भीतीपोटी.

हास्यबालगीत

प्रतिक्रिया

हे भाषांतर नाही आहे. रुपांतर आहे. कारण थोड़ा बदल आहे.
मूळ कविता - http://www.eecs.harvard.edu/~keith/poems/Custard.html

शुचि's picture

13 Jan 2014 - 2:49 am | शुचि

Very very small changes are incorporated. It sounds better now -

इवल्याशा खेड्यातील इवल्याशा घरात
बेलिंडा रहात असे सुखात आनंदात
तिच्याकडे होता एक उंदीर, मांजर, कुत्रा
लहान लाल गाड़ी अन ड्रॅगन एक भित्रा
.
मांजराचे नाव तिने ठेवले होते इंक
करड्याशा उंदराला ती हाक मारे ब्लिंक
पिवळा कुत्रा वागायला होता मोठा परखड़
त्याचे नाव मस्टर्ड अन ड्रॅगनचे कस्टर्ड
.
कस्टर्ड दिसे भयंकर फार खूंखार
अंगावरती खवले त्याची नखे धारदार
मुख त्याचे आग ओके, नाक धूर फेके
त्याला पाहताच सर्वांची उड़े फेफे फेफे
.
बेलिंडाच्या शौर्याला नव्हता पारावार
साहसी इंक-ब्लिंकही सिंहास पळविती पार
मस्टर्ड होता शूर त्याची वाघास वाटे भीती
कस्टर्डच्या मागे मात्र ब्रह्मराक्षस भीतीपोटी
.
बेलिंडा कस्टर्डला गुदगुल्या करून छळे
इंक-ब्लिंक-मस्टर्ड त्याची खोडी काढून पळे
मग सगळे हसत खो-खो, बसून लाल गाडीत
कस्टर्ड रडवा होई, नसे समजूत कोणी काढीत
.
बेलिंडाचे हसून हसून पोट लागे दुखू
ब्लिंकला लोळण घेता आवरत नसे हसू
इंक अन मस्टर्ड त्याला टप्पल मारून पळत
बिच्चार्या ड्रॅगनला सगळे मिळून छळत
.
असेच दिवस चालले होते आले एकदा संकट
अचानक लाल गाडीवर झाली जोरात खटखट
इंक म्हटली म्याऊँ जेव्हा मस्टर्ड गुरगुरला
बेलिंडा हादरली समुद्री चाचा घरात शिरला.

डाव्या हातात पिस्तूल, उजव्या हातात पिस्तूल
दातात धरुन सुरा तो आला रागात चालून
दाढ़ी त्याची काळी अन एक लाकडाचा पाय
विद्रूप किती ध्यान! त्याच्या मनात दडले काय?
.
बेलिंडाने केला मनात धावा देवाचा
मस्टर्डने गुपचूप पाय काढता घेतला होता
इंक मांजर घाबरून बघत बसली सोफ़्याखालून
ब्लिंक उंदीर केव्हाचा बसला बीलात शिरून
.
कस्टर्ड मात्र उठला आता, झेप त्याने घेतली,
खवलेदार मजबूत शेपूट रागानत आपटली
खाँणकण आवाज झाला त्याचा आवेश होता मोठा
चाचाला एका झेंपेत त्याने झोपवला
.
चाचाला वाटले नव्हते होईल असे काही,
तोंडाला बाटली लावून औषध तो पीई.
गोळ्या त्याने झाडल्या केला प्रतिकार
पण ताबडतोब झाला तो कस्टर्ड चा आहार
.
बेलिंडा ने मारली मीठी आले तिला भरुन
मस्टर्डनेही आनंद व्यक्त केला शेपूट हलवून
इंक ब्लिंक बाहेर आले, ते होते थरथरत
कसेबसे कस्टर्डला म्हटले thank You कापत
.
अजूनही गेलात तुम्ही त्या खेड्यात
दिसेल लाल लाल गाड़ी उभी मोठ्या झोकात
आजही बेलिंडा त्याला गुदगुल्या करुन छळते
अजून इंक-ब्लिंक-मस्टर्ड खोड़ी काढून पळते
.
अजूनही भित्रा कस्टर्ड रडवेला होतो
अजूनही ब्लिंक हसत हसत लोळण घेतो
अशी आहे गंमत आपल्या भित्र्या ड्रॅगन ची
बिचार्याच्या मागे ब्रह्मराक्षस भीतीपोटी.

बर्फाळलांडगा's picture

13 Jan 2014 - 3:12 am | बर्फाळलांडगा

इत्क्याने आम्ही गत्परान होणार नाही

इन्दुसुता's picture

13 Jan 2014 - 8:33 am | इन्दुसुता

मजेदार!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Jan 2014 - 9:11 am | ज्ञानोबाचे पैजार

फारच मस्त आवडली

कवितानागेश's picture

13 Jan 2014 - 1:02 pm | कवितानागेश

गमतीदार. :)
'कस्टर्ड' वाचून मला वाटलं पाकक्रुती टाकलीये की काय शुचिताईनी?!

मदनबाण's picture

14 Jan 2014 - 10:35 am | मदनबाण

मस्त...

पैसा's picture

21 Jan 2014 - 2:52 pm | पैसा

मजेशीर!

मुक्त विहारि's picture

21 Jan 2014 - 8:07 pm | मुक्त विहारि

भाषांतर मस्त जमले आहे.