कांद्याचा भात

साहित्य: तांदूळ १ कप, उभा जाडसर चिरलेला कांदा अडीच कप , हरभरा डाळ १ टेबलस्पून , मोहरी अर्धा टीस्पून, मेथ्या एक अष्टमांश टीस्पून, हिंग एक अष्टमांश टीस्पून, हळद पाव टीस्पून, कढीलिंबाची एक काडी, धणेपूड एक टीस्पून,
जिरेपूड अर्धा टीस्पून, काळीमिरीपूड पाऊण टीस्पून, लिंबूरस १ टेबलस्पून, तांदळाच्या दुप्पट आधणाचे पाणी, थोडे तूप, कोथिंबीर व खोबरे, मीठ.

कृती: तांदूळ धुवून निथळत ठेवावेत. कांदा जाडसर चिरावा. फोडणीचे साहित्य तयार असावे. पाणी तापण्यास ठेवावे. पातेल्यात नेहमीपेक्षा थोड्या जास्त तेलाची मोहरी, हिंग, हळद, मेथ्या घालून फोडणी करावी. कढीलिंब व हरभरा डाळ घालून थोडे परतावे. त्यात चिरलेला कांदा घालावा व परतावे. त्यास एक वाफ आणून धुतलेले तांदूळ घालावेत व हलक्या हाताने परतावेत. तांदळाचा रंग किंचित बदलला की आधणाच्या पाण्यापैकी निम्मे पाणी त्यात घालावे. नंतर धणे, जिरे व मिरेपूड, मीठ घालावे. पाणी आटत आल्यानंतर उरलेल्यापैकी निम्मे पाणी घालावे व झाकून शिजू द्यावे. मधेच एक दोनदा हलवावे. त्यावेळी लिंबूरस घालावा. लागल्यास आणखी पाणी घालून मंद आचेवर भात अगदी मऊ व मोकळा शिजायला हवा. किंचित पाणी त्यात असतानाच साजुक तूप कडेने सोडून झाकून ठेवावे व आंच बंद करावी. वाफ मुरल्यावर भात वाढावा. वरून ओले खोबरे व कोथिंबीर घालून उपयोगात आणावा. याबरोबर आमसुलाचे गोडसर ताक द्यावे.

टीपा: १. तांदूळ कोणत्याही प्रकारचा वापरता येतो.
२. कांदे शिजून कमी होत असल्याने जास्त घ्यावेत व जाड चिरावेत म्हणजे शिजून गाळ होत नाही.
३. काळी मिरीचा वापर तब्येतीस झेपेल त्याप्रमाणे करावा.
४. पाणी लागेल तसे थोडे थोडे घालावे.
५.यात गूळ, साखर घालू नये. कांद्याचा गोडसरपणा पुरतो.
६. आमसुलाचे गोडसर ताक करण्यासाठी, नेहमीप्रमाणे ताक करून घेणे. त्यात आमसूलाचे पाणी अथवा आगळ घालावे. आगळ गोड असल्याने साखर नाममात्र घालावी. फक्त आमसूलाचे पाणी /अर्क असल्यास साखरेचे प्रमाण वाढवावे. कोथिंबीर घालावी. मीठ, हिरवी मिरची, आले व एक लसणाची पाकळी यांचे वाटण घालून ताक तयार होते. त्यास फोडणी नाही.

पावसाळी हवेत या भाताचा आस्वाद चांगल्या प्रकारे घेता येतो. एखाद्या पावसाळी संध्याकाळी, सौ. आई हा भात करीत असे.

074

प्रतिक्रिया

सोपी, मस्त पाकृ. करुन पाहीन.
हे आमसुलाचे ताक भारी प्रकार वाटतो आहे. ते आजच करेन. smiley

कांद्याचा भात कांद्याच्या पोह्यांसारखा का दिसतोय.? smiley

~~~~~~~~~~~~~~~~~~oOoOoOoOoOoOo~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल..
ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल..

- अशोक बागवे

साधी आणि सोप्पी पाक क्रुती .
मस्त smiley

०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====

♥ " मेरा पती ' पती ' smiley ... तेरा पती ' वनस्पती ' smiley " ♥

साधा असला तरी टेस्टी असेल याची खात्री वाटते आहे. साधेच पदार्थ बर्‍याचदा खूप टेस्टी असतात.

बादवे. तंबिटाचे लाडू ?!

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

साधीच पाकृ + नमुनेदार सजावट + उत्कृष्ठ फोटो = जिव्हा + पोट + मेंदू चे समाधान !

- तर्री
Humor is the absence of terror, and terror the absence of humor.

मस्त वाटतेय
करून बघणेत यील

***************************************

- मन्या फेणे

वा.. मस्तं पाककृती. छायाचित्र तर, एखाद्या इंग्रजी मासिकातील छायाचित्राप्रमाणे, एकदम आकर्षक आहे.

छायाचित्र तर, एखाद्या इंग्रजी मासिकातील छायाचित्राप्रमाणे, एकदम आकर्षक आहे.

छायाचित्राला विशेष गुण दिले आहेत. सजावट, छायाचित्र, छायाचित्रात येणारी भांडीकुंडी हे जालीय पाककृत्यांचे आत्मे असतात. यांच्यावर बर्‍याचदा पाककृत्यांचे यश असते. मलाही लै पाककृत्या टाकायच्या असतात पण आमची भांडीकुंडी साली आडवी येतात. smiley

-दिलीप बिरुटे

मलाही लै पाककृत्या टाकायच्या असतात पण आमची भांडीकुंडी साली आडवी येतात.

डिट्टो! smiley

स्वॅप्स
------------------------------------------------------------------
"गरूडासारखे उडायची इच्छा असेल तर बदकांबरोबर पोहत बसण्यात वेळ घालवू नका."
"If you want to fly like eagle, don't waste your time swimming with ducks."
-------------------------

जमल्यास कुंडीही बदला smiley

"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.

मी मूळची कानडी असले तरी हा टारगटपणा केला नव्हता. smiley
हे मराठी संस्थळ असल्याचे लक्षात ठेवले होते. smiley

फोटो अतिशय सुंदर आलाय. भातही नक्कीच खूप चविष्ट असणार.

---------------------------------------------------------------------------------------------------------

"To confront a mind that radically alters our perception of the world is one of life's most unsettling yet liberating experiences."

आमसुलाचं ताक करुन बघते उद्या.

***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/

अगदी वेगळा प्रकार वाटतोय भाताचा. चवीची कल्पना केल्यावर तोंपासु.
रेवतीतै, अगदी बारीक सारीक तपशील दिल्याबद्दल धन्स.

॥ स्नेहेषु बलानि ॥

अरे वा! प्रथमदर्शनी तरी आकर्षक तरीही सोपी पाकृ वाटते आहे

ऋषिकेश
------------------
माझे मिपावरील लेखन इथे वाचा

मश्त मश्त पाकृती.

( वस्तुंचे प्रमाण अष्टमांश हा गेलेल्या गोकुळष्टमीचा प्रभाव काय ?)

"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.

मला वाटते, हरभर्‍याच्या डाळी बरोबर शेंगादाणे, मटार हेपण छान लागतील.

========================
"देवा, मला पाव."
"देवा, मला बटरपण!"
-माउ

कान्देभात छानच.आमसुलाचे ताकही चविष्ट.करुन बघते दोन्ही पदार्थ.

मस्तंच.
आमसुलाचे ताक हां नवाच प्रकार ऐकला.
चवीत फरक असला तरी दिसायला सोलकढी सारखंच दिसत असेलं नै?

~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली

आमसुलाचं ताक करुन पहावं असा विचार आहे... भाताबद्दल लई भारी, सध्या एवढंच.

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

आमच्या सोलकढीतच मुळात ताक/दही असते. त्यामुळं आमसुलाचं ताक हा प्रकार किती कातिल असू शकतो याची कल्पना आहे! smiley

पाकृ झकासच!

कांदेभात आवडला. आमसुलाचे ताकही उत्तम.
न खाताच आलेली ही प्रतिक्रिया आहे!

कांदेभात आवडला , वेगळा प्रकार आहे
करून बघेन smiley
आमसुलाच्या ताकाची पाककृती खासकरुन जास्त आवडली
रंगही छान आलाय आणी फोटो तर खल्लास smiley

***************************************************************
People Who Love To Eat Are Always The Best People - Julia Child
***************************************************************
http://delectable-delicious.blogspot.com/

झकास................................................................................! smiley

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे. http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example//16.gif

मस्त.

-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।

पण एक दूरूस्ती करायची आहे.

"आगळ गोड असल्याने साखर नाममात्र घालावी. ".

आगळ गोड नसते. त्यात साखर नसतेच. साखर कोकम (सरबतासाठीचे) मधे असते. आगळात फक्त मिठ आणि कोकमचा अर्क असतो.

लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.

आपले म्हणणे बरोबर आहे पण आजकाल सरबतासाठी जे कॉन्सट्रेट मिळते त्यावर आगळ छपल्याकारणाने माझा दोनदा गोंधळ उडाला होता. पाकृ टंकतानाही मी इथेच अडले पण बाजारात ज्या नावे मिळते तसे लिहिल्यास वाचकांना सोपे जाईल म्हणून लिहिले व अर्काचा उल्लेखही करून ठेवला.

छापणा-याने चुकीचे छापले असणार.

असो.

इथे सविस्तर माहिती मिळेल.

लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.

चिंतामणींशी १००% सहमत.

कोणी 'कोकम सरबताचा' अर्क (अमृत कोकम) 'आगळ' म्हणून विकत असेल तर ती गिर्‍हाईकाची दिशाभूल आहे. 'ग्राहक मंचा'वर तक्रार देता येईल.

मस्तच पाकृ... थोडासा वर्‍हाडी भाता सारखाच आहे... करुन बघायला पाहिजे.

आपण जगण्यासाठी खात नसुन खाण्यासाठी जगतो.
http://fooddreamers.blogspot.com

भाताची वेगळी पाकृ एकदम आवडेश.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

फोटो फारच सुरेख! आणि सोप्पी पाकृ. नक्की करून बघेन. मला आधी वाटलं की कच्चा कांदा घालून एक उन्हाळ्यासाठी थंड भाताची पाकृ आहे तशी की काय! पण हा भात एकदम वेगळाच निघाला.

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आधीं होती दासी । पट्टराणी केलें तिसी ॥
तिचें हिंडणें राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥

डोळ्यांच समाधान झाले.. आता पोटाचे समाधान कोण करणार?

मायला मला पण मनोबासारखे प्रश्न पडायला लागलेत की काय.. smiley

- पिंगू

ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ | क्योंकि वक्त नहीं लगता, वक्त बदलने में |

झकास

पुरी जाईचिया फुल फाकणे| त्याचि नाम जैसे सुकणे|
तैसे कर्मनिषे न करणे| केले जिद्दी|

पाकृ भारी. फोटो भारी. टेस्ट पण भारीच असणार पण..
रेवतीतै मी कांदा खातच नाही हो. smiley
कोबी किसून ट्राय करू का?

..........................................................................
♥ मेरी प्यारी पत्नी smiley........सासको खिलाये चटनी smiley

कोबी, फ्लॉवर, मटार असे ट्राय करून बघा. एकत्र किंवा वेगवेगळे.

आमसुलाच ताक माहिती आहे. अगदी न सांगता खाल्ल तर सोलकढीच.

बाकि भात अन सजावट अतिशय सुरेख. आज करुन पाहिला जाइल.

शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥

मस्त पाककृती !!! सोलकढी तशी माझी आवडतीच आहे म्हणुन आमसुलाचे ताकही करुन बघेल तेही आवडेल अशी खात्री आहे smiley

सोलकढी!!!! आजच करण्यात येईल.

किती थापा माराव्यात माणसानं!

भात आणि कढी पाककृतीतच असल्याने एक चपखल म्हण आठवली smiley

नेमकी, मार्मीक. एकारान्तांना शोभणारी. smiley

सुंदरच..............नक्की करुन पाहिन......आजच.........smiley

फोटुच इतका सुंदर आलाय तर भात देखील झकास असणारच ! smiley

याबरोबर आमसुलाचे गोडसर ताक द्यावे.
हा प्रकार कधी प्यायला नाहीये,ट्राय मारायला हवा ! smiley

सही..... आमच्या इथे सिंची आमसुले मिलत नाहीत smiley

बघ आई आकाशांत सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला
केशराचे घातले हे सडे भूवरीं, त्यावरून डौलानें ये त्याची ही स्वारी

सर्व प्रतिसादकांचे आभार.
गवि, तंबीटाच्या लाडवांचे लक्षात आहे.
किस्ना, भाताचा फोटू पोह्यांसारखा वाटतोय ती माझ्या फटुग्राफीची कमाल समजावी. smiley
फोटो टाकताना वापरण्याची भांडीकुंडी याबाबत लेख लिहिण्यास सानिकाताईंना प्रोत्साहन द्या.
ज्यांनी चव न घेताही पाकृचे कौतुक केले त्यांना घरी आमंत्रण आहे. भात करून वाढला जाईल.
शुचितै, आमसुले इंड्यातून आणावीत नाहीतर पराकडे चौकशी करावी. तो अश्या वस्तू शोधत फिरतो. smiley
पेठकरकाकांनी व चिंतुकाकांनी आगळ व अर्क यावर चर्चा केल्याने आता लक्षात ठेवते.

अSSSSSSब्ब्ब्ब!
पोट्च भर्‍या एकदम!

________________________________
सत्यं ब्रूयात हितं ब्रूयात!

लई झ्याक दिसुन र्हायली ती कढी बगा!!!

आगळ म्हणजे कोकमच्या सालात मीठ मिसळून काढलेला अर्क आणि गोडसर असते ते कोकम सिरप ज्यापासुन सरबत केले जाते. आगळ सोलकढी साठी वापरतात. आगळ नसेल तर आमसूले पाण्यात भिजत घालून तो अर्क वापरावा.

anannnya

मस्तच !!
ए याला "रावणभात" म्हणतात का गं ? माझ्या सासूबाई सुद्धा असा भात करायच्या.

नाही. रावणभात हा खूपच तिखट असावा असे वाटते. हा किंचित मसालेदार असतो.
धन्यवाद.