डिजिटल

अभ्या..'s picture
अभ्या.. in विशेष
16 Sep 2013 - 8:39 am
श्रीगणेश लेखमाला २०१३

डीजीटल
.................................................................................

"नीट बे, नीट घे खाल्लाकडली टोकं. झूम करु का अजून नेऊनशानी?
शिंगम म्हणजे शिंगम पायजे. जराबी गंगाजल झाला का, मागची उधारी बी इसरायची."

पाटलाचा अज्या वारकाच्या दुकानात आईन्यात पाहात बोंबलत होता.
अन लक्ष्या वारीक अशा कीती दाढ्या कराव्यात तवा अज्यासारखा ग्यालक्षी घेता येईल हा विचार करत अज्याच्या मिशा कोरत होता.
चार चमच्याच्या सल्ल्याने सिंघम स्टाइल मिशा, दाढी मसाज उरकून अज्याने परटाच्या दुकानात मुक्काम हलिवला.

"ते बामन आला नाय बे अजून. बोर्डावरला मायना तर त्येच लिव्हतय ना. सच्या लाव बे तेला मिस्कॉल"
चार नंबरातला एक नंबर वाजत असतानाच कुलकर्ण्याचा दिप्या पळत आला.
"या देवा, कुठं हायेत चरणकमल? ते सोडा, बोर्डाचा मायना कुठं हाय?"
"मजकूर होय, असतोय की रेडी त्या डीजीट्ल वाल्याकडं"
"यवढं सांगायला चार पुड्या लागत्येत व्हय रं? येकतर ब्ल्याकनं आणताव त्या बी अशा खाऊन थुकताव का बे?"
एवढे बोलत अज्यानं खिसं चाचपलं, व्हय तालुक्याला कमी पडायला नको. तितं मिळनार बी नाहीत ओळखीशिवाय.
.
.
यंदाच्या गणपतीत डिजीटल लावायचं आसं ठरल्यापासूनच अज्याची तयारी सुरु होती. तालुक्याचे डिजीटल पाह्यल्यापासून अज्यालापण आपण बी असं नेतेस्टाइल झळकावं अशी लै तमन्ना होती. नशीबानं अज्याचा वाढदिवस बी चतुर्थीचाच. बाकी पोरावांनी पैसे दिले नाही तरी स्वतःचे थोडे पैसे घालून अन वर्गणीचा आधार घेऊन बोर्ड चढवायचाच हे त्याने फिक्स केले. मुख्य उत्सवमूर्ती जरा लहान झाली तरी हरकत नव्हती पण पाठबळ दाखवायसाठी तरी चार कार्यकर्त्याची फौज पायजे होती. फुकटात झळकायला तयार पोरांनी लगेच माना डोलावल्या.

मंडप मारला की बोर्ड आणायला तालुक्याला जायचं अन हिकडं नाग्या मंडपवाल्यानं परांचा उभारायचा असा प्लान होता.
नान्या, पंक्या, वाश्या असे एकेक नग जमा होत शेवटी बोर्डावर झळकणारी दहा टाळकी अन तीन मोटारसायकलीचं जुगाड जमले. पोटात अन गाड्यात पेट्रोल भरुन तालुक्याला पोचायलाच दुपार झालेली.
डिजीटलवाल्याकडं ही गर्दी. कसबसं घुसून अज्यानं मालकाला गाठलं.

" मालक डिजीटल छापायचय"
"कीती फूट?"
"सोयरे, डिजीटल मोठं आन कलर्फुल्ल पायजे एकदम"
"फूटात साइज सांगा हो. कीती जण आहेत फोटोत?"
"गणपती आन आमी धा जण. अध्यक्षाचा फोटो मोटा पायजे."
"बर बर, फोटो आणलेत का?"
"मोबाईलात हायेत की, चालतेत का?"
"द्या आत ऑपरेटरकडं अन आडव्हान्स माझ्याकडं"

ऑपरेटर नशीबानं शेजारच्या गावातला निघाला. एका आरएमडीवर फोटो गोरे करुन घ्यायचे म्हणजे अज्याला लैच स्वस्तात सौदा वाटला. निदान लक्ष्या वारकाच्या उधारीपेक्षा.

"सोयरे जरा माजा फोटो वरच्या साईडला घेताव का? मंजे हिक्डं गनपती अन हिक्डं मी."
"ह्या नान्याशेजारी मी नगं. आमच्या भैनीमागं लागलय चिनालीचं"
"वाश्या तूच माज्या बायकोचा कलवरा रे. लाजू नगस"
"ते अजयराजे लिव्हा खाली भगव्या कलरमध्ये"

मंडळाच्या चर्चा अन सूचना ऐकून वैतागलेल्या डीटीपी ऑप्रेटरने एका कागदावर सगळा मजकूर अन फोटोचा क्रम लिहून बाहेरचा रस्ता दाखवला.
.
.

चार तासानी बोर्ड हातात पडणार आणि अज्याचा बड्डे शेलेब्रेशन म्हणून मंडळाचा मोर्चा बारकडे वळला. जमा वर्गणीतला अर्धी रक्कम अन चार तास तिथं खर्चून मंडळ उठलं. गठ्ठा बांधलेल्या डिजीटलवर मंडळाचं नाव लिहिलेलं होतं, उरलेली रक्कम अदा झाली की नीट गावाचाकडचा रस्ता दिसू लागला.
अज्याकडून व्याजाने पैसे घेतलेले असल्याने मंडपवाला नाग्या इमानदारीनं बांबूचा अन दंट्याचा परांचा बांधून लोडशेडींगला शिव्या देत बोर्डाचीच वाट पाहात होता.
पंग झालेलं मंडळ अन बोर्डाचा गठ्ठा नाग्यासमोर एकदमच आदळले.
रात्रीच्या अंधारात, मोबाइलच्या उजेडात अन जितंवर पोहोचतेत तितक्या ऊंच गाड्याच्या हेडलाईटात नाग्यानं बोर्ड चढविला.
दुसर्‍या दिवशी सक्काळसकाळी तोंडात ब्रश घोळवत बनियन टॉवेल वर अज्या चौकात आला.
.
.
बोर्डावर गणपतीबाप्पा मजेत हाती मोदक घेऊन बसले होते.

आणि बाप्पांना तुमच्यासाठी कायपण म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार्‍या कार्यकर्त्यात कोपर्‍यात कुठेतरी अज्या सिंघमकट मिशात हसत होता.

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Sep 2013 - 8:49 am | मिसळलेला काव्यप्रेमी

:)
भारी ष्टुरी.
अज्या शिंघम... नावच भारीये राव..

पैसा's picture

16 Sep 2013 - 8:54 am | पैसा

बिच्चारे अजयराजे! काय डिजिटलवाले, लोकांचा असा पोपट करता काय!

प्रचेतस's picture

16 Sep 2013 - 9:18 am | प्रचेतस

हाहाहा.
जबरी बे.
सोलापुराकडची भाषा लै आवडली. लिहित का नाहीस बे सारखा सारखा?

सोलापुराकडची भाषा लै आवडली

वल्ली ही सोलापूरकडची भाषा नाही. हं, थोडा प्रभाव आहे पण ही भाषा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवरची आहे. जास्त करुन उमरगा, लातूर आणि उस्मानाबाद भागात बोलली जाते.
सोलापुरी भाषा मलासुध्दा जमत नाही :(

प्रचेतस's picture

18 Sep 2013 - 4:32 pm | प्रचेतस

हायला.
एकूण भाषांबद्दलचे आमचे ज्ञान शून्यच.
बाकी काहीही असो पण ही बोलीभाषा ऐकायला भारीच बे.

आदूबाळ's picture

16 Sep 2013 - 10:06 am | आदूबाळ

एकच लंबर! मिरासदार, शंकर पाटील वगैरेंची आठवण झाली :) अभ्याभाऊ तुम्ही रेग्युलरली लिहीत रहा...
.
अजयराजेंचा सिंघमकट मिशांमधल्या फटूऐवजी मोबाईलातून चुकून(!) "तोंडात ब्रश घोळवत बनियन टॉवेल" असा फटू आला असता डिजिटलवर तर मज्जा आली असती :))

अत्रुप्त आत्मा's picture

16 Sep 2013 - 10:46 pm | अत्रुप्त आत्मा

+१११११११

ह्याह्याह्या.. लैच भारी..
पर्तेक टाळक्याचा सम्वाद झ्याक हाय बे..

वल्ल्याशी शेहमत.. >> लिहित का नाहीस बे सारखा सारखा?

अत्रुप्त आत्मा's picture

17 Sep 2013 - 12:38 am | अत्रुप्त आत्मा

पुन्ह्यांदा येकदा धा डाव +१

आम्ची सणमाणणीय नव्लेखक अब्याडब्या सोलापुरकर याश अशी विणंती हाए,की त्यांण्णी या इषयातले लेखण कायम आनी वारंवार करावे! धण्यवाद! http://www.pic4ever.com/images/SEVeyesB08_th.gif

या विणंतीला माण न दिल्यास सोलापुर फुड नळदुर्गला प्रतेक्ष येऊन हग्या दम भरनेत येइल...!
या धम्कीचाही या धाग्यावर येता जाता इचार करावा..!
http://www.pic4ever.com/images/155fs853955.gif

अभ्या..'s picture

18 Sep 2013 - 2:25 pm | अभ्या..

सोलापुर फुड नळदुर्गला प्रतेक्ष येऊन हग्या दम भरनेत येइल...!
या धम्कीचाही या धाग्यावर येता जाता इचार करावा.

धमकी??????
च्यामारी करु काय तुमचे बी डीजीटल? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Sep 2013 - 3:59 pm | अत्रुप्त आत्मा

@करु काय तुमचे बी डीजीटल? >>> =)) =)) =))
धमकीतलं प्रेम समजुन घ्येतल ग्येल न्हाय,तर गेम करनेत येइल! :p

बॅटमॅन's picture

18 Sep 2013 - 4:09 pm | बॅटमॅन

आत्मूस गेमाडपंथी आहेत ही नव्यानेच माहिती कळाली.

मंजे "नाद केल्यास बाद करण्यात येइल" सारखं व्हय?:-D
द्या ज़रा असल्या लैनी. लै उपेग व्हतो :-D

बॅटमॅन's picture

18 Sep 2013 - 4:22 pm | बॅटमॅन

१. नाद केलिया बाद केले जाल
२. एकच फाईट, वातावरण टाईट.
३. बघतोस काय, मुजरा कर.
४ ओव्हरटेक केलाय वाघानं, नको बघू रागानं.

अभ्या..'s picture

18 Sep 2013 - 4:40 pm | अभ्या..

ब्येस्ट आपी. :-D
एकूणच यमक हरामी लोकांना चांगले करीअर आहे ह्यात.
एकच घाव दादाचे नाव.
आपल्या मिपासाठि ख़ास एक. :-D
एकच नीलकांत, बाकी सगळे श्रीशांत ;-)
पला पला मालक यायच्या आत पला :P

बॅटमॅन's picture

18 Sep 2013 - 4:53 pm | बॅटमॅन

हाहाहा अगदी ;)

आम्ही यमक हरामी, येऊ सगळ्यांच्या कामी ;)

मिपासाठी कायपण, मधूनमधून हँगले तरीपण...

एकच नीलकांत, बाकी नुस्ता आकांत ;)

त्या नीलकांत नावावरनं एक अगदीच अवांतर प्रसंग आठवला. कुठे वाचला/ऐकला साफ विसरलो. देवळात कीर्तन चाललं होतं, बुवा म्हणत होते "ऐन समयी रणांत, बाण मारिसी ताकांत".

लोकांना कळेना काय भानगड. मग बुवांनी एक्स्प्लेन केलं की रामरावण युद्धात रामाने मारलेले काही बाण रावणाने चुकवले की ते रावणाच्या किचनमधल्या ताकाच्या डेर्‍यांत पडायचे म्हणून =))

नंतर मग कळ्ळे, बुवा पार म्हंजे पारच गंडले होते. "ऐन समयी रणांत, बाण मारी सीताकांत" हा मूळ पाठ होता =))

चिगो's picture

18 Sep 2013 - 9:49 pm | चिगो

लोकांना कळेना काय भानगड. मग बुवांनी एक्स्प्लेन केलं की रामरावण युद्धात रामाने मारलेले काही बाण रावणाने चुकवले की ते रावणाच्या किचनमधल्या ताकाच्या डेर्‍यांत पडायचे म्हणून 

हा हा हा .. :-D. =)) =))

एका किर्तनात असाच एका अभंगात 'करंटा' हा शब्द आला. बुवांना ठाऊक नसेल अर्थ, तर म्हणे 'ईश्वरभक्तिने शरीरात कसा करंट मारतो' ह्याचे वर्णन अभंगात केलेले आहे.. :-D

जेनी...'s picture

18 Sep 2013 - 10:16 pm | जेनी...

:D

बॅटमॅन's picture

18 Sep 2013 - 10:41 pm | बॅटमॅन

अगागागागागा =)) =)) =))

बुवांचे 'एक्ष्प्लनतिओन' वाचल्यावर माझ्या मेंदूलाही 'योगा करंटा' बसला =)) =))

मालोजीराव's picture

20 Sep 2013 - 6:46 pm | मालोजीराव

मग बुवांनी एक्स्प्लेन केलं की रामरावण युद्धात रामाने मारलेले काही बाण रावणाने चुकवले की ते रावणाच्या किचनमधल्या ताकाच्या डेर्‍यांत पडायचे म्हणून

एकाच लायनीत बुवा आणि ताक दोन्ही शब्द आल्याने :))

दुदुदुदुदुदुदु माऽलोऽजीऽऽ =)) =)) =))

सामान्य वाचक's picture

16 Sep 2013 - 10:13 am | सामान्य वाचक

..

झकासराव's picture

16 Sep 2013 - 11:36 am | झकासराव

हा हा हा हा :)

आतिवास's picture

16 Sep 2013 - 12:48 pm | आतिवास

मस्त लिहिलं आहे - सगळ्या घडामोडी अगदी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Sep 2013 - 1:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

लै भारी ष्टूरी !

कागदावर लायनी तर बेष्ट मारतूयास ;) पर हे पांढ्र्यावर काळं करनंबी झ्याक जमतया की. म्हनून वल्लीसायबाच्या...

"लिहित का नाहीस बे सारखा सारखा?" ला अणुमोदण !

लई झ्याक!! कदी न्हवं त्ये वल्ल्याला हाणुमोदन देतोय बग.

स्पंदना's picture

16 Sep 2013 - 2:14 pm | स्पंदना

हे तर अगदी बिनपाण्याची झाल्यागत झाली की वो अजयराजेंची!!
गणपतीलाबी डोळं हाईत म्हणायला पायजे. कशी जीरली?

चौकटराजा's picture

16 Sep 2013 - 5:35 pm | चौकटराजा

सोलापूरवाले, यकतर काईच समाजकारे केल्यालं नसल्यानं परशीद्दी मिळोन्यासाटी आम्ही ह्यी डीजेटलची आयड्या काडीत आसतो.तुमाला पयशे मिळालेशी कारन ! आमची टिंगल काय करून र्‍हायला भौ ?पर जाउन द्या ते गन्पती पेक्षा बी आमचा
फटू म्होटा दावा म्हन्लं ! आनि त्ये आदारस्तंब , शुबेच्चुक ,प्रेर्नास्तान चे रेडीम्याड लेट्रीग आस्त्याल नव्हं?

भावना कल्लोळ's picture

16 Sep 2013 - 5:55 pm | भावना कल्लोळ

हे आंग आशी बगा… फर्मास लिहिली हाय ष्टूरी!

रेवती's picture

16 Sep 2013 - 6:55 pm | रेवती

हा हा हा. भारी! हे असं बघितल्यावर शिंगमचा चेहरा चिमणीएवढा झाला असणार.

बॅटमॅन's picture

16 Sep 2013 - 8:10 pm | बॅटमॅन

अगायायायाया........शिंगम तर पार चावूनचावून चेपलेल्या "चिंगम"गत पडला असेल =))

प्यारे१'s picture

16 Sep 2013 - 8:25 pm | प्यारे१

ख्या ख्या ख्या ख्या!
काय बे हुंब? काय केलास हे?

मस्त. शंकर पाटलांची २१ व्या शतकातली कथा वाचतोय असं वाटलं.

दशानन's picture

16 Sep 2013 - 9:28 pm | दशानन

हा हा हा मस्तच!

श्रीरंग_जोशी's picture

16 Sep 2013 - 9:41 pm | श्रीरंग_जोशी

जिस दिन मैं कलम उठाता हूं, पेंटब्रश को हात नहीं लगाता...

असा उसूल आहे का अभ्या तुझा? कारण पोटापाण्याच्या उद्योगामुळे लिहायला वेळ भेटत नसावा असे दिसते, नाहीतर... जाऊद्या ;-).

पाषाणभेद's picture

16 Sep 2013 - 9:55 pm | पाषाणभेद

जबरा रे भौ जबरा

कवितानागेश's picture

16 Sep 2013 - 9:57 pm | कवितानागेश

मस्त. :)
पुढचा भाग कधी?

पाषाणभेद's picture

16 Sep 2013 - 10:12 pm | पाषाणभेद

ओ ताई, संपली ना गोष्ट आता. व्हा पुढं.

कवितानागेश's picture

17 Sep 2013 - 11:55 pm | कवितानागेश

अहो, पुढचा भाग आहे की अजून...
ते अजयराजे जाउन डिजिटलवाल्याची कालर पकडतात नै का?!... तो भाग आहे अजून पुढे ;)

सस्नेह's picture

17 Sep 2013 - 9:33 pm | सस्नेह

एकदम रियल ष्टोरी सांगिटलास बग अभ्या.
डिजिटल बाप्पा मोरया !

चिगो's picture

17 Sep 2013 - 11:27 pm | चिगो

भारी, डिजीटलवाले.. पार लाल झाली की भगव्या रंगातल्या अजयराजेंची.. :-D

यसवायजी's picture

17 Sep 2013 - 11:33 pm | यसवायजी

अभ्या मर्दा भारी लिवलयस की.. पाक ईस्कुट बाजार झाला की बे तेचा..

जेनी...'s picture

17 Sep 2013 - 11:37 pm | जेनी...

:)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Sep 2013 - 6:11 am | अत्रुप्त आत्मा

अभ्याच्या पावरफुल धाग्यावर बालिकेचं फक्त हास्य!? :-\
बहुत नाइंसाफ़ी है। बहुत नाइंसाफ़ी है। :-\

जेनी...'s picture

18 Sep 2013 - 10:36 am | जेनी...

:(

अत्रुप्त आत्मा's picture

18 Sep 2013 - 10:45 am | अत्रुप्त आत्मा

बघ...रुसली कशी ती पुन्हा! पण काय झालं? ते नै सांगत!

लौंगी मिरची's picture

18 Sep 2013 - 1:04 am | लौंगी मिरची

छान प्रयत्न . पुलेशु

वेल्लाभट's picture

18 Sep 2013 - 9:28 am | वेल्लाभट

हाहाहाहाहाहाह! सुसाट.

मुक्त विहारि's picture

18 Sep 2013 - 11:27 am | मुक्त विहारि

आवडली,,

अनन्न्या's picture

18 Sep 2013 - 4:34 pm | अनन्न्या

हहपुवा...smily

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Sep 2013 - 5:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान रंगलय डिजिटल बोर्ड. :)

-दिलीप बिरुटे

विटेकर's picture

18 Sep 2013 - 6:01 pm | विटेकर

छान लिहिलयं .. या असल्या प्रकरणात जे काही तयार होतं ते भन्नाट च असलं पाहीजे.. काही वानगीदाखल...

fight

hmm

विटेकर's picture

18 Sep 2013 - 6:01 pm | विटेकर

??

प्राध्यापक's picture

18 Sep 2013 - 8:27 pm | प्राध्यापक

लै दिसानी कडक स्टोरी वाचायला मिळाली ना भाउ......
अजुन हसतोय....
अभ्या शेठ लिहित रहा.

विटेकर's picture

20 Sep 2013 - 12:55 pm | विटेकर

hmm

अच्छा हाच तो वरिजिनल सोर्स आहे काय, जबरीच =))

यशोधन वाळिंबे's picture

20 Sep 2013 - 6:38 pm | यशोधन वाळिंबे

व्हाया वॉशिंग्टनपुर

यशोधरा's picture

1 Oct 2013 - 8:34 am | यशोधरा

झक्कास!

कोमल's picture

2 Oct 2013 - 10:07 pm | कोमल

p

वैभव जाधव's picture

7 Sep 2014 - 8:41 pm | वैभव जाधव

यंदा नाय का भाऊ डिजिटल?
कुठं गायब आहात?