जगात खरंच भुते आहेत काय?

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जनातलं, मनातलं
27 Nov 2013 - 5:07 pm

आगावू टीप :- या धाग्याला मीपा.भूत मंडळींनी उगीचीच फाटे फोडू नयेत. नाही तर अतृप्त आत्मा त्यांच्या मानगुटीवर बसेल .

माझी मुंज १९८८ साली आमच्या गावाला(विसापूर,गुहागर तालुका) झाली. माझ्या मुंजीच्या वेळेची गोष्ट,जे गुरुजी मुंज लावायला आले होते ते आमच्या मामीच्या दापोली तालुक्यातील टेटवली गावचे होते. मुंजीच्या दुसर्या दिवशी सत्यनारायण पूजा सांगून ते निघणार होते म्हणून ते आमच्या कडेच वस्तीला राहिले होते. मग रात्री गप्पांचा फड जमला. होता होता भुतांचा विषय निघाला तेव्हा गुरुजी म्हणाले आमच्या गावाला आहेत भुते आणि जर कोणाला पहायची असतील/ अनुभव हवा असेल तर माझ्या बरोबर चलावे. मी रात्री आमच्या गावच्या वेस कुसेवर घेवून जाईन. पण माझ्या बरोबर चालायचे आणि अजिबात काहीही आवाज झाला, कोणी दिसले तरी मागे वळून पहायाचे नाही. आम्ही तेव्हा लहान होतो असे विषय निघाले तर पुढे काय पुढे काय असे सारखे विचारात असायचो. आणि हा विषय तसा कधी न संपणारा असा.
पुढे मग अनिस बद्दल वाचले आणि जंतर मंतर , झपाटलेपणा , अंगात येणे या विषयी वाचून मनात संभ्रम निर्माण झाला कि या जगात खरोखर भुते आहेत कि नाहित?. मला आलेले म्हणजे प्रत्यक्षात नाही पण ज्याना आले आहेत त्यांचे अनुभाव दाखल असे काही किस्से.
१)१९९७/१९९८ साली मी दाभोळ वीज कंपनी ( पूर्वीची Enron Power proj.) ला कामाला होतो.
शनिवार (अर्धा दिवस) आणि रविवार सुट्टीच्या दिवशी मी भाड्याच्या खोलीत न राहता (कंपनी पासून जवळच असल्याने मी एक खोली तिथे भाड्याने घेतली होती) माझ्या इतर नातेवाईकांकडे गावाला जायचो ते सोमवारी सकाळीच कामावर यायचो. तर असा एक दिवशी मी कुडली-जाम्भारी(गुहागर तालुका) येथे माझ्या सख्खी आत्या राहते तिथे गेलो. घर मोठे होते आणि आजुबाजुला खुप दाट झाडी होती.
जेवणे झाली आणि आत्या , काका माझ्या बरोबर गप्पा मारायला बसले तेव्हा मी म्हणालो कि तुम्ही एवढ्या लांब ३ डोंगराच्या मध्ये आड बाजूला राहता तेव्हा भीती नाही वाटत. तर आत्ये म्हणाली भीती वाटून काय करतोस आणि या घरातच तुला काही अनुभव आला तर मला सांग. कारण माझे आजे सासरे खूप बिड्या ओढायचे; तेव्हा रात्री कधी कधी बिड्या ओढल्याचा वास येतो. तुला पण आज रात्री वास येतो का पाहा. मला तर लग्न होवून इथे आल्यावर यांनी सांगितले तेव्हा विश्वास बसला नव्हता पण नंतर जेव्हा खरोखर वास आला तेव्हा पटले. कारण एवढ्या मोठ्या घरात हे , मी आणी दुर्वास ( त्यांच्या मुलगा) एवढीच माणसे राहतो आणि यांनातर कसलेच व्यसन नाही.
त्या रात्री मी पडवीत खाटेवर (बाज) झोपलो तर मला काहीच जाणवले नाही . मी तु दुसर्या दिवशी कामावर निघुन आलो.
२) माझ्या आई ने आमच्या कळव्याच्या चाळीत राहणारे शेजारी पंडितकाकू यांना बहिण मानले. काही कारणाने त्यांनी चाळीतले घर सोडून १९९५ साली घोडबंदर रोडला पातलीपाडा येथे रहायला गेले. त्या वेळी घोडबंदर रोड म्हनजी जंगल चा भाग होता. आता तेथे खूप वृक्षतोड झालीये. तर या पंडितकाकूंना ४ मुली. एकेदिवशी त्यातील सर्वात धाकटी मुलगी हिला १८/१९ वर्षाची असताना म्हणे घरातच एक मळवट भरलेली बाई वर माडी वरून खाली माझ्या कडे बघतेय/ दिसते असे सागू लागली. त्या बाईला बघितल्यावर ह्या मुलीला ताप यायचा , खूप घाम यायचा. नानाविवध उपाय केले पण काहीच नाही ती मुलगी घरात एकटी थांबत नव्हती. मग आमच्या आईने माझ्या मामाला ही बातमी सांगितली. मामा लालबाग येथे श्रीकृष्ण दुग्धालयात (गणेशगल्ली) कामाला होता. त्याच दुकानात एक मंत्र तंत्र जाणणारा मान्त्रिक होता. त्याना घेवून आमच्या कडे आला. पुढे मीच त्यांना कळव्याहून पातलीपाडा येथे घेवून गेलो. त्यांनी काय केले हे माहित नाही पण त्या दिवसा पासून हे सगळे प्रकार झाले. आता त्या चारही मुलींची लग्न झाली व संसारात सुखी आहेत.

मला कधी असले अनुभव आले नाहीत मी Enron कंपनीत असताना ज्या चाळीत खोली भाड्याने घेतली होती तिथे सगळे भाडेकरू गणपतीला आपापल्या घरी जायचे संपूर्ण चाळीत मी ५ दिवस एकटा राहाचो. आजूबाजुला बोंब मारले तरी कोणी येवू शकणार नाही अशी परीस्तिथी. पण मी मनात काहीच विचार नसल्याने बिनधास्त राहू शकलो. कोणी जर सांगितले की ती जागा बरी नाही तिथे जावू नकोस. तर मात्र मी त्या स्थानी जात नाही भिती म्हणुन समजा हवे तर. पण मुद्दाम म्हाणुन उगिचाच का या विषयाची परिक्षा घ्या.

मधंतरी DISCOVERY CHANNEL वर भुतांविषयी एक सदर चालू होते. त्यात ३ जण वेगवेगळ्या कोनातून कॅमेरे लावून तसेच ghost detector का काही तरी तसेच यंत्र घेवून झपाटलेली स्थळ शोधून काढून भुतांचे छायाचित्र घेण्याच्या प्रयत्न करीत असत.
रेकॉर्डिंग मध्ये काही सापडले तर ते एडिटिंग रूम मध्य जावून स्लो मोशन मध्ये ती चित्र फीत दाखवीत असत.
तू नळीवर ज्या चित्रफीत उपलब्ध आहेत त्या मला तरी खर्या वाटत नाहित.

तुम्हाला काही अनुभाव असतील तर येथे तसे सांगावे.

वावरअनुभव

प्रतिक्रिया

आम्हाला काय माहित भुते आहेत का? आम्हाला मरून किती वर्षे झाली हे सुद्धा विसरून गेलोय

असा पीजे मारायचा मोह आवरवा का नाही असा विचार करतो आहे

कवितानागेश's picture

27 Nov 2013 - 7:13 pm | कवितानागेश

मस्तय पीजे.
साम्गते बाकीच्या भुतांना. ;)

मी_आहे_ना's picture

27 Nov 2013 - 5:19 pm | मी_आहे_ना

१९८८ साली मुंज आणि १९९७ साली एन्रॉन मधे? अरे वा :)
(कॉलिंग अ.आ. गुर्जी...)

प्रमोद देर्देकर's picture

27 Nov 2013 - 5:22 pm | प्रमोद देर्देकर

हो आमची (मी आणि माझ्या मोठ्या भावाची) मुंज जरा उशिरा ने झाली. परिस्थीती दुसरे काय?

मी_आहे_ना's picture

27 Nov 2013 - 5:23 pm | मी_आहे_ना

ओके, फाटा क्लोज्ड

दर्दु काका मुंज म्हणजे काय असते ते ?

प्रमोद देर्देकर's picture

28 Nov 2013 - 10:11 am | प्रमोद देर्देकर

काय्च्या
काइ?
आणि
सारखं दर्दु काका,
दर्दु काका
काय गं मी
लहान आहे
हं तुस
सांगुन
ठेवतो.

जेनी...'s picture

28 Nov 2013 - 10:18 am | जेनी...

बर :-/
लहान दर्दु काका मुंज प्रकार पाहिला नाहि कधी
आम्हि सातारची घाटावरची माणसं , आमच्याकडे नै करत असलं काहि
सो विचारलं ... नाय माहित म्हणुन सांगाना ... असे अंगावर का येताय :-/

प्रमोद देर्देकर's picture

28 Nov 2013 - 10:59 am | प्रमोद देर्देकर

अगं रागावु नाको पुजातै, आणि मला ते अगदि डाविकडे लिहण्यास शिकव कि जरा. म्हन्जे चौकोन लहान कर्ता येइल.
अवांतरः- तु तिकडे अमेरिकेत ना मग तिकडे आता रात्र असेल ना मग तु का़य जागरण कर्तेस काय? कि तुला माहीत नसताना दुसर्या कुणी तुझ्या आयडी ने लिहताहे. बघ बुवा कोणि दिसतंय काय? }:> >:-] >:]

जेनी...'s picture

28 Nov 2013 - 11:04 am | जेनी...

ओ दर्दु काका काय तुमी पण :-/
अहो थँक्स गिविन्ग हॉलिडेझ आहेत संडे पर्यंत सुट्टीयेओ दद्रु काका ... ओह्ह सॉरी सॉरी दर्दु काका
अहो एक मोविए पाहुन झाला आजुन एक पहायचाय ...आत्ताशी तर साडबारा झालेत
सुट्टी का आनंद तुम क्या जानो दर्दु काका :-/

प्रमोद देर्देकर's picture

28 Nov 2013 - 11:14 am | प्रमोद देर्देकर

माग रास त टाइम हाय की तुझ्याकडे. मग शिकिव मला थोडे

यशोधरा's picture

27 Nov 2013 - 5:21 pm | यशोधरा

विसरु नका बरे!

चौकटराजा's picture

27 Nov 2013 - 6:02 pm | चौकटराजा

लहानपणी जादूगार रघुवीर यानी' आपण जादू करताना हातचलाखी करतो . असे करत असताना प्रेक्षकांशी चक्क खोटे असलेले खरे मानण्याची सूचना देतो. मानवात मुळातच गहन विचारापासून दूर जाण्याची प्रवृती असते. गहन विचार हे मनास कष्ट देतात. पण हजारात एखादा वेगळा विचार करणारा माणूस असतो तो आमची जादू ओळखतो. रघुवीर जादूगार एवढे मोठे सदगृहस्थ ते कशाला खोटे बोलतील हे गृहीतच चुकीचे असते हे कायम लक्षांत ठेवा मुलानो ! ' हा त्यांचा उपदेश मनावर खोल ठसा उमटवून गेला आहे. जगातील कोणताही माणूस हा पूर्ण पणे स्वच्छ नसतो. जरा जपूनच कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवावा. मग ते बोलणे मला भूत दिसले असे असो की मला देवाने दर्शन दिले असे असो.

मुक्त विहारि's picture

27 Nov 2013 - 6:59 pm | मुक्त विहारि

पण आजकाल मानव वेशातीलच महाभुते जास्त आहेत.

त्यांना घाबरून ती भुते पण पळून गेली, असे ऐकीवात आहे.

भटक्या .'s picture

27 Nov 2013 - 7:24 pm | भटक्या .

मला तरि अजुन भुत दिसले नहि

भटक्या .'s picture

27 Nov 2013 - 7:24 pm | भटक्या .

मला तरि अजुन भुत दिसले नहि

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2013 - 8:01 pm | अत्रुप्त आत्मा

@नाही तर अतृप्त आत्मा त्यांच्या मानगुटीवर बसेल . >>> http://www.sherv.net/cm/emoticons/rage/creepy-troll-rage-smiley-emoticon.png ह्हा...ह्हा...ह्हा...! असो!

या धाग्या निमित्तानी मला'च (इथे) सुचलेली एक भूता'ची पाककृती द्यावी म्हणतो.

भूत बनविण्याची पाक-क्रुती:-

साहीत्य- एक जोडी धार्मिक वातावरणात वाढलेले-पती/पत्नी, त्यांचं तसच १ श्रद्धाळू अपत्य (वय तीन वर्षापेक्षा जास्त नसावं, नाहीतर रेसीपी संपंन्न होण्यात काही बुद्धीवादी तसेच विवेकी अडचणी येतात), रहाण्यासाठी कोणत्याही देश/प्रदेशातले एक घर, आणी जगातला कुठलाही देश( देश जितका धार्मिक असेल,तितकी पाक-क्रुती दमदार व जोमदार होते)

क्रुती--- प्रथम १ धर्म:श्रद्ध प्र'देश घ्यावा, तो परंपरेनी लडबडीत होइपर्यंत भारुन/माखुन घ्यावा,मग त्यात एका सुशिक्षीत,उच्चविद्याविभुषीत कींवा अशिक्षीत कींवा कश्याही...थोडक्यात ---धार्मिक असलेल्या पती/पत्नींना आणून सोडावे. त्यांना त्यांच्या या अपत्यास शक्यतोवर यथेच्छ धार्मिक संस्कार करण्यास सांगावे, मुल जर का निबर मिळालेलं असेल तर, मधुन मधुन त्याच्यावर 'ऐकत नाहीस आई बाबांचं?...थांब तुला भूत्याकडे देते' असे मंत्र मारावे,यानी पोर चांगलं मऊ पडत,आणी रेसीपी योग्य वळणावर पोहोचते...पोर फारच निबर असेल आणी धर्मश्रद्धेच्या रश्यात बुडत नसेल तर,वरतून एक जाड छडी घेऊन त्याला ''फार अक्कल वाढलीये तुझी,म्हणे आत्मा कुठ्रे असतो?'' असं वरुन खोबरं पेरत खाली टेंबाव...मग त्याला एक श्रद्धेची उकळी येऊ द्यावी... आणी जगात फिरण्यासाठी डीशमधे काढावं... इथे मुलाच्या डोक्यातलं भूत निम्म तयार होतं.. मग हा मुलगा थोडं जरी काही झालं तरी एकदम फॉर्मात येऊन घाबरेल..'माझ्यावर भूत बसलय' अश्या कथा सांगुन शाळेला दांड्या मारेल... झालं... इथुन पुढे त्याच्यावर श्रद्धेचं झाकण टाकून त्याला निवत ठेवलं की त्याच्यातलं भूत तय्यार ... http://www.sherv.net/cm/emoticons/horror/scared-ghost-smiley-emoticon.gif

टीप-स्वतःला आणी नंतर इतरांना फसविण्यासाठी... हे भूत अगदी हुकमी एक्यासारखं तयार राहातं, त्याला नासण्या,अंबण्या विटण्याचं भय फक्त जागरुक प्रशासन,सुशिक्षीत समाजमन या पासूनच असतं ... तेंव्हा ही पाक-क्रुती एकदा तयार का झाली,की सहसा हज्जारो वर्ष खराब होत नाही,अगदी बिनधोक टिकते...

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
आत्म्या'चे अस्तित्व अशिक्षेत असते! http://www.pic4ever.com/images/devil.gif (अशी सही घ्यावी म्हणतोय!)

प्यारे१'s picture

27 Nov 2013 - 8:45 pm | प्यारे१

हे चेपु वर टाकलेलं ना?

पुनर्वाचनाचा लाभ झाला.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2013 - 11:47 pm | अत्रुप्त आत्मा

मुळात हा मिपावर कोनत्या तरी एका धाग्यावर दिलेला प्रतिसाद आहे. नंतर तो मि'मवर आणी मा.बो.वर आणी त्यानंतर मुखपृष्ठा'वर टाकलेला होता. आज इथे देणं गरजेचं वाटलं म्हणून परत इथे! :)

बॅटमॅन's picture

28 Nov 2013 - 12:12 am | बॅटमॅन

भुताचा हसरा चेहरा फार्फार आवडला. त्यावरून आठवले, हीमॅन विरुद्ध स्केलेटॉर या सनातन युद्धात स्केलेटॉरच आमचा फेव्हरीट होता कायम. बेरकी एकदम, आलं अंगावर की घे शिंगावर, नै झेपलं तर जा पळून हा मंत्र जपत कायम हीमॅनला चकवणार...बेष्टंच जबरी.

हा घ्या तुमच्यासाठी एक स्केलेटॉर आत्मूस.

Skeletor

अरे हा मलापण ज्याम आवडायचा ... पळायचा कसला भारी न !
:D

बॅटमॅन's picture

28 Nov 2013 - 12:29 am | बॅटमॅन

आणि पळायचा तेपण एक किलिंग ट्रोल स्माईल देऊन ;) हॅ हॅ हॅ वाली ती कवटी इतकी आवडायची की सर्वत्र तीच चित्रे काढत असे आणि शाळेतल्या बैंची बोलणी खात असे =)) चित्र अर्थात वेताळ आणि स्केलेटॉरचे हायब्रीड असे. धड वेताळाचे तर डोके स्केलेटॉरचे.

अभ्या..'s picture

28 Nov 2013 - 5:49 pm | अभ्या..

आयला बॅट्या तू बी असलाच व्हता व्हय?
म्या काढलेली चित्रं मात्र परफेक्ट असायची. इव्हन ह्युमन अ‍ॅनाटोमी हीम्यान अन पामर वॉकरांची चित्रे पाहूनच शिकलो जास्त. :)

म्या काढलेली चित्रं मात्र परफेक्ट असायची.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते असेच! :)

नायतर आमची चित्रकला म्हणजे......त्याला उपमाही मिळत नाहीये. हात असे कमरेजवळून फुटायचे अन पाय वाकडेतिकडे कसेही. शिवाय कायम साईड व्ह्यू, कारण चेहरा कधी जमलाच नाही. तरीही मी पट्टीचा चित्रकार होतो. पट्टीने सरळ रेषांची चित्रे बरी जमत. निसर्गचित्रातले डोंगर म्हणजे एकजात सगळे समद्विभुज त्रिकोण, आणि कावळे म्हणजे मराठी ४ चा आकडा, फक्त मधले गोंडगोळे कमी करायचे. शिवाय सूर्य म्हणजे वर्तुळपाकळी अन सूर्यकिरणांचे स्पेसिंगही ठरलेले असायचे.
आणि खाली एकच एक अखंड आडवी रेष. जणू डोंगरांना ताकीद देतेय, "याच्या खाली आला तर तंगडं मोडीन".

या अभेद्य रचनेतून नदी कशी आणायची हेही एक मोठे च्यालेंजच. मग एखादा डोंगर खोडणे, खोडूनखोडून चित्रकलेच्या वहीतले पान काळसर दिसणे (कारण चित्र हे दगडावरची रेघ असल्याच्या थाटात दाबून काढले जायचे) , सिमेट्रीसाठी बर्‍याचदा मधला डोंगर खालच्या बाजूने अंमळ खोडल्या जाणे अन एकाच डोंगरातून सूर्य आणि नदी दिसणे वैग्रे मनोहर प्रकार दिसत. अ डान्स ऑफ फायर अँड आईस म्हणजे नक्की काय प्रकार असतो हे तेव्हा कळाले =))

पुढे मग घर तुलनेने सोपे. दोन आयत आणि एक तिरका आयत वरती कौलारू छपरासाठी झाला की झाले. एक दार, दोन खिडक्या आणि वरच्या कौलांजवळ एक वर्तुळाकृती भोक. झालंच तर जवळ एखाददुसरे झाड वैग्रे. ते झाड तसे जमायचे, पण त्याचे डेरेदारपण दाखवताना कधी डाव्या बाजूचा डेरा मोठा तर कधी उजव्या बाजूचा मोठा दिसे, मग परत चिडचीड, अन अर्थातच खाडाखोड.

एवढे झाले की मग कसेबसे रंगवणे. त्यात वॉटरकलरचे काँबिनेशन गंडणे, कधी ते सांडणे, कधी आयत्यावेळी वाटीतले पाणी संपून जाणे, कधी कागद भिजणे, इ.इ. सोपस्कार झाले की एकदाचं चित्र तयार व्हायचं आणि मास्तराला दाखवून शिव्या खायच्या.

गेले ते दिवस.......तेच बरंय तेच्यायला. लै तरास दिला चित्रकलेनं. त्यापेक्षा आवडती कलाकृती म्हणजे वहीचं पान फाडून त्यावर शाईचे ठिपके रँडमलि टाकून कागद फोल्ड करायचा आणि मग उघडायचा. तर्‍हेतर्‍हेचे चित्रविचित्र शेप तयार व्हायचे. मग त्यात कधी बॅटमॅनचा शेप येतो की नाही त्याची प्रतीक्षा करण्यात उत्तम वेळ जायचा. किंवा कागद दुमडून दुमडून चित्रविचित्र कट घेऊन मग उघडण्यात एक मजेशीर ओरिगामी साकारण्यातही तितकीच मजा यायची.

प्रभाकर पेठकर's picture

29 Nov 2013 - 9:43 am | प्रभाकर पेठकर

सेम हिअर, बॅटमॅन साहेब.

कित्ती कित्ती म्हणून सारखेपणा असावा? शब्द अन शब्द अनुभवला आहे.

कित्ती कित्ती म्हणून सारखेपणा असावा? शब्द अन शब्द अनुभवला आहे.

क्या बात पेठकरकाका! समदु:खी भेटल्याचा लयच जब्राट आनंद झाला बगा. :)

मृत्युन्जय's picture

29 Nov 2013 - 1:20 pm | मृत्युन्जय

घ्या. समदु:खी तर आम्हीही आहोत. आम्ही एक आख्खा लेख खर्ची घातला आहे त्यासाठी:

माझी चित्तरकथा
misalpav.com/node/21035

धन्य आहे तुमची चित्तरकथा _/\_ धागा वर काढल्या गेला आहे.

मलाही आठवते, सातवीपर्यंत चित्रकला असे तेव्हा सातवीच्या वार्षिक परीक्षेला चक्क माणसाचे चित्र अंमळ खपेबल काढल्या गेले होते. तेव्हाही स्वतःबद्दल असा आदर दाटून आला होता. स्वतःचीच पाठ थोपटली होती मग एकदम :D

पण या कारचे चित्र बाकी मला तसे बरे जमायचे. अर्थातच आतले लोक सोडून. ही माझी लै आवडती कार होती तेव्हाच्या कार्टूनमधली. वॅकी रेसेस म्हणून कार्टून होते.

mean machine.

इरसाल's picture

29 Nov 2013 - 1:05 pm | इरसाल

काका आणी ब्याट्या सारखीच अमुची चीत्रकला. पोरगी तरीही गोड मानुन घेते बापाचे चित्रविचित्र चित्रकलेचे आकार.
मी कंपनीच्या प्रेझेंटेशन्मधेही असे चित्रे(मशीन शेजारी उभा असलेला मनुक्ष) काढतो लोक त्याला नव्वीन विचार ! असे म्हणुन नावाजतात.

बॅटमॅन's picture

29 Nov 2013 - 2:36 pm | बॅटमॅन

हा हा हा अगदी अगदी =))

मध्ये एकदा मराठी विश्वकोश हाती लागल्यावर त्यात पाश्चात्य चित्रकारांची काही "अ‍ॅब्स्ट्रॅक्ट" चित्रे पाहिल्यावर स्वत:च्या चार गिरगट्यांना चित्र म्हणायची फ्याशन आली होती. चित्रकलेतलं तेव्हाही काही कळत नव्हतं आणि आत्ताही कळत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Nov 2013 - 7:31 pm | अत्रुप्त आत्मा

@हा घ्या तुमच्यासाठी एक स्केलेटॉर आत्मूस.>>> :D अँड द इटर्निया विल बी माईईईई...न!!! http://www.sherv.net/cm/emoticons/horror/creepy-skull-smiley-emoticon.gif

आणी हा घ्या बट्टमण्ण तुमच्यासाठी एक बट्टमण्ण-भुत्त! http://www.sherv.net/cm/emoticons/horror/vampire-bat-smiley-emoticon.gif
=))

ओहो धन्स धनन्स बरं का आत्मूस ;) बट्टमण्णभूत आवडल्या गेले आहे.

भाते's picture

27 Nov 2013 - 8:40 pm | भाते

या विषयावर माबोवर आधीपासुनच एक धागा अस्तित्वात आहे. यावर टिचकी मारून त्याचा जरूर एकदा आस्वाद घ्यावा.
www.maayboli.com/node/12295

आदिजोशी's picture

28 Nov 2013 - 11:40 am | आदिजोशी

धागा आधीपासूनच अस्तीत्वात असला तरी तो मि.पा. वर नसल्याने 'आधीपासूनच' ह्या शब्दाला मि.पा. काँटेक्स्ट मधे काहीच अर्थ नाही. तसेच, जसे तिथल्या लिंका इथे चिकटवता तसेच 'या विषयावर मि.पा.वर आधीपासुनच एक धागा अस्तित्वात आहे' अश्या प्रतिक्रीया तिकडे देता का?

प्रमोद देर्देकर's picture

28 Nov 2013 - 12:47 pm | प्रमोद देर्देकर

धन्स अ‍ॅड्या मला हे सुचले नसते.

भाते's picture

28 Nov 2013 - 3:20 pm | भाते

मी माबो वर सदस्य नाही तर केवळ एक वाचक आहे. त्यामुळे मी माबोवर कुठल्याही प्रतिक्रिया देत नाही अथवा मिपावरील धाग्याच्या लिंका तिकडे चिकटवत नाही. केवळ विषय सारखा असल्याने मी ती लिंक इथे दिली. अनावश्यक असल्यास संमं पैकी कोणीही ती ऊडवण्यास काहीच हरकत नाही आहे.

अग्निकोल्हा's picture

27 Nov 2013 - 11:56 pm | अग्निकोल्हा

इतर काही कामे नसल्यामुळे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Nov 2013 - 11:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

इतके दिवस मिपावर वावरूनही हा प्रश्न पडतोय म्हणजे कमाल आहे ! ;)

जेनी...'s picture

28 Nov 2013 - 12:09 am | जेनी...

हो भुते असतात , आमच्या गावच्या जुन्या घराच्या पाठीमगे भुत आहे . डेन्जरे एक्दम . भ्या दाखवते ते भुत ...

अत्रुप्त आत्मा's picture

28 Nov 2013 - 5:27 am | अत्रुप्त आत्मा

बालिके.... तुला भूत दिसलं,तिथे पाणवठा आहे का गं???

जेनी...'s picture

28 Nov 2013 - 10:22 am | जेनी...

नाहि , माळराण ... भयानक किर्र्र वातावरण ...खुस्पटासारखा आवाज ...
आणि मग ... कर्र ़कर्र कर्र दार उघडल्यासारख ....
आइगं ... भ्या वाटतय .... झोपते बै मी :-/

अत्रुप्त आत्मा's picture

28 Nov 2013 - 7:25 pm | अत्रुप्त आत्मा

@आइगं ... भ्या वाटतय .... झोपते बै मी :-\ >>> अगं जिभ्ले...पाणवठाच असेल,अन् रातीला तु त्यात स्वतःला पाहिलं आणी घाबरलीस! =))

बालिकेचं नवं नाव- ड्यांबिस हडळ!!! =))

जेनी...'s picture

28 Nov 2013 - 8:13 pm | जेनी...

:-/

रुस्तम's picture

29 Nov 2013 - 5:52 am | रुस्तम

अगं जिभ्ले...पाणवठाच असेल,अन् रातीला तु त्यात स्वतःला पाहिलं आणी घाबरलीस !
Rolling laughter

बालिकेचं नवं नाव- ड्यांबिस हडळ!!!
ROFLMAO

स्पंदना's picture

28 Nov 2013 - 4:05 am | स्पंदना

हे बघा जमतय का?
http://www.lanternghosttours.com/?gclid=CO_R8YWDhrsCFcHwpAodI1wAoA येथे अगदी पैसे भरुन हमखास भुते दाखवतात.

ऋषिकेश's picture

28 Nov 2013 - 10:02 am | ऋषिकेश

बलात्कारी, भोंदु बाबा, कर्मकांडे/नाड्या/कसले-कसले नवनवे पुजाविधी वगैरे सांगून लुबाडणारी मंडळी, वेगवेगळ्या चीट-फंडाद्वारे मोठ्या गटाला फसवणारे एजन्ट्स, पोरे/बायकांचा व्यापार करणारे वगैरे अनेक जणं असताना भुते आहेत का हा प्रश्नच कसा पडतो तुम्हाला?

पैसा's picture

28 Nov 2013 - 10:46 am | पैसा

मिपावर किती आहेत ते मोजत होते.

१. अत्रुप्त आत्मा
२. पिवळा डांबीस
३. वेताळ
४. अग्यावेताळ
५. कुबड्या खवीस
६. येडा खवीस

आणखी कोण राहिले असतील तर सांगा.

सुहास..'s picture

29 Nov 2013 - 10:00 am | सुहास..

एक राहिला ...ते म्हणजे कधीतरी भुतासारखच उगवत आणि एकाच प्रतिसादात बोबडी वळवतो ...

क व टी !!

नाखु's picture

28 Nov 2013 - 11:52 am | नाखु

नसावीत कारण:
१.भुता-खेतांचे जे स्वभाव वर्णन (कथा-कादंबर्यातील) वाचलय त्या पेक्शा पाशवी माणस पाहिली आहेत /अनुभवलीत सबब भुतांना काही कामच शिल्लक नाही..आणि दुसरे अति-अति-अवांतर (मधले) कारणः
अस म्हण्त्यात की ईछा अपूर्ण राहिलि की माणसाचं भूत होतं तर भुताची पण ईछा अपूर्ण रहिलि तर त्याचे काय होते?

खर खोटं भुतालाच माहीत..

वेल्लाभट's picture

28 Nov 2013 - 2:17 pm | वेल्लाभट

इथे माणसांची भुतं झालीयत *** !

ग्रेटथिन्कर's picture

28 Nov 2013 - 3:39 pm | ग्रेटथिन्कर

जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत

फुल स्कोप असल्याने इतका आनंद झाला कि प्रतिसाद पण वाचून काढले आणि भीतीने बोटखीळच बसली.

अमोल मेंढे's picture

28 Nov 2013 - 5:17 pm | अमोल मेंढे

आहेत ना... आमच्या कंपनीच्या मालकांचे आडनाव भुते च आहे... अविनाश भुते, नितिन भुते..
त्यांच्या घरात सगळीच भुते आहेत

क्लिंटन's picture

29 Nov 2013 - 8:59 am | क्लिंटन

एकदा दोन भुते गप्पा मारत असतात.

पहिले भूतः काय रे या जगात माणसे असतील का?
दुसरे भूतः छे रे काहीतरी अंधश्रध्दा :)

मृत्युन्जय's picture

29 Nov 2013 - 11:22 am | मृत्युन्जय

अगदी अश्याच प्रकारे ऐकलेला एक विनोदः

अमावस्येच्या काळ्य्याकुट्ट रात्री गावकुसाबाहेरच्या पडक्या वाड्याच्या अंधार्‍या खोलीतल्या एका गंजक्या तुळईवर दोन भुते उलटी लटकत असतात. त्यातले एक भूत कमालीचे घाबरलेले आहे हे अगदी कमालीच्या घाबरलेल्या जिवंत माणसालाही कळत असते. त्यातले दुसरे भूत त्या घाबरलेल्या भूताला समजावत असते "घाबरु नकोस रे बाबा. हे सगळे मनाचे खेळ असतात. घाबरट भूतांनी पसरवलेल्या अफवा बाकी काही नाहे. हे "रजनीकांत" वगैरे असले काही प्रकार नसतात " :)

आमच्या शेजारच्या गावात एक ग्रुहस्थ होते. क्षणात चांगला, क्षणात वेडसर होणारा तो इसम. भर मध्यरात्री जंगलातून गाणी म्हणत जायचे. गावतले लोक म्हणायचे की त्यांना झपाटलय, पण कुठे, कसे हे माहीत नाही. तो माणून वय ५५-५७ ते ७५ अश्या प्रकारे फिरत होता.
मागच्या वर्षी चौकशी केली तर कळले की ते आता बरे आहेत. कसे ते विचारल्यावर कळले की त्यांना कोणालातरी दाखवले होते, त्यांनी सांगितले, के तुमच्या घराजवळ एक पिंपळ आहे, त्याची या माणसाने काहीतरी खोडी काढली आहे.
थोडी चौकशी करता कळले की यांनी त्या पिंपळाच्या पारावर एक दिवस रात्री मोठी आग घातली होती, आणि साधारण तेव्हपासूनच हे वेड सुरु झाले आहे.
त्यांच्या मुलाने पिंपळाला नैवेद्य ठेवला, प्रार्थना केली, आणि हे पूर्ण बरे झाले.