भिक्षां देहि च पार्वति

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in जनातलं, मनातलं
4 Dec 2020 - 9:51 am

अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥  

माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।
बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॥  

जगदगुरु  शंकराचायांनी रचलेल्या अन्नपूर्णा स्तोत्रातील हे शेवटची  दोन  कडवी. शेवटून का सुरुवात केली असा प्रश्न पडणे  साहजिक आहे .  बाकीच्या १० कडव्यांमध्ये  देवीच्या स्वरूपाचं आणि गुणांचं  वर्णन  केलं  आहे. पण  शेवटची दोन कडवी फारच सुंदर आहेत कारण ह्या मध्ये देवीकडे  स्वतःच्या उन्नतीसाठी मागणं  आणि समाजासाठी आपला काय भाव असावा हे खूप छान पद्धतीने सांगितलं आहे . 
त्यावर विवरण करण्याआधी थोडसं  अन्नपूर्णा  ह्या देवीबद्दल जाणून घेऊ.  अन्नपूर्णा हे देवी पार्वतीचं  संपूर्ण  विश्वाचं  पालनपोषण करणारं  स्वरूप  आहे .  भिक्षुक स्वरूपात आलेल्या महादेवाला अन्नदान देते आहे अशा स्वरूपात हि देवी सहसा दाखविली जाते.  जस की लेपाक्षी मधील एक शिल्पात दाखवले आहे 

DSC_4922_03

पण हे शिल्प पार्वती  अन्नपूर्णा  कशी झाली  ह्याची  गोष्ट सुद्धा सांगते - महादेव एकदा भिक्षुकाचं  स्वरूप घेऊन पार्वती समोर प्रकट होतात  आणि   तिच्याकडे भिक्षा मागतात . पार्वती  अन्नदान देण्याचा संकल्प घेते  आणि  भिक्षुकाला अन्नदान देण्यासाठी  येते. तेवढ्यात तिची परीक्षा घेण्यासाठी आलेले महादेव तिचे वस्त्र खेचतात.  शिल्पामध्ये पार्वतीचं  वस्त्र खाली पडताना  दाखवलं आहे. पण भिक्षुकाच्या ह्या उदंडपनाची पर्वा न करता  आपण घेतलेला संकल्प पूर्ण  करणे महत्वाच आहे हे जाणून  ती   भिक्षुकाला अन्नदान देते .  तिच्या ह्या संकल्पनिष्ठेवर प्रसन्न  होऊन महादेव  आपल्या मूळ स्वरूपात प्रकट होतात आणि पार्वती अन्नपूर्णा  म्हणून  ओळखली जाईल असा वर  तिला जातात . 
आता  विचार करूयात 
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति  
 ह्या ओळीचा. समजामध्ये भिकाऱ्याला जास्त सन्मान मिळत नाही, इतका धडधाकट असूनसुद्धा कष्ट करून स्वतःचं अन्न मिळवायचं  सोडून  फुकटचं  भीक मागून खातोय असा  विचार त्यांच्या  बाबतीत  केला जातो .    पण  जर एखादि धार्मिक व्यक्ती , धर्मपाठ  करणारा  विद्यार्थी ,  साधू  किंवा संत  भिक्षा  मागायला  आला तर त्याला  हे  निकष  लावले  जात नाहीत. हेटाळणी  होत नाही उलट त्याला पूज्य मानले जाते.  कारण त्यांचे भिक्षा मागण्यामागील भाव वेगळे  आहेत.  जेंव्हा एखादी  धार्मिक व्यक्ती भिक्षा मागते तेंव्हा त्याने/तिने  स्वाभिमान/अहंकार  त्यागून  निर्मल मानाने  हात  पसरलेले असतात . त्याला कुठल्याही गोष्टीचा लोभ नसतो, ज्ञान-संपादन  आणि  वैराग्य प्राप्तीसाठी जिवंत राहण्यासाठी जितकं अन्न  गरजेचं आहे तितकंच भिक्षा स्वरूपात मिळवावं हा त्याचा उद्देश  असतो. म्हणून तो पूज्य मानला जातो. आणि असेच निकष  भिक्षा/दान  देणाऱ्यालासुद्धा  लावता येतील. भिक्षा/दान देताना  कुठलीही  अपेक्षा  ना ठेवता जर  दान दिले  तर ते पुण्यकर्म मानले जाते.  पण  दान करताना त्यातून काही फायदा  घ्यायचा उद्देश असेल , जसकी काही काम त्या व्यक्ती कडून करून घेणं, तर ते दान राहत नाही,  व्यापार होतो . म्हणजे   दिवाळी-मध्ये मोलकरणीला फराळ द्यायचा आणि त्याबदल्यात तिच्याकडून जास्त काम करून घ्यायचा. किंवा केलेल्या दानधर्मातून प्रसिद्धी  मिळवायच्या हेतुने त्याचा गाजावाजा करायचा. जर दान देनाऱ्याचा  उद्देश  पवित्र नसेल तर  तो सुद्धा भिकारी ठरतो.  ह्या देवाणघेवाणीच्या समीकरणातून लोभ, अहंकार  वजा केले तर कृतज्ञ भावाने घेणारी व्यक्ती  मदेवासारखी पुज्य होते आणि  सेवाभावाने देणारी व्यक्ती पार्वती सारखी   महान होते. 

DSC_8760_00001
अन्नदानाला श्रेष्ठ दान मानण्यात आलं आहे, कारण उपाशी पोटाला तत्वज्ञान , पाप-पुण्य , धर्म-अधर्म  ह्या गोष्टी पचत  नाहीत.  स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या पोटाची आग माणसाला  गुन्हेगार बनन्यास भाग पाडू शकते. समाज आपली काळजी करत नाही असा भाव  उत्पन्न होऊ शकतो आणि मग अराजकता माजू शकते . ह्या-उलट  जर एखाद्या भुकेल्या व्यक्तीला  अन्न  दिले किंवा  गरजवंताला मदत केली  तर त्याच्यामध्ये कृतज्ञता जागरूक होईल  आणि तो त्याची परतफेड पुढे  दुसर्या कुणाला तरी मदत देऊन करेल. कदाचित  असच काहीतरी शेवटच्या ओळीतून सुचवायचं  असेल 
 बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॥  
सर्व शिवभक्त  माझे बांधव आहेत आणि  माझा देश तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ  आहे -  धार्मिक माणसामध्ये समाजप्रती  बंधुभाव  असणे  गरजेचं आहे आणि त्याला  देशाचा अहित होईल असल्या कुठलल्याही  कार्यात सहभागी होता नाही येणार  कारण  समाजाला किंवा देशवासीयांना  दुखवणं   हे  प्रत्यक्ष महादेवाला  दुखावन्यासारखं आहे  असा त्याचा  मतितार्थ  असेल. 

इतका सगळा अर्थ त्या चार आळींअध्ये दडला आहे. पूर्ण स्तोत्र आणि त्याचा अर्थ पुढिल लिंक वर मिळेल.
https://greenmesg.org/stotras/annapoorna/annapoorna_stotram.php

आणि मला आवडलेलं युट्युबवरील त्याचं गीत
https://www.youtube.com/watch?v=qx1JyoP5W5c

दक्षिण भारतात अन्नपूर्णेची बरिच मंदिरे आहेत. बाळाच्या अन्नप्राशनाचा कार्यक्रम ह्या मंदिरांमध्ये केला जातो. देवीची विधिवत पूजा करुन, बालासाठी बनवलेले अन्न देवीला नैवद्य दाखवले जाते. मग गाभर्‍याच्या उंबरठ्यावर बाळाला ठेवून, सोन्याच्या अंगठी त्या अन्नात बुडवून , ते बाळाला चोखवले जाते.

जाता जाता मी पाहिलेली अन्नपूर्णेची सर्वात सुंदर मुर्ती- दारसुरम येथील ऐरावतेश्वर मंदिरातील.

DSC_1347_01

वाङ्मयविचार

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Dec 2020 - 11:58 am | ज्ञानोबाचे पैजार

फोटो पण छान आहेत.
अन्नपूर्णा स्त्रोत्र कधितरी ऐकले होते, पण त्यातल्या या दोन श्लोकांकडे विशेष लक्ष गेले नव्हते.
मनःपूर्वक धन्यवाद
पैजारबुवा,

पॉइंट ब्लँक's picture

4 Dec 2020 - 5:06 pm | पॉइंट ब्लँक

धन्यवाद _/\_

चौथा कोनाडा's picture

4 Dec 2020 - 1:48 pm | चौथा कोनाडा

बेस्ट लेखन आणि सुंदर प्रचि !
अन्नपूर्णे बद्दल विशेष माहिती मिळाली.
धन्यवाद !

पॉइंट ब्लँक's picture

4 Dec 2020 - 5:06 pm | पॉइंट ब्लँक

धन्यवाद _/\_

मूकवाचक's picture

4 Dec 2020 - 5:11 pm | मूकवाचक

+१

पॉइंट ब्लँक's picture

5 Dec 2020 - 5:44 pm | पॉइंट ब्लँक

धन्यवाद _/\_

पुष्करिणी's picture

4 Dec 2020 - 5:22 pm | पुष्करिणी

छान लिहिलय

पॉइंट ब्लँक's picture

5 Dec 2020 - 1:09 pm | पॉइंट ब्लँक

धन्यवाद _/\_

विजुभाऊ's picture

5 Dec 2020 - 7:51 am | विजुभाऊ

छान लेखनआहे

पॉइंट ब्लँक's picture

5 Dec 2020 - 1:09 pm | पॉइंट ब्लँक

धन्यवाद _/\_

सुंदर ..अन्नाचे दान आणि अन्नपूर्णा याबाबत छान लिहिलंय!
पहिल्यांदा स्त्रोत्र ऐकलं! प्रसन्न!

पॉइंट ब्लँक's picture

5 Dec 2020 - 1:17 pm | पॉइंट ब्लँक

धन्यवाद _/\_. मी मागच्या वर्षी नवरात्रामध्ये चौडेश्वरीच्या मंदिरात अन्नपूर्णा स्वरुपात देवीची पूजा झाली होती. त्यादिवशी आरतीच्यावेळेस पहिल्यांदा हे स्तोत्र ऐकलं होत., तेव्हा असाच काहीसा शांत आणि प्रसन्न भाव मनात उमटवून गेलं होता. :)

टर्मीनेटर's picture

5 Dec 2020 - 9:22 am | टर्मीनेटर

छान माहिती आणि फोटो 👍
दारसुरम येथील ऐरावतेश्वर मंदिरातील अन्नपूर्णेची मुर्ती खूप सुंदर आहे 👌
अवांतर - घरात/कुटुंबात दत्तोपासनेचे वातावरण असल्याने अन्नदानाचे महत्व तसे बालपणापासून माहित होते. हिंदू आणि शीख धर्मियांत अन्नादानाला श्रेष्ठदान मानले जाते हे आपल्या माहितीत असते. परंतु वर्षभरापूर्वी मला मुस्लीम समाजातही अन्नदान हे फार पवित्र कार्य मानले जाते असे समजले तेव्हा थोडे आश्चर्य वाटले होते.

पॉइंट ब्लँक's picture

5 Dec 2020 - 1:47 pm | पॉइंट ब्लँक

बहुदा प्रत्येक धर्मामध्ये अन्नदानाला महत्व दिल आहे. त्याची बरीच कारण असु शकतात. सर्वात महत्वाचं संवेदनशीलता आणि नितिमत्ता असू शकते. कुणीतरी भुकेनं तडफडतयं आणि आपण त्यांना उपाशी ठेवून पोटभर जेवतोय असं काम कनवाळू लोक करु शकत नाहीत. त्यांच्या द्रिष्टीने ते अनैतिक कृत्य होईल. दुसरा कारण कृतज्ञता- आपण जे कमवतो ते स्वबळावर किंवा स्वकष्टाने जरी कमवले अस आपल्याला वाटत असलं तरी, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या समाजाने त्याला हातभार लावलेला असतो, त्याची परतफेड दानधर्म स्वरुपात करता येते. तिसरं कारण व्यवहारीक दूरद्रुष्टीता- आपल्याला सहसा सरदारजी कधी भिक मागताना दिसत नाहीत. त्याचं एक कारण असही असु शकतंकी त्यांना त्याची गरज पडत नसावी कारण "मी उपाशी मरेल" ही असुरक्षा त्यांना फारशी जाणवत नसावी इतका दानधर्मे शिखांच्या मध्ये होत असेल. आणि भुकेलेल्या दिलेलं एक जेवण त्याला गुन्हा करन्यापासुन थांबवू शकतो, त्या गुन्ह्याचा बळी कदाचित तुम्ही स्वतः किंवा तुमचे प्रियजनसुद्धा असु शकतात.
तीस एक वर्षापूर्वी समाजात माणुसकी होती खुप- जेवणाच्या वेळेस घरात जर बाहेरच कुणी असेल तर त्यालाही जेवण देत, मग तो पाहुणा असो की काम करनारा मजदुर किंवा मोलकरीन किंवा दरवाज्यात आलेला भिकारी त्याना उपाशी पाठवण पाप समजलं जाई. इतकचं काय , रस्त्यावरचा कुत्र किंवा फिरतफिरत आलेली गाय किंवा गाढव ह्यांनाही भाकरतुकडा दिला जाई. त्यावेळेस लोकांकडे स्वत:च्या चारचाकी सहसा नसत. अडीअडचणीला गाडी भाड्याने घेवून कुठे जायला लागलं तर आपण जे काही खातोय मग ते घरातुन बांधुन नेलेलं असो किंवा बाहेर हॉटेलमध्ये विकत घेतलेलं तेच जेवण ड्राईव्हरला पण दिलं जाई. त्याला पगार मिळतोय मग जेवण कशाला द्या हा विचारसुद्धा मनात येत नसे बहुतेक. आता सगळ्यांकडे चारचाकी आल्यात पण मनाची श्रीमंती हरवली.

बरोबर अन्नदानाची वृत्तीच लागते.आमच्या भांड्यावल्या मावशींना रोज चहा असायचा..एकदा मी त्यांना खजूर द्यायला गेले त्याच्या आधीच बाबांनी त्यांना वाटीभर खजूर दिले...हेच घासातला घास देण्याचे संस्कार समस्त पुढच्या पिढीला जावो .. अन्नपूर्णा अशीच प्रसन्न राहो!

पॉइंट ब्लँक's picture

5 Dec 2020 - 5:44 pm | पॉइंट ब्लँक

_/\_

प्रचेतस's picture

5 Dec 2020 - 10:18 pm | प्रचेतस

छान.
वेरूळ लेणीत प्रदक्षिणापथावर अन्नपूर्णेच कणीस धारण केलेली उभी मूर्ती आहे, खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात पळी धारण केलेली बसलेली मूर्ती आहे.

पॉइंट ब्लँक's picture

6 Dec 2020 - 11:00 am | पॉइंट ब्लँक

धन्यवाद _/\_ . खिद्रापूरच्या मुर्तीचा फोटो मिळाला तर पोस्ट कराल का इथे? मला मी काढलेल्या फोटो मध्ये एक तर ओळखता येत नाहि आहे किंवा काढायचा राहुन गेला असेल.

ही खिद्रापूरची अन्नपूर्णा. गर्भगृहाच्या बाहेरील भागात.

a

आणि ही वेरुळच्या प्रदक्षिणापथावर. हाती कमंडलू आणि कणीस.

a

पॉइंट ब्लँक's picture

7 Dec 2020 - 4:24 pm | पॉइंट ब्लँक

धन्यवाद :)

मदनबाण's picture

3 Jan 2021 - 10:35 am | मदनबाण

लेखन आवडले. अन्नपूर्णा स्तोत्र हे मला आवडणार्‍या काही स्तोत्रां पैकी एक आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chabidar Chabi | Girlz | Praful-Swapnil | Sagar Das | Naren Kumar | Vishal Devrukhkar

पॉइंट ब्लँक's picture

3 Jan 2021 - 11:06 am | पॉइंट ब्लँक

धन्यवाद __/\__