झटपट मोदकाची आमटी

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
24 Sep 2021 - 5:10 pm

मोदकाची आमटी करण्यात माझा हात सफाईदारपणे बसला आहे .वेळेला कोणतीच भाजी नसेल तर २५-३० मिनिटांत ही आमटी तयार होते.ही आमटी खानदेशातली खासियत आहे .पण सुगरणीला कोठेही अगदी सहज शक्य आहे.
झटपट का ? तर इथे चातुर्मासामुळे कांदे नसल्याने ग्रेव्हीला फाटा मिळाला आणि पदार्थ लवकर होतो.
साहित्य :

दोन वाटी डाळीचे पीठ (बेसन)
ओवा १ चमचा
तेल २ चमचे

-सारण साहित्य

अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचा किस
अर्धी वाटी तीळ
एक चमचा खसखस
२ चमचे जिरे
लसूण -६ पाकळ्या
सुकलेल्या २ लाल मिरची
१ चमचा गरम मसाला
कोथिंबीर
तेल १ मोठा चमचा

 
-मोदक कृती:
१.तेच ते आपले मुख्य नायक डाळीचे  पिठ त्यात अर्धा चमचा तिखट ,चवीनुसार हळद ,मीठ,ओवा  आणि  दोन चमचे तेल टाकावे.घट्ट असे हे पीठ मळावे .(नीट ह बऱ्याचदा पाणी जास्त म्हणून पीठ ओता आणि असा खेळ खूप वेळ चालतो .)
२.पीठला जरा आराम द्यावा ,बाजूला ठेवावे.मधल्या लुटपुट सारणासाठी कढईत एक मोठा चमचा तेल घ्यावे.गरम झाल्यावर  लाल मिरची ,खोबऱ्याचा कीस ,तीळ ,जीरे,लसूण पाकळ्या,खसखस अशा क्रमाने टाकावे .चांगले लाल होईपर्यंत मंद आचेवर परतावे.नंतर थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवावे.

३.वरील सारण पदार्थ गार झाल्यावर कोथिंबीर आणि गरम मसाला  घालून  मिक्सरमधून बारीक वाटावे.मोदकात भरण्यापूर्वी त्यात एक चमचा तेल आणि किंचित पाणी टाकून पेस्ट ओलसर करावी (कोरडे सारण नीट शिजत नाही .)
 ४.डाळीच्या मळलेल्या  पिठाच्या छोट्या छोट्या लाट्या करून मोद्कासारख्या बारीक गोल लाटाव्या .
५.गोल पारींमध्ये मध्यम आकाराचे  सारण भरावे आणि मस्तपणे पाकळ्या जोडून मोदक बनवावे.
-आमटी
१.कढईत तेल घेऊन फोडणी द्यावी.
२.उकळलेले पाणी (साधारण ४ वाट्या ) त्यात ओतावे.उकळी आल्यावर त्यात दाण्याचा कुट टाकावा.चवीप्रमाणे मीठ आणि तिखट टाकवे.
३.पाण्याला उकळी फुटल्यावर मोदक त्यात सोडावे .
४.मोदक  शिजायला  जरा पंधरा मिनिटे लागतात .असे ते टम्म होऊन वर आले की शिजले समजावे .(जास्त काळ शिजल्यावर फुटण्याची पाकृची फजिती होऊ शकते.)
बाप्पाला गोड गोड मोदक आणि  अशी ही तिखट मोदकाची आमटी आपल्याला आहे ना गंमत !!
-भक्ती
A

प्रतिक्रिया

कंजूस's picture

24 Sep 2021 - 6:24 pm | कंजूस

गोळ्यांची आमटी किंवा गट्टे का साग ची आठवण झाली. कांदा नसल्याने पसंत.

गॉडजिला's picture

24 Sep 2021 - 6:27 pm | गॉडजिला

ग्रेट रिस्पांसाबीलीटी…

गोरगावलेकर's picture

24 Sep 2021 - 7:01 pm | गोरगावलेकर

पण खान्देशात मोदकाची भाजी माझ्या पाहण्यात तरी नाही.
त्याऐवजी वाटलेल्या मसाल्याच्या आमटीत शेव घालून झटपट तयार होणारी शेवभाजी प्रसिद्ध.
मी भजांच्या पिठासारखे बेसनपीठ घट्ट भिजवून उकळत्या आमटीत हाताने किंवा झाऱ्याने वड्या पाडून घेते. (भाजी झणझणीत व भरपूर तर्री असलेलीच हवी)
खान्देशात हिला 'डुबुक वड्यांची' भाजी म्हणतात.

आनंदी गोपाळ's picture

24 Sep 2021 - 9:02 pm | आनंदी गोपाळ

कोन गाव्नी गं तू?

डुबुक वडा कसाले म्हन्तस ते मालूम शे का तुले? काय बी लिखी र्‍हायनी आठे!

खान्देस कसाले म्हंतस ते बी मालूम नसंन तुले.

आनंदी गोपाळ's picture

24 Sep 2021 - 9:05 pm | आनंदी गोपाळ

भाजीनं बट्टं तर्रिदार नै शे ते मी बी देखी र्‍हाय्नू.

(अहिराणी ऑफ)
@भक्ति,

भाजीचा रस्सा सेम मसाला (खस्खस, खोबरं वापरून. नॉर्मली यात कांदा पण परतून घातलेला असतो, अन जास्त छान लागतो), वापरून केलेला, प्लस तर्रीदार बनवायची पद्धत आहे.

मला तुम्ही बनवलेला जास्त आवडतो, कारण 'वय वर्षे' एल ओ एल.

hrkorde's picture

24 Sep 2021 - 7:25 pm | hrkorde

दुसऱ्या दिवशी अजून चांगली लागते

उगा काहितरीच's picture

24 Sep 2021 - 7:40 pm | उगा काहितरीच

कांदा टाकला तर अजून छान लागेल ना ? टाकायचा असेल तर नक्की कधी आणि कसा टाकावा लागेल?

आनंदी गोपाळ's picture

24 Sep 2021 - 9:13 pm | आनंदी गोपाळ

हे घ्या. त्या तिकडल्या साईटवर्ची रेस्पी आहे.

ह्या ताईंनी चातुर्मासात कांदे न खाणार्‍या सभ्य कर्मठांसाठी टेस्टी रेस्पी टाकली आहे. वर दिलिय ती वर्जिनल कडक रेस्पी. (माझी नाही)

ही नॉर्मल कारागिरी आहे. (ही पोस्ट माझी आहे, त्या तिकडल्या साईटवर.)

आनंदी गोपाळ's picture

24 Sep 2021 - 9:13 pm | आनंदी गोपाळ

.

वाह भारीच की ओ! इतर वेळी कांदा असतो यात पण सध्या नाही!
एक प्रश्न मराठवाड्यात याला उंबराची आमटी पण म्हणतात, अजून काही नावं माहीत आहे काय :)

सर्वांचे झणझणीत आभार ;)

तुषार काळभोर's picture

24 Sep 2021 - 10:07 pm | तुषार काळभोर

वाचायला तरी सोपी वाटली आहे. पण डॉक्टरसाहेबांचा फोटो बघून मोदकाची भाजी कातील असणार यात शंका नाही!!

सरिता बांदेकर's picture

25 Sep 2021 - 10:06 am | सरिता बांदेकर

मस्त भक्ती,
तुमची टोमॅटोची चटणीची रेसीपी बघून केली होती.छान झाली होती.
आता ही पण करीन.असंच नवीन नवीन देत जा.
धन्यवाद.

Bhakti's picture

25 Sep 2021 - 7:08 pm | Bhakti

धन्यवाद सरिता ताई,

टोमॅटोची चटणीची रेसीपी बघून केली होती.छान झाली होती.

छानच :)

मनस्विता's picture

25 Sep 2021 - 8:23 pm | मनस्विता

खूप दिवस झाले ही पाककृती करून बघायचे मनात आहे. बघू कधी योग्य येतो ते!

मनस्विता's picture

25 Sep 2021 - 8:24 pm | मनस्विता

.

पियुशा's picture

25 Sep 2021 - 9:59 pm | पियुशा

कृपया पार्सल करने ;)

स्मिताके's picture

25 Sep 2021 - 10:09 pm | स्मिताके

मस्त झणझणीत पाकृ आणि फोटोही छान.

प्रचेतस's picture

26 Sep 2021 - 9:36 am | प्रचेतस

भारी आहे, माहीत नव्हता हा प्रकार.

Bhakti's picture

26 Sep 2021 - 9:59 pm | Bhakti

:)
मनस्विता,पियुशा, स्मिता, प्रचेतस खुप खुप धन्यवाद!

श्रीरंग_जोशी's picture

26 Sep 2021 - 10:43 pm | श्रीरंग_जोशी

अहाहा, रोचक पाककृती. आजवर ठाऊक नव्हती.

जुइ's picture

29 Sep 2021 - 12:22 am | जुइ

बर्‍याच वर्षांपूर्वी मावशीच्या हातची मोदकांची आमटी खाली आहे. स्वर्गीय चव! करायला हवी आमटी एकदा.

Bhakti's picture

29 Sep 2021 - 7:06 am | Bhakti

जुइ नक्कीच!
धन्यवाद श्रीरंग आणि जुइ.

mangya69's picture

12 Oct 2021 - 8:03 pm | mangya69

मस्त

Bhakti's picture

12 Oct 2021 - 10:02 pm | Bhakti

:)

त्रिवेणी's picture

13 Oct 2021 - 4:39 pm | त्रिवेणी

झारलेल्या शेवभाजीला डुबुकवड्या कोण म्हणतंय इकडे बर. जाइ या थोडा दिन तठे.

त्रिवेणी's picture

13 Oct 2021 - 4:43 pm | त्रिवेणी

डुबकवड्या म्हणजे नुसत्या डाळींना पीठना गोयां सोडतस रस्सामा.

मी डुबकवड्या नाही बनवल्या कधी पण घाई असेल तर पटोड्या करते मोदका ऐवजी,तिखट चकोल्यासारख्या.

मदनबाण's picture

15 Oct 2021 - 12:51 pm | मदनबाण

नविनच पाकृ पाहिली.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rama Ashtakam (Ameya Records) Bhaje Visesha Sundaram!!! श्री रामाष्टकम्

मला खरंच आश्चर्य वाटलं,ही पाककृती जास्त माहिती नाही ते :)