मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?

Trump's picture
Trump in काथ्याकूट
29 Jun 2022 - 11:04 pm
गाभा: 

मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?

------

हा एक अद्भुत प्रयोग होता. भले तो भाजपाने शिवसेनाचा विश्वासघात केल्याने झाला असेल, काही शिवसैनिकांना श्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बघायची हौस असेल आणि त्यात बारामतीच्या काकांची भर पडली, त्यामुळे हा प्रयोग झाला असेल.

शिवसेना: (जिंकले) त्यांचा भाजपच्या नाकावर टिच्चुन मुख्यमंत्री झाला. भाजपने शिवसेनेला गृहीत धरु नये हा संदेश गेला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसः (जिंकले) महत्वाची खाती मिळाली. कार्यकर्त्यांची कामे झाल्याने पक्ष वाढला.

कॉंग्रेसः (पराभुत) राकाबरोबर एक दुय्यम भागीदार म्हणुन जागा मिळाली. शिवसेन्यासारख्या पक्षाशी समजोता केल्याने मुस्लिम समाजात वेगळा संदेश गेला.

भाजप: (पराभुत) विनाकारण ३१ महिने सत्तेबाहेर राहवे लागले. शिवसेनेसारखा जुना सहकारी गमावला. आता फोडा-फोडी केलेल्या लोकांना ठेवायचे कोठे हा प्रश्न आहेच.

जनता: (पराभुत) कायम पराभुतच असते.

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

2 Jul 2022 - 1:04 pm | कानडाऊ योगेशु

फडणवीस हे शरद पवार इन मेकिंग आहेत.असे बोलुन मी खाली बसतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2022 - 1:13 pm | अमरेंद्र बाहुबली

शरद पवारांनी ० तून सुरूवात करून पक्ष बनवला. त्यांना आयतं काहीही मिळालं नाही. तसेच त्यांचा कुणी मालकही नाही दिल्लीतून आदेश द्यायला. असे बोलायला मी ऊभा राहतो.

एकुलता एक डॉन's picture

3 Jul 2022 - 7:50 pm | एकुलता एक डॉन

ते ९८ नंतर
त्याआधी साहेब इंदिरा चे ऐकत होते आणि पाकशा काँग्रेस होता

चौकस२१२'s picture

5 Jul 2022 - 5:33 am | चौकस२१२

बर त्यास्तही १० पैकी ८ गन देऊ आपण त्यांना .... पुढे काय ?
- एकदा तरी स्वबळावर महाराष्ट्र्र जिंकला ?
- सतत जातीय द्वेषाचे राजकारण केले

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2022 - 2:41 pm | अमरेंद्र बाहुबली
Nitin Palkar's picture

4 Jul 2022 - 8:37 pm | Nitin Palkar

आबा,
तुमचे सर्व प्रतिसाद वाचून शोले मधल्या मौसीचा 'बेटा एक बात कि दाद देनी पडेगी, भले सौ बुराइया है सेना और काका मे पर तुम्हारे मुह से उनके लिये बस तारीफ ही निकलती है' हा संवाद आठवतो.
आणि
सामना मध्ये मास्तरच्या (श्रीराम लागू) तोंडी निळू फुलेंच्या पाळलेल्या गुंडाला उद्देशून एक संवाद आहे तो आठवतो. 'तुमच्या या निरागस निर्बुद्धपाणाचे रहस्य काय'?

श्रीगुरुजी's picture

4 Jul 2022 - 8:56 pm | श्रीगुरुजी

बापरे, अजून हसतोय.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Jul 2022 - 9:20 pm | अमरेंद्र बाहुबली

काका द्वेष्टे, ठाकरेद्वेष्ट्यांना सेना आणी पवारांत दोषच दिसतील.
त्यांनी घडवलेला महाराष्ट्र पहा. पवारांच्या चाळीस वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे हे. पण काकाद्वेष्ट्यांना दिसनार नाही.
सामना मध्ये मास्तरच्या (श्रीराम लागू) तोंडी निळू फुलेंच्या पाळलेल्या गुंडाला उद्देशून एक संवाद आहे तो आठवतो. 'तुमच्या या निरागस निर्बुद्धपाणाचे रहस्य काय'?
मलाही भाजप समर्थकांना पाहून हाच प्रश्न पडतो. वय झाल्यामुळे होत असावे कदाचीत. :)

सामान्य माणसाकडेही आहे.
आमच्या इथल्या दूधवाल्यांनी नोटाबंदीनंतर चेकने पैसे घेण्यास नकार दिला. बँक अकाउंटच नाही. "दोन महिन्यांनी द्या पैसे, क्याशच द्या." म्हणजे हा धंदा दाखवलाच जात नाही.

-----
काका द्वेष्टे, ठाकरेद्वेष्ट्यांना सेना आणी पवारांत दोषच दिसतील.

भाजप, कॉ यांच्या नेत्यांचे दोष आणि चर्चा होतच असते भरपूर. कोणी सुटला नाही.

सुबोध खरे's picture

5 Jul 2022 - 9:50 am | सुबोध खरे

भुजबळ बुवा

काका एवढे हुशार होते तर त्यांना आजतागायत दोन आकड्यात खासदार, तीन आकड्यात आमदार का निवडून आणता आले नाहीत?

एकदाही
स्वबळावर सरकार स्थापन करता आले नाही.

स्वतः तीन वेळेस मुख्यमंत्री झाले परंतु एकदाही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही?

एवढ्याच प्रश्नांची उत्तरे द्या.

बाकी मेंदूला ताण येऊ नका.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Jul 2022 - 11:18 am | अमरेंद्र बाहुबली

पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही?

पाच वर्षे काम करतो ह्या पेक्षा कसे करतो हे महत्वाचे. त्यांच्या काळात पुरग्रस्तांना मदत मिळायची.

कानडाऊ योगेशु's picture

5 Jul 2022 - 3:43 pm | कानडाऊ योगेशु

काका द्वेष्टे, ठाकरेद्वेष्ट्यांना सेना आणी पवारांत दोषच दिसतील.

काकांना आणि ठाकरेंना ही अगदी काही दिवसांपर्यंत एकमेकातले नुसतेच दोषच दिसत होते.

साहेबांनी नवा पक्ष तयार केला कारण त्यांना बार्गेनिंग पॉवर हवी होती. त्यासाठी सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावर भाम्डून वेगळे झाले आणि नंतर सगळे संदर्भ गुंडाळून त्याच्याच सरकारात सामील झाले.
यामुळेच की काय त्यांच्या पक्ष कधीच देशातच काय पण सम्पूर्ण महाराष्ट्रातही व्यापू शकला नाही.
त्यांच्या मागून येवून केजरीवालने खूपच सरच प्र्गती केली आहे.

शाम भागवत's picture

5 Jul 2022 - 7:49 am | शाम भागवत

एकनाथ शिंदे यांचे कालचे भाषण ऐकले. सत्ताधारी व विरोधक यांच्यातील सिमारेषा पुसून टाकणारे साधे सरळ व सोपे भाषण भावले. मुख्य म्हणजे आम्ही बाहेर का पडलो, पुढे आमची वाटचाल कशी असणार आहे ह्याचे दिशादिग्दर्शन गप्पाष्टकांतून झाल्यासारखे वाटले.

गुलाबरावांचे आक्रमक भाषण झाले. ते आग ओकत असल्यासारखे वाटत होते. पण त्यात प्रामाणिक पणा होता. शिंदे असोत की गुलाबराव. ताकाला जाऊन भांडे लपवायचा प्रयत्न केल्याचे जाणवले नाही.
हल्लीच्या शुध्द मराठीत सांगायचे झाले तर, दोघांनी पोलिटिकल करेक्ट रहावयाचे प्रयत्न केले नाहीत त्यामुळे त्यांचे बोलणे आपोआप मनाला भिडत गेले.

शाम भागवत's picture

5 Jul 2022 - 8:49 am | शाम भागवत

मोदी व शहा दोघेही रत्नपारखी आहेत. सगळ्यांशी चांगले संबंध ठेवूनही राष्ट्रवादीचा खरा चेहरा ओळखणारे, तसेच तळागाळातील लोकांचा विश्वास संपादन करून त्यातून आपली मतपेठी तयार करणारे शिंदे ह्यांना देफ यांचे उत्तराधिकारी म्हणून निवडणे ही एक मोठी चांगली चाल आहे. मला वाटते, उठा व शप यांना व्यवस्थित तोंड देऊ शकेल असा देफ यांना उत्तराधिकारी म्हणून एकही माणूस भाजपामधे सध्यातरी नाही. गडकरी आहेत, पण शप यांना रोखण्यासाठी त्यांचा उपयोग नाही

शिंदे यांना प्रशासकीय कामात देफ यांची सुरवातीच्या काळात अत्यंत आवश्यकता आहे असे जाणवले. यासाठीच त्यांना उमुमं बनवून शिंदे यांच्या शेजारी बसवले असल्याचे जाणवले. शिवाय उमुमं हे प्रशासकीय पद असल्याने ते कोणत्याही अधिका-याला भेटू शकतील, फाईली पाहू शकतील. माहिती मिलवू शकतील.
शिंदे मला तरी कृतज्ञता असलेले माणूस वाटले. त्यामुळे ते देफ यांच्या मदतीची जाण ठेवतील यात सध्यातरी मला शंका वाटत नाही.

देफ यांना केंद्रात मोठी कामगीरी देण्याअगोदर महाराष्ट्राची व्यवस्था नीट लावण्याची जबाबदारी सांगितली गेली असावी असा कयास आहे. अर्थात पर्रिकरांप्रमाणेच देफ यांना केंद्रात जायचे नसेल तर त्यात काही चुकीचे आहे असेही नाही. पण संपूर्ण देशाचे हीत साधायचे का एका राज्यापुरतेच ते मर्यादीत करायचे हे शेवटी ठरवायला लागणारच आहे.

२०१९ च्या शेवटी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांआधी शिवसेना फुटेल असं वाटलं होतं. त्यावेळेस नगरसेवकांपासून सुरवात होईल अशी समजूत होती. पण उठा यांनी फारच निराशा केली त्यामुळे एकदम वरच्या थरातूनच बंड सुरू झाले.

अगदी त्याच पध्दतीने मला काय वाटते हे लिहून ठेवलंय. २०२४ साली बघूया काय होते आहे ते.
_/\_

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2022 - 9:40 am | श्रीगुरुजी

शिंदे पुन्हा एकदा टोपी फिरवून पुन्हा उठांशी जमवून घेतील असा माझा अंदाज आहे. असे झाले तर फडणवीस व भाजप पुन्हा एकदा तोंडावर आपटेल व ही मोहीम बूमरॅंग होईल.

१९९६ उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप १७६, सप १०९, बसप ६७ अशी स्थिती होती. सुरूवातीला २ महिने राष्ट्रपती राजवट होती. नंतर बसप व भाजप एकत्र येऊन प्रत्येकी ६-६ महिने मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचे ठरून संयुक्त सरकार स्थापन झाले. मायावतीच्या मुख्यमंत्रीपदाचे पहिले ६ महिने संपल्यानंतर कल्याणसिंह मुख्यमंत्री झाले. परंतु चार आठवड्यातच बसपने पाठिंबा काढून घेऊन विश्वासघात केला.

२००४ कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप ८०, कॉंग्रेस ६५ व निजद ५६ अशी स्थिती होती. कॉंग्रेस व निजदचे संयुक्त सरकार २० महिने चालल्यानंतर भाजपने निजदच्या कुमारस्वामींना फोडून २०-२० महिन्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वाटणीवर संयुक्त सरकार स्थापन केले. कुमारस्वामींच्या मुख्यमंत्रीपदाचे २० महिने संपल्यानंतर बरीच खळखळ करून शेवटी नाईलाजाने त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडले व येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले. परंतु जेमतेम आडवडाभरात निजदने पाठिंबा काढून भाजपला तोंडावर आपटवले.

बिहारमध्ये संजद अतिशय लहान पक्ष असूनही भाजपने प्रारंभापासूनच दुय्यम भूमिका घेतली आहे. नितीशकुमारांनी २०१३ मध्ये भाजपला लाथ मारून कॉंग्रेस व राजदच्या मदतीने सरकार टिकविले. २०१५ विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा कॉंग्रेस व राजदच्या मदतीने मुख्यमंत्री झाले. परंतु राजदचा वरचष्मा त्यांना असह्य होत होता. शेवटी भाजपचा पाठिंबा घेऊन त्यांनी नवीन सरकार स्थापन केले. २०२० मध्ये सुद्धा भाजप ७४ व संजद ४३ अशा स्थिती असूनही भाजपने मुख्यमंत्रीपद संजदलाच दिले व पुन्हा एकदा दुय्यम भूमिका स्वीकारली. नितीशकुमार हे अत्यंत विश्वासघातकी आहेत व ते कधीही भाजपला लाथ घालू शकतात.

महाराष्ट्रात सुरूवातीपासून मोठा पक्ष असूनही भाजपने नगण्य सेनेसमोर कायमच दुय्यम भूमिका घेतली. जेव्हा २०१४ मध्ये भाजपने सेनेला खांद्यावरून खाली फेकले तेव्हाच भाजपचा मुख्यमंत्री झाला. दुर्दैवाने क्ष२०१९ मध्ये भाजपने पुन्हा एकदा सेनेला खांद्यावर घेतले व सेनेकडून लाथ खाल्ली. आता पुन्हा एकदा सेनेच्याच पण आपल्यापेक्षा खूपच लहान गटासमोर भाजपने दुय्यम भूमिका घेतली आहे. हे तात्पुरते आहे, भाजपला यामुळे भविष्यात दीर्घकालीन फायदा होणार वगैरे बाता मारणे सुरू आहे. बिहारमध्ये मोठा पक्ष असूनही १७ वर्षांनंतर सुद्धा भाजपचा मुख्यमंत्री नाही कारण भाजप कायम विनाकारण दुय्यम भूमिका घेत बसला. महाराष जेव्हा जेव्हा भाजपने दुय्यम भूमिका घेतली तेव्हा तेव्हा भाजपघा तोटाच झालाय क्षव मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. आताही तेच करून ठेवलंय. भाजप पुन्हा एकदा तोंडावर आपटणार आहे.

सेना व राष्ट्रवादीचा वाईट अनुभव येऊनहीआणि बिहार/उत्तर प्रदेश/कर्नाटक/महाराष्ट्राचा अनेक दशकांचा वाईट अनुभव येऊनही महाराष्ट्रात भाजपने पुन्हा एकदा आपल्यापेक्षा लहान पक्षासमोर दुय्यम भूमिका स्वत:हून पत्करली आहे. याची शिक्षा मिळणारच आहे.

शिंदे पुन्हा एकदा टोपी फिरवून पुन्हा उठांशी जमवून घेतील असा माझा अंदाज आहे
अशक्य.
दिघे हे ठाण्यात नवीन सत्ताकेंद्र बनू पाहात होते तेव्हाच ठाकरे गटात चिंतेचे वातावरण पसरले होते. ठाणेकर हे जाणतात.
शिंदेची भेट उठा टाळत होते आणि महिन्यापूर्वीच त्यांना सेनाभवनातून हाकलण्यात आलेले अशी बातमी आहे.
बाकी सत्तेत असतानाही शिवसेनेच्या सामनामधून भाजपचा अपमान करणे सुरू झाले होतेच.
तर हा दोघांनी अपमानाचा बदला घेतला.

सुबोध खरे's picture

5 Jul 2022 - 10:03 am | सुबोध खरे

श्री गुरुजी

भाजप अनेक राज्यांत दुय्यम भूमिका घेताना दिसतो यामागे काहीतरी कारण असेल कि नाही?

सदा सर्वत्र सगळ्या राज्यात हटवादी भुमिका घेतली घेतली तर राज्यसभेत आपले कायदे पास करणे त्यांना अशक्य होऊन बसेल.

आजही राज्यसभेत ३७० कलम, नागरिकत्व, तीन तलाक सारखे कायदे पारित करून घेण्यासाठी भाजपला स्थानीक पक्षांची दाढी धरावी लागते आहे.

स्थानिक पातळीवर आपले म्हणणे बरोबर असेल कदाचित परंतु राष्ट्रीय पातळीवर नेतृत्वाने असा काही विचार केला असेलच.

जर श्री मोदी आणि शहा गुजरात सारख्या राज्यात २२ वर्षे सत्ता एकहाती निवडून आणतात आणि केंद्रात दोन वेळेस स्वबळावर सरकार स्थापन करतात तर त्यांच्या राजकीय समंजसपणा आणि आकलनशक्ती मध्ये इतकी मोठी चूक असणे शक्य नाही.

आणि

उडी , बालाकोट पासून राम जन्मभूमी तीन तलाक यात त्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे त्यांना कणाहीन म्हणणे हा त्यांच्यावर अन्याय होईल.

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2022 - 1:23 pm | श्रीगुरुजी

भाजप अनेक राज्यांत दुय्यम भूमिका घेताना दिसतो यामागे काहीतरी कारण असेल कि नाही?

काय कारण आहे? तामिळनाडू, पंजाब या दोन राज्यात भाजप दुय्यम भूमिका घेतो कारण तेथे भाजपचा मताधार स्थानिक पक्षांपेक्षा खूपच कमी आहे. परंतु बिहार व महाराष्ट्र येथे भाजपचा मताधार प्रारंभापासूनच तथाकथित स्थानिक मित्रपक्षांपेक्षा खूप जास्त असूनही दशकानुदशके दुय्यम भूमिका घेतल्याने भाजपचा फक्त तोटाच झाला आहे. या दोन्ही राज्यात मुख्य भूमिका घेतल्यानंतरच भाजपचा फायदा झाल्याचे स्पष्ट दिसले. तरीही भाजप पुन्हा एकदा यांच्या वळचणीला जाऊन शेवटी दुय्यम भूमिकेतच राहिला.

जर श्री मोदी आणि शहा गुजरात सारख्या राज्यात २२ वर्षे सत्ता एकहाती निवडून आणतात आणि केंद्रात दोन वेळेस स्वबळावर सरकार स्थापन करतात तर त्यांच्या राजकीय समंजसपणा आणि आकलनशक्ती मध्ये इतकी मोठी चूक असणे शक्य नाही.

मोदी-शहांची आकलनशक्ती व राजकीय समंजसपणा अत्यंत अचूक आहे असे निदान मी तरी म्हणणार नाही. २०१४ ची लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र, हरयाणा या राज्यांबरोबर दिल्ली विधानसभेची निवडणूक घेतली असती तर भाजपची फक्त ३ जागा जिंकण्याइतकी दारूण परिस्थिती झाली नसती. डिसेंबर २०१८ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने ७० पैकी ३२ व आआपने ३८ जागा जिंकल्या होत्या. मे २०१९ मध्ये दिल्लीतील लोकसभेच्या सर्व ७ जागा भाजपने जिंकल्या होत्या ऑक्टोबर २०१९ मध्ये दिल्लीत भाजपने बहुमत जिंकण्याची शक्यता होती. परंतु मोदी-शहांनी निवडणूक लांबवून केजरीवालांना सावरण्याची संधी दिली व स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला.

फेब्रुवारी २०१९ मध्ये अजिबात गरज नसताना सेनेच्या अटींवर सेनेशी युती करणे, महाराष्ट्रातील जेष्ठ नेते फडणवीस संपवून पक्ष खिळखिळा करीत असताना त्यांना पाठिंबा देणे, नोव्हेंबर २०१९ मध्ये अजित पवारांबरोबर सरकार स्थापन करणे, डिसेंबर २०२० मध्ये नितीशकुमारांना निवडणुकीआधीच मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन देणे इ. निर्णय मोदी-शहांच्या चुका दृग्गोचर करतात.

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2022 - 1:28 pm | श्रीगुरुजी

वरील प्रतिसादात दिल्ली संदर्भात २०१३ व २०१४ असे वाचावे.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Jul 2022 - 1:45 pm | अमरेंद्र बाहुबली

परंतु बिहार व महाराष्ट्र येथे भाजपचा मताधार प्रारंभापासूनच तथाकथित स्थानिक मित्रपक्षांपेक्षा खूप जास्त असूनही दशकानुदशके दुय्यम भूमिका घेतल्याने भाजपचा फक्त तोटाच झाला आहे.

ईथे सरळ दिसतंय की १९९५ ला सेनेला १६.३९ टक्के तर भाजपला १२.८० टक्के मते पडलीत. तरीही श्रिगुरूजी धडधडीत खोटं विधान करताहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Jul 2022 - 1:46 pm | अमरेंद्र बाहुबली
कपिलमुनी's picture

5 Jul 2022 - 2:41 pm | कपिलमुनी

पुरावे दाखवले की इथे फिरकणार नाहीत...
आता गोल पोस्ट बदलणार .

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Jul 2022 - 2:55 pm | अमरेंद्र बाहुबली

खिक्क.

कॉमी's picture

5 Jul 2022 - 3:16 pm | कॉमी

हे चूक दिसतेय श्रीगुरुजी.

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2022 - 3:20 pm | श्रीगुरुजी

कोणी चुकीचे लिहिलंय?

तुम्ही...
बिहार व महाराष्ट्र येथे भाजपचा मताधार प्रारंभापासूनच तथाकथित स्थानिक मित्रपक्षांपेक्षा खूप जास्त असूनही

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2022 - 4:20 pm | श्रीगुरुजी

हे बरोबर लिहिले आहे. विश्वास बसत नसल्यास महाराष्ट्रात १९६६ पासून १९८५ पर्यंतच्या सर्व विधानसभा निवडणुकीतील जनसंघ/भाजप व सेनेला मिळालेल्या जागा व मतांची टक्केवारी पहा.

तसेच बिहारमध्ये समता पक्ष/संजद व भाजप यांची युती होण्यापूर्वी त्यांना मिळालेल्या मतांची टक्कैवारी व जिंकलेल्या जागा पहा. .

कपिलमुनी's picture

5 Jul 2022 - 4:39 pm | कपिलमुनी

हे बहुधा इतरांचे प्रतिसाद वाचत नसावेत

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2022 - 5:22 pm | श्रीगुरुजी

"सामना" चित्रपटात लागू एकदा विलास रकटेला विचारतात "आपल्या या निरागस निर्बुद्धपणाचे रहस्य काय?".

हाच प्रश्न विचारावासा वाटतोय. अर्थात हा प्रश्न यांच्या डोक्यावरून जाईल हे नक्की.

क्लिंटन's picture

5 Jul 2022 - 4:59 pm | क्लिंटन

१९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनसंघाला पूर्ण देशात ४ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी अर्ध्या- म्हणजे दोन जागा आताच्या महाराष्ट्रातून आल्या होत्या. त्या होत्या- रत्नागिरीतून प्रेमजीभाई असर आणि धुळ्यातून उत्तमराव पाटील. त्यावेळी शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता. तरीही दावे करताना शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपला मोठे केले असेच केले जातात. अर्थातच त्यात काही तथ्य नाही.

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2022 - 5:19 pm | श्रीगुरुजी

सेनेचा जन्म १९६६ मध्ये झाला. त्यानंतर १९६७, १९७२ व १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार उभे करूनही सेनेने शून्य जागा जिंकल्या. १९८० मध्ये सेनेने विधानसभा निवडणूक न लढता इंदिरा कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता, तर १९८५ मध्ये अनेक जागा लढूनही सेनेचा अवघा १ आमदार जिंकला. म्हणजे ५ विधानसभा निवडणुकीत फक्त १ आमदार.

जनसंघाने १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ४ व १९७२ मध्ये ५ जागा जिंकल्या होत्या. १९७८ मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन झाला होता व जनता पक्षाच्या ९६ आमदारांपैकी सुमारे ४० मूळ जनसंघाचे होते.

भाजपची स्थापना १९८० मध्ये झाली व नंतर अवघ्या दीड महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे स्वबळावर महाराष्ट्राच्या विविध भागातून १४ आमदार जिंकले होते. १९८५ मध्ये १६ आमदार जिंकले होते.

काहीही असले तरी महाराष्ट्रात शून्य असलेल्या भाजपला संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेल्या सेनेनेच मोठे केले!

शाम भागवत's picture

5 Jul 2022 - 10:18 am | शाम भागवत

परंतु चार आठवड्यातच बसपने पाठिंबा काढून घेऊन विश्वासघात केला.

बसप हिंदूत्ववादी पक्ष आहे?

परंतु जेमतेम आडवडाभरात निजदने पाठिंबा काढून भाजपला तोंडावर आपटवले.

निजद हिंदूत्ववादी पक्ष आहे?

नितीशकुमार हे अत्यंत विश्वासघातकी आहेत व ते कधीही भाजपला लाथ घालू शकतात.

नितीशकुमार हिंदूत्ववादी आहेत?

भाजप पुन्हा एकदा तोंडावर आपटणार आहे.

मी भाजपाप्रेमी नाही. मी महाराष्ट्रावर प्रेम करतो. महाराष्ट्राचे भले होत असेल तेवढेच पाहातो. एका विशिष्ट पक्षाकडूनच महाराष्ट्राचे भले व्हावे असा माझा आग्रह नाही त्यामुळे माझा पास.

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2022 - 1:06 pm | श्रीगुरुजी

सेना हिंदुत्ववादी होती/आहे?

शाम भागवत's picture

5 Jul 2022 - 1:45 pm | शाम भागवत

शिवसैनिक हिंदुत्ववादी आहेत. शिवसेनाप्रमुख नाहीत. आमची हिंदुत्वाची भूमिका चुकली हे उठा यांनी स्पष्ट केले आहे.

मला वाटते तुम्हाला मी मांडत असलेला मुद्दा स्पष्ट झालेला असूनही........
जाऊ दे.
तुमचं कधीच चुकत नाही.
ओके?

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2022 - 2:10 pm | श्रीगुरुजी

१९६६ पासून आजतागायत सेना व आजी माजी सेनाप्रमुख कधीही हिंदुत्ववादी नव्हते. असे असूनही बाळ ठाकरेंचा उल्लेख अजूनही हिंदूहृदयसम्राट असा करणे, सेनेशी हिंदुत्वामुळे युती केली असे वारंवार सांगणे, बाळ ठाकरेंच्या काळातील हिंदुत्वाची भूमिका सेनेने सोडली असे सांगत रहाणे हे प्रकार भाजपने तात्काळ थांबवावे.

शाम भागवत's picture

5 Jul 2022 - 3:34 pm | शाम भागवत

हिंदुत्वाची भूमिका प्रथम बाळासाहेबांनी घेतली. १९८२ साली समाजवादी भाजपा अस्तित्वात आला. बाळासाहेबांच्या हिंदूत्वाला यश मिळते आहे हे दिसल्यावर भाजपाने समाजवादी विचारांची झूल बाजूला केली व मूळची जनसंघी हिंदूत्वाची पताका हाती घेतली. अशी माझी समजूत आहे.

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2022 - 3:50 pm | श्रीगुरुजी

१) १९८६ पासून श्रीरामजन्मभूमी आंदोलन सुरू झाल्यानंतर १९८८ मध्ये ते हिंदुत्व वगैरे बोलायला लागले. त्यापूर्वी ते मराठी बाणा वगैरे माल विकत होते, पण तो खपत नव्हता. १९८८ पूर्वी बाळ ठाकरेंनी मुस्लिम लीग, प्रजा समाजवादी वगैरे पक्षांशी युती केली होती. इंदिरा कॉंग्रेसशी तर ७-८ वर्षे युती होती. यात हिंदुत्व कोठेही नव्हते.

२) भाजप १९८० मध्ये अस्तित्वात आला. तेव्हा भाजपने जनसंघापासून सुरू असलेली हिंदुत्वाची भूमिका कायम ठेवून (याच हिंदुत्वामुळे भाजपला जनता पक्षातून बाहेर जावं ए लागले होते) दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानवतावाद, गांधीवादी समाजवाद, लोकशाही वगैरे आपल्या विचारसरणीत आणण्याचे जाहीर केले. परंतु काही महिन्यातच एकात्म मानवतावाद, गांधीवादी समाजवाद वगैरे कचऱ्याच्या पेटीत गेले कारण ही विचारसरणी भाजपच्या कोणालाच माहिती नव्हती.

३) देशात श्रीरामजन्मभूमी आंदोलन, शहाबानो वगैरेमुळे देशात भाजप, विश्व हिंदू परीषद वगैरेंची हिंदुत्वावादी विचारसरणी जोम धरत आहे हे बाळ ठाकरेंच्या लक्षात येताच त्यांनी मराठी बाणा, भूमीपुत्र वगैरे विचार दूर करून हिंदुत्वाचे सोंग घेतले.

शाम भागवत's picture

5 Jul 2022 - 4:57 pm | शाम भागवत

होका. बर.

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2022 - 5:11 pm | श्रीगुरुजी

बरं

शाम भागवत's picture

5 Jul 2022 - 10:42 am | शाम भागवत

दुर्दैवाने क्ष२०१९ मध्ये भाजपने पुन्हा एकदा सेनेला खांद्यावर घेतले व सेनेकडून लाथ खाल्ली.

मी शिवसेना ही एक शक्ति समजतो. शक्ति ही कधीच वाईट अथवा चांगली असत नाही. ती शक्ति वापरकर्त्यावर सगळं अवलंबून असतं. पण हे लक्षात घेतले नाही तर मात्र वापरकर्त्या उठांकडे दुर्लक्ष होऊन शिवसेना हाच आपला मुख्य शत्रू आहे असं वाटायला लागतं आणि आपली दृष्टी संकूचित होऊन जाते.
मला वाटते शिवसेना ही शक्ति शिंदेसाहेबांकडे (ज्यांना देफ यांचेप्रमाणेच खाजगी मालमत्ता जमवायची नाही आहे. व जे हिंदूत्ववादी आहेत) गेली तर शिवसेनेवर राग धरायचे काही कारण नसावे. तसेच शिवसेनेत बाळासाहेबांपासून ब्राह्मणद्वेष जाणवलेला नाही.

देफ यांची जात महाराष्ट्रात आडवी येत असली तरी देशाच्या पातळीवर मात्र तो त्रास त्यांना सहन करायला लागणार नाही व आपोआपच ते गडकरींसारखे देशात लोकप्रिय होऊ शकतील असे वाटते. त्यांना बिहार व गोवा येथे जबाबदा-या देऊन त्यांच्या दोन परिक्षा घेतल्या गेल्या आहेत व देशपातळीवर काम करायला ते खूपच चांगल्या मार्काने उत्तिर्ण झाले आहेत असे वाटते.

बघूया पुढे काय होते ते. मी थोडाच तज्ञ आहे. :)

ते त्यांना न विचारता याबद्दल शिंदे चिडले होते व त्यांनी तसे बोलूनही दाखवले. तर या घटनेवेळी काकांनी लक्ष घातले नाही आणि गाफील राहिले. हे निस्तरायला उद्धव समर्थ आणि सक्षम आहेत हा समज करून घेतला. या सर्व घटना ,बातम्या गेल्या दोन महिन्यांत पेप्रात येऊन गेल्या. पण
परिस्थिती आणि इतिहासाचं गांभिर्य लक्षात घेण्यात नेते अयशस्वी ठरले.

सुबोध खरे's picture

5 Jul 2022 - 10:05 am | सुबोध खरे

काका गाफील राहिले

कंजूस काका

हा काकांवर अत्यंत भयंकर आरोप करताय?

तुम्हाला सुद्धा केतकी चितळे सारखी अटक होऊ शकेल.

सावध राहा

कंजूस's picture

5 Jul 2022 - 12:38 pm | कंजूस

मला असं म्ह णायचंय की त्यांनी लक्ष घा तले असते तर प्रकरण चिघळले नसते.

या सगळ्यात मनसे च काय, ह मोठा प्रश्न आहे...

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2022 - 11:52 am | श्रीगुरुजी

शून्य आहे ते शून्यच राहणार.

विवेकपटाईत's picture

6 Jul 2022 - 5:31 pm | विवेकपटाईत

सरकार बदलताच चांगले निर्णय घेणे सुरू झाले आहे.
आरे कारशेडचे कार्य वर्षांत पूर्ण होणार. 2021 मध्ये सुरू होणारी मेट्रो आता 2023 अंति सुरू होण्याची शक्यता. अडीच वर्षांत काम ठप्प असल्याने किती हजार कोटींचे नुकसान झाले याची कल्पना इथे कुणालाही नसणार. त्या शिवाय 2 लाख लोक प्रवास करत असते तर किती पेट्रोल डिझेल वाचले असते. किती प्रदूषण कमी झाले असते. हे वेगळे.
2. जळयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू होणार. कमी खर्चात शेतकर्‍यांना पानी पुरवणारी यशस्वी योजना. ती का बंद केली कुणी सांगू शकेल का?
3. बुलेट ट्रेनचे कार्य ही सुरू होणार. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पर्यावरणचा फायदा तर होईलच. उद्योग जगाचा ही फायदा होणार.
4. केंद्रीय मदत ही जास्त मिळेल हा ही फायदा होणार.
बाकी शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहे. याचा फायदा, राष्ट्रवादी सर्वात जास्त, भाजप काही प्रमाणात होणार. जसे उत्तर प्रदेश विधान सभा निवडणूकीत शांतिपूर्ण मत समाजवादी पार्टी कडे वळले त्याच्या परिणाम बीएसपीचे दलित वोट ही तुटून समाजवादी आणि काही प्रमाणात भाजप कडे वळले. तसेच महाराष्ट्रात होणार. बीएमसी निवडणूकीत उद्धव सेना/ शिंदे सेना पैकी एक 20 एक जागा जिंकू शकली नाही तर तिचे अस्तित्व संपण्याची शक्यता.

क्लिंटन's picture

6 Jul 2022 - 6:08 pm | क्लिंटन

यापैकी आरे कारशेडचा निर्णय सगळ्यात आवडला. जलयुक्त शिवारविषयी मला विशेष माहिती नाही त्यामुळे त्यावर लिहित नाही.

आरे कारशेडसाठी पूर्ण आरे कॉलनी इतकेच नव्हे तर पूर्ण नॅशनल पार्कमधील सगळी झाडे कापली जाणार असे वातावरण उभे केले जात होते. त्यात अजिबात तथ्य नव्हते. कारशेडसाठी जितकी झाडे कापली जाणार होती त्यापेक्षा कितीतरी जास्त झाडे कापून Royal Palm आणि फिल्म सिटी उभी केली आहे. त्याच Royal Palm मध्ये राहणारे लोक मोठे पर्यावरणवादी बनून आरे कारशेडला विरोध करत होते. तो भाग किती उचभ्रू आहे, तिथे किती दरडोई किती गाड्या आहेत, त्या गाड्यांमधून किती प्रदूषण होते, तिथल्या घरोघरी असलेल्या एसीमुळे किती प्रदूषण होते वगैरे प्रश्न विचारायला बंदीच असते. बाकी आदूबाळ ज्या वर्तुळात वावरतो (बॉलीवूड सेलेब्रिटी) त्याच लोकांच्या पार्ट्या त्या भागात चालत असतात. आणि तेच सेलेब्रिटी या तथाकथित 'आरे वाचवा' मोहिमेत पुढे होते.

बाकी हे विरोध करणारे मोठे सेलेब्रिटी/ विचारवंत बहुरूपी असतात. समजा कारशेड आरे ऐवजी कोणत्यातरी झोपडपट्टीच्या ठिकाणी करायचा निर्णय घेतला असता तर हेच लोक पर्यावरणप्रेमीचा मुखवटा टाकून मानवतावादाचा मुखवटा चढवून पुढे आले असते आणि मग झोपड्या का तोडता वगैरे हाकाटी सुरू झाली असती.

ठाकरे सरकारने आरे कारशेडचा निर्णय रद्द केला त्यमागचे कारण पर्यावरण वगैरे अजिबात नव्हते तर तो निर्णय फडणवीसांच्या सरकारने घेतला होता ना मग त्याला विरोध करणे हे ठाकरेंचे आद्य कर्तव्य असल्याने कारशेड आरेमधून कांजूरमार्गला न्यायचा निर्णय घेतला होता हे उघड आहे. कांजूरमार्गला प्रस्तावित कारशेड मीठागराच्या पाणथळ जागेत होणार होती तिथे प्रदूषण होणार नव्हते का? खरं तर मुंबईत पाणी तुंबायचे प्रमाण जास्त असल्याने अशा पाणथळ जागांचे संवर्धन करणे जास्त गरजेचे होते. दुसरे म्हणजे इतकी पर्यावरणाची काळजी ठाकरे सरकारला असेल तर मग वाशीत फ्लायओव्हर बांधायला ४०० झाडे (तशीच मोठी झाडे) तोडायचा प्रस्ताव का होता? तिसरे म्हणजे आरेत कारशेड होणारी मेट्रो लाईन मुंबईतील पश्चिम उपनगरामधील अतिशय दाट लोकवस्तीच्या भागातून जाणार आहे. तिथे किती ट्रॅफिक जॅम असतो आणि नुसत्या ट्रॅफिक जॅममध्येच किती हजार लीटर पेट्रोल्/डिझेल नुसते जळून किती प्रदूषण होत असेल याचा कोणी हिशेब केला आहे का? तिथे मेट्रोमुळे रहदारी कमी (म्हणजे शून्य नाही तर त्यामानाने सांभाळण्याजोगी) झाली तर त्यातून किती प्रदूषण टळू शकेल याचे गणित कोणी मांडले आहे का?

फाईव्ह स्टार पर्यावरणवाद्यांच्या हाकाटीला साद देऊन ठाकरेंच्या सरकारने घेतलेला हा आकसपूर्ण निर्णय रद्द केल्याबद्दल फडणवीसांचे मुंबईकर आभारच मानतील.

श्रीगुरुजी's picture

6 Jul 2022 - 6:17 pm | श्रीगुरुजी

बंद पडलेल्या इंदू कापड गिरणीच्या रिकाम्या जागेत कारशेड करता येणे शक्य आहे का?

क्लिंटन's picture

6 Jul 2022 - 9:17 pm | क्लिंटन

नाही.

१. कारशेड मेट्रो मार्गाच्या दोन पैकी एका टोकाच्या पलीकडे असायला पाहिजे. मेट्रो गाड्यांच्या देखभाल / दुरुस्तीसाठी त्या गाड्या कारशेड नेतात. तसेच रात्री त्या गाड्या कुठेतरी ठेवायला लागतात त्या तिथे नेतात. तिथून त्या गाड्या सकाळी मेट्रो मार्गावर आणतात. इंदू मिल या मार्गाच्या मधेच आहे. ती पण खुद्द मार्गावर नाही तर एक मेट्रो स्टेशन असलेल्या सिद्धीविनायक मंदिरापासून एखाद किलोमीटरवर आहे.

२. समजा कारण १ हे इतके महत्त्वाचे नाही असे गृहीत धरले तरी कांजूरमार्ग येथे कारशेड साठी १०२ एकर जागा दिली होती तर डॉ. आंबेडकरांच्या इंदू मिलमध्ये स्मारकांसाठी १२ एकर जागा दिली गेली होती. इंदू मिलमध्ये पुरेशी जागा आहे असे वाटत नाही. बाकी इंदू मिलच्या आजूबाजूला भरपूर इमारती आणि लोकवस्ती आहे. तिथे कार शेड करता येईल का याविषयी कल्पना नाही.

अच्छा, असे असते का. छान छान.

4. केंद्रीय मदत ही जास्त मिळेल हा ही फायदा होणार.

शाम भागवत's picture

8 Jul 2022 - 6:30 am | शाम भागवत

मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?

मग काय मंडळी, शेवटी काय ठरलं?
नक्की कोण जिंकलं?
.
मला वाटतंय की सरतेशेवटी हिंदूत्व जिंकलं.
:)

श्रीगुरुजी's picture

8 Jul 2022 - 7:49 am | श्रीगुरुजी

अर्थातच भाजपवाले जिंकले. भाजपचा टिळा लावलेले १५-२० जण मंत्री होणार, उपमुख्यमंत्रीपद व.सभापतीपद ही अत्यंत महत्त्वाची मंत्रीपदे भाजपला मिळाली. १२ नियुक्त आमदारांपैकी ८ भाजपचे असणार.

प्रताप सरनाईक, भावना गवळी, संजय राठोड वगैरे सुद्धा जिंकले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपचे कट्टर समर्थक सुद्धा जिंकले कारण त्यांचे आवडते नेते सत्तेत आले.

शाम भागवत's picture

8 Jul 2022 - 9:20 am | शाम भागवत

कोणता पक्ष जिंकला हे संकुचीत उत्तर झाले.
जिंकले ते हिंदुत्व.
जो पक्ष हिंदुत्वाकडे झुकेल तो जिंकेल. जो हिंदुत्वाकडे पाठ फिरवेल त्याची मतदान टक्केवारी घटेल.

नास्तीक वाले आस्तिक असल्याचे भासवायला लागले आहेत.
इफ्तारवाले देवपूजा करायला लागले आहेत
कोणी तर हिंदू आहोत हे दाखवण्यासाठी जानवी घालायला लागले आहेत.
असो.
:)

श्रीगुरुजी's picture

8 Jul 2022 - 10:06 am | श्रीगुरुजी

असे ढोंग करायला लागावे हा हिंदुत्वाचा विजय? अत्यंत भ्रष्ट व हिंदुत्वद्वेष्ट्यांना अभय मिळणे हा हिंदुत्वाचा विजय?

श्रीगुरुजी's picture

8 Jul 2022 - 10:37 am | श्रीगुरुजी

नास्तीक वाले आस्तिक असल्याचे भासवायला लागले आहेत. इफ्तारवाले देवपूजा करायला लागले आहेत
कोणी तर हिंदू आहोत हे दाखवण्यासाठी जानवी घालायला लागले आहेत.

याच निकषानुसार इस्लामचा विजय झाला असेही म्हणता येईल कारण हिंदुत्ववादी पक्षाच्या फडणवीसांनी दर्ग्यावर चढवून आणलेली चादर कपाळाला लावून नमस्कार केला, डोक्यावर जाळीदार टोपी घालून इफ्तार पार्टी दिली, कोणत्या तरी दर्ग्यासमोर झुकते, सेनेचे सुद्धा धर्मांध टिपूचे नाव मैदानाला दिले, जनाब ठाकरे असा उल्लेख सुरू केला, अजान स्पर्धा भरविली . . . हा तर इस्लामचा विजय आहे.

शाम भागवत's picture

8 Jul 2022 - 1:23 pm | शाम भागवत

बर.
फडणीसांपेक्षा तुम्हीच हुषार.
:)

श्रीगुरुजी's picture

8 Jul 2022 - 1:40 pm | श्रीगुरुजी

ठाकरे सरकार जाणे हा हिंदुत्वाचा विजय असलं काही तरी भंपक लिहायचं आणि ते सप्रमाण खोडून काढल्यावर त्यावर उत्तर देता आलं नाही की असे टोमणे येतात. असो.

शाम भागवत's picture

8 Jul 2022 - 3:20 pm | शाम भागवत

बर.

अगदी जेन्यूईन प्रश्न.
जो पक्ष हिंदुत्वाकडे झुकेल तो जिंकेल. जो हिंदुत्वाकडे पाठ फिरवेल त्याची मतदान टक्केवारी घटेल.

नास्तीक वाले आस्तिक असल्याचे भासवायला लागले आहेत.
इफ्तारवाले देवपूजा करायला लागले आहेत
कोणी तर हिंदू आहोत हे दाखवण्यासाठी जानवी घालायला लागले आहेत.
ह्याचा तुम्हाला, मला किंवा आणि कोणाला काय उपयोग आहे ?

श्रीगुरुजी's picture

10 Jul 2022 - 7:37 pm | श्रीगुरुजी

हे सर्व प्रकार प्रामाणिकपणे केले तरी कोणाला काहीही फायदा नाही. मग असल्या प्रकारांचे ढोंग करून तर अजिबातच फायदा नाही.

कॉमी's picture

10 Jul 2022 - 10:03 pm | कॉमी

हेच म्हणणे आहे.

चौकस२१२'s picture

12 Jul 2022 - 7:25 am | चौकस२१२

ह्याचा तुम्हाला, मला किंवा आणि कोणाला काय उपयोग आहे ?
माझे २ पैश्याचे नास्तिक उत्तर
- प्रत्यक्ष आणि ताबडतोब जरी फायदा नसाल हे मान्य केले तरी लांब पल्याचाच फायदा आहे ते असे
जसे ख्रिस्ती धर्मप्रचारक कष्ट करून लांब पल्य्याच्या दृष्टितीने आपलं धर्म वाढवतात तसेच काहीसे ( यात धर्माची पकड = आर्थिक साम्राज्य हे गृहीत धरावे )
१) जे काही उरले सुरले हिंदूं आहेत त्यावर जगातील २ बलाढय धर्म आपल्या कडे खेचू पाहत आहेत त्यावर थोडा आळा बसेल
२) हिंदू काहीही खपवून घेतो या पारंपरिक समजुतीला तडा जायला मदत
३) आपलं ब्रँड ( येथे हिंदू धर्म = भारत = तेथील संस्कृती - योगापासून ते खाण्यापर्यंत सर्व आले ) वाढायला मदत

एकूण काय भारत या देशात ( तरी) हिंदू या बहुसंख्य धर्माचं लोकशी कारण नसताना धवलढवळ करू नका हा संदेश जाईल

गेली अनेक वर्षे हिंदूताला " ह" जरी उच्चारला तरी महापाप समजले जायचे ते आता उघडपणे बोलणे/ कला यातून हिंदू संस्कृती ची उजळं आणि प्रसार होत असेल तर काय वाईट आहे ! ( मध्यंतरी मिपावर सध्याचे चित्रपट कसे खते हिंदुत्व पसरवत आहते वैगरे
आज जगातील विविध संस्कृती / धर्म सामावून घेणारे धर्म फार कमी आहेत त्यात हिंदू धर्माचा क्रमांक खूप वरती लागतो .. पण त्याची अशी हेळसांड एका ठराविक वृत्ती मुले एवढी झाली ती गाडी परत फिरत असेल तर चांगलेच आहे असे एक जन्माने हिंदू पण कर्माने अधार्मिक असलेलया माझे मत आहे

आता मी अग्नोस्टिक का काय ते असल्यामुळे जरी भारतात हिंदूंचे प्रभुत्व वाढले कि नाही याने मला फरक पडला नाही पाहिजे तरी पण जर मला विचारले कि कोणाचा प्रभाव तुला वाढलेला आवडेल तर खालील प्रमाणे
१) हिंदू ( पण हिंदुराष्ट्र्र नको )
२) बुद्ध
३) जैन
४) झोरॅष्ट्रियन
५) ख्रिस्ती

असो तर हे झाले हिंदुत्वाच्या बाजूने आता " समविचारी " हिंदुत्ववाद्यांशी " देऊळ नको शाळा बांधा " वैगरे विषयवार भांडायला मी मोकळा "

शाम आणि गुरुजी तुम्ही दोघ भांडायला लागले तर बाकिच्यांनी कोणाकडे बघायच.

लक्षात घ्या रात्र वैर्याची आहे.
सर तन से जुदा च्या काळात आप आपल्यात नुसताच सद्भावना असुन चालणार नाही तर पुढे योग्य योजना असणे गरजेच आहे.
कोणीतरी नेता येऊन काही तरी करेल अशी अपेक्षा ठेवुन श्रीलंकेसारखी परिस्थिती ओढवुन घेण्यापेक्षा आपल्या परीने काय करता येईल हे पहाणे जास्त चांगले आहे, त्यासाठीच ब्रेन स्टॉर्मींग व्हायला पाहीजे.

आता भजपा प्रणित केंद्र सरकार मुस्लिम तुस्टीकरणापासुन त्यांच्या तृप्तीकरणा पर्यंत पोहोचला आहे. जागतीक राजकीय घडामोडीच्या
पार्श्वभुमीवर अश्या तात्पुरत्या जुमल्याची गरज असेल तर माहिती नाही पण ह्यातुन हिंदु स माजाला वाईट संदेश जात आहे. त्या पेक्षा वाईट मेसेज खुद्द मु समाजाला जात आहे की त्यांनी काही केले तरीही माफ आहे.

उ प्र मधल्या निवडणुकां मध्ये स्पष्ट दिसले आहे की मुस्लिम बहुल भागात उ प्र सरकारच्या योजनांचा चांगला लाभ उचलणारे मुस्ल्मिम लोक शेवटी आपल मत मुस्लिम नेत्यांनाच देतात भले ते जेल मध्ये पडलेले असु देत. अजुनही जेल मधुन निवडणुक लढवता येते ?

श्रीलंकेच्या परिस्थितीची समिक्षा हिंदु समाजा कडुन होणे गरजेच आहे. कदाचीत भारताने श्रीलंकेला आपल्यात समावुन घेतल तर
चिनच्या एका डावाचा खातमा होईल. पण असे बोलणे हे आजच्या बुद्धिवाद्यांच्या गळी उतरणार नाही.

मिपावर तरी तुम्ही हिंदु आ हात म्हणुन बोलु शकता, तिथे म बो वर तर वारच करायला बसलेले आहेत. मि पा चा चांगला उपयोग करत आपापसातले मतभेद विसरुन कामाला लागा. आपल्या परिने परिस्थितीच आकलन करा व समाजाला मार्गदर्शन करा. आता त्याची गरज आहे.

श्रीगुरुजी's picture

10 Jul 2022 - 1:27 pm | श्रीगुरुजी

भागवतराव व माझ्यात तसे भांडण नाही. ते फडणवीस समर्थक आहेत व मी फडणवीस विरोधक आहे, हाच बहुतेक एकमेव मतभेदाचा मुद्दा आहे. बाकी पवार, मविआ, सेना, कॉंग्रेस वगैरे बाबतीत आमच्या मतांमध्ये फार फरक नाही.

डँबिस००७'s picture

10 Jul 2022 - 1:30 pm | डँबिस००७

श्रीगुरुजी : भागवतराव व माझ्यात तसे भांडण नाही.

शाम तुमच्या कडुन ही येऊ द्या

शाम भागवत's picture

10 Jul 2022 - 10:01 pm | शाम भागवत

भांडण?
माझं?
काहीही.
माझं लक्ष फक्त मतदान टक्केवारी वरून हिंदूत्व वाढतंय की कमी होईल होतंय यावर असतं. त्या जनरल ट्रेंडला मी महत्व देतो. कारण विवेकानंद व गुरूदेव रानडे यांनी हिंदुत्वाचे महत्व वाढत जाईल असं सांगितलेलं आहे.

शिवसेना व फडणवीस हे आपलं गुरूंजीना चिडवण्यासाठी असतं. कोणि आलं गेलं तरी मला फरक पडत नाही. मी मायबोलीवरची चर्चाही आरामात वाचू शकतो. बिलकूल त्रास वगैरे काही होत नाही. अगदी कागलकरचं पण वाचू शकतो.
;)

पण मग व्यग्रता वाढायला लागली की काही दिवस युट्यूबसकट सगळं बंद करून टाकतो. अजिबात चुकल्या चुकल्यासारखं होतं नाही.
असो.
_/\_

सुनावणी चालूच राहणार. कारण एकाच वेळी बरेच अर्ज आहेत.
नाना पटोळेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन रिकामी झालेली जागा लगेच भरायला हवी होती.
ते नव्या सरकारने भरली.

प्रसाद_१९८२'s picture

11 Jul 2022 - 3:01 pm | प्रसाद_१९८२

उद्धव ठाकरेंचे ११ खासदार शिंदे गटात सामील झाले. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलवलेल्या खासदारांच्या बैठकीसाठी १८ पैकी फक्त ७ खासदार उपस्थित होते.

गामा पैलवान's picture

12 Jul 2022 - 2:10 am | गामा पैलवान

उद्या काका पवारांवर हीच वेळ आली तर? एक आपली शंका. जाम धमाल येईल.
-गा.पै.

एकुलता एक डॉन's picture

12 Jul 2022 - 2:23 am | एकुलता एक डॉन

२००४ मध्ये संगमा यांनी राष्ट्रवादी वर आपला हक्क सांगितलं होता ,पवार साहेब हाय कोर्टात वाट बघत बसले ,शेवटी संगमा तृणमूल मध्ये विलीन झाले