सुशांत सिंह राजपूत

मदनबाण's picture
मदनबाण in काथ्याकूट
31 Aug 2020 - 4:12 pm
गाभा: 

ताज्या घडामोडी - ऑगस्ट - सप्टेंबर २०२० या धाग्यात सुचवल्या प्रमाणे केवळ सुशांतसाठीच वेगळा धागा काढला आहे. मी या एकमेव विषयावर जमेल तसे अपडेट्स देत राहीन, ज्यांना या विषयात रस असेल त्यांनी सुद्धा माहितीत भर टाकवी.

वरती ज्या धाग्याचा संदर्भ दिला आहे त्याच्या शेवटच्या प्रतिसादात Imtiaz Khatri संबंधी व्हिडियो दिला आहे, आता अशी माहिती जालावर येत आहे की तो सीबीआय कस्टडीत गेला आहे.

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

10 Oct 2020 - 9:55 am | सुबोध खरे

प्लास्टिक वापरणे बंद करायला तुम्हाला श्री मोदींनी सांगायला पाहिजे का?

दुसरे म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशवीत सफरचंदे( कोणतीही फळे) लवकर पिकून काळी पडतात

गामा पैलवान's picture

10 Oct 2020 - 2:28 pm | गामा पैलवान

त्यापेक्षा तुम्ही कोकण रेल्वे दुपदरी का बांधली नाहीत? म्हणजे डबलडेकर गाडी चालवायचा त्रास वाचला असता.
-गा.पै.

हस्तर's picture

11 Oct 2020 - 3:23 am | हस्तर

अर्नब गोस्वमि शायरि https://youtu.be/lFs_42NdxFM

कपिलमुनी's picture

11 Oct 2020 - 9:46 am | कपिलमुनी

नवीन मटेरीयल काही येईना !
सगळया थियरीज संपल्या वाटतं.

सुशांत सिंग प्रकरणात केंद्रीय सरकार आणि त्या सरकार च्या इषाऱ्या वरून जो तमाशा लोकांना बघायला मिळाला तो भारताच्या इतिहास मध्ये पहिल्यांदाच .
BJP हा देशातील राज्यकर्ता पक्ष असणे हे देशाला आणि समाजातील सर्व च घटकान (काही थोडे मोदी चे मित्र सोडले तर) अतिशय धोकादायक आहे.

रात्रीचे चांदणे's picture

12 Oct 2020 - 12:15 am | रात्रीचे चांदणे

Rajesh188, म्हणजे जर CBI ने सुशांत ने आत्महत्याच केली असा निष्कर्ष काढला तर मोदी आणि शहा दोषी आणि समजा आत्महत्या नसून तो खून होता असा निष्कर्ष काढला तरी मोदी आणि शहा ने CBI वरती दबाव टाकला, म्हणजे काहीही झाले तरी दोष हा मोदी आणि शहा चाच असणार आहे. ही Cbi कडे तपासासाठी देण्याचा निर्णय हा कोर्टाचा होता मोदी शहाचा नव्हता. म्हणजे देशात काहीही झाले तरी तुम्ही लोक दोष हा मोदी आणि शहालाच देणारं.

सॅगी's picture

21 Oct 2020 - 6:48 pm | सॅगी

मोदी विरोधकांना असले प्रश्न विचारायचे नसतात. नाहीतर लगेचच तुम्हाला भक्त ठरवून मोकळे होतात ते.

चुकीचे दावे करणारे you tube किंग,चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्ती,न्यूज चॅनेल,ह्या सर्वांवर अत्यंत कडक कारवाई कोर्टाने स्वतः च करावी .
सरकार कडून अपेक्षा नाही.
रिया बद्द्ल चुकीचे माहिती प्रसारित करणे,तिचा पाठलाग करणे,चुकीचे आरोप करणे .
हे करणारे सर्व गुन्हेगार आहेत ह्यांच्या वर अशा कलम खाली कोर्टात चालावी ज्या नुसार कमीत कामी 10 वर्ष तरी तुरुंगवास झाला पाहिजे.
तरच कायद्याचे राज्य देशात आहे असे म्हणता येईल..

गामा पैलवान's picture

12 Oct 2020 - 7:37 pm | गामा पैलवान

लोकहो,

हाच न्याय आसारामबापूंच्या विरोधात गदारोळ माजवणाऱ्या माध्यमांनाही लावायचा का?

आ.न.,
-गा.पै.

हस्तर's picture

12 Oct 2020 - 7:58 pm | हस्तर

रिया हि एक स्त्री आहे
तिला जास्त्त त्रास झाला आहे

कोणत्या ही व्यक्ती विरूद्ध सत्य माहीत नसताना खोटी माहिती पसरवून त्या व्यक्ती चे चरित्र हनन करणे,त्या व्यक्ती ला गुन्हेगार ठरवणे ही गुन्हेगारी वृत्ती आहे.
रिया वर आरोप करणारे आणि रोज वेगळेच सत्य सांगणारे सर्वच आता गायब झाले आहेत.

कपिलमुनी's picture

13 Oct 2020 - 11:38 am | कपिलमुनी

यू टर्न

साक्षीदाराने यू तर्न घेतला, रिया ड्रग डीलर नाही असे हाय कोर्ट म्हणतय .

धागाकर्ते ३०० चा टीआरपी घेउन मस्त खुष !

Rajesh188's picture

13 Oct 2020 - 11:47 am | Rajesh188

रिया अत्यंत संयमी आणि खमकि निघाली.
तिने तिचे मानसिक संतुलन बिघडू दिले नाही.
मूर्ख कंगना सारखी बेताल वक्तव्य केली नाहीत.
आता ह्या टीआरपी वाले आणि paid स्वयं घोषित न्यायाधीश ह्यांना धडा शिकवला च पाहिजे.
नाही तर ही वृत्ती अशीच फोफावत जाईल.

शा वि कु's picture

13 Oct 2020 - 12:38 pm | शा वि कु

पश्चिम देशांमध्ये कॅन्सल कल्चर म्हणून वेडगळ टूम तिथल्या लिबरल्स आणि असोर्टेड डाव्यांमध्ये जोरात गाजते आहे. एखाद्या व्यक्तीशी आपले पॉलिटिकल मत जुळत नसले की जीवनाच्या सर्व अंगांमधून त्या व्यक्तीस वाळीत टाकायचे.
उदा- जे. के. रोलिंगने ट्रान्स व्यक्तींबाबत काही विधान केले तर तिच्या ५व्या हेरकथा पुस्तकाला न वाचताच गुडरिड्सवर कमी रेटिंग द्यायचा ट्रेंड सुरु केला. पुस्तकसुद्धा ट्रान्सफोबिक आहे असे ऐकीव महितीवरून ठरवले. असे बर्याच ठिकाणी. बऱ्याच वृत्तपत्र संपादकाना वेगळे मत असल्यामुळे राजीनामा देण्यास भाग पाडले.

गंमत म्हणजे ही वेडगळ पाश्चिमात्य लिबरल ट्रेट इथल्या कॉन्सर्व्हेटिव्ह लोकांनी नेमकी उचलली आहे. फरहान आणि जावेद अख्तर, स्वरा भास्कर,दीपिका पदुकोण, नेपोटीझमच्या नावाखाली आलीया भट इत्यादींच्या सिनेमांच्या ट्रेलर्स ना डिस्लाईक करणे, वाळीत टाकणे वैगेरे बालिश प्रकार इथेही जोराने फोफावतायत.

सुशांत सिंग प्रकरणातून हे नेमके अधोरेखित झाले.

कपिलमुनी's picture

21 Oct 2020 - 4:01 pm | कपिलमुनी

हवाबाण उगीच म्हणाले नव्हतो!

नुसती महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांवर चिखलफेक करून झाली आता गायब

डॅनी ओशन's picture

21 Oct 2020 - 5:36 pm | डॅनी ओशन

हे काय ऐकतोय...
आता कोण देणार न्याव ?
मदनबाणजी असे नका क्रू.

मदनबाणजी चालते झाले धाग्याला दाखवूनी पाठ,
सुशांतच्या न्यायासक्तांनी धरली असे हो खाट !

कितीक असती प्रश्न अजुनी सुटावयाचे बाकी,
ब्यांकेतले पैशे गेले ते कुणा कुलटेच्या गाठी ???

तितकेच नाही; फौ-जी आहे, कृष्णजाल आहे,
मिनिष्ट्राचे पोरच दोषी, गोस्वामी काय करितो आहे ?

मदनबाणजी सांगा मजला असते का कधी असे ?
न्याय मागणारे सगळेच्या सगळे गजाआड हो कसे ?

&#128534

- ("र ला ट" कवी) डॅनी.

शा वि कु's picture

23 Oct 2020 - 8:42 am | शा वि कु

“ही शोध पत्रकारिता आहे का?,” सुशांत प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीला फटकारलं

मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी चॅनेलकडून चालवण्यात आलेल्या #ArrestRhea या हॅशटॅगचा उल्लेख केला. यावेळी उच्च न्यायालयाकडून चॅनेलच्या वकील मालविका त्रिवेदी यांना रिपब्लिक टीव्हीने मृतदेहाचे फोटो का दाखवले? तसंच ही आत्महत्या आहे की हत्या यावरुन अंदाज का बांधण्यात आले? अशी विचारणा केली.
(...)
“तुम्ही एका महिलेचं वर्णन असं केलं की तिच्या हक्कांचे उल्लंघन झालं आहे, हे आमचं प्राथमिक मत आहे,” असं न्यायालयाने म्हटलं आहे. शुक्रवारी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

सुबोध खरे's picture

23 Oct 2020 - 10:00 am | सुबोध खरे

उच्च न्यायालय श्री परमवीर सिंह यांच्या बद्दल काय म्हणतंय ?

शा वि कु's picture

23 Oct 2020 - 10:07 am | शा वि कु

काय म्हणतंय ?

शा वि कु's picture

23 Oct 2020 - 10:13 am | शा वि कु

तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा.
रिपब्लिकने केस केलीये इतकेच माहितीये.

कपिलमुनी's picture

23 Oct 2020 - 12:33 pm | कपिलमुनी

whataboutery आणि गोल पोस्ट बदलणे हे भारी करता तुम्ही !
म्हणजे न्यायालयाने रिपब्लिक ला फटकारले मग त्यावर बोलायचे नाही, 'तेरी कमीज मुझसे जादा मैली है हे दाखविण्यात इंटरेस्ट !

Rajesh188's picture

23 Oct 2020 - 12:12 pm | Rajesh188

अर्णव आणि कंगना चे माकड चाळे आक्षेप घेण्यासारखे वाटत नाहीत.ह्याचे आश्चर्य वाटते.
एवढं कसा माणूस आंधळा होवू शकतो.
निष्ठा असावी एकद्या विचार धारेवर पक्षांवर पण अशी आंधळी नसावी

रात्रीचे चांदणे's picture

23 Oct 2020 - 1:28 pm | रात्रीचे चांदणे

माझ्या महितातले जेवढे bjp समर्थक आहेत त्यात ले बहुसंख्य अर्णब आणि कंगना च्या माकड चाळयाना समर्थन करत नाहीत. पण सेनेवर टीका केली म्हणून कंगना चे ऑफिस तोडणे पण चुकीचे आहे. माझ्या मते rupublic चॅनेल bjp ची मत कमी करतो तर NDTV bjp ची मत वाढवतो.

मदनबाण's picture

27 Oct 2020 - 6:18 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India, US to sign landmark defence pact to share high-end military technology, logistics today

कपिलमुनी's picture

30 Oct 2020 - 10:02 pm | कपिलमुनी

?

कपिलमुनी's picture

17 Nov 2020 - 4:55 pm | कपिलमुनी

बिहार इलेक्शन संपला तसा सुशांतसिंग ला हळुच बाजुला टाकलं !
आता कोणी यूट्यूबवर व्हिडीओ बनवत नाही, प्राईम टाईम देत नाही इतकेच काय इथे धागा कर्ता सुद्धा टीआरपी संपल्यावर फिरकेना झालाय

शा वि कु's picture

18 Nov 2020 - 5:18 pm | शा वि कु

मुदलात काही नव्हतंच त्यात. फुगा किती दिवस राहणार ?

विंदांची कविता आहे की-

होता कुठे, आला कुठे - तो शाश्वताचा सारथी !
दर्याच सरला मागुती की सांडपाणी आटले ?

निनाद's picture

18 Nov 2020 - 9:53 am | निनाद

दिल्लीतले आंदोलन अण्णांचे वापरून केजडीवाल मुख्यमंत्री झाले - आता अण्णांना कोण विचारतो बरे?
किती वेळा त्याने अण्णांकडे ढुंकून पाहिले आहे? त्या कुमार विश्वास ला पण वापरून असेच फेकून दिले आहे.

हाथरस मध्ये बंटी बबली गेले. पण त्यातले पितळ उघडे पडताच किती वेळा परत गेले?

फार काय त्या ब्लॅक लाइव्ह मॅ. आंदोलनाला पण बायडन प्रेसिडेंट झाल्यावर अनाथ सोडून दिले आहे.

सगळे हे तंत्र वापरतात. त्यात नवीन ते काय?

कपिलमुनी's picture

19 Nov 2020 - 3:58 pm | कपिलमुनी

एका मृत्यूचे भांडवल करून वापरले हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद

मदनबाण's picture

20 Nov 2020 - 3:03 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chunar... :- ABCD 2 [ Arijit Singh ]

शा वि कु's picture

6 Jan 2021 - 10:51 am | शा वि कु

सुशांत सिंह राजपूत जिवंत आहे इति श्री सत्यान्वेषी, सुप्रिम कोर्टातले वकील, विभोर आनंद.

महालोल !

गामा पैलवान's picture

6 Jan 2021 - 2:38 pm | गामा पैलवान

१ तास १३ मिनिटांचं चलचित्र पाहून हा निष्कर्ष काढलात! ;-)
-गा.पै.

मदनबाण's picture

15 Jan 2021 - 3:27 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zoo Zoo Zoobie Zooby... :- [ Dance Dance (1987) ]

चौथा कोनाडा's picture

15 Jan 2021 - 5:54 pm | चौथा कोनाडा

मुंढे प्रकरण पण आता त्याच मार्गाने निघालंय !

Rajesh188's picture

15 Jan 2021 - 6:07 pm | Rajesh188

जे bjp नेते रात्रंदिवस सुशांत साठी तळमळत होते ते सर्व आता गायब आहेत.
कंगना ला सुशांत च विसर पडला आहे.
Yotube ,fb वर अचानक mushroom उगवले होते सुशांत साठी ते पण आता कुठे दिसेनासे झाले आहे.
सुशांत ल न्याय मिळाला की काय?

मदनबाण's picture

23 Feb 2021 - 7:50 pm | मदनबाण

वकिल आणि त्यांची मते :-


जाता जाता :---
आपल्या देशात माणुस जिवंत असताना त्याच्या गुणांची पारख केली जात नाही किंवा कौतुक केले जात नाही, मेल्यावर मात्र सन्मान दिले जातात.
The Critics Best Actor was awarded posthumously to late Sushant Singh Rajput, who passed away last year. He last starred in Dil Bechara, released after his passing.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dil Bechara – Title Track | Sushant Singh Rajput |

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीने चार्टशीट दाखल केली.
In Sushant Singh Rajput-related Drug Case, NCB Files 12,000 Page Charge Sheet

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Din Mahine Saal Gujarte jayege... :- Avatar

इतके दिवस मिडियात सुशांत सिंग आत्महत्या हा शब्द प्रयोग केला जात होता, परंतु महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सुशांत सिंगची "हत्या" झाली होती असा त्यांच्या भाषणात उल्लेख केला आहे. आता मिडियाने सुशांत सिंग ने आत्महत्या केली होती असे म्हणणे टाळले पाहिजे नाही का ? स्वतः गृहमंत्रीच आता ती हत्या होती हे कबुल करुन मोकळे झाले आहेत हे आता लक्षात ठेवायला हवे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्‍यांची इतिहास नोंद ठेवत नाही.