आठवण आणि सलाम

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
24 Nov 2011 - 2:10 am

तीन वर्षांपूर्वीचा हाच बुधवार. चार दिवस सलग थँक्सगिव्हींगची सुट्टी म्हणत घरी येण्यासाठी लवकर निघालो होतो. गाडीत रेडीओ लावला तेंव्हा ओझरती बातमी आली होती की मुंबईत कोण्या एका बंदूकधार्‍याने गोळीबार केला म्हणून. सुरवातीस काहीतरी स्थानिक असेल असे वाटले. पण घरी जाईस्तोवर लक्षात आले की हा काहीसा अतिरेकी हल्ला आहे.... आणि नंतरच्या तासाभरातच त्याचे गांभिर्य हे जास्तच समजले कारण तो पर्यंत करकरे, साळसकर, कामटे यांच्या हत्येची बातमी देखील समजली होती. पुढचे अनेक दिवस हे सर्वच भारतीयांना आणि जागतीक माध्यमांमुळे कुठल्याही संवेदनाशील मनाला अस्वस्थ करणारे ठरले होते. अजूनही अस्वस्थता कुठेतरी मनात दडून राहीली आहे असे वाटते...

आज ही खपली निघायचे कारण केवळ नोवंबरमधील बुधवार हे नसून, काल पिबीएसवर "फ्रंटलाईन" वार्तापटात पाहीलेले संशोधनात्मक, "ए परफेक्ट टेररीस्ट" हे वृत्तचित्र. दाऊद गिलानी उर्फ डेव्हीड हेडली कसा (बि)घडला आणि त्याने हा हल्ला आयएसआय, लष्करे तोयबा यांच्या मदतीने आणि त्यांना मदत करत कसा यशस्वी केला या संदर्भातील भेदक संशोधन आपल्याला एका तासात पहायला मिळेल आणि ते अवश्य पहावेत...

२६/११ ला काय झाले हा आता एक काळा इतिहास आहे. त्यात जितकी भारतीय राजकारण्यांची जाड त्वचा दिसली तितकेच भारतीय पोलीस, विशेष सैन्यपथक, सामन्य आणि असामान्य नागरीक यांचे धैर्य आणि प्रेम दिसले... करकरे, कामटे, साळसकर, इतर अनेक पोलीस आणि विशेष करून हुतात्मा तुकाराम ओंबळे यांनी मुंबईची आणि देशाची लाज राखली. रतन टाटांनी नंतर केलेल्या मदतीबद्दल, ताज जनरल मॅनेजर करमबीर कांग यांच्या असामान्य आणि अथक कर्तव्यतत्परते बद्दल तसेच त्यांच्या व्यवस्थापनाच्या अथक परीश्रमाबद्दल तोड नाहीच पण छत्रपती शिवाजी टर्मिनस वरील सुचना देणार्‍या कर्मचार्‍याने देखील प्रसंगावधान दाखवून लोकांना दहशतवाद्यांपासून दूर ठेवण्यात जे शक्य होते तितके यश मिळवले, तो आता काय करत असेल याचे राहून राहून कुतुहल वाटत रहाते.

२० नोव्हेंबर २०११ ला हुतात्मा ओंबळे यांच्या खालील अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण गिरगाव चौपाटीवर झाले.

आज भारत हे लोकांनी चालवलेले राष्ट्र आहे का हे माहीत नाही, पण लोकांनी वाचवलेले लोकांचे राष्ट्र नक्कीच आहे असे वाटते...

...

समाजजीवनमानराजकारणमाध्यमवेध

प्रतिक्रिया

आज भारत हे लोकांनी चालवलेले राष्ट्र आहे का हे माहीत नाही, पण काही निवडक लोकांनी वाचवलेले लोकांचे राष्ट्र नक्कीच आहे असे वाटते.

असेच म्हणीन.
दुव्यांबद्दल धन्यवाद विकासराव.

मदनबाण's picture

24 Nov 2011 - 10:57 am | मदनबाण

हेच म्हणतो...
अजुन तो कसाब जिवंत आहे... तो हसतोय का आपल्या न्याय व्यवस्थेला ? की हसतोय आपल्यावर ? आपल्या देशावर ? :(

मदनबाण's picture

26 Nov 2011 - 10:16 pm | मदनबाण

कोणाची आठवण ? कोणाला सलाम ?

आजच्या काही ठळक घडामोडी !

१)26 /11 मधील पीडितांना अटक
http://ibnlokmat.tv/showstory.php?id=206012
लोकशाहीची तत्वे ? मुल्ये ?

२)
मुंबईच्या सागरी सुरक्षकांना कारवाईचे अधिकारच नाही !
http://ibnlokmat.tv/showstory.php?id=206032
देशवासींची सुरक्षा ?

३)
कम से कम इलाज का खर्चा तो दिजीए' !
http://ibnlokmat.tv/showstory.php?id=206042

४)
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्याचे अनावरण
http://ibnlokmat.tv/showstory.php?id=206062

५)
जेव्हा मुख्यमंत्री टेनिस खेळतात
http://ibnlokmat.tv/showvideo.php?id=205892

६)
शरद पवारांवरील हल्ला हा राजकारण्यांविरुद्धच्या असंतोषाचा स्फोट आह का?
http://ibnlokmat.tv/showvideo.php?id=205942

जाता जाता :---

Nervous China may attack India by 2012: Expert
हा जुन २००९ सालचा लेख वाचातोय...
आता डिफेन्स एक्पर्ट म्हणजे त्या विषयातील तज्ञ मंडळी असणार नाही ?म्हणुन त्यांनी त्या वर्षी काय वर्तवले होते ?
आणि हे देखील वाचतोय...
India, China Border Talks Put Off Over Dalai Lama Row
http://news.outlookindia.com/items.aspx?artid=742665
का वाचतोय? कारण आपण इतिहास विसरतोय ?
कांग्रेस का इतिहास, चीन युद्ध का जिक्र नहीं
http://goo.gl/7eqZg

अर्धवटराव's picture

24 Nov 2011 - 4:04 am | अर्धवटराव

मी विसरलोच होतो ही घटना :(

(शर्मींदा) अर्धवटराव

पैसा's picture

24 Nov 2011 - 8:10 am | पैसा

आम्हा सगळ्यांनाच कायमची जखम देऊन इतिहासजमा झालेला हा काळ कुणीही विसरू नका. अशा घटना परत परत घडत रहाणार आहेत. कधीतरी नशीबाने आधी उघडकीला येतात, कधीतरी निरपराध लोकांचे बळी जातात. पण सामान्य लोकांची संवेदनशीलता जागी राहिली तर यांच्या सर्वोच्च त्यागाला काही अर्थ राहील.

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Nov 2011 - 10:49 am | बिपिन कार्यकर्ते

आठवण आणि सलाम!

पण जे आहे ते उत्तम चाल्लय,प्रगती वगैरे होतेय, आपण सुरक्षित आहोत असे म्हणायची जी अघोषित सक्ती आहे, जो दणदणाट सुरु आहे, तो कधी थांबणार?
घडलेला निष्काळजीपणा पुन्हा होनार नाही, व पुन्हा कुणाला अशी एकाएकी जिवाची बाजी लावायची मुळी वेलच येणार नाही असे होइल का?
ओंबाळेंना सलाम करतो, तसाच त्यांच्या कुटुंबियांनाही. त्यांना ओंबाळेंच्या शौर्यार्थ व सहय्यर्थ म्हणून एक रक्कम दिली गेली होती; ती त्यांनी स्वतःकडे न ठेवता इतर गरजूंना देउन टाकली. ओंबाळेंचे शौर्य मोठे, तसेच संस्कारही मोठेच.

"तो आता काय करत असेल याचे राहून राहून कुतुहल वाटत रहाते"
हा प्रश्न नेहमीच मला देखील पडतो. त्यातल्या त्यात आकाशवाणीसारख्या ठिकाणी अशा लोकांच्या प्रकट मुलाखती कधीतरी ऐकायला मिळतात .. अन्यथा कोण लक्षात ठेवून त्यांच्यावर लेख किंवा तत्सम काही लिहील ??

प्रीत-मोहर's picture

24 Nov 2011 - 3:39 pm | प्रीत-मोहर

आठवण आणि सलाम!

दादा कोंडके's picture

24 Nov 2011 - 3:59 pm | दादा कोंडके

"बडे बडे शेहरोमें..." म्हणणारा काय किंवा रामगोपाल वर्माला बरोबर नेणारा काय. च्यायला चीड येते अशा लोकांची. पण बंदुकधारी अतिरेक्यांशी दंडुके घेउन छातीचा कोट करून लढणार्‍या पोलिसांना सलाम! :(

वाहीदा's picture

26 Nov 2011 - 10:56 pm | वाहीदा

मनापासून सलाम !
यानिमीत्ताने मेजर संदीप उन्नीकृष्णनची आईही आठवली, त्या मातेलाही सलाम !! त्यांचे फोटो येथे ही पहायला मिळतील.. http://itzarun.blogspot.com/2008_11_01_archive.html