हाय काय अन् नाय काय!

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
18 Jan 2021 - 1:13 pm

मला चांगलंच ठाऊकाये, की चित्रबित्र मला बिल्कुलच काढता येत नाही. पण तरीही..
एकदा मी तुझं चित्र काढणार आहे. बघंच तू.
सोप्पं तर आहे. हाय काय अन् नाय काय!
आधी दहाचा आकडा काढेन. हं पण त्यातला एक जरा पसरटच.
का म्हंजे काय? तुझ्या कपाळावरच्या इतक्या सगळ्या आठ्या मावायला नकोत का?
आणि त्यावरचा शुन्य थोडा चपटा, मला चिडवतानाचा तुझा मिश्किलपणा पुरेपूर भरलेला.
नाकाच्या जागी आठाची तिरकी रेषा काढताना हात जरा मी मोकळाच सोडेन. कित्ती कित्ती तिरकेपणा तो? कळायला नको? शिवाय याचा राग, त्याचा राग, अमका राग, तमका राग, एवढे सगळे रागराग फतकल घालून बसणार तिथं, तर जागा हवीच ना?
त्याच्याखालचा ओठांचा E एकदमच छोट्टासा नि सोप्पा. मिटलेलेच तर असतात कायम ओठ. काय बोलू हा तुझा कायमचा तर प्रश्न. बोलायचं काम माझं आणि तू "हं आणि ओके" करत फक्त ऐकणार.
त्यामुळे कानाच्या जागी उलटा एक C काढला की काम झालं!
मग डोकं आणि त्यावर थोडेस्से केस.
त्याखाली मान मात्र हवीच! ताठ, सरळ, अगदी तुझ्यासारखीच.
एवढं रेखेस्तोवर कागदच संपून जाईल.

बघ, झालं की नाही तुझं चित्र तयार?
सांगितलेलं ना, सोप्पं तर आहे.
हाय काय अन् नाय काय!

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jan 2021 - 1:30 pm | ज्ञानोबाचे पैजार

गुरुजींनी सांगितले १०,
मुलांनी काढले ८
मुलिंनी काढले ६
आणि गुरुजिंचे तोंड पहा
हा का ना का

पैजारबुवा,

टवाळ कार्टा's picture

18 Jan 2021 - 3:18 pm | टवाळ कार्टा

टायट्यानिक आठवला =))

प्राची अश्विनी's picture

18 Jan 2021 - 3:34 pm | प्राची अश्विनी

टक्या, शिव शिव शिव शिव! ;))

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jan 2021 - 3:48 pm | ज्ञानोबाचे पैजार

टायट्यानिक सारखे चित्र काढायचे असेल तर अजून कोणते कोणते आकडे वाढवले पाहिजेत?
पूर्ण तसेच्या तसे चित्र काढायला काही इंग्रजी आकड्यांची पण मदत घ्यावी लागेल.
पैजारबुवा,

सौंदाळा's picture

19 Jan 2021 - 4:20 pm | सौंदाळा

आकड्यांची अजिबात गरज नाही
W X Y असले की झाले ;)

@ सौंदाळा...देवा विठ्ठला उचल आता .

प्रचेतस's picture

20 Jan 2021 - 9:18 am | प्रचेतस

मस्त :)