वळण नसलेल्या वाटेवर

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
27 Jun 2022 - 10:43 am

*वळण नसलेल्या सरळ वाटेवर*
जेंव्हा कोणीतरी खास भेटतं
मग सरळ रेषेतलं आयुष्य
नागमोडी होऊन जातं

वादळ आणी पाऊस
मग नित्याच होतं पण
वादळा पूर्वीची शांतता
सोसण मात्र असह्य होतं

सोसाट्याचा वारा ,गारांचा मारा
संतत श्रावणधार, रस्ता चिबं होतो
आणी हवाहवासा गारवा
वाटेवर पसरतो

भिजलेला रस्ता,दाटलेली हिरवळ
पुन्हा एकदा कुशीत येते
अन वाटेवरली मरगळ
त्वरीत निघून जाते

आसेच कुणीतरी
खास भेटावे
प्रत्येकाला वाटते
मग नागमोडी वाट
सुद्धा सरळ भासते
२७-६-२०२२

आयुष्याच्या वाटेवरमुक्त कविताकवितामुक्तक

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Jun 2022 - 11:08 am | ज्ञानोबाचे पैजार

अगदी ....
असे कोणीतरी असावेच आयुष्यात
पैजारबुवा,

तिसरं आणि चौथ कडवं छान!पण पहिल्या

मग सरळ रेषेतलं आयुष्य
नागमोडी होऊन जातं

याचा विरोधाभास लगेच शेवटी

खास भेटावे
प्रत्येकाला वाटते
मग नागमोडी वाट
सुद्धा सरळ भासते

असं वाटलं.नक्की नागमोडी सरळ की सरळ नागमोडी होत :)
भिजलेला रस्ता,दाटलेली हिरवळ
पुन्हा एकदा कुशीत येते
अन वाटेवरली मरगळ
त्वरीत निघून जाते

छान!

मग नागमोडी वाट
सुद्धा सरळ भासते

सरळ वाटही
नागमोडी असावी
वाटू लागते.

हा हा!होता है ऐसाच होता है :)

कुमार१'s picture

28 Jun 2022 - 9:12 am | कुमार१

छान!

कर्नलतपस्वी's picture

28 Jun 2022 - 10:52 am | कर्नलतपस्वी

भक्ती,कंजूस आणी कुमारेक सर प्रतीसाद बद्दल धन्यवाद.

कंजूस भौ,वळणदार शेवट आवडला.

गणेशा's picture

3 Jul 2022 - 12:07 am | गणेशा

वळण नसलेल्या सरळ वाटेवर
जेंव्हा कोणीतरी खास भेटतं
मग सरळ रेषेतलं आयुष्य
नागमोडी होऊन जातं
.
.
.
.
.
आणि नागमोडी वळणं घेता घेता..
कोणी तरी हे खास सरळ निघून जातं
अन आयुष्य मग नागमोडी वाटेवर
उगा कंदिल बनुन लटकत राहतं... जळत राहतं..