फौजिया अबू खालिद यांच्या कवितांचा अनुवाद

Kavita Mahajan's picture
Kavita Mahajan in जे न देखे रवी...
21 Sep 2012 - 6:27 pm

१.पाणी

तिनं वाळवंटात आपली बोटं बुडवून

एक कविता लिहिली मृगजळानं... जी टपकतेय

टप

टप

टप

एक लय. इंद्रियातीत...

२. दोन मुली

( आई नूर साठी, जिच्या कविता मी उधार घेते...)

मी तिची कुडती घट्ट पकडून ठेवते
जसं एखादा मुलगा पतंगाचा मांजा पकडतो
तिच्या केसांचं टोक गाठते बोटांनी
जसं एखादी खार बदामाच्या झाडावर चढते.
दुपारी आम्ही दोघी उड्या मारत राहतो या दुनियेतून त्या दुनियेत.
मस्ती करतो वार्‍यासोबत
पाखरांसारखी, ज्यांच्या पिंजर्‍याचा दरवाजा उघडा राहिलाय.
एक खेळ सोडून, मध्येच खेळायला लागतो...

कविता

प्रतिक्रिया

पहिली कविता मला 'झेपली' नाही, दुसरी थोडीशी कळली असं वाटतं, पण तिला कवयित्रीच्या भौगोलिक/ सामाजिक परिस्थितीचे काही संदर्भ असावेत असं वाटतं, या फौजिया अबू खालिद अफगाणिस्तान, इराण, वगैरे मध्यपूर्वेतल्या आहेत का? तसं असेल तर तिथल्या स्त्रियांच्या आयुष्यावर बोलका प्रकाश टाकणारी कविता वाटली. Then again, तसं नसेल तर मला दुसरीही कळली नाही, आणि ते माझं न्यून आहे असं धरून चालतो. पण समजावून घ्यायला आवडेल.

पैसा's picture

22 Sep 2012 - 8:37 am | पैसा

मला पण कविताची पार्श्वभूमी समजून घ्यायला आवडेल.

जाई.'s picture

22 Sep 2012 - 11:49 am | जाई.

+१
बहुगुणीँशी सहमत

नगरीनिरंजन's picture

22 Sep 2012 - 8:54 am | नगरीनिरंजन

पिंजर्‍यातल्या पाखरांना पिंजरा तोडता येत नाही
कैदी शरीराचा पिंजराही सोडवत नाही
दु:खाच्या फटींतलं सुख टिपून खाताना
दर्दभरी गाणी आपोआप उमटतात.....
मला त्यांचं दु:ख हळूहळू आवडायला लागलंय की काय?

नाना चेंगट's picture

22 Sep 2012 - 10:44 am | नाना चेंगट

मुळ कविता कोणत्या भाषेतली होती ?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Sep 2012 - 9:44 pm | विश्वनाथ मेहेंदळे

ओ ताई, काही तरी आगापिछा, पार्श्वभूमी, वर्जीनल कविता कुठल्या भाषेत होती, त्याचे सामाजिक संदर्भ, काहीतरी माहिती द्या.
मला जाम कॉम्प्लेक्स आला हे दोन धागे वाचून.

सांजसंध्या's picture

24 Sep 2012 - 10:31 am | सांजसंध्या

दुसरी कविता आवडली.

@तिनं वाळवंटात आपली बोटं बुडवून एक कविता लिहिली मृगजळानं... जी टपकतेय
टप
टप
टप

ख्याक =))
फु बै फु नामक तद्दन टाकाऊ मराठी कार्येक्रमात असल्या छापाच्या कविता असतात

Kavita Mahajan's picture

24 Sep 2012 - 12:12 pm | Kavita Mahajan

कविता एकतर कळते किंवा कळत नाही. तिथे थोडी समजली, अमक्या छापाची वाटली असे काही म्हणणे हेच विनोदी असते. ख्याक करण्यापेक्षा समजली नाही असे म्हणावे किंवा काहीच म्हणू नये. फौजिया जगातील महत्त्वाच्या कवींपैकी एक समजली जाते. हे आपल्या माहितीस्तव. तुम्हांला चांगले ते टाकाऊ वाटत असेल तर त्या अज्ञानाला माझा इलाज नाही.

स्पा's picture

24 Sep 2012 - 12:19 pm | स्पा

हो का? तसं असेल तर.. तुमचा अनुवाद अगदीच कॉपी टू कॉपी आणि बाळबोध झालाय ..
नुसते शब्दांना मराठीत लिहून त्याला अनुवाद म्हणायला लागलो तर असाच हास्यास्पद प्रकार दिसतो..

मला इथे एका हिंदी गाण्यांचा अनुवाद मराठीत करणाऱ्या काकांची आठवण झाली

Kavita Mahajan's picture

24 Sep 2012 - 12:49 pm | Kavita Mahajan

मूळ मजकूर न पाहता अनुवाद कॉपी टू कॉपी आणि बाळबोध असल्याचं ओळखता येतंय म्हण्जे अंतर्ज्ञान दिसतंय तुम्हांला. तसंच मलाही मिळालं असतं तर इतकी वर्षं अनुवाद, अनुवादांचे संपादन, त्याविषयी शोधनिबंध, संवाद... असली सगळी खर्डेघाशी आणि डोकेफोड करावीच लागली नसती. हे ज्ञान कुठून मिळवलंत त्याचा पत्ता तेवढा दिलात तर बरं होईल बुवा.

यशोधरा's picture

24 Sep 2012 - 1:22 pm | यशोधरा

तुम्ही दिलेल्या फौजिया ह्यांच्या कवितांचा हिंदी अनुवाद इथे आहे.
http://padhte-padhte.blogspot.co.uk/2011/08/blog-post_08.html
http://padhte-padhte.blogspot.co.uk/2011/08/blog-post_10.html

हेच अनुवाद तुम्ही मराठी भाषेत उपलब्ध करुन दिले आहेत ना? हे आत्ता नेटवर सापडले आहेत. अजूनही लिंका सापडू शकतील आणि पुस्तकांच्या दुकानांमधून पुस्तके. हे सगळे शोधणे फारसे कठीण काम नव्हे. तुम्ही निश्चित काम केले असेल, पण त्यहूनही उत्तम कोणी कधी करु शकेल ही जाणीव मनात सतत जागी असली तर इतके मग्रूर प्रतिसाद लिहायची गरज भासणार नाही कदाचित. असो.

तुमचा अनुवाद हिंदी अनुवादाचा शब्दशः अनुवाद वाटतो हे तर खरेच.

अजूनही काही कवी आणि कवयित्रींच्या कवितांचा अनुवाद ह्याच संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मामे लिंक बद्दल मंडळ हाभारी हाये :)

प्रभाकर पेठकर's picture

24 Sep 2012 - 1:53 pm | प्रभाकर पेठकर

नेमक्या शब्दात पंचनामा केला आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

24 Sep 2012 - 2:02 pm | विश्वनाथ मेहेंदळे

कुणाला हे मग्रूर वाटेल तर कुणाला मूळ प्रतिसाद. हो की नाही ? :-)

जयंत कुलकर्णी's picture

24 Sep 2012 - 2:14 pm | जयंत कुलकर्णी

जर कविता वारंवार वाचली तर त्यात कवीला काय म्हणायचे आहे हे थोडेफार समजू शकते. कविता भाषांतर करण्यापेक्षा त्यातील भावाचे भाषांतर करावे अशा मताचा मी आहे. माझा एक बापूडा प्रयत्न...

वास्तवाची लेखणी उचलली
कवितेसाठी विचार माझे
मृगजळ.
जे ठिपकत आहे....
माझ्या जाणीवांच्या लयीत...

मस्त कविता आहे... अगदी मनस्वी...

स्पा's picture

24 Sep 2012 - 2:15 pm | स्पा

@@@@कविता भाषांतर करण्यापेक्षा त्यातील भावाचे भाषांतर करावे अशा मताचा मी आहे. @@@

विमेना जर हे समजले असेल तर चांगलंच आहे

विश्वनाथ मेहेंदळे's picture

24 Sep 2012 - 9:26 pm | विश्वनाथ मेहेंदळे

सदर कविता बरीचशी abstract प्रकारची वाटली. It's quite open to interpretation. जकुंनी तिचे एक interpretation लिहिले असेल, जे त्यांना त्या कवितेत दिसले. इतर कुणाला आणि काही दिसेल. पण तिला कवितेचा अनुवाद म्हटले तर मूळ कवितेवर तो अन्याय आहे. कारण तसे केल्याने कविता वेगळ्या प्रकारे interpretate करण्याचा वाचकाचा हक्क जातो नाही का ?

ज्ञानेश्वरी म्हणजे गीता नव्हे. बघ पटते आहे का ते.

@वास्तवाची लेखणी उचलली
कवितेसाठी विचार माझे
मृगजळ.
जे ठिपकत आहे....
माझ्या जाणीवांच्या लयीत...

वा जकू..
धन्यवाद :)

Kavita Mahajan's picture

24 Sep 2012 - 9:08 pm | Kavita Mahajan

ही स्वतंत्र कविता झाली. मूळ कवितेचा अनुवाद नव्हे. अर्थांतरणही नव्हे. कारण वाळवंटात बोटे बुडवणे आणि मृगजळाने लिहिणे या प्रतिमा आहेत. प्रतिमा अनुवादात जशाच्या तशा राहिल्या पाहिजेत, कारण त्यांमधून अगणित अर्थ निघू शकतात. टप टप टप म्हणताना जी लय येते, तीही आली पाहिजे. वाळवंट म्हणजे वास्तव आणि मृगजळ म्हणजे कल्पना हा तुम्ही काढलेला एक अर्थ आहे. तो चांगलाही आहे. पण मूळ कवितेला त्यामुळे पूर्णपणे न्याय मिळत नाही असे वाटते. कवितेविषयी लिहिताना आपण अशी स्पष्टीकरणं देणं ठीक, पण कविता हेच एक स्पष्टीकरण करणे हे पटत नाही. भावाचे भाषांतर करताना आपण प्रतिमा गमावतो, असे तुम्हांला जाणवले नाही का?

पैसा's picture

24 Sep 2012 - 9:19 pm | पैसा

इथे मला दोन मते दिसत आहेत

१. कवितेचा भाव महत्त्वाचा. दुसर्‍या भाषेत रुपांतर करताना मूळ भाव त्यात उतरला तरी पुरेसा आहे,

२. कवितेतील प्रतिमा सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत.

दोन्ही मते बरोबर वाटत आहेत. यावर आणखी चर्चा वाचायला आवडेल.

Kavita Mahajan's picture

24 Sep 2012 - 2:22 pm | Kavita Mahajan

यशोधरा, नाईलाजाने 'जशास तसे' या न्यायाने ही भाषा वापरावी लागली.
एकुणात चांगल्या चर्चांसाठी अशी भाषा वापरली जात नाही. माझा स्वभाव मग्रूर नाही व भाषाही नाही. चांगले लेखन वाचकांपर्यंत पोहोचावे, हा अनुवादाचा हेतू असतो आणि त्याच हेतूने मी हे काम करत आले आहे. माझ्याहून उत्तम काम करणारे अनेकजण आहेत. त्यांना सामावून घेणारा 'भारतीय लेखिका' सारखा ४० पुस्तकांचा प्रकल्प मी आखला आहे आणि त्यातील मी संपादित केलेली १४ पुस्तके मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत. नवीन चांगले लेखक, चांगले अनुवादक व चांगले संपादक यांचा शोध नेटवर देखील घेतला जाऊ शकतो, अशा एकमेव हेतूने मी मिसळपाववर आले आहे. उपक्रमवर मला अशी चांगली मंडळी मिळाली, जी प्रकल्पांमध्ये सहभागी झाली. तिथे आम्ही गांभीर्याने उत्तम चर्चा केल्या. मी स्वतःला एकमात्र समजणारी असते, तर असे सर्वसमावेशक उपक्रम आखले नसते. आणि मग्रुरीने वागणारी असते तर इतक्या मोठ्या संख्येने लोकांना सोबत घेऊन काम देखिल करणे शक्य झाले नसते. इथे ज्या पद्धतीने काही प्रतिसाद येताहेत, त्यांना मी दिलेली उत्तरे जरूर वाचून पहा. सर्व उत्तरे मग्रूर वाटतात का, ते सांगा. उगाचच शब्दच्छल करणे, डिवचणे हे पौगंडावस्थेत ठीक असते... त्यापद्धतीने कुणी त्रास देत असेल आणि व्यवस्थित भाषेत उत्तर देऊनही पुन्हा तसेच वर्तन करत असेल, तर जशास तसे वागावेच लागते. इथे केवळ टाइमपास लेखनच द्यावे असे मिसळपावच्या संपादक मंडळाने सांगावे, म्हणजे मी इथे येणे थांबेन. ज्यांना मी आखलेल्या प्रकल्पांमध्ये रस आहे, ते व्यनि करू शकतातच.

एकूणातच हा विषय पुढे वाढवायचा नाही, पण तुम्ही हे -इथे ज्या पद्धतीने काही प्रतिसाद येताहेत, त्यांना मी दिलेली उत्तरे जरूर वाचून पहा. सर्व उत्तरे मग्रूर वाटतात का, ते सांगा. - लिहिलेच आहेत म्हणून. सगळे जे काही म्हणायचे आहे, ते इथेच लिहिते.

सगळे धागे वाचलेत. वाचताना हे प्रकर्षाने जाणवले आहे की, जेथे वा ज्यांनी तुम्हांला कोणत्याही प्रकारचा विरोध केलेला नाही, त्यांना गोड शब्दांत उत्तरे मिळाली आहेत, ज्यांनी जराही विरोधी सूर लावला आहे, त्यांच्याशी बर्‍यांच धाग्यांवर तुम्ही फाडफाड केलेले आहे. अडचणीत याल तेथे उत्तरे दिलेली नाहीत, पण ते असो.

कवितांबद्दलची तुमची मते वाचून मी अवाक् झाले होते. एका फटक्यात सर्व उत्तमोत्तम रचनांना तुम्ही आधुनिकोत्तरच्या नावाखाली कचर्‍यात फेकून दिलेत की! लोकांची समजही काढलीत. ह्याला मग्रूर नाही म्हणायचे तर काय? की केवळ कविता महाजन म्हणतात म्हणून ते ग्राह्य? कितीतरी थोरामोठ्यांनी काव्याचे सर्वतोपरी नियम पाळूनही सुरेख कविता केल्या आहेत, ही तरी जाणीव तुम्ही बाळगावयास हवी होती. त्याऐवजी तुम्ही जे लिहिले आहेत त्याचे सखेद आश्चर्य वाटले होते आणि खरे म्हणाल तर कीव आली होती.

भाषांतर/ अनुवादाबद्दल म्हणाल, तर मूळ लेखन कोणाचे व त्या लेखका/ लेखिकेबद्दल काही थोडे लिहिण्यात, काहीच गैर नाही, उलटपक्षी तो एक शिष्टाचारच आहे. साहित्य जगतातले आणि आंतरजालावरचेही. ते न पाळण्यात काय हशील, हे समजले नाही.

माझे असे प्रांजळ मत आहे की मिपावर तुम्हांला काहीही विरोध न होता सगळ्यांनी माना डोलावल्या असत्या तर कदाचित मिपावरचे तुमच्या मताप्रमाणे होणारे "टाईमपास" लेखन तुम्हांला खटकले नसते आणि मिपाच्या संपादक मंडळाच्या नावाने उगा आगपाखड का? पुन्हा मिपावर येऊन तिसर्‍याच कोण्या संकेत स्थळाचे गुणगान गाणे हा कोणता शिष्टाचार?

सर्वात शेवटी इतकेच सांगावेसे वाटते की तुम्ही स्वत: तुमचे मला उद्देशून लिहिलेले पोस्ट वाचा आणि तुम्ही त्यात " मी, माझे, मला" ह्याचा कितीदा उल्लेख केला आहेत ते पहा. असो.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

24 Sep 2012 - 2:02 pm | विश्वनाथ मेहेंदळे

स्पा भाऊ, मी खूप विचार केला, पण इतक्या छोट्या कवितेचा अनुवाद अजून कसा करणार ते कळले नाही.
जरा समजावून सांगतोस का ? नक्की काय बाळबोध वाटले, कुठला शब्द नेमका अर्थ न पोहोचवता उगाच शब्दाला शब्द म्हणून दिला आहे ते दाखवून दिलेस तर आभारी राहीन.

@स्पा भाऊ, मी खूप विचार केला, पण इतक्या छोट्या कवितेचा अनुवाद अजून कसा करणार ते कळले नाही.जरा समजावून सांगतोस का ? नक्की काय बाळबोध वाटले, कुठला शब्द नेमका अर्थ न पोहोचवता उगाच शब्दाला शब्द म्हणून दिला आहे ते दाखवून दिलेस तर आभारी राहीन

>>>>>विमे त्याच काय आहे ना.. कविता छोटी अथवा मोठी असो.. अनुवाद करणे म्हणे फक्त शब्दाला शब्द जोडणे नव्हे..
कवितेच्या लांबीपेक्षा त्यातली भावना पोचण जास्त महत्वाच हे कळण्याएवढे तुम्ही दुधखुळे नसाल ... भावना पोचण्यासाठी अनुवाद करण्यार्याने थोड स्वातंत्र्य घेतल्यास हरकत नसावी .

तुम्ही कदाचित भाषांतरा बाबत बोलत आहात आणि मी अनुवादाबद्दल
असो.. चालायचंच
कोणी कसे वागावे वेग्रे..हॅ ..हॅ.

.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Sep 2012 - 1:20 pm | llपुण्याचे पेशवेll

>> फौजिया जगातील महत्त्वाच्या कवींपैकी एक समजली जाते. <<
बरं मं? म्हणून तिने काही लिहीले तरी ते चांगले म्हणायचे का?

>> हे आपल्या माहितीस्तव. तुम्हांला चांगले ते टाकाऊ वाटत असेल तर त्या अज्ञानाला माझा इलाज नाही. <<
बर मग वरील बालिश वाक्यं वाचून आम्ही चान चान म्हणून टाळ्या पिटायच्या का? तुम्हाला चांगली वाटली असेल तर ठीक आहे का चांगली वाटली हे सांगा. मग वाचणारे ठरवतील चांगली आहे का नाही ते.

<<तुम्हाला चांगली वाटली असेल तर ठीक आहे का चांगली वाटली हे सांगा. मग वाचणारे ठरवतील चांगली आहे का नाही ते. >>

पेशव्यांशी सहमत.

स्पा's picture

24 Sep 2012 - 12:57 pm | स्पा

:)

यशोधरा's picture

24 Sep 2012 - 2:10 pm | यशोधरा

विमे, केवळ हा एक प्रतिसाद पाहून मी हे लिहिलं नाहीये. आजवर लेखिकामहोदयांचे जितके धागे आले, त्यावरचं एकूण लेखन आणि लिहायची पद्धत पाहून लिहिलेलं आहे. लेखिकेबद्दल मला वैयक्तिक काहीच आकस नाही पण त्यांची भाषा पटली नाही. बाकी चालूदेत.

कवयित्री सौदी अरबस्तानातील आहे. हा संदर्भ असला, तर कवितेतील प्रतिमा आणखी कळते.
मला पहिली कविता आवडली.
- - -
तिने वाळवंटात बोटे बुडवून
मृगजळाने लिहिलेली कविता
ठिबक
ठिबक
ठिबकतेय
अस्फुट लयीत.
- - -

वेणू's picture

29 Sep 2012 - 3:33 pm | वेणू

उग्र वाळवंटातल्या मृगजळात आपली बोटे बुडवून तिने एक कविता केली....
जी टिपटीपते आहे, आजही...
एक लय साधत!
जाणिवे नेणिवे पलिकडली....!!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 Sep 2012 - 4:13 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आवडले :-)