आई! नको वध करू माझा!

उमेश कोठीकर's picture
उमेश कोठीकर in जे न देखे रवी...
29 Mar 2009 - 5:02 pm

गे आई!
नको वध करू माझा तुझ्याच या चिमण्या जीवाचा
आकांत तुझ्याच उदरी तुला पाहवेल का ग माझा?
मातृत्व तुझे मिळावे म्हणूनी मी देवाकडे हट्ट धरिला
जन्मत:च माझा मृत्यूदिन तू का ग ठरविला?
मुलगी म्हणूनी दु:स्वास का ग? शेवटी मी तुझीच ना?
भीतीने वधाच्या बिलगून उदरी तुझ्या लपले ना!
जरी मुलगी मी जन्मानंतर आयुष्य वेचेन तुझ्यासाठी आई
दादासारखीच मलाही ऐकव ना गोड अंगाई!
ते बघ घेउन येत आहेत डॉक्टर काका ती करवत
भीती वाटते ग मला स्वर माझा अजुनही अस्फुट
माहित्येय मला तू पोटात किती प्रेमाने गं जपले
पाहवेल का तुला होतांना माझ्या बाळतनूची शकले?
मलाही वाटते ग आई या सुंदर जगी जन्म घ्यावा
फक्त तुझ्या सुखासाठी क्षण प्रत्येक कृतार्थ व्हावा
नको संपवू अस्तित्व माझे जन्मतःच मुलगी म्हणून ग!
कोमल पाकळीसम काया माझी होईल रक्तलांछित ग!
तूच म्हटली होती गोड माझी परी ये ना लवकर
आई! आई! वाचव मला तो बघ हात यमाचा निष्ठुर!
बाबांना बोलाव ना गं आई करेल मी त्यांना विनंती
वधू नका मला बाबा घ्या हो मला कडेवरती!
खूप बोलूनी आई थकले गं झोप मला येत आहे
बोट तुझे चिमुकल्या बाळमुठीत धरीले घट्ट आहे
आई बाबा दादा नमस्कार करते तुम्हा शेवटच्या क्षणी
पण.....................................
आई म्हणूनी फक्त तुझी कूस लाभो मला पुढच्या जन्मी!

कविताविचार

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

29 Mar 2009 - 6:27 pm | अविनाशकुलकर्णी

क्वितेचा विसय खुप जुना आहे...पन क्विता निराली व बेदक असी आहे...मुलिचा अकरोश म्नाला चतका लाव्तो..एकदरीत चान आहे..

चन्द्रशेखर गोखले's picture

29 Mar 2009 - 7:23 pm | चन्द्रशेखर गोखले

हा काय प्रॉब्लेम...?

टारझन's picture

29 Mar 2009 - 11:49 pm | टारझन

क्वितेचा विसय खुप जुना आहे...पन क्विता निराली व बेदक असी आहे...मुलिचा अकरोश म्नाला चतका लाव्तो..एकदरीत चान आहे..

=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
आगायातया ... असली मराठी लिपी आजपर्यंत पाहिली/वाचली णव्हती =)) बोल्ड केलेल्या शब्दांनी फुटलोय ... हे मुद्दाम लिहीलंय का ? की अशी लिपी आपल्यामुळे खरोखर अस्तित्वात आहे ? च्यायला टिका करायला असली भाषा वापरणार ? हे म्हणजे उघडी करून देण्यासारखं .. आणि पर्‍याची कमेंट ... खल्लास .. =)) =))

तरी मी काय म्हणतो परा, मनोरंजण म्हणन आपण ब्रिटीश वगैरे पब्लिकच्या लिपीला पसंत करतोच की .. हा प्रकार पण भारी वाटतो .. चान आहे ना ?

परिकथेतील राजकुमार's picture

29 Mar 2009 - 7:43 pm | परिकथेतील राजकुमार

अविनाश काका ती मराठी भाषा तुमच्याकडे अशीच याचना करत असेल .... 'नको करु वध माझा.'

कविता छानच आहे, विषय उत्तम मांडला आहे.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

प्राजु's picture

29 Mar 2009 - 7:49 pm | प्राजु

अविनाश काका ती मराठी भाषा तुमच्याकडे अशीच याचना करत असेल .... 'नको करु वध माझा.'

परा.... अवघड आहेस तू!!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

उमेश कोठीकर's picture

29 Mar 2009 - 8:03 pm | उमेश कोठीकर

धन्यवाद्.मि पा वर पहिलाच दिवस आहे. सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा.

प्राजु's picture

29 Mar 2009 - 7:35 pm | प्राजु

छान लिहिले आहेस...
अशा प्रकारचा एक लेख मला ढकलपत्रातून आला होता..
ही कविता मात्र खूप आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मराठमोळा's picture

29 Mar 2009 - 10:07 pm | मराठमोळा

छान सामाजिक संदेश देणारी कविता !!!!
आवडली...

नववर्षाच्या आणी पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

लिखाळ's picture

1 Apr 2009 - 7:14 pm | लिखाळ

कविता आवडली.

पराचा प्रतिसाद पण आवडला :)
-- लिखाळ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Apr 2009 - 9:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कविता आवडली.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

चंबा मुतनाळ's picture

2 Apr 2009 - 10:18 am | चंबा मुतनाळ

क्विता आव्द्ली!!

चंबा