दूरदर्शन

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in जनातलं, मनातलं
29 Jul 2021 - 5:52 am

मी सध्या काय पाहतोय दूरदर्शन
१) काही वर्षांपूर्वी दूरदर्शन " कोर्ट मार्शल " मुलाखतकार प्रदीप भिडे ( बातम्या)
https://www.youtube.com/watch?v=pUSFBwD2Hx4
२) अलीकडले दूरदर्शन " दुसरी बाजू " मुलाखतकार विक्रम गोखले
https://www.youtube.com/watch?v=OFBEtsv2bm8
३) https://www.youtube.com/watch?v=iiAQAIGp588

नक्की पहा
मराठी कलाक्षेत्रातील
दिग्दर्शक, निर्माते. कलाकार, गायक.. मेजवानी आहे नुसती

नाट्यप्रकटन

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

29 Jul 2021 - 6:51 am | चौकस२१२

विशेष करून यातील निर्मात्यांच्या मुलखाती बघण्यात मजा आहे प्रभाकर पणशीकर, मोहन वाघ, आणि प्रशांत दामले ( निर्माता म्हणून)
आणि दोन काळातील महागाई फरक इत्यादी गोष्टी

कुमार१'s picture

29 Jul 2021 - 11:59 am | कुमार१

2 चे कार्यक्रम पूर्वी थेट पाहिले आहेत
1 चे बघावे आता

कंजूस's picture

29 Jul 2021 - 12:07 pm | कंजूस

" दुसरी बाजू " मुलाखतकार विक्रम गोखले ...
तेच तेच कलाकार आणि व्यक्ती होऊ लागले आहेत. म्हणजे दिवाळी अंकांनाही लेख आले आहेत. आणि पुन्हा तेच प्रसंग सांगणे. अगदी नवे कलाकार हवेत.

गॉडजिला's picture

29 Jul 2021 - 8:42 pm | गॉडजिला

वय वाढेल तसे लोकांना दूरदर्शन अजुन अजुन अजुन आवडत जाईल...

एक काळ होता जेंव्हा सकाळच्या रंगोलीला टीवी समोर बसलो की दुपारी १२ शिवाय प्रेक्षक समोरून हलत नसे... गेले ते दिवस.

चौथा कोनाडा's picture

29 Jul 2021 - 1:10 pm | चौथा कोनाडा

हो ... अगदी !
मी यातल्या काही पहात असतो अधून मधून !

दूरदर्शनचे अर्काईव्हज म्हणजे, हो मेजवानीच ! ये सोना, हैं सोना !
सध्या टिव्ही चॅनेल्स वर असणार्‍या सासु-सुनः कटकारस्थान, शह-काटशह, वैवाहिक लफडी यांना कंटाळून डीडी कडे वळलोय !
त्या काळाच्या अप्रतिम कलाकृती आहेत !
( उदा: अमोल पालेकर अभिनित Telefilm - Hindi | आदमी और औरत | https://www.youtube.com/watch?v=dJxTJ1nrlG8 )

कंजूस's picture

29 Jul 2021 - 1:26 pm | कंजूस

कंटाळून डीडी कडे वळलोय ! हो. सहमत.
आणि आता सह्याद्री चानेल कार्यक्रम झाला की यूट्यूबवर अपलोड करतात त्यामुळे फारच सोय झाली. रंगा येई वो माझा सध्याचा आवडता कार्यक्रम आहे.

चौथा कोनाडा's picture

30 Jul 2021 - 12:46 pm | चौथा कोनाडा

"रंगा येई वो" सुरेख कार्यक्रम आहे !

कंजूस's picture

29 Jul 2021 - 1:30 pm | कंजूस

सह्याद्रीच्या पाउलखुणा कार्यक्रमात एकदा सुरेश भट, कुमार गंधर्व यांचे कार्यक्रम पाहिलेले. कविता ,संगीतातलं कळत नाही पण त्यांचे जीवन पाहायचे हैते. छान दाखवले. आणि सिनेमात पुलदेशपांडेंचा जीवनपट. भारी हैता.

Bhakti's picture

29 Jul 2021 - 1:44 pm | Bhakti

चांगला धागा आहे.
खरच मी तर सह्याद्री दिवसातून अर्धातास पाहणेच मग कोणतापण कार्यक्रम असो.कारणे तीच इतर वाहिन्यांवरील बोगस मालिका, जाहिराती, बटबटीतपणा यांचा अतिमार झालाय.
२.हो ,यु ट्युबवर भाग टाकतात हे उत्तम
३.शैक्षणिक कार्यक्रम खुप उपयोगी आहेत.कोवीड काळात सामाजिक भान दाखविले आहे.

येत्या शनिवारी टिळक -आगरकर यांच्यावरील नाटक आहे.दुपारी दीड वाजता.हे दोघं एकत्र असते तर ..कायम विचार येतो.
टिळक-आगरकर

सध्या मराठी चित्रवाहिन्यांवर ज्या मालिका चालु आहेत त्या दर्जाहीन आहेत, मागच्या आठवडतल्या भागाचा पुढच्या आठवडतल्या भागाशी संबंध नसतो. [ तरीही समस्त स्त्री वर्ग त्यात पार घुसलेला असतो ! :))) ] या मालिकांचे लेखक फार ग्रेट असावेत कारण असं अगम्य लिहणं ही अगम्य कला आहे ! :)
असो... मी अधुन मधुन डीडी [ विशेषतः कृष्ण-धवल ] पाहण्याचा प्रयत्न करत असतो... कालच किशोर कुमार लाईव्ह थोडे फार पाहिले आहे, ते इथे देउन ठेवतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - China on Radar: India Deploys Rafale Fighters on Eastern Front

मदनबाण's picture

29 Jul 2021 - 8:55 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - China on Radar: India Deploys Rafale Fighters on Eastern Front

क्षमस्व ! वरील व्हिडियो मला माझ्या धाग्यात द्यायचा होता, परंतु चुकुन इथे दिला गेला.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : -China on Radar: India Deploys Rafale Fighters on Eastern Front

अनिता ठाकूर's picture

29 Jul 2021 - 10:23 pm | अनिता ठाकूर

खूपच चांगला विषय आहे धाग्याचा. पण वाचनखूण कशी साठवायची?

अनिता ठाकूर's picture

29 Jul 2021 - 10:27 pm | अनिता ठाकूर

वाचनखूण साठवण्याचा पर्याय सापडला. वाचनखूण साठवली. धन्यवाद.