दिवाळी अंक २०१३

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
4 Oct 2013 - 5:22 pm

नमस्कार मिपाकर हो,

कळविण्यास आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या यशस्वी दिवाळी अंकानंतर आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, अशा सर्व प्रकारचे लेखन दिनांक २३/१०/२०१३ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती. कारण व्यनिद्वारे आलेली फाईल अंकात समाविष्ट करणे जरा जिकिरीचे काम आहे. अन्यथा जणू धागाच प्रकाशित करतो आहोत अशा रितीने मिपा एडिटरमधे (इमेज टॅग्जसकट) लिहीलेली पोस्ट तशीच्यातशी एचटीएमएल टॅग्जसहित चोप्य पस्ते करुन टेक्स्ट फाईल (नोटपॅड) जीमेलवर अटॅच करुन पाठवली तरी दिवाळी अंक संपादकांचे काम सोपे होईल.

१. कोणकोणत्या साहित्यप्रकारात लेखन अपेक्षित आहे.
कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, कादंबरी इ. प्रकारचे साहित्य पाठवावे. अंक पीडीएफ स्वरूपातही काढायचा आहे त्यामुळे मल्टिमिडिया फाईल्स असतील तर त्या पीडीएफ अंकात फक्त लिंक या स्वरूपात येतील, तरी दिवाळीच्या निमित्ताने स्वतंत्रपणे प्रकाशित करायला हरकत नाही.

२. कोणत्या प्रकारचे साहित्य स्वीकारता येणार नाही (बंधने -विषय, आकार इत्यादिबाबतची)
नेहमीचे म्हणजे अगदी एकोळी दोनोळी साहित्य पाठवू नये, तसेच उत्सवी अंक असल्यामुळे दु:खी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे.

३. साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : २३/१०/२०१३

४. इतर अटी:
साहित्य दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत दिवाळी अंक संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील. दिवाळी अंकात समाविष्ट न होऊ शकलेलं साहित्य तुम्ही नेहमीप्रमाणे मुख्य बोर्डावर प्रसिद्ध करू शकताच!

५. साहित्य पाठवण्याचा ऑप्शन.
वर लिहिल्याप्रमाणे mipa.sampadak@gmail.com या जीमेल आयडीला पाठवल्यास उपकृत राहू. पण काही कारणाने ते शक्य नसेल तर दिवाळी अंक आयडीला मिपावर व्यनि करावा.

तुमचे सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अजून साधारण १९ दिवस आहेत. तरी सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती! धन्यवाद!

हे ठिकाणधोरणप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

6 Oct 2013 - 7:47 am | मुक्त विहारि

मस्त...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Oct 2013 - 10:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपाच्या दुस-या वर्षी निघणा-या दिवाळीअंकासाठी शुभेच्छा.

संपादक, दिवाळी अंकासाठी कै मदत बिदत लागली तर हाक मारा.

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

6 Oct 2013 - 10:52 am | यशोधरा

मिपाच्या ह्या दुस-या दिवाळी अंकासाठी खूप शुभेच्छा. दर्जेदार दिअं वाचायला मिळेल ह्याबद्दल शंका नाही :)

अभ्या..'s picture

6 Oct 2013 - 1:05 pm | अभ्या..

दिवाली अंकाला खुप खुप शुभेच्छा :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Oct 2013 - 1:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

दिवाळी अंकाला शुभेच्छा ! दिवाळीच्या साहित्यफराळाची वाट पहात आहे :)

दिपक.कुवेत's picture

6 Oct 2013 - 2:23 pm | दिपक.कुवेत

दर्जेदार परत वाचायला मिळणार. आतुरतेने वाट बघतोय.

मदनबाण's picture

7 Oct 2013 - 9:59 am | मदनबाण

दिवाळी अंकास शुभेच्छा ! :)

(फराळ प्रेमी) ;)

स्वाती दिनेश's picture

7 Oct 2013 - 12:40 pm | स्वाती दिनेश

दिवाळी अंकासाठी शुभेच्छा!
स्वाती

क्रमांक एक चे काम - शुभेच्छा !!!

दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठा साठी फोटो / चित्रे यासाठी एखादी स्पर्धा ठेवावी.
तसेच त्या स्पर्धच्या निमित्ताने आलेले फोटो अंकात सहभागी करावेत् ही विनन्ती.

दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठा साठी फोटो / चित्रे यासाठी एखादी स्पर्धा ठेवावी.

सहमत.
.
पण आधी निकष सांगून. किंवा नंतर रसग्रहण तरी,
नुसते एकतर्फी नको.

दोन्ही सूचना आवडल्या. दिवाळी अंक संपादकांपर्यंत पोचतील.

इरसाल's picture

9 Oct 2013 - 2:17 pm | इरसाल

दिवाळी अंकासाठी शुभेच्छा!

ते चोप्य पस्ते मिपाचा युएस्पी झालाय का? वर लेखातही तसे लिहीलेय म्हणुन ?

सुहास झेले's picture

9 Oct 2013 - 3:20 pm | सुहास झेले

सहीच... अंक दर्जेदार असणार ह्यात शंका नाही... खूप खूप शुभेच्छा :) :)

पिशी अबोली's picture

9 Oct 2013 - 9:00 pm | पिशी अबोली

वाचणेके प्रतीक्षामें...
शुभेच्छा.. :)

सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे.

भयकथा बाद का ?? *DONT_KNOW*

भयकथा चालतील असे वाटतेय, कारण त्यात कुणाचा मृत्यु होत नाही पण मेलेली व्यक्ती पुन्हा जीवंत होते. :)

खरतर हे सांगायचे गरज नव्हती कारण पुर्वप्रकाशित साहित्य दिवाळी अंकात पुन्हा प्रकाशित करण्यात काहीच अर्थ नाही.
तरीही मुद्दा वर धाग्यात उल्लेखला नाही म्हणुन
दिवाळी अंकासाठी पाठवलेले साहित्य पुर्वप्रकाशित असु नये. निदान मिपावर या आधी प्रकाशित झालेले साहित्य पुन्हा प्रकाशित करता येणार नाही, कृपया संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

चाफा's picture

10 Oct 2013 - 3:43 am | चाफा

पण मरत असेल कुणी तर ???

स्पंदना's picture

10 Oct 2013 - 3:49 am | स्पंदना

तो त्या कथेचा परिणाम असेल चाफाभाऊ!
कथा उत्कंठा वाढवत नेत असेल, मनात भय उत्पन्न करुन वाचायला उद्युक्त करत असेल, तर तो प्रकार किळसवाणा ठरत नाही. ही एक फार पातळ अन नाजुक रेषा ठरु शकते ठरवण्यासाठी, पण बिभस्त नसेल, मन गुंगवुन ठेवणारी असेल तर चालु शकेल.
मागच्यावेळी मीच लिहीलेली सवाष्ण शेवटी थोडी ट्रॅजीक होत गेली, पण कथेच्या अनुषंगाने जाणारा मृत्यु वेगळा. एकूण या वेळी सणासमारंभात मन उल्हसित असावा असा काहीसा सूर आहे, तरीही अपवाद असतातच. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या लेखनाला कोणीही नाही म्हणु शकणार नाही.

कॅन्सरची कथा आणि अखेर मरण.

शी शू वातनिस्सारण उलटी आदिंची वास्तवपूर्ण वर्णने किंवा त्यावर
बेतलेले विनोद.

इत्यादि शक्यतो टाळावे.

मरणाचा उल्लेखही नको असे नव्हे.

वातनिस्सारण

वाचुन खपलो आहे.

त्यातल्या "स्स" मुळे विसिष्ट फील येतो त्यामुळे ते वाचूनच निर्वाण पावल्या जाते.

सोत्रि's picture

10 Oct 2013 - 9:45 pm | सोत्रि

त्यातल्या "स्स" मुळे विसिष्ट फील येतो

महानिर्वाण जाहले आहे!

- (हसून हसून वातनिस्सारण झालेला) सोकाजी

आदूबाळ's picture

11 Oct 2013 - 11:44 am | आदूबाळ

वासिष्ट फील...

त्यावरून आठवलं, लहानपणी कथा वाचायचो त्यात "अमुक शहरात/ठिकाणी तमुक तमुक वास करून असतो/असते" हे वाक्यही तसेच वाटायचे.

म्हणजे आट्पाट नगरात उत्तानपाद राज वास करायचा. त्याला २ राण्या होत्या... वगैरे वगैरे असच ना ;)

दादा कोंडके's picture

12 Oct 2013 - 11:43 am | दादा कोंडके

आणि लाइफबॉयच्या मराठी जाहिरातीत देखिल, "लाइफबॉय हे जहां, तंदुरुस्ती है वहां" याचं भाषांतर, 'लाइफबॉय जेथे, आरोग्य वास करते तेथे' असं केलेलं असायचं. :)

आदूबाळ's picture

12 Oct 2013 - 2:18 pm | आदूबाळ

नाही नाही

लाईफबॉय ज्याचे घरी
आरोग्य तेथे वास मारी

असं आहे :))

कोमल's picture

10 Oct 2013 - 10:56 am | कोमल

शुभेच्छा.. :)

kalpana joshi's picture

10 Oct 2013 - 1:06 pm | kalpana joshi

दिवाळी अंकासाठी सुभेच्छा . अंध-श्रद्धा ,कर्म कांड , कला ,प्रवास वर्णन ,इत्यादी चालेल का?

पैसा's picture

10 Oct 2013 - 11:11 pm | पैसा

तुम्हाला जे काही पाठवावंसं वाटेल ते पाठवा. प्रकाशित करण्याबद्दल अंतिम निर्णय दिवाळी अंक संपादकांचा असेल.

हसरी's picture

10 Oct 2013 - 3:52 pm | हसरी

चोप्य पस्ते >>>

लेखन आवाहन लिहून झाल्यावर पुन्हा एकदा वाचून पाहिले नाही काय?

पैसा's picture

10 Oct 2013 - 11:09 pm | पैसा

पण ते मिपाच्या सं मं चे लिखाण आहे ना! चोप्य पस्ते हा मिपाकरांचा ट्रेडमार्क आहे!

माम्लेदारचा पन्खा's picture

10 Oct 2013 - 3:53 pm | माम्लेदारचा पन्खा

ह्यावेळी सुधा खमन्ग सहित्य वाचायला मिळणार....आमची खरी दिवाळी मिपावरच असते.....

अनन्न्या's picture

10 Oct 2013 - 9:38 pm | अनन्न्या

पाकॄ नको? त्याशिवाय दुसरे काही येत नाही!

पैसा's picture

10 Oct 2013 - 11:10 pm | पैसा

पाठवून दे.

सोत्रि's picture

10 Oct 2013 - 9:47 pm | सोत्रि

पाकॄ नको

त्यांना बहुदा 'जिलबी' नको असे म्ह्णायचे असावे. :)

- (जिलबीसारखा गोलगोल) सोकाजी

अर्धवटराव's picture

11 Oct 2013 - 1:16 am | अर्धवटराव

तुमच्याकडे काहि खास दिवाळी कॉकटेल वगैरे असेलच ना... नक्की पाठवा. शिवाय अभ्यंगस्नान आटोपल्यानंतर चावडीवर गप्पा मारायला घारुअण्णा गँग देखील आली पाहिजे यंदा.

घारूअण्णांना जोरदार अनुमोदन.

बॅटमॅन's picture

11 Oct 2013 - 12:16 pm | बॅटमॅन

लै दिवस झाले ग्यांग सुट्टीवर गेलीये. आणा आता लौकर. अन हो, चहासोबत अजून काहीतरी मागवले तरी चालेल. वाचकांनाही तेवढाच रुचिपालट.

सोत्रि's picture

12 Oct 2013 - 9:50 am | सोत्रि

तथास्तु!

-(हुकुमाचा ताबेदार) सोकजी

माझ्या जिवाचे मधल्यामधे हाल झाले, मी मारे खून बिन करून मोकळा झालेलो, नियमावली वाचायचे कष्ट घेतले नाहीत हे काही वेगळे सांगायला नको ;) , आता परत हाणामारी करतोय, एखादा खून माफ कराल ना हो संपादक ;)

गवि's picture

12 Oct 2013 - 9:03 am | गवि

खुनी कोण असतो ?? ;-)

स्पंदना's picture

12 Oct 2013 - 10:12 am | स्पंदना

अहो,अहो तुम्ही लेखक मंडळी, आसा जीवाबीवाच हाल नका करुन घेऊ. निवांत हाना मारा चाफाभाऊ. काय लय लागल बिगल कुनाला तर देउ चिरीमीरी. तुमी सुरु ठेवा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Oct 2013 - 10:20 am | डॉ सुहास म्हात्रे

चला चाफासाहेब आता तुम्हाला सगळे खून माफ... खुद्द मिपासंमंकडून पाठिंबा म्हणजे काय ! लागा तलवारीना धार करायला आणि बंदूका साफ करायला... ठरवल्यापेक्षा दोनचार जास्त आत्मे मुक्त झाले तरी आता नो वरीज आणि नाचणीज ;)

निवेदिता-ताई's picture

12 Oct 2013 - 2:44 pm | निवेदिता-ताई

दिवाळी अंकाला खूप खूप शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!!!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Oct 2013 - 6:41 am | निनाद मुक्काम प...

मिपाच्या दिवाळी अंकांचे विशेष म्हणजे सर्व सामन्यांच्या लेखणीतून उतरलेले असामान्य लेखन त्यात उगाच उच्चभ्रू पणाचा लवलेश नाही.

भाते's picture

13 Oct 2013 - 1:24 pm | भाते

सर्व मिपाकर आगाऊ लेखकांना शुभेच्छा.

दिवाळी अंकाची आतुरतेने वाट पहात आहे.

भाते's picture

13 Oct 2013 - 3:53 pm | भाते

कृपया वरील वाक्य "सर्व मिपाकर लेखकांना आगाऊ शुभेच्छा" असे वाचावे.
लिहिताना कळफलक गंडला आणि प्रकाशित करायच्या आधी वाक्य वाचलेच नाही.

मालक/संमं,
कृपया स्वसंपादनाची सोय ऊपलब्ध करून द्यावी ही विनंती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Oct 2013 - 10:19 am | डॉ सुहास म्हात्रे

नक्की ना ? मग हरकत नाही ! :) ;)

भ ट क्या खे ड वा ला's picture

14 Oct 2013 - 10:24 am | भ ट क्या खे ड वा ला

दिवाळी अंकाची वाट पहात आहे.

चौकटराजा's picture

20 Oct 2013 - 10:14 am | चौकटराजा

लेख वर्ड मधे देताना arial unicode ms या फॉन्टचा वापर करावा लागत आहे. यामुळे आपल्याकडे संपादनात काही अडचण
येणार नाही ना ?

पैसा's picture

20 Oct 2013 - 10:44 am | पैसा

युनिकोड कम्प्लायंट काय पण चालेल.

प्रभाकर पेठकर's picture

24 Oct 2013 - 12:04 pm | प्रभाकर पेठकर

दुर्दैवाने, दिवाळी अंकासाठी लेखन देण्यासाठीची तारीख, व्यवसाय व्यस्ततेत, उलटून गेली. मस्कत लेखमालीकेतील पहिला लेख लिहून तयार आहे. तसेच एखाद दूसरी पाककृतीही देण्याचा मानस आहे. २ दिवस वाढवून मिळतील का?

नगरीनिरंजन's picture

24 Oct 2013 - 1:36 pm | नगरीनिरंजन

शनिवार संध्याकाळ्पर्यंत मुदत वाढवून मिळावी ही विनंती.

माझीही शॅम्पेन's picture

24 Oct 2013 - 2:57 pm | माझीही शॅम्पेन

+ २

पेठकर काका, ननि अन माशॅ चालेल जरा दोन दिवसांनी दिला तर, पण फक्त जरा व्याकरण व्यवस्थीत करुन अन मग फाईल न पाठवता डायरेक्ट जीमेल मध्ये चोप्य पेस्त करा.
काही फोटोज असतील तर प्लिज त्यांच्या लिक्स पण द्या.सगळेच फोटोज जरा त्रास देताहेत.
या मुळे लेख ताबडतोब अपलोड करता येइल.
धन्यवाद.

प्रभाकर पेठकर's picture

24 Oct 2013 - 8:44 pm | प्रभाकर पेठकर

सहमत आणि धन्यवाद.

व्याकरण तपासून आणि लेखातच छायाचित्रांच्या पुढे जोडण्या (लिंक्स) देतो. आज रात्री लेख पाठवतो. उद्या पाककृती देईन.

मुक्त विहारि's picture

24 Oct 2013 - 4:31 pm | मुक्त विहारि

वो मिपा का दिवाली अंक का प्रकाशन?

विजुभाऊ's picture

24 Oct 2013 - 4:49 pm | विजुभाऊ

धन्यवाद. लेख तयार आहे. शनिवारी सम्ध्याकाळ पर्यन्त टंकुन देतो

प्रभाकर पेठकर's picture

29 Oct 2013 - 3:28 pm | प्रभाकर पेठकर

दिवाळी अंकाचे दरवाजे बंद झाले का? जरा किलकिले करून एक लेख घेता येईल का? संध्याकाळपर्यंत तयार होईल.

पैसा's picture

29 Oct 2013 - 3:59 pm | पैसा

द्या लौकर!

प्रभाकर पेठकर's picture

29 Oct 2013 - 9:14 pm | प्रभाकर पेठकर

लेख जिमेल पत्यावर, नोटपॅड फाईल जोडून, पाठवला आहे.

मिळाला असल्यास कळवावे. कांही समस्या येत असल्यास तसे कळवावे.

धन्यवाद.

पैसा's picture

29 Oct 2013 - 9:18 pm | पैसा

धन्यवाद! काही समस्या नाही!

सॅगी's picture

29 Oct 2013 - 10:53 pm | सॅगी

दिवाळीनिमीत्त व दिवाळी अंकानिमीत्त सर्व मिपाकरांना शुभेच्छा!!!

(अंकाची आतुरतेने वाट पाहणारा)सागर

राजु भारतीय's picture

29 Oct 2013 - 10:59 pm | राजु भारतीय

दिवाळी अंकाला शुभेछा !

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Oct 2013 - 11:25 am | मिसळलेला काव्यप्रेमी

कधी येतोय?

प्रभाकर पेठकर's picture

30 Oct 2013 - 2:12 pm | प्रभाकर पेठकर

दिवाळी २०१३त..!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Oct 2013 - 2:37 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

साधारणपणे कुठल्या तारखेला मिळेल असे विचारायचे होते.

प्रभाकर पेठकर's picture

30 Oct 2013 - 3:59 pm | प्रभाकर पेठकर

गम्मत केली हो..!

दिवाळी अंकासाठी शुभेच्छा!
पण मला मागच्या दिवाळी अंकाची लिंक देता का कुणी प्लिझ :) खुप शोधतेय सापड्त नाहिये :(

वेल्लाभट's picture

1 Nov 2013 - 1:57 pm | वेल्लाभट

याची पीडीएफ प्रतही मिळते का?