खरडवही व खरडफळ्यावरील मजकूर

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
5 Oct 2011 - 4:38 pm

मिसळपाववर लेखन करण्यासाठी काही संकेत आहेत. त्यानुसार सामाजीक संकेतांचे पालन करून येथे जाहीर लेखन केलं जातं. यासोबतच मिसळपाववर खरडवही आणि खरडफळा अश्या सोई दिलेल्या आहेत. यापैकी खरडवही जरी सदस्याची व्यक्तीगत असली तरी त्यावरचा मजकुर अन्य सदस्यांना दिसतो.त्यामुळे खरडवही आणि खरडफळा या दोन्ही जागी काही लिहायचे असल्यास त्यावर सुध्दा मिपाचे नियम लागू होतात.

गेल्या एकदोन दिवसांत मिपावर जो काही प्रकार चालू आहे तो चुकच आहे. मात्र त्या लिखानात तांत्रीक दृष्ट्या तरी चुक काढता येत नाही. मात्र त्याला विरोध म्हणून खरडवहीत जे खालच्या पातळीवर लिहील्या गेलं आहे ते तर १००% चुकच आहे. अश्या किंवा अन्य कुठल्याही घाण लिखाणाला मिसळपाववर स्थान नाही. ज्यांनी असे प्रकार केले आहेत त्यांना ही जाहीर सूचना आहे की त्यांनी आपलं वागणं सुधारावं. अश्याच प्रकारे चुक पुन्हा झाली तर सूचना न देता कारवाई करण्यात येईल हे लक्षात घ्यावे.

तसेच तांत्रीक दृष्ट्या जरी बरोबर असला तरी या संदर्भातील लेखाचा रोख सुध्दा कळून येतो. सबब त्या लेखासाठी सुध्दा अशीच सूचना देण्यात येते की उगाच कुणाला चिडवण्यासाठी म्हणून धागे काढायचे टाळा.

- नीलकांत

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

5 Oct 2011 - 5:04 pm | राजेश घासकडवी

मिसळपाववरील सदस्यांनी गलिच्छ, हीन व मानहानिकारक भाषा वापरू नये याबाबतीत मालकांकडून सूचना आली हे उत्तमच. यापुढे हे प्रकार थांबतील असं वाटतं.

मात्र एक प्रश्न आहे. मित्रामित्रांच्यात अनेक वेळा अशी भाषा गंमत म्हणून वापरली जाते. त्यात मानहानीचा बिलकुल हेतू नसतो. अनेक माननीय सदस्यांच्या खरडवह्या अशा भाषेने भरलेल्या सापडतील. त्या सर्व स्वच्छ करणार का?

मला म्हणायचं आहे की दुसऱ्याची मानहानी करणारी गलिच्छ भाषा आणि मित्रांमित्रात गमतीने वापरलेली भाषा यात फरक कसा करणार?

उगाच कुणाला चिडवण्यासाठी म्हणून धागे काढायचे टाळा.

दुसरा प्रश्न असा की काही धागेदेखील मित्रामित्रांच्यात एकमेकांची चेष्टा करण्यासाठी काढले जातात. मी अदितीच्या अमेरिकाप्रवासाबद्दल लिहिलेला होता, छोटा डॉन यांना रजनीकांत कल्पणारा लिहिला होता. तसंच अदितीनेही माझी आणि प्रियालीची गुरू कल्पून चेष्टा करणारा धागा परवाच लिहिला. अशी मित्रांमित्रांतली गंमत करू नये का?

पुन्हा दुसऱ्यांना चिडवणारा, त्रास देणारा धागा आणि मित्रांची गंमत करणारा धागा यात फरक कसा करायचा? तसा फरक होत नसेल तर सगळ्याच गमती थांबवायच्या का?

प्रियाली's picture

5 Oct 2011 - 5:09 pm | प्रियाली

. मित्रामित्रांच्यात अनेक वेळा अशी भाषा गंमत म्हणून वापरली जाते. त्यात मानहानीचा बिलकुल हेतू नसतो. अनेक माननीय सदस्यांच्या खरडवह्या अशा भाषेने भरलेल्या सापडतील. त्या सर्व स्वच्छ करणार का?

मला वाटते मित्रामित्रांतील भाषा आणि त्रयस्थाबद्दल लिहिलेला मानहानीकारक अश्लील आणि खालच्या पातळीवरील संवाद यांत फरक आहे. याला अटकाव घातला हे योग्य झाले.

कोणी कितीही कंठशोष केला तरी खरडवह्या या जाहीर असतात. त्यात लिहिलेल्या गोष्टी प्रकाशित (पब्लिश्ड) असतात आणि त्याविरुद्ध तक्रार नोंदवता येते.

मिसळपावावर खरडवहीची धोरणे अधिक स्पष्टपणे जाहीर करावीत. तूर्तास जी वर सूचना दिली आहे त्याबद्द्ल धन्यवाद.

येथे हे ही नमूद करावेसे वाटते की

मागे अशाप्रकारे एका बाईला सौम्य शिवी दिल्याबद्दल एका सदस्यांचे खाते गोठवण्यात आले होते. इथे अश्लाघ्य प्रकार घडल्यावरही संबंधितांवर कार्यवाही झालेली नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2011 - 8:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

राजेश आणि प्रियाली यांची मस्करी करण्याबद्दल त्या दोघांपाशी मी क्षमायाचना करते. मी यापुढे ज्या काही मित्रमंडळात जी काही मस्करी करायची आहे आणि ज्या काही खोड्या काढायच्या आहेत त्या इतर फोरम्सवरच काढेन. माझ्या खोड्यांमुळे प्रियाली अथवा राजेश यांनी मिपाला कायद्याच्या कचाट्यात पकडू नये अशी नम्र विनंती. प्रियाली आणि राजेश यांनी मोठ्या मनाने मला माफ करावे.

पक्षी: माझे शिक्षण, माझ्या कामाचे स्वरूप, मंगळावरचे पाणी आणि इतर काही संशोधन यांच्याबद्दल दमडीचीही माहिती नसताना कोणी त्याबद्दल टिप्पणी करणार नाही अशी अपेक्षा ठेवणे रास्त असावे.

मिपा कॉलेजकट्टा आहे, इथे मस्करी चालते, मी तुझी खोडी काढते<->तू माझी मस्करी कर असे प्रकार कॉलेजकट्ट्यावर हमखास चालतात असा माझा समज गेल्या साडेतीन वर्षांत झालेला होता तो खोटा आहे काय?

मी स्वतःचीच मस्करी करणारा धागा काढला (उदा: वूडी अ‍ॅलनचे चित्रपट असे असतात), स्वतःलाच नावं ठेवली तर ते मिपाच्या धोरणात बसेल काय? (माझंच उदाहरण घेतलं कारण मला याची सवय आहे.)

कविता, लेख, लेखनशैली यांची विडंबनं काय सदरात मोजली जाणार? लेखनाची खिल्ली उडवणं का लेखकावर हल्ला? विचारांचा प्रतिवाद करणे मिपावर चालण्यातले आहे काय?

मागे अशाप्रकारे एका बाईला सौम्य शिवी दिल्याबद्दल एका सदस्यांचे खाते गोठवण्यात आले होते. इथे अश्लाघ्य प्रकार घडल्यावरही संबंधितांवर कार्यवाही झालेली नाही.

आणखी दोन प्रकार सांगते. १. याच स्त्री आयडीच्या शयनगृहाचा उल्लेख जाहीर धाग्यावर केल्यानंतर एका संपादकांचा राजीनामा आला होता. २. दुसर्‍या स्त्री आयडीला काहीबाही व्यनी केले म्हणून एका सदस्याचा आयडी नामशेष झाला.
यापुढे
मला प्रश्न असा आहे की एक पुरूष आयडी आणि दोन स्त्री आयडींबद्दल एका स्त्री आयडीने बीभत्स खरड लिहीली त्याबद्दल काही कारवाई होणार का? नसेल तर स्त्रियांनी काहीही केले तर खपून जाते अशी मिपाची प्रतिमा व्हावी का? का पुरूषांविरोधात काहीही लिहीले तर खपून जाते? सदर बीभत्स खरड लिहीणार्‍या स्त्री आयडीच्या मित्रांनीही या बीभत्सपणाला खरडवह्यांतून साथ दिलेली आहे तर या सर्व लोकांवर कारवाई होणार काय? का चार लोकांनी मिळून काही केलं तर खपून जातं?
असले बीभत्स लेखन करणार्‍या लोकांना काही ताकीद मिळाल्याचे मला समजलेले नाही. शिवाय त्यांच्यापैकी काही लोकांची इथेही अरेरावी दिसून येत आहे. तेव्हा अनिर्बंध लिखाण करणार्‍या लोकांनी खोड्या काढलेल्या चालतात पण स्वतःवर निर्बंध घालून लिहीणार्‍यांनी स्वतःवर झालेली टीका सतत ऐकूनच घ्यावी असा मिपाचा नवा नियम आहे का?

सबब त्या लेखासाठी सुध्दा अशीच सूचना देण्यात येते की उगाच कुणाला चिडवण्यासाठी म्हणून धागे काढायचे टाळा.

इतक स्पष्ट असताना देखील तसंच अदितीनेही माझी आणि प्रियालीची गुरू कल्पून चेष्टा करणारा धागा परवाच लिहिला

ही काडी कशाला ? एखाद्याच्या खरडवहीत असलेल्या, श्रध्दास्थानाची विटाळणी करुन,त्याचा धागा करण्याला माझा स्पष्ट विरोध आहे, राहील. आणि पुन्हा तसे दिसल्यास भाषा मानहानीपुर्ण आढळली तर मी जबाबदार नाही.

स्पष्ट
सुहास

राजेश घासकडवी's picture

5 Oct 2011 - 5:37 pm | राजेश घासकडवी

मी नीलकांत यांच्या घोषणेविषयी मनात आला तसा रास्त प्रश्न विचारला.

पुन्हा तसे दिसल्यास भाषा मानहानीपुर्ण आढळली तर मी जबाबदार नाही.

घोषणेत जे म्हटलंय त्याच्या सरळसरळ विरोधी कृती करण्याची ही धमकी समजावी का?

सुहास..'s picture

5 Oct 2011 - 6:31 pm | सुहास..

मी नीलकांत यांच्या घोषणेविषयी मनात आला तसा रास्त प्रश्न विचारला.

घोषणेत जे म्हटलंय त्याच्या सरळसरळ विरोधी कृती करण्याची ही धमकी समजावी का? >>>

उत्तर तुम्हीच दिले आहे. :)

धनंजय's picture

5 Oct 2011 - 9:18 pm | धनंजय

मला म्हणायचं आहे की दुसऱ्याची मानहानी करणारी गलिच्छ भाषा आणि मित्रांमित्रात गमतीने वापरलेली भाषा यात फरक कसा करणार?

माझ्या मते हा प्रश्न फक्त काही थोड्या करड्या क्षेत्रासाठीच उद्भवू शकेल. बहुतेक परिस्थितीत ओळखता येते.
संदिग्धता वाटल्यास संबंधितांना विचारता येईल.
अधिकृत विचारणेचे उत्तरही अधिकृत मानता येईल. मित्रामित्रांपैकी एका-एकीनेही वाक्यांस आक्षेप घेतला तर तो संवाद आक्षेपार्हच ठरतो.

- - -
माझ्याबाबत घडलेला एक अनुभव सांगतो - मित्रामित्रांतच पण लोकांना ऐकू येईल अशा ठिकाणचा संवाद आहे.
एकदा एका भाजीपाल्याच्या दुकानात मी मित्रामित्रांत बिगर-इंग्रजी भाषेत गप्पा मारत होतो. (मी राहातो त्या गावात बहुतेक इंग्रजी बोलून व्यवहार होतो.) वेगवेगळ्या भाज्यांच्या तथाकथित लिंगनिर्देशक आणि लिंग-चेतक गुणांबाबत मी गमतीने सांगत होतो - शब्द ग्राम्य होते, "अभ्यासू" नव्हते. मग माझ्या लक्षात आले, की बाजूला एक पोक्त कुटुंब माझ्याकडे थोड्या रागाने बघत होते. चेहर्‍यामोहर्‍यावरून असे स्पष्टच होते, की ती भाषा त्यांना कळत होती.
मी स्वतः ओशाळलो, आणि हे ओशाळणे योग्यच होते, असे मला अजून वाटते. तोच विषय इंग्रजीमध्ये अशा खुल्या ठिकाणी बोलण्याबाबत माझ्या मनातही विचार आला नसता. (म्हणजे बिगर-इंग्रजी बोलून मी एक खाजगी संवादकक्ष निर्माण झाल्याच्या भ्रमात होतो. म्हणूनच तो विषय त्या ग्राम्य शब्दांत मी बोलत होतो.) यावरून असे दिसते, की खाजगीमध्ये (फक्त मित्रांना समजणार्‍या भाषेत, किंवा, फक्त मित्रांना ऐकू येईल अशा ठिकाणी) जे ग्राम्य शब्द ठीक आहेत, तेच शब्द मित्रांशीच बोलताना बाजारात ठीक नाहीत, हे जाणण्याबाबत कुठलेसे निकष आपणा सर्वांना अध्याहृत असावेत.

- - -

मित्रांशीच खाजगी/सार्वजनिक बोलणे यातील नीरक्षीरविवेक अध्याहृत आहे, पण तो जुलमी आहे, असे कोणी म्हणू शकते. पण मग तसे म्हटले पाहिजे. किंवा अध्याहृत नियम आहेत ते स्पष्टपणे काय आहेत? याबाबत कोणाला संशोधन करायचे असेल, तर तेही ठीकच आहे. पण ते संशोधन करायची जबाबदारी (किंवा तज्ज्ञता) मिसळपाव चालकाकडे आहे, हे समजून प्रश्न विचारणे ठीक नव्हे.

या प्रश्नाचे सुस्पष्ट उत्तर मिळेपर्यंत भाजीबाजारात त्या लैंगिक विषयाबाबत चर्चा मी चालू ठेवायलाच हवी होती काय? किंवा सुस्पष्ट उत्तर नाही म्हणून उद्या इंग्रजीमध्ये त्या विषयाबाबत बाजारात चर्चा करू काय?

ऋषिकेश's picture

5 Oct 2011 - 5:06 pm | ऋषिकेश

मिसळपाववरील सदस्यांनी गलिच्छ, हीन व मानहानिकारक भाषा वापरू नये याबाबतीत मालकांकडून सूचना आली हे उत्तमच.

+१ असेच म्हणतो..

नितिन थत्ते's picture

5 Oct 2011 - 5:13 pm | नितिन थत्ते

घोषणेच्या दुसर्‍या धाग्यावर संमं आणि सल्लागार यांच्या नावांच्या लिंका गंडल्या आहेत.

क्रेमर's picture

5 Oct 2011 - 5:17 pm | क्रेमर

लिंका गंडलेल्या आहेत. घोषणेचा धागा वाचनमात्र असल्याने संपादक व सल्लागार मंडळांचे अभिनंदन करता येत नाही आहे.

Nile's picture

5 Oct 2011 - 7:54 pm | Nile

नविन संपादक व सल्लागार मंडळाच्या अभिनंदना बरोबरच पुन्हा जुन्या, माणसात आलेल्या माजी संपादकांचेही अभिनंदन करता येत नाहीए. तरी ते त्यांनी इथे स्विकारावे*. ;-)

(*इतका विनोद चालेल काय?)

बाकी, या घोषणा इ. नेहमीचेच झाल्याने मागे दिलेले प्रतिसाद पुन्हा देत नाही.

क्रेमर's picture

5 Oct 2011 - 7:57 pm | क्रेमर

नाइलदादा तुमच्या सुविधेसाठी नवीन धागा काढलेला आहे. लाभ घ्यावा.

राजेश जे आपल्याला मान्य असेल ते सर्व मान्य असेलच असे नाही.
उदा: कोल्हापुरात एखादा बाप अथवा आई कौतुकाने त्याच्या लहान मुलाला ए रांडेच्या वगैरे सहज म्हणतात. हेच असे म्हंटलेले ठाण्यात चालेलच असे नाही.
मिपावर सर्व प्रकारचे लोक येतात हे एक घरच आहे असे समजा ना. कट्ट्यावर मित्रामित्रात जे विनोद होतात अथवा जी भाषा आपण वापरतो ती कट्ट्यावर सर्वमान्य असली म्हणून तशी भाषा आपण घरात वापरत नाही.
गंमत /चिडवाचिडवी करावी पण तीला काही मर्यादा निश्चीतच असाव्यात.
काही सदस्य धाग्यावर अत्यंत उर्मटपणे प्रतिसाद देतात. कदाचित तो उर्मटपणा त्याना स्वत:ला सर्वमान्य वाटत असेल. पण त्यामुळे त्यांचीच बुद्धीमत्ता दिसून येते.
आपण घरात जसे एकमेकांचा मान राखून वागतो तसे वागावे ही इथे माझ्यासारख्या सर्वसामान्य सदस्यांची अपेक्षा असते.
नीलकांतचे म्हणणे सर्वस्वी योग्य आहे. माफक थट्टा आनि जिव्हारी लागणारे बोल यात फरक असतो.
एखाद्याच्या श्रद्धास्थानांची खिल्ली उडवावी पण त्यातही काही पातळी जरूर बाळगावी.
ज्याचा शेवट व्यथिततेच होतो त्याची सुरुवात कोणी केली हे गौण ठरते

प्रियाली's picture

5 Oct 2011 - 5:27 pm | प्रियाली

काही सदस्य उर्मट असतात तर काही सदस्य लोचट असतात. बुद्धीमत्ता सर्वांचीच दिसून येते. जसा एखाद्याला उर्मटपणा आवडत नाही तसा एखाद्याला लोचटपणा शिसारी आणतो. तरीही जोपर्यंत संकेतस्थळांच्या धोरणांत राहून लोक लिहितात तेव्हा त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही.

बाकी, ते प्रताधिकार असणारे चित्र सहीतून काढून टाकायचे मनावर घ्या.

विजुभाऊ's picture

5 Oct 2011 - 5:42 pm | विजुभाऊ

मू उ दे ना म्ह प्र का टा आ

चिंतातुर जंतू's picture

5 Oct 2011 - 5:24 pm | चिंतातुर जंतू

मात्र एक प्रश्न आहे. मित्रामित्रांच्यात अनेक वेळा अशी भाषा गंमत म्हणून वापरली जाते. त्यात मानहानीचा बिलकुल हेतू नसतो. अनेक माननीय सदस्यांच्या खरडवह्या अशा भाषेने भरलेल्या सापडतील. त्या सर्व स्वच्छ करणार का?

मला म्हणायचं आहे की दुसऱ्याची मानहानी करणारी गलिच्छ भाषा आणि मित्रांमित्रात गमतीने वापरलेली भाषा यात फरक कसा करणार?

हाच प्रश्न माझ्याही मनात आला होता. राजेश आणि मी एकमेकांना खरडवहीत परस्परांबद्दल काहीबाही बोललो, आणि आम्हा दोघांना त्याविषयी आक्षेप नसला तरीही त्यावर कारवाई होणार का?
(यात राजेश आणि मी हे केवळ उदाहरणादाखल आहे).

विजुभाऊ's picture

5 Oct 2011 - 5:30 pm | विजुभाऊ

चिंजं
खरडवहीत तुम्ही काय लिहीता या पेक्षा तुम्ही एखाद्या धाग्यावार काय प्रतिसाद देता याच्याशी जास्त संबंधीत आहे.
एखाद्या धाग्यावर प्रतिक्रीया देताना जे आपल्याला सर्वमान्य वाटते ( पण ते तसे नसते) अशा भाषेत लिहु नये.
सभ्य लोक टॉयलेट मध्ये जे करतात ते जरी सर्वमान्य असले तरी जाहीर रीत्या ते कोणी केले तर ते बीभत्स ठरते

विसोबा खेचर's picture

5 Oct 2011 - 5:44 pm | विसोबा खेचर

नीलकांता, मज पामराचा तुला एकच सल्ला -

जे सभासद तुला, संपादकांना आणि पर्यायाने मिपाला त्रास होईल असे वागत आहेत त्यांना सरळ चपला दाखवाव्यास हे उत्तम..

असो..

आपला नम्र,
(संस्थापक)तात्या.

जे सभासद तुला, संपादकांना आणि पर्यायाने मिपाला त्रास होईल असे वागत आहेत त्यांना सरळ चपला दाखवाव्यास हे उत्तम..
तातुडीचे हेच तत्वज्ञान मला इथे आठवले होते. चपला आणि सत्कार

असो...
कोणाचा आयडी डिलीट केला जावा या मताचा मी नाही.काही काळ त्याला अंडासेल मधे जरुर टाकावे.
तिरकस प्रतिसाद देणार्‍यानां / माज करणार्‍यांना योग्य वेळी तंबी दिलीत तर असे प्रकार घडणार नाहीत किंवा कमी होतील असे वाटते.दुसर्‍यांची खिल्ली उडवताना /मस्करी करताना मजा येत असेल तर स्वतःची पण ते सहन करायची तयारी ठेवावी.

प्रियाली's picture

5 Oct 2011 - 6:05 pm | प्रियाली

दुसर्‍यांची खिल्ली उडवताना /मस्करी करताना मजा येत असेल तर स्वतःची पण ते सहन करायची तयारी ठेवावी.

तुमच्या आणि इतरांच्या खरडवहीत जो अश्लाघ्य प्रकार चालला होता हे सहन करायचे का? तसे असल्यास वरील नीलकांतच्या मजकूराला तुमची असहमती आहे असे समजायचे का?

तुम्हाला जर प्रकार मान्य नव्हते तर त्याविरुद्ध तक्रार करणे किंवा तशाच स्वरूपाचे खोडकर, पोलिटिकली करेक्ट शालजोडीत माराणारे धागे लिहिणे हा पर्याय होता. तसे न करता तुम्ही जो प्रकार केलात त्यावर या धाग्यात नीलकांतने आक्षेप दर्शवला असता परत येऊन तुम्ही सहन करण्याबद्दल का सांगत आहात?

नवनिर्मित संपादकमंडळाने कृपया यात लक्ष घालावे. खुद्द या धाग्यावर धमक्या देण्याचे प्रकार सुरू आहेत.

दुसर्‍यांची खिल्ली उडवताना /मस्करी करताना मजा येत असेल तर स्वतःची पण ते सहन करायची तयारी ठेवावी.

हे अगदी सर्व साधारण विधान असुन ते कळण्या इतपत आपण सुज्ञ असाल असे वाटले होते. हे प्रत्येक सदस्याला लागु आहे माझ्या सकट.

तुमच्या आणि इतरांच्या खरडवहीत जो अश्लाघ्य प्रकार चालला होता हे सहन करायचे का? तसे असल्यास वरील नीलकांतच्या मजकूराला तुमची असहमती आहे असे समजायचे का?
बाई माझ्या खरवडी बद्धल बोलण्या पेक्षा इतरांच्या खरडवह्या पहा ! त्यांच्या खरडवह्या बरबटलेल्या सापडतील त्याची तुलना माझ्या खरड वहीशी शक्य नाही. ३ वर्षातला माझ्या खरडवही मधला मजकुर सगळ्यांना वाचायला उघडाच आहे. लावा जो शोध लावायचा आहे तो...

नवनिर्मित संपादकमंडळाने कृपया यात लक्ष घालावे. खुद्द या धाग्यावर धमक्या देण्याचे प्रकार सुरू आहेत.
हॅहॅहॅ... धमकी ! बॉ बॉ बॉ... चांगला विनोद होता. ;)

प्रियाली's picture

5 Oct 2011 - 7:37 pm | प्रियाली

बाई माझ्या खरवडी बद्धल बोलण्या पेक्षा इतरांच्या खरडवह्या पहा ! त्यांच्या खरडवह्या बरबटलेल्या सापडतील त्याची तुलना माझ्या खरड वहीशी शक्य नाही. ३ वर्षातला माझ्या खरडवही मधला मजकुर सगळ्यांना वाचायला उघडाच आहे. लावा जो शोध लावायचा आहे तो...

माझा आक्षेप जे काल झाले त्यावर आहे. त्यात तुमची खरडवही सहभागी होती. मी तक्रारही त्याबद्दल केली होती आणि हा धागाही त्याबद्दलच आहे. तेव्हा दुसर्‍यांच्या वह्या बघा वगैरेची गरज नाही.

मदनबाण's picture

5 Oct 2011 - 7:48 pm | मदनबाण

माझा आक्षेप जे काल झाले त्यावर आहे.
एका विधानावर एव्हढा आ़क्षेप ? गम्मतच आहे. ! ते विधान योग्य आहे. ते ज्या प्राण्याबद्धल आहे,त्याला ते तंतोतंत लागु पडतो. आता इतर कोणी स्वतःला तो प्राणी समजत असेल तर तो दोष माझा नाही.
त्यात तुमची खरडवही सहभागी होती.
बरं मग ?

मी तक्रारही त्याबद्दल केली होती आणि हा धागाही त्याबद्दलच आहे.
मला आत्ता पर्यंत कोणीही या बद्धल बोललेले नाही,आणि हा धागा त्या खरडी बद्धल हे नव्याने कळले असो. माझ्या खरडवहीचा उल्लेख या धाग्यात कुठेही नाही. तो तुम्ही आणण्याचा प्रयत्न मात्र जरुर केलात... प्रयत्न चांगला होता. ;)

तेव्हा दुसर्‍यांच्या वह्या बघा वगैरेची गरज नाही.
खी खी खी... दुसर्‍यांनी खरडवह्यां मधे काहीही लिहले तर ते तुम्हाला चालते असा अर्थ झाला. ;)

प्रियाली's picture

5 Oct 2011 - 8:07 pm | प्रियाली

मदनबाण, माझा तुमच्याशी कोणताही वाद किंवा दुष्मनी असल्याचे मला आठवत नाही. माझे वरील सर्व प्रतिसादही अतिशय सभ्य आणि संयत भाषेत लिहिलेले आहेत. तुम्हाला प्रश्न विचारण्याचे कारण 'सहन करावे म्हणजे काय?' हे कळावे इतकेच होते कारण कालच्या प्रकारात तुमची खरडवही सामील होती.

तरीही तुमच्या प्रतिसादातील खोडसाळ भाषेबद्दल मी निषेध नोंदवते आणि येथेच थांबते.

मदनबाण's picture

5 Oct 2011 - 8:16 pm | मदनबाण

मदनबाण, माझा तुमच्याशी कोणताही वाद किंवा दुष्मनी असल्याचे मला आठवत नाही.
माझा तुमच्याशीच काय,कोणाशीच वाद झालेला नाही.इतके वर्ष इथे आहे त्या कालावधीत कोणाशी वाद झाल्याचा प्रकार नाही.

माझे वरील सर्व प्रतिसादही अतिशय सभ्य आणि संयत भाषेत लिहिलेले आहेत. तुम्हाला प्रश्न विचारण्याचे कारण 'सहन करावे म्हणजे काय?'
माझाही प्रतिसाद अतिशय सरळ आणि सुस्पष्ट आहे.

कालच्या प्रकारात तुमची खरडवही सामील होती.
ह्या विधानाला माझा आक्षेप आहे, ते माझे वैयक्तिक मत होते, आहे आणि राहील.ज्या सदस्याला ते लिहले आहे,त्या व्यतिरिक्त इतर कोणाशी त्याचा अर्थ जोडु पाहिल्यास माझा नाईलाज आहे.

तरीही तुमच्या प्रतिसादातील खोडसाळ भाषेबद्दल मी निषेध नोंदवते आणि येथेच थांबते.
संपूर्ण धाग्यात माझ्या आणि माझ्या खरड वहीचा उल्लेख नसताना,माझ्यावर राळ उडवण्याच्या प्रवॄत्तीचा मी निषेध नोंदवतो,आणि इथेच थांबतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2011 - 8:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्ता यादी देऊ का किती लोकांनी या बोर्डावरून "हसायला आलं" असं मला लिहीलं आहे? जाऊ दे, विडंबनं, शैलीचं अनुकरण, मस्करी इत्यादी गोष्टी मिपावर कितपत चालतात हे आधी समजू देत. नवनिर्वाचित संपादकांपैकीही काही लोकांनी या बोर्डामुळे हसायला आल्याचं मला सांगितलं आहे. पण विनोद समजण्यासाठी उलुसं कायतरी ... पण ते एक असो.

या बोर्डात काय व्यक्तीगत कमेंट्स आहेत? कोणाचा अपमान केला आहे? कोणाची थट्टा केली आहे? अगदीच केली असेल तर मी स्वतःचीच थट्टा केली आहे. मी स्वतःला कळीचा नारद* म्हटल्यामुळे तुमचा अपमान झाला असेल तर तो माझा प्रश्न नाही.

असो. हा जो बोर्ड आहे ना, त्याचा आस्पेक्ट रेशो तुम्ही बिघडवला आहेत. त्याबद्दल तुमच्यावर कारवाई का होऊ नये?

*कळीचा नारद हा मराठीतला वाक्प्रचार आहे, उगाच आमच्या पुराणांवर हल्ला वगैरे ओरडा करू नये.

एखाद्याने दुसऱ्याला डुक्कर म्हणणे हे निदान वराहावताराची उपासना करणार्या हिंदूंमध्ये तरी मानहानीकारक वाटू नये. अब्राहमिक धर्मांच्या अनुयायांमध्ये तसे वाटल्यास ठीक आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2011 - 9:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ईश्वरी अवतार आणि मानवी आयडी यांची तुलना केल्यामुळे महान हिंदू धर्माची अवहेलना झाली असं तुम्हाला वाटतं का? नसेल तर मग कलावतीमाता, अनिरूद्ध बापू, स्वामी समर्थ यांच्याशी इतर माणसांची तुलना करावी का?

आण्णा चिंबोरी's picture

5 Oct 2011 - 9:25 pm | आण्णा चिंबोरी

ईश्वरी अवतार आणि मानवी आयडी यांची तुलना केल्यामुळे महान हिंदू धर्माची अवहेलना झाली असं तुम्हाला वाटतं का?

नाही. किंबहुना एखाद्याला डुक्कर म्हणणे हा त्याचा सन्मान आहे असे मला वाटते.

नसेल तर मग कलावतीमाता, अनिरूद्ध बापू, स्वामी समर्थ यांच्याशी इतर माणसांची तुलना करावी का?

याबाबत पुरेशी कल्पना नाही. कलावती म्हणजे नवरी मिळे नवर्याला मधली निवेदिता जोशी का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2011 - 9:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रश्न तुमच्या प्रतिसादाखाली असला तरीही तो तुम्हाला होता असं नव्हे. सदर आध्यात्मिक लोकांची तुलना इतर मर्त्य माणसांशी केलेली ज्या लोकांना चालत नाही त्यांच्यासाठी होता.

"ज्युडी! हे काय नाव झालं काय? आपल्याकडे कशी नावं असतात पोरींची! कलावती, मैनावती, एक ना एक दनका!"
-- "वर्‍हाड निघालंय लंडनला" मधून हे वाक्य घेतलं आहे. आठवणीतून लिहील्यामुळे उद्धृतात किंचित चुका असू शकतात.

या सन्मानिय सदस्येच्या सततच्या तिरकस प्रतिसादाने मला त्रास होत आहे, तेव्हा संपादक मंडळाने सदर व्यक्तीस योग्य ताकीद द्यावी,जेणे करुन मला आणि भविष्यात इतरांना जाच होणार नाही.

आण्णा चिंबोरी's picture

5 Oct 2011 - 9:27 pm | आण्णा चिंबोरी

सदर सन्मानीय सदस्येचा प्रतिसाद तिरकस दिसला नाही. काही ठिकाणी तो ठळक जरूर दिसला आहे, मात्र तिरकस प्रतिसाद पाहण्यात आला नाही. कृपया अधिक माहिती द्यावी.

सुहास..'s picture

5 Oct 2011 - 6:33 pm | सुहास..

दुसर्‍यांची खिल्ली उडवताना /मस्करी करताना मजा येत असेल तर स्वतःची पण ते सहन करायची तयारी ठेवावी. >>>

शिपंल !!

चित्रा's picture

5 Oct 2011 - 6:50 pm | चित्रा

ह्यासारखे प्रकार रोखणे दरवेळी संपादक मंडळास शक्य होत नाही, हे स्वानुभवावरून. असो. नीलकांत आणि नवीन संपादक मंडळास तसेच सल्लागार मंडळास शुभेच्छा.

नीलकांत यांनी लिहीलेले बर्‍यापैकी स्पष्ट आहे असे मला वाटले. मित्रामित्रांतील संवादावर या सूचनेमुळे काही टाच/निर्बंध येणार नाही असे वाटते.

आत्मशून्य's picture

5 Oct 2011 - 6:53 pm | आत्मशून्य

कोठेही अश्लाघ्य भाषा वापरणे चूकच, पण संघटीत नालायकपणा बद्दल जर कोणी त्यांना जाणवेल अशी टीका केली तर त्यात काहीच चूक वाटत नाही. विषेशतः टीकाकार व्यक्ती जर उठसूठ आपली पातळी सोडून टीका करणारी नसेल तर. बाकी चालूदे, मागील काही घटनांमधे केवळ सदस्यांसाठीच उपलब्ध्द असलेली खरड सरळ सरळ धाग्यावर आणून सर्वांना उपलब्ध्द करून देणार्‍यांचे विषेश आभार मानावेसे वाटतात. मज्या येते असे प्रकार बघून.

अवांतर :- बाकी याआधीच मी स्वतः एका विशीश्ट सदस्याकडून बरेचदा इम्ग्रजीमधून हॅरॅसिंग प्रतीसाद व खरडींचा बळी ठरलो आहे (आपण माझी खरडवही उचकू शकता वा सदरील सदस्याचे काही उडवलेले अहं व गलिछ्चपणाने नटलेले प्रतीसादही बघू शकता), मला त्याच्या मूर्खपणाबद्दल तक्रार करायची नाहीच की जशास तसे उत्तर देणे फार आवघड असते असे म्हणायचं नाही, पण आमच्या वेळी स्व्तः होऊन कोणी मै का लाल कधीच पूढ आलां नाही याचं वैषम्य मात्र कायम आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2011 - 7:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म. संकेतस्थळावर (वैचारिक) मतभेद, वादविवाद, नवीन नाहीत. संकेतस्थळावर खेळीमेळीचे वातावरण असले पाहिजे. आता इतिहास उगाळत बसण्यात मतलब नाही. खरडवह्यांमधे लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहीले पाहिजे, यात नवीन सांगण्यासारखंही काही नाही, पण गेल्या दोन दिवसातील लेखनाची भाषा पाहिल्यावर खूपच वाईट वाटले. इतकेच मी नम्रपणे नमूद करतो.

एखाद्या गोष्टीचा राग येऊन येणार्‍या लेखन-प्रतिसादातील भावना ही माणसाची सहजप्रक्रिया आहे, पण लेखनात तो त्रागा कसा व्यक्त झाला पाहिजे, याचाही विवेकानं विचार झाला पाहिजे असे वाटते. मिपा सदस्यांनी काही प्रसंगी लेखनावर संयम ठेवला तर सदस्यांवर कार्यवाहीची वेळ येणार नाही, असेही वाटते.

>>> उगाच कुणाला चिडवण्यासाठी म्हणून धागे काढायचे टाळा.
हम्म, हेही खरं आहे.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

5 Oct 2011 - 7:46 pm | पैसा

सर्वप्रथम घोषणेबद्दल नीलकांतचे आभार!

एखाद्याचा आपल्याला राग येतो, हे खरं आहे, पण राग आला की आधी १० आकडे मोजा असं जुनेजाणते लोक सांगतात. मिपा हे आपल्या सर्वांचं आहे, तेव्हा घरातल्या माणसांचा राग आला तरी आपण घर मोडायला निघत नाही, एवढंच म्हणते. आम्हाला, म्हणजे गणपा आणि मला नव्या भूमिकेत यायला जर वेळ द्या! इथे भांडणारे सगळेच माझे मित्र आहेत. सर्वांना विनंती करते, जे झालं ते झालं. यापुढे तरी आपण सर्वानीच जबाबदारीने वागूया.

फोकलीचा मी झोपी गेल्याने काय झालं ते निट कळलं नाही. कोणी त्या धाग्याचा ब्याकप घेतला आहे काय? असल्यास कृपया व्यनीने धाडणे. तुमचे उपकार Nile हा आयडी आजन्म विसरणार नाही. धन्यवाद.

विशेष सुचना: हा प्रतिसाद विनोदी नाही.

शिल्पा ब's picture

5 Oct 2011 - 8:13 pm | शिल्पा ब

नीलकांत व डॉ. बिरुटे यांच्याशी सहमत. बाकी नविन संपादक कोण कोण आहेत त्याची यादी पण द्या.

अनामिक's picture

5 Oct 2011 - 8:20 pm | अनामिक

घ्या! तिथं घोषणा करु करु हत्तीवरुन साखर वाटून र्‍हायलेत, अन् म्हणे यादी द्या! आता काय कुणी घरी येवून सांगावं का काय?

शिल्पा ब's picture

5 Oct 2011 - 8:24 pm | शिल्पा ब

हे बघितलंच नै. लिंकावल्याबद्द्ल धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2011 - 8:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि खरडवह्या साफ व्हायला सुरूवात झालेली आहे याला काय म्हणावे? चोराच्या मनात चांदणे?

याला काय म्हणावे? चोराच्या मनात चांदणे?
नाही. सुधारणा!;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2011 - 8:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

फायरफॉक्स आणि लिनक्स वापरून काही सेकंदात वेबपेजेसच्या पीडीएफ बनवता येतात, ज्या पुरावे म्हणून वापरता येतात हे माहित असण्यासाठी थोड्या डीग्रा, थोडं संशोधन, थोडं पृथ्वीवरचं पाणी, आणि उलुशी अक्कल पुरते.

आत्मशून्य's picture

5 Oct 2011 - 8:59 pm | आत्मशून्य

पीडीएफ हे सबळ पूरावे ठरत नाहीत.मग कीतीही अक्कल वापरा....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2011 - 9:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कुठे?

लहान मुलांच्या हाती एखादा रबरबँड मिळाल्यावर ते मुल तो ताण ताण ताणतो आणि गिटारची तार छेडावी त्याप्रमाणे छेडुन त्यातुन कंपनं काढुन खुश होत. पण जेव्हा त्या रबरबँडची सहनशक्ती संपते तेव्हा त्याचा दणका त्या मुलासही मिळतो. हात चोळत बसाव लागत, शिवाय रबरबँड तुटतो ते वेगळच. *

मिपा हे असच एक साधन आहे. त्याचा आनंद सर्वांनी लुटावा. चार घटका करमणुक करुन घ्या.
मागे कुणी तरी म्हटल होत की "दुर्लक्ष करण्या सारखा दुसरा अपमान नाही." बघा आमलात आणुन.

* कृपया ह्याला कुणालाही धमकी समजु नये.

असं ड्वोळा मारून ;-) मजे मजेत खरड केली तर धोरणात बसेल काय? :-/

तुझो उजवो ड्वलो लै लवताव मा रे? ;)

Nile's picture

5 Oct 2011 - 9:13 pm | Nile

दोन्ही लवतात हे पहा.. (-; .. तुमचा डाव्यावर आक्षेप असेल तर मला उजवा चालेल.