या प्रियकराला,प्रित माझी कळेना..
अधरी अडकति शब्द ..भाषा डोळ्यांची उमजेना
मास श्रावणाचा .,शशी तेवतो नभि
ते चांदणे हि शितल..पण तनुदाह सोसवेना
सुकुन गेले अधर..,कोमेजली काया.
कसा कठोर हा..मम दुःख्ख त्यास कळेना,,
आठवता छबी..विज तनुत कल्लोळे
रात्रभर ना डोळ्यास डोळा..ना पापणी मिटेना
वाटते असे..हे गुपित त्यास वदावे
हि लाज गडे मुलखाचि..पाठ माझी सोडेचना
Avinash
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1419
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रीत