पुणे ५२

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
22 Jan 2013 - 9:22 am

रात्रीची नीरव शांततेची वेळ. मुसळधार पाऊस पडतोय. झाडांवरून, इमारतींवरून झरझर कोसळणारा पाऊस सगळं कसं ओलंचिंब करून टाकतोय. जमिनीवर पडणार्‍या पावसाच्या थेंबाचा लयबद्ध आवाज घुमतोय. एक माणूस हातात विजेरी घेऊन पाठमोरा जातांना दिसतोय. त्याची नजर शोधक. डोक्यापासून पायांपर्यंत घातलेला त्याचा काळा रेनकोट पावसाच्या पाण्यात चमकतोय. झाडांची ओली पाने चंद्रप्रकाशात चंदेरी दिसत आहेत. तो चोरपावलांनी हळूहळू काहीतरी शोधत फिरतोय. एका बंगल्याचे एक दार उघडून तो आत शिरतो. एका खोलीच्या दाराजवळ येऊन थबकतो आणि पटापटा फोटो काढायला सुरुवात करतो...

ही आहे 'पुणे ५२' ची सुरुवात! खुर्चीवर सरसावून बसलो. मनातच म्हटलं अब आयेगा मजा! कोण आहे तो? काय करतोय इतक्या रात्री? कुणाच्या घरात शिरलाय? आणि कुणाचे इतके फोटो काढतोय? इतक्या पावसात हा उद्योग करायला सांगीतलाय कुणी याला?

हळूहळू (अक्षरशः) चित्रपट पुढे सरकतो. १९९२ सालातलं पुणे. सहवास सोसायटी किंवा डहाणूकर कॉलनी अशा भागात राहणारा अमर आपटे (गिरीश कुळकर्णी) हा खाजगी गुप्तहेर आपल्या व्यावसायिक अपयशावर मात करण्याचा आटोकाट आणि प्रामाणिक प्रयत्न करतांना दिसतो. त्याची बायको प्राची (सोनाली कुळकर्णी) त्याचा संसार सांभाळता सांभाळता मेटाकुटीला येते. घरात पैसे नाहीत, बिले थकलेली. घराची अवस्था अत्यंत वाईट, भिंतींचा रंग उडालेला, जागोजागी भिंतींचे पोपडे उडालेले, फुटके नळ, अस्वच्छ स्वयंपाकघर, मोडक्या खुर्च्या, रिकामे डबे असे दारिद्र्याच्या खुणा मिरवणारे घर प्राचीच्या दु:खाचे मुख्य कारण असते. अपयशी नवरा हे तिच्या खचलेल्या मनाचे कारण असते. दिवस असे निराशेने ग्रासलेले असतात. प्राचीची आई प्राचीला घटस्फोट घेण्याचा आग्रह करते. प्राचीच्या आई-वडिलांच्या पैशावर अमर-प्राचीचे दिवस कसेबसे साजरे होत असतात. प्राची आणि अमर यांच्यात अर्थातच भावनिक दुरावा आलेला असतो. प्राची सततच्या दारिद्र्याला आणि आई-वडिलांसमोर पत्कराव्या लागणार्‍या लाचारीमुळे अस्वस्थ असते. आई-वडिलांच्या मर्जीविरुद्ध हट्टाने अमरशी प्रेमविवाह केल्याने प्राचीची मानसिक कुचंबणा होत असते. ती अमरला जबाबदारीने वागायला सांगते परंतु मनस्वी स्वभावाच्या हळव्या आणि सरळमार्गी अमरला त्याच्या कामात काहीकेल्या मनासारखे यश मिळत नाही. तो ही भयंकर अस्वस्थ असतो. बायकोची होणारी तारांबळ आणि सासू-सासर्‍यांसमोर तिला सावरावी लागणारी त्याची लंगडी बाजू याची त्याला पूर्ण जाण असते; पण काहीतरी बिनसलेलं असतं. त्याला गुप्तहेरगिरी सोडायची नसते परंतु कामात हवे तसे यश देखील मिळत नाही. त्याचे घर ज्या भागात असते त्या भागाचा पिन कोड असतो ५२. राहत्या घराखेरीज आणि एका जुनाट स्कुटरखेरीज अमरकडे काहीच नसते.

असेच तणावग्रस्त दिवस जात असतांना त्याला एक काम मिळते. एका माणसाला त्याच्या विवाह्यबाह्य संबंध असणार्‍या पत्नीचे अप्रशस्त अवस्थेतले फोटो पुरावा म्हणून हवे असतात. अमर पैशाची निकड असल्याने तयार होतो पण काम पूर्ण करत असतांना पकडला जातो आणि पैसे गमावून बसतो. नंतर नेहा (सई ताम्हणकर) अमरला तिच्या नवर्‍याच्या बाहेरख्यालीपणाचे पुरावे गोळा करण्याचे कंत्राट देते. अॅडवान्स म्हणून ती अमरला घसघशीत रक्कम देते. अमर कामाला लागतो. काम करत असतांनाच तो नेहाकडे आकर्षिला जातो आणि अचानक असे काहीतरी घडते ज्यामुळे अमर नखशिखांत हादरतो. त्याचे आयुष्य एकदम बदलून जाते. नंतर सुरु होतो एक थरारक खेळ, एक अनपेक्षित प्रवास! अमर, प्राची, नेहा सगळेच त्यात ओढले जातात. अनपेक्षित घटनांच्या अतर्क्य चक्रात सगळे गरागरा फिरत राहतात. असे काय आक्रीत घडते? अमर त्याच्या व्यवसायात यशस्वी होतो का? प्राचीला सुख मिळते का? नेहाला नेमकं काय मिळतं? सगळा गुंता सुटतो का? हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर एकदा बघायला हरकत नाही निखिल महाजन दिग्दर्शित, अरभाट निर्मित 'पुणे ५२'.

आधी 'पुणे ५२' च्या जमेच्या बाजू. कथा एकदम वेगळी आणि उत्सुकता ताणून धरायला लावणारी आहे. पुढे काय होईल हा प्रश्न मनात सारखा रुंजी घालत राहतो. गिरीश कुळकर्णीचा अभिनय खूप प्रगल्भ आणि संयत आहे. एका कफल्लक, सरळमार्गी, मध्यमवर्गीय विवाहित पुरुषाची व्यक्तिरेखा त्याने खूप चांगल्या प्रकारे साकारलेली आहे. त्याची होणारी घुसमट, तगमग त्याने योग्य प्रकारे सादर केली आहे. सोनाली कुळकर्णीने अमरला चांगली साथ दिली आहे. सई ताम्हणकर एका भन्नाट आणि बिनधास्त भूमिकेमध्ये चमकली आहे. तिचे गिरीशसोबतचे प्रणयप्रसंग मराठी चित्रपटांमधला 'वरणभात'पणा पार पुसून टाकतात. इतकी गरमागरम प्रणयदृष्ये मराठी चित्रपटात आधी कधीच दाखवली नसावीत. चित्रपटात या दृष्यांची खरच गरज होती का? म्हटलं तर होती, म्हटलं तर नाही. हे ज्याने-त्याने चित्रपट पाहिल्यावर ठरवायचं. चित्रपट 'फक्त प्रौढांसाठी' आहे हे लक्षात ठेवून मगच चित्रपट बघायला जावे हे उत्तम.

बाकी श्रीकांत यादव, किरण करमरकर, भारती आचरेकर यांच्या भूमिका चोख आहेत. चित्रीकरण खूपच छान आणि सफाईदार आहे. चित्रपटाची रहस्यमय आणि थरारक बाजू खुलवण्याचे काम चित्रीकरणाने आणि पार्श्वसंगीताने (ह्युंग जंग शिम) चोख केले आहे.

१९९२ सालचे पुणे दाखवतांना कलादिग्दर्शन योग्य झाले आहे. डेक्कन टॉकीजचा परिसर, अमरचे घर, नेहाचे घर, हॉटेल्स असे सगळे व्यवस्थित दाखवले आहे. निखिल महाजनचे दिग्दर्शन चित्रपटाची प्रेक्षकांवरची पकड कायम ठेवण्यात किंचित कमी पडते. पण एकंदरीत दिग्दर्शन चांगले झाले आहे. पात्रांच्या मनाची अवस्था चित्रपटात नेमकेपणाने बाहेर येते. 'पुणे ५२' हे शीर्षक देण्यामागचे कारण तसे फारसे स्पष्ट होत नाही परंतु त्या काळातल्या त्या भागातल्या मध्यमवर्गीय कुटुंबांची ओढाताण प्रातिनिधिकपणे दाखवण्याचा एक प्रयत्न म्हणून 'पुणे ५२' या शीर्षकाकडे बघता येईल असे एकंदरीत चित्रपटाच्या श्रेयनामावलीत दाखवलेल्या दृष्यांवरून वाटते. अर्थात हा माझा कयास आहे.

आता जरा दोष. सगळ्यात मोठा दोष म्हणजे चित्रपट बर्‍यापैकी संथ वाटतो. अशा चित्रपटांमध्ये जो एक वेग आवश्यक असतो तो थोडा कमी पडलाय. पटकथा जर अजून बांधेसूद असती तर चित्रपट अधिक सरस झाला असता. अधून मधून येणारा रटाळपणा कमी करण्यास निश्चितच वाव होता. संकलन थोडे अधिक विचारपूर्वक केले असते तर बराचसा अनावश्यक भाग काढून टाकता आला असता.

एकदा बघावा असा हा 'पुणे ५२' काहीतरी वेगळे पाहिल्याचे समाधान देतो हे मात्र खरे. चित्रपट सर्वत्र जोरात सुरु आहे. असे वेगळे चित्रपट आवडणार्‍यांना हा चित्रपट बर्‍यापैकी आवडेल. बाकी 'दबंग' प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेलच असे ठामपणे सांगता येत नाही. एकदा बघूनच ठरवा आवडतोय की नाही ते, काय?

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

22 Jan 2013 - 9:43 am | स्पंदना

आधी समिक्षण वाचल. मग पुन्हा वर जाउन नाव वाचल, खात्री करून घेतली नक्कीच तुम्ही समीरसुर!

मस्त! अगदी बघावास वाटायला लावणार कडक समिक्षण.

गरमा गरम दृष्यांबाबत, निदान आपण आपल्या भाषेतले लोक आहेत आहेत म्हणुन त्यांना आवाहन करुन असली दृष्ये अन आयटम सॉग कमी करायला सांगु शकतो का? सार्‍या समाजाचा र्‍हास होत चाललाय या असल्या गोष्टी पडद्यावर बघुन.

असो! तुमच समिक्षण आवडल.

स्पा's picture

22 Jan 2013 - 9:50 am | स्पा

थोडं हात राखून केल्यासारखं वाटलं परीक्षण , सुरुवात झकास झाली होती , पण नंतर पटकन गुंडाळलत
स.सु टच वाटला नाही यावेळेस

किसन शिंदे's picture

22 Jan 2013 - 10:05 am | किसन शिंदे

बर्याच दिवसांनी परीक्षण लिहलंत. दोन तीन ठिकाणी हा चित्रपट बकवास आहे असं वाचलं होतं पण तुमच्या परीक्षणावरून तर तसं वाटत नाहीये. पाहायला जाईन आता, संथ असला तरी चालेल.

पुणे ५२ म्हणजे डहाणुकर किंवा सहवास नव्हे तर आमचं लाड्कं वारजे हे नम्रपणे नमुद करु इच्छितो.

बाकी पिक्चर पाहिला पाहिजे असं वाटायला लागलंय.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jan 2013 - 11:47 am | अत्रुप्त आत्मा

1 बोंबलेला शिनूमा - पुणे 52.
ह्हूं. भंगार, नाव मोठ,लक्षण खोटं

समयांत's picture

22 Jan 2013 - 12:41 pm | समयांत

अत्रुप्ततेची चुणूक दाखवलीत =))

मालोजीराव's picture

22 Jan 2013 - 1:08 pm | मालोजीराव

बुवा तुमी बी लिवा समिक्षान ...म्हंजी आमालाबी कळन कुटंकुटं "अतृप्ती" राहिलिया शिनेमात !

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jan 2013 - 11:02 pm | अत्रुप्त आत्मा

नकोच....! इतका त्रास डोक्याला कोण करून घेणार?,सिनेमा बघताना झाला...तो काय कमी आहे....त्यापेक्षा तुंम्हीच सिनेमा बघा,आणी अपेक्षा भंग करून घ्या. ;-)
इंटरव्हल पर्यंतचा रटाळपणा आणी असंबद्धता इतकी आहे,की त्या कथित नव-दिग्दर्शकाचा कान पकडून त्याला थेटरात त्याच्या एका पायावर उभा केला पाहिजे. अर्थातच इंटरव्हल नंतर कथेच्या (सुरवातीच्या) असंबद्धतेमुळे होणारे आणी केले गेलेले थेटरी/प्रेक्षकी विनोद ऐकून त्याचा बोर्‍या वाजेलच...तो भाग निराळा...चांगल्या गुणी कलाकारांना हताशी घेऊन खेळ कसा खराब करावा याचं आदर्श उदाहरण म्हणजे ... हे दिग्दर्शक महाशय. नावाचा तर संपूर्ण कथेशी नक्की काय संबंध आहे,हे मला कुणी समजावून सांगितलं तर मी पुणे -५२ प्रभागात,या नाव सुचवणार्‍या ला खरच साष्-टांग मारून लोटांगण घालिन.

जवळजवळ बारा ५२ ला प्रतिसाद देतोय. एका पॅरॅमधे सगळं कव्हर केलंत!

संजय क्षीरसागर's picture

23 Jan 2013 - 12:59 am | संजय क्षीरसागर

नावाचा तर संपूर्ण कथेशी नक्की काय संबंध आहे,हे मला कुणी समजावून सांगितलं तर मी पुणे -५२ प्रभागात,या नाव सुचवणार्‍या ला खरच साष्-टांग मारून लोटांगण घालिन

तुम्ही लिहा हो परिक्षण. थेटरातल्या कमेंटासकट लिहा!

नगरीनिरंजन's picture

22 Jan 2013 - 12:08 pm | नगरीनिरंजन

रोचक दिसतोय चित्रपट. जमेल तेव्हा पाहीन म्हणतो.

अनिल तापकीर's picture

22 Jan 2013 - 12:46 pm | अनिल तापकीर

छान समिक्षन

सानिकास्वप्निल's picture

22 Jan 2013 - 1:30 pm | सानिकास्वप्निल

गिरीश कुळकर्णीचा चित्रपट म्हणजे बघायलाच पाहिजे :)
परीक्षण आवडले.

स्वप्निल घायाळ's picture

22 Jan 2013 - 2:13 pm | स्वप्निल घायाळ

आतिशय भंगार चित्रपट आहे!!! just tried to Copy "Chinatown" (1974 released) Movie.. Please do not watch and waste your time... Camera work is very good..Script is very poor...On acting front Girish Kulkarni has disappointed...Sai tamhankar and Acting are 2 different words...Only Sonali Kulkarni has delivered ok performance... After watching this movie I am now afraid to visit Karvenagar (Pune 52)...

चौकटराजा's picture

22 Jan 2013 - 6:19 pm | चौकटराजा

ऐला, ठिसूळ कथानक असेल तर राग कर्वनगर वर का बॉ ?

तिमा's picture

22 Jan 2013 - 8:43 pm | तिमा

आता कळलं पुणे ५२ का ते! आम्हाला आपलं 'बावन्नखणी' शी काहीतरी संबंध असेल असं उगाचच वाटलं. 'घाशीराम' चा इफेक्ट काही जात नाही.
परीक्षण आवडलं.

बोका-ए-आझम's picture

25 Sep 2015 - 9:03 pm | बोका-ए-आझम

चायनाटाऊनऐवजी व्हर्टिगोचं रुपांतर वाटतंय.

उत्तम परीक्षण, चित्रपट एकदा पाहिला जाईल. उगीच कोणता बायस न ठेवता आणि कथा जास्त सांगून एन्ड स्पॉईल न करता नेमका परिचय करुन दिला आहेस.

एक निरीक्षण.. खालील वाक्यः

असेच तणावग्रस्त दिवस जात असतांना त्याला एक काम मिळते. एका माणसाला त्याच्या विवाह्यबाह्य संबंध असणार्‍या पत्नीचे अप्रशस्त अवस्थेतले फोटो पुरावा म्हणून हवे असतात. अमर पैशाची निकड असल्याने तयार होतो

पैशाची निकड असल्याने (नाईलाजाने) तयार होतो अशी परिस्थिती सिनेमात दाखवली आहे की हे तुझं लिखाणातलं मत आहे? कारण प्रायव्हेट डिटेक्टिव्ह हीच कामं मुख्यतः करत असतो, एरवी आम्ही "असली" कामं घेत नाही पण सध्या निकड आहे म्हणून स्वीकारलं झालं, अशी मनोवृत्ती या कामाबाबत या प्रायव्हेट डिटेक्टिव्हची असण्याचं कारण लॉजिकल वाटत नाही.

समीरसूर's picture

24 Jan 2013 - 9:30 am | समीरसूर

अमर पैशाची निकड असल्याने नाईलाजास्तव हे काम घेतो असं दाखवलं आहे. बायको सतत पैशासाठी भुणभुण करत असते; घरात अजिबात पैसे नसतात; आणि मुख्य म्हणजे डाळ-दाणा संपलेला असतो. त्यामुळे अमर जरी अगदी स्पष्टपणे तसे म्हणून दाखवत नसला तरी हे काम तो पैशाची आत्यंतिक निकड असल्याने करतो हे सहजच कळते.

लॉजिकल वाटत नाही हे खरं आहे. प्रायव्हेट डिटेक्टिव्हला ही कामे करावी लागत असतील कदाचित (नक्की माहित नाही) पण बहुधा त्यांची कार्याची क्षेत्रे ते आधीच ठरवत असतील. म्हणजे कुणी आर्थिक गुन्हे, कुणी औद्योगिक गुन्हे, कुणी फक्त माहिती मिळवण्याचे काम अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे काम करत असेल. आणि प्रेमप्रकरणांसाठी काम करतांना देखील 'तसले' फोटो पुरावे म्हणून लागतच असतील असे वाटत नाही. शिवाय तसे फोटो काढणे कायद्याने गुन्हा आहेच. त्यात बराच मोठा कायदेशीर, सामाजिक, आणि वैयक्तिक गुंता असतो. पकडले जाणे, फोटोंची गळती होणे, डिटेक्टिव्हकडूनच त्या फोटोंचा गैरवापर होणे, ब्लॅकमेलिंग होणे, इंटरनेटवर प्रसिद्ध होण्याचा धोका असणे असे बरेच संभाव्य धोके असल्यामुळे माझ्या मते कुठलेच डिटेक्टिव्ह असे फोटो काढत नसावेत असे वाटते. कायद्याच्या कचाट्यात सापडल्यास खूप महाग पडू शकते असे फोटो काढणे. शिवाय कुणी होणार्‍या भयंकर मानहानीकारक अब्रूनुकसानीचा धसका घेऊन खून वगैरे करण्यासही कमी करणार नाही. म्हणूनच प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असले फोटो काढत नसावेत असा माझा कयास आहे.

सस्पेन्स कथा आवडत असल्यामुळे चित्रपट पहायची ईच्छा आहे.

अग्निकोल्हा's picture

22 Jan 2013 - 6:18 pm | अग्निकोल्हा

हळूहळू (अक्षरशः) चित्रपट पुढे सरकतो. १९९२ सालातलं पुणे. सहवास सोसायटी किंवा डहाणूकर कॉलनी अशा भागात राहणारा अमर आपटे (गिरीश कुळकर्णी) हा खाजगी गुप्तहेर आपल्या व्यावसायिक अपयशावर मात करण्याचा आटोकाट आणि प्रामाणिक प्रयत्न करतांना दिसतो........ प्राची आणि अमर यांच्यात अर्थातच भावनिक दुरावा आलेला असतो. प्राची सततच्या दारिद्र्याला आणि आई-वडिलांसमोर पत्कराव्या लागणार्‍या लाचारीमुळे अस्वस्थ असते.......... हळव्या आणि सरळमार्गी अमरला त्याच्या कामात काहीकेल्या मनासारखे यश मिळत नाही. गुप्तहेरगिरी सोडायची नसते परंतु कामात हवे तसे यश देखील मिळत नाही. ............ घराखेरीज आणि एका जुनाट स्कुटरखेरीज अमरकडे काहीच नसते.

शरलॉक होम्स नाहि पण जेम्स हॅडलि चेस फॅक्टरीची तद्दन कथा मात्र नक्किच वाचतोय असं वाटलं... पण मराठी चित्रपट असल्याने बघावा म्हणतो.

ताजे कलम :-

आतिशय भंगार चित्रपट आहे!!! just tried to Copy "Chinatown" (1974 released) Movie..

अरेरे म्हणजे पुन्हा जाणत्या चित्रपट हौशिंच्या तोंडाला मराठी सिनेसृष्टीने पाने पुसली म्हणा की ? किती दिवस मराठी सिनेसृष्टीने लिंबु टिंबुंचा नमस्कार अथवा केवळ कलात्मकतेलाच भाव मानणार्‍या म्हातार्‍या मनाच्या प्रेक्षकांसाठीच चित्रपट बनवणार ?
बर ढापला आहे तरी हरकत नाही पण काही कलेच्या दृष्टिने तरी दर्जेदार, तांत्रिकबाजुने सफाइदार व पब्लिकच्या नजरेत सुपर हॉट ठरेल, मनामधे आग लावतिल अशी दृष्ये (सिन) तरी आहेत काय ? अगदीच हॉलिवुडपटां प्रमाणे स्तन मोकळे सोडलेल्या मदनिकांच्या मुक्त वावराचि द्रुश्ये वा सलमान खान/ मेथ्यु डेमन सारखि शरीरयश्टी वा देखणे पण असलेले हिरो पण नको तरीही काहितरी लार्जर दॅन लाइफ बघायला केव्हां भेटणार ?

एकदम बकवास चित्रपट. कशाचा कशालाही संबंध लागत नाही.
गिरीष कुल़कर्णी वरचा भरोसा उडाला.
थेटरात जाउन बघायच्या लायकिचा नाहीए.
बोल्ड सिन मात्र फारच बोल्ड आहेत हिंदीत सुध्दा असे आले नसतील त्या बाबत मात्र एकदम विंग्लीश सिनेमा टाइप.

अग्निकोल्हा's picture

22 Jan 2013 - 6:23 pm | अग्निकोल्हा

बोल्ड सिन मात्र फारच बोल्ड आहेत हिंदीत सुध्दा असे आले नसतील त्या बाबत मात्र एकदम विंग्लीश सिनेमा टाइप.

आजच बघतो मग :)

तेवढ्या साठी अख्खा शिनेमा सहन करायचा म्हणजे कठीणच आहे.

अग्निकोल्हा's picture

22 Jan 2013 - 8:05 pm | अग्निकोल्हा

कारण की जेया अंगि मोठेपन तेला यातना कठिण. मग जर काही चांगल मराठी चित्रपटसृष्टी देत असेल तर मनाचा मोठेपणा नको का दाखवायला ? कठीण का असेना ?

संजय क्षीरसागर's picture

23 Jan 2013 - 1:11 am | संजय क्षीरसागर

तुम्हाला `जेया अंगि मराठीपन तेला यातना कठिण' असं म्हणायच दिसतंय.

मराठी लोकांचे बोल्डसीन म्हणजे शेजार्‍याच्या बेडरूमचा सीसीटिवीच अचानक चालू झाल्यासारखं वाटतं.

मराठी लोकांचे बोल्डसीन म्हणजे शेजार्‍याच्या बेडरूमचा सीसीटिवीच अचानक चालू झाल्यासारखं वाटतं.

ही एखादयाची (किंवा एखादीची) फँटसी असू शकते ना? ;)

संजय क्षीरसागर's picture

25 Jan 2013 - 1:55 pm | संजय क्षीरसागर

हिंदी आणि इंग्रजी पात्रं लांबची वाटतात पण ओलेती मराठी नटी किंवा तिचे बोल्डसीन्स एकदम भिडतात. बोल्ड मराठी नाटकं उगीच का चालतात? (विषय भले काही का असेना). सखाराम बाइंडर, पुरूष, घाशिराम कोतवाल...आणि अधनमधनंच लागणारं पण तुफान चालणारं..००च्यामनीच्या गोष्टी!

मालोजीराव's picture

22 Jan 2013 - 8:15 pm | मालोजीराव

जरा वाट पहा यूट्युबावर अपलोड होइलच एव्हड्यात ! ;)

चौकटराजा's picture

23 Jan 2013 - 2:27 pm | चौकटराजा

ह्ये पटलं आपल्याला... तीन तासाचा शेणिमा एका किस साठी बघायचा उपदव्याप तारुण्यात " फेष्टीवल" सेनुमात केला होता
आता शेने बनलो .फुक्काट मधी तूनळी वर मिळेलच की बघायला !

अरे! म्हणजे निवांतपणे चार सहा महिन्यात बघितला तरी चालेल सिनेमा.

पैसा's picture

22 Jan 2013 - 8:14 pm | पैसा

आयनॉक्समधे नाही पण सहज बघायला मिळेल तेव्हा बघेन.

तांत्रिक बाबींवर चित्रपट नक्कीच चांगला आहे आणि उत्कंठा शेवट पर्यंत वाढवतो , पण नक्की शेवटी काय होते , आणि आपली उत्कंठा का वाढली आणि का शमली हेच कळत नाही , नक्की शेवटी काय होते

समीरसूर's picture

24 Jan 2013 - 9:37 am | समीरसूर

लेखात एक बाब नमूद करायची राहिली. चित्रपटाचा शेवट खूपच अपूर्ण आणि असमाधानकारक आहे. म्हणजे काय शेवट करावा हे न कळल्याने आणि तद्दन फिल्मी शेवट करणे टाळल्याने शेवट अगदीच तोकडा आणि अर्धवट वाटतो. म्हणजे खूप उन्हातून ४-५ तास फिरून आल्यावर घसा कोरडा ठक्क करणारी तहान लागावी, पाण्यासाठी जीव कासावीस व्हावा, आणि एवढ्यात समोर वाळामिश्रित गार पाण्याचा गडू यावा, तो ओठांना लावावा, दोन-पाच गार गार घोट तोंडावाटे घशात उतरावेत आणि अचानक तो गडू हातातून निसटून खाली पडावा तसे या 'पुणे ५२' च्या शेवटाबाबत होते.

पण एकदा बघावयास हरकत नाही...असे वेगळे चित्रपट आवडत असतील तर. सस्पेंस बर्‍यापैकी हाताळला आहे.

संजय क्षीरसागर's picture

24 Jan 2013 - 10:28 am | संजय क्षीरसागर

हा बुवांचा सस्पेन्स अजून जसाच्यातसा आहे!

तिमा's picture

25 Jan 2013 - 11:37 am | तिमा

तो पोस्टल कोड आहे.

संजय क्षीरसागर's picture

25 Jan 2013 - 1:47 pm | संजय क्षीरसागर

तिकडे तर बराच सस्पेन्स आहे.

आणि पुणे ०४ मधे अशा कथा घडण्याची शक्यता जास्त आहे.

सुहास झेले's picture

24 Jan 2013 - 11:49 am | सुहास झेले

स्पाशी सहमत....थोडं हात राखून केल्यासारखं वाटलं परीक्षण. पण नक्की बघणार.