जागृत स्वप्न (भाग -१)

आत्मशून्य's picture
आत्मशून्य in जनातलं, मनातलं
18 Aug 2011 - 6:05 pm

अल्केमि (किमयागीरी), हे एक शास्त्र आहे पदार्थ तयार करण्याचं, रचण्याचं. आणी तो मोडून पून्हा त्यातून काहितरी दूसरा नवीन पदार्थ निर्माण करण्याचं. म्हणूनच हे लोखंडापासून सोनं निर्माण करू शकत... पण हे एक शास्त्र असल्याने एका मूलभूत सिध्दांताला बाधील आहे आणी तो म्हणजे एखादी गोश्ट तयार करण्यासाठी तीतकेच समान मूल्य असलेली दूसरी गोश्ट गमावणे अत्यावश्यक आहे....

गावाबाहेरच्या टेकडीवर उभ्या असलेला माझ्या छोटेखानी परंतू दगडी गढीबद्दल लोकांना कधि फारसे आकर्षण न्हवतेच. मी मूद्दामच ती गढी गावापासून दूर अशा ठीकाणी राहता येण्यासाठी निवडली होती. किमयागारीच्या विवीध कल्पना व प्रयोगांनी झपाटून जाऊन मी व माझा मित्र पॅचिक्यूलस (पॅचि) याने अल्केमीच्या मदतीने विश्वाच्या रहस्याचा पडदा उलगडायचा विडाच उचलला होता. आमच्या आयूष्यातील उमेदीची वर्षे आम्ही यासाठी खर्ची पाडली होती आणी त्यासाठी ही गढी आम्हाला आवश्यक तो निवांतपणा मिळवून देत होती. तसही राजाच्या मर्जीने चालणारा कारभार असो की विक्षीप्त सरकारी अधीकारी असोत, पेगन्स समूदाय असो वा अल्केमी जाणणारी लोकं असोत, किव्हां द ओब्जरव्हर, वा ऑर्डर ऑफ मेटल्स सारख्या गूढ , विचीत्र आणी भयानक गोश्टींशी बांधीलकी ठेवणार्‍या संस्था असोत, सामान्य जनता अशा लोकांपासोन स्वतःला दूर ठेवणेच पसंत करते म्हणूनच हा असा एकांत आम्हाला सर्वच प्रकारे लाभदायक ठरला होता.

त्याकाळात आम्हाला आमचे अल्केमीबाबतचे झपाटलेपण, उत्साह व इतर समान आवडी निवडी या सोबतच आमचा स्वतःच्या मतांवर व कल्पनांवर असलेल्या आत्मविश्वास हा आमच्या मैत्रीचा गाभा होता, मानवी मनाचा ओलावा, विश्वास या मैत्रीला कधी लाभला नाही, पण मनूष्य स्वभावही थोडासा विचीत्रच असतो नाही का ...? हा असा स्वतःच्या मतांवरील आत्मविश्वास कधी कधी आमच्या क्षूल्लक मतभिन्नतेला छोट्या वादविवादांपासून ते सूप्त विद्वेशांपर्यंत आम्हाला कसा वाहवत न्हेत असे याची जाणीवच आम्हाल पूरेशी आली न्हवती. संपुर्ण समाज नाकासमोर चालायचे मार्ग पत्करताना आम्ही पत्करलेला वेगळा मार्ग आम्हाला आव्हान देत होता आवाहन करत होता आणी मूख्य म्हणजे आम्हा एकमेकांना एकत्र राहण्यास बाधील झाला होता. आमच्या महत्वाकांक्षा समान असल्याने आमच्यामधे मतभिन्न्ता का आली व हळूहळू याचे रूपांतर आमच्या अहंकारामधे वाहून जाण्यात कसे घडले हे समजण्यापूर्वीच यासर्वांची परीणीती आमचे मार्ग वेगवेगळे होण्यात झाली होती. मी दैवाचे असे पडलेले फासे मान्य करणे शक्य न्हवतेच पण यासोबतच मी एकट्याने माझे अल्केमीबाबतचे प्रयोग चालूच ठेवले, पण एक गोश्ट पॅचिच्या जाण्यानंतर सातत्याने मला छळत राहीली आणी ति म्हणजे आमच्यात वितूश्ट आल्या नंतर वर्षभराच्या काळात पॅचिने यशाची विवीध शिखरे सर करण्याचा जणू सपाटाच लावला होता....

फार थोड्या कालावधीत त्याने राजाचा सर्वोत्तम सल्लागार व राज्यातील अत्यंत प्रतीष्ठीत व्यक्ती म्हणून मान्यता मिळवली होती. राजाचे त्याच्या वाचून पानही हालत नसे, त्याच्या या प्रगतीने राज्याच्या पूर्वीच्या मर्जीतले कित्येक लोक खफा असूनही त्याने त्याच्या सर्व उघड/छूप्या शत्रूंचा अत्यंत सफाइने साम दाम दंड भेद वापरून पराभव केला होता त्याला तोड न्हवती. किमयागारीची रहस्ये त्याने भलेही उलगडली नसतील पण विवीध लोकांवर प्रभाव टाकून त्याचे परिवर्तन पैसा , सत्ता, व मानसन्मान मिळवण्यात त्याचा झपाटा कोणाच्याही आवाक्या बाहेरचा होता. त्याला शत्रू बरेच मिळाले पण आज त्याला राज्यामधे प्रत्यक्ष राजाच्या खालोखाल अघोषीत मानसन्मान प्राप्त झाला होता. स्वतः राजाने त्याच्या हूशारीची कदर ठेवत त्याला अत्यंत नीडर बलदंड असे ३०० लढवय्ये त्याच्या संरक्षणाला स्वखर्चाने दीले होते म्हणूनच तो धनाड्य, हूषार, सामर्थ्यवान आणी राज्यातील विवाहोत्सूक तरूणींच्या हृदयाची धडकन बनला होता... काळ पूढे जात राहीला त्याने माझ्याशी कसलाही संपर्क ठेवला न्हवता. पण आज सकाळी माझ्या गढीत शिरून एका शस्त्रधारी घोडेस्वाराने माझी झोप भंग होण्याची वाट पाहीली होती. आणी अत्यंत आदराने मला पॅचिचा आज संध्याकाळी त्याचि माझी भेट होइल काय याबाबत विचरणा करणारा निरोप दीला होता, एकूणच माझ्या प्रयोगातील फारसे उत्साहदायी नसलेले निश्कर्ष व अचानक पॅचेची भेट होणार याच्या आनंदात मी जेव्हां होकार कळवला होता तेव्हां माझं मन भूतकाळातील काही ठळक गोश्टींबाबत पून्हा वेध घेऊ लागलं होतं.... अल्केमी, पॅचि व एरिसा या पलीकडे मी कधी आयूष्य जगलोच नसल्याने भूतकाळ असा फार मोठा न्हवताच... पण एरीसाची अठवण मात्र चटकन मनाला थोडस हळवं बनवून गेली.

त्या संध्याकाळी माझ्या गढीकडे भलीमोठी चौकोनी ढाल , कमरेला तलवार, अंगावर चिलखत, डोक्यावर शिरस्त्राण, हातात भाला घेतलेल्या सैनीकांची रांग शिस्तबध्दतेने बूटांचा खाडखाड आवाज करत धूरळा उडवत सावकाश सरकत होती. त्यासोबतच पॅचि त्याच्या मोठ्या चौकोनी रथातून मोजके लोक व काही तरूण स्त्रीयांच्या सोबतीत अत्यंत रूबाबदारपणे मार्गक्रमण करत होता.मला क्षणभर स्वतःच्या सामान्यपणाची लाज वाटून गेली व मनाचा हिय्या करून मी त्याच्या भेटीला सामोरे जायची वाट बघू लागलो ते त्याला शक्यतो त्वरीत कटवायचा निर्धार करूनच. सैनीकांचा जथ्था बाजूला सारून उंची राजवस्त्रे घातलेला पॅची जेंव्हा अत्यंत रूबाबदारपणे माझ्या पूढे आला, मला विश्वासच बसत न्हवता की माझ्या जून्या सोबतीची गाठ कधी अशा प्रकारे होइल. तो खरच बदललेला होता , त्याच्या आलिंगनातील राजकीय औपचारीकता व माझ्या समोर दाखवलेला बडेजाव बघून मनातून मी जरा जास्तच चिडलो होतो पण त्याच्या हातात असलेले पूस्तक बघून मला पॅचि अजूनही ज्ञानाचा उपासक आहे याचा आनंद झाला व त्याला मी आत यायची विनंती केली. कारण जूना पॅचि अजूनही शिल्लक आहे याचा मला मनस्वि आनंद झाला होता. आतला भाग म्हणजे तशी माझी अस्ताव्यस्त प्रयोगशाळाच होती विवीध पूस्तके कसेही रचलेले सामान, धूळ आणी कचरा यातच आम्ही मोठा काळ काढला होता. पॅचिने त्याकडे नापसंतीचा तिव्र कटाक्ष टाकून उभ्या उभ्याच बोलायला सूरूवात केली, " मित्रा कॅसेंड्रा तूझ्या आठवणीनी व्याकूळ होऊन मी तूला भेटायला आलो आहे, आपल्या आयूष्यातील उमेदीची वर्षे आपण विश्वाच्या रह्स्याची उकल करायला एकत्र घालवली, आणि तो आपल्या दोघांच्याही आयूश्यातील खरचं फार चांगला काळ होता. ते दीवस परत येणार नाहीत म्हणूनच कधीकाळी आपले मतभेद झाले होते हे विसरून आज मी आपली मैत्री वृध्दींगत करायला तूझ्याकडे आलो आहे". माझ्यातील अलीप्ततेची जागा आता विस्मीततेने घेतली होती, पॅची खरच बदलला होता ? स्वतःचे ज्ञान व मते केवळ यावरच ठाम राहणारा प्रसंगी त्यासाठी समोरच्याशी वैर पत्करणारा अहंकारी भासलेला पॅची माणसात आला होता ? तो पूढे बोलतच राहीला मित्रा मी तूझी फसवणू़क केली आहे, ज्यावेळी आपण विश्वाचे रहस्ये उलगडायला अल्केमीचा मार्ग स्विकारला होता तेव्हां मी हळूच तूझ्या नकळत मंत्र तंत्र व काही पेगन पध्द्तींतील सिध्दींचा अभ्यास करत होतो ज्यामागे माझा उद्देश केवळ भौतीक जगात यश मिळवणे इतकाच होता. ही बाब मी तूझ्यापासून गोपनीय ठेवल्याबद्दल मला क्षमा कर. म्हणूनच तूझ्या सोबत असूनही मी नसल्यासारखा होतो. आपल्यातील वाद विवादाचे खरे कारण आपली वेगेवेगेळी उद्दीश्टे हेच होतं. म्हणूनच आपण एकत्रपणे संशोधन करू शकलो नाही. पण आज मी या चूकीची भरपाइ करायला आलो आहे . माझ्या आयूष्यातील यशाची गूरूकिल्ल्ली मी तूला द्यायला आलो आहे. याचा वापर करून तू लोकांवर प्रभाव पाडू शकशील, त्यांच्या कडून आपली कामी करून घेऊ शकशील, तूला त्यांच्या समस्या सोडवता येतील... मला खात्री आहे तूझी बूध्दीमत्ता व मी दीलेले तंत्र वापरलेस तर या जगात तूला अशक्य अप्राप्य काहीही नाही... असे म्हणून त्याच्या हातात इतका वेळ सांभाळून ठेवलेले ते चॉकलेटी रंगाचे बाड त्याने माझ्याकडे सूपूर्त केले... कोणत्यातरी प्राण्याच्या कातड्याचे ते कव्हर असलेले पूस्तक हातात पकडून कीती तरी वेळ मी तो जे बोलत होता ते विस्मीतपणे ऐकत गेलो. काही वेळाने थोडी औपचारीक बोलणी करून ते पुस्तक माझ्याकडे तसेच सोडून पॅची परत निघून गेला...

मध्यरात्र झाली होती पण मी संध्याकाळच्या पॅचिच्या भेटीनंतर माझं मन अजूनही थार्‍यावर आणू शकलो न्हवतो. अल्केमी मधे जेव्हां तूम्ही एखाद्या पदार्थाचे शूध्दीकरण करत करत त्याच्या मूळ संरचने पर्यंत पोचता तेव्हांच तूम्हा त्याच्यामधे बदल करायचे रहस्य सापडते. आणी हे सर्व घडत असताना हे शूध्दीकरण करणाराही समोरच्या पदार्थासोबतच स्व्तःही शूध्द होत स्वतःच्या शूध्द स्वरूपाकडे जात राहतो, अंतिम सत्याकडे पोचतो हा साधा नीयम लक्षात घेऊनच मी अल्केमीचा वापर विश्वाची रह्स्ये उलगडायला करायच्या निश्चयाप्रत आलो होतो. माझ्या अल्केमीच्या अभ्यासाचा हेतू केवळ हाच होता, आणी पॅचि माझ्या मतांशी संपूर्ण सहमत आहे, न्हवे तो त्याच उद्देशाने माझ्या प्रयोगात मला सोबत करतो अशीच माझी समजूत होती. पण आता सत्य समोर आले होते, पॅचि व माझे संशधन यामागे खरी मैत्री न्हवती, आमची उदीश्टे त्यावेळीपासूनच वेगवेगळी होती हे त्याने आज माझ्या समोर उघडपणे कबूल केले होते.. आणी प्रथमच आमच्या मतभेदांच्या काळोखात त्याने त्याच्या विश्वासघाताची सावली यापूर्वी अत्यंत बेमालूमपणे लपवली होती याची खात्री मला झाली. म्हणूनच त्याने दीलेल्या पूस्तकावर आता कीती विश्वास ठेवायचा, तसे करण्यामागे त्याचा उद्देश काय, व त्याने यासाठी माझीच निवड का केली याचा शोध घेणे फार आवश्यक बनले होते.. एक गोश्ट नक्कि झाली होती... तो माझा कधीच मित्र न्हवता.. सहकारीही न्हवता... आणी त्याने त्याचे जाळे याक्षणी माझ्यावर फेकले आहे आणी मी त्यात याक्षणी तरी अडकलो आहे अशी स्पश्ट सूचना मला माझी मनोदेवता देत होती......

(क्रमशः)
टिपः- स्वतःचे लेखन करायचा असा हा पहिलाच प्रयत्न आहे, मिपाकर सांभाळून घेतील (विषेशकरून शूध्द लेखनाच्या बाबत)अशी अपेक्षा करतो :)

कथाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

18 Aug 2011 - 6:10 pm | इंटरनेटस्नेही

सविस्तर प्रतिसादासाठी जागा आरक्षित.

वपाडाव's picture

19 Aug 2011 - 11:31 am | वपाडाव

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Aug 2011 - 6:14 pm | बिपिन कार्यकर्ते

वाचतोय

आम्हीही वाचतोय... पुढचा भाग येउद्यात...

ही एरिसा कोण?

आत्मशून्य's picture

18 Aug 2011 - 11:06 pm | आत्मशून्य

एरीसा बद्दल फार डीटेल माहीती आत्त्ताच देत नाही, पण काही पंथातील लोकांच असं मानणं आहे की परमेश्वर हा स्त्रिच असला पाहीजे. जी सहहृदयता, प्रेम व परोपकारी वृत्ति आपण परमेश्वरात बघतो, वा अपेक्षा करतो ते बघता अशी प्रवृत्ती कोणत्याही पूरूषजातीच्या जिवाकडे असणे कदापी शक्य नाही, म्हणून त्यांची बरीचशी गाणीही स्त्रिच्या सौंदर्यापासून ते दया, क्षमा, शांति अशा विवीध प्रवृत्तिंची गोडवे गाणारी रचलेली असतात.... असो कथेच्या अनूशंगाने तूला थोडी हिंट दीली आहे असं वाटतयं.

>> .....याक्षणी तरी अडकलो आहे अशी स्पश्ट सूचना मला माझी मनोदेवता देत होती......
मग? मग काय झालं?
पु भा ल टा

गणपा's picture

18 Aug 2011 - 7:14 pm | गणपा

पुढे काय होणार याची उत्सुकता लागुन राहिली आहे.

छान सुरुवात ...

पुढील लेखनास मनापासुन शुभेच्छा ...

कवितानागेश's picture

18 Aug 2011 - 7:24 pm | कवितानागेश

पहिल्याच भागात इतक्या सगळ्या गोष्टी उघड करायला नको होत्या.
अजून लटकवून,..आपले ते हे,... गूढता वगरै ठेवायला पहिजे. :)

५० फक्त's picture

18 Aug 2011 - 11:08 pm | ५० फक्त

मस्त रे, येउ दे अजुन वाचतोय.

किसन शिंदे's picture

19 Aug 2011 - 9:31 am | किसन शिंदे

एरिसा हि कॅसेंड्राची प्रेयसी असावी..बहूतेक.

वातावरण निर्मिती छान केलीय्...पुढील भागाच्या प्रतिक्षेत..

प्रचेतस's picture

19 Aug 2011 - 9:32 am | प्रचेतस

सुरुवात तर छानच झालीय. पहिले एकदोन परिच्छेद थोडेसे विस्कळीत वाटले होते, पण एकूणात सुसंगती जाणवते आहे.
पुढचा भाग येउ दे लवकर.

अवांतरः पेगन्स समुदायाबद्दल अधिक माहिती मिळेल काय?

शाहिर's picture

19 Aug 2011 - 10:31 am | शाहिर

वातावरण निर्मिति छान झालि अहे ..आता पुढील भागाची वाट पहात आहे

स्पा's picture

19 Aug 2011 - 11:39 am | स्पा

झकास सुरुवात... वाचतोय

अनुरोध's picture

19 Aug 2011 - 1:20 pm | अनुरोध

पुढचा भाग लवकर टाका राव अता......

स्वानन्द's picture

19 Aug 2011 - 3:38 pm | स्वानन्द

सह्ह्हीच!! पुढचे भाग वाचायची उत्सुकता निर्माण झालीय. येऊ दे लवकर लवकर. :)

इरसाल's picture

19 Aug 2011 - 3:57 pm | इरसाल

पुढील भागाच्या प्रतिक्षेत !! हा भाग आवडल्या गेला आहे हेवेसांनल.

वपाडाव's picture

22 Aug 2011 - 10:53 am | वपाडाव

चान चान....
पुढील भाग सांगोपांग येउ दे....
(राजधानी धावल्यागत गुढ कथा संपवावी तशी नको.... )

निनाद's picture

22 Aug 2011 - 11:21 am | निनाद

वाचत आहे.

टिपः- स्वतःचे लेखन करायचा असा हा पहिलाच प्रयत्न आहे, मिपाकर सांभाळून घेतील (विषेशकरून शूध्द लेखनाच्या बाबत)अशी अपेक्षा करतो Smile

लेखन करतांना फायरफॉक्स वापरा आणि त्याला हे मराठी स्पेल चेक करणारे अ‍ॅडऑन जोडा.
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/marathi-dictionary/
अयोग्य शब्दांखाली लाल रेष येऊन ते तेथेच योग्य स्वरूपात लिहिता येतील.

सोत्रि's picture

22 Aug 2011 - 1:38 pm | सोत्रि

मस्त विषय आणि छान सुरुवात.
पु. भा. ल. टा.

निनादने सांगीतलेला उपाय अमलात आणल्यास आणखी मजा येइल वाचायला.
वेळ लागेल थोडा टंकायला पण... "टाइम लेना लेकिन जल्दी करना" इती भाइसाहब - फस गये रे ओबामा

- (अल्केमिस्ट) सोकाजी

पल्लवी's picture

22 Aug 2011 - 2:09 pm | पल्लवी

(का कोण जाणे, पण मला Inception हा चित्रपट आणि त्यातला अल्केमिस्ट युसुफ आठवला.)
पुढे लिहा, वाचत आहे.

नगरीनिरंजन's picture

23 Aug 2011 - 6:55 am | नगरीनिरंजन

रोचक आहे. पुभालटा.

स्पंदना's picture

23 Aug 2011 - 7:15 pm | स्पंदना

आवड्या!

पुढे लिहा.

पैसा's picture

23 Aug 2011 - 7:19 pm | पैसा

वाचतेय...