कारळ्याची चटणी

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
4 Oct 2012 - 8:54 pm

साहित्यः

१ वाटी कारळे
३/४ वाटी कढीपत्ता
४-५ लाल सुक्या मिरच्या (आवडीप्रमाणी कमी जास्त)
१/४ वाटी तीळ
१/२ वाटी भाजलेले शेंगदाणे
१/४ वाटी सुके खोबरे
मीठ चवीनुसार
१/२ टीस्पून हींग

.

पाकृ:

एका पॅनमध्ये कारळे कोरडेच भाजून घ्यावे व एका ताटात काढून घ्यावे.
त्याच पॅनमध्ये कोरडेच तीळ गुलाबी रंगावर भाजून घ्यावे व ताटात काढून घ्यावे.
त्याच पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करून कढीपत्ता तळून घ्यावा.
तो कुरकूरीत झाला की काढून ठेवावा.
त्याच पॅनमध्ये मिरच्या तळून घ्याव्यात.
त्याही बाजूला काढून ठेवाव्यात.

.

आता पॅनमध्ये हींग व सुके खोबरे सोनेरी रंगावर परतून घेणे.
सगळे थंड झाली की मिक्सरच्या भांड्यात एकत्र करावे.
त्यात भाजलेले शेंगदाणे व मीठ घालून वाटून घ्यावे.

.

कारळ्याची खमंग चटणी तयार आहे.
हवाबंद डब्यात भरुन ठेवावी.

.

प्रतिक्रिया

स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स वाव ..सानिका काश मय लडका होती ,मय तेरेसे शादी कर लेती :

तु बहुत अच्छा खाना बनाती हय .
स्वप्निल बहुत लकि हय .
कारेळेकी चटणी सुंदर लग रहि हय .
_/\_

......***.......

मग काश लडका होती चि अट कायको?? ;)

अर्धवटराव

एकदम बरोबर, मिपाचं जुनं रुप आणि प्रतिसाद परत आले.

चिंतामणी's picture

6 Oct 2012 - 12:54 am | चिंतामणी

गल्ली चुकली का हो??????????

ऐकसयुरी's picture

4 Oct 2012 - 9:32 pm | ऐकसयुरी

मस्तच

कच्ची कैरी's picture

4 Oct 2012 - 10:16 pm | कच्ची कैरी

ह्या चटणीबद्दल नेहमी एकलेच होते कधी खाण्याचा योग आला नाही आता करुन बघेल आणि खाऊनही :)

मीही साधारण अश्याच पद्धतीने करते. फोटू आवडला. लई म्हणजे लई आवडती चटणी आता करायलाच हवी. सध्या चाललेली लसणीची संपली की कारळे नक्की.

रेवा आज्जी इथे कुठे मिळतिल कारेळे ,काय म्हणतात गं त्याना ,पूड (पावडर ) मिळेल का त्याची ??:(

भारतवारीत आणून ठेवते बरेच. :)

बहुगुणी's picture

5 Oct 2012 - 2:59 am | बहुगुणी

Niger/Nyger seeds किंवा thistle seeds या नावाने हे 'फिंचेस' या पक्षांचं आवडतं खाद्य म्हणून pet shops मध्ये किंवा KMart/ Target/ Home Depot वगैरेंच्या garden departments मध्ये मिळतं, पण कमीत कमी १० पौंडांच्या पिशवीत मिळतं :-( [इतक्या मोठ्या प्रमाणावर कारळाची चटणी!!!]

वलिसालु या तेलुगु, किंवा उच्चेल्लु/गुरेल्लु या कानडी नावांनी एखाद्या भारतीय दुकानात मिळू शकतील, बघायला हवं.

ओह्ह ....मी तर त्या प्राण्या पक्ष्यांच्या गल्ली मध्ये घुसत पण नाय ( वल्मार्ट टार्गेट मधल्ये )
त्यापेक्षा भारतातुन कुणासोबत डायरेक्ट चटणी बनवुन मागितलेलि काय वाईट्ट :)

धन्यवाद बहुगुणी पण माझी हसून पुरेवाट झाली. मी १० पौंडाची पिशवी आणलिये असं डोळ्यासमोर आलं. आता ती खपवायची कशी? यावर एक लेख पाडून होईल.

कवितानागेश's picture

5 Oct 2012 - 7:54 pm | कवितानागेश

कारळाची चटणी,
कारळाचे लाडू (अख्ख्या कारळाचे आणि कूटाचे, दोन्ही),
कारळाचे पौष्टिक घावन,
कारळाचे तेल,
कारळाच्या तेल काढून उरलेल्या कडब्याचे सांडगे,
कारळाचा चिवडा, ...
हे सगळे अती झाले की,
कारळ चिकटवून सुंदर निसर्गचित्र आणि पोर्ट्रेट्स....
आणि सगळ्यात शेवटी मागच्या अंगणात टाकलेले कारळ खाण्यास रोज येणार्‍या पक्ष्यांचे फोटु...
अश्या अनेक धाग्यांची सोय होइल! :D

संक्रांतीच्या हळदीकुंकवास कारळ्याच्या पुड्या लुटणे. लग्न, मुंजीचा आहेर म्हणून शोभिवंत डब्यात कारळे भरून देणे, जावयाला पहिल्या संक्रांतीला हलव्याऐवजी कारळे भरून चांदीची वाटी. अधिक महिन्यात जावयाला (हो बै, सगळं काय ते जावयालाच) कारळ्याच्या चटणीने भरलेल्या तेहत्तीस वाट्या. ;) असं कित्ती मनात आहे. आता फक्त १० पौंडाची पिशवी आणण्याची देरी! लगेच उपक्रम सुरु! (बहुगुणी, हलके घ्या.)

तुम्हाला बर्‍याच सुना येउ घातल्याचं ऐकतोय उपवर-नोंदणीच्या कॉमेंटस वरून, आता जावई पण येउ घातलेत आहेत हे नवीनच ऐकतोय; नोंदणी वधूंपर्यंत पोचली की काय? :-) आणि तसंही सुनांनीही काय घोडं मारलंय म्हणा, आय्टी नवरे स्वयंपाकाला लागल्यावर तुमच्या सुनांनी काँट्रिब्युशन म्हणून घरात कारळाची चटणी द्यावी (तुमच्या जीवावर!)

रेवा आज्जी ए .. एक काम करुया कै गं ??
एक दहा पौंडाची पिशवी तु , मी आणि शिल्पि तिघी शेअर करुयात कै ;)

कुंदन's picture

6 Oct 2012 - 5:50 pm | कुंदन

म्हणजे सगळे पैसे ...सॉरी सॉरी $ रेवती तै देणार , अन मग त्या पुढे शेअरींग होणार ना?

इश्श्य , तुम्ही कसं ओळखलत ?? :(
:P

अत्रुप्त आत्मा's picture

4 Oct 2012 - 10:24 pm | अत्रुप्त आत्मा

कट टू कट....

ए टू झेड...

येकदम परफेक्ट...

बाकि नेहमीची प्रतिक्रीया कल्पावी.. :-)

वा मॅडम.... मस्तच..... माझी काकी पण मस्त करते हि चटणी.... त्याची आठवण झाली.

प्रभाकर पेठकर's picture

5 Oct 2012 - 1:52 am | प्रभाकर पेठकर

कारळ्यांची चटणी फार आवडते. ह्या पद्धतीने करून पाहिली पाहिजे.

Solapurkar's picture

5 Oct 2012 - 2:50 am | Solapurkar

ऊत्तम. अ‍ॅक्दम गावाची आट्वन आली. भाकरी आणी कान्दा हवा.

यशोधरा's picture

5 Oct 2012 - 7:55 am | यशोधरा

मस्त दिसते आहे चटणी. करुन पाहीन्.धन्यवाद.

आमच्याकडे करतात त्यात तीळ, शेंगदाणे घालत नाहीत. अशी करुन पाहायला हवी एकदा.

वामन देशमुख's picture

5 Oct 2012 - 1:06 pm | वामन देशमुख

फारच चविष्ट होणारी पाकृ. धन्यवाद, सानिकास्वप्नील!
मराठवाड्यात कारळ्याला काऱ्हाळ असे म्हणतात.
काऱ्हाळाची पूड दह्यात कालवून (विशेषतः शिळ्या) भाकरीसोबत खाण्याचा आनंद खरंच अवर्णनीय!

रेवती's picture

5 Oct 2012 - 7:18 pm | रेवती

आमच्याकडेही दह्यात कालवून खातात. याला खुरासणी असेही म्हणतात. त्यात शेंगदाणे, खोबरे न घालता फक्त तीळ घालून चटणी कुटायची (मिक्सर नव्हते तेंव्हा).

स्मिता.'s picture

5 Oct 2012 - 1:55 pm | स्मिता.

कारळे याआधी ऐकूनही माहिती नव्हते. पण फोटोंवरून चटणी चविष्ट असेल असंच वाटतंय.

मस्त लागते ही चटणी. च्यायला इकडे सगळीच मारामार... कारळा काही मिळत नाय... :(

पक्षीखाद्य दुकान शोधा मोहनराव! ;)

खादाड's picture

5 Oct 2012 - 8:18 pm | खादाड

आणि चट्णी तर छान लागतेच :)

सस्नेह's picture

5 Oct 2012 - 8:44 pm | सस्नेह

अगदी नेमकी पाकृ.बरोबर साहित्य व प्रमाण. मी अशीच करते. फक्त खोबरे घातल्यामुळे चटणी लगदा होते म्हणून ते घालत नाही.

कुंदन's picture

5 Oct 2012 - 8:50 pm | कुंदन

कारळे म्हणजेच अळशी का ?

सानिकास्वप्निल's picture

5 Oct 2012 - 8:52 pm | सानिकास्वप्निल

अळशी म्हणजे जवस / फ्लॅक्ससीड्स

कारळे म्हणजे बहुगुणी म्हणतात तसे Thistle seeds or Niger seeds

कुंदन's picture

8 Oct 2012 - 7:07 pm | कुंदन

http://en.wikipedia.org/wiki/Flax_seeds

Flax seeds contain high levels of dietary fiber as well as lignans, an abundance of micronutrients and omega-3 fatty acids (table).

रेवती's picture

5 Oct 2012 - 8:53 pm | रेवती

नाही हो भाऊजी......आळशी म्हणजे जवस.

प्रभाकर पेठकर's picture

6 Oct 2012 - 2:10 am | प्रभाकर पेठकर

'आळशी' नाही, 'अळशी'.

दादा कोंडके's picture

5 Oct 2012 - 9:29 pm | दादा कोंडके

मला लहान असताना त्या चटणीकडे बघून कटींगच्या दुकानात खाली पडलेल्या केसापासून केली की काय असा संशय होता, त्यामुळे खूप दिवस खात नव्हतो.

वरती काही जणांचं कारळाच्या चटणीबद्द्ल घोर अज्ञान बघून एक मिपाकर......असो.

एकदम आवडणारी चटणी. ज्वारीच्या भाकरीबरोबर मस्त लागते. कारळं मिळतात का पाहते. जवस अन कारळं वेगवेगळे का?

पैसा's picture

5 Oct 2012 - 11:17 pm | पैसा

एकदम मस्त पाकृ!

अभ्या..'s picture

5 Oct 2012 - 11:29 pm | अभ्या..

मस्त तर आहेच पाकृ
पण त्यात शेंगादाणे. अहं. :-(.
नुसत्या कारळाच्या चटणीचीच टेस्ट वेगळी आणि नुसत्या शेंगदाण्याच्या चटणीची टेस्ट वेगळी (त्यात आमची सोलापूरची चटणी)
तरी घरी सांगायला पाहिजे हे रिमिक्स म्हणजे चव चाखायला तरी मिळेल.

चिंतामणी's picture

6 Oct 2012 - 12:53 am | चिंतामणी

राणीच्या देशात कारळे मिळाले तुला?

सानिकास्वप्निल's picture

6 Oct 2012 - 3:10 am | सानिकास्वप्निल

भारतातून आणते नेहमी :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Oct 2012 - 12:12 am | निनाद मुक्काम प...

लय भारी
तोंडात लाळेचा ओघळ भरून आला आहे.

स्पंदना's picture

8 Oct 2012 - 6:44 am | स्पंदना

दही अन तिळ्कुट ...आम्ही तिळकुट म्हनतो याला.
अन कारळे नसतील मिळत तर जवस (फ्लॅक्स सीडस) वापरुन बघा तीच चव पण जवस जरा उग्र वासाचे वाटतात.

बापू मामा's picture

17 Oct 2012 - 5:27 pm | बापू मामा

कारळाची चटणी करताना जर मिक्सर ऐवजी खल बत्ता वापरला तर अजून चवीची होइल.
कोणतीही चटणी खलबत्त्यात कुटून करावी. जास्त टेस्टी होईल.