ध्यान गरज आणि फायदे

स्वप्ना_तुषार's picture
स्वप्ना_तुषार in जनातलं, मनातलं
11 Jul 2011 - 12:24 pm

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे "स्ट्रेस"(ताण) हा शब्द वारंवार आपल्या कानावर पडत असतो. कोणाला शारीरिक ताण तर कोणाला मानसिक ! या ना त्या कारणाने आपण सगळेच तणावग्रस्त आहोत किंवा झाले आहोत की काय असे वाटायला लागले आहे. या सगळ्याचे मूळ मानसिक ताणातच आहे असे आता निदर्शनासही आले आहे.मूळात प्रश्न हा आहे की हा ताण निर्माण कशाने होतो? तशी बरीच कारणं देता येतील...कधी आपल्या अपेक्षा आणि त्यांची पूर्तता यात न बसलेला ताळमेळ तर कधी विश्वासाला गेलेला तडा..एक ना अनेक..थोडक्यात काय तर प्रामुख्याने आपल्या मनाला पवनकुक्कुटाप्रमाणे वारा येईल त्या दिशेला भरकटण्याच्या लागलेल्या सवयीने ही समस्या निर्माण झालेली दिसून येते.

स्ट्रेस मॅनेजमेंट करावयाचे असेल तर ध्यान हा उत्तम उपाय आहे असा बोलबालाही आपल्याला सर्वत्र ऐकू येतो.पण ध्यान करणे म्हणजे नेमके काय? इंग्रजीत ध्यानाला Meditation म्हटले आहे. Meditation या शब्दाच्या dictionary meaning नुसार Meditation is nothing but continuously thinking about something ! म्हणजेच सतत एकाच गोष्टीचा विचार करणे म्हणजेच ध्यान असा ध्यानाचा ढोबळ अर्थ !
मग कुणी पैशावर ध्यान करत असेल तर कुणी खेळावर. अर्थात प्रत्येकजण कशाना कशाचा सतत विचार करीत असतो म्हणजेच ढोबळ अर्थाने ध्यानच करीत असतो.विचार करणे हा मनाचा स्थायीभाव आहे मग त्याला चिरडून किंवा मारून आपल्याला जे साध्य करावयाचे आहे ते कसे साध्य करता येईल? मनाला आपला मित्र बनवूनच हे शक्य होईल.ज्याप्रकारे सुसाट वाहणार्‍या नदीच्या प्रवाहाला योग्य दिशेने वळविले असता तिचा उपयोग जनकल्याणाकरिता करता येऊ शकतो त्याच प्रकारे आपल्या मनाचा नियमनाद्वारे आपल्याच कल्याणाकरिता उपयोग केला जाऊ शकतो.मनाचे नियमन त्याला योग्य विचाराची दिशा देऊन आणि योग्य विचारावर स्थिर करून ध्यानद्वारे सहज साध्य होऊ शकते.
पण जेव्हा ही प्रक्रिया सुरू होते तेव्हा खरी परीक्षा सुरू होते. डोळे मिटून बसल्यावर आपल्या मनात अक्षरशः विचारांचं काहूर माजतं.म्हणजे डोळे उघडे असताना येणार नाहीत एवढे विचार डोळे बंद केल्यावर येतात. मग करायचं काय? अशावेळी आपण विचारांना अनाहूत पाहुण्यांप्रमाणे वागवायचं.जसे एखादी व्यक्ती नको असताना आपल्या घरी आल्यास आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो अगदी तसेच आपल्या विचारांच्या बाबतीतही करायचे.म्हणजे आपोआपच विचारांची निर्मिती बंद होऊन मन निर्विचार होण्यास सुरुवात होते.अश्या तर्‍हेने काही दिवस नियमितपणे अभ्यास चालू ठेवल्यास ध्यान करणे सोपेच नाही तर आनंददायी बनते. मग ताण्,स्ट्रेस अश्या शब्दांना आपल्या आयुष्यात काही महत्त्वच उरत नाही.म्हणूनच ध्यानामुळे होणार्‍या या फायद्याकडे पहाता ध्यान ही काळाची गरज होती , आहे आणि राहील असेच म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

इरसाल's picture

11 Jul 2011 - 2:13 pm | इरसाल

आजकालच्या ह्या धावपळीच्या जीवनात तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खरोखरच ध्यानाची गरज आत्यंतिक आवश्यक बाब आहे. पण आपण सगळ्यांनी स्वताला नको त्या गोष्टीत इतका गुरफटवून ठेवलाय कि अश्या जीवनावश्यक गोष्टीसाठी आपणा पुरेसास वेळ देवू शकत नाहीयेत.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jul 2011 - 2:32 pm | परिकथेतील राजकुमार

वाह !

रोज हे येवढे कसे काय लिहू शकता हो तुम्ही ? आम्हाला तर वाचतानाच दम लागतो.

खरच कौतुक वाटते तुमचे.

सहज's picture

13 Jul 2011 - 2:00 pm | सहज

सहमत आहे पण
खरच 'ध्यान - गरज आणि फायदे' या विषयावर चुचुतै यांचा लेख वाचायला आवडेल. आजकाल गायब आहेत त्या.

धमाल मुलगा's picture

13 Jul 2011 - 2:29 pm | धमाल मुलगा

हाण्ण तिच्यायला!
=)) =)) =)) =))

सहजरावांनी गाप्पकन सिक्सर ठोकलेला आहे. :D

नितिन थत्ते's picture

13 Jul 2011 - 6:54 pm | नितिन थत्ते

असेच म्हणतो.

श्रावण मोडक's picture

13 Jul 2011 - 7:24 pm | श्रावण मोडक

+२!

" .मनाचे नियमन त्याला योग्य विचाराची दिशा देऊन आणि योग्य विचारावर स्थिर करून ध्यानद्वारे सहज साध्य होऊ शकते."

योग्य विचार हे व्यक्ती सापेक्ष असतात कि त्यालाही काही नियमांची चौकट आहे ? कारण एखादा मला योग्य वाटणारा विचार अथवा कृती तुम्हाला संपूर्णपणे अयोग्य वाटू शकते.
तसेच प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात ( व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ) काहींना अध्यात्म, ध्यानधारणा, देवधर्म यांची सवय असते म्हणा किंवा त्यांचा मानसिक कल या गोष्टींकडे जास्त असतो म्हणा, त्यांना हे ध्यान (मेडिटेशन) तुलनेने सहजसाध्य असतं का ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Jul 2011 - 3:56 pm | ज्ञानोबाचे पैजार

भगवान सांगतात

तत्रकाग्रं मन: कॄत्वा यताचेत्तेन्द्रियक्रियः |
उपविशासने युज्ज्याद्योगमात्माविशुध्दये || १२||

समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः|
सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशच्श्रानवलोकयन || १३||

प्रशान्तात्मा विगतभीर्बम्हचारिव्रते स्थितः |
मन: संयम्य मच्चितो युक्त असीत मत्परः || १४ ||

युज्जुन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः |
शांन्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति || १५||

भगवत गीता अध्याय ६

ध्यान करणे म्हणजे काहीही न करता स्वस्थ बसणे. मनात येणार्‍या कोणत्याही विचारा कडे तटस्थ पणे पहाणे. असेही काही जण सांगतात.

शेवटी आपण आपल्याला रुचेल, पटेल आणि झेपेल ते करावे. जे करावे ते गुरुच्या मार्गदर्शनाखालीच करावे.

मि. पा. वरचे आपले मित्र श्री यशवंत एकनाथ त्यांच्या ब्लॉगवर काय लिहीतात ते इथे जरुर वाचावे वरील श्रोकांचे सार त्यांनी सोप्या भाषेत मांडले आहे.

Nile's picture

12 Jul 2011 - 12:13 am | Nile

ध्यान करणे म्हणजे काहीही न करता स्वस्थ बसणे. मनात येणार्‍या कोणत्याही विचारा कडे तटस्थ पणे पहाणे. असेही काही जण सांगतात.

च्यायला!! आम्ही असे केले तर लगेच "आळशीपणा पुरे, काहीतरी काम करा!" असेच सगळेजण सांगतात. एक काय ते ठरवा बुवा आधी.

शरद's picture

12 Jul 2011 - 7:41 am | शरद

वर "विचारांकडे तटस्थ पणे पहा " असे सांगितले आहे. तुम्ही तुम्हाला "काम करा " असे सांगणार्‍यांकडे तटस्थपणे पहा.
शरद

वर "विचारांकडे तटस्थ पणे पहा " असे सांगितले आहे. तुम्ही तुम्हाला "काम करा " असे सांगणार्‍यांकडे तटस्थपणे पहा.
शरद

त्यांपैकी एक म्हणजे ती शेजारच्या गल्लीतली, यमीपेक्षा सहापट गोरी वगैरे! आता तिच्याकडे जर तटस्थपणानं पहायचं असेल तर सालं आयुष्यात पहायचं कुणाकडे!!

आत्मशून्य's picture

11 Jul 2011 - 4:02 pm | आत्मशून्य

.

आत्मशून्य's picture

11 Jul 2011 - 4:04 pm | आत्मशून्य

.

नितिन थत्ते's picture

11 Jul 2011 - 4:20 pm | नितिन थत्ते

मन निर्विचार झाल्याचा अनुभव कोणी घेतला आहे काय?

आत्मशून्य's picture

11 Jul 2011 - 6:44 pm | आत्मशून्य

मन एकविचारी झाल्याचा अनूभव सहज येतो, ती जाणवणारी हवीहवीशी वाटणारी, शांतता, सहजता, हलकेपणा वगैरे याच अवस्था होत. अगदी सोप्या शब्दात सांगायच तर एकदंम कूल उत्साही व आनंदी वाटू लागतं. नेमकी ही अवस्था दारू पिल्याने प्राप्त होते का याबाबत मलातरी शंका आहे ? असो अवस्थातील समानता हा या चर्चेचा मूद्दा नाही. पण मन नीर्वीचार होतं यावर विश्वास नाही कारण निर्वीचारता ही मनाची अवस्था नाही त्यामधे कीमान एकविचारता त्यात राहतेच असे ठाम मत आहे. मनाकडे झालेल्या दूर्लक्षानंतर ज्ञानाप्रत न्हेणारी अवस्था/ अथवा रस्ता म्हणजे निर्वीचारता होय, पण जसं म्हटलो की ही जी गोश्ट मनाकडे झालेल्या दूर्लक्षानंतर साध्य असते तीला मनाची अवस्था मी मानणार नाही. (शेवटचे वाक्य चर्चेसाठी दूर्लक्शीत केलेत तरी चालेल)

ध्यानामधे सहजता (कंफर्ट/एकविचारता) वाढल्यानंतर तर मन निर्वीचार होणे ज्याला म्हणतात अशा अवस्थेला पोचल्याचा अनूभव मला आला आहे. पण तो क्षणीक कालासाठी असल्याने त्याची संपूर्ण जाणीव/आठवण होत नाहीये. तूम्हाला झोपेतून चटकन जागे केले तर कसे वाटते ? एखादा झटका वा मनाला पडलेला हलकासा दचका ?

ध्यानाच्या सहज अवस्थेमधे जेव्हां मन एक विचारी बनून त्या एकविचारतेलाही दूर्लक्शीत करू लागते/ मनाच्याच अस्तीत्वाची गरज तठस्ततेने स्विकारते वा सरळ सरळ नाकारते पण यात तठस्तता सोडत नाही, तेव्हां मनातील विचाराची उपस्थीती हळू हळू जाणवली जात नाही, वा मनाचे अस्तीत्वच जाणवत नाही.(यालाच जाणीवेचा र्‍हास होणे म्हटले असावे यामधे विचार काळ व अनूभव, भोग व मी याचे आकलन होत नाही), जाणीवेच्या या सिमारेषेवर मनाचे अस्तीत्व येजा करत असताना ध्यानामधे एक हलकासा झटका (विनाकारण कोणताही विचार वा कृती मनामधे घडलेली नसताना) जाणवतो(ध्यानामधे असताना २-३ वेळा अधून मधून जाणवतोच) हीच मनाची निर्वीचारता भंगणारी अवस्था होय. हा एक अत्यंत हलका व सहज झटक्याचा अनूभव ज्याला म्हणता येइल तो मनाचे अस्तीत्व पून्हा सूरू झाल्यामूळे जाणवतो. पण जर जाणीवेच्या पलीकडेही स्थीर होणे साधले गेले की मग ज्ञान/जिवनमूक्तावस्था/समाधी वगैरे मीळते म्हणतात पण याचा अनूभव नाही. त्यामूळे निर्वीचारता जी म्हणतात ती अशा प्रकारे मला जाणवली असे मी म्हणेन. पण यामधे फार काळासाठी स्थीर झालो नसल्याने विश्लेशण मला देता येत नाहीये, म्हणून मी फक्त त्याआधी काय घडते व नंतर काय घडते हेच आत्मविश्वासाने बोलू शकतो, बाकी वाचलेलं बरच आहे पोपट्पंची, बेगडी चर्चा व वादविवादही बराच करू शकेन पण ते उपयोगाचे नाही म्हणून फक्त स्वानूभव बोललो आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Jul 2011 - 1:23 pm | llपुण्याचे पेशवेll

तो, बाकी वाचलेलं बरच आहे पोपट्पंची, बेगडी चर्चा व वादविवादही बराच करू शकेन पण ते उपयोगाचे नाही म्हणून फक्त स्वानूभव बोललो आहे.
लाख मोलाची बात.

नितिन थत्ते's picture

11 Jul 2011 - 4:22 pm | नितिन थत्ते

मन निर्विचार झाल्याचा अनुभव कोणी घेतला आहे काय?

हो. प्रयत्नपूर्वक अशी अवस्था आणता येते.

"अरे.. काय मस्त निर्विचार अवस्था आलीय.." ,

"एकदम सक्सेसफुल झालं आपलं मेडिटेशन.."

"कसं शांत शांत वाटतंय.."

"आता परत नाही ना सुरु होणार विचार?"

असे सर्व विचार निर्विचार अवस्थेत येतात.. :)

.......

विनोद जाऊदे. पण श्वासावर लक्ष केंद्रित करणं, विचारांकडे दुर्लक्ष करणं हे सर्व मनाचे खेळ आहेत आणि ते अत्यंत निरुपयोगी असावेत असं दिसतं.

जे चाललंय ते चालू द्यावं. मनाची विचार करण्याची कपॅसिटी अमर्याद आहे. विचारांची गर्दी, वेड लागायची पाळी. काहूर वगैरे ही सर्व "परसेप्शन्स" आहेत. आपल्या मनावर विचारांचा ताण येतो आहे डोकं फुटेल, अशा समजुतीने आपण स्वतःला त्रास देतो.

मनाला काय काशी घालायची ती घालू दे. त्याकडे लक्ष देणं किंवा न देणं किंवा मनाला उधळलेला घोडा समजून कंट्रोल आणणं असं काही प्रयत्नपूर्वक करत बसायचं नाही. मग सगळं रांगेत येतं. तसं करुनही न आलं तर त्यावर रासायनिक उपचार घेतलेलेच बरे.

.. उगीच वेळ काढू नये आणि ध्यानाची धडपड करु नये.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jul 2011 - 5:27 pm | परिकथेतील राजकुमार

तसं करुनही न आलं तर त्यावर रासायनिक उपचार घेतलेलेच बरे.

सहमत आहे.

आम्ही रोज संध्याकाळी४/५ पेग रासायनिक उपचार घेतो.

परासायनीक

:)

अपेक्षित प्रतिसाद आणि समाधान.. :)

एकदम सहमत..

sagarparadkar's picture

11 Jul 2011 - 5:55 pm | sagarparadkar

>> .. उगीच वेळ काढू नये आणि ध्यानाची धडपड करु नये.

खरंय.

पाणी आहे पण त्यावर तरंग नाहीत असं कधी झालंय का? तीच गोष्ट मनाची . बंद टाकीतल्या पाण्यावरसुद्धा, टाकीला जरासा धक्का बसला तर तरंग उमटतातच ....

सोत्रि's picture

11 Jul 2011 - 9:41 pm | सोत्रि

>> श्वासावर लक्ष केंद्रित करणं, विचारांकडे दुर्लक्ष करणं हे सर्व मनाचे खेळ आहेत आणि ते अत्यंत निरुपयोगी असावेत
गविजी, स्वानुभावरून असहमत. श्वासावर लक्ष केंद्रित करून विचारांकडे दुर्लक्ष करणं शक्य आहे आणि उपयोगीही आहे, स्वानुभावरून.

- सोकाजी

वाक्यांमधे अंतर हवे.

श्वासावर लक्ष केंद्रित करणं..

किंवा

विचारांकडे दुर्लक्ष करणं..

इ इ हे मनाचे खेळ आहेत.

श्वास ही इनव्हॉलंटरी क्रिया आहे आणि ती तशीच रहावी हे निसर्ग आणि आरोग्यदृष्ट्या योग्य. अनैच्छिक क्रियांचे निरीक्षण / नियमन करायला जाऊ नये. (जाण्याची गरज पडू नये. आणि पडलीच तर ते अशा रितीने साध्य होणार नाही)

अशा गोष्टींचे निरिक्षण / नियमन केल्याने हायपरव्हिजिलन्सची मानसिक सवय लागून "वाजे पाऊल अपुले" स्थिती होण्याचा धोका असतो.

पाच मिनिटे शांत वातावरणात बसून सलग आपल्या छातीचे ठोके ऐकून पहाणे हा प्रयोग कोणीही करुन पहावा.

कदाचित हायपरव्हिजिलन्सची झलक मिळेल.

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Jul 2011 - 5:30 pm | ज्ञानोबाचे पैजार

अचपळ मन माझे नावरे आवरीता, तुज विण शिण होतो धावरे धाव आता

मन मोठे चंचल असते. आणि त्यावर कोणाचीच अधिसत्ता चालत नाही. निर्विचार वगेरे राहुद्या. मी सांगतो म्हणुन तुम्ही मनात माकडाचा विचार आणू नका. बाकी कशावरही तुम्ही विचार करु शकता. बघा करुन. काय होते? शक्य आहे असे करणे? मग मन निर्विचार करणे तरी कसे बरे शक्य आहे?

पण मनात येणार्‍या विचारांकडे तटस्थ पणे बघता येणे अभ्यासाने शक्य आहे.

हो मी घेतलाय असा अनुभव. इच्छा असल्यास इतरानादेखील हा अनुभव देवू शकतो.
फक्त मन निर्वीचार झाल्याची जाणीव( विचार) झाली की त्यातून बाहेर यायला होते.

प्रियाली's picture

11 Jul 2011 - 5:34 pm | प्रियाली

अशावेळी आपण विचारांना अनाहूत पाहुण्यांप्रमाणे वागवायचं.जसे एखादी व्यक्ती नको असताना आपल्या घरी आल्यास आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो अगदी तसेच आपल्या विचारांच्या बाबतीतही करायचे.म्हणजे आपोआपच विचारांची निर्मिती बंद होऊन मन निर्विचार होण्यास सुरुवात होते.अश्या तर्‍हेने काही दिवस नियमितपणे अभ्यास चालू ठेवल्यास ध्यान करणे सोपेच नाही तर आनंददायी बनते.

हे असे ध्यान दिवसातले किती तास लावायचे? कारण समजा अर्धातास लावले तर उरलेले १४-१५ तास (माणूस किमान वेळ जागा असतो तो काळ) मन विचार करत राहते त्याचे काय? आणि अर्ध्या-एक तासाने ध्यान केल्याने उरलेल्या १४-१५ तासांवर किती आणि कसा परिणाम होणार याचे मूल्यमापन केले आहे का?

मुळात माझा प्रश्न असा आहे की आपल्याच मनात "आलेल्या" विचारांकडे "दुर्लक्ष" ते कसे बुवा करायचे?

हे म्हणजे आपण गाढ झोपेत आहोत असे तोंडाने सांगण्यापैकी आहे.

बाकी त्या विचारांकडे त्रयस्थ दृष्टीने पहायचे वगैरे हे शब्दभ्रम आहेत.

sagarparadkar's picture

11 Jul 2011 - 5:56 pm | sagarparadkar

सहमत

प्रियाली's picture

11 Jul 2011 - 6:00 pm | प्रियाली

त्या विचारांकडे त्रयस्थ दृष्टीने पहायचे वगैरे हे शब्दभ्रम आहेत.

+१ परंतु एखादा त्रासदायक विचार काही काळापुरता मनातून काढून टाकण्याचे प्रयत्न आपण सर्वच करतो (म्हणजे मन निर्विचार करणे नव्हे, तर ते इतरत्र रमवणे) परंतु अर्धा तास मनातून एखादा विचार काढला आणि पुढचे १५ तास चघळला तर किती प्रमाणात फायदा/ तोटा होईल याचे मोजमाप केले आहे का असे विचारायचे होते. ;)

स्मिता.'s picture

12 Jul 2011 - 2:36 pm | स्मिता.

मनातल्या विचारांकडे (मुख्यतः त्रासदायक) दुर्लक्ष करणे कसे शक्य होणार?
प्रियाली म्हणतात तसं थोडा वेळ दुसरीकडे मन रमवलं की तो विचार फक्त जरा मागे जाऊन बसतो. पण त्यावेळीही मन नकळतपणे त्या विचारवर प्रोसेसिंग करत असतेच.

खरं तर मनाच्या या सतत विचार करण्यातूनच तर समस्यांची उकल मिळत असते. झोपेत किंवा तंद्री लागून अचानक काहितरी शोध लागलेल्या बर्‍याच शास्त्रज्ञांच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तसंच आपल्या रोजच्या समस्या, ताण तावरही मन विचार करूनच उपाय शोधत असणार ना? मग मनाला त्याचे काम करण्यापासून परावृत्त का करावे?

आत्मशून्य's picture

11 Jul 2011 - 7:11 pm | आत्मशून्य

बाकी त्या विचारांकडे त्रयस्थ दृष्टीने पहायचे वगैरे हे शब्दभ्रम आहेत.

शब्दभ्रम अजिबात नाही. उदाहरणार्थ माझ्या अस्तीत्वाकडे याक्षणी आपण तटस्थतेनेच पहात आहात. बघा मे इथे म्हटलं मला लागलय तर आपल्याला फरक पडत नाही, त्यावर काय प्रतीक्रिया द्यायची वा ती द्यायची की नाही याचे संपूर्ण स्वातंत्र्य तूम्हाला आहे, म्हणूनच माझ्याबाबतीत तूम्ही तटस्थ आहात. पण हेच जर तूमच्या समोर असताना मला लागल तर त्याची स्वाभावीक प्रतीक्रीया तूम्ही द्याल , म्हणजे तूमचे मनंच तूम्हाला ती देइल यालाच तटस्थता नसणे समजा. अशी तटस्थता स्वानूभव वा स्वतःच्या सर्व विचारांप्रती राखता आली पाहीजे, म्हणूनच तटस्थते मधे आपल्यावर कोणतेही बंधन नाही म्हणूनच जर ती विचाराबाबत साधली मनामधे रूजली तर मनापासून निर्माण होणार्‍या सर्व भोगांकडे आपले सहज दूर्लक्ष होएल... मग तो राग, लोभ असो वा काळाचे भान अथवा ह्या संपूर्ण विश्वाची जाणीव ... असो....

विचारांकडे दूर्लक्ष ही एक सवय आहे, ते पाहीजे तसे येऊद्यात, हो फक्त त्यावर पून्हा प्रतीक्रीया देणे टाळायचा प्रयत्न करा, ज्याला कर्म कर पण फळची अपेक्शा धरू नको म्हण्तात ते म्हणजे हेच की ? उगीच का त्याला कर्मयोग म्हटलयं ? ध्यान असो वा कर्मयोग यात फरक नाहीच... फक्त जेव्हां ध्यान आपण प्रयत्न पूर्वक करतो तेव्हां कर्मयोग जास्त अचूकतेने साधला जातो वा जेव्हां आपण संपूर्ण कर्मयोग आचरतो तेव्हां ध्यान आपोआप जमून गेलेले असते कारण इथे फक्त मनापासून स्वतःला वेगळे करणे हेच साध्य मानलं गेलं आहे. जसं माझा हात म्हणजे मी न्हवे, माझा पाय म्हणजे मी न्हवे, तसच हे केवळ मन म्हणजेसूध्दा मी न्हवे.... सातत्याने आपल्याला विविध अनूभवात गूंतवणार्‍या मनाचे आपल्यापासूनचे अस्तीत्व वेगळे करा .. बसं.

हे म्हणजे आपण गाढ झोपेत आहोत असे तोंडाने सांगण्यापैकी आहे.

आधीही एकदा म्हटलो होतो... दोन झोपलेल्या व्यक्तींकडे बघून कोण स्वप्न बघत आहे आणी कोण झोपेत आहे हा फरक कळेल काय ? ज्ञान मीळणे पण असच आहे. लौकीकार्थाने तूमचे कर्म चालू राहून आतून साधना चालू ठेवू शकतो. विचारांकडे स्तब्धतेने पाहू शकतो... नाही याबाबत तोंडाने काही कोणाला सांगयला जायचे नाही ... तोंडाने सांगायला गेलात तर झोप मोडेलेली असेल.... तेव्हां काहीही सांगायचे नाही.. फक्त अनूभवायचे.

अहो तुमच्या कशाकडेही मी त्रयस्थपणे पाहू शकतो,.... नव्हे त्रयस्थपणे पाहणेच स्वाभाविक आहे.

इथे माझ्याच मनात ऑलरेडी आलेल्या माझ्याच विचारांना त्रयस्थपणे पाहण्याविषयी मी म्हणतोय की अशी कन्सेप्ट निव्वळ शाब्दिक आणि काल्पनिक आहे.

धमाल मुलगा's picture

12 Jul 2011 - 2:49 pm | धमाल मुलगा

Looing into it as a third person's perspective असं म्हणलं तर ती कन्सेप्ट काल्पनिक न राहता व्यावहारिक होईल का?

-(शंकाग्रस्त) धम्या.

धमु,

ते विचार आपल्या मनात ऑलरेडी आलेले आहेत. आपण त्यांच्या थ्रू जातोय आणि अशावेळी त्यांना जणूकाही तिसर्‍याच्या नजरेतून पहात आहोत असे म्हणणे म्हणजे शाब्दिक करामत नाही का?

म्हणजे तू रस्त्याने चालतो आहेस, स्वतःच्या पायांनी. समोरून गाडी आली तर उडी मारुन चुकवतोयस. खड्डे टाळतोयस.. अशा वेळी तू स्वतः चालत नाहीयेस, जणू दुसराच कोणी चालतोय असं म्हणून चाल किंवा किंवा दुसराच कोणीतरी चाललाय असं समजून बघ असं तुला सांगितलं तर तू काय म्हणशील?

"काय फरक पडतो माझ्या चालण्यात असं समजल्याने?"

हेच म्हणशील ना?

हां त्याच वेळी रस्त्याने चाललेल्या खरोखरीच्या दुसर्‍या कोणाच्या चालण्याकडे (फार आकर्षक नसल्यास) त्रयस्थपणे बघू शकशील..

क्या बोल्ता?

धमाल मुलगा's picture

12 Jul 2011 - 3:10 pm | धमाल मुलगा

इतर बाबींची जाणिव नसताना नक्कीच १०१% हेच बरोबर आहे.
पण जेव्हा ध्यानधारणेतल्या काही गोष्टींशी हळूहळू ओळख होऊ लागते तेव्हा मात्र स्थिती-वस्तुस्थिती काही वेगळीच असते असं ऐकून आहे बा.

असाच काहीसा प्रकार स्वसंमोहनातही असतो म्हणे. स्वसंमोहन करण्यातून असे काहीसे प्रकार जे तुम्ही म्हणताय, ते करतात असं दिसतंय.

>हां त्याच वेळी रस्त्याने चाललेल्या खरोखरीच्या दुसर्‍या कोणाच्या चालण्याकडे (फार आकर्षक नसल्यास) त्रयस्थपणे बघू शकशील.
खी खी खी....हे बरीक खरें हों!
-(डोमकावळा) धम्या. ;)

गवि's picture

12 Jul 2011 - 3:24 pm | गवि

इतर बाबींची जाणिव नसताना नक्कीच १०१% हेच बरोबर आहे.

इतर बाबींची (नसलेली) जाणीव कशाला करुन घ्यायची आहे?

(मनात कितीही विचार आले तरी त्याचं काही वाईट होणार नाही एवढा रिअ‍ॅश्युरन्स देण्याचं जमलं की झालं.. त्याचा प्रयत्न करावा ना.. विचार येऊन येऊनच डिसेन्सिटाईज होता येतं. त्यासाठे त्रयस्थपणे वगैरे वगैरे काही भलतं वळण नको एवढंच म्हणणं आहे. त्याउप्पर ज्यांना असं त्रयस्थ वगैरे करता येतंय त्यांनी जरुर लाभ घ्यावा. उदा. "आल इज वेल" म्हणून कोणाचं दिल उल्लू बनत असेल तर जरुर बनवावं.)

असो. हे संपणार नाही.

धमाल मुलगा's picture

12 Jul 2011 - 3:34 pm | धमाल मुलगा

>इतर बाबींची (नसलेली) जाणीव कशाला करुन घ्यायची आहे?
तीच तर खरी गम्मत आहे. पोहायला येत नसणार्‍याला कसं कळणार की पाण्यात उडी मारल्यानंतर काय गम्मत असते ते?

बाकी, 'आल इज वेल' वगैरे स्वतःला गंडवण्याच्या भानगडीबद्दल लै जोरात सहमत.

मनात कितीही विचार आले तरी त्याचं काही वाईट होणार नाही एवढा रिअ‍ॅश्युरन्स देण्याचं जमलं की झालं.. त्याचा प्रयत्न करावा ना.. विचार येऊन येऊनच डिसेन्सिटाईज होता येतं. त्यासाठे त्रयस्थपणे वगैरे वगैरे काही भलतं वळण नको एवढंच म्हणणं आहे.

अलबत. ही तर फॅक्टच आहे.
पण ध्यानाचा मुलभूत हेतूच वेगळा दिसतोय असं मला वाटतंय इतकंच.

>असो. हे संपणार नाही.
;)
तुम्ही आसारी धरताय का मांजा? मला दोन्हीपैकी काहीही चालेल. ;)

गवि's picture

12 Jul 2011 - 3:50 pm | गवि

तीच तर खरी गम्मत आहे. पोहायला येत नसणार्‍याला कसं कळणार की पाण्यात उडी मारल्यानंतर काय गम्मत असते ते?

पोहण्याचे उदाहरण पुढे चालवू.

पोहायला जाताना आपण गम्मत म्हणून जात असतो..किंवा व्यायाम म्हणून..किंवा काही हेतूने. मग ते ठरलं की पाणी कुठे आहे शोधणं / पोहायला येत असणं नसणं/ पोहायला शिकणं या सर्व गोष्टी रिलेव्हंट होतात.

पण सध्या चालू असलेल्या (आणि पोहण्याशी अजिबात संबंधित नसलेल्या) कृतीत काही समस्या आहे असं समजून "पोहणे" हा त्या समस्येवरचा एक उपाय म्हणून करुन पाहू, अशा धडपडीने पोहणे शिबिर जॉईन करण्यात काय अर्थ आहे..?

अशा अर्थाने अन्य गोष्टी जाणून कशाला घ्यायच्या असं वर म्हटलं आहे.

ध्यानधारणा करुन कोणाला गंमत येत असेल तर ते जरुर करावे.

पण इथे विचारांना आवर घालणे, शांतता मिळवणे, स्वसंमोहन अशापैकी अनेक अर्थांनी एक सोल्यूशन म्हणून त्याकडे पाहिले जाताना दिसले म्हणून प्रतिसाद दिला.

...

बाकी तुमच्या मांज्याच्या प्रश्नाविषयी.. काहीही धरा धमुशेठ..:) उरलेले आम्हाला द्या.

प्रतिसाद तिरपे होत जाण्याची लक्षणे दिसताहेत..

आत्मशून्य's picture

12 Jul 2011 - 4:02 pm | आत्मशून्य

@गवी:
आपण पूस्तक वाचता, चीत्रपट बघता .. हे एक प्रकारचे ध्यानच समजा (परीपूर्ण वा अचूक न्हवे पण समान क्रीया आहे) आपल्याला स्वप्नही पडत असतील ? आता ती काय तूमच्या जागृत मनाने निर्माण केलीत काय ? ते काम अंतर्मनाचे. पण तूमचं जागृत मन त्याचा अनूभव घेतच ना ? कधी कधी असही जाणवलं असेल की मी स्वप्न बघतोय... बस... नेमकं हेच ... म्हणजेच स्वतःचे विचार तटस्थपणे बघणं म्हणजे शब्दाचा खेळ न्हवे ती एक प्रत्यक्ष घडणारी क्रीया आहे. बस फक्त सहजता व सजगता साधली पाहीजे. मनात विचार आपोआप येत आहेत पण आपण त्यापासून संपूर्ण वेगळे आहोत व ते विचार म्हणजे मी न्हवे की त्याला कारणीभूत असणारं मनाच्या क्रीयाप्रतीक्रीया म्हणजे मी न्हवे, ह्याचा असाच प्रत्यय कॉन्शीअस्ली घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ध्यान करणे होय. करणे हा शब्द थोडा विचीत्र आहे... कारण ध्यान करायच नसत तर ते आपोआप सवयीने उतरत जातं. करायला गेला की मनाच्या भ्रमांमधे अडकलात समजा, आणी म्हणूनच मनाच्या चंचलपणातून सूटका होणार नाही.. मग असल्या भ्रमात कीतीही बरं/मस्त वाटत राहो, अशा भ्रामक ध्यानाचा कंटाळा येणारच.

करणे हा शब्द थोडा विचीत्र आहे... कारण ध्यान करायच नसत तर ते आपोआप सवयीने उतरत जातं.

या तुमच्या वाक्यात सारं सार आलं.

उत्तम विचार. धन्यवाद..

नितिन थत्ते's picture

12 Jul 2011 - 3:31 pm | नितिन थत्ते

>>पण हेच जर तूमच्या समोर असताना मला लागल तर त्याची स्वाभावीक प्रतीक्रीया तूम्ही द्याल ,

समोर लागल्यावर प्रतिक्रिया न देणारी तटस्थता न आलेलीच बरी..... ;)

आत्मशून्य's picture

12 Jul 2011 - 3:40 pm | आत्मशून्य

कोणासाठी बरी ? तूमच्यासाठी की समोरच्यासाठी ?

नितिन थत्ते's picture

12 Jul 2011 - 3:48 pm | नितिन थत्ते

माझ्यासाठी. म्हणजे समोरच्याला लागले असताना त्यावर काही प्रतिक्रिया न देण्यासारखी (मदतीला धावून न जाण्यासारखी) तटस्थता (की बधीरता?) न आलेली माझ्यासाठी बरी. समोरच्यासाठीतर नक्कीच बरी.

घाबरून न जाणे/ पॅनिक न करणे याला तटस्थता म्हणायचे असेल तर ठीक आहे.

आत्मशून्य's picture

12 Jul 2011 - 4:11 pm | आत्मशून्य

बधीरता व तट्स्थता यात फरक आहे. बधीरते बाबत तूमच्याशी सहमत पण तटस्थतेच्या गवींना दीलेल्या उदाहरणात मी स्पश्ट म्हटलय की प्रतीक्रीया काय ध्यायची की ध्यायचीच नाही हे संपूर्णपणे त्यांचा हातात असतं/असेल हीच तट्स्थता होय. मी असं कधी म्हटलंच नाही की तूम्हाला प्रतिक्रीया देता येणार नाही अशी अवस्था येणे म्हणजे तटस्थता होय ? मग बधीरते बाबतच्या चर्चेची घूसड तटस्थतेमधे कशाला ? किम्बहूना तट्स्थ माणसाकडे जास्त पर्याय असतात जे तट्स्थता नश्ट झालेल्या व्यक्ती गमावून बसतो. तट्स्थता म्हणजे सजगता, बधीरता न्हवे.

मूद्दा समजूनच फाटे फोडा, अनावश्यक विशयांतर मलासूध्दा करता येइल... जसं की आताच आपलं उदाहरण हे स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात, पण न मरताच पृथ्वीसूंदर आहे चा दावा करण्यासारख वाटत नाही काय ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jul 2011 - 6:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ध्यानामुळे मन निर्विकार होऊ शकते आपण म्हणता म्हणून थोडा विश्वास ठेवतो. पण मला हे अशक्यच वाटते. अहो, झोपेतून डोळे उघडले की ही अशी विचारांची गर्दी होते की विचारु नका. असो,

विपश्यना शिबिरात दहा दिवस मौन आणि ध्यान धारणा बद्दल काही शिकविले जाते म्हणतात त्याबद्दल थेट कोणाला काही अनुभूती आहे का ? कोणी अशा शिबिरात भाग घेतला आहे काय ?

विपश्यनेबाबत जरा दुव्यावर माहिती मिळाली पण मनात विचार चालूच नाही अशी अवस्था अशा शिबिराने येऊ शकते ?

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jul 2011 - 6:26 pm | परिकथेतील राजकुमार

विपश्यना शिबिरात दहा दिवस मौन आणि ध्यान धारणा बद्दल काही शिकविले जाते म्हणतात त्याबद्दल थेट कोणाला काही अनुभूती आहे का ? कोणी अशा शिबिरात भाग घेतला आहे काय ?

महान योगी श्री. इंटरनेटस्नेही ह्यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

त्यांनी अशा एक शिबिरात सहभाग घेतला होता, परंतु तिथे त्यांना फक्त बाईकडे बघु देखील नका आणि ब्रम्हचर्य पाळा व सर्व जग हे मिथ्या आहे अशा दोनच गोष्टी शिकवल्याचे समजते.

इंटरनेटस्नेही's picture

11 Jul 2011 - 7:10 pm | इंटरनेटस्नेही

सविस्तर प्रतिसादासाठी जागा आरक्षित.

कवितानागेश's picture

11 Jul 2011 - 9:58 pm | कवितानागेश

महान योगी श्री. इंटरनेटस्नेही ह्यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
सहमत. ;)
ज्ञानकण वेचायला आलेय मी.

चुकुन दोनदा प्रकाशित झाल्यामुळे प्रकाटाआ.

सोत्रि's picture

12 Jul 2011 - 1:59 pm | सोत्रि

प्रकाटाआ, चुकुन भलत्या ठिकाणी टाकला प्रतिसाद.

इंटरनेटस्नेही's picture

12 Jul 2011 - 1:50 pm | इंटरनेटस्नेही

गतवर्षी २०१० सालच्या अंतिम चरणात आम्ही काही (म्हणजे खरंतर बर्‍याच!) वैयक्तिक तर काही व्यावसायिक कारणांमुळे नैराश्येच्या गर्तेत सापडलो होतो.. दिवसभर आणि रात्रभर ताणावग्रस्त असल्यामुळे विचार करुन झोप देखील येत नसे.. मग मनःशांती, आत्मउन्नती तर फार दूर राहीली.. आपले मिपा आणि मिपाकर हाच काय तो क्षीणलेल्या जीवाला आधार.
नेमके याच सुमारास मिपाकर लीमाउजेट यांची काय 'ध्यान' आहे! http://www.misalpav.com/node/15515 ही लेखमाला वाचनात आली.. मग ठरवले, एवीतेवी घरीच बसुन आहोत, तर नवीन वर्षाची (२०११) सुरुवात एखाद्या सकारात्मक कामाने केलेली जास्त योग्य ठरेल..
***
विपश्यना शिबीराकरता नोंदणी ही त्यांच्या संकेतस्थळाद्वारे आगाऊ करणे अपे़क्षित असते - ती तशी केली. आणि १ जानेवारी २०११ ते १२ जानेवरी २०११ असे शिबीर आळंदी नदी किनारा, पुणे जिल्हा येथे मिळाले.
नोंदणी करते समयी इगतपुरी (नाशिक), गोराई (मुंबई), असे अनेक पर्याय उपल्ब्ध होते; पण आम्ही मात्र शांत व प्रदुषण विरहीत वातावरण तसेच राहत्या घरापासुन भौगोलिकदृष्ट्या जास्तीत जास्त दूर व तरीही वेळेच्या गणितात बसणारे, म्हणुन पुणे येथील आळंदीची निवड केली.
***
ठरल्याप्रमाणे आम्ही विहित वेळेस पुण्यात दाखल झालो, येथुन पुढे आळंदीला शिबीरस्थळी जाण्याकरता मिपाकर परा व धमु यांचे मोलाचे मार्गर्शन लाभले!
***
यानंतर शिबीरात दाखल झाल्यावर आता सुरु झाली विपश्यना.. येणारे संपुर्ण दहा दिवस "संन्यास्-धर्माचे" पालन करायचे होते.. यासंबंधी सुमारे पंधरा मिनिटांची एक दृकश्राव्य चित्रफीत आम्हाला सर्वांना दाखवण्यात आली. त्यात शिबीर काळात पाळयचे नियम आणि काय करावे काय करु नये याचे मार्गदर्शन होते. विपश्यनेसंबंधी सर्वात महत्त्वाची सुचना, म्हणजे संपुर्ण मौन, म्हणजे केवळ वाचेचे नाही तर, विचारांचे देखील पाळायचे आहे.. (वाचे बरोबर विचारांचे देखील मौन पाळणे याला 'आर्य मौन' असे म्हणतात) म्हणजे शिबीर काळात कोणाशीही बोलायचे नाही, नेत्रपल्लवी, करपल्लवी किंवा लेखी संवाद साधायचा नाही.
***
सायं पाच वाजता उपर्युक्त दृकश्राव्य चित्रफीत दाखवण्या अगोदर सर्व शिबीरार्थींना आमचे सर्व शिबीराच्या दृष्टीने अनावश्यक सामान जसे की लेखनसाहित्य, पुस्तके, पैसे, अंगावरील दागिने (मौल्यवान व इतर), भ्रमणध्वनी इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले, माझ्या माहितीप्रमाणे याचा उद्देश ती विशिष्ट वस्तु बघितल्यावर आपल्या त्या वस्तुशी संबंधित आठवणी जाग्या होऊन (जसे की, आपल्याला ती वस्तु आपल्या कोणत्या प्रिय व्यक्तीने भेट दिली/ तेव्हा आपली/तिची प्रतिक्रिया काय होती इ.) आठवणी उचंबळुन इ. येऊ शकतात ज्यामुळे साहाजिकच आर्य मौनात बाधा येते. विपश्यना शिबीरात काय करावे काय करु नये याबद्दल अधिक माहिती विपश्यनेच्या अधिकृत संस्थळावर पाहता येईल.
***
यानंत सलग दहा/अकरा दिवस विपश्यनेचे शिबीर संप्पन्न झाले, यात काय झाले त्याचे दैनंदिन क्रमवार वर्णन आपल्यासमोर मांडण्यापेक्षा; मी यातुन घेतेला बोध आपल्या समोर मांडतो.
***
१. विपश्यना म्हणजे वि+पश्यना = स्वताचे सविस्तर आत्मवलोकन करा.
२. सदर आत्मवलोकन करत असताना, आपल्या लक्षात येते की, आपण या भुतकाळ आणि भविष्यकाळ या दगडांवर पाय ठेवुन जगत आहोत, भुतकाळातील आठवणी आणि भविष्यकाळातील विवंचना याबद्दल सतत विचार करत असताना आपल्या हातातुन वर्तमानकाळ कधी अलगद निसटुन जातो ते आपल्याला कळत सुद्धा नाही. त्यामुळे जीवन जगताना जर ते यशस्वीरित्या जगायचे असेल तर फक्त आपण सध्या करत असलेल्या कर्माकडे लक्ष द्यावे, भुतकाळाची आणि भविष्याची चिंता भगवंतावर सोडुन द्यावी.
३. आपण जीवन हे प्रतिमेवर जगतो, प्रतिमा म्हणजे चित्र, पण जे चित्रात असेल ते वास्त्व असेलच असे नाही, आपल्या आयुष्यातील पुर्वानुभवानुसार आपण आपल्या भोवतालच्या परिसराचे, व्यक्तींचे एक कल्पनाचित्र मनात अभे केलेले असते, कधी राग, कधी लोभ कधी द्वेश अश्या प्रकारच्या संकल्पना आपल्या मनात विविध व्यक्तींबद्दल किंवा घटनांबद्दल असतात. पण आपण याच गोष्टींकडे तटस्थपणे पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की या सर्व तात्कालिक, तात्पुरत्या स्वरुपाच्या बाबी आहेत. यातील कोणतीही गोष्ट कायम स्वरुपी राहणार नाही. त्यामुळे असेल त्या परिस्थीतीला हे चांगले हे वाईट असे 'टाचण' देण्यापेक्षा आपण त्रयस्थ नजरेने त्याकडे पाहावे आणि त्या समस्येतुन मार्ग काढावा.
४. कोणतीही बाब मग ती चांगली असो की वाईट, कायमस्वरुपी टिकुन राहत नाही. तेव्हा आपण त्यात अधिक गुंतुन न पडता आपले कर्म करावे आणि मोकळे व्हावे.
५. आपले मित्र / मैत्रीण / प्रियकर / प्रेयसी / पती / पत्नी / पालक / अपत्य / अन्य नातेवाईक हे आपल्यावर प्रेम करतात आणि आपण त्यांच्यावर प्रेम करतो असा आपला समज असतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की माणुस फक्त स्वता:वर प्रेम करतो. आणि आपल्याला दुसर्‍यांची गरज आज ना उद्या, कधीतरी लागेल या भावनेतुन सर्व नाती गोती एकत्र बांधुन ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे आपण (मानवाने) निर्माण केलेले मायाजाल आहे. वस्तुत: प्रत्येक आत्मा स्वतंत्र आहे व त्याचे कर्म देखील त्यासोबत आहे. तेव्हा आत्मउन्नती करण्यासाठी आपण स्वता:चा प्रयत्न स्वता करणे श्रेयस्कर.
***
विपश्यनेचे अनेक फायदे आहेत... त्या पैकी मला स्वताला जाणवलेला एक महत्त्वाचा फायदा म्हणजे एकाग्रता वाढते, व बाह्य स्तुतीमुळे / टीकेमुळे मन विचलित होत नाही, साहाजिकच आपली कार्यक्षमता देखील सुधारते, निर्णयक्षमता अधिक काटेकोर झाल्यामुळे आपण आपला वेळ वाया घालवणे टाळतो व आपले नेमुन दिलेले काम अधिक योग्यरित्या करु शकतो.
***
विपश्यना तसेच विपश्यना शिबीरां बद्दल अधिक माहिती: http://www.dhamma.org/ येथे पाहता येईल.

सोत्रि's picture

12 Jul 2011 - 2:00 pm | सोत्रि

>> आपले मित्र / मैत्रीण / प्रियकर / प्रेयसी / पती / पत्नी / पालक / अपत्य / अन्य नातेवाईक हे आपल्यावर प्रेम करतात आणि आपण त्यांच्यावर प्रेम करतो असा आपला समज असतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की माणुस फक्त स्वता:वर प्रेम करतो. आणि आपल्याला दुसर्‍यांची गरज आज ना उद्या, कधीतरी लागेल या भावनेतुन सर्व नाती गोती एकत्र बांधुन ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे आपण (मानवाने) निर्माण केलेले मायाजाल आहे. वस्तुत: प्रत्येक आत्मा स्वतंत्र आहे व त्याचे कर्म देखील त्यासोबत आहे. तेव्हा आत्मउन्नती करण्यासाठी आपण स्वता:चा प्रयत्न स्वता करणे श्रेयस्कर.

शब्दा-शब्दाशी सहमत. माणुस हा भयंकर आत्मकेन्द्री असतो.

- ( स्वता:वर प्रेम करणारा) सोकाजी

श्रावण मोडक's picture

12 Jul 2011 - 2:13 pm | श्रावण मोडक

आळंदीला शिबीरस्थळी जाण्याकरता मिपाकर परा व धमु यांचे मोलाचे मार्गर्शन लाभले!

बुद्धं शरणं... ;)

भुतकाळाची आणि भविष्याची चिंता भगवंतावर सोडुन द्यावी.

हा भगवंत कोण?

निर्णयक्षमता अधिक काटेकोर झाल्यामुळे आपण आपला वेळ वाया घालवणे टाळतो व आपले नेमुन दिलेले काम अधिक योग्यरित्या करु शकतो.

म्हणजे, आता इथला टीपी, खवउपा वगैरे बंद करणार की काय? ;)

स्पा's picture

12 Jul 2011 - 2:34 pm | स्पा

छान प्रतिसाद

धमाल मुलगा's picture

12 Jul 2011 - 2:46 pm | धमाल मुलगा

छान माहिती दिलीस रे इंट्या.

स्मिता.'s picture

12 Jul 2011 - 2:50 pm | स्मिता.

इंस्नेही, तुमची सविस्तर प्रतिक्रिया आवडली. आतापर्यंत विपश्यना म्हणजे तेथे १० दिवस काहिही संवाद न साधता ध्यान करत बसणे अशीच कल्पना मनात होती. (बहुतेकांनी तेवढंच सांगितल्याने असेल)

तुम्ही स्वतःचे अनुभव/बोध मांडल्यामुळे त्याबद्दल जरा वेगळी माहिती मिळाली. तरी त्यातून असं जाणवतं की विपश्यना करताना मन 'निर्विचार' होत नाही. त्याउलट, सर्व बाह्य प्रभावांपासून काही काळ दूर राहून मन स्वतःचा, स्वतः पुरता विचार करते. विचारांना एक दिशा मिळते.

श्रावण मोडक's picture

12 Jul 2011 - 3:42 pm | श्रावण मोडक

असं जाणवतं की विपश्यना करताना मन 'निर्विचार' होत नाही.

हो. तसं होत नाहीच. (ते अभिप्रेतही नाही.)

सर्व बाह्य प्रभावांपासून काही काळ दूर राहून मन स्वतःचा, स्वतः पुरता विचार करते.

हो. (पण विपश्यना इथंच थांबत नाही. त्यापुढे ती जाते.)

विचारांना एक दिशा मिळते.

हो. (हाच तो पुढचा टप्पा.)
विपश्यना हे पूर्णपणे सापेक्ष तंत्र आहे. त्यामुळं इथं कंसात जे लिहिलं आहे ते फक्त विपश्यना तंत्राविषयी त्या व्यक्तींनी केलेला दावा असे मानावे. जे लिहिलं आहे ती माझी भूमिका नव्हे.

स्मिता.'s picture

12 Jul 2011 - 4:29 pm | स्मिता.

इंस्नेही आणि तुमच्या सांगण्यावरून वाटते की विपश्यना शिबिरात गेल्यावर तिथल्या नियमांना योग्य रितीने पाळले आणि थिल्लरपणा न करता गंभीरपणे घेतल्यास मनाला अनुभूती मिळते.

माझ्या परिचयातील २-३ व्यक्ती हौशेखातर गेल्या असल्याने त्यांनी विपश्यना गंभीरपणे घेतले नसावे असे वाटते.

आमचे काही मित्र आहेत, कुठल्यातरी झाडपाल्याचा धुर घेतल्यावर त्यांना तर स्वर्गात जाऊन आल्याची अनुभुती येते असे ते म्हणतात ब्वॉ!

The Believing Brain: http://www.colbertnation.com/the-colbert-report-videos/391554/july-11-20...

आत्मशून्य's picture

12 Jul 2011 - 6:14 pm | आत्मशून्य

मारीयूआना ... ? :)

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jul 2011 - 6:23 pm | परिकथेतील राजकुमार

अर्रारा निळ्या तू आता मॅरुवानाची नशा करायला लागला का काय ?

येवढा मोठा नको रे होउ ;)

श्रावण मोडक's picture

12 Jul 2011 - 6:32 pm | श्रावण मोडक

अर्रारा निळ्या तू आता मॅरुवानाची नशा करायला लागला का काय ?

लाल रंगातील शब्दाला तीव्र आक्षेप. ;)

सर्व श्रेय गुरुजींचे आहे, आम्ही निमित्तमात्र. ;-)

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jul 2011 - 6:43 pm | परिकथेतील राजकुमार

अहो आधी तो गांजा, भांग इथपर्यंतच मर्यादित होता. गेला बाजार गोळी लावायचा, पालीचा धूर घ्यायचा, कोरॅक्स प्यायचा.

आता हे सगळे नखरे तिकडे जौन शिकलेला दिसतोय.

उत्तरोत्तर प्रगती करणे हा मानवाचा स्वभावधर्म आहे हे तुम्हाला सांगून थकलो! पण तुम्ही खिडकीतून खाली याल तर तुमच्यात काही प्रगती होईल ना! ;-) =)) (पळा भेंडी)

बाकी तुमच्या समोरच्या सौंदर्यफुफाट्यातनं नेलपॉलिश वगैरे गोष्टी मिळतात का बघा जरा! ;-)

श्रावण मोडक's picture

13 Jul 2011 - 11:45 am | श्रावण मोडक

सौंदर्यफुफाट्यातनं नेलपॉलिश वगैरे गोष्टी मिळतात का बघा जरा!

या अशा आवडी(निवडी) माहितीच नव्हत्या. स्वतःची ओळख नीट करून दिल्याबद्दल धन्यवाद... ;)

Nile's picture

13 Jul 2011 - 1:37 pm | Nile

Predators are known by their prey! ;-)

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jul 2011 - 12:50 pm | बिपिन कार्यकर्ते

निले की निलू?

म्हणजे आता खात्री करून द्यावी लागणार का?

मस्त कलंदर's picture

13 Jul 2011 - 1:41 pm | मस्त कलंदर
स्मिता.'s picture

12 Jul 2011 - 7:51 pm | स्मिता.

हे 'अनुभूती' प्रकरणच जरा विचित्र वाटतंय. म्हणूनच त्याबद्दल बरेच कुतुहल वाटते.

अवांतरः अनेकजण आपल्याला ही अशी ध्यान किंवा झाडपाल्याच्या धूरातून अनुभूती आल्याचे दाखले देतात. मला आजवर कधीही कोणतीही अनुभूती आलेली नाही. त्याबद्दल कुतुहल, उत्सुकता बरीच आहे. त्यासाठी कोणता मार्ग जास्त श्रेयस्कर आहे? ;)

नितिन थत्ते's picture

12 Jul 2011 - 8:03 pm | नितिन थत्ते

म्हणजे तुम्ही झाडपाल्याचा अनुभव घेतला नाही असं म्हणताय की अनुभव घेऊनही 'अनुभूती' आली नाही असं म्हणताय?

स्मिता.'s picture

13 Jul 2011 - 2:51 pm | स्मिता.

ध्यान किंवा झाडपाला, दोघांचाही अनुभव नसल्याने अनुभूती नाही. सुदैवाने अजून तरी कोणतीही अनुभूती घेण्याची गरज पडलेली नाही.

Nile's picture

12 Jul 2011 - 8:27 pm | Nile

त्यासाठी कोणता मार्ग जास्त श्रेयस्कर आहे?

अहो तोच, योग्य विपश्यना केंद्र! कधी आमच्या बाजूला आलात तर मारा चक्कर, 'पोहोचलेल्या' गुरुंशी गाठ घालून देऊ तुमची. त्यात तुमच्या निमित्ताने आमच्याही नशिबी चार थेंब आले तर .. हॅ हॅ हॅ..

आत्मशून्य's picture

12 Jul 2011 - 10:40 pm | आत्मशून्य

धूरातून येणार्‍या अनुभूतीबद्दल कुतुहल, उत्सुकता नैसर्गीक आहे पण ती अनूभूती फार लवकरच प्रचंड शारीरीक व मानसीक अधोगतीमधे बद्दलते एव्हंड विसरू नका म्हणजे झालं. ही अधोगती जर नियंत्रीत करता येत असेल व मजबूत पैसा गाठीला असेल काही कामधाम व जबाबदार्‍या नसतील तर धूराचा मार्ग सूखदायक समजा. पण हे ९९% लोकांबाबद घडत नाही आणी ते लोक नशेलाच अनूभूती म्हणून चीकटून राहतात व वाहवत जातात.

स्मिता.'s picture

13 Jul 2011 - 5:34 pm | स्मिता.

मला वाटणारी उत्सुकता किंवा कुतुहल हे लोकांना येणार्‍या निरनिराळ्या (किंवा किणतीतरी एकच) अनुभूतीबद्दल आहे. केवळ धूरातून येणार्‍या अनुभूतीबद्दल नक्कीच नाही. ती प्रतिक्रिया म्हणजे काहितरी गंमत करण्याचा माझा क्षीण प्रयत्न समजावा ;)

बाकी तुमची प्रतिक्रिया लाख मोलाची आहे.

ती अनूभूती फार लवकरच प्रचंड शारीरीक व मानसीक अधोगतीमधे बद्दलते.

१०१% सहमत. त्यामुळे अश्या अनुभूत्यांपासून दूरच बरे!

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jul 2011 - 3:55 pm | परिकथेतील राजकुमार

स्पष्ट प्रश्न :-

हे सर्व वाचायला - लिहायला ठिक आहे. पण प्रत्यक्ष विपशन्येनंतर तुझ्या आयुष्यात काय फरक पडला ? तुझा वागण्या / बोलण्यात काही फरक पडला का ? विपश्यने आधीचा तू आणि नंतरचा तू ह्यावर आई वडिलांचे मत काय? आधिचा आत्मविश्वास (असल्यास) आणि नंतरचा आत्मविश्वास ह्यात काही फरक वाटत आहे का ?

येथुन पुढे आळंदीला शिबीरस्थळी जाण्याकरता मिपाकर परा व धमु यांचे मोलाचे मार्गर्शन लाभले!

काय कटवलाय पर्‍याने इंट्याला!! सुमडी आहे साला एकदम!! ;-)

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jul 2011 - 4:11 pm | परिकथेतील राजकुमार

काय कटवलाय पर्‍याने इंट्याला!! सुमडी आहे साला एकदम!!

निच माणसा !
चांगला तिर्थ प्रसाद देउन मग सोडले हो त्याला.

पराभौ, नका मनावर घेऊ. आम्ही समजू शकतो.

आपले मित्र / मैत्रीण / प्रियकर / प्रेयसी / पती / पत्नी / पालक / अपत्य / अन्य नातेवाईक हे आपल्यावर प्रेम करतात आणि आपण त्यांच्यावर प्रेम करतो असा आपला समज असतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की माणुस फक्त स्वता:वर प्रेम करतो. आणि आपल्याला दुसर्‍यांची गरज आज ना उद्या, कधीतरी लागेल या भावनेतुन सर्व नाती गोती एकत्र बांधुन ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे आपण (मानवाने) निर्माण केलेले मायाजाल आहे. वस्तुत: प्रत्येक आत्मा स्वतंत्र आहे व त्याचे कर्म देखील त्यासोबत आहे. तेव्हा आत्मउन्नती करण्यासाठी आपण स्वता:चा प्रयत्न स्वता करणे श्रेयस्कर.

यासाठी मी म्हणेन एक साडेसाती अनुभवावी. फार काही नाही 'अनुभवावी'.

खरं बोललात. आपलं कोण ते अगदी नीट कळतं. नीट!!!

अप्पा जोगळेकर's picture

14 Jul 2011 - 9:23 pm | अप्पा जोगळेकर

प्रामाणिकपणे आणि कळकळीने हे सांगू इच्छितो की हे नाद सोडून द्यावेत. तुम्ही लिहिलेल्या परिच्छेदातील 'आत्मउन्नती करण्यासाठी आपण स्वता:चा प्रयत्न स्वता करणे श्रेयस्कर.' हे वाक्य पुढे कंटिन्यु करुन असे म्हणावेसे वाटते की 'त्यामुळेच काय करावे, कसे जगावे, वागावे याचे धडे घेण्यासाठी विपश्यना शिबिर वाल्यांच्या घशात पैसे घालण्याची आणि स्वतःचा मौल्यवान वेळ वाया घालवण्याची गरजच काय ? ' वयाच्या पंचविशीमध्ये(जे वय उमेदीचे, भविष्य घडवण्याचे, अडचणींशी हिरीरीने लढण्याचे वय असते ) त्या वयात ध्यान, संन्यास, विवंचना इत्यादी अनावश्यक बाबीं शिकण्यासाठी एका विपश्यना शिबिरात जावेसे वाटणे हीच मुळामध्ये अतिशय अश्लाघ्य गोष्ट आहे. नातीगोती, प्रेम, पैसे, संपत्ती हे सर्व मायाजाल आहे असे सांगत असतानाच अशा शिबिरांचे आयोजन करणारे भरमसाठ फी आकारतात ही विसंगती शिबिरार्थींच्या का लक्षात येत नाही याचे नेहमीच कोडे वाटते.

अवांतर -
आपण या भुतकाळ आणि भविष्यकाळ या दगडांवर पाय ठेवुन जगत आहोत,
संजय दत्तचा एक भयानक पांचट ड्वायलाक या निमिताने आठवला.

मितभाषी's picture

16 Jul 2011 - 12:40 pm | मितभाषी

'त्यामुळेच काय करावे, कसे जगावे, वागावे याचे धडे घेण्यासाठी विपश्यना शिबिर वाल्यांच्या घशात पैसे घालण्याची आणि स्वतःचा मौल्यवान वेळ वाया घालवण्याची गरजच काय ? '

अशा शिबिरांचे आयोजन करणारे भरमसाठ फी आकारतात ही विसंगती शिबिरार्थींच्या का लक्षात येत नाही याचे नेहमीच कोडे वाटते.

श्री जोगळेकर विपश्यनेची कुठलीही फी नाही.

Nile's picture

16 Jul 2011 - 12:46 pm | Nile

जेवण मिळतं का हो तिथे चांगलं?

अजातशत्रु's picture

16 Jul 2011 - 4:45 pm | अजातशत्रु

ध्यान, संन्यास, विवंचना इत्यादी अनावश्यक बाबीं शिकण्यासाठी एका विपश्यना शिबिरात जावेसे वाटणे हीच मुळामध्ये अतिशय अश्लाघ्य गोष्ट आहे

.

अश्लाघ्य या शब्दावर तिव्र आक्षेप आहे,
तुम्हाला विपश्यनेतला वि ही ठाऊक नाही,
आणि वाट्टेल ते बरळताय...अगोदर नीट माहिती घ्या मग हवे ते बरळा.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

हि तुम्हाला आलेली खरड >अप्पा तुमची कलकल पटली आहे. मात्र, विपश्यना शिबीर हे संपूर्ण पणे मोफत असते, तिथे संपूर्ण दहा दिवस राहण्याचे, जेवण्याचे कोणतेही पैसे आकारले जात नाहीत. तेव्हा आपण प्रतिसाद संपादित करावा ही नम्र विनंती.
http://www.dhamma.org/

वरील विनंती नाकारुन स्वतःला काय सिध्द करण्याचा प्रयत्न आहे?

अवांतर- तुमच्या वागण्याची एव्हाना सवय झाली आहे पण नवीन वाचणार्‍या लोकांचा गैरसमज नको म्हणून.

Nile's picture

16 Jul 2011 - 4:50 pm | Nile

जेवण्याचे कोणतेही पैसे आकारले जात नाहीत.

ह्ये बेस झालं बघा! बाकी पोट भर जेवल्यावर पेंग आली तर चालते का हो तुमच्या केंद्रात? आणि आलीच तर गाद्या वगैरे असतात का लवंडायला? एसी असेलच म्हणून विचारत नाही.

असलं काही लहानपणी सापडलं असतं तर शाळेच्या कचाट्यातून सूटका झाली असती राव!

इंटरनेटस्नेही's picture

16 Jul 2011 - 5:09 pm | इंटरनेटस्नेही

+१ अजातशतत्रु,

सदर खरड मीच अप्पांना टाकली होती. पण बहुदा त्यांनी आमची विनंती अव्हेरली असावी.

इंटरनेटस्नेहीThu, 14/07/2011 - 21:53
अप्पा तुमची कलकल पटली आहे. मात्र, विपश्यना शिबीर हे संपूर्ण पणे मोफत असते, तिथे संपूर्ण दहा दिवस राहण्याचे, जेवण्याचे कोणतेही पैसे आकारले जात नाहीत. तेव्हा आपण प्रतिसाद संपादित करावा ही नम्र विनंती.
http://www.dhamma.org/

जाऊंदे लीव्ह ईट.. मे गॉड ब्लेस हिम.

अजातशत्रु's picture

16 Jul 2011 - 5:35 pm | अजातशत्रु

मी तुमच्या नावाचा वेगळा उल्लेख केला नाही, कारण जोगळेकरना माहीती होते ते,

असो..
.
.
.
.
.
.
.
.
.
तुमचा अनुभव आवडला, इथे दिल्या बद्दल धन्यवाद.

पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घ्या!