मृत्यूपत्राविषयक माहिती

यशोधरा's picture
यशोधरा in काथ्याकूट
29 Dec 2010 - 4:50 pm
गाभा: 

मला मृत्यूपत्राविषयक माहिती हवी आहे. सद्ध्याच काही वेब साईटस वर वा काही जणांशी बोलून मी जी माहिती गोळा केली ती परस्पर विरोधी वाटली.

कोणाला खालील पैकी माहिती असल्यास इथे लिहाल का?
१. मृत्यूपत्र रजिस्टर करावेच लागते का?
२. मृत्यूपत्र रजिस्टर न केल्यास, ते व्हॅलिड धरले जात नाही का?
३. मृत्यूपत्र हे लीगल डॉक्यूमेंट असल्याने ते स्टॅम्प पेपर वर करुन नोटराईज वगैरे करावे लागते का? की साध्या पेपरवर केले तरी चालते?

अजून काही ह्या विषयासंबंधी काही माहिती कोणाला असल्यास ती इथे लिहिण्याची विनंती. धन्यवाद.

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

29 Dec 2010 - 4:54 pm | मृत्युन्जय

मला वाटले गविंचा अजुन एक धागा आला की काय?

स्वतःच्या विचारसरणीनुसार जे काही वाटायचे ते वाटते मृत्युन्जय. असो. इथे कृपया आपल्याला ज्या विषयाबाबत विचारले आहे, त्याबद्दल माहिती नसल्यास कारण नसताना फालतू पोस्ट्स टाकू नये अशी विनंती.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2010 - 5:05 pm | परिकथेतील राजकुमार

स्वतःच्या विचारसरणीनुसार जे काही वाटायचे ते वाटते मृत्युन्जय. असो. इथे कृपया आपल्याला ज्या विषयाबाबत विचारले आहे, त्याबद्दल माहिती नसल्यास कारण नसताना फालतू पोस्ट्स टाकू नये अशी विनंती.

यशोधराबुध, 29/12/2010 - 17:02
http://www.misalpav.com/node/16076#comment-273004 मृत्यूपत्राविषयक धाग्यावर आपल्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार. आपणासही मृत्युन्जय ह्यांना दिलेले उत्तर लागू आहे, म्हणून लिंकवत आहे.

पुन्हा एकदा आभार.

पुढच्यावेळी धाग्यावर कोणी प्रतिक्रीया द्याव्यात आणि कोणी नकोत असा स्पष्ट उल्लेख करावा, म्हणजे तुमचा आणि आमचा दोघांचा वेळ फुकट जाणार नाही.

अनेक आभार.

यशोधरा's picture

29 Dec 2010 - 5:24 pm | यशोधरा

इथे कृपया आपल्याला ज्या विषयाबाबत विचारले आहे, त्याबद्दल माहिती नसल्यास कारण नसताना फालतू पोस्ट्स टाकू नये

हे शुद्ध मराठीतच आहे परा. आणि हे सगळ्यांनाच लागू आहे. त्यात आपणही आलात.

प्रेषक परिकथेतील राजकुमार दि. बुध, 29/12/2010 - 16:57.
मला वाटले विडंबन आले.

ह्या प्रतिसादाचे काहीही प्रयोजन नव्हते. असो.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2010 - 5:30 pm | परिकथेतील राजकुमार

शुद्ध मराठीतच आहे परा. आणि हे सगळ्यांनाच लागू आहे. त्यात आपणही आलात.

मला खरच तसे वाटले त्याला मी काय करु ? :( जस्ट तो प्रॉव्हिडंट फंड वाला धागा वाचुन आलो होतो =))

असो..

मृत्युन्जय's picture

29 Dec 2010 - 5:51 pm | मृत्युन्जय

फालतु धागे टाकलेले चालतात तर फालतु पोस्टस का नकोत?

मी आजवर टाकलेला फालतू धागा दाखवावा.

मृत्युन्जय's picture

29 Dec 2010 - 5:56 pm | मृत्युन्जय

मी तुमच्याबद्दल बोललो?

मृत्युन्जय, तुम्हाला शेवटचे उत्तर देत आहे. मी तुम्हांला इतर धाग्यांवर काय प्रतिक्रिया द्याव्यात हे सांगितलेले नाही. कोणते धागे काढावेत - इतरांनी वा तुम्ही - हे ही सांगितलेले नाही. फक्त ह्या धाग्यासंबंधी सांगितलेले आहे. तेह्वा इतर धाग्यांविषयी/ प्रतिसादांविषयी ह्या धाग्यावर बोलायची गरज नाही. धन्यवाद.

मृत्युन्जय's picture

29 Dec 2010 - 6:30 pm | मृत्युन्जय

माझ्या मते तुम्ही या धाग्याबद्दलही मी काय प्रतिक्रिया द्याव्यात हे न बोललात तर उत्तम. तुम्हीच उगाच त्रागा करुन घेत आहात. मी अशी कुठलीही गोष्ट केलेली नाही की ज्याच्या निषेधार्थ ४ प्रतिक्रिया खर्च कराव्यात.

कुठला धागा आणि कुठली प्रतिक्रिया फालतु आहे याबद्दल सविस्तर विवेचन आपणही मला करायला लावु नये ही विनंती.

गवि's picture

29 Dec 2010 - 4:58 pm | गवि

व्याडेश्वरा रे...!!!!

धाग्याच्या नावावरूनच ??

आता मी गगनविहारी ऐवजी किरवंत असा आय डी घेतो.. :)

यकु's picture

29 Dec 2010 - 5:17 pm | यकु

किरवंत ????

=) ) =) ) =) ) =) )

=) ) =) ) =) )

=) ) =) )

=) )

यशवंत एकनाथ (एलेल्बी) यांनी मूळ प्रश्नाला उत्तर देऊ नये याचा निषेध.

यशो जी. हा पहा वकील आला.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

29 Dec 2010 - 4:56 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

मृत्युपत्र कधी आणि कोणत्या वयात करता येतं?

प्रश्न :मृत्युपत्र कधी ?
उत्तर : ज्या व्यक्तीचं मृत्युपत्र करायचय तिच्या मृत्युपुर्वी.

प्रश्न : कोणत्या वयात करता येतं?
उत्तर : वयाच बंधन नसावं बहुतेक. कायद्याने सजाण (१८ वर्षे पुर्ण) असलेल्या कुठल्याही व्यक्तीस ते करता येत.

मला या विष्यावर अधीक माहीती नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2010 - 4:57 pm | परिकथेतील राजकुमार

मला वाटले विडंबन आले.

मी सांगतो

१. मृत्यूपत्र रजिस्टर करावेच लागते का?

नाही

२. मृत्यूपत्र रजिस्टर न केल्यास, ते व्हॅलिड धरले जात नाही का?

नाही

३. मृत्यूपत्र हे लीगल डॉक्यूमेंट असल्याने ते स्टॅम्प पेपर वर करुन नोटराईज वगैरे करावे लागते का? की साध्या पेपरवर केले तरी चालते?

कोणत्याही साध्या कागदावर केले तरी चालते. कोणत्याही वयात केले तरी चालते. सही आवश्यक.

बाकी मृत्युपत्रात आपण आपल्या स्वकष्टार्जित मालमत्तेचेच वातप करु शकतो इ इ आपल्याला माहीत असेलच असे गृहीत धरतो.

मायनर वारसांच्या केसमधे ज्याच्याकडे मृत्युपत्र एक्झेक्यूशनला द्यायचे तो वारस मेजर होईपर्यंत फक्त ट्रस्टी राहू शकतो. तो बेनिफिशियरी असू शकत नाही.

यशोधरा's picture

29 Dec 2010 - 5:06 pm | यशोधरा

खूप आभार गगनविहारी.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

29 Dec 2010 - 5:08 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

__/\__

सुहास..'s picture

30 Dec 2010 - 12:00 am | सुहास..

३. मृत्यूपत्र हे लीगल डॉक्यूमेंट असल्याने ते स्टॅम्प पेपर वर करुन नोटराईज वगैरे करावे लागते का? की साध्या पेपरवर केले तरी चालते?

कोणत्याही साध्या कागदावर केले तरी चालते. कोणत्याही वयात केले तरी चालते. सही आवश्यक.

क्षमस्व ! थोडीशी सुधारणा

कोणत्याही साध्या(रिकाम्या, दोन्ही बाजुने ) कागदावर केले तरी चालते. कोणत्याही वयात केले तरी चालते(मान्य) ,सही आवश्यक (तिच सही जी आधी कुठल्याही लिगल कागद पत्रावर केलेली असावी , बेटर ऑप्शन अंगठा !! )

अवांतर : जर काही कारणास्तव प्रकरण कोर्टात गेले तर विरुध्द बाजुच्या वकीलाशी तडजोड करण्याची तयारी , अति आवश्यक मुद्दा !!

भाऊ पाटील's picture

31 Dec 2010 - 1:20 pm | भाऊ पाटील

>>कोणत्याही साध्या कागदावर केले तरी चालते. कोणत्याही वयात केले तरी चालते. सही आवश्यक.
- ह्याबरोबरच दोन सज्ञान व्यक्ती साक्षीदार म्हणुन आवश्यक असतात. साक्षीदारांना मृत्यूपत्रात कुठल्याच प्रकारचा वाटा (बेनेफिट) नसायला हवा.
(दोन सज्ञान व्यक्ती साक्षीदार- ह्यातील एक डॉक्टर आणी दुसरा वकील असल्यास अतिउत्तम. अंमलबजावणीच्या भानगडी खुपच कमी होतात. :))

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2010 - 5:16 pm | परिकथेतील राजकुमार

सद्ध्याच माझे वडिल गेले, त्यासंदर्भात मी तो मृत्यूपत्राचा धागा काढलेला आहे. आता तिथे कोणत्याही आयडीने अजून काही गोंधळ घालवयाचा असला तर जरुर घालावा.

कृपया असले आरोप करण्याआधी स्वत:ची खरडवही उघडी ठेवावी आणि मग लोकांना बोलावे.

इथे माझा हा सोडून दुसरा आयडी असल्याचे सिद्ध करा मी लगेच मिपा सोडतो. आणि सिद्ध करता येत नसल्यास असले आरोप करायचे सोडून द्या.

मुळातच विषयाला न धरुन असलेले प्रतिसाद कशाला द्यावेत? तेही अशा विषयांवर? असल्या विषयाचे गांभीर्य कळत नसेल तर कठीण आहे. आणि, मला मिपावरचे डुप्लिकेट आयडी पहायची सुविधा असती तर आजवर सगळ्यांचे बुरखे फाडले असते हे नक्की.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2010 - 5:22 pm | परिकथेतील राजकुमार

आणि, मला मिपावरचे डुप्लिकेट आयडी पहायची सुविधा असती तर आजवर सगळ्यांचे बुरखे फाडले असते हे नक्की.

मग जेंव्हा सुविधा मिळेल तेंव्हा या असले आरोप करायला :) तोवर विनाकारण आमचे चारित्र्यहनन टाळा.

१. मृत्यूपत्र रजिस्टर करावेच लागते का?

नाही. मात्र स्थावर जंगम वगैरेची किंमत अधिक असल्यास रजिस्टर केलेले चांगले. याबाबत वकिलाची थोडी फी दिलेली चांगली.

२. मृत्यूपत्र रजिस्टर न केल्यास, ते व्हॅलिड धरले जात नाही का?

असे काही नाही. फक्त आवश्यक असे सर्व उल्लेख त्यात असलेले बरे.

३. मृत्यूपत्र हे लीगल डॉक्यूमेंट असल्याने ते स्टॅम्प पेपर वर करुन नोटराईज वगैरे करावे लागते का? की साध्या पेपरवर केले तरी चालते?

चालते. परंतु करण्याआधी वकिलाचा सल्ला घेऊन शब्द रचना योग्य असल्याचा निर्वाळा घेतलेला बरा म्हणजे नंतर वारसांना जास्त त्रास होत नाही.

सुरवातीच्या माहिती साठी "मृत्युपत्र कसे बनवावे" अशा अर्थाच्या शीर्षकाचे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे त्याचा लाभ घ्यावा.

अवांतर - हल्ली मिपावर प्रतिसाद देतांना मृत्युपत्र बनवुनच द्यावा की काय असे वातावरण होत चाललेले आहे. मिपाचे उपक्रम होणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस असेल.. असो.

मलाही हीच माहिती हवि होती .
धन्यवाद

यशोधरा's picture

29 Dec 2010 - 5:32 pm | यशोधरा

ज्यांनी माहिती दिली त्या सर्वांचे अनेक आभार लोकहो.

पुष्करिणी's picture

29 Dec 2010 - 6:53 pm | पुष्करिणी

यशो,
http://www.legalserviceindia.com/articles/will_hindu.htm आणि
http://www.legallight.in/wills.html

हे बघ. कदाचित काही माहिती मिळेल

मृत्युपत्र रजीस्टर करावेच लागते असे नाही. परंतू केलेले कधीही चांगले. मृत्युपत्र रजीस्टर केल्यावरही त्याला आ़क्षेप घेणारे असतात/आहेत. माझ्या आजीनेच तिच्या नावची जमीन मृत्युपत्रात माझ्या नावे केली. ते मृत्युपत्र स्टँपपेपरवर आहे, आणि दोन साक्षीदारांच्या साक्षीने रजीस्टर केलेले आहे. असे असूनही माझ्या काकाने त्यावर आक्षेप घेतला आणि आता त्या बद्दलची केस तहसील कार्यालयात मागचे ६-८ महिने सुरू आहे. तेव्हा जेवढ्या कायदेशीरपणे मृत्युपत्र करता येईल तेवढे करावे जेणेकरून आपल्या पश्चात ज्याच्या नावे मालमत्ता केली त्याला/तिला जास्तं त्रास होऊ नये.

>>मृत्युपत्र रजीस्टर करावेच लागते असे नाही. परंतू केलेले कधीही चांगले >> अनामिक, आत्ताच काही वेळापूर्वी माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता. तिने ह्या संदर्भात हल्लीच - महिनाभराची गोष्ट आहे - चौकशी केली असता, तिला वकिलांकडून सांगण्यात आले की मृत्यूपत्र हे रजिस्टर करावेच लागते व स्टँप पेपरवरच करावे लागते. अशीच उलट सुलट माहिती मिळाल्याने गोंधळ वाढतो. :(

पुष्की, धन्यवाद.

गणेशा's picture

29 Dec 2010 - 8:41 pm | गणेशा

हा ही श्यकता पण आहेच की.

अविनाशकुलकर्णी's picture

29 Dec 2010 - 7:33 pm | अविनाशकुलकर्णी

कोकिला बेन वा बिर्ला फ्यामिलीला यातले माहित असेल..त्यांचे खुप वाद चालु असतात..

त्या मुळे डेथ लेटर केले तरी वा नाहि केले तरी वाद अटळ आहेत...

सहि खोटी असेहि वाद झाले आहेत....

जिवंत असतानाच सारे उरकावे.....

अनामिक's picture

29 Dec 2010 - 7:49 pm | अनामिक

सहि खोटी असेहि वाद झाले आहेत....

असू शकते. पण मृत्युपत्र रजीस्टर करताना ते रजीस्ट्रार ऑफिसमधे जाऊन करावे लागते. त्यावेळी मृत्युपत्र करणार्‍या व्यक्तीबरोबर दोन साक्षीदारही लागतात. कायद्याने केलेल्या मृत्युपत्रामधे सही खोटी असा वाद होऊ शकत नाही.

कवितानागेश's picture

29 Dec 2010 - 7:57 pm | कवितानागेश

हल्ली बहुतेक बर्‍याच ठिकाणी मालमत्तेच्या ( स्थावर जागा, शेअर्स, डिपॉझिट्स, विमा पॉलिसी वगरै) कागदपत्रांमध्येच 'नॉमिनेशन' करतात.
व बँक अकाउंट्स्मध्ये सुद्धा नॉमिनेशन असतेच.
व बँकेचा लॉकर असल तरी त्याचेसुद्धा नॉमिनेशन असते.
एखादी गोष्ट नॉमिनेट करायची राहून गेली असेल, तरच तिथे हा प्रश्न येउ शकेल.

उपास's picture

29 Dec 2010 - 8:12 pm | उपास

लीमाउजेट,
तुम्ही म्हणतायत ते बरोबर आहे पण पुरेसे नाही. वडिलोपार्जित मालमत्ता, राहाते घर, फंड अशा कितीतरी ठिकाणी नॉमिनेशनची सोय नसते किंवा ते राहून गेलेले असू शकते. आपल्या नंतर नातेवाईंकांत भांडणे लागू नयेत शिवाय आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तींना मनस्ताप होऊ नये म्हणून ईच्छापत्र करणे आवश्यक आहे.

प्रमोद्_पुणे's picture

31 Dec 2010 - 12:18 pm | प्रमोद्_पुणे

नॉमिनेशनच्या तरतूदी प्रत्येक कायद्यात वेगळ्या आहेत. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे फक्त शेअर्सची मालकी नॉमीनीकडे जाते कारण कंपनी कायद्यात तशी तरतूद आहे. स्थावर जागा, बँक अकाउंट मधली रक्कम नॉमीनीला मिळत नाही. सदर प्रॉपर्टी त्याच्यात व्हेस्ट होत नाही. तेंव्हा वील मधे तरतूद करणे भाग आहे.

भाऊ पाटील's picture

31 Dec 2010 - 1:30 pm | भाऊ पाटील

नॉमिनेशनच्या तरतूदी प्रत्येक कायद्यात वेगळ्या आहेत. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे फक्त शेअर्सची मालकी नॉमीनीकडे जाते कारण कंपनी कायद्यात तशी तरतूद आहे.

ईतर केसेस मध्ये (स्थावर मालमत्ता, जीवन वीमा, बँक अकाउंट, फंड्स वगैरे) रक्कम नॉमीनीला मिळते, पण तो/ती अशा रकमेची मालक नसतो. नॉमीनीला अशी रक्कम कायदेशीर वारसदारांमध्ये वाटावी लागते, किंवा विल मध्ये (जर असेल तर) लिहिल्याप्रमाणे त्या रकमेची वाटणी करावी लागते.

यशोधरा ताई,
मृत्युपत्रा ऐवजी त्याला आता 'ईच्छापत्र' असं म्हणण्याचा प्रघात आहे, मृत्यु शब्दामुळे आपण हळवे होतो म्हणून.
असो, वर गगनविहारींनी सांगितले आहेच, तुम्ही फक्त तुमच्या मालकीच्या (वारसाहक्काचे किंवा वहिवाटीचे नाही) किंवा स्वकष्टार्जित मालमत्तेचेच वाटप मृत्युपत्राद्वारे करु शकता.
योग्यवेळी वकिलाचा सल्ला पुढे होणारे मनस्ताप आणि वेळेचा अपव्यय टाळू शकतो. प्रत्येक मूत्युपत्रात, आधीचे मृत्युपत्र आहे का आणि असल्यास ते रद्द समजावे, असा उल्लेख अनिवार्य ठरतो नाहीतर गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. शिवाय ह्या इच्छापत्रावर तुमच्या फॅमिली डॉक्टरची सही असेल तर उत्तमच.
माझ्या माहितीप्रमाणे, रजिस्टार ऑफीसमध्ये जाण्याची गरज नाही. नोटरी करणे पुरेसे ठरते पण इच्छापत्रातील वाक्यरचना ही वकिलाकडून तपासून घ्यायला हवी.
अधिक माहिती हवी असेल तर मुंबईमधील काही ओळखी मी देऊ शकेन.
महत्त्वाचा मुद्दा असा की जर कायदेशीर गोष्टी करायच्या असतील तर कायदा तज्ञाच्या मदतिने पूर्ण कायदेशीर रीत्या कराव्यात, इकडच्या तिकडच्यांची मते ऐकल्याने वैचारिक गोंधळ, मनस्ताप वाढतो आणि हशील तर काहीच होत नाही.

वकिलाकडून तपासून घ्यायलाच हवी.
अधिक माहिती हवी असेल तर मुंबईमधील काही ओळखी मी देऊ शकेन.
सहमत.
मीही पुण्यातला पत्ता देऊ शकीन.

यशोधरा's picture

29 Dec 2010 - 9:18 pm | यशोधरा

उपास, रेवती धन्यवाद. जरुर लागल्यास मी पत्ते घेईन तुमच्याकडून. मदतीची तयारी दाखवल्याबद्दल मनापासून आभार.

माझ्या अम्मीने तिच्या मृत्यूच्या आधी मृत्यूपत्र हे रजिस्टर केले होते अन त्या सोबत तिने डॉक्टरांचे सर्टिफिकेट ही जोडलेले होते.
अब्बूंनी त्यांच्या मृत्यूच्या आधी असे काहीही न केल्यामुळे अम्मीला फार हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. मृत्यूपत्राची एक प्रत अम्मीने वकिलांकडे कायमची देऊन ठेवली आहे. कारण तिला भिती होती मी तिच्यानंतर काहीतरी भावनेच्या भरात मुर्खपणा करुन पायावर दगड आपटून घेईन.
मला त्याचे महत्व आत्ता कुठेशी लक्षात येत आहे. It is a Huge Surprise for me.
यशो,
योग्य वकीलाकडेच जा.

यशोधरा's picture

30 Dec 2010 - 9:26 am | यशोधरा

सुहास, वाहीदा -दोघांचे आभार.
पुन्हा एकदा, इथे व व्यनिमधून माहिती देणार्‍या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. खूप मदत केलीत लोकहो.

kamalakant samant's picture

30 Dec 2010 - 12:19 pm | kamalakant samant

आपण क्रुपया खालील पुस्तक वाचावे.भरपूर माहिती उदाहरणासह आहे.
पुस्तकाचे नाव्-कसे करावे व्यवस्थापत्र/इच्छापत्र/मॄत्युपत्र
लेखक -अड्व्होकेट वि.पु.शि॑त्रे
प्रकाशक -राजह॑स
कि॑मत -रु.११०/-
बहुता॑श माहिती मिळेल.

प्रमोद्_पुणे's picture

31 Dec 2010 - 12:04 pm | प्रमोद्_पुणे

यशोधरा,

१. मृत्यूपत्र रजिस्टर करावेच लागते का?

मृत्यूपत्र रजिस्टर करावे लागत नाही. As per Section 18 (e) of the Registration Act, मृत्यूपत्र रजिस्टर करणे optional आहे. Registration does not give any special sanctity or authenticity to the will though registration of the will by the testator himself/herself may prima facie show the genuineness of the will. (C. Silva Bai v. J. Noronha Bai; Ryali Kameswara Rao V. Bendapudi Surya Prakash Rao.)

२. मृत्यूपत्र रजिस्टर न केल्यास, ते व्हॅलिड धरले जात नाही का?

धरले जाते. उत्तर एक पहा.

३. मृत्यूपत्र हे लीगल डॉक्यूमेंट असल्याने ते स्टॅम्प पेपर वर करुन नोटराईज वगैरे करावे लागते का? की साध्या पेपरवर केले तरी चालते?

स्टॅम्प करण्याची अजिबात गरज नाही.

मृत्यूपत्र काही आवश्यक बाबी:

(१) मृत्यूपत्र कोणीही सज्ञान माणूस करू शकतो. मृत्यूपत्र करणार्याला त्यात उल्लेख केलेल्या सर्व प्रॉपर्टीची वहिवाट करण्याचा अधिकार असावा.

(२) मृत्यूपत्रावर सही असावी.

(३) सही ही किमान २ माणसांनी अटेस्ट केली असावी.

(४) मृत्यूपत्र लिखित असावे (हिंदू असाल तर).

भाऊ पाटील's picture

31 Dec 2010 - 1:52 pm | भाऊ पाटील

५) मृत्यूपत्रावर तारीख, स्थळ ह्यांचा स्पष्ट उल्लेख असावा.
६) ह्याअगोदर कोणते मृत्यूपत्र केले आहे की नाही त्याचा स्पष्ट उल्लेख असावा. ( तारखेनुसार नंतरचे मृत्यूपत्र , तारखेनुसार अगोदरच्या मृत्यूपत्राला सुपरसीड करते- म्हणजे तारखेनुसार अगोदरच्या मृत्यूपत्र अवैध ठरते)
७) सर्व मालमत्तांचा उल्लेख नाव, गाव, पत्ता, तपशील यांच्यासह असावा. (उदा. फ्लॅट चे क्षेत्रफळ, पत्ता, सोसायटी; बँक अकाउंट मधली रोख रक्कम वेगळी, आणी एफ. डी चा उल्लेख वेगळा, आणी बँक लॉकर चा उल्लेख वेगळा)
८) मृत्यूपत्राच्या किती प्रती केल्या आहेत आणी त्या कुठे ठेवणार आहात त्याचा उल्लेख. (शक्यतो एक प्रत बँक लॉकर मध्ये ठेवावी, आणी एक प्रत विश्वासु मित्राकडे/वकीलाकडे-ज्याला ह्या मृत्यूपत्रात काहीच बेनेफिट मिळणार नसावा)

प्रमोद देर्देकर's picture

4 Oct 2013 - 4:39 pm | प्रमोद देर्देकर

याशोधराजी!
मी तुमचा हा धागा आताच वाचला म्हणून हि प्रतिक्रिया इतक्या उशिरा देत आहे. मी स्वत:हा माझ्या अनुदिनीवर या विषयी लिहिले आहे तेव्हा इथे टीचकी मारा . तुम्हास हवी ती माहिती मिळेल. शियाय मृत्युपत्राचा नमुना पण दिला आहे.
धन्यवाद

खटपट्या's picture

5 Oct 2013 - 12:24 am | खटपट्या

छान माहीती.. रेडीमेड म्रुत्युपत्राची लीन्क पण खूप उपयोगि आहे..

उद्दाम's picture

5 Oct 2013 - 9:03 am | उद्दाम

मृयुत्य्पत्रासोबतच, सदर व्यक्ती मेंटली साउंड आहे, असे डॉक्टरी सर्टिफिकेटही लागते. शक्यतो आपण ज्या कागदांवर मृत्युपत्र करणार त्यातल्याच कुठल्या तरी एका कागदावर मेडिकल सर्टिफिकेटही घेऊन ठेवावे.

चित्रगुप्त's picture

17 May 2017 - 5:59 pm | चित्रगुप्त

मृत्युपत्र रजिस्टर का करावे त्याबद्दल:
समजा एकादा वृद्ध एकाद्या बंगल्यात एकटा रहातो आहे, त्याची मुले परदेशात वा लांब आहेत. त्या वृद्धाने मृत्यूपत्र करून कुठेतरी ठेवलेले आहे. त्या वृद्धाचा अचानक मृत्यु झाला वा कुणी गुंडांनी प्रॉपर्टीसाठी खून केला, आणि बनावट मृत्युपत्र त्या गुंडाने स्वतःच्या नावे करून घरावर कबजा केला तर त्या वृद्धाच्या मुलांना घराचा ताबा मिळवणे जवळ जवळ अशक्य आहे. परंतु मृत्युपत्र रजिस्टर्ड असेल तर त्यातल्या त्यात सोपे पडू शकते. हे मला एका वकिलानेच सांगितले. बाकी जाणकारांनी आणखी प्रकाश टाकावा.

हेमंत लाटकर's picture

4 Sep 2017 - 1:09 pm | हेमंत लाटकर

मृत्यूपत्र का, कधी व केव्हा करावे?
http://tarunbharat.net/archives/30883

प्रकाश घाटपांडे's picture

28 May 2019 - 4:04 pm | प्रकाश घाटपांडे

म्रुत्यु हा शब्द अशुभ अस्ल्याने काहि लोक त्याला इच्छापत्र वा व्यवस्थापत्र म्हणतात