द काश्मीर फाइल्स

निनाद's picture
निनाद in काथ्याकूट
9 Mar 2022 - 9:04 am
गाभा: 

द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या चर्चेसाठी हा धागा काढत आहे.
हा चित्रपट भारतातल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना, दु:ख, संघर्ष यांचे चित्रण आहे. ९० च्या दशकात काश्मिर खोर्‍यात केल्या गेलेल्या हिंदुंच्या कत्तलीचे एक डॉक्युमेंटेशन तरी करतो. आजवर असा प्रयत्न ही झालेला नाही. लेखक दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हिंदी भाषेत याची निर्मिती केली आहे.
११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रमुख कलाकार अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आदी आहेत.

या चित्रपटाला विरोध झाला आहे. याविरुद्ध याचिकाही दाखल करण्यात आली होती. आता या चित्रपटाची चर्चा ही होऊ नये म्हणून दडपून टाकण्याचे प्रयत्न चालले आहेत असे दिसते. उदा: काश्मिरच्या हिंदूंचा ज्वलंत विषय असूनही कपिल शर्मा शो ने याचे प्रमोशन नाकारले आहे. आपल्याच इंडस्ट्रीतील सिनेमा असूनही विषय हिंदू विषयक असल्याने कोणत्याही खान किंवा प्रस्थापित चित्रपट कलावंतांनी द काश्मीर फाइल्सचा उल्लेख पूर्णपणे टाळला आहे.
या चित्रपटाची चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे.

प्रतिक्रिया

निनाद's picture

9 Mar 2022 - 9:07 am | निनाद

चित्रपटाचा ट्रेलर येथे पाहता येईल

चित्रपट जरूर पहावा असा असणार आहे.

६ मार्च रोजी, दिल्लीमध्ये काश्मीर फाइल्सचे प्री-रिलीझ स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. समाजातील अनेक क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांना तसेच काश्मिरी हिंदूंना स्क्रीनिंगसाठी आमंत्रित करण्यात आले होते. काश्मीर मधील नरसंहाराच्या क्रूर कथेची मांडणी भिडणारी आहे असे मत श्री ढिल्लन यांनी व्यक्त केले आहे.

निनाद's picture

9 Mar 2022 - 9:18 am | निनाद

इंडिया टुडे चा लेख म्हणतो की, या अशा कथा आहेत ज्या सांगायला हव्यात. फुटीरतावाद्यांसाठी कितीही कडवट असले तरी हे सत्य सांगितले पहिजे!

फारुख अहमद दार उर्फ ​​बिट्टा कराटेची व्यक्तिरेखा चिन्मय मांडलेकरने उत्तमपणे साकारली आहे. या बिट्टाने काश्मिरी हिंदूंना अतिशय क्रूरपणे हालहाल करून मारल्याची उघडपणे कबुली दिली असतानाही काश्मिरी वाटाघाटीसाठी याला बोलावले जात होते.

सौंदाळा's picture

9 Mar 2022 - 10:13 am | सौंदाळा

नक्की बघणार

कर्नलतपस्वी's picture

9 Mar 2022 - 10:41 am | कर्नलतपस्वी

वरवर वाटणारे स्थानिक प्रश्न देशाच्या एकता आणी अखंडतेवर जबरदस्त परीणाम करतात.पंजाब,असम किंवा काश्मीर याची झळ इतर प्रदेश, राज्यातील लोकांपर्यंत पोहोचत नाही.आजही कशमीरी विस्थापित पंडित पुण्यातही दिसतात.कर्मधर्म संयोगाने खोर्‍यात काम करत असताना बरोबरच काम केलेले एक काश्मीरी पंडित आमच्याच काॅलोनीत राहातात जवळपास रोजच भेट होते.विस्थापित पंडितांचे दुख यावरील चर्चेत त्याचे डोळे भरून येतात.
शाळेत इतीहासा बरोबरच करंट अफेअर्स पण एक विषय हवा.विषयाची व्याप्ती हळुहळू वाढवत नेली पाहिजे.याचा उपयोग स्पर्धा परीक्षेत
तर होईलच पण विचार मधे सुध्दा परिपक्वता येईल आसे मला वाटते.

चंद्रसूर्यकुमार's picture

9 Mar 2022 - 11:20 am | चंद्रसूर्यकुमार

शाळेत इतीहासा बरोबरच करंट अफेअर्स पण एक विषय हवा.विषयाची व्याप्ती हळुहळू वाढवत नेली पाहिजे.याचा उपयोग स्पर्धा परीक्षेत तर होईलच पण विचार मधे सुध्दा परिपक्वता येईल आसे मला वाटते.

फक्त या विषयाचा अभ्यासक्रम डिझाईन करणार्‍यांमध्ये कोणीही जनेयुवगैरे ठिकाणचे नकोत. कारण या लोकांच्या लेखी हिंदूंच्या हालअपेष्टांना शून्य किंमत असते. ३७०वे कलम रद्द केल्यानंतर काश्मीर खोर्‍यात ३-४ महिने मोबाईल इंटरनेट बंद ठेवण्यात आले होते त्यामुळे तिकडच्या लोकांना स्विगी आणि उबर वापरता आले नाही म्हणून गळे काढणारे पुरोगामी विचारवंत मी बघितले आहेत पण इतकी वर्षे काश्मीरी हिंदू नक्की कोणत्या स्थितीत राहात आहेत याचा त्यांना सोयीस्कर विसर पडलेला असतो. त्या लोकांवर ते हिंदू आहेत या एकाच कारणाने अत्याचार करण्यात आले आहेत हे समजून यायला काही रघुराम राजन किंवा अभिजीत बॅनर्जीच्या आय.क्यू ची गरज नाही. तरीही या सेक्युलर पोपटांना ती गोष्ट दिसत नाही. त्यामुळे असले घाणेरडे लोक अभ्यासक्रम डिझाईन करणार्‍यांमध्ये नकोत. खरं तर असले लोक कुठेच नकोत. या लोकांना आणि त्यांच्या स्वयंसेवी संस्थांना जोपर्यंत मान मिळत आहे तोपर्यंत आपले काहीही चांगले होऊ शकणार नाही. असल्या लोकांवर कडकडीत बहिष्कार हाच मार्ग अवलंबायला हवा.

काश्मीर फाईल्स हा चित्रपट असल्या लोकांच्या ढोंगाला उघडे पाडायला मदत करेल. त्यामुळे मी तो चित्रपट नक्कीच बघणार आहे.

कर्नलतपस्वी's picture

9 Mar 2022 - 11:38 am | कर्नलतपस्वी

+1

कर्नलतपस्वी's picture

9 Mar 2022 - 11:38 am | कर्नलतपस्वी

+1

चौथा कोनाडा's picture

9 Mar 2022 - 11:53 am | चौथा कोनाडा

+11

तथाकथिक निधर्मांधाना ते दिसते पण बोलायचे नाही.

तरीही या सेक्युलर पोपटांना ती गोष्ट दिसत नाही.

Bhakti's picture

9 Mar 2022 - 12:04 pm | Bhakti

+१११

प्रदीप's picture

9 Mar 2022 - 12:15 pm | प्रदीप

१०१ %.

फक्त या विषयाचा अभ्यासक्रम डिझाईन करणार्‍यांमध्ये कोणीही जनेयुवगैरे ठिकाणचे नकोत

त्याच्प्रमाणे, 'आम्ही गेल्या सात वर्षांत पाठ्यक्रमांच्या पुस्तकांत एक ओळही बदललेली नाही' असली फुशारकी मारणारे बुळचट भाजपायी/ संघिष्टही अजिबात नकोत.

निनाद's picture

9 Mar 2022 - 12:19 pm | निनाद

त्याच्प्रमाणे, 'आम्ही गेल्या सात वर्षांत पाठ्यक्रमांच्या पुस्तकांत एक ओळही बदललेली नाही' असली फुशारकी मारणारे बुळचट भाजपायी/ संघिष्टही अजिबात नकोत. १००% सहमत आहे

चौथा कोनाडा's picture

9 Mar 2022 - 11:54 am | चौथा कोनाडा

बघावा लागेल,
बघणार आहे!

यश राज's picture

9 Mar 2022 - 1:04 pm | यश राज

+११

कर्नलतपस्वी's picture

9 Mar 2022 - 1:11 pm | कर्नलतपस्वी

थोडे विषयांतर होत आहे, पहिलीच्या new find out या पुस्तकात
स्पोर्ट्स स्टार म्हणून बोल्ट आणी रोनाल्डो यांची नावे व फोटो दिले आहेत. शंका नाही ते मोठे खेळाडू आहेत पण भारतीय खेळाडूंची नावे का नाहीत, निरज ,राज्यवर्धन इ. ग्रेट इंडियन्स म्हणून सावरकर, पटेल,टिळक ,फुले,आंबेडकर इ नावे दिसण्या ऐवजी इंदिरा गांधी आणी मदर टेरेसा आणी मुख्य म्हणजे फेमस अक्टर्स म्हणून शहारूख,आमीर,प्रियांका,इरफान दीपिका आणी रणबिर कपूर .

कीव येते या शिक्षण तज्ञांची. आपण देशाचे भवितव्य आणी भविष्य घडवतो याचे भान दिसत नाही.

आजच्या या मोबाईल पिढीला याच्या पेक्षा जास्त माहिती आहे.

sunil kachure's picture

9 Mar 2022 - 1:16 pm | sunil kachure

देशातील जाती,धर्माच्या भिंती आर्थिक प्रगती करून पाडून टाका.
इथे सर्व वास्तू इतक्या महाग आहेत की सर्वात गरीब भारतात आहेत त्यांना दोन वेळ हे जेवण पण मिळत नाही.
भारत म्हणजे गरीब लोकांचा देश ही अवस्था आहे
आणि राजकीय पक्ष आणि त्यांचे पाठी rakhe .
कुठल्या भलत्याच विश्वात असतात.
इथे जी मुस्लिम आहेत ते असणार च आहेत.
उगाच द्वेष निर्माण करू नका.
सर्वांना सोबत घेवून जाणारा राजकीय पक्ष पाहिजे.
आणि वेळ आली तर स्व धर्मीय असू नाही तर कुटुंबातील त्याला पण फासावर लटकवणारा नेता पाहिजे.

मी बहुतेक फक्त तिकीट काढेन, चित्रपटाला पाठिंबा म्हणून.
हा चित्रपट 3 तास बघण्याची क्षमता माझ्यात असे असे मला वाटत नाही..

नावातकायआहे's picture

9 Mar 2022 - 7:25 pm | नावातकायआहे

नक्की बघणार!!

जेम्स वांड's picture

10 Mar 2022 - 8:08 am | जेम्स वांड

लवकरच बघावा लागेल, विवेक रंजन अग्निहोत्रीनं मागे काढलेल्या हू किल्ड शास्त्री ह्या विषयावर आधारित ताशकंद फाईल्सने भ्रमनिरास केला होता मजबूत, ह्या विषयात तरी तो फ्रंटफूटवर येऊन खेळला असेल अशी अपेक्षा आहे, ती पूर्ण न झाल्यास वाईट वाटेल मात्र नक्कीच.

चौकस२१२'s picture

10 Mar 2022 - 6:37 pm | चौकस२१२

ताशकंद फाईल्सने भ्रमनिरास केला होता
हो मलहि तसेच वाट्ते

सगळ्या तथाकथित पुरोगाम्यांना हे पचणार नाही
अनुपम चोप्रा या प्रसिद्ध समीक्षक सुद्धा बघा याची समीक्षा करनार र्नाहीत किंवा केली तरी नाराजीचा सूर असणार ( त्यांचे पती वैदू विनोद हे स्वतः काश्मीर ) त्यांनी "मनकर्णिका" कडे असेच दुर्लक्ष केलं होत

- तान्हाजी, बाजीराव मस्तानी, पानिपत , मनकर्णिका , मराठीतील रमा माधव, फर्जद , फत्तेशीकस्त , पावनखिंड आणि काश्मीर फाईल्स असले चित्रपट पुरोगामी सर्वधर्मभावी भारतात "बनलेच कसे " असा प्रश्न काही लोकांना पोटशूळ उठतो

कॉमी's picture

10 Mar 2022 - 7:47 pm | कॉमी

तुम्ही दिलेल्या सिनेमामुळे "पुरोगाम्यांना" काही पोटशूळ वैगेरे उठला नाही. ताशकंद फाईल्स काय पहिला नव्हता, कारण ट्रेलर पाहून भारी प्रोपोगंडा वाटला. तानाजी पहिले काही मिनिटं बघून बंद केला, अत्यंत टुकार सिनेमा वाटला. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, बाजीराव मस्तानी तर सर्वप्रिय सिनेमे आहेत.
खरोखर काय होते बघा- माय नेम इज खान, जोधा अकबर, पद्मावत या सिनेमांना प्रदर्शित होण्यासाठी झगडावे लागते. झुंड वर उगाचच ब्राम्हणविरोधी, विखारी म्हणून टीका होते, सैराट "मुलांना बिघडवणार" अशी टीका होते.

अनुपमा चोप्राचे नाव घेतले म्हणून- ताशकंद फाईल्स वर तिच्या सहकार्याने असला बँगर रिव्यू लिहिलेला कि हसून हसून पुरेवाट झालेली. त्यावरून विवेकजी अग्निहोत्री (facts are not facts वाले) इतके तंतरेलेले कि अनुपमा चोप्राबद्दल असभ्य भाषेत ट्विट करता होते, माझ्याविरुद्ध "कुभांड" रचतायत वैगेरे रडलेले.यांच्या सिनेमाबद्दल नकारात्मक रिव्ह्यू म्हणजे "कुभांड" होय.

नक्की वाचा- A second hand history lesson in third rate politics

चौकस२१२'s picture

11 Mar 2022 - 6:55 am | चौकस२१२

सिनेमाबद्दल नकारात्मक रिव्ह्यू म्हणजे "कुभांड" होय... असं मी म्हणत नाहीये
अनुपम चोप्रा जर निपक्षपाती सिने टीकाकार पत्रकार म्हणवतात आणि तरी जाणून बुजून अश्या चित्र पटांकडे दुर्लक्ष करतात असा अनेकांचा आरोप आहे.. कारण त्यांना असेल चित्रपट जणू हिंदुत्ववाद्यांचा प्रोपोगांडा वाटतो ...
राजदीप जेवहा निपक्ष पत्रकार म्हणून एकाच बाजूने ढोल बडवतो तेव्हा त्यावर जशी टीका होते तसेच आहे हे काहीसे

मी उल्लेखलेलीय चित्रपट त्रुटी आणि एक चित्रपट म्हणून त्यातील काही सुमार दर्जाचे असतील हि .. अग्निहोत्रींनचा काश्मीर फाईल हा चित्रपट सुद्धा कदाचित फार भारी नसेलही .. पण त्याची दखल जेहें हे टिकाकराच कर्तव्य आहे

आता बोलतो बाजीराव मस्तानी बद्दल , यांवरून माझेही "अगदी कर्मठ हिंदुत्ववाद्यांनशी वाद झाले आहेत
पिंगा = मंगळागौर . त्यात काय गैर ते काय? फक्त स्त्रिया असे उत्सव खाजगीत साजरे करायायच्या कि
मल्हारी: = चपखल गाणे .. पेशवे बाजराव हे केवळ खलबते करणारे नवहते तर ते सामान्य सैनिकांच्यात मिळून मिसळून , झालेलया अनोख्या ( अतरंगी ) विजयाचा आनंद साजरा करीत आहेत हे दाखवलाय .. काय गैर त्यात.. आप्ल्याला पेशवे म्हणजे फक्त छान कपडे घालून दरबारात खलबते करणारे असे बघायची सवय झालेल्याना हे पचले नाही ! .. खास करून शेवटी त्यांचे सैनिक मानवी सिहांसन करून त्यावर बाजीराव बसतो , हे एक, त्याला सर्वसामान्य सैनिकाने स्वीकारण्याचे प्रतीक असे दिग्दर्शकाला दाखवयायचे होते असे मला वाटते ....

असो एकूण काय कि असे मराठा साम्राज्यवार ऐतिहसिक चित्रपट निघतील त्यात अर्थातच मुघलनचं विरुद्ध असे प्रसंग असणार कि , पोटशूळ मि म्हणले ते हे कि असे चित्रपट "निघालेच कसे आणि त्यातील काही चालेलच कसे कसे " यावर सर्व लिब्रा,,,,, वैतागलेली आहेत ( कारण त्यांना असे वाटते कि या चित्रपटातून "कोणा अल्पसंख्यान्कांच्या " भावना तर दुखावल्या जाणार नाहीत !)

काश्मीर फाईल अनुल्लेखाने मारणे हा असाच एक डाव आहे ( प्रत्यक्ष चित्रपट कदाचित तेवढा भारी नसेल हि .. त्यावर टीका होऊ शकते )

एक खुलासा : अनुसुमा चोप्रा या एक प्रभावी सिने टीकाकार आहेत हे मी हि मानतो ( त्यांनी झुंड वर पण चांगली टिपण्णी केली आहे )पण त्यांचा अजेंडा एकूण काय आह त्यांच्या या अनुल्लेखाने कळते
असो

कुठला अनुल्लेख अहो ? चित्रपट (काश्मीर फाईल्स) रिलीज होण्याआधीच अग्निहोत्री चोप्राच्या नावाने रडत होता, कि माझ्या विरुद्ध कुभांड रचले म्हणे. अत्यंत असभ्य भाषेत चोप्राचा उल्लेख केलेला. त्याचे समर्थक विधु विनोद चोप्राची जात काढून "हा काष्मीरी पंडित नाहीच" असे बोलत होते. अग्निहोत्रीचे सिनेमे टोकाचे डाव्यांना बॅशिंग करणारे असतात. इतके सगळे असून अग्निहोत्रीला डाव्यांनी त्याच्या सिनेमाचे प्रोमोशन करावे वाटत असेल किंवा गोग्गोड रिव्यू लिहावे वाटत असतील तर त्याच्यासारखा येडा तोच.

अग्निहोत्री कधी गुड फेथ मध्ये वागलाय का दुसऱ्यांकडून अपेक्षा करायला ??

निनाद's picture

13 Mar 2022 - 4:22 am | निनाद

वस्तुस्थिती दाखवली आणि डावी + इस्लामी+ तुकडे गँग यांची इकोसिसिटिम किती खोल रुजवलेली आहे हे उघडे पाडले आहे म्हणून अनुपमा चोप्राचा जळफळाट होणे साहजिक आहे आणि तुमचा ही साहजिक आहे.

चौकस२१२'s picture

14 Mar 2022 - 7:17 am | चौकस२१२

तुम्हाला नक्की काय म्हण्यायचाय ?
भारतात हिंदूंवर अन्याय झाल्याची जी ठळक उदाहरने आहेत तयावर कलाकृती काढायायचि नाही ?
भाईजान प्रेमाने एक छोट्र्या मुलीला आपला जीव धोक्यात घालून कसा सरहद पार करतो एवढेच दाखवयायचे

ओवेसी परवडला , पण तुमची विचारसरणी जास्त धोक्याची

कॉमी's picture

14 Mar 2022 - 8:06 am | कॉमी

जरूर काढावी, यश पण मिळावे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Mar 2022 - 5:55 pm | अनिरुद्ध.वैद्य

100 कोट कमावले म्हणे !

मुक्त विहारि's picture

19 Mar 2022 - 6:04 pm | मुक्त विहारि

अवघ्या सात दिवसांत सिनेमानं केली घसघशीत कमाई; १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश

https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-...

निनाद's picture

13 Mar 2022 - 4:25 am | निनाद

ताशकंद फाईल्स काय पहिला नव्हता, कारण ट्रेलर पाहून भारी प्रोपोगंडा वाटला. बरोबर आहे अडचणीचे प्रश्न विचारणारा चित्रपट असला तर मग तो प्रोपोगंडा! तुम्ही, एन्डीटिव्ही, अनुपमा चोप्रा, कपिल शर्मा ही एकच भाषा बोलतात तेव्हा नेमका प्रोपोगंडा उघडा पडून जातो!

जेम्स वांड's picture

10 Mar 2022 - 10:05 pm | जेम्स वांड

पुरोगामी बडवायचे तर खुशाल बडवा हो पण बाजीराव मस्तानीवर तर देशप्रेमीही खट्टू झाले होते की, पिंगा गाण्यावर टीका, बाजीरावच्या तोंडी असलेल्या डायलॉगवर टीका, कथानकावर टीका, जणू काही भन्साळी पैसा कमवायला नाही इतिहासाचे धडे द्यायला काढणार होता बाजीराव मस्तानी.

इथं बाजीराव मस्तानीला शिव्या घालणाऱ्यात पापभिरू, सज्जन, टॅक्सपेयर देशभक्त म्हणून नावाजलेले मिपाकर पण होते, आता काय करावं मग ? त्यांना लिब्रांडू म्हणावं का सिनेमाला एकंदरीत सगळीकडूनच शिव्या पडत होत्या म्हणावं चौकसजी ?

Bhakti's picture

10 Mar 2022 - 10:25 pm | Bhakti

शेवटी भन्साळीच तो,आधी मसाला भरून पैसाच कमावणार पण घुमर गाण सिनेमात घेण्यासाठी त्याला टेक्नोलॉजीने आक्षेपार्ह गोष्टी नीट कराव्या लागल्या ज्या पिंगाच्या बाबतीत नाही घडून शकल्या :(
इतिहास घडवणार्या प्रत्येक स्त्रीची प्रतिमा जपलीच पाहिजे.

जेम्स वांड's picture

10 Mar 2022 - 10:37 pm | जेम्स वांड

आर यु मिसिंग द पॉईंट एंटायरली ? एकदा रीव्हिजिट करा ही विनंती.

चौकस२१२'s picture

11 Mar 2022 - 6:56 am | चौकस२१२

बाजीराव मस्तानी बद्दल , यांवरून माझेही "अगदी कर्मठ हिंदुत्ववाद्यांनशी वाद झाले आहेत
पिंगा = मंगळागौर . त्यात काय गैर ते काय? फक्त स्त्रिया असे उत्सव खाजगीत साजरे करायायच्या कि
मल्हारी: = चपखल गाणे .. पेशवे बाजराव हे केवळ खलबते करणारे नवहते तर ते सामान्य सैनिकांच्यात मिळून मिसळून , झालेलया अनोख्या ( अतरंगी ) विजयाचा आनंद साजरा करीत आहेत हे दाखवलाय .. काय गैर त्यात.. आप्ल्याला पेशवे म्हणजे फक्त छान कपडे घालून दरबारात खलबते करणारे असे बघायची सवय झालेल्याना हे पचले नाही ! .. खास करून शेवटी त्यांचे सैनिक मानवी सिहांसन करून त्यावर बाजीराव बसतो , हे एक, त्याला सर्वसामान्य सैनिकाने स्वीकारण्याचे प्रतीक असे दिग्दर्शकाला दाखवयायचे होते असे मला वाटते ....

असो एकूण काय कि असे मराठा साम्राज्यवार ऐतिहसिक चित्रपट निघतील त्यात अर्थातच मुघलनचं विरुद्ध असे प्रसंग असणार कि , पोटशूळ मि म्हणले ते हे कि असे चित्रपट "निघालेच कसे आणि त्यातील काही चालेलच कसे कसे " यावर सर्व लिब्रा,,,,, वैतागलेली आहेत ( कारण त्यांना असे वाटते कि या चित्रपटातून "कोणा अल्पसंख्यान्कांच्या " भावना तर दुखावल्या जाणार नाहीत !)

जेम्स वांड's picture

11 Mar 2022 - 7:59 am | जेम्स वांड

चौकसजी, पण एकंदरीत देशप्रेमी जनतेनेही त्याकाळी निरर्थक गिल्ला केला होता असे मी म्हणतोय, त्यामुळे असल्या सिनेमांना फक्त लिब्रांडू लोकांनी विरोध केला म्हणण्याला फारसा आधार नसावा असे मी सुचवतोय.

चौकस२१२'s picture

14 Mar 2022 - 7:22 am | चौकस२१२

कंदरीत देशप्रेमी जनतेनेही त्याकाळी निरर्थक गिल्ला केला होता
हो सहमत आहे .. पण मी त्या यादीत त्या चित्रपटाचा उल्लेख केला कारण कि विषयाला धरून होते . पूर्वी चाह्या (पोलिटिकल करेकंटनेस ) राज्यात असल्या विषयवार ( ज्यात सरळ स्वराज्यासाठी हिंदू ना मुस्लिम आक्रमकांशी लढावे लागले हे सरळ सरळ दाखववयाला जवळ जवळ वैचारिक बंदी होती )

जेम्स वांड's picture

14 Mar 2022 - 8:26 am | जेम्स वांड

कुठल्या राज्यात कसली वैचारिक बंदी होती ते.

"अल्पसंख्यांकांच्या भावना दुखावतील ना" हे ४७ पासून चालू आहे ... अदृश्य बंदी ! सोंग किती करता राव !
जणू बहुसंख्यकांना भावनांच नाहीत
कोणी म्हणत नाहीये कि हिंदुत्ववादी वैग्रे बना म्हणून पण निदान निधर्मी खरा सर्वधर्म संभव तरी राबवा हो.. किती ना समजल्यासारखा करताय .. जगभर २ अब्राहमीक धर्म एकमेकांवर कुरघोडी करत असताना हिंदूंना आणि बुद्धांना आणि शिखांना कसे हळू हळू नामशेष करण्याचा अजेंडा राबवत आहेत ते जरा बघा, जगात
ओळीने अश्या विषयवार बिनधास्त चित्रपट काढले आणि ते चालले कि सुरु जळफळाट ...

जेम्स वांड's picture

14 Mar 2022 - 10:49 am | जेम्स वांड

:O

मी कुठं म्हणतोय बहुसंख्याक लोकांनां भावना नसतात ? मला कश्याला पर्सनल होऊन बोलताय सरजी आपण ?

कर्नलतपस्वी's picture

10 Mar 2022 - 8:46 pm | कर्नलतपस्वी

व्यावसायिक दृष्टिकोन हा प्रमुख उद्देश असतो. समाज विरोधी, समाजविघातक समाजभिमुख आशी वादळे उठवून बाॅक्स ऑफिस वर जास्तीत जास्त पैसे कमवायचे.कोट्यावधी पैसे कमवल्यावर समाज हिता साठी लावणारे कमीच.

निनाद's picture

13 Mar 2022 - 4:20 am | निनाद

विवेक रंजन चे व्हिडियो पाहिले असता असे काही असेल असे वाटत नाही. पण तुमचे म्हणणे बॉलिवुड गँग बाबत खरे असू शकते. तेथे कमावलेले पैसे त्यांच्या साहेबांकडे कसे जात असतील याचे अनुमान काढता येते.

हरियाणा सरकारने 'द काश्मीर फाइल्स' करमुक्त घोषित केला, तिकिटांवर कोणताही राज्य जीएसटी आकारला जाणार नाही. या आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की चित्रपटगृहे ग्राहकांकडून राज्य जीएसटी वसूल करणार नाहीत आणि राज्य जीएसटीची रक्कम वजा करून तिकीटे किमतीत विकावी लागतील.

मुक्त विहारि's picture

12 Mar 2022 - 7:19 am | मुक्त विहारि

स्वतःला हिंदू हितवादी समजणारी, शिवसेना, ह्या बाबतीत काय निर्णय घेणार? हे बघणे रोचक ठरेल ...

प्रसाद_१९८२'s picture

12 Mar 2022 - 2:46 pm | प्रसाद_१९८२

महाविकास आघाडीत 'शिवसेने'ला काळ कुत्र देखील विचारत नाही. सर्व अधिकार भ्रष्टवादी कॉंग्रेसच्या हातात आहेत आणि ते काही हिंदू हितवादी नाहीत. तेंव्हा करमुक्त तर सोडाच उद्या या चित्रपटावर महाराष्ट्रात बंदी नाही आणली तर ती मोठी गोष्ट होईल.

मुक्त विहारि's picture

12 Mar 2022 - 6:37 pm | मुक्त विहारि

सध्या हिंदू हितवादी भाजपचे विधानसभा निवडणूकीतले यश बघता, महाराष्ट्र सरकार, चित्रपट दाखवायला आक्षेप घेणार नाही.

उदारमतवादी हिंदूंना कसे हाताळायचे? हे कॉंग्रेसला नक्कीच माहिती आहे...

निनाद's picture

13 Mar 2022 - 4:17 am | निनाद

काही समाजाच्या लोकांनी मागणी केल्यामुळे भिवंडी मध्ये पीवीआर या थेटरने द काश्मीर फाइल्स चे शो बंद केले होते.
पण नागरिकांनी आवाज उठवल्यावर यातला एक शो दाखवला गेला आहे असे पळसुले यांच्या फेसबुक पोस्ट वरून कळते.
मुस्लिम बहुल शहरात या सिनेमाचे शोज दाखवू नयेत म्हणून दबाव आला असल्याचे संकेत आहेत असे दिसते आहे.

kashmir files वर फार लिहून आलयं.सर्व भावनाप्रधान कढ काढण्यावर आहे.
ही मार खाण्याची story झाली,
कधी मार देण्याची story असू शकते असा विचार केला नसेलच कोणी.

मला असं वाटतं पुढचा पिक्चर अग्नीहोत्री ने 'गोपाल पाठा' वर काढावा.

मराठीत आपण पठ्या म्हणतो, गड्या किंवा मित्रा याअर्थी, बंगाली पाठा म्हणत असावेत.

म्हणजे परीस्थीती हीच,किंवा याहून खराब कारण म.गांधी उपस्थीत.
फरक फक्त गोपाल पाठा उपस्थीत असणे....बास

check wikipedia

एक बंगाली खाटीक होता, गोपाल.
त्याला गोपाल पाठा म्हणायचे.

http://surajlmishra.blogspot.com/2019/10/gopal-patha.html?m=1

Trump's picture

13 Mar 2022 - 5:20 pm | Trump

kashmir files वर फार लिहून आलयं.सर्व भावनाप्रधान कढ काढण्यावर आहे.
ही मार खाण्याची story झाली,

आजकालचे जग आमच्यावर कसे अन्याय झाले किंवा होतायेत याचे रडगाणे गाण्याचे आहेत. पाशात्य माध्यमे, भारतीय हिंदु कसे क्रिश्चन आणि मुस्लीमावर अन्याय करत आहेत ह्याचे रडगाणे गातात. गुजरात दंगल, चर्चवर होणारे हल्ले याचे सारखेच पीठ पाडतात. आपण पण तेच केले पाहिजे.

बाजीगर's picture

13 Mar 2022 - 6:29 pm | बाजीगर
बाजीगर's picture

13 Mar 2022 - 6:30 pm | बाजीगर

आपल्यावर अमानूष अत्याचार झालाय, ह्याचं documentation आणि प्रसार झालाच पाहिजे, हे आपलं म्हणणं पटलं.
विषेशत: तरुणपिढी ला हे कळलं पाहिजे.

ते नक्कीच बघतील ....

सूनबाई, देखील आमच्या सारखीच, हिंदू हितवादी आहे...

मुक्त विहारि's picture

13 Mar 2022 - 5:24 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

रावसाहेब चिंगभूतकर's picture

14 Mar 2022 - 10:21 am | रावसाहेब चिंगभूतकर

गोपाल पाठा

धन्यवाद

रावसाहेब चिंगभूतकर's picture

13 Mar 2022 - 9:55 pm | रावसाहेब चिंगभूतकर

कायप्पा वरून साभार:

एक विनंती आहे. खूप जण म्हणत आहेत, "आम्हाला काश्मीर फाईल्स पाहवणार नाही" ठीक आहे! पण जरी पाहिला नाहीत तरी तिकिटे काढा. हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर तुफान चालला पाहिजे.
विवेक अग्निहोत्री यांनी नाना अडचणी आणि त्रास याला तोंड देत हिंदूंवरील अनन्वित अत्याचाराचा दाबून ठेवलेला सत्य इतिहास मांडायला हा चित्रपट बनवला. ही हिम्मत आतापर्यंत कोणीही केली नव्हती. त्यात बॉलिवूडमधील नशेडी , माफियाचे कुत्रे रिलीज करायला धड थिएटर मिळू देत नाहीयेत. कपिल शर्माने प्रमोशनला नकार दिला या बातम्या आपण ऐकतोय.
तरीही सगळ्याला तोंड देत सिनेमा रिलीज झालाय. खानांच्या तालावर नाचणाऱ्या बॉलिवूडमधील या प्रो हिंदू इकोसिस्टिमला फ़ंडिंग आपणच केले पाहिजे. हा पिक्चर जर चालला नाही तर भविष्यात कोणी हिंदूंच्या बाजूने बोलण्याची, वाचा फोडण्याची किंवा काही कलाकृती बनवण्याची हिंमत दाखवणार नाही हे लक्षात ठेवा!
त्यामुळे सर्व हिंदू भगिनी आणि बांधवांना हात जोडून विनंती आहे, की जरी तुम्ही चित्रपट पाहणार नसाल तरी तिकिटे काढा. मग सिनेमाला जा किंवा जाऊ नका. पण तिकिटे काढाच.

केंद्रात हिंदू वादी सरकार आहे पूर्ण बहुमत आहे सरकार का.
देशाच्या बहुसंख्य जनतेचा आजुन पण सरकार ल पाठिंबा आहे
सरकार कडे काश्मिरी पंडित न साठी काही ठोस कार्यक्रम आहे का?
त्यांच्या विषयी खरेच तळमळ असेल तर त्यांना त्यांच्या मुळ जागी परत त्यांना वसवले पाहिजे
त्यांच्या मालमत्ता परत मिळवून दिल्या पाहिजेत.
पण अशी काही योजना सरकार कडे नाही.
रडगाणे किती दिवस गाणार.
रडगाणे कोणी ऐकत नाही
ठोस उपाय पाहिजेत योजना पाहिजे.
इथे पण परत पोकळ भावना भडकून देण्याचा उद्योग च चालू आहे
काश्मीर फाईल ह्या सिनेमाचा आधार घेवून.
फक्त पोकळ प्रेम ..

चौकस२१२'s picture

14 Mar 2022 - 7:09 am | चौकस२१२

इथे पण परत पोकळ भावना भडकून देण्याचा उद्योग च चालू आहे
काश्मीर फाईल ह्या सिनेमाचा आधार घेवून.
फक्त पोकळ प्रेम
..

sunil kachure यांचा मी जाहीर धिक्कार करतो ...

प्रदीप's picture

14 Mar 2022 - 7:08 pm | प्रदीप

sunil kachure यांचा मी जाहीर धिक्कार करतो ...

आणि त्यांचे प्रतिसाद वाचून, त्यावर प्रतिसाद लिहीणार्‍या तुमच्यासकट सर्वांचा मी 'जाहीर धिक्कर' वगैरे करतो.

चंद्रसूर्यकुमार's picture

13 Mar 2022 - 11:25 pm | चंद्रसूर्यकुमार

बहुचर्चित काश्मीर फाईल्स चित्रपट बघितला. त्यात दाखविलेल्या घटनांविषयी शाळेत असताना झेलमची हाक म्हणून एका पुस्तिकेत आणि नंतर जगमोहन यांच्या My frozen turbulences in Kashmir या पुस्तकात वाचले होते.

मला पुरोगामी विचारवंत या जमातीविषयी जितकी घृणा आणि तिरस्कार आहे तितका माझ्या ओळखीतल्या कोणालाही असणे शक्य नाही. तरीही हा चित्रपट बघून त्यांच्याविषयीचा संताप आणखी वाढला आहे. अमेरिकेत झालेल्या घटनेवर हे लोक Black lives matter हे hashtag चालविणार. इस्राएल-Palestine मध्ये काही झाले की यांना लगेच मानवता आठवणार. पण मग काश्मीरी हिंदूचा विषय आला की मग यांच्या तोंडाला कुलूप लागते. खरं तर या लोकांसाठी All lives other than Hindu lives matter हा योग्य hashtag आहे. त्या लोकांचे धोरण तेच असते.

बस आता ठरले. या पुरोगामी विचारवंत आणि त्यांच्या स्वयंसेवी संस्थांवर कडकडीत बहिष्कार टाकायचा. समाजकार्याच्या नावावर हे लोक हिंदूविरोधी अजेंडा पुढे नेत असतात. त्या संस्थाना वाळीत टाकायचे. हे सगळे लोक इतके कट्टर मोदीविरोधी का असतात याचे खरे कारण मोदींनी या लोकांना मिळणारा चखणा बंद केला आहे. आणि हे असले लोक सिव्हील सोसायटीचे प्रतिनिधी असतील तर मरो ती सिव्हील सोसायटी. त्यांच्याविषयी कोणीही अश्रू ढाळायची गरज नाही.

निनाद's picture

14 Mar 2022 - 5:27 am | निनाद

या पुरोगामी विचारवंत आणि त्यांच्या स्वयंसेवी संस्थांवर कडकडीत बहिष्कार टाकायचा. समाजकार्याच्या नावावर हे लोक हिंदूविरोधी अजेंडा पुढे नेत असतात. त्या संस्थाना वाळीत टाकायचे.
हे आपण सर्वांनी करायचे आहे. म्हणजे दणका बसेल.

यांच्या एन जी ओज, यांचे वार्ताहर, यांचे चित्रपट समिक्षक, यांचे वकील, यांना सहाय्य करणारे प्राध्यापक या सर्वांना जेथे दिसेल तेथे उघडे पाडले गेले पाहिजे.
डावे पुरस्कृत चित्रपट बनवणारे - भट कुटुंबीय, खान मंडळी, बच्चन गट हे सर्व या इको सिस्टीमचा भाग आहेत हे लक्षात आले की अक्षरश: डोळे उघडतात. त्यातले एकमेकांचे संबंध सहजतेने दिसू लागतात.

चौकस२१२'s picture

14 Mar 2022 - 7:07 am | चौकस२१२

चंद्रसूर्यकुमार , १०००% सहंंमत

गामा पैलवान's picture

14 Mar 2022 - 12:41 am | गामा पैलवान

निनाद,

धाग्याबद्दल आभार.

मला हा चित्रपट बघायची इच्छा नाही. अगदी १९९० सालापासनं काय व कसं घडंत गेलं त्याची जाणीव आहे. परत तो विषय नकोसा वाटतो.

माझे बापजादेही काहीशे वर्षांपूर्वी असेच काश्मीरातनं हाकलले गेले होते. कदाचित जरा कमी हिंसक प्रकारे असेल, पण हाकलले गेलेले हे नक्की. काश्मीरातनं परतपरत हिंदूंची हाकलपट्टी होत होती. आज इतक्या शतकांनी त्यास वाचा फुटते आहे हे योग्य दिशेने पडलेलं पाऊल आहे. काश्मीरी विखरणाचा ( = डायास्पोरा ) एक सदस्य म्हणून माझी मती गुंग झाली आहे.

जाताजाता : मागे राजीव गांधींवर काहीतरी आक्षेपार्ह टिपणी केल्यामुळे माझं सदस्यत्व गोठवलं होतं. चूक माझीच होती. रीतसर माफी मागितली. प्रशासकांनी क्षमा करून सदस्यत्व परत सुरू केलं. राजीव गांधींविषयी तीव्र भावना बाळगण्यामागील कारण हा चित्रपट पहिल्याने कळतं. बस इतकंच.

आ.न.,
-गा.पै.

निनाद's picture

14 Mar 2022 - 5:21 am | निनाद

यांची इकोसिस्टिम फार ताकदवान आहे. - हो अजूनही आहे!
भारतातील डाव्या आणि साम्यवादी लोकांची इकोसिस्टिम उघडी पाडण्यात विवेक रंजन अग्निहोत्री यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यांच्या '''अर्बन नक्षल''' या पुस्तकात नक्षल गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी शहरी भागातील लोकांचे गट कसे पुढे येतात हे त्याने दाखवून दिले आहे. या गटात वार्ताहर, वकील, प्राध्यापक आणि समाजात प्रतिष्ठेचा बुरखा घतलेले अनेक लोक सामील असता किंवा सामील करून घेतले जातात. हे लोक त्यांना हव्या असलेल्याच बातम्या माध्यमात पेरतात. त्यांना हव्या असलेल्या दृष्टीनेच बातमीचे चित्रण केले जाते.
मग गुन्हेगारांना बळी असल्याचे भासवले जाते. अशा रीतीने या गटाने दबाव निर्माण करायचा आणि सरकारला काम करू द्यायचे नाही असा साधारण डाव्या विचारधारेचा कामाची शैली असते. यामुळे पोलिसांना गुन्हेगारांवर कारवाया करणे अशक्य होते. मग परत नवीन गुन्हेगारी सुरू होते असा निष्कर्ष त्यांनी आपल्या संशोधन लेखनातून काढला आहे. यासाठी त्यांनी अनेक पुरावे आपल्या पुस्तकात दिले आहेत. आपण विचार केल्यावर असे अनेक पुरावे जागोजागी आपल्याला दिसून येतात.

आपली कार्य शैली उघडी पडल्याने अनेक डाव्या विचारधारेच्या लोकांनी अग्निहोत्री यांना प्रचंड विरोध केला आहे. त्यांची विश्वासार्हता नाही हे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे.

आपली वेदना हीच माझीही वेदना आहे गा मा साहेब!

sunil kachure's picture

14 Mar 2022 - 2:11 am | sunil kachure

राजकारण बाजूला ठेवून
The Kashmir file एक सिनेमा आहे .
आणि सिनेमा एक व्यवसाय आहे
बाकी व्यवसाय सारखा..
त्या बद्धल इतकेच
राजकारण जरा पण इतके बिनडोक ,स्वार्थी करू नका की ते देशालाच संकटात टाकेल.
अतिरेकी धर्मवाद मुळे पाकिस्तान ची स्वतःची आज ची अवस्था काय आहे पूर्ण मुस्लिम धर्मीय राष्ट्र आहे तरी हे अतिरेकी विचाराचे जल्लाद मशिदी मध्ये,शाळेत पण आत्मघाती हल्ले करतात..एक धर्मीय च आहे...
मुस्लिम धर्मीय दुबई ,सौदी पण आहे पण तिथे असे घडत नाही
भारतात धार्मिक उन्माद निवडणुका जिंकण्यासाठी कोणी वापरू नका.
मग ते मुस्लिम असतील ,हिंदू असतील नाहीं तर बौद्ध
देशाला रसातळाला घेवून जाईल हा स्वार्थ
त्या पेक्क्षा भारताची न्याय व्यवस्था मध्ये . सुधारणा करा..पोलिस यंत्रणा सशक्त बनवा.active बनवा.
अंतर्गत सुरक्षा इतकी मजबूत आणि talented हवी की कोणताच गुन्हेगार
कोणत्या ही धर्माचा असू त्याला कठोर मधील कठोर शिक्षा लगेच मिळेल
.धर्म देश एकत्र ठेवू शकतं नाही .अनेक उदाहरणे आहेत ..न्याय,सुशासन ,भेदभाव बिलकुल नसणे.
आणि बलाढ्य आर्थिक स्थिती ह्याच गोष्टी देश एकत्र ठेवू शकतात .
हे लक्षात ठेवा.
नाही तर आज सत्ता मिळण्यासाठी केलेल्या उचापती पुढच्या पिढी लं नरकात ढकलतील.

चौकस२१२'s picture

14 Mar 2022 - 7:05 am | चौकस२१२

- माझ्या गावात २च खेळ लावले होते, काही कारणाने जाता आले नाही परंतु तिकिटाचे २८ डॉलर मी विवेक रंजन अग्निहोत्रींच्या कार्यासाठी या ना त्या पद्धतीने पोचवण्याचा पण केला आहे
- या शिवाय काही मित्रानि मिलून , मुद्दामून दुकानात जाऊन " नॉन हलाल " मिळेल काय असे विचारायचा उपक्रम हाती घेतला आहे ( भादीपचं भाषेत शांतीत क्रांती )
पशिमत्य देशात रहनर्या मिपकरन्न हि हे आवाहन कि अपण पण असे करुन बघा...( कल्पना पटत अस्ल्यास )

बाकी सर्व पूरो गाम्यांना काय बोलू.... आम्ही हरलो हो बरोबर आहे तुमच, हिंदूंच्यावर अत्याचार कधीच होत नाहीत ... आणि झाले तरी त्या बद्दल शष्प बोलणे दुःख करणे , हे महापाप आहे ..

आपला एक उदास हरलेला हिंदू

मुक्त विहारि's picture

14 Mar 2022 - 11:21 am | मुक्त विहारि

कशाला नाराज होता?

माझ्या ओळखीतले 100-125 हिंदू आता, उदारमतवादी हिंदू नाहीत...

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Mar 2022 - 8:32 am | चंद्रसूर्यकुमार

एकूणच या चित्रपटाच्या निमित्ताने जमात-ए-पुरोगामी चा तडफडाट होत आहे ते बघता बाण योग्य ठिकाणी लागला आहे याची खात्री पटते.

इतिहासातीलच नव्हे तर कोणाहि स्त्रीची प्रतिमा जपलीच पाहिजे. या सिनेमात हिन्दु पन्डितान्च्या स्त्रियावर झालेले अत्याचार पाहून अस्वस्थ झालो॰

दिगोचि's picture

14 Mar 2022 - 10:04 am | दिगोचि

गेली अनेक वर्षे पुरोगामी विचारवंत आणि त्यांच्या संस्था समाजकार्याच्या नावाखाली हिंदूविरोधी अजेंडा पुढे नेत आहेत असे दिसते. यात देशातील तसेच परदेशी वर्तमानपत्रे, टीव्ही चानेल्स, अनेक अभिनेते, दिग्दर्शक आणि वृत्तसंस्था पण आहेत.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

14 Mar 2022 - 10:31 am | रावसाहेब चिंगभूतकर

Jinda

प्रतिसाद देणाऱ्यांची नावे पहा:
Names

Neveragain

Who

मुक्त विहारि's picture

14 Mar 2022 - 10:48 am | मुक्त विहारि

देवगिरी येथील अत्याचार

विजयनगर येथील अत्याचार

कर्णावती येथील अत्याचार

राजस्थान मधला जोहार

सुर्हावर्दी प्रकरण

पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये झालेला हिंसाचार

पानीपत

आणि

छत्रपती संभाजी महाराज

यांच्या वरील लेख वाचल्या नंतर, कित्येक दिवस झोप येत न्हवती

त्यामुळे, आता हा सिनेमा बघवणार नाही, पण तिकीट काढून, सिनेमा बघणार नाही ....

उदारमतवादी हिंदू, हा हिंदू लोकांना लागलेला शाप आहे ...

क्रुपया लिन्क शेर कराल काय....

मुक्त विहारि's picture

16 Mar 2022 - 7:20 pm | मुक्त विहारि

वाचनालयांत मिळतील

कुमार१'s picture

14 Mar 2022 - 10:57 am | कुमार१

चित्रपट निर्मितीशी संबंधित सर्व कलाकारांचे अभिनंदन !

मुक्त विहारि's picture

14 Mar 2022 - 11:50 am | मुक्त विहारि

आमच्याविरोधात फतवा निघाला होता, पण…”, पल्लवी जोशींनी सांगितला शूटिंग करतानाचा ‘तो’ किस्सा

https://www.loksatta.com/manoranjan/the-kashmir-files-producer-pallavi-j...

सिनेमाघरों में लगाई गई रोक, नहीं दिखाई जाएगी फिल्म

https://m.youtube.com/watch?v=j8yOo6vCRJE&feature=youtu.be

sunil kachure's picture

14 Mar 2022 - 12:36 pm | sunil kachure

The काश्मीर फाईल हा सिनेमा .
हिंदू वरील झालेले अत्याचार जगा समोर आण्याण्यासाठी बनवला गेला आहे.
त्या मधील काम करणाऱ्या कलाकार चा पण तोच उदात्त हेतू आहे.

हे खरे असेल तर .
ह्या सिनेमाच्या निर्मात्याने असे जाहीर करावे.
मी हा सिनेमा व्यवसाय म्हणून बनवला नशिम
काश्मिरी पंडित विषयी प्रेम आहे म्हणून बनवला आहे .
ह्या सिनेमातून होणारा नफा हा मी जे पीडित काश्मिरी पंडित आहेत त्यांना दान करत आहे
फक्त सिनेमा निर्मिती साठी झालेला खर्च सोडून बाकी सर्व पैसा मी दान करत आहे.
त्यांची नियत साफ असेल तर असे जाहीर आश्वासन निर्माते देतील
मग मात्र देशातील सर्व हिंदू नी हा सिनेमा थिएटर मध्ये जावून बघावाच .
पण इथे पण स्व स्वार्थ साधण्यासाठी जाहिरात बाजी असेल तर हिंदू नी फुकट २०० रुपये तरी का खर्च करावेत.

अजिबात गरज नाही, त्याने हा नफा असे अजून चित्रपट तयार करण्यासाठी वापरावा.
आम्ही त्याला खुशीने पैसे देऊ.

मुक्त विहारि's picture

14 Mar 2022 - 12:43 pm | मुक्त विहारि

https://en.m.wikipedia.org/wiki/Farooq_Ahmed_Dar

2006 मध्ये, ह्याची सुटका झाली आणि त्यावेळी असलेले केंद्रीय मंत्रीमंडळ ....

https://en.m.wikipedia.org/wiki/First_Manmohan_Singh_ministry

Farooq Ahmed Darच्या सुटकेला, कुठल्या केंद्रीय मंत्र्याने आक्षेप घेतला होता का?

जितकी-जितकी इतिहासाची पाने उलगडावी, तसे
तसे, माझे हेच मत बनत जाते की, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, हिंदू हितवादी भुमिका घेत नाहीत...

जाता जाता, सध्या तरी Farooq Ahmed Dar, अटकेत आहेत, असे विकीपेडीया वरून कळते... अर्थात, हा काही खात्रीशीर माहितीचा स्त्रोत नाही..

sunil kachure's picture

14 Mar 2022 - 1:19 pm | sunil kachure

आज ची हिंदू ची आर्थिक स्थिती आणि bjp व्यतिरिक्त दुसऱ्या राजकीय पक्षाच्या सत्ता काळातील हिंदू ची आर्थिक स्थिती ह्या वर फोकस करा.
बकवास,भावनिक, विषय सोडून ध्या.
आज हिंदू आर्थिक बाबतीत सक्षम आहेत का?
असे प्रश्न मनात आणा.

हिंदू कमजोर आणि हिंदुत्व वादी स्वार्थी फक्त सत्तेवर. ..
ही स्थिती आहे.
भावनेच्या आहारी जावू नका.
स्व स्वार्थ बघा.

गामा पैलवान's picture

14 Mar 2022 - 3:30 pm | गामा पैलवान

sunil kachure,

आज हिंदू आर्थिक बाबतीत सक्षम आहेत का? असे प्रश्न मनात आणा.

रोचक सल्ला आहे.

हिंदूंच्या आर्थिक स्वार्थाचं म्हणाल तर तो चालू होताच की. १९९० साली जेव्हा काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद होत होता तेव्हा उर्वरित भारत मुक्त अर्थप्रणाली राबवण्यात मग्न होता. तुमचा सल्ला आधीच अंमलात आणून झाला आहे.

काश्मिरी हिंदूंच्या जखमांवर कृपया मीठ चोळू नका. धन्यवाद.

आ.न.,
-गा.पै.

हिंदू वादी BJP सरकार केंद्रात सत्तेवर आल्या नंतर सर्व सामान्य हिंदू ची आर्थिक स्थिती ही bjp सत्तेवर नसताना असलेल्या सरकार च्य काळात उत्तम होती.
हिंदू आर्थिक बाबतीत कमजोर करायचे .त्या वर काहीच बोलायचे नाही
आणि भावनिक विषय काढून हिंदू हित वादी आम्हीच आहोत असा प्रचार करायचा.
ही त्री सूत्र आहेत .
हिंदू चे हित हेच ध्येय असेल तर ..देशातील प्रतेक हिंदू आर्थिक बाबतीत पूर्ण सक्षम असेल अशा योजना अमलात आणा.
आणि नंतर हिंदू हिताच्या गप्पा मारा

sunil kachure's picture

14 Mar 2022 - 2:25 pm | sunil kachure

कोण हे पंडित हिंदू वर जातीच्या नावा वर अत्याचार करणारे हैवान.
अजून पण ह्या लोकात स्वतः लं सर्व श्रेष्ठ समजायची स्वार्थी वृत्ती आहे.
काश्मीर मध्ये फक्त मुस्लिम लोकांनी जात विचारून हिंदू पंडित म्हणजे ब्राह्मण लोकावर च अत्याचार केले का?
हिंदू फक्त पंडित च आहेत का?

आग्या१९९०'s picture

14 Mar 2022 - 3:12 pm | आग्या१९९०

गेल्या ३० वर्षात अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील १७२४ नागरिकांना ठार केले, त्यात ८९ काश्मीरी पंडित होते असे RTI कार्यकर्त्याने उघड केले.
आपल्या देशाच्या नागरिकांचे रक्षण करणे हे सरकारचे काम आहे. असे सिनेमे बघून त्यांचे रक्षण कसे होणार?

चौकस२१२'s picture

14 Mar 2022 - 4:31 pm | चौकस२१२

हिंदू फक्त पंडित च आहेत का?
चला धागा धन्य झाला .. यात आपण आता जात आणलीत
"अजून पण ह्या लोकात स्वतः लं सर्व श्रेष्ठ समजायची स्वार्थी वृत्ती आहे."
सबुरीने घ्या .. sunil kachure फार होतंय
आग्या१९९०
असे सिनेमे बघून त्यांचे रक्षण कसे होणार?
लोक हलाल सर्टिफिकेट मधून जमवतात आम्ही काढून आणि बघून

आग्या१९९०'s picture

14 Mar 2022 - 4:35 pm | आग्या१९९०

लोक हलाल सर्टिफिकेट मधून जमवतात आम्ही काढून आणि बघून
ह्याने देशातील नागरिकांचे रक्षण कसे होते ?

चौकस२१२'s picture

14 Mar 2022 - 5:25 pm | चौकस२१२

असा ,,,दावा केलाय का ? उगा का चिकटवताय ?

स्वतःचं राज्यातून अशी हकालपट्टी झाली त्याबद्दल काही लोक आणि सरकार बोलत नाही, अश्या चित्रपटातून जर गोष्टी ची हि बाजू दाखवली तर का चिडचिड?
एवढया गंभीर घटनबद्दल का नाही बोलायचे ?
१९९० चे हे कारस्थान आणि त्यावेळचा भारत म्हणजे काही युगांडा नव्हतं कि १५ दिवसात भारतीयाना एका हुक्मशाहने हाकलून द्यावे
किंवा १९४८ सालचे जनतेचा राग म्हणून महाराष्ट्रातील ब्राह्माण विरोधी जाळपोळ ( कि एकवेळ म्हणू शकतो कि एका व्यक्तीने घेत ला म्हणून त्या समाजाला सोसावे लागले )
१९९० ला काश्मीर मधील हिंदूंनी काय घोड मारल होतं हो?

सरळ तर्क आहे जम्मू च्या हिंदूना किंवा लडाख च्या बुद्धांना इतर भारतीय गणराज्य बरोअबर काही प्रश्न नाही
फक्त काश्मीर मधील " प्रेमळ" धर्माचं लोकांनाच का? कारण ते ९०% कि ९४% आहेत मग तिथे बाकी सगळे काफिर

एवढेच काय काश्मिरी लोकांच्या मुलाखती बघा अनेक जण म्हणतात हा प्रसहन " काश्मिरीयत" चा पण नाही आम्ही भारतीय आहोत हेच एखाद्य पंजब्याला विचारा तिथे "भारत या संकल्पनेपेक्षा कितीदा तरी "पंजाबीयत" जास्त पुढे पुढे केली जाते
मग ह्या काश्मिरीन बद्दल आत्मीयता का वाटू नये

सरळ तर्क आहे जम्मू च्या हिंदूना किंवा लडाख च्या बुद्धांना इतर भारतीय गणराज्य बरोअबर काही प्रश्न नाही
फक्त काश्मीर मधील " प्रेमळ" धर्माचं लोकांनाच का? कारण ते ९०% कि ९४% आहेत मग तिथे बाकी सगळे काफिर
इथेच ग्यन्बचि मेख आहे

आग्या१९९०'s picture

14 Mar 2022 - 5:46 pm | आग्या१९९०

माझ्या प्रतिसादातले एक वाक्य बोल्ड करून तुम्ही त्यावर काहीतरी गहन उत्तर दिले,जे मला समजले नाही म्हणून विचारले. चिडचिड बिडचिड काही नाही. फक्त एकच खटकते, ३७० कलम काढले तरी आपले सरकार काश्मीरी पंडितांचे अतिरेक्यांपासून संरक्षण करू शकत नाही ह्याचे. सिनेमे लाख काढा ,बघा, जमल्यास सरकारलाही दाखवा. सिनेमे बघून सरकार प्रश्न सोडवत असेल तर चांगलेच आहे.

सिनेमे लाख काढा ,बघा, जमल्यास सरकारलाही दाखवा. सिनेमे बघून सरकार प्रश्न सोडवत असेल तर चांगलेच आहे.

प्रथम प्रश्नाची व्याख्या करूयात. ही माझ्या समजूतीनुसार व्याख्या आहे:

" १९९० साली काश्मिरांतील हिन्दू जनतेचे जे संघटित हत्याकांड (लिबरलांचा आवडता शब्द-- पोग्रॉम) झाले, त्याची आतापर्यंत कुठल्याही सरकाराने दखल घेतलेली नाही. अलिकडेच एक याचिका सुप्रिम कोर्टांत दाखल झाली होती, त्यांनीही ती फेटाळून लावली. हे धिक्कारार्ह आहे, व सरकारने त्याविषयी काहीतरी ठोस करावे. असे काही झाले होते ते मान्य करावे, त्याची व्यवस्थित चौकशी व्हावी, निर्वासित झालेल्या काश्मिरी हिंदू जनतेचे हाल त्याने ऐकून घ्यावेत. त्यांपैकी कुणाचीही पैशाने अथवा अन्य प्रकारे खर्‍या अर्थाने नुकसान भरपाई होणार नाहीच. तरीही, त्यांच्या झालेल्या आघाताची दखल घेऊन, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलावीत".

सिनेमे काढून, व ते दाखवून काय होणार आहे? ह्याचे उत्तर असे की प्रथम जनमानसांतच असे काही झालेले होते ह्याविषयी माहिती होईल... (त्या कालानंतर जन्मलेल्या अनेकांना ह्याविषयी माहिती, जवळजवळ नाहीच, असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये). ही माहिती झाल्याने, एकतर सरकारवर दबाव आणणे सोपे होईल. तसेच, हे लोण आपल्यापर्यंतही आज ना उद्या येऊ शकते ह्याचीही हिंदूंना जाणीव होईल.

येथे सुप्रीम कोर्टांतील एक वकिल, जे. साईदिपक ह्यांनी सरकारकडून काय करून घेता येईल, ह्याविषयी त्यांचा प्रस्ताव मांडला आहे. तो मुळातून वाचावा. अर्थात, ह्या क्षणाला तो प्रार्थमिक स्वरूपाचा आहे. ह्यावर चर्चा होऊ शकते.

त्याची आतापर्यंत कुठल्याही सरकाराने दखल घेतलेली नाही. अलिकडेच एक याचिका सुप्रिम कोर्टांत दाखल झाली होती, त्यांनीही ती फेटाळून लावली.

पण असे का ? कोर्टाने काय ग्राउंड वर फेटाळली ?

प्रदीप's picture

14 Mar 2022 - 8:36 pm | प्रदीप

Ever since the release of #TheKashmirFiles, people have expressed their serious and justified disappointment with the Supreme Court's failure to take cognizance of the genocide of Kashmiri Pandits citing passage of time and other untenable reasons.

हे मी वर दिलेल्या साई दीपक ह्यांच्या ट्विटरवरून.

कॉमी's picture

14 Mar 2022 - 8:56 pm | कॉमी

साई दीपक यांचे बोलणे पटले.
इथे वाचले असता KP बाजू मांडणाऱ्या वकिलाचा युक्तिवाद सुद्धा पटला.

काही इतर मुद्दे ही समोर आलेत जे मी फेसबूकवर वाचलेत.
माझा या विषयातला मुळातून अभ्यास नाही व चित्रपटही अजून बघितला नाही. पण या मुद्द्यांमध्ये तथ्य असल्याचे जाणवते - त्यावरही चर्चा होण्यास हरकत नसावी
काश्मिरी पंडितांविरोधात जेव्हा अत्याचार झालेत तेव्हा केंद्रात व्ही पी सिंग यांचे सरकार होते तर सरकारला भाजपचा पाठिंबा होता. काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट होती.
काश्मीरमधल्या घटना घडत असताना पाठिंबा देणार्‍या भाजपकडून तत्कालीन सिंग सरकारवर योग्य ती कारवाई तातडीने करण्याकरिता कशा प्रकारे दबाव आणला गेला किंवा कसे ? तसेच या मुद्द्यावर सरकारचा पाठिंबा काढून घेतला नाही ह्या मागचे काय कारण असावे ?

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Mar 2022 - 6:32 pm | चंद्रसूर्यकुमार

काश्मिरी पंडितांविरोधात जेव्हा अत्याचार झालेत तेव्हा केंद्रात व्ही पी सिंग यांचे सरकार होते तर सरकारला भाजपचा पाठिंबा होता. काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट होती.

तेलाने भरलेल्या जमिनीवर एक ठिणगी अक्राळविक्राळ आग लाऊ शकते. आता ती आग नक्की कोणी लावली असे म्हणायचे? तेलाने की ठिणगीने? तेल नसते तर नुसती ठिणगी काहीही करू शकली नसती तेव्हा आग लावायला जबाबदार तेल आहे असे म्हणायला हवे. काश्मीरमध्ये तेल पसरवायचे काम राजीव गांधींच्या सरकारच्या काळात झाले आणि ठिणगी वि.प्र.सिंगांच्या सरकारच्या काळात लागली. हे तेल लावण्यात १९८७ च्या निवडणुकांची भूमिका मोठी होती. या निवडणुकांमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स युतीने मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केले आणि स्थानिक मुस्लिम युनायटेड फ्रंटच्या उमेदवारांना पाडून या युतीचे उमेदवार असे गैरव्यवहार करून निवडून आणले गेले. त्यामुळे काश्मीरी युवकांमध्ये असंतोष मोठ्या प्रमाणावर पसरला. दिल्लीतील केंद्र सरकार आपल्याला आपले प्रतिनिधी निवडूनही देत नाही आणि आपलेच पिट्टे लादते असा प्रचार करायला फुटिरतावादी ताकदींना कारण मिळाले. खरं वाटणार नाही पण हिजबुल मुजाहिदीनचा दाढीवाला सय्यद सलाहुद्दिनही १९८७ मध्ये मुस्लिम युनायटेड फ्रंटचा उमेदवार होता. ३७० कलमामुळे 'आम्ही इतर भारतीयांपेक्षा वेगळे' ही भूमिका आधीपासून होतीच. त्यात ही भर पडली. मे १९८४ ते मे १९८९ या काळात (बराचसा राजीव गांधींचा कार्यकाळ) जगमोहन मल्होत्रा काश्मीरचे राज्यपाल होते. परिस्थिती बिघडत आहे तेव्हा काहीतरी करा ही विनंती करणारी कित्येक पत्रे त्यांनी गृहमंत्र्यांना म्हणजे केंद्र सरकारला लिहिली होती. त्याविषयी काही करणे दूरच राहिले त्या पत्रांची पोच द्यायची तसदीही केंद्र सरकारने घेतली नव्हती. मार्च १९८७ नंतर म्हणजे परिस्थिती जास्त बिघडायला लागली तेव्हापासून काश्मीरमध्ये फारूख अब्दुल्लांचे सरकार सत्तेत होते. आपल्या राज्यपध्दतीत एखाद्या राज्यात विधानसभेत बहुमत असलेले सरकार सत्तेत असताना राज्यपालांना प्रशासकीय निर्णय घेता येत नाहीत त्यामुळे जगमोहन त्याविषयी पत्रे लिहिण्यापलीकडे काहीही करू शकले नाहीत.

वि.प्र.सिंगांची सगळ्यात मोठी चूक म्हणजे पहिल्यांदा मुफ्ती महंमद सईदला गृहमंत्री करणे आणि रूबिया सईद अपहरण प्रकरणात दहशतवाद्यांना सोडणे. हे झाले वि.प्र.सिंग सरकार सत्तेत आल्यानंतर आठवड्याभरात. हे प्रकरण गंभीर असले तरी त्यावरून आठवड्याभरात सरकार खाली खेचणे हा पर्याय नव्हता. सध्या व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर विचारवंतांची एक विनोदी पोस्ट फिरत आहे त्यात म्हटले आहे की काश्मीरी पंडितांचे स्थलांतर व्हायला राज्यपाल 'संघी' जगमोहन जबाबदार होते आणि त्याबद्दल त्यांना पुढे वाजपेयी सरकारमध्ये मंत्रीपद दिले गेले. तसेच भाजपने काश्मीरी पंडितांचे स्थलांतर या कारणावरून नाही तर रथयात्रेच्या कारणावरून वि.प्र.सिंग सरकारचा पाठिंबा काढला होता यावरून भाजपची प्राथमिकता कशाला होती हे कळते. इतके मूर्खपणाचे (खरं तर विचारवंती) आर्ग्युमेंट मी गेल्या दहा हजार वर्षात ऐकले नव्हते.

काश्मीरी पंडितांचे बरेचसे स्थलांतर १५ ते १९ जानेवारी १९९० या काळात झाले. त्यानंतरही तुरळक प्रमाणात स्थलांतर अगदी मार्चपर्यंत चालू होते पण बरेचसे १५ ते १९ जानेवारी या काळात झाले होते. जगमोहन यांनी दुसर्‍यांदा राज्यपालपदाची शपथ घेतली १९ जानेवारीच्या संध्याकाळी. अशावेळी जगमोहन काश्मीरी पंडितांच्या स्थलांतराला कसे जबाबदार? दुसरे म्हणजे जगमोहन आणि संघी? बोंबला. आणीबाणी प्रकरणात जगमोहन संजय गांधींचे उजवे हात होते. दिल्ली डेव्हलपमेंट ऑथोरीटीचे उपाध्यक्ष या नात्याने दिल्लीत तुर्कमान गेटजवळची झोपडपट्टी पाडण्यात त्यांचा मोठा हात होता. १९८१ मध्ये शेख अब्दुल्लांचे निधन झाल्यानंतर फारूख अब्दुल्ला मुख्यमंत्री झाले होते. शेख जिवंत असतानाच नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेसपासून दुरावला होता पण शेखच्या मुख्यमंत्रीपदाला धक्का लावणे इंदिरा गांधींना शक्य झाले नव्हते. पण नंतर फारूख मुख्यमंत्री झाल्यानंतर इंदिरा गांधींच्या सरकारने ती संधी साधली. विरोधी पक्षांची सरकारे बरखास्त करा हा एकच अजेंडा घेऊन इंदिरा सरकारने जम्मू काश्मीरमध्ये जगमोहन आणि आंध्र प्रदेशात ठाकूर रामलाल या राज्यपालांना पाठवले. याच जगमोहन यांनी २ जून १९८४ रोजी फारूख अब्दुल्लांचे सरकार बरखास्त केले होते (त्याचप्रमाणे दोन महिन्यात ठाकूर रामलालांनी आंध्र प्रदेशात एन.टी.रामारावांचे सरकार बरखास्त केले). असे जगमोहन संघी? बोंबला.

त्याच जगमोहन यांची वि.प्र.सिंग सरकारने राज्यपालपदावर परत एकदा नियुक्ती केल्याच्या निषेधार्थ फारूख अब्दुल्लांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि १९ जानेवारी १९९० रोजी राज्यात राज्यपाल राजवट लागली (तत्कालीन जम्मू काश्मीरच्या संविधानाप्रमाणे राज्यपाल राजवटही होती. हे संविधान कलम ३७० काढले गेल्यावर हटवले गेले) आणि मग जगमोहन यांच्या हातात खरे अधिकार आले. जगमोहन राज्यपाल पदावर ४ महिने होते. या काळात सुरवातीला प्रशासनात शिस्त हा प्रकार नव्हता. अनेक पोलिसही सरकारच्या नाही तर दहशतवाद्यांच्या ऑर्डर घेत होते. अशा परिस्थितीत जगमोहन यांनी कडक आसूड उगारला आणि मुळात प्रशासन ठीक करायचा प्रयत्न केला. काश्मीरमधील फुटिरतावादी तत्वे आजही जगमोहन यांची चार महिन्यांची राज्यपालपदाची कारकिर्द हा एक काळा कालावधी होता असेच म्हणतात त्यातच सगळे काही आले. जगमोहन निष्क्रीय असते, काश्मीरी पंडित जात असताना त्यांनी काही केले नसते तर फुटिरतावाद्यांना ते हवेसे वाटायला हवे होते नाही का? पण विचारवंतांना हा साधा प्रश्न पडत नाही.

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की १९ जानेवारी १९९० पर्यंत राज्यात राज्य सरकार सत्तेत असताना आणि प्रशासन पोखरले गेले असताना पंडितांना वाली राहिला नाही. एक तर ३७० मुळे केंद्र सरकार काय करणार यावर मर्यादा होत्या आणि त्यात मुफ्ती महंमद सईदसारखा घाणेरडा माणूस गृहमंत्री होता. त्यामुळे दुसरे काय होणार होते? आणि या परिस्थितीविषयी राजीव गांधी आणि फारूख अब्दुल्लांना जबाबदार न धरता जगमोहनना जबाबदार धरणे हे केवळ आणि केवळ अती उच्चशिक्षित पुरोगामी विचारवंतच करू शकतील.

आता या कारणावरून भाजपने वि.प्र.सिंग सरकारचा पाठिंबा का काढला नाही? ते सरकार सत्तेत आले होते २ डिसेंबर १९८९ रोजी. तेव्हा दीड महिन्यात पाठिंबा काढणे कसे काय शक्य होते याचे उत्तर वाचकांनीच शोधावे. दुसरे म्हणजे पाठिंबा रथयात्रेनंतर म्हणजे ऑक्टोबर १९९० मध्ये काढला (सरकारला साडेदहा महिने झाल्यावर) ही खरी गोष्ट आहे. पण मधल्या काळात देवीलालांचे बंड आणि त्याला उत्तर म्हणून वि.प्र.सिंगांनी उगारलेले मंडल कमिशनचे हत्यार आणि त्याविरूध्द उत्तर भारतात पेटलेले राखीव जागाविरोधी आंदोलन आणि त्यानंतर सुरू झालेली रथयात्रा अशी टाईमलाईन आहे. म्हणजे मधल्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले होते. एक प्रश्न कधीही विचारवंतांना पडत नाही का? काँग्रेसने देवेगौडा सरकारला दिलेला पाठिंबा १० महिन्यांनंतर (१ जून १९९६ रोजी देवेगौडा सरकार सत्तेत आले आणि ३० मार्च १९९७ रोजी काँग्रेसने पाठिंबा काढला) काढला होता तेव्हा अशा स्फोटक घटनांपैकी काहीही घडलेले नव्हते. त्यामुळे अचानक पाठिंबा काढून घेतला म्हणून काँग्रेसची किती छी थू झाली होती हे या लोकांना माहित नाही का? पण भाजपची वि.प्र.सिंग सरकारला दिलेला पाठिंबा असाच १०-साडेदहा महिन्यात काढल्यावर तशी छि थू झाली नव्हती. त्याचे कारण काय असावे? माझ्या मते त्याचे कारण हे की वि.प्र.सिंग सरकारच्या त्या दहा-साडेदहा महिन्यात बरेच काही घडले होते. तेव्हा काश्मीरी पंडितांचे स्थलांतर मग देवीलाल बंड (आणि त्यामुळे डुगडुगायला लागलेले जनता दल) मग मंडल आयोग आणि मग रथयात्रा अशाप्रकारे पाठिंबा काढून घ्यायला परिस्थिती निर्माण होत होती. काश्मीरी पंडितांचे स्थलांतर हे त्यातील पहिले कारण होते. ही सगळी टाईमलाईन लक्षात न घेता 'भाजपने रथयात्रेच्या मुद्द्यावरून वि.प्र.सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला' असे म्हणणे हे केवळ आणि केवळ ढुढ्ढाचार्य विचारवंतच करू शकतील. दुसरे कोणी नाही.

चंसूकु

मुक्त विहारि's picture

14 Mar 2022 - 6:38 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

तर्कवादी's picture

14 Mar 2022 - 6:52 pm | तर्कवादी

विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

अनन्त अवधुत's picture

15 Mar 2022 - 12:23 am | अनन्त अवधुत

विस्तृत प्रतिसादासाठी धन्यवाद! जगमोहन, संघ, रथयात्रा, आणि व्हीपी सरकार याबद्दल समाजमाध्यमांवर फिरणार्‍या कितीतरी प्रश्नांची उत्तरे मिळाली.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Mar 2022 - 9:22 pm | अमरेंद्र बाहुबली

? ते सरकार सत्तेत आले होते २ डिसेंबर १९८९ रोजी. तेव्हा दीड महिन्यात पाठिंबा काढणे कसे काय शक्य होते याचे उत्तर वाचकांनीच शोधावे.
सहमत. सत्तेपेक्षा कश्मिरी पंडीतांचा जीव महत्वाचा नव्हता.

श्रीगुरुजी's picture

16 Mar 2022 - 10:53 pm | श्रीगुरुजी

काश्मिरी पंडितांच्या हत्या या वि. प्र. सिंह पंतप्रधान झाल्यानंतर सुरू झाल्या नसून त्यापूर्वीच सुरू झाल्या होत्या.

उदाहरणार्थ टिकालाल टपलू यांना १४ सप्टेंबर १९८९ या दिवशी मारण्यात आले होते जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते. मकबूल भटला फाशीची शिक्षा देणारे न्यायाधीश नीलकंठ गजलू यांना ४ नोव्हेंबर १९८९ या दिवशी मारण्यात आले होते जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते. त्यापूर्वी १९८६ मध्ये काश्मीरात हिंदू मुस्लिम दंगलीत काही हिंदू मारले गेले होते व तेव्हाही राजीव गांधी पंतप्रधान होते. फेब्रुवारी १९८४ मध्ये मकबूल भटला फाशी दिल्यानंतर सुध्दा काश्मीरमध्ये हिंदूंवर हल्ले झाले होते.

एकंदरीत काश्मीर ्मधीर परिस्थिती बिघडण्यास १९८४ मध्ये प्रारंभ झाला होता.

चंद्रसूर्यकुमार's picture

16 Mar 2022 - 11:27 pm | चंद्रसूर्यकुमार

जगमोहन यांनी त्यांच्या राज्यपालपदाच्या दुसर्‍या कारकिर्दीत काश्मीरी लोकांवर अत्याचार केले आणि त्यामुळे दहशतवाद अजून वाढला ही टीका सगळे विचारवंत एकेकाळी त्यांच्यावर करायचे. पण हा चित्रपट आल्यानंतर अचानक टीकेचा सूर बदलून जगमोहन यांनी राज्यपालपदावर असताना काश्मीरी पंडितांच्या स्थलांतराविरोधात काहीही केले नाही असा झाला आहे. जे काही असेल ते असेल. पण जगमोहन यांच्या राज्यपालपदाच्या कारकिर्दीविषयी सगळ्यात महत्वाचे प्रशस्तीपत्र कोणी दिले असेल तर ते बेनझीर भुत्तोने. 'आम्ही जगमोहनला भागमोहन बनवून त्याचे तुकडे तुकडे करू' अशी गरळ बेनझीरने ओकली होती. म्हणजेच जगमोहन यांची राज्यपालपदाची कारकिर्द आपल्यासाठी खूप उत्तम होती याचे दुसरे कोणते प्रमाणपत्र मिळू शकेल?

https://www.newsncr.com/national/tribute-to-jagmohan-when-benazir-bhutto...

सर्टिफिकेट बघायचे असेल तर संजय गांधीची चांडाळ चौकडी म्हणून भाजपा नेत्यांनी एक सर्टिफिकेट ह्याच जगमोहन, विद्याचरण शुक्ला, कमलनाथ आणि आर के धवन याना प्रदान केले होते. तूर्कमान गेट चे हत्याकांड प्रकरण ज्या दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी द्वारे पार पडले त्यामागे हेच जगमोहन होते. ती सर्टिफिकेट पण जोडावित ह्या बायोडेटा मध्ये.

जेम्स वांड's picture

17 Mar 2022 - 7:25 am | जेम्स वांड

&#129315 &#129315

चंद्रसूर्यकुमार's picture

17 Mar 2022 - 8:56 am | चंद्रसूर्यकुमार

तूर्कमान गेट चे हत्याकांड प्रकरण ज्या दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी द्वारे पार पडले त्यामागे हेच जगमोहन होते. ती सर्टिफिकेट पण जोडावित ह्या बायोडेटा मध्ये.

का हो तुम्हाला मराठी वाचता येत नाही का? वरच तुर्कमान गेटचा उल्लेख केला आहे तो दिसला नाही का?

प्रदीप's picture

17 Mar 2022 - 10:03 am | प्रदीप

त्यांना आपण दुव्यासकट, तुम्ही ह्याच धाग्यात, थोडेसे अगोदरच, काय लिहीले होतेत ते भरवूयांतः

दुसरे म्हणजे जगमोहन आणि संघी? बोंबला. आणीबाणी प्रकरणात जगमोहन संजय गांधींचे उजवे हात होते. दिल्ली डेव्हलपमेंट ऑथोरीटीचे उपाध्यक्ष या नात्याने दिल्लीत तुर्कमान गेटजवळची झोपडपट्टी पाडण्यात त्यांचा मोठा हात होता.

त्या प्रतिसादाचा दुवा इथे

सुरिया's picture

17 Mar 2022 - 10:03 am | सुरिया

नुसते मराठी वाचायला येऊन उपयोग नसतो. कळावी लागते.
मुद्दा तुर्कमान गेट चां नाहीये. आपापल्या सोयीने सर्टिफिकेट वाटण्याचा आणि ती मिरवण्याचा आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

17 Mar 2022 - 10:16 am | चंद्रसूर्यकुमार

मुद्दा तुर्कमान गेट चां नाहीये. आपापल्या सोयीने सर्टिफिकेट वाटण्याचा आणि ती मिरवण्याचा आहे.

बरं.

सुरिया's picture

17 Mar 2022 - 10:25 am | सुरिया

गुड गोइंग.
हेच कळलेले "ते सगळ्यांना माहिती भरवण्याचा ठेका घेतलेल्या " मित्रवर्याना पण भरवा.

चंद्रसूर्यकुमार's picture

17 Mar 2022 - 1:39 pm | चंद्रसूर्यकुमार

मी आणीबाणीचे आणि त्याकाळात झालेल्या तुर्कमान गेटसारख्या प्रकारांचे कधी समर्थन केले आहे? एकच माणूस (जगमोहन) आणीबाणीच्या वेळेस वाईट काम पण नंतर काश्मीरचे राज्यपाल म्हणून चांगले काम करू शकत नाही का? तुमच्या म्हणण्यानुसार त्याचे उत्तर नाही असे दिसते- कारण आपापल्या सोयीने सर्टिफिकिटे मिरविणे की तत्सम काहीतरी तुम्ही म्हणाला आहात. त्याच न्यायाने इंदिरा गांधींनीही पण काहीही चांगले केले नाही असे म्हणायला हवे. असो. तरीही 'नुसते मराठी वाचायला येऊन उपयोग नसतो. कळावी लागते.' हे वर तुम्हीच लिहिले आहेत. आता हाच प्रश्न उलटा विचारता येईल- जगमोहन यांनी काश्मीरच्या राज्यपालपदावर असताना चांगले काम केले होते हे लिहिणे याचा अर्थ त्यांनी आणीबाणीदरम्यान वाईट काम केले होते याकडे दुर्लक्ष केले असा होतो का? (स्पेसिफिकली तुर्कमान गेटचा उल्लेख वरच्याच प्रतिसादात केलेला असताना). तरीही तो संबंध तुम्ही लावत आहात असे दिसते. इथे लिहिलेल्या नक्की कोणत्या प्रतिसादात तसे लिहिले आहे? तुम्हाला खरोखर मराठी समजते का?

असो. यापुढे मला तुमच्याशी कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायची इच्छा नाही. मुख्य बोर्डावर काही सदस्यांचे प्रतिसाद आले की दिसताक्षणी दुर्लक्षित करावेत हा आदेश मी माझ्याच सबकॉन्शस माईंडला दिला आहे त्या यादीत तुमचेही नाव जोडत आहे.

सुरिया's picture

17 Mar 2022 - 2:10 pm | सुरिया

तुम्ही आणि तुमचे ते सबकाँसिअस का काय ते माईंड मिळून काहीही करा. उगी माझी यादी अन माझे दुर्लक्ष असली आरशाची आरती करण्यापेक्षा एक बघा काही कळते का ते.
"बेनझीर एखाद्या भारतीय माणसाला वाईट ठरवते तेव्हा तो भारतासाठी चांगलाच असतो.
त्याच माणसाला भाजपा कधीकाळी वाईट ठरवते तेव्हा तो भारतासाठी वाईट असतो.
तोच माणूस भाजपा मध्ये गेला की तो भाजपासाठी पण चांगला असतो अर्थात देशासाठी पण चांगला असतो."
ही सगळी सर्टिफिकेट तुम्हीच नमूद केली आहेत. त्यावर मी सर्टिफिकेट सोडून काहीही लिहिलेले नाहीये. वरील तीन विधान परत वाचा आणि ठरवा काय म्हणायचे ते.
आता conscious मनाने बरं म्हणून परत sub conscious मनाने प्रतिसाद लिहायचा असेल तर तुमची मर्जी.
तुमच्या याद्या तुम्हाला लखलाभ.

प्रदीप's picture

17 Mar 2022 - 3:18 pm | प्रदीप

माफ करा, हे तुमच्यांत व चंसुकूंमधे आहे. तरीही

"बेनझीर एखाद्या भारतीय माणसाला वाईट ठरवते तेव्हा तो भारतासाठी चांगलाच असतो." -- हे चंसुकूंनी म्हटले आहे, व ते बरोबरच आहे.
" त्याच माणसाला भाजपा कधीकाळी वाईट ठरवते तेव्हा तो भारतासाठी वाईट असतो." --- असे चंसुकूंनी म्हटले असल्याचे अथवा तसे ध्वनित केल्याचे मलातरी जाणवले नाही. का मी कशाकडेतरी दुर्लक्ष करतो आहे (म्हणून मला ते दिसत नसावे?)
"तोच माणूस भाजपा मध्ये गेला की तो भाजपासाठी पण चांगला असतो अर्थात देशासाठी पण चांगला असतो."-- वरीलप्रमाणेच.

मलातरी चंसुकूंच्या प्रतिसादांतून फक्त जगमोहनांनी वेळोवेळी काय केले ह्याची क्रॉनॉलॉजिकली लिहीलेली जंत्री दिसली. त्यांत काही चूक असल्यास ते नक्कीच दर्शवून द्यावे.

शाम भागवत's picture

17 Mar 2022 - 4:19 pm | शाम भागवत

सहमत आहे.

श्री सुरिया आणि श्री चंद्रसूर्यकुमार
आपण येथील चर्चा पश्चातबुद्धी ( hindsight ) ह्या सदरात करतोय. त्यावेळी त्या माणसाला (श्री जगमोहन ) यांना निर्णय घेताना कोणती माहीती उपलब्ध होती, आजुबाजुला कोणती माणसे होती, त्यांना योग्य ती माहीती मिळाली होती की नाही, त्यांच्या आज्ञा व सुचना यांचे योग्य पालन झाले का हे पण बघायला हवे. एकच मुद्दा घेउन कोणत्याही इसमाविरोधात बोलणे म्हणजे चरित्रहणण केल्यासारखे आहे. राजकारणात आणि प्रसासनामध्ये बरेचसे चापलुसी करणारे, आपल्या स्वार्थ दुसर्‍याच्या आडुन साधणारे पण असतात.

चंद्रसूर्यकुमार's picture

17 Mar 2022 - 3:37 pm | चंद्रसूर्यकुमार

जगमोहन यांनी My Frozen Turbulence in Kashmir हे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांच्या राज्यपालपदाच्या दोन्ही कारकिर्दींचा उल्लेख आहे. १९८७-८८ पासून जास्त परिस्थिती बिघडायला लागल्यावर त्यांनी केंद्र सरकारला वारंवार लिहिलेल्या पत्रांचा मजकुर दिला आहे. नक्की काय होऊ घातले आहे हे त्यांना नक्कीच कळले होते. आणि त्यावर राजीव गांधींच्या सरकारने काही पावले उचलली असे दिसत नाही. उदाहरणार्थ एप्रिल १९८९ मध्ये त्यांनी लिहिलेल्या पत्रात ताबडतोब कारवाई करा अशीच मागणी केली होती--

“The situation is fast deteriorating. It has almost reached a point of no return. For the last five days there has been large-scale violence, arson, firing, hartals, casualties and what not. Things have truly fallen apart. Talking of the Irish crisis, British Prime Minister Disraeli had said: “It is potatoes one day and Pope the next.” Similar is the present position in Kashmir. Yesterday, it was Maqbool Butt; today it is Satanic Verses; Tomorrow it will be repression day and the day after it will be something else. The Chief Minister stands isolated. He has already fallen-politically as well as administratively; perhaps, only constitutional rites remain to be performed. His clutches are too soiled and rickety to support him. Personal aberrations have also eroded his public standing. The situation calls for effective intervention. Today may be timely, tomorrow may be too late”.

नंतर एप्रिल १९९० मध्ये राजीव गांधी पंतप्रधानपदावरून गेल्यानंतरही जगमोहन यांनी राजीव गांधींना तीन पत्रे लिहिली होती. त्यात 'मी वारंवार दिलेल्या इशार्‍यांवर तुमच्या सरकारने काहीही केले नाही म्हणून परिस्थिती इतकी बिघडली' असे स्पष्टपणे म्हटले होते. तेव्हा जगमोहन यांना पुरेशी माहिती नव्हती असे अजिबात नाही.

आता हे पुस्तक जगमोहन यांनीच लिहिले असल्याने ते आपली चांगली बाजूच उघड करतील हे वेगळे सांगायलाच नको. पण मग या सगळ्याचा प्रतिवाद करता आला तर तो पुढील मुद्द्यांवरच होऊ शकेल--
१. जगमोहन यांनी अशी पत्रे लिहिलीच नव्हती.
२. त्यांनी अशी पत्रे लिहिली होती आणि त्यावर सरकारने विचार केला होता. पण त्यावर कारवाई करावी इतक्या महत्वाची ती पत्रे वाटली नाहीत.- पण मग परिस्थिती चिघळायला लागल्यावरही राजीव गांधींना कारवाई का करावीशी वाटली नाही हा पुढचा प्रश्न त्यातून उभा राहतो.
३. त्यांनी अशी पत्रे लिहिली होती आणि सरकारने कारवाईही केली त्यामुळे जगमोहन खोटे बोलत आहेत. तसे असेल तर मग परिस्थिती का चिघळली याचे उत्तर मिळत नाही. की परिस्थिती चिघळली नव्हतीच?

अवांतर- जगमोहन यांनी १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीतून काँग्रेसकडून निवडणुक लढवावी अशी ऑफरही राजीव गांधींनी दिली होती. पण राजीव गांधींच्या राजकारणाला आणि अकार्यक्षमतेला वैतागलेल्या जगमोहन यांनी त्याला नकार दिला. आता जमात-ए-पुरोगामी जगमोहन हे संघी होते असे म्हणत होते. आतापर्यंत वाजपेयी आणि मोदींनी संघाच्या लोकांना राज्यपालपदावर नियुक्त केले होते हे ऐकले होते पण इंदिरा गांधींनीही तेच केले होते हे माहित नव्हते :) आणि राजीव गांधी संघाच्या माणसाला लोकसभेची उमेदवारी द्यायचा विचार करत होते? ऐकावे ते नवलच.

Trump's picture

17 Mar 2022 - 3:52 pm | Trump

धन्यवाद चंद्रसूर्यकुमार.
माझा मुद्दा एवढाच होता की जर माणसाच्या चरीत्राविषयी किंवा एकुनच मानसिकतेविषयी चर्चा करायची असेल तर पुर्णकष चर्चा व्हावी. एकाद - दुसर्‍या अनावधानामुळे, किंवा दुसर्‍यांच्या प्रभावामुळे झालेल्या चुकीमुळे पुर्ण माणसाला दोषी ठरवणे चुकीचे आहे. तुम्ही कालही श्री नरसिंहराव यांना https://www.misalpav.com/comment/1136300#comment-1136300 दोष दिला होता. काही चुका होतातच, कितीही प्रयत्न केला तरी.

--
अवांतरः येथे चांगले पुस्तक आहे. मी खुप दिवसांपुर्वी वाचले होते.

India, Pakistan and the Secret Jihad
The Covert War in Kashmir, 1947-2004
By Praveen Swami
https://www.sanipanhwar.com/India%20Pakistan%20and%20the%20Secret%20Jiha...

शाम भागवत's picture

17 Mar 2022 - 4:13 pm | शाम भागवत

मला असे वाटते की, नरसिंहराव हे अल्पमतातील सरकार होते. त्यामुळे त्यांना बर्‍याच तडजोडी कराव्या लागल्या.
हर्षद मेहताचे १ कोटी प्रकरणही गाजले होते.
असो.
मिपावर असे बरेच जण होते की, आरेमधील झाडे तोडल्याने ते इतके व्यथित झाले होते की त्यांनी भाजपाविरोधात मतदान करू असे सांगितले होते.
तेव्हां आदित्य ठाकरे हे पर्यावरणवादी होते.

पण राजकारण्यांना याबाबत मानायलाच हवे. भावनिक मुद्यांवर जोर देऊन तो व्यवस्थित मांडून भल्या भल्या अभ्यासकांना ते आरामात गंडवू शकतात.
असो.

शाम भागवत's picture

17 Mar 2022 - 4:17 pm | शाम भागवत

त्यावेळी त्या माणसाला (श्री जगमोहन ) यांना निर्णय घेताना कोणती माहीती उपलब्ध होती, आजुबाजुला कोणती माणसे होती, त्यांना योग्य ती माहीती मिळाली होती की नाही, त्यांच्या आज्ञा व सुचना यांचे योग्य पालन झाले का हे पण बघायला हवे.

+१

आपल्याला सगळ्या बाजूंचे आकलन झालेले नाही याचे भान सतत ठेवता येणे यासारखे भाग्य नाही. ते ज्यांना लाभते तेच फक्त सर्वोच्च स्थानी स्वबळावर जाऊ शकतात. फक्त त्यांना एखादी संधी मिळणे फक्त आवश्यक असते.
असो.

चौकस२१२'s picture

14 Mar 2022 - 5:28 pm | चौकस२१२

Vidya Bhushan Dhar

प्रसाद_१९८२'s picture

14 Mar 2022 - 7:33 pm | प्रसाद_१९८२

अतिशय अस्वस्थ करणारे सत्य आहे तेही पुराव्यांसहित. चित्रपटाचा शेवट अगदी हादरवून टाकणारा आहे. अनुपम खेरचा अभिनय अलिकाडच्या काळातला सर्वौत्कृष्ठ अभिनय म्हणवा लागेल. चिन्मय मांडलेकर बद्दल तर काय बोलावे 'फारुक अहमद डार उर्फ बिट्टा' त्यांने हुबेहुब उभा केलाय इतका की चित्रपट पाहाताना त्याच्या बद्दल तिरस्कार निर्माण होतो.
--
सर्वानी हा चित्रपट एकदा तरी जरुर पहावा.

धर्मराजमुटके's picture

14 Mar 2022 - 8:12 pm | धर्मराजमुटके

आपल्याला एखाद्या गंभीर गोष्टीची माहिती पाहिल्यावर कळते हेच मुळात धक्कादायक आहे.
काश्मीरी पंडीतांचा प्रश्न अनेक वर्षे सुशील पंडीत यांनी लावून धरला आहे. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी आपल्या व्याख्यानातून भारतभर हा प्रश्न कित्येक वर्षापासून लावून धरलेला आहे. युट्युब वर शोधले तर अनेक जुन्या चित्रफीती पाहायला मिळतील.
चित्रपटामुळे कदाचित प्रश्नाला जास्त वाचा फुटत असेल एवढेच वाटते.

sunil kachure's picture

14 Mar 2022 - 11:19 pm | sunil kachure

काश्मीर मध्ये हिंदू चे हत्याकांड झाले आणि ते किती भयानक होते हे ह्या सिनेमात दाखवले आहे
मी अजून सिनेमा बघितला नाही पण एकंदरीत चर्चे वरून तसे वाटते.
इतकी मोठी घटना अचानक घडत नाही
त्याच्या पाठी अनेक कारणे असतात
हिंदू चा इतका द्वेष निर्माण केला गेला की त्याचे रूपांतर हत्याकांड मध्ये झाले.
हे नीट समजून घ्यायचे असेल तर इंदिरा गांधी ह्यांच्या हत्ये नंतर ज्या काही देशात राजकीय घडामोडी होत होत्या त्याचा अभ्यास करायला हवा .इंदिराजी गेल्या नंतर सर्वांना च सत्ता मिळवण्याची स्वप्न पडत होती
राजीव गांधी नवखे होते..
काँग्रेस अंतर्गत राजकारण,विविध विरोधी राजकीय पक्षांचे राजकारण .
ह्या सर्वांचा परिपाक म्हणजे हिंदू चे हत्याकांड..
इतके होत असताना bjp च्या पाठिंब्यावर केंद्रात असलेले vp सिंग सरकार.
.राजकीय पक्ष स्वतःच्या फायद्यासाठी काही ही करू शकतात

दुसर्या एका मराठी साईटवर १९९० मधे भाजप कॉन्ग्रेस बरोबर सत्तेत होती म्हणून त्यान्चा पण पन्डितान्च्या हत्त्येमधे थोडा का होईना हातभार आहे असे काहीजण म्हणत आहेत. एकाने तर फक्त ८९ पन्डित व इतर धर्माचे १६३५ मारले गेले असे एक पोलिसचे पत्र चिकटवले आहे.

प्रसाद_१९८२'s picture

15 Mar 2022 - 11:08 am | प्रसाद_१९८२

फारुक अहमद डार उर्फ बिट्टा यांने टिव्हीवरिल मुलाखतीत (हि मुलाखत युट्युबवर आहे) त्याने स्वत: २० ते २२ पंडीताना डोक्यात गोळी मारुन ठार केले होते असे मान्य केले आहे, जेकेएलएफचे असे कितीतरी बिट्टा त्यावेळी सक्रिय होते. संपूर्ण काश्मिर खोर्‍यात अश्या शंभर-एक बिट्टानी प्रत्येकी २० पंडीत मारले असतील तर त्याचीच संख्या २०,००० च्या आसपास होईल.

सुरिया's picture

18 Mar 2022 - 3:16 am | सुरिया

एक बिट्टा २० पंडित.
शंभर बिट्टा २००० (अक्षरी दोन हजार) हा हिशोब होतो. २०००० नाही.
भावना ओके, हिशोब तेवढा व्यवस्थित मांडा.
किंवा हे भाजपिय वैदिक वगैरे गणित असल्यास तसे नमूद करा.

निनाद's picture

18 Mar 2022 - 4:44 am | निनाद

एका चुकीबद्दल वैदिकाचा द्वेष का?

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Mar 2022 - 9:45 am | चंद्रसूर्यकुमार

दुसर्या एका मराठी साईटवर...

कुठची ती साईट? मायबोली किंवा ऐसीअक्षरे असली तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही. तिथे असल्या लोकांचा भरणा आहे.

एकाने तर फक्त ८९ पन्डित व इतर धर्माचे १६३५ मारले गेले असे एक पोलिसचे पत्र चिकटवले आहे.

हा माणूस नक्कीच विचारवंत असणार. कारण असल्या लोकांना समोर दिसत असते ते बघायचे नसते. त्यातही बळी पडणार्‍यांमध्ये हिंदू असले तर त्याकडे कानाडोळा करायचा हा या लोकांचा शिरस्ता असतो. आता हेच बघा ना- एप्रिल ते जून १९९८ या तीन महिन्यात जम्मू विभागात (जम्मू, उधमपूर, पूंछ, दोडा वगैरे) दीडशे लोकांना दहशतवाद्यांनी ठार मारले अशी ही रेडिफवरील बातमी सांगते. https://www.rediff.com/news/1998/aug/06kash.htm . या बातमीतील एक वाक्य आहे- "The ISI has gradually shifted its stand from azadi to a pan-Islamic jihad. It now aims at communalisation and ethnic cleansing by hitting soft targets." यातील अधोरेखित केलेल्या शब्दावरून दहशतवाद्यांनी नक्की कोणाला ठार मारले हे समजून येईल. ही गोष्ट १९९८ मधील आणि ती पण जम्मू विभागातील. काश्मीर खोर्‍यात असले प्रकार किती चालत होते याची आकडेवारी तपासायला मी गेलो नाही पण जम्मूपेक्षा कितीतरी जास्त होते हे त्या काळातील घटनांचा मागोवा ठेवणार्‍या कोणालाही सांगता येईल. तरीही 'फक्त' ८९ लोक मारले गेले असली पोपटपंची विचारवंत ही घाणेरडी जमात सोडून दुसरे कोणी करूच शकणार नाही.

रात्रीचे चांदणे's picture

15 Mar 2022 - 10:13 am | रात्रीचे चांदणे

पण समजा मेलेल्यामध्ये मुस्लिम जास्त आहेत आस समजलं तरी प्रश्न पडतो की त्यांना मारले कोणी? हिंदूंनि एकवटून त्यांना मारले ही शक्यता फारच कमी वाटते. कदाचीत जे काही मुस्लिम नागरिक मेले असतील मग तो नंबर काही का असेना त्यात त्यांचाच धर्मातील दहशतवादी लोकांनी त्यांना मारले असेल. सध्याही मधून मधून बातम्या येतात की काश्मीर मध्ये ग्रेनेड हल्ल्यात सामन्य नागरिक मेले किंवा एखादा सामान्य काश्मिरी युवक सैनिक सुट्टीसाठी गावाला आला असताना दहशतवाद्यानी त्याला मारले. पण तरीही काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्याविरुद्ध असंतोष आहे किंवा आंदोलन होतात हे ऐकून पण नाही. उलट आपले सैनिक एखादि मोहीम चालवत असताना मशिदींमधून घोषणा दिल्या जातात. बुऱ्हाण वाणी सारखा दहशतवादी मारला गेला की तेथील सामान्य मुस्लिम लोक आंदोलन करतात. गेल्यावर्षी एक बातमी आलेली की दहशतवाद्यांनी एका मुस्लिम सरपंचाची हत्या केली होती.
दहशतवाद्यांना सपोर्ट करून कश्मिरी जनतेचेच नुकसान झालेले आहे

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Mar 2022 - 10:26 am | चंद्रसूर्यकुमार

दहशतवाद्यांना सपोर्ट करून कश्मिरी जनतेचेच नुकसान झालेले आहे

इतकं होऊनही त्यांना ते समजत नसेल तर त्यांच्याविषयी अजिबात अश्रू ढाळायची गरज नाही. थोडीथोडकी नाही ३० वर्षे तोचतोच अनुभव परत परत घेऊनही त्यांना ते समजत नसेल तर काय करायचे? त्यांना त्यांच्या नशीबावर सोडून द्यायचे दुसरे काय?

आग्या१९९०'s picture

16 Mar 2022 - 4:02 pm | आग्या१९९०

मायबोली किंवा ऐसीअक्षरे असली तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही. तिथे असल्या लोकांचा भरणा आहे.
मला ऐसीअक्षरेवर ह्या चित्रपटावर एकच धागा दिसत आहे व चित्रपटाच्या बाजूने किंवा विरुद्ध चर्चा तर नाहीच्या बरोबर आहे. बैलाचे दूध काढत नाही वाटतं ते.

स्वप्निल रेडकर's picture

15 Mar 2022 - 11:03 am | स्वप्निल रेडकर

काश्मिर फाईल्स बघताना मला Mathieu kassovitz चा चित्रपटामधला एक डायलॉग पुन्हा पुन्हा आठवत राहिला -hate breeds hate ..असो
मी प्रत्येक कहाणी पडद्यावर ऊतरली पाहिजे याचा समर्थक आहे ,जर गोष्ट हिंस्त्र असेल तर तर ती तशी पडद्यावर दाखवली जायला हवी.
जेव्हा Terentino किंवा Gaspaer noea ,fantacy चित्रपटात एवढी क्रूर दृश्य शकतात तर सत्य घटनेवर आधारित चित्रपटात त्याच चित्रण येण स्वाभाविक आहे किंवा यायलाच हवं .roman पोलान्स्की ची पियानिस्ट हि अशीच एक film आहे ज्यात नाझी राजवटींच्या अत्याचार आणि हिंसेचा चित्रण आहे . जालियनवाला बागेच्या हत्याकांडामधली क्रूरता पूर्ण ऑथेन्टिसिटी ने शुजीत सरकार ने फिल्म मध्ये मांडलीय .पण असं का होत कि पोलान्स्की चा “दा पियानिस्ट “बघून आपल्याला जर्मनी मधल्या गैर ज्यू बद्दल द्वेष निर्माण होत नाही ,आणि शुजीत सरकार चा ”सरदार उधम सिंग “बघितल्यावर सगळ्या इंग्रजाना आपण शत्रू समजत नाही. असं का...?
या “का ”च उत्तर या ओळीत दिसत .”की गोष्ट काय आहे यापेक्षा ती कशी सांगितली गेली आहे “एक चांगला फिल्म मेकर आपली गोष्ट प्रेक्षकांपुढे मांडताना आपली जबाबदारी नाही विसरत . थोडं अजून सोपं करून सांगतो जस लिंकन ने लोकशाहीची व्याख्या केलीय ऑफ द पीपल ,बाय द पीपल अँड फॉर द पीपल ,तशीच काहीशी परिभाषा या अग्निहोत्रींच्या चित्रपटांसाठी लागू होते .एका विशिष्ट वर्गाद्वारा ,विशिष्टवर्गासाठी ,एका विशिष्ट वर्गाविरुध्द .... आपण थोडा विचार केला तर लक्षात येईलकी १७० मिनीटस चित्रपटामध्ये एका हि नॉर्मल मुस्लिम कॅरेक्टरला अर्ध्या मिन च पण फुटेज दिल गेलं नाहीय .लिटरली निल ,अगदी मुस्लिम स्त्रियांपासून,इमाम पर्यंत सगळ्यांना व्हिलन केलं गेलाय. पण त्या कम्युनिटी मधल्या एकही कॅरॅक्टरला ला व्हाईट शेड मध्ये दाखवलं नाही गेलाय .आता तुम्ही म्हणाल कि सगळे तसेच होते मग दाखवणार कस पॉसिटीव्ह त्यांना? तर मी म्हणेन कि बकवास बंद करा. ज्या वेळी काश्मीर मधून exodus झालं त्यावेळी काश्मिरी पोलिटिकल फिगर्स पासून ईस्लामिक धर्मगुरूंच्या पण हत्या झाल्या कारण ते काश्मिरी पंडितांसाठी बोलत होते .,दहशतवाद्या विरुद्ध उभे होते. पण असं स्क्रीन वर दाखवलं तर नॅरेटिव्ह सपक झालं असत ना .कारण जेवढं लोकांचं रक्त सळसळेल तेवढं चांगलं,जेवढ्या शिव्या लोक घालतील तेवढं चांगलं ,घोषणाबाजी जेवढी जास्त फायदा ..
film जशी पुढे सरकते तास एकामागून एक प्रोपोगांडा समोर येत जातो. secular मतलब sickular ,संघवाद से आझादी मनुवाद से आझादी म्हणणं म्हणजे गद्दारी ,काश्मिरी महिलेवर जे अत्याचार होतात ते आतंकवादी आर्मीचे युनिफॉर्म घालून करतात ,मुसलमान किती पण जवळचा असो तो वेळ आल्यावर धर्मच निवडणार .वगैरे वगैरे .पण हे सगळं असून सुद्धा मी म्हणेन कि आपण जरूर हा चित्रपट बघा .म्हणजे तुम्हाला चित्रपटाबरोबर त्याचा परिणाम पण दिसु शकेल. तुमच्या पाठीमागच्या सीट वर बसलेल्या लोकांना काँग्रेस ला आयाबहिणीवरून शिव्या देताना ऐकू शकू. त्यांना हे सांगायला भीती वाटेल कि बाबानो जेव्हा हे सगळं घडत होत तेव्हा केंद्रामध्ये काँग्रेस नाही तर जनता दल सरकार होता त्यात तुमची लाडकी भाजप सामील होती.,कारणाशिवाय जय श्री राम च्या घोषणा ऐकू येतील आणि पुरुषांच्या बडबडी पण ऐकू की हिंदू एक झाले पाहिजेत हो नाहीतर हे साले आपल्याला पण कापून टाकतील,मोदी असते ना तर असं झालाच नसतं .,खरं सांगायचं तर हि film अशाच लोकांसाठी बनवली गेलीय ज्यांच्या मनात आधीपासूनच मुस्लिम द्वेष खच्चून भरलाय पण तो डायरेक्ट व्यक्त कारण पांढरपेशा स्वभावामुळे सुसंगत वाटत नसल्यामुळे आता फिल्मचा आडून आणि ते पण सध्याच्या वातावरणात व्यक्त कारण सोपं झालाय ..डोक्यात आधी “ते लोक सगळे तसेच असतात ”याला खतपाणी घालायला आणखी एक कारण बस्स.आणि काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि त्यांना त्यांच्या मातृभूमीपासून करावा लागलेलं स्थलांतर याचा उपयोग देशात कुठेपण मायनॉरिटीस होणाऱ्या अन्यायामधे ढालीसारखा करायचा बस्स!!"तेव्हा कुठे होता जेव्हा काश्मिरी पंडितांवर वर अत्याचार झाले"type . मुस्लिम दहशवाद्यांपेक्षा पूर्ण मुस्लिम समाजालाच व्हिलन ठरवायला सोपं. फिल्म बघून काश्मिरी पंडितांच्या दुःखाबद्दल उमाळे काढणाऱ्यांनी कधी विचारलं का सरकारला कि काय केलं काश्मिरी पंडितांना पुन्हा काश्मीर मध्ये सेटल करण्यासाठी.गेल्या ७ वर्षात किती पंडित परत गेले व्हॅली मध्ये ..किती गुन्हेगारांना शिक्षा केली जे जबाबदार होते यासाठी. पण असे प्रश्न अडचणीचे असतात त्यापेक्षा भारत माता कि जय ,पाकिस्तान चाले जाव . वगैरे उन्माद पसरावं जास्त सोपं नाही का?
आणि कोणीही नाकारत नाहीय कि हे सर्व islamic fanatics मुळे झालाय पण यात भारतीय राजकारण्यांचे हाथ पण काश्मीरच्या रक्ताने माखले आहेत फक्त दहशतवाद्यांचेच नाहीत आणि अग्निहोत्रीच्या हिम्मतीला दाद देणारे विसरताहेत कि हिम्मत प्रतिकूल परिस्थितीमध्ये असते जेव्हा भक्त मंडळींचं राज्य चालू असताना धार्मिक उन्माद पसरवणारी फिल्म बनावं तेवढं कठीण नसावं बहुतेक .आणि चित्रपटातून इतिहास शिकायचं ट्रेंड पण धोकादायक आहेच.
आणि शेवटी हा प्रश्न उरतोच कि फक्त काश्मिरी बांधवांवर झालेला अन्याय आणि अत्याचार जगासमोर यावा हे या फिल्म चा ध्येय आहे कि दुसरा पण काही मोटिव्ह आहे. (हा प्रश्न प्रेक्षकांनी स्वतःलाच विचारायचा आहे आणि त्याच उत्तर पण स्वतःलाच मिळेल )

( आणि थोडे फॅक्टस -हल्लीच(भाजप राजवटीत)फाईल केलेल्या एका rti नुसार गेल्या ३० वर्षात दहशतवाद्यांनी १७२४ लोकांची हत्या केली त्यात ८९ काश्मिरी पंडित होते.आणि यात काश्मिरी पंडितांचा आकडा कमी आहे म्हणून त्यांची शोकांतिका कमी होत नाही. फक्त समाज म्हणून आपणापण कसे दुटप्पी आहोत हे दिसून येत. ) आणि हा फिल्म बद्दल पर्सनल view आहे ,तुमची मत वेगळी असू शकतात .शेवटी लोकशाही आहे :) may peace prevail

आणि जाता जाता “परझानिया ” नावाचा एक चित्रपट आलाय तो पण बघता आला तर बघा कारण गुजरात मध्ये तरी unofficial बॅन आलाय ,हा पण सत्य घटनेवर आधारितच आहे एक पारशी जोडप्याचे गोध्रा दंगलीमध्ये हरवलेल्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न दाखवलाय .कदाचित तेवढं जास्त भावुक नाही व्हायला जमणार !असो ...

मूळ लेख रिषभ दुबे

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Mar 2022 - 11:11 am | चंद्रसूर्यकुमार

बकवास पोस्ट एवढेच लिहितो.

मुक्त विहारि's picture

15 Mar 2022 - 12:20 pm | मुक्त विहारि

त्यामुळे, उत्तर देण्याची तसदी घेतली नाही...

सौंदाळा's picture

15 Mar 2022 - 12:28 pm | सौंदाळा

+१
काश्मिर फाईल्स मधल्या पल्लवी जोशीच्या व्यक्तीरेखेची मानसिकता असणारी ही लोक.
१. काश्मिरमधे दहशतवादात बळी पडलेले हिंदू, मुस्लिम आणि इतर, यात मुस्लिमांची संख्या
२. १९९० मधे झालेला फक्त हिंदुंचा वंशविच्छेद आणि जबरदस्ती झालेले विस्थापन
वरील १ आणि २ ला लोक एकाच पारड्यात तोलताना बघून चीड आली.
कॉग्रेसच्या काळात अगदी २०१२/१३ पर्यंत हुर्रीयत नेते दिल्लीतील काँग्रेसींना भेटायला, चर्चा, मसलत वगैरे करायला यायचे.
ज्या गटाची स्थापनाच काश्मिर वेगळे करण्यासाठी आहे त्यांना पायघडया का घातल्या जायच्या कोण जाणे.
भाजपा सत्तेत आल्यापासून हुर्रियत हा विषय कमीत कमी राजकारणातून तरी संपला आहे.
असे चित्रपट काढून लोकांचे संरक्षण कसे होणार, दहशतवाद वगैरे कसा संपणार वगैरे प्रश्न विचारणार्‍यांची कीव येते.
असे चित्रपट हे प्रश्न सोडवायचे नाही तर जनजाग्रुतीचे माध्यम आहेत. राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय हीरो यांवर प्र्त्येक वर्षात कमीत कमी दोन तीन चित्रपट तरी यायलाच पाहिजेत.

मुक्त विहारि's picture

15 Mar 2022 - 12:41 pm | मुक्त विहारि

सहमत आहे ...

चालु द्या तुमचे विचारजंत. तुम्ही सरळ सरळ वंशद्वेषाचापुरस्कार करताय.

आपण थोडा विचार केला तर लक्षात येईलकी १७० मिनीटस चित्रपटामध्ये एका हि नॉर्मल मुस्लिम कॅरेक्टरला अर्ध्या मिन च पण फुटेज दिल गेलं नाहीय .लिटरली निल ,अगदी मुस्लिम स्त्रियांपासून,इमाम पर्यंत सगळ्यांना व्हिलन केलं गेलाय. पण त्या कम्युनिटी मधल्या एकही कॅरॅक्टरला ला व्हाईट शेड मध्ये दाखवलं नाही गेलाय .आता तुम्ही म्हणाल कि सगळे तसेच होते मग दाखवणार कस पॉसिटीव्ह त्यांना?

याचा अर्थ गोरे ते सगळे चांगले आणि अगोरे ते वाईट.
ज्या पध्दतीने तुम्ही ईस्लामिक दहशतवादाचे समर्थन करत आहात त्याच पध्दतीने गोर्‍या वंशवादाचे समर्थन करत आहात.

sunil kachure's picture

15 Mar 2022 - 12:27 pm | sunil kachure

समतोल आणि प्रश्नाच्या सर्व बाजूंचा विचार करून लिहलेली पोस्ट.
सिनेमा बनवणाऱ्या लोकांकडे इतका डेटा असेल तर सरकार कडे खूप मोठी माहिती असेल
केंद्र सरकार कडे अनेक एजन्सी आहेत.
काश्मिरी हत्याकांड मध्ये कोण सहभागी होते त्याची माहिती सरकार कडे असणारच.
2014 पासून केंद्रात सत्तेवर आहेत.
किती दोषी लोकावर कारवाई केली.
दोषी मध्ये खूप सारे राजकीय पक्षांचे नेते च असतील हे नक्की.
किती काश्मिरी हिंदू मारले गेले विस्थापित झाले त्याची सर्व माहिती सरकार कडे असेल.
2014 पासून केंद्रात सत्ता आहे.
किती विस्थापित हिंदू लोकांना त्यांच्या मूळ जागी सुरक्षा देवून मूळ जागी बसवले.
कंगना ल z plus सुरक्षा सरकार देत असेल .
ज्या विस्थापित हिंदू ना z security तरी देवू शकते.
किती विस्थापित लोकांची संपत्ती परत मिळवून दिली
हे प्रश्न खरेच कोणाला पडत नाहीत
शोकांतिका आहे.
फक्त उन्माद निर्माण करून राजकीय पोळी भाजणे इथ पर्यंत विषयाचे गांभीर्य असते.

तर्कवादी's picture

17 Mar 2022 - 12:07 am | तर्कवादी

काश्मीरी पंडितावर झालेल्या अन्यायाचा इतिहास जाणून घेणे आणि त्यामुळे व्यथित होणे ही एक गोष्ट तर त्यामुळे लोकांच्या मनात व एकंदरीत समाजात मुस्लिमद्वेषास उत्तेजन दिले जाणे हे धोकादायक वळण घेवू शकते.

जसे "जय भीम" हा चित्रपट पाहून आपण व्यथित होतो (हा चित्रपटही सत्यघटनेवर आधारित आहे म्हणून हे उदाहरण घेतले) , त्यातील आदिवासी जमातीच्या पात्रांवर झालेल्या अन्यायाबद्दल आपल्याला राग येतो. पण म्हणून आपण समस्त उच्चवर्णीयांबद्दल किंवा फार काय समस्त पोलिसांबद्दलही मनात राग धरत नाही. तशीच प्रतिक्रिया "काश्मीर फाईल्स" बघितल्यावरही असल्यास उत्तमच. त्या चित्रपटाची हाताळणी त्या पद्धतीने असेल तर चांगलेच (मी अद्याप हा चित्रपट पाहिला नाही) . पण सध्यातरी चित्रपटाचे प्रमोशन व प्रेक्षकांच्या ढोबळ प्रतिक्रिया बघता ही अपेक्षा अवास्तवच ठरेल व पहिल्या वाक्यात उल्लेखलेली भीतीच खरी ठरेल की काय असे चित्र आहे.
असो.. पुढे समाजात काय वाढून ठेवले आहे ते येणारा काळच ठरवेल. आपण आपल्या परीने सुज्ञ विचारसरणीस पाठिंबा द्यावा इतकंच काय ते आपल्या हातात.

Trump's picture

17 Mar 2022 - 12:19 am | Trump

पण सध्यातरी चित्रपटाचे प्रमोशन व प्रेक्षकांच्या ढोबळ प्रतिक्रिया बघता ही अपेक्षा अवास्तवच ठरेल व पहिल्या वाक्यात उल्लेखलेली भीतीच खरी ठरेल की काय असे चित्र आहे.

मला तसे वाटत नाही. ढोंगी पुरोगामी विनाकारण वातावरण बिघडवुन आणि बुध्दीभेद करुन ताणतणाव निर्माण करत आहेत. दुर्देवाने मुस्लीम समाजातील काही लोक त्याला बळी पडतात आणि वादविवाद सुरु करतात. भारतीय समाज नेहमीच मुस्लीम व मुस्लीमेतर यांच्यात तणावाचा सामना करत आला आहे, जो पर्यंत मुस्लिम त्यांच्या चुका स्विकारत नाहीत तो पर्यंत तो तसाच राहणार आहे. अशीच परिस्थिती गदर चित्रपटानंतर झाली होती.
ज्या लोकांचे वाचन नाही आणि चित्रपटातुन नवीन इतिहास कळतो अशा लोकांना मात्र धक्का आहे.

मला तसे वाटत नाही

तसे असेल तर उत्तमच. म्हणूनच मी वर म्हंटले की "पुढे समाजात काय वाढून ठेवले आहे ते येणारा काळच ठरवेल" ते खासकरुन या चित्रपटाच्या निमित्ताने - चित्रपटाचा बरावाईट काय परिणाम होतो ते..

अशीच परिस्थिती गदर चित्रपटानंतर झाली होती

थोडाफार वाद झालाही असेल पण अगदीच समाज ढवळून निघाला असं काही झालं नाही.
तशीही गदरची मांडणी हिंदू विरुध मुस्लिम अशी नव्हती - भारत/भारतीय विरुद्ध पाकिस्तानी अशी होती.

थोडाफार बॉम्बेच्या वेळेसही झाला - मला वाटतं मुस्लिम नायिका हिंदू नायकाशी लग्न करते असं दाखवल्याने काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता असं काहीसं आठवतंय. पण नंतर चित्रपट स्वीकारला गेला. फार काही गदारोळ झाला नाही. मला आठवतंय मी १५ वर्षांचा होतो आणि एकट्यानेच जावून दापोडीला हा चित्रपट पाहिला. घरच्यांनी आधी थोडी काळजीचा सूर लावला होता पण मी बघितलाच.

पिंजर चित्रपटातही (नुकताच मी हा पुन्हा पाहिला होता) मुस्लिम युवक (मनोज वाजपेयी) हा हिंदू युवतीला (उर्मिला) पळवून नेतो - तेही स्वातंत्र्यापुर्वी. आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर फाळणीच्या वेळी आणखी एका हिंदू मुलीचे (संदाली सिन्हा) पाकिस्तानातील मुस्लिमांकडून अपहरण केले जाते. पण तरीही चित्रपटाची मांडणी हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी वाटत नाही. चित्रपट पाहून त्यावेळी ज्यांनी जे काही भोगलंय त्यांच्याबद्दल हळहळ वाटते पण त्यातुन कुठेही मुस्लिमविरोधी प्रतिक्रिया निर्माण झाली नाही. "आताच जागे व्हा - नाहितर हे कुठेही घडू शकते ... तुमच्या आमच्या सोबतही घडू शकते" किंवा "सेक्युलरांना चपराक" वगैरे प्रकारचा प्रचार वा अशा प्रकारची भावना निर्माण करण्याचे काम या चित्रपटाने कुठेही केले नाही. (अमृता प्रीतम यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट कलात्मकरित्या दिग्दर्शित केला होता चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी. - अलीकडे २०१८ मध्ये द्विवेदींनी वाराणसीतील अस्सी घाट येथील समाजजीवनातील स्थित्यंतरांवर बेतलेला "मोहल्ला अस्सी " हा सुंदर चित्रपट दिग्दर्शित केला -तो ही आवर्जुन बघण्यासारखा आहे- असो.)

मग आताच " काश्मीर फाईल्स" बाबत हे का घडत आहे ? या चित्रपटाने अतिरेक्याबद्दल चीड निर्माण होणे अपेक्षित आहे की सरसकट मुस्लिमविरोधी वा भावनांना उत्तेजन दिले जात आहे/किंवा तेच अपेक्षित आहे काय? आणि मुस्लिमांना सरसकट व उघडपणे थेट शिव्या घालणे पॉलिटिकली इनकरेक्ट ठरेल म्हणून सेक्युलर लोकांना शब्दांनी बडवावे - अशी काही मांडणी अभिप्रेतच आहे ?चित्रपटाला पाठिंबा देणार्‍यांपैकी कुणी (शक्यतो चित्रपट बघून ) प्रामाणिक मत व्यक्त करु शकेल काय ? बाकी काँग्रेस - भाजप - जगमोहन - व्ही पी सिंग इत्यादींना तुर्तास बाजूला ठेवून ठळक ओळीतील प्रश्नाचे उत्तर मिळाले तर बरे होईल.

श्री तर्कवादी.
मग आताच " काश्मीर फाईल्स" बाबत हे का घडत आहे ? या चित्रपटाने अतिरेक्याबद्दल चीड निर्माण होणे अपेक्षित आहे की सरसकट मुस्लिमविरोधी वा भावनांना उत्तेजन दिले जात आहे/किंवा तेच अपेक्षित आहे काय? आणि मुस्लिमांना सरसकट व उघडपणे थेट शिव्या घालणे पॉलिटिकली इनकरेक्ट ठरेल म्हणून सेक्युलर लोकांना शब्दांनी बडवावे - अशी काही मांडणी अभिप्रेतच आहे ?

याचा बराचसा दोष तथाकथित पुरोगामी लोकांना जातो. माझ्या माहितीमध्ये कट्टर कॉंग्रेसवाले किंवा तत्सममतवाले, भाजपा कि समकंक्षविचारणीकडील पक्षाकडे वळले आहेत. ढोंगी पुरोगामी लोकांनी ज्या पध्दतीने हिंदु मंदीरावर हल्ले झालेच नाहीत, इस्लाममध्ये सगळेच कसे समान असतात, दंगलीमध्ये हिंदुचा दोष नेहमी कसा असतो, बाटला हाऊस, इसरत जहॉ प्रकरण, समान नागरी कायदा, अश्या उचापती केल्याने मध्यममार्गी लोक वैतागले आहेत आणि संयम जवळपास संपला आहेत. तेच मतदारपेटीमधुन व्यक्त होत आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुस्लिमांनी आणि युरोपियन हिंदुंची आणि भारतीयांची माफी मागणे अपेक्षित होते. इतर देशांमध्ये truth and reconciliation commission सारखे प्रयोग झाले, दुर्देवाने ते भारतामध्ये झाले नाहीत उलट भारतामध्ये डावी लोक इतरांना बोलुनही देत नाहीत. उदा. सीएए आणि एनआरसी सारखे युरोपियन देशांमध्ये आहेत, मुस्लीमांना तिथे त्यांच्याबद्दल अडचण नाही, पण भारतामध्ये आंदोलने चालतात. मुस्लीम इतर देशामध्ये समानतेसाठी आंदोलने करतात आणि भारतामध्ये समान नागरी कायद्याला विरोध करतात. तांत्रिक प्रगतीमुळे आणि वाढलेल्या संवादामुळे ह्या गोष्टी सहज कळतात आणि ढोंगी डाव्यांच्या दांभिकपणा उघडकीस येतो.

मी श्री पटेल यांचे भाषण येथे डववतो, तुम्हीच सांगा हे भाषण कोणताही कॉंग्रेसवाला किंवा तथाकथित डावा आज देईल का?

----
तथाकथित डाव्यांच्या जोडीला गजवा - ए - हिंद, बुरखा, इस्लाममधील असमानता हे जोडीला आहेतच. तुम्हाला जवळचे उदाहरण देतो. https://www.misalpav.com/comment/1127514#comment-1127514

तर्कवादी's picture

17 Mar 2022 - 6:29 pm | तर्कवादी

ट्रम्पजी,

याचा बराचसा दोष तथाकथित पुरोगामी लोकांना जातो.

माफ करा .. पण मला वाटते आपण कारण मीमांसा नंतर करुयात. मला फक्त आता चित्रपटामुळे प्रेक्षकांची किंवा चित्रपटाच्या एकुणच समर्थकांची प्रतिक्रिया काय स्वरुपाची आहे - म्हणजे साधारणपणे
१) काश्मीरमध्ये १९९० साली काश्मीरपंडितांवर झालेले अत्याचार मला व्यथित करत आहेत
२) क्र १ + त्यामुळे काश्मिरी अ तिरेक्यांबद्दल माझ्या मनात अतिशय राग निर्माण झाला आहे
३) क्र १ + क्र २ + असे घडण्यास प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष कारणीभूत सर्व राजकारण्यांबद्दल मनात अतिशय राग निर्माण झाला आहे
४) क्र १+ क्र२ + क्र ३ + सर्वच मुस्लिम व्यक्तिंबद्दल माझ्या मनात राग व संशय निर्माण झाला आहे
५) क्र १+ क्र२ + क्र ३ + क्र ४ + या घटनेबद्दल मी व इतरांनी जमेल तेव्हा जमेल तसा सूड घ्यायला हवा असे मला वाटते.
किंवा अन्य काही प्रतिक्रिया....किंवा वरच्या १ ते ५ मधले इतर काही कॉम्बीनेशन्स...
तुम्हाला काय वाटते ? साधारण पणे काय प्रतिक्रिया निर्माण होत आहेत ?

मी श्री पटेल यांचे भाषण येथे डववतो, तुम्हीच सांगा हे भाषण कोणताही कॉंग्रेसवाला किंवा तथाकथित डावा आज देईल का?

सध्या तरी मला चित्रपटाच्या परिप्रेक्ष्यातुन फक्त चर्चा करायला आवडेल.

एक सामान्य व्यक्ती म्हणून माझी फक्त इतकीच अपेक्षा आहे की - चित्रपट जरुर बनावेत, बघितलेही जावेत, इतिहास लोकांसमोर नक्कीच यावा पण चित्रपट अशा प्रकारचा असाव की त्याची प्रतिक्रिया म्हणून समाजात एखाद्या जाती वा धर्माविरुद्ध द्वेष निर्माण होवू नये- एखाद्या चुकीच्या प्रवृत्तीबद्दल फक्त राग असावा. - जसे मी वरच्या प्रतिसादात पिंजर या चित्रपटाचे उदाहरण दिले-- हा चित्रपट कुठल्याही प्रकारे द्वेषास उत्तेजन देत नाही. माझ्या या अपेक्षेचे आणि व एकूण्च माझ्या मुस्लिमद्वेष न करण्याचे वर्गीकरण ढोंगी पुरोगामी म्हणून केले जाईल का ? एकूणातच मुस्लिमद्वेष मनात न बाळगणे = ढोंगी पुरोगामी असे नवसमीकरण (न्यू नॉर्मल) तयार होत आहे का ?

Trump's picture

17 Mar 2022 - 6:44 pm | Trump

सध्या तरी मला चित्रपटाच्या परिप्रेक्ष्यातुन फक्त चर्चा करायला आवडेल.

सध्या तरी मला चित्रपटाच्या परिप्रेक्ष्यातुन फक्त चर्चा करायला आवडेल.

जर तुम्ही सगळी पार्श्वभुमी काढुन टाकली तर चर्चा कशी करणार!!! दुर्देवाने भारतीय लोकांना त्याविषयी ईतिहास आहे, आणि तो काढुन टाकणे अशक्य आहे. उदा. किलींग फिल्ड (https://en.wikipedia.org/wiki/The_Killing_Fields_(film)) नावाचा चित्रपट आहे, तसे सध्याच्या कंबोडीयाबरोबर भारतीय समाजाचे संबध कमी आहेत, त्यामुळे भारतीय समाज त्याविषयी तट्स्थ मत देउ शकतो. जर तुम्हाला तटस्थ (फक्त चित्रपटाच्या परिप्रेक्ष्यातुन) मत हवे असेल तर ज्यांचा कोणतही संबध नाही अशी लोक घ्यायला हवेत.

माझ्या या अपेक्षेचे आणि व एकूण्च माझ्या मुस्लिमद्वेष न करण्याचे वर्गीकरण ढोंगी पुरोगामी म्हणून केले जाईल का ? एकूणातच मुस्लिमद्वेष मनात न बाळगणे = ढोंगी पुरोगामी असे नवसमीकरण (न्यू नॉर्मल) तयार होत आहे का ?

ढोंगी पुरोगामी म्हणजे आपल्या उध्दीष्ठासाठी खोटा / अपुरा किंवा एकतर्फी इतिहास तयार करतात, इतिहासिक चुका न स्वीकारता, त्यावर पांघरुन घालतात त्यांना म्हणतात.
तुम्ही तसे करता का, हा प्रश्न तुम्हीच तुम्हाला विचारा.

उत्तम प्रतिसाद. मला वाटते १-५ सर्वच रेंजमध्ये काही प्रतिक्रिया येत आहेत.

पण ४-५ या प्रतिक्रिया जास्त चर्चिल्या जाणार. त्यामुळे साधारणपणे काय होते हे सांगणे अवघड आहे.

तर्कवादी's picture

17 Mar 2022 - 8:40 pm | तर्कवादी

धन्यवाद कॉमी जी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Mar 2022 - 7:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडला प्रतिसाद. अगदी योग्य.

-दिलीप बिरुटे

तर्कवादी's picture

17 Mar 2022 - 8:41 pm | तर्कवादी

धन्यवाद सर

सौंदाळा's picture

17 Mar 2022 - 9:00 pm | सौंदाळा

उत्तम प्रतिसाद.
माझ्यासाठी क्रमांक ३

तर्कवादी's picture

17 Mar 2022 - 10:52 pm | तर्कवादी

उत्तम प्रतिसाद.

धन्यवाद

माझ्यासाठी क्रमांक ३

परफेक्ट !!

प्रदीप's picture

17 Mar 2022 - 8:26 pm | प्रदीप

पण सध्यातरी चित्रपटाचे प्रमोशन व प्रेक्षकांच्या ढोबळ प्रतिक्रिया बघता ही अपेक्षा अवास्तवच ठरेल व पहिल्या वाक्यात उल्लेखलेली भीतीच खरी ठरेल की काय असे चित्र आहे.

हे निव्वळ कंजेक्चर आहे. आणि अर्थात हे व्यक्तिगत आहे. उदा. मी स्वतः उजवीकडे झुकणारा असल्याने, सोशल मीडियावर मी त्याच बाजूच्या अनेकांना फॉलो करतो. ह्यांतील एकानेही, आपण खाली दिलेल्या श्रेणीक्रमांतील १- ३ च्या वर (४ आणि/ अथवा ५) प्रतिक्रिया दिलेली नाही.

एक मात्र खरे, ह्या चित्रपटाच्या निमीत्ताने जी चर्चा होते आहे, त्यांतील डाव्या व तथाकथित उदारमतवाद्यांच्या आक्रस्ताळ्या भूमिका पहाता, त्याची दाहकता मूळापेक्षा वाढली आहे. म्हणजे, तुमच्या श्रेणीक्रमांत खरे तर ३अ आहे-- 'जे ढळढळीत पुराव्यांनिशी मांडले जात आहे, त्याविषयी नकारात्मक, सांशयिक भूमिका घेणार्‍या त. क. उदारमतवाद्यांविषयी माझ्या मनांत राग व संशय निर्माण झाला आहे' ते बर्‍याच जनतेचे होत आहे. 'जे झाले असे चित्रपट मांडतो, ते तसे झालेच नाही'/ 'इतक्या पूर्वी होऊन गेलेल्या त्या घटनांचा आता उल्लेख कशाला?"/ 'ह्याने समाजांत दुफळी निर्माण होईल' असली वावदूक वक्तव्ये ही मंडळी चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीपासून आतापर्यंत करत आली आहेत, ते चीड आणणारे आहे.

'शिंडलर्स लिस्ट' सारखा चित्रपट प्रसिद्ध झाल्यावर, ह्यामुळे दुफळी माजेल, लोक समस्त जर्मनांशी वाईट वागू लागतील, असले काही झालेले नाही. आताही ह्यांतून हिंदू- मुस्लिम दुफळी निर्माण होण्याइतका हिंदू समाज बावळट नाही. सर्वसामान्य जनता व त. क. पुरोगामी/ उदारमतवादी ह्यांतील दुफळी नक्कीच वाढेल, मात्र. आणि त्याला चित्रपट निर्माता/ दिग्दर्शक जबाबदार न राहता, हे त. क. पुरोगामीच असतील.