बातम्यांचे विषारी गुलाबजाम

एस.बी's picture
एस.बी in काथ्याकूट
14 Oct 2020 - 5:16 pm
गाभा: 

बातम्यांचे विषारी गुलाबजाम

देणारे कोण आणि खाणारे कोण???

निषेध !! घोर निषेध!! आम्हीच न्याय मिळवून देणार!! हे सगळे चोर आहेत!! गोळ्या घालून उडवून द्या ह्यांना !! देशद्रोही आहेत!!...आमचा आवाज सत्याचा आवाज...आमचं भाषण स्वातंत्र्याची गळचेपी करणारे हेच...ह्यांच्या वर बहिष्कार घाला!
अशा कानठळ्या बसवणाऱ्या आरोळ्या रोज रात्री घराघराच्या बैठकीच्या खोलीत घुमताना दिसतात..आणि आई बाप लेकरे म्हातारे सर्व एका धुंदीत होऊन ," बरोबर आहे!! बरोबर आहे!! द्या त्यांना शिक्षा !! " असा आक्रोश करताना आढळत आहेत!..
चौकाचौकात गटबाजी होऊन वादविवादाचे फड रंगतात ...तावातावाने आरोप प्रत्यारोप केले जातात..
पुराव्याचा काय सवाल?? व्हॉट्सअँप आहे...फेसबुक आहे...तिथं सगळं खरं असतं असं म्हणून प्रत्येक जण आपला अंतरात्मा जो की मूलभूत समस्यांच्या विळख्यात अडकल्याने भयंकर धुसफूसलेला आहे त्याच्या रागाला एक वाट काढून देतोय बास्स!!!....
इतिहास सतत पुनरावृत्ती करतो असं म्हणतात...कारण मनुष्याची जात एवढी मुजोर आहे जी त्याच त्याच चुका परत करत राहते आणि मग परिणाम काय वेगळे होणार आहेत ??
जरा इतिहासात मागे जाऊयात ...
ही गोष्ट आहे १८९८ साल ची..
अमेरिका आणि स्पेन मधल्या युद्धाची ,जे की क्युबा या देशात घडले आणि मुळात पाहता प्रश्न होता सरळसरळ स्पेन आणि क्युबा मधला आंतरिक..म्हणजे स्पेन ने क्युबा वर साम्राज्य स्थापन केले होते..आणि क्युबन लोकांना एक ठराविक कालावधी नंतर ते जुलमी वाटू लागले..आणि साहजिक त्यांनी क्रांती,आंदोलने,वगैरे वगैरे उद्योग सुरू केले...अगदी आपल्यासारखेच...काही अहिंसक तर काही हिंसक ...
आता हे सर्व उद्योग आणि त्याबद्दल वार्तांकन करायला अमेरिकन माध्यमे आपले आपले प्रतिनिधी क्युबा मध्ये पाठवत होती. आणि सर्व काही सुरळीत चाललं होत..म्हणजे क्युबा चे लोक क्रांती करत होते...अमेरिकन लोक त्याच्या बातम्या जगात दाखवत होते...स्पेन आपली बाजू मांडत होते की क्रांती करणारे लोकांचे गट मर्यादित आहेत...सर्वसामान्य क्युबन जनता त्यांचे समर्थन करत नाही वगैरे वगैरे..!
मग आता प्रश्न पडतो की जर हे वादविवाद स्पेन आणि क्युबा मधले होते तर मग ह्या अमेरिकन बातमीदारी चे काय बिनसलं की बुवा अमेरिकेच्या शासनाने स्पेन बरोबर युद्ध पुकारले आणि क्युबाला स्वतंत्र करण्याचे पवित्र पुण्य कार्य आपल्या डोक्यावर घेतले??...
तर त्याचे दोन आयाम आहेत

पहिला म्हणजे अमेरिका आणि क्युबाचा असणारा साखर व्यापार ( जो की मोठ्या प्रमाणावर खासगी उद्योगपतींची मक्तेदारी होता ज्यात मोठ्या प्रमाणावर तत्कालीन विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पक्षाची चमचे मंडळी दाटीवाटी करून मोक्याच्या जागा अडवून बसली होती!)

आणि दुसरा म्हणजे दोन अमेरिकन वृत्तपत्र समूह मधला आपापले गिऱ्हाईक वाढवण्यासाठी असणारी स्पर्धा...
( बघा कुठे काही सुत जुळते आहे का सध्या आपल्या आजूबाजूला उसळलेल्या गोंधळात आणि ह्या १८९८ च्या माथेफिरू मध्ये!!!)

साखर सम्राटांनी अशी धारणा किंवा नियोजन करून घेतले होते की जर क्युबा स्पेन कडून मुक्त होण्यात आपला देश अग्रभागी राहिला तर पुढे भविष्यात आपल्या व्यवसायासाठी मोठे कुरण लाभेल..
आणि वृत्तपत्र समूहाचे बोलायचे झाले तर ती आघाडीची वृत्तपत्रं होती
१)न्यूयॉर्क जर्नल - विल्यम हर्श्ट
२) न्यूयॉर्क जर्नल वर्ल्ड - जोसेफ पुलित्झर
( हे तेच पुलित्झर बाबा आहेत ज्यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात...काळाचा महिमा अगाध आहे!!)
ह्या दोघांचे पण एकमेकांसोबत वाचक वर्ग मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा होती.त्या स्पर्धेला तोंड फुटले ते "येलो किड" नावाच्या व्यंगचित्र स्तंभ लेखनावरून जो की पहिल्यांदा पुलित्झर यांच्या वर्तमानपत्र मध्ये प्रसिद्ध होत असे पण त्याचा व्यंगचित्रकार हर्श्ट यांच्या वर्तमानपत्र समूहाने सौदेबाजी करून पळवला आणि आपल्या वर्तमानपत्र मध्ये तो स्तंभ त्याच नावाने सुरू केला...झालं!! पुलित्झर साहेबांच्या नाकाला मिरच्या झोंबल्याना राव!! त्या काळी पेटंट , निकोप स्पर्धा कायदे असले काय प्रकार नसल्याने पैसा फेको तमाशा देखो असा राजरोस कार्यक्रम होता..त्यामुळे पुलित्झर समूहाने ही नवा चित्रकार पैसे देऊन उभा केला आणि त्याचं पण स्तंभ लेखन त्याच येलो किड नावाने सुरू राहिले आणि मुहूर्तमेढ रोवली गेली एका व्यापारी स्पर्धेची ज्याची अखेर झाली ३ देशांच्या युद्धामध्ये ,अनेक निर्दोष सैनिकांच्या बळी मध्ये!!,स्थानिक नागरिकांच्या युद्ध समर्थक आणि युद्धाला विरोध असणाऱ्या गटांच्या दंगली मध्ये!! आणि अमेरिकेच्या हाती काय लागलं तर.. क्युबाची तात्पुरती मालकी आणि अमेरिकेला स्पेन ला द्यावी लागली युद्ध भरपाई रक्कम म्हणून २० दशलक्ष डॉलर्स द्यावे लागले जे की सध्याच्या काळातील ६१० दशलक्ष डॉलर्स एवढे!!
( ६१० गुणिले १० लाख = आलेल्या उत्तराला ७० रू ने गुणून घ्या म्हणजे जे काय भारतीय रक्कम येईल ना त्यात नेमके किती शून्य असतात ते मला पण सांगा!!! शिंचे हे गणित फार द्वाड अस्तय राव!!)

आता हे दोन माध्यमे आणि त्यांचे मालक यांनी नेमके युद्ध कसे पेटवले ते बघुयात..
वरती सांगितल्याप्रमाणे स्पर्धा सुरू होती आणि प्रत्येक माध्यम समूह जास्तीत जास्त वाचक गोळा करू पाहत होता..आणि त्यासाठी त्यांनी आपापल्या युद्धाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारावर दबाव टाकायला सुरुवात केली की ," आम्हाला बातम्या द्या ...चमचमीत बातम्या द्या...अशा बातम्या द्या की ज्या दाखवतील की स्पेन कसे क्युबा मध्ये अत्याचार करत आहे!.."
ह्या बद्दल ची हर्श्ट यांच्या पत्रकाराने त्यांना पाठवलेला एक तार संदेश युद्धानंतर प्रसिद्ध झाला ..
त्यात तो पत्रकार म्हणतो की
," इकडे सर्व शांत आहे..इथे काही युद्ध होऊ शकत नाही..थोडे स्थानिक परकीय वाद आहेत पण त्यामुळे युद्ध नाही होऊ शकत..मला कृपया अमेरिकेत परत बोलवून घ्या !"

त्या वर हर्श्ट यांचं उलट तार उत्तर असं होतं," तू आहे तिथेच रहा..फक्त फोटोज् पाठवत रहा...तू क्युबावरून मला फोटो पाठव...मी तुला अमेरिकेकडून युद्ध पाठवतो!!!"

केवढा हा दुर्दम्य आत्मविश्वास आणि दूरदृष्टी!!!!

आणि त्यांनी बोलेल तसेच केले आणि अमेरिकेकडून युद्ध क्युबा मध्ये निर्यात करायला एकाहून एक सनसनीखेज प्रकरणे प्रसिद्ध करायला सुरुवात केली!!
त्यातल पहिलं प्रकरण म्हणजे क्लेमेन्सिया अरांगो ह्या क्युबन महिलेची ओलिवेट ह्या अमेरिकन प्रवासी जहाजावर स्पॅनिश अधिकाऱ्यांनी घेतलेली अंगझडती चे प्रकरण!
ह्या प्रकरणात ही क्युबन महिला अमेरिकन जहाजावरुन प्रवास करत असताना तिच्याकडे क्रांती संबंधित सामग्री असल्याचा संशय घेऊन स्पॅनिश अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली होती पण ह्या प्रकरणाचे वार्तांकन खालील प्रमाणे अमेरिकन माध्यमात करण्यात आले होते...

"आपल्या देशाचा झेंडा एका महिलेची अब्रू वाचवू शकतो ? "
"अमेरिकन जहाजावर स्पॅनिश अधिकाऱ्यांनी महिलेचा विनयभंग केला"
"आपल्या देशाच्या झेंड्याच्या नजरेत असून सुद्धा कोवळ्या तरुणीचे कपडे उतरवतात स्पॅनिश अधिकारी!!!"
आणि पुढे ह्यामुळे स्थानिक अमेरिकन महिलावर्ग बिथरला आणि सरकार कडे सतत क्युबा स्पेन मध्ये हस्तक्षेप करण्यासाठी आग्रह करू लागला...तत्कालीन विरोधी पक्षांनी पण पोळ्या भाजायला सुरुवात केली..
पण हा बुडबुडा लगेच फुटला कारण नंतर क्लेमेन्सिया अरांगो हिने स्वतः पुढे येऊन जबाब दिला की तिची झडती महिला अधिकारी घेतली होती आणि कोणता ही गैरप्रकार झाला नव्हता...पण तोपर्यंत उशीर झाला होता..स्पॅनिश अधिकारी हे महिलांसोबत गैरवर्तन करतात हे बीज जनतेमध्ये पक्के रुजले होते..त्यामुळे ही बाई खोटे बोलत असणार ...हिला स्पेन ने पैसे दिले...ही पण गद्दार आहे वगैरे वगैरे गरळ ओकणे सुरूच राहिलं!!

नंतर या युद्ध ज्वराला फोडणी मिळाली ती म्हणजे डॉक्टर रिकार्डो रुईझ यांच्या क्युबा मधल्या तुरुंगात झालेल्या मृत्यूची!
हे डॉक्टर शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत आले होते ..इकडे आल्यावर त्यांनी शिक्षण घेतले तसेच आपल्याकडे जसे एन आर आई चे आकर्षण असते तसेच अमेरिकन नागरिकत्वाचे आकर्षण त्यांनाही होते आणि त्यातून त्यांनी अमेरिकन नागरिकत्व पण मिळवले आणि नंतर ते स्वखुशीने क्युबा मध्ये परतले ..तिकडे परदेशी शिकून आलेले डॉक्टर म्हणून त्यांचा व्यवसाय ही उत्तम चालू होता आणि कुटुंब ही सुखी होते..पण त्यांनी स्थानिक क्युबा क्रांती मध्ये भाग घेतला आणि त्यात त्यांना अटक झाली..आणि तुरुंगात त्यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला.
आणि मग ह्याचा फायदा अमेरिकन वृत्तपत्रांनी घ्यायला सुरुवात केली..
कोणत्या ही तटस्थ ,निष्पक्ष चौकशीची मागणी न करता..कोणते ही पुरावे सादर न करता...राजरोस युद्धाचा आग्रह करणाऱ्या बातम्या रोज छापल्या जाऊ लागल्या..
नमुना काही असा असायचा बघा...

"हे खरे आहे की स्पेनच्या लोकांनी रुईझची त्याच्या क्यूबाच्या तुरूंगात हत्या केली, आपला राष्ट्रीय स्वाभिमान, तसेच राष्ट्रीय सन्मान, आपल्याकडे मागणी करतात की आपण स्पेनविरूद्ध लढा घोषित करावा .... युद्ध ही एक भयानक गोष्ट आहे, परंतु त्याहीपेक्षा आणखी भयानक गोष्टी आहे ती म्हणजे आपला राष्ट्रीय अपमान!. रुईजच्या मृत्यूसंदर्भातील सत्य जे सांगितले गेले त्याप्रमाणेच आहे यात शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही. ... आता जनतेच्या भावना सूड उगवतील. आणि यावेळी लोकभावनेचे वर्चस्व राहील. "
(New York World, 21 February 1897
and New York Journal, 22 February 1897)

झालं मग जो तो एकच बरळू लागला बस... आता खूप झालं...स्पेन ला धडा शिकवायला हवा...त्यांना इंगा दाखवू आपण...अमेरिकेशी पंगा घेतला ना की काय होत ते समजेल आता त्यांना...अशा आरोळ्या चोहोबाजूंनी निनाद करू लागल्या!...

आणि पुढे काय मग इंग्रजी मध्ये एक म्हण आहे बघा
third time is the charm!!!
म्हणजे तिसऱ्या प्रयत्नात यश हमखास !!
आणि इथे पेपरवाले जिंकले कारण दैव त्यांचं बलवत्तर होत आणि त्यांना त्यांचं ब्रह्मास्त्र मिळवून देणारा प्रसंग घडला तो म्हणजे हवाना ह्या क्युबा च्या बंदरात Uss maine या अमेरिकी युद्ध नौकेला झालेला अपघात जो की समुद्री mines चा स्फोट मुळे झाला आणि त्यात ती युद्ध नौका बुडाली आणि जवळपास २००-३०० अमेरिकी नागरिकांना जलसमाधी प्राप्त झाली..

पुन्हा एकदा वृत्तपत्रे पेटली आणि मग काय..
" remember the maine !! to hell with the spain!!"

" $ 50,000 price for the people who can punish spanish criminals!!!"

" punishment to spain for the USS maine!!"

अशा मथळ्याखाली रोज जनप्रक्षोभ भडकवनाऱ्या बातम्या छापल्या गेल्या!!!...

या अपघाताची सखोल चौकशी न करताच वृत्तपत्रांनी निकाल लावून दिला की हा हल्ला स्पेन ने केला आहे आणि त्यांनीच समुद्री mines लावून आपली युद्धनौका बुडविली...

पण तत्कालीन नौदल अधिकाऱ्यांचे एक मत असे ही होते की uss maine चा तळभाग मध्ये मोठ्या प्रमाणावर bituminus प्रतीचा कोळसा साठवून ठेवण्यात आला होता जो की fire dampening प्रक्रिये मधून स्फोटक वायूंची निर्मिती करत राहतो..आणि मग असे वायूचे कोठार कधी पण वाढत्या तापमानाला पेट घेऊ शकते...

पण ऐकणार कोण...स्पेन सोबत युद्ध करायचे आहे...!
स्पेन चा अत्याचार पेपर मध्ये छापायचा आहे...मग असल्या थातुर मातुर वैज्ञानिक शक्यतेला काय भाव द्यायचा आहे...??
त्या पेक्षा तत्कालीन सर्व वृत्तपत्रांनी स्पेन विरोधी आघाडी उघडली...आणि त्यात" आम्हाला अमेरिकी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून विश्वसनीय बातमी मिळाली आहे की सदर हल्ला कसा स्पेन ने आखला होता..त्यांनी कसा आपल्या युद्धनौकेचा अभ्यास केला....स्फोटके कुठून मिळवली...ती तिथे कशी पेरून ठेवली याच्या सुरस कथा छापायला सुरुवात केली!!"

या सर्वाचा परिणाम एकच झाला की तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष यांना आपल्या सार्वभौम सभागृहामध्ये युद्धाचा अधिकृत प्रस्ताव परित करून घ्यावा लागला आणि
एप्रिल १८९८- ऑगस्ट १८९८ असे ३ महिने चाललेले युद्धाचा प्रारंभ झाला!!!!

आता त्या युद्धात अमेरिका जिंकली...स्पेन हरला...क्युबा स्वतंत्र झाला...वगैरे वगैरे गोड गुलाबी ऐतिहासिक गैरसमजुती चे गुलाबजाम आजही अनेक इतिहासकार मिटक्या मारत खाताना आढळतील...तुम्हाला पण आग्रह करतील की चाखून तरी बघा ...किती गोड आणि स्वादिष्ट आहेत !!

पण हे गुलाबजाम विषारी आहेत..त्यांची पाककृती ही एका विकृत व्यापारी मानसिकतेमधून तयार झाली आहे...
त्याला बनवताना तप्त अशी धग तुमच्या आमच्या सारख्या मध्यमवर्गीय नागरिकांच्या संतापाची देण्यात आली होती!!

सध्या तुमच्या आजूबाजूला अशाच अनेक विषारी मिठाई वाल्यांच्या चुलीवर कढई तापत ठेवलेल्या दिसतील...
पण सांभाळ करा...वेळीच हे विष आवरणे तुमच्या आमच्या हातातच आहे...

- शैलेश भोसले
टीव्ही ला घाबरणारा एक सर्व सामान्य नागरिक

प्रतिक्रिया

दीपक११७७'s picture

18 Oct 2020 - 10:30 pm | दीपक११७७

मिडिया इज अल्वेज अलरेडी सोल्डं.

भारतातील मीडिया ची भूमिका देशाच्या हिताची आहे का असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर ..
भारतीय मीडिया देश हिताची बिलकुल नाही असे उत्तर च योग्य आहे.
देशाच्या समीरची आव्हान, देशा समोरच्या समस्या,सरकारचे चुकीचे निर्णय आणि त्याचा होणार देशावर परिणाम,सामाजिक ऐक्य निर्माण करणे.
ह्या मधील कोणत्याच विषयात भारतीय मीडिया योग्य आणि mature bhumika घेत नाही..
त्या उलट सरकारची खोटी स्तुती करणे,त्यांचे चुकीचे निर्णय पण कसे बरोबर आहेत हे दाखवणे, समाजात विद्वेष पसरवणे,लोकांचे प्रश्न न मांडणे असले च उद्योग भारतीय मीडिया करत आहे..
भारतीय मीडिया जन्म झाल्या पासून आज पर्यंत बाल अवस्थेत च आहे..
ती जवान पण झाली नाही आणि प्रौढ पण झाली नाही.
मला तर असे वाटते..
जागतिक मीडिया हाउस मधून उत्तम दर्जाचे काम करणाऱ्या मीडिया ला भारतात 100 टक्के मालकीचे न्यूज चॅनेल आणि न्यूज paper स्थानिक भाषेत चालवण्यासाठी परवानगी दिली पाहिजे
तरच ही भारतीय मीडिया ची थोडी वाढ होवून जवान तरी होईल.

मदनबाण's picture

22 Oct 2020 - 10:39 pm | मदनबाण

आत्ता अर्णब गोस्वामी ने इंडिया बुल्स हे नाव घेतल्यावर कोणाला तरी त्रास होतो असे म्हंटले.
त्यावर जालावर मी शोध घेतल्यावर मिळालेली माहिती खालील प्रमाणे :-
P1
ज्या पोर्टल पेजचा हा स्क्रिनशॉट आहे ते पोर्टल :-
https://www.marketscreener.com/business-leaders/Savita-Singh-0720GF-E/bi...

दुसरा स्क्रिन शॉट :-
P2
आता या स्क्रिनशॉटचा अजुन एक संबंध खालील बातमीत :-
How Mumbai Police Commissioner Param Bir Singh Used India Bulls as an Accomplice in Manufacturing Fake “Hindu Terror” Bogey in 2008

अजुन एक गोष्ट... इंडिया टिव्हीच्या आप की अदालत मध्ये सांध्वी प्रज्ञा सिंग यांची मुलाखत काही काळा पूर्वी आली होती ती देखील आठवली, त्यातील एक छोटीशी झलक :-

आता कोणाचे दिवस कसे भरले आहेत, हे समजले असेलच.

जाता जाता :- राज्यात / देशात धार्मीक भावना मुद्दामुन भडकवण्याचे प्रयत्न करुन दंगली घडवण्याचे प्रयत्न चालु आहेत का असा संशय निर्माण व्हावा असे जाणवत आहे. नवरात्र चालु असताना Eros अत्यंत अश्लील कमेंट्स नवरात्रीच्या उत्सवात ट्विट केल्या होत्या, त्याचा क्षणात भडका उडकुन लोक पिसाळले ! ही झळ इतकी दाहक होती की लगेच Eros ने माफीनामा दिला.
Eros Now deletes ‘vulgar’ Navratri posts amid boycott call
We must preserve cinema as a community viewing theatre experience,its more difficult to enthrall large section of audience than sexualise content for personal viewing, digitisation of art faces this major crisis, all streaming platforms are nothing but a porn hub.
इति :- कंगना
हिंदूच्या पवित्र सणात अत्यंत अपवित्र कृती करणार्‍या Eros विरोधात कारवाई व्हायला हवी !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Final user trial of Anti tank guided missile NAG tested at pokhran range Today

Rajesh188's picture

22 Oct 2020 - 11:05 pm | Rajesh188

Bjp हा पक्ष फक्त हिंदू मुस्लिम ह्यांच्या द्वेष वरच राजकारण करत आहे .
फक्त हिंदू ना भावनिक ब्लॅक मेल करणे आणि हिंदू ना नेहमी मुसलमान लोकांची भीती दाखवायची ह्याच तत्व वर राजकारण करत आहे.
त्यांना हिंदू विषयी बिलकुल प्रेम नाही.
हिंदू नाच लुटण्यात ,कमजोर करण्यात,त्यांना हतबल करण्यात BJP च सर्वात मोठा हात आहे.
उद्या हिंदू आणि मुस्लिम चा संघर्ष पेटला तर bjp हिंदू चे रक्षण करण्यात बिलकुल समर्थ नाही.
हिंदू साठी निस्वार्थी काम करणारे नेतेच त्यांच्या कडे नाहीत.
आणि त्यांचे कार्य करते पण तेवढे सक्षम नाहीत फक्त बोल घेवडे आहेत.

मराठी_माणूस's picture

23 Oct 2020 - 8:52 am | मराठी_माणूस

सध्याच्या काळात "निस्वार्थी काम करणारे नेते" कोणाकडे आहेत ?

सुबोध खरे's picture

23 Oct 2020 - 9:58 am | सुबोध खरे

निस्वार्थी काम करणारे नेते

हि जमात १९४७ सालीच नामशेष झाली आहे.

हिंदूंच कशाला मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, ज्यू अशा कोणत्याही धर्मात निस्वार्थपणे काम करणारी माणसं कुठे दिसली तर शिवतीर्थावर मी त्यांचा जाहीर सत्कार करायला तयार आहे.

तुमच्या अपेक्षाच अवास्तव आहेत.

मराठी_माणूस's picture

23 Oct 2020 - 10:23 am | मराठी_माणूस

त्यामुळेच तो प्रश्न गर्भीत उत्तरासह विचारला होता :)

सॅगी's picture

23 Oct 2020 - 10:27 am | सॅगी

तुमच्या अपेक्षाच अवास्तव आहेत.

सर, केवळ एवढेच नाही, फक्त एका राजकीय पक्षाबद्दल गरळ ओकायचे काम अगदी इमानेइतबारे सुरू आहे...जणू काही इतर राजकीय पक्ष "दुध के धुले" आहेत. :)

Gk's picture

31 Oct 2020 - 9:30 am | Gk

सहमत

देशासाठी करा आणि मरा असे लोकांना सांगून स्वतःही तसे करणारे लोक 1947 प्लस मायनस 20 वर्षे होते

आता कुणी लोकांना देशासाठी करा म्हणत असेल तर ते देशासाठी करा ( आणि तुम्ही मरा मी खातो) असे असते

बाप्पू's picture

23 Oct 2020 - 10:51 am | बाप्पू

वा मस्त प्रतिसाद. ! तुम्ही खांग्रेस चे प्रवक्ते काय हो??
असो असल्या प्रतिसादाला उत्तर द्यायचे तर एकच पर्याय -

तुमच्या प्रतिसादात जिथे हिंदू लिहिलेय तिथे मुस्लिम आणि जिथे मुस्लिम लिहिलेय तिथे हिंदू असे रिप्लेस करा. आणि Bjp la काँग्रेस ने रिप्लेस करा.
उत्तर मिळेल. !

धन्यवाद.

मदनबाण's picture

29 Oct 2020 - 2:08 pm | मदनबाण

काल सांध्वी प्रज्ञा सिंग यांची मुलाखत झाली त्याचा व्हिडियो :-

सुशांत सिंग राजपूत प्रकरणी चुकीच्या बातम्यां बाबतीत २ चॅनलनी माफी मागितली आहे, नक्की माफी मागितली का सारवासारव ? :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Twitter apologises for showing Leh, Jammu and Kashmir in China