अर्थक्षेत्र भाग - २ (पहिल्या लॉस नंतरची सुरुवात )

ज्ञानव's picture
ज्ञानव in अर्थजगत
20 Dec 2013 - 10:55 am

===================================================================================
अर्थक्षेत्र भाग १ (शेअर मार्केटमधला पहिला लॉस )
===================================================================================
बापट आशेने आले होते. मला माझा पहिला ट्रेड आणि पहिला लॉस आठवला कुणा एका डीलरने मला असेच हिंदुस्तान मोटर्स मध्ये दोन दिवस प्रोफिट करून दिला आणि चटक लागल्यावर गंडवले. पण असे बरेच बापट (बापट ह्या शब्दाचा अर्थ एके काळी अर्धा असा होता.. हल्ली काय आहे माहित नाही.)मी तेव्हा पासुन आज पर्यंत पाहतो आहे.
पूर्वी आम्ही दलालांना "धोतीवले" म्हणत असू. दलाल स्ट्रीटवर सरकारी कार्यालायासारखी अजागळ ऑफिसेस, लाल कपड्यात बांधलेल्या खाते वह्या म्हणजे एकेका गुंतवणूक दाराचे मढे बांधून ठेवले आहे असे वाटे. प्रत्येक खतावणी ओरडून ओरडून काहीतरी "झोल" तीच्या पोटात लपवला आहे हे सांगायची. ब्रोकर्सचे, जॉबर्सचे आणि इतर पंटर ह्यांचे इतके हातखंडे आणि इतके झोल पहिले की त्रास व्हायचा कधी कधी "अरे आपण कोण आणि कुठे कोणाच्यात आलोय?" असे वाटे. त्यांचे सगळे गोंधळ, चोरी-चपाटी इथे लिहिणे हे प्रयोजन नाही. कारण ते रंजक जरूर होईल पण त्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही कारण आपण ब्रोकेर कसे फसवतातपेक्षा स्वतःला गुंतवणूकदार म्हणवणारे बापटांसारखे कसे फसतात किंबहुना का फसतात? हे जाणून घ्यायला हवे.

ह्या "धोतीवाल्यांची" तत्वे ठरलेली होती की ज्याच्याकडे पैसे आहेत मग तो एखादा स्वतंत्र गुंतवणूकदार असो की भली मोठी बँकेसारखी सिस्टीम असो त्यांचा पैसा माझ्या तिजोरीत कसा येईल आणि त्यासाठी ते वाटेल त्या युक्त्या लढवत होते. आज रूप बदलून चकचकीत ऑफिसेस आली आहेत. तुमचा फॉर्म भरून घेतलेला माणूस नंतर आयुष्यात कधीच तुम्हाला दिसत नाही त्यामुळे तुम्हाला त्याने काय सांगितले ह्यावर कंपनी उडवाउडवीच करते. कॉल सेंटर नामक एक भला मोठा फ्रोड आहे जो यांत्रिक पोपटपंची करतो थोडक्यात जसे पूर्वी सामान्य माणूस थेट दलालाला भेटू शकत नव्हते तसेच आजही आहे. फक्त फौज वाढली त्यांची नावे बदलली आहेत. त्यामुळे "धोतीवाले" "कॉर्पोरेट धोतीवले"
झाले आहेत.
मग प्रश्न असा उरतो की बापट त्यांनी काय करायचे?

ब्रोकर आणि बापट हा बुद्धिबळाचा डाव मांडून बसलेली लोके आहेत पण दुर्दैवाने बापट ब्रोकेरला प्रतिस्पर्धी ना मानता आपलाच एक भिडू आपल्या मागे उभा राहून आपल्याला मार्गदर्शन करतोय असे समजून बसलेत...इथे मेख आहे.
तर ब्रोकर हा एक सेवक आहे इतकेच त्याचे महत्व तो सल्ला गार कधी नव्हता आणि नसणार आहे. आपला खेळ आपण आपल्याच बुद्धिवर खेळायचा आहे. मग त्यासाठी
१)प्रायमरी : बाजार म्हणजे काय? बाजारात वापरल्या जाणार्या भाषेचे अर्थ किंवा "टर्मिनॉलोजी".

२)सेकंडरी : शेअर निवडीची प्रक्रिया कशी असते. खरेदी-विक्रीच्या वेळा कशा जाणून घ्याव्यात त्या करिता कोणते
निकष लावायला हवेत. कोणते टूल्स आपण वापरू शकतो.
ते किती सोपे किंवा किचकट आहेत मला जमण्यासारखे कोणते आहेत.

३)हायर सेकंडरी: प्रत्यक्ष ट्रेडिंग, गुंतवणूक कशी करावी? त्याबाबतीत माझे नियम काय असावेत? केलेल्या
गुंतवणुकीबाबतची नोंद, हिशोब, पडताळे ह्या बाबतची खबरदारी कशी घ्यावी.

हे सगळे तुम्ही करणार का बापट? त्यावर बापट त्रासून म्हणाले "हो !पण अरे ह्या वयाला हे सगळे शिकू म्हणतोस?"

म्हंटले "जर हे शिकून समजून घेतलेत तर तोच तुमचा भांडवल बाजारातला पाहिला नफा असेल जो भांडवल म्हणून आयुष्यभर तुम्हाला उपयोगी पडू शकतो."

प्रतिक्रिया

जेपी's picture

20 Dec 2013 - 11:01 am | जेपी

वाचतोय.

शैलेन्द्र's picture

20 Dec 2013 - 11:41 am | शैलेन्द्र

छान, वाचतोय, येवूच द्या

मालिका छान चाललीय पण जरा मोठे भाग टाकलेत तर बरे होईल.

अमित खोजे's picture

20 Dec 2013 - 10:45 pm | अमित खोजे

माझीही अगदी अशीच अवस्था होते आहे. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक तर करायची आहे. परंतु त्यासाठी काहीच माहिती नाही. कसे करायचे माहित नाही. तुमचे लेख वाचून थोडी थोडी माहिती होत आहे. वाचनखुणा साठवत आहे. शेवटी आपल्या पैशांची आपणच काळजी घायची असते हेच खरे. ते जर का ब्रोकर कडे त्याच्या भरोशावर दिले कि संपलेच म्हणून समजा. अभ्यासाला पर्याय नाही.

मुक्त विहारि's picture

20 Dec 2013 - 10:58 pm | मुक्त विहारि

तुम्ही फार सुंदर लिहीत आहात.

मारकुटे's picture

21 Dec 2013 - 12:18 pm | मारकुटे

वाचतोय

चाणक्य's picture

21 Dec 2013 - 1:00 pm | चाणक्य

.

सांश्रय's picture

22 Dec 2013 - 9:35 pm | सांश्रय

मला एक प्रश्न पडला आहे कि, ट्रेडिंगसाठी एजन्सी आणि डीलरची आवशकता असते का? तसेच ट्रेडिंग हे एजन्सी शिवाय करिता येते का?

करता येणार नाही. ब्रोकर्स तुम्हाला ट्रेडिंग प्लॅटफॉम उपलब्ध करून देतात. डीलर फक्त तुमची ओर्डर कम्प्लीट करतो. पण जर ओनलाईन ट्रेड तुम्ही करत असाल तर तुम्हीच डीलर चे काम घरी बसून करत असता.
(बेकायदेशीररित्या तुम्ही ब्रोकरविनाही ट्रेड करू शकता पण मग ते बेकायदेशीर असल्याने त्याचे परिणाम तसेच व्हायचे)

"ब्रोकर्स तुम्हाला ट्रेडिंग प्लॅटफॉम उपलब्ध करून देतात. डीलर फक्त तुमची ओर्डर कम्प्लीट करतो." हे मला माहित नव्हते.
"पण जर ओनलाईन ट्रेड तुम्ही करत असाल तर तुम्हीच डीलर चे काम घरी बसून करत असता."
म्हणजेच डीलर ला बाजूला काढून आपण स्वतः ऑनलाईन ट्रेडिंग करू शकतो. कारण ओर्डर प्लेस करणारा हा डीलरच असतो, बरेचदा तो ओर्डर वेळेत प्लेस करत नाही, असा अनुभव आहे, हे डीलर चे काम आपण स्वतः घरी बसून करू शकत असल्यास, ऑनलाईन ट्रेडिंग कसे करायचे हे मात्र व्यवस्थितच शिकायला लागेल.
धन्यवाद .

प्रसाद१९७१'s picture

24 Dec 2013 - 3:55 pm | प्रसाद१९७१

ऑनलाईन ट्रेडिंग - म्हणजे काही अवघड नसते हो. तुम्ही जर इंटरनेट वरून पुस्तके, किंवा कपडे खरेदी करु शकत असाल. किंवा गेला बाजार मोबाइल किंवा वीजेचे बील भरत असाल तर हे जमणे सहज शक्य आहे.
ट्रेडिंग ऑन्लाइन आहे का तुम्ही ते कोणाला करायला सांगताय, ह्या पेक्षा तुम्ही काय करताय हे महत्वाचे आहे.

ज्ञानव's picture

23 Dec 2013 - 10:46 am | ज्ञानव

पण तो ऑपरेशनल भाग झाला.
मुळात ट्रेडिंग आणि गुंतवणूक ह्यातला फरक आणि ह्यांची सांगड घालणे हे जमायला हवे.

मुळात ट्रेडिंग आणि गुंतवणूक ह्यातला फरक आणि ह्यांची सांगड घालणे हे जमायला हवे.
+१