स्वसंपादन आणि वाचनखूणांची सोय देण्यात येत आहे.

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
28 Feb 2011 - 6:48 am

नमस्कार,
आज पासून मिपाकरांना आपण लिहीलेल्या लेखात बदल करण्याची म्हणजेच स्वसंपादनाची सोय देण्यात येत आहे. मात्र ही सोय त्यांनी काही तांत्रीक सुधारणा करण्यासाठीच वापरावी ही विनंती आहे. आपल्या लेखाचा आशय बदलावा असे बदल करू नये. त्यामुळे मूळ लेखाच्या आधारे खाली झालेल्या चर्चांतील प्रतिक्रिया अवाजवी ठरतील व अन्य सदस्यांचा हिरमोड होईल. त्यामुळे स्वसंपादन ही सोय अत्यंत जवाबदारीने वापरावी. तसेच असा आशय बदलण्याचा प्रकार घडल्यास तो लेख मूळ स्वरूपात परत प्रकाशित करण्याचा अधिकार व शक्यता मिसळपाव.कॉम राखून ठेवत आहे.
सोबतच आपले आवडलेले लेख वाचनखूण म्हणून साठवून ठेवण्याची सोय सुध्दा देण्यात येत आहे. या द्वारे आपण आपल्याला आवडलेल्या लेखाची खास आपली अशी सूची बनवून ठेवू शकता. यासाठी अधीक माहिती येथे बघा.
जूण्या सदस्यांच्या पुर्वीच्या वाचणखूणा परत देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही त्यासाठी दिलगीर आहोत.

- मिसळपाव व्यवस्थापन.

प्रतिक्रिया

सहज's picture

28 Feb 2011 - 6:53 am | सहज

धन्यवाद नीलकांत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2011 - 7:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वसंपादनाची सोय दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार......!

अवांतर : वरील सोयी देतांना लेखनाच्या खाली प्रतिसाद देण्याची सोय काढून टाकली की काय ? ;)
[ह.घे]
-दिलीप बिरुटे

चित्रा's picture

28 Feb 2011 - 7:54 am | चित्रा

वाचनखुणा दिल्या हे उत्तम झाले. स्वसंपादनाच्या सोयीबद्दल माझे पूर्वीचे मत असे होते की काही सदस्यांनी या सोयीचा चुकीच्या पद्धतीने (मुद्दाम असे नाही) वापर केला आणि त्यामुळे अधिक गोंधळ झाले होते. आता ही सोय दिली आहे तर संपादकांचे काम कमी झाले म्हणून एकीकडे आनंद वाटतो, पण दुसरीकडे पूर्वीचे गोंधळ परत सुरू होतील अशी भिती वाटते. यामुळे सदस्यांनी स्वसंपादनाच्या सोयीचा उपयोग हा चुकांच्या दुरूस्तीसाठी करावा. वाक्यरचना, आशय यात बदल शक्यतो होऊ नयेत एवढी काळजी घ्यावी, आणि लेख पूर्णपणे काढून टाकणे असले प्रकारही करू नयेत असे आवाहन करते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2011 - 8:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वसंपादनाच्या सोयीचा उपयोग हा चुकांच्या दुरूस्तीसाठी करावा. वाक्यरचना, आशय यात बदल शक्यतो होऊ नयेत एवढी काळजी घ्यावी, आणि लेख पूर्णपणे काढून टाकणे असले प्रकारही करू नयेत असे आवाहन करते.

सहमत आहे.

मराठी संस्थळाचे स्वरुप खासगी असल्यामुळे सदस्यांना काय सोयी द्यायच्या हे संपूर्णपणे संस्थळाच्या मालकाच्या हातात असते. सदस्यांमुळे संस्थळ असते असे समजणारे व्यवस्थापन सदस्यांच्या सोयीसाठी अधिक जागृक असते आणि ते मिपाच्या व्यवस्थापनात दिसते. सदस्यांना जेव्हा अधिक सोयी दिल्या जातात तेव्हा सोयींचा योग्य वापर अधिक जवाबदारीने करणे ही जवाबदारी सदस्यांचीच असते. लेख संपादनाची सोय दिल्यामुळे सदस्यांना आपापल्या लेखनात बदल करता येतील. फक्त लेखन काढून टाकणे हाच मोठा धोका यात असतो. सदस्य जेव्हा या सोयीचा गैरफायदा घेतात जसे लेखन काढून टाकणे त्यामुळे आपापल्या कामातून अतिशय अभ्यासू- वाचनीय प्रतिसाद टाकलेले असतात ते सर्व प्रतिसाद मिटले जातात. असो, हा दोष सोडला तर संपादनाची सोय दिल्याबद्दल आणि सदस्यांच्या मागणीची नोंद घेतल्याबद्दल व्यवस्थापनाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. व्यवस्थापनाचे अभिनंदन...!!!

-दिलीप बिरुटे

अवलिया's picture

28 Feb 2011 - 8:11 am | अवलिया

वा ! वा ! वा !!

हे उत्तम झाले.

चला आता स्वसंपादन नाही असे म्हणून जे लेख लिहित नव्हते ते किती लिहितात आणि कसे लिहितात ते बघु या ! ;)

नीधप's picture

1 Mar 2011 - 9:53 am | नीधप

नक्की लिहिणार. लवकरच. :)

राजेश घासकडवी's picture

28 Feb 2011 - 8:35 am | राजेश घासकडवी

स्वसंपादन व वाचनखुणा या दोन्हीही सुविधा मिपाकरांचा मिसळपाववरचा वावर अधिक समृद्ध करतील अशी खात्री आहे.

Nile's picture

28 Feb 2011 - 8:45 am | Nile

संपुर्ण सहमत.

विंजिनेर's picture

28 Feb 2011 - 9:49 am | विंजिनेर

ढुमढुम ढुमाऽक
अगदी असेच म्हणतो.
स्वगत - आता तरी दवंडी पिटायला खिन्न सत्ताधार्‍यांची हरकत नसावी ;)

नीलकांत, स्वसंपादनाची आणि वाचनखुणेची सोय पुन्हा एकदा उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

नेत्रेश's picture

1 Mar 2011 - 7:35 am | नेत्रेश

असेच म्हणतो.

पिवळा डांबिस's picture

1 Mar 2011 - 9:43 am | पिवळा डांबिस

नीलकांत, स्वसंपादनाची आणि वाचनखुणेची सोय पुन्हा एकदा उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
सूज्ञ धोरणात्मक निर्णय!

छोटा डॉन's picture

28 Feb 2011 - 10:02 am | छोटा डॉन

हुश्श्श्श्श्श्श्श्श्श ऽऽऽ

धन्यवाद नीलकांत, सदस्यांना दिलेली ही सुविधा त्यांना नक्कीच उपयोगी पडेल व सदस्य त्याचा वापर पुर्ण जबाबदारीने करतील अशी अपेक्षा ठेवतो.
आभार ...

-छोटा डॉन

चिंतातुर जंतू's picture

28 Feb 2011 - 11:09 am | चिंतातुर जंतू

स्व-संपादनाची सोय पुन्हा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्रिवार आभार. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या खंद्या पुरस्कर्त्यांना प्रस्तुत संकेतस्थळाविषयी आता अधिक आदर वाटू लागेल अशी आशा आहे.

नमस्कार निलकांत,

माझ्या लेखात एक लिंक चुकीची पडली होती, हि सुविधा सुरु झाल्याने मला ती लगेच दुरुस्त करता आली, या सुविधेसाठी अतिशय धन्यवाद.

हर्षद.

नितिन थत्ते's picture

28 Feb 2011 - 11:37 am | नितिन थत्ते

धन्यवाद.
धन्यवाद.
धन्यवाद.

गणपा's picture

28 Feb 2011 - 1:19 pm | गणपा

अत्यंत आभारी आहे मित्रा. :)
या सोईचा माझ्याकडुन दुरुपयोग केला जाणार नाही याची खात्रीच देतो.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Feb 2011 - 1:44 pm | परिकथेतील राजकुमार

वा वा उत्तम !

आता स्वसंपादनाची सोय नव्हती म्हणुन गळे काढणार्‍या साहित्य सुर्यांचा आणि चांदण्यांचा किती लेखन प्रकाश पडतो ते बघु.

नितिन थत्ते's picture

28 Feb 2011 - 9:43 pm | नितिन थत्ते

साहित्यसूर्यांना बहुधा स्वसंपादन करायची गरज पडत नसावी.

ती गरज आमच्यासारख्या क्षुद्रांनाच वाटत असावी.

सोय दिली हे उत्तमच.

पूर्वी अशा विषयावरच्या चर्चेत, अशी सोय असावी हे म्हणणंही पटायचं आणि नसावी हे ही.

आय मीन, संपादकांशी सोय करुन अद्ययावत करुन घेण्याचा काहीसा लांबचा मार्ग हा उगीच वारंवार मजकूर बदलण्याच्या मधे एक डिसइन्सेंटिव्ह म्हणून बरा होता.

आता जबाबदारीने अपडेट्स करणं फार महत्त्वाचं आहे. यासाठी एक दोन उपाय मनात आले.

१) प्रत्येक अपडेट केलेल्या लेखाला "अद्ययावत" असे लेबल येत असेल तर चांगले म्हणजे वारंवार बदल होत आहेत हे तरी वाचकांना कळेल. हे बहुधा ऑलरेडी असेलच.

२) वाचकांनी प्रतिक्रिया देताना मूळ मजकुरातला संदर्भ नेहमी उचलून चोप्य पस्ते / हायलाईट करावा आणि मगच आपली प्रतिक्रिया द्यावी. म्हणजे जरी मूळ लेखातून ते वाक्य गायब झाले तरी संदर्भ लागेल. (याचा उलट दुरुपयोग मूळ लेखात नसलेली वाक्ये प्रतिक्रियेत हायलाईट करुन कोणी करु नये म्हणजे झाले.. !! :) )

हे काही फूलप्रूफ नव्हे पण एवढे केले तरी सर्वांना सोयीचे होईल.

पण एकंदरीत अधिक स्वायत्ततेबद्दल आभार..

स्वसंपादन आणि वाचनखूण साठवणे ह्या सुविधा दिल्याबद्दल आभारी आहे.
वाचनखुणा साठविण्याची सोय झाल्याने आता माझ्या फालतू कॉमेंट्स कमी होतील, अशी आशा आहे.

-सूर्यपुत्र.

शाहरुख's picture

28 Feb 2011 - 9:51 pm | शाहरुख

सोय पाहिजे असणार्‍या सगळ्यांचे अभिनंदन !

(प्रकाशित लिखाण संपादन करता येणं म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्य कसे हे न समजलेला) शाहरुख

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Feb 2011 - 10:25 pm | निनाद मुक्काम प...

स्वसंपादन आणि वाचनखूण साठवणे ह्या सुविधा दिल्याबद्दल आभारी आहे.
संपादकांनी पुरवलेल्या नव्या सुविधा व त्या वापरण्याचा सल्ला किंबहुना त्या सुविधा वापरण्यामागील भूमिका ह्याबद्दल योग्य मार्गदर्शन केले आहे .
मूळ लेखात नवीन माहिती (मूळ विषयाला पूरक) टाकता येत असल्याने मूळ लेखकाच्या मालकास वेगळी प्रतिक्रिया द्यावी लागणार नाही .
पण माझ्या मागे मागे लेखातील तांत्रिक दोषामुळे आता मिपावरील शामा माझ्या हात धुवून पाठी लागेल .
सोबतीला अंकाची प्रतिक्रिया द्यायला त्यांचे ....
बाकी शुद्ध लेखन नसेल तर माणसाने मुळात लिहू नये .
कारण शुद्ध लेखनाने मानंसाच्या लिखाणातील शुध्द विचार प्रदर्शित होतात .त्याचा कृपाभिषेक शुध्द माणसांवर पडतो .नि त्यांची गात्रे शुध्द होतात .
सिंधू ताई ह्यांनी सुरेश भटांच्या गझला म्हटल्या कि हे म्हणणार '' त्या शुध्द लिहिता येतात का ?

>>(प्रकाशित लिखाण संपादन करता येणं म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्य कसे हे न समजलेला) शाहरुख

'संपादन' ऐवजी 'संपादित' लिहायला हवे होते..निनाद सायबांचे बुच बसल्याने आता बदलता येत नाहीय..पण याला अभिव्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी वगैरे न म्हणता प्रतिसाद देताना झालेला आमचा हलगर्जीपणा असे आम्ही मानतो :)

प्रतिसादाला उप-प्रतिसाद मिळाला तरी संपादन करायला मिळाले पाहिजे आता !

वारकरि रशियात's picture

4 Mar 2011 - 3:54 pm | वारकरि रशियात

>>आपले आवडलेले लेख वाचनखूण म्हणून साठवून ठेवण्याची सोय सुध्दा देण्यात येत आहे.

आभार आणि धन्यवाद !
दोन प्रश्नः
१) यापुर्वीच्या वाचनखुणा परत मिळविता येतील का ?
२) ही सोय होण्याआधीच्या धाग्यांवर 'वाचणखूण साठवा' हा पर्याय दिसत नाहीय ! (मला की तशी सोय नाहीय?)

चिंतामणी's picture

9 Jan 2013 - 11:47 pm | चिंतामणी

अजुन उपलब्ध नाहीत.

मागच्य वाचनखुणा गायब आहेत.

प्रियाकूल's picture

10 Jan 2013 - 3:19 pm | प्रियाकूल

नवीन मंडळींना काही जुने लेख वाचायचे असतात पण ते दिसतच नाहीत बरेचदा. आणि कृपया पाककृती चा विभाग थोडासा अद्ययावत करावा कारण इतक्या पाकृ मधून आपल्याला हवी असलेली पाकृ शोधणे शक्य होत नाही. आणि सापडलीच एखादी पाकृ तरी ती बरेचदा दिसतच नाही.

स्वंयसंपादनाची सोय का काढली गेली .

उद्दाम's picture

4 Jan 2014 - 12:38 pm | उद्दाम

छान