< निशःब्द >

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
13 Jul 2013 - 5:31 pm

आमची प्रेरणा http://misalpav.com/node/25136
सुरेश चे लग्न जमत नसते त्यामुळे तो टेन्शन मधे असायचा. आज बुधवार होता. बुधवारी एक कविता करणे हा सुरेशचा नियम होता त्यामुळे तो आजतरी बाहेर जाणार नव्हता. मात्र लग्न जमत नाही या तेन्शन मुळॅ त्याच्या बुधवारच्या कविता आटल्या होत्या. इतक्यात रमेश चा फोन आला
" काय अरे सुरेश बाबांची प्यान्ट टेलरकडुन आणायची विसरलास. मी ती दीड वीत लहान करायला दिली होती.
तू सुद्धा ...अरे मी देखील टेलर मास्तरला ती बाबांची प्यान्ट दीड वीत कमी करा म्ह्णून सांगुन आलोय." सुरेश.
म्हणजे तु सुद्धा." रमेश
" हो" सुरेश
त्या प्यान्टचे काय झाले आसेल आत्ता" रमेश.
ते ठीक आहे रे. पण बाबा कालपासून सोसायटीत चट्ट्यापट्ट्याची अन्डरप्यान्ट घालूनच फिरताहेत. पार लाज आणली आहे त्याने त्याना प्यान्ट लवकर आणुन द्यायला हवी." सुरेश
तु जातोस का टेलर मास्तर कडे" रमेश
नको मला तेन्शन आहे" सुरेश
कसले टेन्शन?
माजेह लग्न जमत नाहिय्ये. तुला माहीतच आहे ना त्यासाठी मी पाम्ढरे बुधवार करतो.
सोड रे बुधवार करून कोणाचे काही झालय?
आज रामगड ला तमाशा आहे. येतोस.
तमाशा? पण आज बुधवार आहे
त्याला काय झाले
बुधवारी मी वाईट कामे करत नाही.
बुधवारी सकाळी धुतोस ना....
हो.ते चांगले काम आहे. वाईट नाही.
असो... एका नर्तकीच्या आणि तिच्या साथीदाराना पोटाची भूक भागवण्यासाठी मदत करणे हे देखील पवित्र काम आहे. ते बुधवारी केल्यास पूण्यच मिळेल.
असे म्हणतोस...... चल मग येतोच मी. माझी बाईक मागच्या वेळेस जीप उडवताना जीपसोबत नदीत पडली. तीला सर्दी झालीये. स्पार्क प्लग मधुन सारखे मिसफायरचे फट्ट फट्ट आवाज येताहेत.
हरकत नाही आपण सोसायटीच्या वॉचमन ची सायकल घेवून जाऊया. चल निघू या.
मी तुला हायएव वरच्या धाब्यावर भेटतो. तेथेच जेवू अन जाऊया.
हायवेवरच्या धाब्यावर मटार उसळ अन केळ्याचे शिकरण चापून झाल्यावर सुरेश रमेश दोघे तमाशाला गेले. गण झाला गवळण झाली कटाव झाला वग सुरु झाला. वगाच्या मधे एक लावणी आली.
" हात सोडा राया माझा..... लगीन ठरलया... अन राया माझं लगीन ठरलया...."
रमेश लावणीच्या अदाकारीत गुंग झाला होता. सुरेश मात्र लावणीच्या शब्दानी आणखीच टेन्शन मधे आला. मघा धाब्यावर चापलेल्या केल्याच्या शिकरणाची धुंदी आता जास्तच चढली होती. त्याचा अम्मल म्हणा किंवा टेन्शन म्हणा सुरेश ला आता फार राग येवु लागला. त्याच्या मनात येवू लागले " माझी ही अवस्था झाली त्या गणीताच्या दामले मास्तरांमुळेच त्यानी शाळेत मला गृहपाठात चांगले मार्क दिले असते तर सोनाली पूर्णफातरफेकरने मला त्यावरच्या डिफीकल्टीज विचारल्या असत्या. त्या डिफीकल्तीज मी सोडवून दिल्या असत्या. अन आज माझ्यावर ही अवस्था ओढवली नसते. आज मी रमेश सोबत तमाशा पहाण्या ऐवजी सौ सोनाली सुरेश पूर्णफातरफेकर-अर्धकामे सोबत टीव्हीवर सास बहू मालीका पहात बसलो असतो.
सुरेशचा राग वाढत होता. एका क्षणी सुरेश जाग्यावरून उठला. तमाशातील नाच्याला वाटले की सुरेश बक्षीशी देण्याकरीताच उठला आहे. त्याने सुरेशच्या जवळ जात सुरेशच्या हनुवटीला हात लावला. सुरेश चिडलेला हो ताच नाच्याने हनुवटीला हात लावलेले पाहून केळ्याच्या शिकरणीची झिंग जागी झाली त्याने नाच्याला जोरात ओढले. लावणीवर नाचणारी स्त्री अवाक झाली. लावणी थांबली. तसा नाच्या बेहान झाला त्याने सुरेश ला एक ठेवून दिली. तो वार वर्मी बसला. सुरेश तिथेच आडवा झाला. पडताना त्यने डावा हात आधाराला घेतला. डाव्या हातावर पडताना नाच्याने त्याचा उजवा हात धरूनच टेह्वला होता. हात लचकला. सुरेश धुमसतच तमाशाच्या कनातीतून बाहेर पडला.
त्याने सायकल घेतली. हात लचकलेला पाय हेलपडत होते. त्यातच केळ्याच्या शिकरणची धुंदी.होतीच. रागारागातच सुरेशने सायकल काढली. अन पायडल हाणत त्याने दामले मास्तरांच्या घराकडे वाटचाल सुरू केली. त्याच्या डोक्यात राग पुर्ण चढलेला होता. काहिही झाले तरी दामले मास्तराना त्यानी केलेल्या पापाचे प्राय:श्चित द्यायचे होते.
चढावर सुरेश सायकल हाणत होता. एकदम बुंगाट १५/२० किमी च्या वेगाने सायकल जात होती. गार हवेमुळे मुळे शिकरण आता जास्तच चढू लागले होते.
समोरून कोणीतरी अर्जून रनगाडा चालवत येत होते. सुरेश ने नीट पाहिले. ओह्ह्ह न्नो..... सोनाली पुर्णफातफेकर....
सुरेशला आठवले सोनालीचा नवरा नरेश सैन्यात होता. सोनाली अन नरेश बहुतेक रणगाड्यातून पिकनीकला निघाले असावेत. रणगाड्याच्या काचेतून सोनाली नरेशच्या खांड्यावर मान टाकून प्रवास एन्जॉय करत असल्याचे दिसले.
सुरेशचा राग अनावर झाला. या असल्या रणगाडावाल्यासोबत गेलीस तू माझ्यात काय कमी होते. रणगाडा नसेल पण माझ्याकडे स्वतःची बाईक होती. त्यावर बसून मला मागून घट्ट मिठी मारत तू अशीच माझ्या बरोबर फिरली असतीस.
तुझ्या बापाला तो रणगाडावाला आवडला ना..... दामले मास्तर मिर्दाबाद. सुरेश चे आता भान सुटले होते. रणगाडा त्याला पास करून पुढे गेला. सुरेशने सायकल सिग्नल नसतानादेखील डिव्हायडरवरून यू टर्न घेवून उलट्या दिशेने चालवायला सुरवात केली.आता उतारच होता. जोरात सायकल हाणत सुरेश ने रणगाड्याला गाठले. नरेश आणि सोनाली अर्धफातरफेकर अजूनही तशाच अवस्थेत रणगाड्यात होते. सोनालीच्या मानेचा अँगल आता थोडा अधीकच तिरका झाला होता. तिचे डोळे मितलेले असले तरी त्यातून सूख पाझरत असल्याचे स्पष्ट कळत होएत. सुरेशचा राग आता आवरायच्या पलीकडे गेला. त्याने आणखीनच जोरात हाणायला सुरवात केली. सायकल वेगात पुढे चालू लागली. रणगाडा आता खूपच मागे पडला. नीरा नदीचा पूल ओलांडल्यानंतर सुरेशने पुन्हा एकदा यूटर्न घेतला. सायकलने वेग घेतला.
रणगाडा आता समोर फक्त पन्नास फुटांवर होता. सुरेशच्या डोळ्यात खून चढला होता.त्याने ने सयकलचा हॅन्डल घट्ट धरला. पाय्डल वर पाय नीट रोवला. फुल्ल टेन्शन ने पाय खाली नेला...... सायकल वेगात अर्जून रणगाड्याच्या दिशेने निघाली.
धडाम ठॉऑऑऑऑऑऑऑऑप. फुस्स्स्स्स्स्स आवाज झाला सायकलची रणगाड्याशी जोरात धडक बसली होती. सुरेशचे इप्सीत साध्य झाले होते. रणगाडा च्या साखळ्या तुटून रणगाडात नदीत कोसळताना त्याला स्पष्ट दिसत होता.
डोळ्या समोर अंधार पसरला.
शुद्ध आली तेंव्हा सुरेश सिव्हील हॉस्पीटल मधे होता. रनगाडा नदीत पडताना नरेश अन सोनाली ने त्यातून उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला होता. रणगाड्याच्या चेनमध्ये अडकल्यामुळे सायकलचे पुढच्या चाकाचे दोन स्पोक तुटले होते. सुरेशचा तोल जावून तो नदीत फेकला गेला होता. मात्र सोनाली पूर्णफातफेकर आनि सैन्यातल्या नरेशने त्याचा वाचवले. सुरेश ला हाताच्या कोपर्‍याला खरचतले होते. गावच्या कुंभाराने त्यावर मातीचा लेप देवून सुरेशचा जीव वाचवला होता.
ज्या सोनाली पूर्णफातरफेकरला आपण मारण्याचा प्रयत्न केला तीनेच वेळेवर येवून आपला जीव वाचवला. हे समजल्यावर सुरेश निशःब्द झाला. जिला आपण आपले आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल दोषी ठरवून मारायला निघालो होतो...........तिच्यामुळेच आज मृत्युच्या दारातून आपण परत आलो.............हे समजल्यावर नक्की काय बोलावे तेच त्याला कळत नव्हते...........................!

बालकथाविरंगुळा

प्रतिक्रिया

भावना कल्लोळ's picture

13 Jul 2013 - 5:54 pm | भावना कल्लोळ

वेड्यासारखी हसत सुटले आहे, कार्यालयातले लोक वेड लागले आहे का असे पाहत आहेत माझ्याकडे, अरे काय हे, काहीतरी …. आणि असा कोणता धाबा आहे जिथे केळ्याचे शिकरण भेटते. बाकी जे काही लिहिले आहे भन्नाट.

जेपी's picture

13 Jul 2013 - 6:16 pm | जेपी

मीपण

निशःब्द :-)

उगा काहितरीच's picture

13 Jul 2013 - 6:28 pm | उगा काहितरीच

:D :D :D __/\__ :D :D :D
:D :D :D __/\__ :D :D :D
:D :D :D __/\__ :D :D :D

राजेश घासकडवी's picture

13 Jul 2013 - 6:40 pm | राजेश घासकडवी

मजा आली वाचून. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jul 2013 - 6:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. त्या खास केळ्याच्या शिक्रणाची पाकृ येउ दे.

२. माझी बाई मागच्या वेळेस जीप उडवताना जीपसोबत नदीत पडली. तीला सर्दी झालीये. स्पार्क प्लग मधुन सारखे मिसफायरचे फट्ट फट्ट आवाज येताहेत. यावरून मागच्या अपघाताचा प्रसंग झाला तेव्हा तुमच्या बरोबर कोणतरी बसले होते असे दिसते. "बाई"ला स्पार्क प्लग असतात ही नविन शास्त्रिय माहिती मिळाली... आतापर्यंत कुठे वाचले नव्हते. सर्दी झाल्यावर बायका शिंकांऐवजी "मिसफायरचे फट्ट फट्ट आवाज" काढतात हेही नवेच. असो.

मणोरंजणाबरोबर ज्ञानात पण भर्पूर भर पडली !!! +D +D +D

कपिलमुनी's picture

15 Jul 2013 - 2:23 pm | कपिलमुनी

"बाई"ला स्पार्क प्लग असतात ही नविन शास्त्रिय माहिती मिळाली

असतात ;)
शोधा म्हणजे सापडेल..

कवितानागेश's picture

13 Jul 2013 - 7:35 pm | कवितानागेश

भारी!! :D
गावच्या कुंभाराने त्यावर मातीचा लेप देवून सुरेशचा जीव वाचवला होता. हे मस्तच.

___/\___,
खालचा एकही प्रतिसाद न वाचता लिहितो आहे. नंतर पुन्हा एकदा वाचून योग्य प्रतिसाद देईन.
वाचायला दहा मिनिटे लागली. हसून हसून पोट दुखायला लागले.
आधीचा लेख वाचल्यावर तुमचा प्रतिसाद वाचुन थक्क झालो.
बाकीचे नंतर लिहितो.

पैसा's picture

13 Jul 2013 - 9:44 pm | पैसा

लै भारी!

दिपक.कुवेत's picture

13 Jul 2013 - 9:53 pm | दिपक.कुवेत

यु टु? पण सॉल्लीड जमलीये.....केळ्याची शीकरण खासच!

सस्नेह's picture

13 Jul 2013 - 9:54 pm | सस्नेह

डिव्हायडरवरून यू टर्न घेवून
a

शिकरण, बाईकची सर्दी, १५/२० चा बुंगाट स्पीड, रणगाडा, डिव्हायडरवरून यू टर्न, सगळेच अतिशय जबरी =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) वायझेडसारखा सत्राशेसाठ वेळेला हसत सुटलो आहे अन तोंडातले ताक लॅपटॉपवर पसरलेय!! विजुभौ, किस ढाबे का शिक्रण खाते हो ऐसे विडंबन पाडने के लिये?

मंदार कात्रे's picture

13 Jul 2013 - 11:52 pm | मंदार कात्रे

ज ब री वि ड म्ब न !!!

;)

बॅटमॅन's picture

14 Jul 2013 - 12:00 am | बॅटमॅन

काय हो ते " ;) " डॉळामारू स्मायळी तुमची सिग्नेचर आहे काऽय म्हंटो मी, सगळीकडे दिस्ताय ते =))

विजुभाऊ's picture

15 Jul 2013 - 3:36 pm | विजुभाऊ

ब्याटम्यान....... बहुतेक सगळेच जण डोळे मारताहेत.

बॅटमॅन's picture

15 Jul 2013 - 3:50 pm | बॅटमॅन

तरी बरं डोळे मारून कुणाचा रणगाडा फोडत नाहीत ते =))

सुहास झेले's picture

14 Jul 2013 - 3:40 am | सुहास झेले

हा हा हा .... महा महाप्रचंड =)) =)) =))

शिल्पा ब's picture

14 Jul 2013 - 6:46 am | शिल्पा ब

<<<सुरेशचे इप्सीत साध्य झाले होते. रणगाडा च्या साखळ्या तुटून रणगाडात नदीत कोसळताना त्याला स्पष्ट दिसत होता.
हॅ हॅ हॅ...
आवडेश.

मूकवाचक's picture

14 Jul 2013 - 2:35 pm | मूकवाचक

=))

अग्निकोल्हा's picture

15 Jul 2013 - 3:06 am | अग्निकोल्हा

ड्युएलचे इतके सुरेख वर्णन वाचले. मजा आलि.

स्मिता चौगुले's picture

15 Jul 2013 - 9:55 am | स्मिता चौगुले

धन्य आहात... जबरि आहे हे... :)

चावटमेला's picture

15 Jul 2013 - 12:00 pm | चावटमेला

काळजाला घरे पाडणारी कथा ;)

विजुभाऊ's picture

17 Oct 2013 - 2:16 am | विजुभाऊ

त्या घरांची कॉलनी झाली का?

बॅटमॅन's picture

17 Oct 2013 - 12:59 pm | बॅटमॅन

कुठली म्हाडाची की अन्य बिल्डरची?

मोदक's picture

15 Jul 2013 - 1:58 pm | मोदक

:-))

सुहास..'s picture

15 Jul 2013 - 1:58 pm | सुहास..

=))

लईच

कपिलमुनी's picture

15 Jul 2013 - 2:26 pm | कपिलमुनी

पार भुस्काट पाडलतं !!

विजुभाऊ's picture

15 Jul 2013 - 2:30 pm | विजुभाऊ

लेखातील खालील दोन प्रसंगासाठी मिपावुड मध्ये एका फिल्म साठी हक्क देण्यात आलेलेले आहेत.
"एक था ताईगर" चा रीमेक निघतोय.

प्रसंग १ ) रणगाड्याच्या फ्रंट विन्डशील्ड (किती लहान अस्तं म्हैतै?) सुरेश ने सोनाली अन नरेश ला पाहिले तेही सोनाली नरेशच्या खांद्यावर मान टाकून बसली होती. ***या नंतर गाणे आहे " बहारो फूल बरसाऑ ( रीमिक्स)

रणगाड्याच्या चेन मध्ये सायकल अडकून फक्त दोन स्पोक तुटले. रणगाड्याची मात्र चेन तुटली. सुरेश अन सोनाली ने रणगाडा पडताना त्यातून बाहेर उडी मारुन जीव वाचवला.( *** या नंतरही गाणॅ आहे "सोने की हँडल चांदीकी सीट .आओ चले डार्लींग चले डब्बल सीट ( स्लो स्पीड मधे ( ये दोसती हम नही तोडेंगे....... शोले मधे शेवटी जसे होते तसे "
है का नाय सलमान खानचा " एक था ताईगर".... सुपर रीमेक

चिगो's picture

15 Jul 2013 - 9:44 pm | चिगो

=)) =)) =)) भारी...

चिगो's picture

15 Jul 2013 - 9:49 pm | चिगो

=)) =)) =)) भारी...

मिपावरती विडंबनांचा हॉल ऑफ फेम कुणीतरी सुरू करा राव....लै हसलोय आणि हसतोय हे विडंबन वाचून =)) =))

किसन शिंदे's picture

15 Jul 2013 - 11:07 pm | किसन शिंदे

ह्या ह्या ह्या =))

विजूभौंना सध्या बराच वेळ मोकळा दिसतोय. ;)

बांवरे's picture

16 Jul 2013 - 4:24 am | बांवरे

कसलं शिरकाण नाट्य हाय !
हहह !

विक्रान्त कुलकर्णी's picture

17 Jul 2013 - 4:50 pm | विक्रान्त कुलकर्णी

कश्श्याचा काहीही पत्ता लागला नाही... आणि लोक्स बावळ्यागत हसतायत...

मूळ प्रेरणेची लिंक दिलीय ती पाहण्याचे अंमळ कष्ट घ्यावेत...मग कळेल काय भानगड आहे ते.

विजुभाऊ's picture

17 Jul 2013 - 7:11 pm | विजुभाऊ

नुस्ते वर्तमान बघुन काय समजणार. इतिहास म्हैत पायजेल

धमाल मुलगा's picture

17 Jul 2013 - 9:36 pm | धमाल मुलगा

हितली लोकं बावळीच हैत. उगं येड्यासारखी रोज रोज मिपावर येतात काय, रोज रोज लेख वाचतात काय, त्या लेखांचे संदर्भ लक्षात ठेवतात काय अन मग त्यावर आलेली विडंबनंपण वाचतात, त्या विडंबनांच्या वर-खाली कुठेतरी दिलेली लिंक क्लिकवून मूळ धागाही पाहतात काय अन बावळ्यागत हसतात काय! खुळ्याची चावडी है जी सगळी.

त्यातल्यात्यात एक गोष्ट जमेची- विडंबन म्हणजे काय त्ये 'लोक्सांना' ठाऊक आहे, आणि विडंबन कळण्यासाठी मूळ कलाकृती(?) आधी पहावी लागते इतकं उमजतं ह्या खुळ्यांना. :)

मृत्युन्जय's picture

17 Jul 2013 - 6:39 pm | मृत्युन्जय

आइच्या गावात. ढिश्क्याव विडंबन आहे एक्दम. विजुभौंना पुढच्या भेटीत एक मस्तानी (प्यायची) सप्रेम भेट ;)

यशोधरा's picture

17 Oct 2013 - 2:27 am | यशोधरा

केलास ना पचका विजूभौंचा! :P

विजुभाऊ's picture

17 Oct 2013 - 2:36 am | विजुभाऊ

तरी बरं तो धाब्यावर शिकरण खायला जाऊयात असे नाही म्हणाला ;)

यशोधरा's picture

17 Oct 2013 - 2:49 am | यशोधरा

LOL!

सुधीर's picture

17 Jul 2013 - 10:04 pm | सुधीर

वेड्यासारखा हसलो. भारी!

क्रेझी's picture

17 Oct 2013 - 2:38 pm | क्रेझी

*lol*

*lol*

*lol*

कथा तर कथा, प्रतिसादही जबरा आहेत

बॅटमॅन's picture

28 Oct 2013 - 3:53 pm | बॅटमॅन

हा धागा वाचून परत एकदा नि:शब्द होऊन प्रचंड हसल्या गेले आहे =)) =)) =)) =))

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Oct 2013 - 1:06 pm | llपुण्याचे पेशवेll

वा वा वा.

पाषाणभेद's picture

3 Nov 2013 - 6:27 pm | पाषाणभेद

मुळ कथेतील प्रतिसाद अन विजूशेठ यांची ही कथा वाचून हसतोय नुसता.

विडंबन वाचुन पुन्हा एकदा मनसोक्त हसु आले. वाहवा विजुभाऊ.

चित्रगुप्त's picture

4 Nov 2013 - 1:07 pm | चित्रगुप्त

काय राव नुस्ती धमाल आहे ही कथा. प्यान्ट काय, शिकरण काय, तमाशा काय, सायकल काय, रणगाडा काय अन काय काय.
यापूर्वी वाचली होती तेंव्हा काही समजले नव्हते, कारण प्रेरणा - कथेकडे लक्ष गेले नव्हते. आज दोन्ही कथा वाचल्या आणि कलेजा खलास झाला.
वाचताचि या कथेला, कलेजा खलास झाला.

रुपी's picture

20 Jun 2015 - 3:59 am | रुपी

हे अफाट विडंबन आणि मूळ कथा (त्यातले प्रतिसाद) सगळंच याआधी वाचायचं राहिलं होतं =)

प्यारे१'s picture

29 Oct 2015 - 3:20 pm | प्यारे१

___/\___

विजुभौ खडक्स!

कपिलमुनी's picture

29 Oct 2015 - 4:30 pm | कपिलमुनी

जमलयं !

बोका-ए-आझम's picture

29 Oct 2015 - 4:59 pm | बोका-ए-आझम

जबरी! केळ्याच्या शिकरणाची ही पोटेन्सी? कौनसे बागका केला है ये?

दमामि's picture

29 Oct 2015 - 6:19 pm | दमामि

भारी आहे.:):)

केळ्याच्या शिक्रणाची पाककृती ल्ह्यायलाच हवी
;)