१००व्या ईबुकचे लोकार्पण...

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
17 Mar 2022 - 10:11 pm

मित्रहो,
ज्या मिसळपावने मला अनेक वाचक दिले. माझ्या लेखनाचा आस्वाद घेतला. त्या संस्थळाला माझे अभिवादन आणि धन्यवाद.
१००वे ईबुक प्रकाशित करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
निमंत्रण आणि कार्यक्रम पत्रिका सोबत देत आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून उपस्थित रहा ही आग्रहाची विनंती.
ह्या पुस्तिका रुपातील सादरीकरणात ९० टक्के पुस्तकातील विषय मिपावून आधीच सादर झाले आहेत. अनेक धागे पुन्हा संपादित करून सादर केले आहेत.
ज्यांना या कार्यक्रमाला उपस्थित रहायचे असेल त्यांनी ९८८१९९१९४९ वर कळवल्यास आनंद होईल

४

६

https://alkaoaksebookshoppy.online/

७

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Mar 2022 - 10:15 pm | मुक्त विहारि

अभिनंदन

एक विचारणा...
ओकांच्या स्टाईलप्रमाणे ते एक पत्ता ते खिशात ठेऊन सस्पेन्स तयार करतात कि काय?
कार्यक्रम रविवार, दिनांक २० मार्च २०२२रोजी सायंकाळी ५ ते ८ मेहेंदळे गॅरेजपाशी मनोहर बँक्वेट हॉल दुसरा मजला (लिफ्टची सोय आहे) येथे आहे.
अल्पोपहारानंतर ओक आपल्या १०० पुस्तकांची ओळख करून देतील आणि एक प्रेझेंटेशन सादर करतील.
ही सर्व पुस्तके खरेदी करायला किती खर्च येईल? या विचारणेला उद्या उत्तर मिळेल...

कंजूस's picture

18 Mar 2022 - 6:55 am | कंजूस

उपक्रम असाच सुरू राहे दे.
शुभेच्छा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Mar 2022 - 7:54 am | ज्ञानोबाचे पैजार

अभिनंदन आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा.

मार्च एन्डिंग सुरु असल्याने रविवारी सुध्दा कामावर जावे लागेल असे चिन्ह आहे. पण लवकर कलटी मारायचा प्रयत्न करेन.

रच्याकने एक सूचना :- कार्यक्रमाच्या आधी आल्पोपहार ठेवल्यास कार्यक्रम संपेपर्यंत पर्यंत थांबणार्‍या श्रोत्यांच्या संख्येत लक्षणिय घट होउ शकते.

पैजारबुवा,

मुक्त विहारि's picture

18 Mar 2022 - 10:14 am | मुक्त विहारि

दर्दी थांबतील आणि भोजनभाऊ घरी जातील

100 पेक्षा 5 जास्त उत्तम ...

शशिकांत ओक's picture

18 Mar 2022 - 11:10 am | शशिकांत ओक

आपण १०० जणांची पाचांशी तूलना करून भोजनादि बंधन मुक्तांची केलेली प्रशंसा भावली.

शशिकांत ओक's picture

18 Mar 2022 - 11:24 am | शशिकांत ओक

पैजार बुवा,
किचकट, कटकटीचे हिशोब व्यवस्थापना भावतील असे तयार करण्यात आपण तरबेज आहात.
मारा कलटी आणि या..!

कर्नलतपस्वी's picture

18 Mar 2022 - 8:33 am | कर्नलतपस्वी

अभिनंदन.

दुर्गविहारी's picture

18 Mar 2022 - 10:39 am | दुर्गविहारी

हार्दीक अभिनंदन !

शशिकांत ओक's picture

18 Mar 2022 - 11:28 am | शशिकांत ओक

माझ्या अनेक धाग्यांना आपल्या अनुभवाची आणि ऐतिहासिक वाचनाची जोड मिळाली आहे. महाराणा प्रतापांच्या प्रेझेंटेशन तयार करण्यात आपले योगदान महत्त्वाचे ठरले.

बर्फीचा जादा प्रसाद देऊन सत्कार करण्यात येणार आहे...
जे या कार्यक्रमावर आधारित धागा मिपावर सादर करतील त्यांना शाल व श्रीफळ देऊन आधीच गौरविण्यात येणार आहे.
तेंव्हा सर्व मिपाकरांना आग्रहाने निमंत्रण देत आहे.

Nitin Palkar's picture

18 Mar 2022 - 11:37 am | Nitin Palkar

अभिनंदन आणि शुभेच्छा.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Mar 2022 - 5:01 pm | प्रकाश घाटपांडे
शशिकांत ओक's picture

18 Mar 2022 - 10:58 pm | शशिकांत ओक

आपण ही क्लिप सादर करून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
अदभूत घटना प्रत्यक्षात घडतात. श्रद्धा आणि श्रम यांच्या संगमात दिव्य शक्ती पाठीशी उभ्या राहतात. याचे ते प्रतिकात्मक रूप आहे.
नातलगांना घरगुती मराठीत पत्रव्यवहारात मराठी वापरणारा मी, एकदम एका रात्री अंधारछाया कादंबरी लिहायला घेतो हे ही मला पडलेले गूढ आहे...
ऑटोरायटिंग करताना त्यात ऑटोरायटिंग म्हणजे काय? ते करून काय उपयोग होतो? ते नेमके कोण करतो? 'श्रद्धा भाव नसेल तर बंद कर' हा संबंध असे सांगणारे माझे दिवंगत वडील! वगैरे विषय मला ईबुक माध्यमातून सादर करावेसे वाटले.

असे वाटले होते...
कदाचित अंनिसची त्याच वेळी सभा असावी. असो.
नाडी भविष्य विषयावर पुस्तके उपलब्ध आहेत.

प्रकाश घाटपांडे's picture

12 Apr 2022 - 4:17 pm | प्रकाश घाटपांडे

कंटाळा हा एकमेव कारण घडले न येण्याचे. इच्छेवर कंटाळयाने मात केली. तसे ही अशा माहोल मधे आपल येण हे फार औपचारिक होते.

शशिकांत ओक's picture

7 Apr 2022 - 1:52 am | शशिकांत ओक

उघडून पाहिली असेल कोणास ठाऊक!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Mar 2022 - 5:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन आणि शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे
(शुभेच्छुक)

पाषाणभेद's picture

18 Mar 2022 - 8:45 pm | पाषाणभेद

वा वा!
अभिनंदन!

आपल्या पुस्तकांचे लवकरच द्विशतक होवो या शुभेच्छा!

नमस्कार मित्रांनो,
१००व्या ईबुकच्या लोकार्पण कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून एयर मार्शल भूषण गोखल्यांनी, हवाईदलातील वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरील विंग कमांडर शशिकांत ओकांच्या पुस्तकांचा परामर्ष घेतला. २०१० सालच्या मंगलोर विमान अपघातातील चौकशीचे प्रमुख म्हणून सखोल माहिती त्यांनी दिली.
लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी तरूण वयात काश्मीरातील आतंकवाद्यांचा कसा खातमा केला होता. यावर प्रकाश टाकला. शिवाजी महाराज आणि पेशवेकालीन लढाया यावर मिलिटरी कमांडरच्या दृष्टीने विचार मांडले.
ग्रहांकित मासिकामुळे मराठी वाचकांना नाडीग्रंथ भविष्य विषयाची माहिती मिळाली, असे श्री चंद्रकांत दादा शेवाळे यांनी म्हटले. श्री भारवि अवधानी यांनी नाडी ग्रंथावरील अद्भूत घटना सांगून नाडी भविष्याने अंनिसला कसे चक्रावून टाकले होते यावर भाष्य केले.
त्या कार्यक्रमात ३७० ई-बुक्स लोकांनी विकत घेतली.
१००व्या ईबुकचे वैशिष्ट्य म्हणजे ते गुजराती भाषेत कै. मेधा दिवेकर यांना समर्पित आहे. त्या न्यूझीलंडहून यांच्या हस्ताक्षरातील गुजराती भाषांतर मला पाठवत. ते सुरतेच्या दैनिक सामना टाईम्समधे दर रविवारी धारावाहिक प्रसिद्ध होत असे.
आता ते ३२० पानी हस्तलिखित रूपाने प्रकाशित झाले आहे.
सर्व ईपुस्तके १०,२०, ५० रुपये किंमतीची आहेत. गूगलपे फोन पे, पेटीएम वरून विकत घेऊन मोबाईलवर वाचायला मिळतात.
https://alkaoaksebookshoppy.online

कंजूस's picture

27 Mar 2022 - 9:19 pm | कंजूस

archive dot org वर दिसते आहे। ते आणि नाडी ग्रंथ वेगळे का?

शशिकांत ओक's picture

27 Mar 2022 - 10:20 pm | शशिकांत ओक

नाडी ग्रंथ भविष्य आणि भृगुसंहिता यातील फरक आणि साम्य नावाने एक ई-बुक आहे ते वाचावे.

शशिकांत ओक's picture

7 Apr 2022 - 1:58 am | शशिकांत ओक

सहसा लेखकाच्या हस्ताक्षरातील लेखन पुस्तक रूपाने प्रकाशित झाल्याचे दिसून येत नाही.
१००व्या ईबुकचे वैशिष्ट्य म्हणजे ते गुजराती भाषेत कै मेधा दिवेकर यांच्या गुजराती हस्ताक्षरात प्रकाशित झाले आहे. किंमत माफक ₹५० आहे.
कोणी गुजराती भाषा जाणकारांनी ते वाचून अभिप्राय जरूर कळवा. म्हणजे तो ही सादर करता येईल.