"हे मात्र अती होतंय आता. अरे तुमची आवड उच्च अभिरुची आणि आमची आवड उकिरडे हुंगणे. बास नाही सहन होत आता".
दिप्या अगदी तावातावाने बोलत होता. पण तो नेमका कुठल्या विषयावर बोलत होता त्याचा मला बिलकुल अंदाज येत नव्हता. दिप्या माझा शाळेतला, ज्युनियर कॉलेजमधला जिगरी मित्र. बारावीनंतर मी इंजिनीयरींगला गेलो आणि हा बीएस्सीला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी शेवटच्या वर्षाला असताना आमच्याच गावातील माझ्या कॉलेजला आणि माझ्याच डीपार्टमेंटला लॅब असिस्टंट म्हणून आला. मग तर आमची मैत्री अगदी मोगर्यासारखी बहरली. आम्ही जगातल्या यच्चयावत विषयांवर सांगोपांग चर्चा करु लागलो. पुढे वर्षभराने माझी डीग्री संपली. मी दुनियादारीसाठी गाव सोडलं. पण आमच्या चर्चांमध्ये कधी खंड पडला नाही. मी गावी गेल्यावर, कधी फोनवर बोलताना आम्ही चर्चा करतच राहीलो.
मी मागच्या आठवडयात गोकुळाष्टमीला गावी गेलो होतो तेव्हाची ही गोष्ट. म्युझिक सिस्टीम वाल्याने नेहमीची 'शोर मच गया शोर', 'अरे गोविंदा रे गोपाला' वगैरे नेहमीची गोविंदा स्पेशल गाणी वाजवून झाल्यावर थोडी वेगळी रेकॉर्ड टाकली. सुरुवात तर छान होती परंतू पुढच्या ओळी ऐकल्यावर मात्र माझ्या चेहर्यावर नापसंतीची रेषा उमटली. नेमका त्याच वेळी दिप्या माझ्या बाजूला होता. त्याने माझी रीअॅक्शन नेमकी हेरली. आणि तो सुरु झाला.
"यार तुमचं फुसफुशीत हुचब्रुंचं मला हेच कळत नाही. तुम्ही साला ते दिल्ली बिल्लीचं 'भाग बोस डी के' गाणं सकाळी अगदी 'उठी उठी गोपाला' सारखं गाणं भुपाळी म्हणून ऐकता. आणि आम्ही लोकांनी लोकसंगीतामधलं एखादं गाणं जरा मोठयाने लावलं की तुमच्या कपाळावर आठया पडतात."
"दिप्या, पहिली गोष्ट म्हणजे तू हे असले फुसफुशीत हुचब्रु वगैरे शब्द वापरणे बंद कर. ते शब्द सुशिक्षित उच्चभ्रू असे आहेत. आणि त्या चित्रपटाचं नांव देल्ही बेलीज आहे. दिल्ली बिल्ली नाही."
"हेच. हेच म्हणतो मी. सर्वसामान्यांच्या भावना तुम्हाला कधी कळणारच नाहीत. त्यांनी काहीही म्हटलं तरी तुम्ही त्याला अशुद्ध म्हणणार. त्यांनी लोकसंगीतामधली गाणी ऐकली, म्हटली की तुम्ही त्याला ओंगळ, हिडीस, बिभत्स असे एकच अर्थ असलेले शब्द वापरणार"
"अरे पण दिप्या, तू ऐकतोस त्यातली काही गाणी खरंच अशी असतात रे. मागे तू मला त्या आनंद आणि मिलिंद शिंदेंच काय गाणं ऐकवलं होतंस, म्हणे डाव्या हातानं साडी वर करा, उजव्या हातात सामान धरा. आणि त्याच्याही आधी ते बाबूला आतमध्ये घ्या, भले गोटया बाहेर राहू दया. शी. ही काय गाणी झाली. अरे कबुल आहे की अशा गाण्यांमध्ये आपली जुनी म्युझिकल इन्स्ट्रुमेंटस कधी अॅक्च्युअली तर कधी सिंथेसायझरवर छान वाजवलेली असतात. पण शब्दांचं काय? लोकसंगीताच्या नावावर काहीही खपवायचं?"
मी ही आता भडकलो होतो. माझा रुद्रावतार पाहून दिप्याही बर्यापैकी शांत झाला होता. पण तरीही तो आपला हेका मात्र सोडायला तयार नव्हता.
"हे बघ तू म्हणतोयस त्यात काहीसं तथ्य आहे. नाही असं नाही. मला मान्य आहे की ती गाणी थोडीशी डबल मीनिंगची आहेत. पण या गाण्यात काय वाईट आहे?"
दिप्याची गाडी आता मुळ मुद्दयाकडे वळली होती. विषय मघाशी ऐकलेल्या तुझा झगा गं झगा गं वार्यावर उडतो या गाण्यावर आला होता.
"मला सांग काय वाईट आहे या गाण्यात? अरे इतकं सुंदर आणि गती असलेलं गाणं या आधी मराठीत आलंच नाहीये. गाण्याचं ओपनिंग म्युझिक क्रेझी फ्रॉगशी साम्य दाखवणारे तर त्यानंतरचा धिनताना नाधिनतीन हा आलाप सरळ शंकर महादेवनच्या गाण्यांची आठवण करुन देणारा"
"अरे पण तरीही तुझा झगा गं झगा गं वार्यावर उडतो हे काय गाण्याचं धृपद झालं का?"
"का? काय वाईट आहे त्यात? अं? सांग ना मला. तुम्हाला तुमच्या त्या मर्लिन मन्रोचा वार्यावर उडणारा झगा आवडतो. नव्हे, त्याला अभिजात कलाकृती म्हणता. आणि इथे एखादया मराठमोळ्या गीतकाराने जर का झगा वार्यावर उडतो असं लिहिलं तर मात्र संस्कृती बुडाली काय?"
दिप्याच्या या युक्तीवादाने मात्र मी निरुत्तर झालो. तो जे बोलत होता त्यात तथ्य होतं. मी ऐकण्याच्या मुडमध्ये आहे हे पाहून दिप्यालाही आता चेव चढला. त्याने तर चक्क त्या गाण्याचं रसग्रहणच सुरु केलं.
"अरे खुपच सुंदर गाणं आहे ते. गतीमान संगीत, लयदार शब्दरचना. सारं काही अप्रतिम आहे यार.
केसाचा गं फुगा तुझा, डोळयावर बट
नाक चाफेकळी तुझं, गुलाबी गं ओठ
अगं नाही बोलतो मी खोटं, रुप तुझं मोठं
गं तुझा झगा गं झगा गं, वार्यावर उडतो.
किती अचूक आणि सूंदर शब्दरचना आहे. एकदम प्रवाही. यात यमक असला तरीही तो अगदी सहजतेने आला आहे. कुठेही ओढून ताणून जुळवलेला नाही. इतके सुंदर शब्द की नजरेसमोर कथा- कादंबर्यामधली अप्सरा तरळावी. आणि त्या झगा शब्दांत काय वाईट आहे रे. तो तुमच्या फ्रॉक शदाचा मराठी प्रतीशब्द आहे. आणि जर मुलीने झगा घातला आहे तर तो वारा आला की उडणारच. जर तिने साडी नेसली असती तर कवीने तुझ्या साडीचा पदर वार्यावरती उडतो असं लिहिलं असतं.
हे ठुमक ठुमक लचक लचक तिरकी तुझी चाल
छन छनन छनन छनन पैंजण हे बोलं
चोळीला या तुझ्या गाठ गोरी गोरी पाठ
अवघड हा तुझा घाट, नागमोडी वाट
अरे तिच्या सौंदर्याचं इतकं सुंदर वर्णन मराठीत याआधी फक्त राम जोशींनी सुंदरा मनामध्ये भरली मध्ये केलं आहे. अनुप्रास अलंकाराचं उत्तम उदाहरण आहे कडवं. मराठीच्या तासाला अनुप्रास अलंकार शिकवताना 'काकूंनी काकांच्या कामाचे कागद कपाटातून काढून कात्रीने कराकरा कापले' सारखी निरस उदाहरणे देण्यापेक्षा अशी रसरसलेली उदाहरणे दिली तर मुलं आणि हल्ली मुलीसुद्धा अगदी समरसतेने शिकतील. गाठ असलेल्या चोळीचा उल्लेख करुन कवी आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचीच ओळख करुन देत नाही तर मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या माधूरी दिक्षित या मराठी कन्यकेच्या 'हम आपके हैं कौन' या अतिशय गाजलेल्या चित्रपटाचीही ओळख करुन देतो. आणि 'अवघड हा तुझा घाट, नागमोडी वाट' या ओळीबद्दल मी काय बोलावं. किती सुचक शब्द. तिच्या वळणदार कमनिय शरीराचे इतक्या सभ्य आणि तरीही सुचक शब्दात वर्णन मराठीत याआधी झालं नसेल.
नागिणीचा तोरा असा डंख तुझा गोड
प्रीतीचा जहर तुझा अंगभर सोड
टंच तुझी ज्वानी सखे लावू का गं बोट
गालाला ह्यो गाल तुझ्या ओठाला गं ओठ
कुठल्याही सुंदर मुलीचं वर्णन करताना तिला नागिणीची उपमा दिली जाते. हीच नागिणीची उपमा कवी अजून खुलवतो. या सौंदर्याच्या नागिणीचा डंख विषारी नसुन चक्क हवाहवासा वाटणारा आहे. तिने असंच तिच्या सौंदर्याचा डंख करावा, तिच्या प्रीतीचं जहर अंगात सोडावं. इथे कवीने जहर हा अमराठी शब्द वापरला असला तरी प्रेमासाठी मात्र 'इश्काचा' सारख्या शब्दाचा वापर टाळून प्रीती हा अस्सल मराठमोळा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे एक वेगळंच वजन ओळीला आलं आहे. पुढच्या दोन ओळींमध्ये शृंगार रस अगदी ठासून भरला आहे. तिचं टंच यौवन पाहून नायकाला तिला स्पर्श करण्याची अनावर ईच्छा होते. तिच्या गालावर गाल आणि ओठांवर ओठ टेकवण्याचीही त्याची ईच्छा होते.
...दिप्या किर्तनकाराप्रमाणे तल्लिनतेने रसग्रहण करत होता. त्या सुंदर शब्दांमध्ये मी ही नकळत हरवून गेलो होतो. नव्हे, त्या शब्दांत इतकी ताकद होती की मी दिवास्वप्नामध्ये एका अप्सरेचा हात धरुन हवेच्या हळूवार झुळूकीबरोबर तरंगत होतो.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
29615
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी
In reply to वोक्के बॉस डी डब्ल्यू by धनंजय
वाकडेशेट, लिहीत रहा.
वाकडेशेठ , लिहीत रहा. असं
In reply to वाकडेशेट, लिहीत रहा. by ३_१४ विक्षिप्त अदिती
(No subject)
In reply to वाकडेशेठ , लिहीत रहा. असं by आत्मशून्य
नाही, खरंतर सेठ लिहायचं होतं,
In reply to (No subject) by स्वानन्द
क ड क (लेखन)
@---'तुझा गं पाप्लेट नाजूक
In reply to क ड क (लेखन) by मी-सौरभ
:)
In reply to @---'तुझा गं पाप्लेट नाजूक by अत्रुप्त आत्मा
=)) बा*** भां**! च्यायला लय
येक्दम फिट्ट!सी ग्रेड हिंदी
मूळ कविता आणि रसग्रहण येकदम
फार आवडले आहे रसग्रहण
"दिप्याचा" युक्तिवाद उत्तम!!! पण गाणं चुकीचं निवडलंत बुवा!!!