बेरी के बेर

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
16 Jan 2021 - 6:05 pm

संक्रांती नंतर दुसऱ्या दिवशी किक्रांत असते.बच्चे कंपनीचा मुरमुरे,बोर,रेवड्या,चॉकलेट लयलुटीसाठी बोरनहाणसाठीचा दिवस असतो.
आगगाडीच्या डब्यात बसल्यासारख एक घर झाल कि दुसर घर अस करत करत ५-६ घरी ह्या सोहळ्याची मौज होते.परीच्या घरी कन्येला घेऊन बोरनहाणसाठी गेले .परीभोवती सगळे बाल गोपाल गोलाकार जमले.काही नवखे तर काही तरबेज होते,एकमेकांना सांगत होते .. “हा असा पटकन पुढे हात करायचा आणि चॉकलेट पकडायचे...हे झाले कि दुसऱ्या घरी...पिशवी आणली का तू?..”
किती ती उत्सुकता !!आठव्या आठव्याने परीच्या डोक्यावर मुरमुरे,बोर,रेवड्या,चॉकलेट या राशी ओतल्या गेल्या.हि चिमुकल्यांची घाई ,आनंद ओसंडून वाहत होता.कार्यक्रम संपला.बच्चेकंपनीने सराईतपणे एकही चॉकलेट मागे ठेवले नाही सर्व मिळवली.पण लक्ष गेले ती बोर ..एकानेही बोर काही उचलली नव्हती.सगळी बोर तशीच पडली होती.आपसूकच बोर उचलली आणि खायला लागली.
मन गेलं लहानपणात..तेव्हा हि अशी मोठ मोठाली बोर नव्हती.मस्त तांबूस रंगाची छोटी छोटी बोर असायची.कधी आंबट कधी गोड तर कधी मिश्र अशी हि बोर असायची.कधी इतकी आंबट बोर असायची की तेव्हा प्रभू श्रीरामाना उष्टे बोर खाऊ घालणारी शबरी मला हुशारच वाटायची.घराच्या आजूबाजूला जर बोराच झाड असेल तर विचारूच नका..आठवडाभर झाडाकडे लक्ष असायचे.रविवारची दुपार या झाडची बोर गोळा करण्यातच जायची.शाळेपाशी बोरकुट मिळायचं.त्याची चव तर जिभेवर अजूनही रेंगाळते.पुढे पुढे काही वर्षांनी जरा मोठाले बोर त्या जाळीदार पिशवीत मिळू लागली.मला बोरापेक्षा त्या जाळीदार पिशविचेच आकर्षण असायचे.ती पिशवी तोंडावर घालून चोर चोर आम्ही खेळायचो.काही वर्षांनी शेफालीच “बंगले के पिछे तेरी बेरी के नीचे...काटा लगा” हे गाण ऐकून बोराच्या झाडाखाली गेलीस तर काटे लागणारच ना ..असे काहीसे माझ्या बालपण आणि टीन एज याच्या मध्यावर असलेल्या माझ्या मनाला वाटायचे.:) मग आले अप्पल बोर..आकाराने फारच मोठे असतात.पण चवीला सगळेच रसाळ आहेत.पोपटी रंगांचे गोड फळ मलाही आवडतात.
बोरीच असे हे झाड काटेदार पण फळ कोणालाही कोणत्याही वयात भुरळ पाडणार.तासान तास प्रवासात कितीदा हि फळ साथ देतात.ह्यांच्या बियापण असंख्य गोळा होतात.एखाद झाड लावायचं मोहही मनाला करतात.
तोंडातल बोर संपल होत.पटापट जमेल तेव्हढी बोर उचलली आणि ओढणीत बांधून घरी आणली.कन्या सिंकदर प्रमाणे जग जिंकल्याच्या आवेशात चॉकलेटन भरलेली पिशवी घेऊन घरभर नाचत होती.बोराची मज्जा मात्र आयांसारखी ह्या पोरांनी अनुभवलीच नव्हती...कदाचित अनुभवणारही नाही.
-भक्ती

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

18 Jan 2021 - 9:26 am | मुक्त विहारि

बोर न्हाण म्हटले की, जळगांव आठवते.

बोरं खूप ठिकाणची खाल्ली पण, मेहरूणच्या बोरांची सर, इतर बोरांना नाही.

लेख आवडला

कुमार१'s picture

18 Jan 2021 - 9:32 am | कुमार१

चवीला सगळेच रसाळ आहेत
+१२

मुक्त विहारि's picture

18 Jan 2021 - 9:50 am | मुक्त विहारि

सहमत आहे

सरिता बांदेकर's picture

18 Jan 2021 - 10:38 am | सरिता बांदेकर

भाजीवाली म्हणजे भाजी विकणारी माझी एक मैत्रीण होती , तिच्याकडे बोरांचे झाड होते. ती मला भरपूर बोरं आणून द्यायची.ती ऊन्हात सूकवायला ठेवायची पण ती पूर्ण सूकण्याआधीच बोरांनी आमचे पोट गाठलेले असायचं.
आता तशी बोरं मिळत नाहीत. पण ड्रायफ्रूटच्या दुकानात सुकलेली बोरं मिळतात. पण ती खाताना मजा येत नाही.
आठवण ताजी केल्याबद्दल धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

18 Jan 2021 - 12:29 pm | मुक्त विहारि

गोठवलेले पदार्थ खाण्यात काहीही मजेत नाही

मुक्त विहारि's picture

18 Jan 2021 - 12:30 pm | मुक्त विहारि

मजा नाही

मुक्त विहारीजी,कुमारजी,सरिताजी प्रतिसादात छान छान अनुभव सांगितले.. धन्यवाद!
सरिताजी बरोबर सुकलेली बोरं एवढी खास नाही.
मेहरूणची बोर खायला हवी...
सर्व रसाळच अगदी!

बोरं म्हटलं की देशी छोटी बोरं बेस्ट. ती रसाळ, मोठी, अमदाबादी वैग्रेत मजा नाय. झाडावरून थेट पाडून (येनकेन प्रकारेण) तिथेच खाणे पिक्की पिक्की.

आणि आवळे म्हणजे रायआवळे.. करमरेवाले. त्यातून गाभुळलेले असले की अहाहाहा..
राय

कोणी त्या दुसर्या एका तुरट गोल फळाला आवळा म्हणायला सुरुवात केली कोण जाणे.
-(कोंकणी) गवि

Bhakti's picture

19 Jan 2021 - 5:27 pm | Bhakti

हे आवळे ...एक नंबर ...मैत्रिणीच्या घरी झाड होते.खूप ताव मारलाय ..

चौथा कोनाडा's picture

26 Jan 2021 - 1:22 pm | चौथा कोनाडा

व्वा, बोरांचे आंबटगोड दिवस ! एक नंबर लिहिलंय !

👌

आताची पिढी याला मुकलीय. त्यांच बालपण कॅडबरी, बिस्किटं, टॉफीज, केक इ. नी गोडमिट्ट झालंय. कुरुकुरे आणि तत्सम जंकनी खारटलंय !
बोरं म्हण्जे माझं आख्खं बालपण आणि शालेय दिवस ! मेवा संपन्न दिवस होते ते. बोरं, पेरू, चिंचा, चिंचेचा कोवळा पाला ( घरी याची बर्‍याच वेळा चटणी असायची) कैर्‍या, आंबे वै वै .... थोडं गावाबाहेर गेलं की या रानमेव्याची चंगळच ! बर्‍याचदा शाळा बुडवून ही उनाडगिरी करायचो, शाळेत मास्तरांच्या आणि घरी आईच्या शिव्या खायचो ! त्या आठवणींनी हुळहुळायला झालं !

रानमेवा!शब्दानेच शेतात , डोंगरावर फिरून आल्यासारखं वाटतं.:)
खरोखर गंमत असते झाडाहून स्वतः बोरं,चिंचा,आवळे,पेरू,कैरी हा गोड आंबट मेवा गप्पा टप्पा मारत गातांना!
.. चिंचेची चटणी खाल्ली आहे चिंचेच्या पाल्याची नाही..
https://youtu.be/P9nKOCWjYsk
मस्त वाटतेय करून पाहावी लागेल.

Bhakti's picture

26 Jan 2021 - 3:33 pm | Bhakti

*खातांना :)