"श्रीपाद श्रीवल्लभ लीला वैभव" पोथी परिचय-

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
1 Feb 2021 - 4:29 pm

संत महंतांच्या जीवनावर आधारित काव्यातून किंवा गद्यातून केलेले लेखन पोथी लेखन म्हणून मानले जाते. अद्भूत रम्यता, पारलौकिक अनुभव, चरित्र नायकांचे अचाट किंवा अवास्तव वर्णन त्यांच्या भक्तगणांना मान्य असते. ते श्रद्धा भावनेने पोथी लिखाण वाचतात, पारायणे करतात. त्यांनाही अदभूत अनुभव येतात. ते खाजगीत सांगितले वा बोलले जातात. पण मुद्दाम ते सार्वजनिक करून सांगण्याचे साहस करायच्या भानगडीत पडत नाही... असो.

एक पोथी माझ्या वाचनात आली. यावर प्रकाश टाकावासा वाटला म्हणून सादर...

"श्रीपाद श्रीवल्लभ लीला वैभव" पोथी परिचय-

विठ्ठल बाबा यांना प्रवचनातुन श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रातील अनेक घटनांची अनुभूती येत असे. त्या दिव्यानुभूतीच्या प्रभावातून बाहेर आल्यावर ते त्या तेलुगू मधून उपस्थितांना रसाळपणे वर्णन करत. जयाभारती ते शब्द पटापट लिहून घेत. ते कथन नंतर लीला वैभव पोथीतून प्रकाशित सन २००५ मधे झाले. मराठीत ते सन २०१४ मधे वाचकांच्या हाती आले.
श्री स्वामी विठ्ठलानंद सरस्वती महाराज पूर्वाश्रमीचे विठ्ठलबाबा साई आणि दत्त संप्रदायाचे अनुयायी होते. त्यांचाकडून दीक्षित माता निरंजनानंद सरस्वती (पूर्वाश्रमीच्या पोस्टमास्तर जयाभारती) सन १९८९ पासून संपर्कात आल्या. कृष्णा नदीच्या पात्रातील कुरवपुरबेट क्षेत्राच्या पंचदेव पहाडाच्या बाजूच्या किनार्‍यावर सध्या श्रीक्षेत्र वल्लभापूर या आश्रम संस्थानाची स्थापना झाली. जुलै २०१४ मधे स्वामी विठ्ठलबाबांचे निजगमन झाले.
श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्र अमृता पोथी सन २००१ च्या सुमारास प्रकाशात आली. तिचे अनेक भाषांमध्ये सुरस अनुवाद निर्माण झाले. मराठीत हभप हरिभाऊ निटुरकर प्रत निघाल्यानंतर गोपाळ बाबांच्या ट्रस्टच्या वतीने ते माफक किंमतीत उपलब्ध आहे. त्या पोथीमधे श्रींच्या पीठिकापुरातील वास्तव्याचे कथन प्रामुख्याने येते. तर २४ अध्यायाच्या लीला वैभव पोथीतून अध्याय १२ पर्यंत पीठिकापुर गमन, बद्रिकावन, गोकर्ण महाबळेश्वर, श्री शैल्य येथे वास्तव्य करून कुरवपुरातील स्थायिक झाल्या नंतर घटनांचे, नंतर साधारणपणे अध्याय २२ वीस पर्यंत तेथे संपर्कात आलेल्या व्यक्तींचे विशेषत्वाने कथन येते. अध्याय २३ मधे श्रींचे निजगमन आणि अध्याय २४ वल्लभेशाला वाचवायला ते पुन्हा प्रगट झाले याचे सुरस वर्णन येते. त्यानंतर अनुबंध प्रकरणात आत्ता पर्यंतच्या प्रखर शिष्यगणांचा संक्षिप्त आढावा आहे. दत्तपीठ वल्लभापूर क्षेत्रातील अनेक प्रकल्पांचा परिचय करून दिला आहे.

श्री विठ्ठलबाबांच्या प्रवचनातील वेचक विचारधन ज्ञानसागरातील मोती सादर केले आहे.

1

मांडणीवाङ्मयविचारआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

अनिरुद्ध प's picture

1 Feb 2021 - 5:48 pm | अनिरुद्ध प

आवडला ,पण खूपच त्रोटक वाटला.

मूकवाचक's picture

1 Feb 2021 - 7:55 pm | मूकवाचक

गूढरम्यता किंवा सुरस, अतिशयोक्त आणि चमत्कारिक कथांचे आकर्षण जनमानसात पूर्वापार चालत आलेले आहे. आजही त्यात फारसा फरक नाही. 'डीटीएच' असो किंवा 'ओटीटी', प्लॅटफॉर्म कुठलाही असला तरी गूढरम्यता असलेल्या मालिका आणि चित्रपटांकडे आजही लोकांचा तुफान ओढा आहे. सांप्रतच्या काळात मनोरंजनाची अनेकविध माध्यमे उपलब्ध असल्याने गूढरम्य कथांची गरज नानाविध माध्यमांमधून सहजपणे पुरवली जाते.

मनोरंजनाची अन्य माध्यमे उपलब्ध नव्हती त्या काळात ही गरज कथेकरी बुवा किंवा धार्मिक ग्रंथांच्या माध्यमातून भागवली जात असणे साहजिक आहे. अशा सुरस काल्पनिकांमधून जो मतितार्थ सांगण्याचा प्रयत्न केला जात असे, किंवा जी जीवनमूल्ये रूजवण्याचा प्रयत्न होत असे त्याकडे लक्ष न देता निव्वळ 'भाकडकथा', 'अंधश्रद्धा' अशी लेबल्स लावत ज्ञानाच्या एका फार मोठ्या साठ्याला ('बॉडी ऑफ नॉलेज') पूर्णपणे रद्दी समजणे तितकेसे बरोबर वाटत नाही. ज्ञानाच्या या साठ्यामधल्या काही निवडक गोष्टी आधुनिक माध्यमांमधून सांप्रतचा युगधर्म लक्षात घेत पुनरूज्जिवीत केल्या तर त्या यशस्वी होताना दिसतात. असो.

असे सांगणारे काही गाठोडे लेखन असेल असे प्रथम दर्शनी वाटेल. पण या पोथीतील कथन प्रत्यक्ष घटनांचे कथन आहे म्हणून याचा स्तर वेगळा आहे असे वाचून जाणवते.
७०० वर्षांपूर्वीची पोथी व ही गेल्या २० - २५ वर्षांतील पोथी यात एकमेकांना पुरक होतील असे ताडून पाहता येतील असे घटना क्रम, कथने आहेत.

मुक्त विहारि's picture

1 Feb 2021 - 8:04 pm | मुक्त विहारि

मनोरंजन छान करतात...

जी जीवनमूल्ये रूजवण्याचा प्रयत्न होत असे त्याकडे लक्ष न देता निव्वळ 'भाकडकथा', 'अंधश्रद्धा' अशी लेबल्स लावत ज्ञानाच्या एका फार मोठ्या साठ्याला ('बॉडी ऑफ नॉलेज') पूर्णपणे रद्दी समजणे तितकेसे बरोबर वाटत नाही. ज्ञानाच्या या साठ्यामधल्या काही निवडक गोष्टी आधुनिक माध्यमांमधून सांप्रतचा युगधर्म लक्षात घेत पुनरूज्जिवीत केल्या तर त्या यशस्वी होताना दिसतात.

अनेक अशा गोष्टी समजून येतात. ज्या ७शे वर्षां पुर्वी देखील आजच्या सारख्याच आहेत त्यावर श्रीपाद श्रीवल्लभ यांनी त्या काळातील संदर्भात कशी तोड काढली होती वगैरे नुसते रंजक नाही तर ज्ञानवर्धक आहे.
कदाचित म्हणूनच मला त्या पोथीतील घटना, चर्चा, यांच्यामधून प्रेरणादायी ठरेल असे जे वाटले. ते शोधक नजरेने टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
७शे वर्षांपूर्वीच्या गावांचा, मंदिरांचा, नद्या, पर्वत राजी, सागरतट यांचा शोध आधुनिक तंत्रज्ञान वापरून करता आला तर ते चित्र काय दिसते यावर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे. त्याचा पुढचा भाग वरील लीला वैभव चरित्र आहे.
जर आपणासारख्या वाचकांना ते वाचायची उत्सुकता असेल तर सादर करेन.

शशिकांत ओक's picture

2 Feb 2021 - 4:29 pm | शशिकांत ओक

प्रश्न : "निरंतर स्मरण करणाऱ्यांचा योगक्षेम मी पाहतो". असे गीताचार्यांचे अर्जुनाला निमित्तकरून भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे. पण जीवनाच्या अनंत गरजांच्या गराड्यतात क्षणोक्षणी चिंतनाचे विषय बदलात. त्यात भगवत चिंतनाचे संकल्प हवेत विरून जातात. नुसतेच निरंतर चिंतन करत राहिले तर अन्य कार्य कसे करायचे? (अ.21 पान 179)

उत्तर : आपल्या मनाला दोन कामे करायची शक्ती आहे. उदाहरणाने पटकन लक्षात येईल. तुम्हाला लग्नासाठी जायचे आहे. त्यावर विचार करत तुम्ही स्नानाला जाता. परत येऊन पाहता तर एक दागिना जागेवर दिसत नाही. शोधाशोध करूनही सापडत नाही. निराश होऊन चालणार नसते. लग्नाला तर वेळेत जायचे आहे. दागिना नंतर सावकाश शोधू. म्हणून लगेच लग्नाला पोहोचता. पण रस्त्यात, तुमचे मन कशाचा विचार करत होते? लग्नात सर्वांशी बोलता, सगळीकडे गडबडीने फिरताना, वधुवरांचे अभिनंदन करताना, नजरेने इकडे तिकडे पहाताना, कानांनी इतरांचे बोलणे ऐकताना, मनात मात्र दागिन्याचा विचार चाललेला असतो. मनात विचारांचे काहूर उठते. शोधून मिळाला तर खूप आनंद आणि नाही मिळाला तर अपार दु:ख. यावरून हे समजते की आपल्या मनाला दोन प्रकारची शक्ती असते. ज्यामुळे एका विषयावर विचार करीतच समोरची कामे सुद्धा सांभाळता येतात. दागिन्यांविषयी चिंता करीत असताना सुद्धा लग्न समारंभात सर्वांशी सुरळीत व्यवहार चाललेला असतो. मन दोन्ही कार्ये करीत असल्याचे यावरून कळते. किंमती वस्तु न दिसल्यामुळे मन त्याचे सतत चिंतन करत राहते. म्हणजे मनाला अनन्य चिंतन माहिती असल्याचे दिसते.
भगवंत रूपी अमूल्य वस्तूचे भौतिक दागिन्याबाबतच्या चिंतनासारखेच चिंतन करू शकलात तर अनन्य चिंतन होऊ शकते. दागिन्यांचे चिंतन केले तर तो दागिना मिळेल किंवा मिळणार नाही. परमेश्वराचे चिंतन करू शकल्यास तुम्ही गमावलेल्या ज्ञानासह बाह्य संपदा आदि तुम्हाला जितके द्यायचे तितके भगवंत सोय करून देतो व दिलेल्याचे सदासर्वकाळ कवचासारखे उभे राहून रक्षण करतो. असे हे वचन आहे. याचा शोध करून सफल व्हा. हीच मानवजन्माची सार्थकता! अशा प्रकारे श्रीपादवल्लभांनी उपस्थितांना बोध केला....​

प्रश्न : आपण सदशिष्याची लक्षणे विषद करावी. (अ.22 पान 183)

उत्तर : आता सदशिष्याची नऊ लक्षणे सांगतो.
१. अहंकार रहित, सन्मानापासून दूर राहणे.
२. निर्मत्सरत्व, मत्सररहीत असणे.
३. दक्षता, आळस नसणे.
४. निर्ममत्व. ममकाररहित.
५. गुरुसेवा परायणत्व.
६. निश्चलत्व, चंचलता नसणे.
७. परमार्थ जिज्ञासा.
८. अनसूयत्व, असूया रहित राहणे.
९. पवित्र सत्य भाषण.

ह्याचा अर्थ एकच....

माझे गूण घ्या ...

शक्ती आणि बुद्धीला, वेळेचा पाठिंबा दिला पाहिजे...

कंस वध, पुतना मावशीचा वध, जरासंध वध, कालिया मर्दन, इतकेच कशाला, घटोत्कचाला ऐनवेळी रणांगणात पाठवून, कर्णाचे अमोघ अस्त्र, घटोत्कचावर वापरायला लावणे, ह्या श्रीकृष्णा कडून, शिकण्याच्या गोष्टी आहेत...

हिंदू धर्म आता, गुणग्राहकता विसरून, व्यक्तिपुजक झाला आहे...

आणि शिष्याच्या 9 गोष्टी, सध्या तरी फक्त संरक्षण दलातच बघायला मिळतात ...

*कणाद महर्षींचा कण सिद्धांत विषद करतात - पलनी स्वामी
अध्याय 3. पान 14.

“समस्त सृष्टी परम मूल अशा अणूंनी निर्माण झाली आहे. त्या परमाणूंपेक्षा सूक्ष्म अशा कणांच्या अस्तित्वाने विद्युत शक्ती उद्भवते. हे सूक्ष्म कण आपापल्या कक्षेमधे परिभ्रमण करीत असतात. स्थूल सूर्याभोवता ग्रह आपापल्या भिन्न कक्षेत परिभ्रमण करीत असतात. त्याच प्रमाणे हे सूक्ष्म कण सुद्धा आपल्या केंद्र बिंदूस अनुसरून परिभ्रमण करीत असतात. या सूक्ष्म कणांपेक्षा सूक्ष्म असा स्थितीत प्राणीमात्रांचे भावोद्वेगाचे स्पंदन चालू असते. स्पंदनशील असा जगात काहीच स्थिर नाही. चंचलता हा त्याचा स्वभाव आहे. या स्पंदनांच्या पेक्षा सूक्ष्म स्थितीत दत्तप्रभूंचे चैतन्य असते. यावरून मला (पलनी स्वामी म्हणतात) सर्वांचे अनंत भाग केले असता. एकएक कणाचा भाग शून्य समान होतो. अनंत अशा शून्य कणांचे फलस्वरूपच ही चराचर सृष्टी आहे. पदार्थसृष्टी ज्याप्रकारे होते तिच्याप्रमाणे व्यतिरेकी पदार्थांचे सुद्धा असते. या दोन्हींचे मिश्रण झाल्यास व्यतिरेक पदार्थांचा नाश होतो. ( प्रा. अद्वयानंद गळतगे यांचे विश्लेषण - व्यतिरेक कणांना फिजिक्समधे अँटीमॅटर म्हणतात. ते व सामान्य कण एकत्र आले तर दोन्ही मॅटर म्हणजेच कणपदार्थ नष्ट पावतात)

पदार्थाच्या गुणात सुद्धा फरक होतो. अर्चावतारात प्राणप्रतिष्ठा केली असता, ती मुर्ती चैतन्यवंत होऊन भक्ताची मनोकामना पुर्ण करते. सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीत असतात. गायत्री मंत्र देखील या शक्तीमधे सामावलेला असतो. गायत्री मंत्रात तीन पाद आहेत असा सर्वसाधारण समज आहे. परंतु मंत्रात चौथा पादसुद्धा आहे. तो असा “परोरजसि सावदोम ”

मुक्त विहारि's picture

3 Feb 2021 - 4:43 pm | मुक्त विहारि

बाबराने, राम मंदिर पाडले, तेंव्हा त्या मुर्तीने प्रतिकार का केला नाही?

सोरटी सोमनाथ येथील, शंकराच्या पिंडातून स्वतः भगवान शंकर प्रकट का झाले नाहीत?

मथूरेत, भगवान श्रीकृष्ण प्रकट का झाले नाहीत?
.........

.ह्या तिन्ही प्रश्र्नांची उत्तर एकच, हिंदू आपली लढाऊ वृत्ती विसरले.

शशिकांत ओक's picture

3 Feb 2021 - 6:07 pm | शशिकांत ओक

योग्य नेता, सेनानी, आदर्श समोर असेल तर लढाऊ वृत्ती प्रसरण पावते.
मोदींच्या सारखे धडाडीचे नेतृत्व भारताला लाभल्यानंतर देशातील जनतेला मिळालेली लढाऊ वृत्ती पुन्हा एकदा झळकली.
भगवान मूर्तीतून प्रकट होत नाहीत हे आपणही जाणता. आपले आदर्श या मंदिरात, मूर्तीतून प्रेरणास्थान म्हणून पाहिले जातात. त्यांचे धैर्य, साहस, कल्पनाशक्ती, हे त्या त्या काळातील जीवंत लोकांनी दाखवायचे असते. त्यांना दिशादर्शक नेता मिळाला की ती लढाऊ वृत्ती सकारात्मक उर्जेत परिवर्तित होते.

मुक्त विहारि's picture

3 Feb 2021 - 6:26 pm | मुक्त विहारि

नेते आपल्या मधूनच तयार होत असतात ...

पण, सध्या हिंदू धर्मात, मवाळ पणा अनावश्यक वाढलेला आहे ....

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, यांच्या विचारांची, त्यागाची, साहसी वृत्तीची, आणि वेळ प्रसंगी, आत्म बलिदान करण्याची विचारसरणी नष्ट होत आहे..... आणि जपजाप्य करत, कुणीतरी येईल आणि आपले रक्षण करील अशी षंढ वृत्ती हिंदू धर्मात वाढत आहे ...

हे मत इतरांचे असेल असे नाही.

मुक्त विहारि's picture

3 Feb 2021 - 8:19 pm | मुक्त विहारि

ओवेसीचे धारिष्ट्य कसे काय वाढले?

तो कोण तो, उस्मानी इथे, महाराष्ट्रात येऊन, हिंदू धर्मावर टीका करून जातो ...

ह्या सगळ्या, लिटमस टेस्ट, आहेत....

एक अतिशय बाळबोध प्रश्र्न विचारतो .....

हे जपजाप्य शिकवणारे, बाबामहाराज, इतके सामर्थ्यवान होते तर, एका फटक्यात, ब्रिटिश साम्राज्य, उधळून का लावले नाही?

ती वेळ न्हवती, किंवा, हे त्यांचे कार्य न्हवते, हा पळपुटे पणा झाला ...

राष्ट्र संरक्षणावरच चालते .... उद्या जर, सगळे सैनिक जपजाप्य करत बसले तर, राष्ट्र टिकेल का?

शशिकांत ओक's picture

15 Feb 2021 - 12:31 am | शशिकांत ओक

१५ दिवसात ९०० च्या वर टिचक्या ...
आता श्रीपाद श्रीवल्लभांच्या जीवनावर आधारित पोथीची वेगळ्या प्रकारे ओळख करून देऊ इच्छितो. आपल्याला आवडले तर नंतर पुढील अध्याय सादर करेन.

गॉडजिला's picture

27 May 2021 - 12:50 pm | गॉडजिला

आजून येउद्या... पुढील लेखनाच्या प्रतीक्षेत