तुन्हा मन्हा जुगुमले...

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 Jan 2021 - 1:44 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

तुले मनावाले जास
मी काकोळीतखाल
तुन्हा भ्या मा खंगाईसन
तुन्ही गोटना उगरा टोकले
मी तुन्हामाच रवळी जास...

मन्हाच रंगतवरी
माले थापन देवानी
मी कितली काकोळीत कई
आनि मोर्‍हला उच्छाव
येवानं आदुगरच
मी व्हई गऊ घुमर्‍या
तुनी पसरेल- आखडायेल
कपारनी गौळ नादमा...

मी घांगळी वाजी पाही
पावरी वाजी पाही
टापरा वाजी पाह्या
चिमटा हालाई पाह्या

तुन्ही थाळीना नाद
आझुनबी आयकू येत नही
मी रातभर घुमी र्‍हास...

मी तुन्हा
भुज्या खाई पाह्या
कोंडी खाई पाही
चव लागनी नही तरी
चौकपूजा करी पाही
तुन्हा मोर्‍हे
थोम गाडी बसनू
तुन्हा आचरक व्हईसन...
आंगमा वारं घीसन...
तुन्ह्या गाव-रानखळीमा
खेळत बसनू...
कमारी- कोठारीन
मन्हा सुपडामा
आझुनबी दखात नही...

पुनी उलटी गई तरीबी
तुन्ही कपार आझुन
ठायकेच ऊठी बशी
चौवडी कशी व्हत नही...
आपला जुगुम व्हत नही...

- मी तुन्हा घुमर्‍या
आनि तू मन्ही गौळ
ववाळ
तुन्हा मन्हा जुगुमले
म्हसोबा
कैन्ह दी व्हकार!
- सुधीर राजाराम देवरे

2000 साली प्रकाशित झालेल्या ‘आदिम तालनं संगीत’ या कवितासंग्रहातील ही अहिराणी भाषेतली कविता. या कवितेचा मुख्य घटक म्हणजे भाषा आणि भाषेतली परिभाषा. कवितेतली परिभाषा वाचून ही नक्की कोणती भाषा आहे, असा प्रश्नही कोणी उपस्थित करेल.
भाषा कोणतीही असो त्या भाषेत आविष्कृत होताना कवीची स्वत:ची स्वतंत्र भाषा तयार होत जाते. म्हणून व्यक्तीपरत्वे भाषा बदलते असं म्हटलं तर वावगं होणार नाही. म्हणून केवळ परिभाषा वा विशिष्ट बोली समजून घेतली की कविता समजली, असं होत नाही. कोणतीही कविता अजून एक नवीच परिभाषा होत जाते.
कविता अहिराणी भाषेतली असली तरी ह्या भाषेत बागलाणातील भील आणि बागलाण पश्चिम परिसरातील कोकणा आदिवासी बांधवांची ‘डोंगर्‍या देव उत्सवा’ची मौखिक विधीतली विशिष्ट भाषा साहजिकपणे उपयोजित झालेली दिसेल. हा उत्सव भील आणि कोकणी हे दोन्ही आदिवासी बांधव स्वतंत्रपणे साजरा करतात. (आजच्या बागलाणसह नंदुरबार, शहादा, प्रकाशा, धुळे, नवापूर, साक्री, पिंपळनेर, अक्कलकुवा, दोंडाईचा, कळवण, मालेगाव, देवळा, गुजरात राज्यातील डांग आदी ग्रामीण आणि आदिवासी भागात हा उत्सव साजरा होतो.)
डोंगर्‍या देवाचा हा उत्सव मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरु होऊन पौर्णिमेला त्याची सांगता होते. विरगावला बालपणापासून मी हा उत्सव अनुभवतो, 1980 पासून अभ्यास करतो आणि 1995 साली ह्या उत्सवावर- ह्या विधीवर पहिल्यांदाच प्रकाश टाकणारा माझा लेख ‘लोकायत’ मध्ये प्रकाशित झाला होता. याच चिंतनातून 1995 साली लिहिलेली ही कविता.
हे विवेचन म्हणजे कवितेची निर्मिती प्रक्रिया नाही, आस्वाद नाही आणि मर्मग्रहण- समीक्षाही नाही. कवितेकडे जाण्यासाठी फक्त प्रास्ता‍विक.
(कवितेतील शब्दार्थ: जुगुम- जोडी, खंगाई - झिजणे, रवळी- रमणे, थापन देणे - बंद करणे, घुमर्‍या - घुमणारा, आचरक- आचरण करणारा, अंगात देवाचं वारं घेणं - अंगात देव येऊन घुमणे, खळी- पूजा करण्याची जागा, कोंडी, भु्ज्या - कोकणा आदिवासी बांधव या उत्सवादरम्यान खातात ते पदार्थ, थोम - पुजेच्या जागी विशिष्ट वनस्पती रोवणे, कमारी कोठारीन- नाचणी, नागली, चौवडी- रुंद, गौळ- गुहा)
(कविता आणि लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Jan 2021 - 10:26 am | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद

भुजंग पाटील's picture

16 Jan 2021 - 12:01 pm | भुजंग पाटील

पिंपळनेर मनं आजोय शे.

मी पुणे मुंबई ना पोरास्नी लिसन ताहाराबाद - मांगीतुंगी - मुल्हेर - साल्हेर - आहवा - डांग - सापुतारा असं ६ दिस न ट्रेक करेल व्हतं.
३० साल व्हई गयात, मले अजूनबी त्या दिसनी सय येस.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

18 Jan 2021 - 10:46 am | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद.

चांदणे संदीप's picture

16 Jan 2021 - 4:40 pm | चांदणे संदीप

अवघड शब्दार्थ लावून वाचली, पुन्हा पुन्हा वाचून पाहिली. आवडली.

हे माझ्यासाठीच मी मराठीत केलेलं रूपांतरण. खरवडलंय खरंतर.

जातो तुला मनवायला
मी पोटतिडकीने
तुझ्या भीतीने झिजतो
तुझ्या गोष्टीच्या टोकाला
मी तुझ्यातच अडकतो

माझ्याच रंगामध्ये मला थापून द्यावं
त्यासाठी मी किती केला आटापिटा
आणि पुढचा उच्छाव येण्याआधीच
तू पसरलेल्या आकसून धरलेल्या
गुहेतल्या कपारींच्या नादात
मी हरवून, हरखून गेलो

मी घंगाळी वाजवून पहिली
बासरी वाजवून पहिली
टिपरी वाजवून पहिली
चिमटाही वाजविला
तुझ्या झांजेचा आवाज
त्यात अजूनही ऐकू येत नाही
मी रात्रभर त्यातच गुंतून पडतो

तुझ्या भुज्या मी पहिल्या खाऊन
पाहिले कोंडाळे खाऊन
तरी त्यात चव आली नाही
चौकपूजा करून पाहिली
तुझ्या समोर थोम मांडून बसलो
तुझा भक्त पाईक होऊन
अंगात वारं घेऊन
तुझ्या गावा-शिवारातल्या
देवळात बेभान खेळलो
नाचणी, नागणी
तरी माझ्या सुपात
अजूनही दिसत नाही

पौर्णिमा गेली तरी कशी
अजून तुझी कपार(?)
आहे तिथेच उठ बसते
तिची वाढ होत नाही
आपली भेट घडत नाही

मी तुझा वेडावला भक्त
आणि तू माझा रे ईश्वर
तुझ्या माझ्या भेटीला
म्हसोबा,
कधी मिळेल होकार?

धन्यवाद डॉक्टरसाहेब!

सं - दी - प

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

18 Jan 2021 - 10:49 am | डॉ. सुधीर राजार...

खूप छान सर. अनुवाद भारी जमला. धन्यवाद.