ब्लिडींग हार्ट....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
26 May 2022 - 8:16 am

खुप दिवस मनात होते की "रक्तस्त्राव हृदय फुले" दिसावीत. अंतरजालावर एका राजकुमाराची प्रेमकहाणी वाचली म्हणूनच कुतूहल वाढले होते.सकाळची फिरण्याची सवय आज कामाला आली.ज्या झुडूपवर्गीय वनस्पतीला रक्तस्त्राव हृदया फुले येतात ते झुडूप एके ठिकाणी दिसले. जवळच "रडणार्‍या चेरी चे झाड (विपींग चेरी)",बघुन काय वाटले ते लिहीण्याचा प्रयत्न.

भेटता रक्तस्त्राव हृदय फुले
कळाली अमर प्रेम कहाणी
"ब्लिडींग हार्ट" नाव त्यांचे
गात आहेत विरह गाणी

वेदना त्याच्या जीवाच्या
तेव्हांच मला कळाल्या
भंगून हृदय जेंव्हा
रक्त पाकळ्या गळाल्या

घालून मान खाली,
वृक्ष (विपींग चेरी)अश्रु ढाळीत होते
जणू जखमेवरी तयांच्या
फुंकर घालीत होते

लेवूनी पुष्पे भग्न दिलाची
झुरते आपुल्या मनाशी
आजुनही जपत आहे
कहाणी भंगल्या दिलाची

अपसूक मी वदलो,
ऐक बोल अनुभवाचे
दु:खात असते का कधी
कोण कुणी कुणाचे?

ऐशा किती कहाण्या
आणी किती विराण्या
जगतास काय त्याचे
मग अर्थ काय झुरण्याला!!!!....

निसर्गप्रेम कवितामुक्त कवितासांत्वनाप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

श्रीगणेशा's picture

27 May 2022 - 8:29 am | श्रीगणेशा

"ब्लिडींग हार्ट" नाव त्यांचे
गात आहेत विरह गाणी

कर्नलतपस्वी's picture

27 May 2022 - 7:39 pm | कर्नलतपस्वी

चर्चेची मिसळ
लेखांची भेळ
कवितांकडे बघायला
कुणाला नाही वेळ

भंटकंतीचा वडापाव
शशकांचा पिझ्झा
शेअर्स मधली गोडी
कवितांमधे नाही तसली मज्जा

प्रेमाची रडगाणी,भंगलेली हृदयं
करतात डोक्याचं दही
म्हणून त्यांच्या वाटेला
कुणी जात नाही

धन्यवाद श्रीगणेशा

श्रीगणेशा's picture

27 May 2022 - 10:35 pm | श्रीगणेशा

प्रेमाची रडगाणी,भंगलेली हृदयं
करतात डोक्याचं दही

हे खरं आहे :-)

आणि काही कविता तर इतक्या अवघड की परत परत वाचल्या तरी अर्थ समजतो की नाही ही शंका राहतेच. त्यापेक्षा त्या वाटेला न गेलेलं बरं, असं वाचकाला वाटणं स्वाभाविक आहे.

बाकी, ही (कवितांकडे बघायला, कुणाला नाही वेळ) उत्स्फूर्त रचनाही छान जमली आहे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 May 2022 - 6:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली रचना. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी's picture

27 May 2022 - 7:41 pm | कर्नलतपस्वी

बिरूटे सर धन्यवाद.

चामुंडराय's picture

29 May 2022 - 4:40 am | चामुंडराय

BH1

कर्नलतपस्वी's picture

29 May 2022 - 6:16 am | कर्नलतपस्वी

तत्र अकुशल आसल्यामुळेच टाकू शकलो नाही.
आपण ती कमी पुरी केल्याबद्दल धन्यवाद.

अतंरजालावरून

रक्तस्त्राव झालेल्या हृदयाची कहाणी

एकेकाळी एक राजकुमार होता जो एका राजकुमारीवर प्रेम करत होता ज्याने त्याची दखल घेतली नाही. राजकन्येचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि त्याचे प्रेम सिद्ध करण्यासाठी, त्याने तिला दूरदूरवरून आश्चर्यकारक भेटवस्तू आणल्या.
एके दिवशी त्याला दोन जादुई गुलाबी ससा दिसला आणि त्याने ते दोन्ही राजकन्येला देऊ केले. (कथाकार दोन बाह्य गुलाबी पाकळ्या काढतो आणि प्राणी दाखवण्यासाठी प्रत्येक बाजूला ठेवतो.)

राजकन्या सशांमुळे अविचल होती, म्हणून त्याने पुन्हा प्रयत्न केला आणि तिला सुंदर झुमके दिले. (दोन आतील पांढऱ्या पाकळ्या वेगळ्या केल्या आहेत आणि प्रदर्शनासाठी कथाकाराच्या कानाजवळ धरल्या आहेत.)

तरीही, राजकुमारीने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. राजपुत्र तिरस्कारामुळे इतका व्यथित झाला की त्याने खंजीर घेतला आणि स्वतःवर वार केला. (फुलांच्या उरलेल्या मध्यभागी मध्यभागी एक रेषा असलेल्या हृदयाच्या बाह्यरेषेप्रमाणे आकार दिला जातो. हृदय वर ठेवले जाते, खंजीर सारखी रेषा काढून टाकली जाते आणि कथाकार हृदयाच्या मध्यभागी "चाकू" बुडवतो.)

राजकन्येला खूप उशीरा कळले की तिचे राजपुत्रावर प्रेम आहे, ती ओरडली, "माझ्या राजपुत्रासाठी माझ्या हृदयात आणखी रक्तस्त्राव होईल!" आणि तिचे हृदय आजपर्यंत रक्तस्त्राव करत आहे.

कर्नलतपस्वी's picture

29 May 2022 - 6:20 am | कर्नलतपस्वी

प्रत्यक्ष फुल तोडून वरील माहीती पडताळून बघितली,

देवाची करणी आणी नारळात पाणी.
कमाल आहे.