शब्दखेळ : विरंगुळा

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
24 May 2020 - 3:45 pm

शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा

खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.
प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा.

1 ऐच्छिक :
2 अपूर्णता :
3 विष्णूचे स्थान :
4 वाचा :
5भिन्नता :
6काळी तुळस :

7 सावत्र :
8धन्वंतरी :
9कायदेशीर :
10 आश्चर्य :
11गरूड :
12 समृद्धी :

13 सीता :
14 ऐश्वर्य :
15 निष्फळता :
17 शत्रू :
18 चारा :

19 संन्यासी :
20 ओसाड :
21 कुबेर :
२२. चतुर्वर्णापैकी एक :

23. विष्णूभक्त :
24 निज
25 सूड उगवणे :
26 लग्नाची एक पद्धत :
27 अग्नी :

भाषाविरंगुळा

प्रतिक्रिया

Prajakta२१'s picture

24 May 2020 - 4:00 pm | Prajakta२१

1 ऐच्छिक : वैकल्पीक

2 अपूर्णता :वैगुण्य
3 विष्णूचे स्थान :वैकुंठ
4 वाचा :वैखरी
5भिन्नता :वैविध्य
6काळी तुळस : पास

7 सावत्र :-----
8धन्वंतरी :वैद्य
9कायदेशीर :वैध
10 आश्चर्य :वैचित्र्य ?
11गरूड :वैनतेय
12 समृद्धी : वैभव?

13 सीता :वैदेही
14 ऐश्वर्य :वैभव
15 निष्फळता :वैफल्य
17 शत्रू :वैरी
18 चारा : वैरण

19 संन्यासी :वैरागी
20 ओसाड :वैराण
21 कुबेर : वैश्वदेव ??

२२. चतुर्वर्णापैकी एक : वैश्य (व्यापारी )

23. विष्णूभक्त :वैष्णव
24 निज
25 सूड उगवणे :vendetta (इंग्लिश )???
26 लग्नाची एक पद्धत :वैदिक
27 अग्नी : वैश्वानर ?

कुमार१'s picture

24 May 2020 - 4:38 pm | कुमार१

२१, २५ चूक.
बाकी बरोबर.
आता थोडेच राहिलेत
धन्यवाद !

Prajakta२१'s picture

24 May 2020 - 5:44 pm | Prajakta२१

काली तुळस -वैजयंती ???
निज -वैयक्तिक (मला निज म्हणजे झोप वाटले )

एव्हडे अवघड शब्द एव्हड्या पटकन, आमचा खुप विरंगुळा झाला असता.. प्राजक्ता जी ना ___^___ असला तरी त्यांनी आमचा विरंगुळा घालवला.. :- ))

सूड उगवणे : वैमनस्य पाळणे?

Prajakta२१'s picture

24 May 2020 - 6:35 pm | Prajakta२१

कोणीतरी कुबेराला शब्द सुचवा प्लिज
वैमनस्य -वैराला जास्त उपयुक्त वाटतोय (बातम्यात असते ना पूर्व वैमनस्यातून वगैरे )
सूड उगवणे -वैर साधणे ?
सावत्र -पास

Prajakta२१'s picture

24 May 2020 - 6:42 pm | Prajakta२१

वैवस्वत पण हे मनूचे नाव आहे एका

कुमार१'s picture

24 May 2020 - 6:46 pm | कुमार१

१.सूड उगवणे -वैर साधणे ? >>> नाही.
एकच शब्द पाहिजे.

२. तुळस > बरोबर

३. कुबेर >> चूक. ४ अक्षरीच आहे.

कुमार१'s picture

24 May 2020 - 8:33 pm | कुमार१

नाही !

प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा.

कुमार१'s picture

24 May 2020 - 8:47 pm | कुमार१

वैश्रवण

Prajakta२१'s picture

24 May 2020 - 11:36 pm | Prajakta२१

विश्रवा ऋषींचा मुलगा (रावणाचा भाऊ )
ओह्ह हे नाही आठवले धन्यवाद

कुमार१'s picture

25 May 2020 - 7:40 am | कुमार१

मंडळी,
चला आता ७ व २५ असे दोनच राहिले.
नक्की येतील तुम्हाला...... !

अभ्या..'s picture

25 May 2020 - 9:20 am | अभ्या..

.

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 May 2020 - 11:26 am | ज्ञानोबाचे पैजार

२५. वैर निभावणे

पैजारबुवा,

कुमार१'s picture

25 May 2020 - 11:36 am | कुमार१

उत्तर एकशब्दीच हवे.

मराठी_माणूस's picture

25 May 2020 - 11:47 am | मराठी_माणूस

7 सावत्र := वैमात्र

कुमार१'s picture

25 May 2020 - 12:00 pm | कुमार१

7 सावत्र := वैमात्र >>> वैमात्रेय

25 सूड उगवणे = वैरशोधन >>> नाही.
हा शब्द तुम्ही कोशात पाहिलाय का ?

कुमार१'s picture

25 May 2020 - 12:26 pm | कुमार१

हरकत नाही. हेही पर्यायी उत्तर धरू.
माझे उत्तर ४ अक्षरी आहे.
कोणाला येतंय का बघू.
थोड्या वेळाने उत्तर लिहितो.

कुमार१'s picture

25 May 2020 - 2:06 pm | कुमार१

25. सूड उगवणे : वैरोद्धार

धन्यवाद
हे शब्द माहिती नव्हते

कुमार१'s picture

27 May 2020 - 7:28 am | कुमार१

म्हणी ओळखा

एकूण ५ ओळखायच्या आहेत. प्रत्येक म्हणीसाठी ३ शब्द शोधसूत्र म्हणून देत आहे. ते शब्द उत्तरात (म्हणीत) जसेच्या तसे असणार नाहीत. त्यांचा अर्थ लक्षात घ्यावा आणि त्यावरून तिचा शोध घ्यावा.

१. शरीर, नकार, दौड.

२. अवयव, भंग, प्राणी

३. बोट, पहाड, वाढ.

४. कप्पा, दाम, सम्राट.

५. कलत्र, ईश्वर, ती.
......

एक उदा. देतो.
(चादर, अवयव, कृती ) याचे उत्तर :

अंथरूण पाहून पाय पसरावे.

गणेशा's picture

27 May 2020 - 9:41 am | गणेशा

खुप अवघड जाते आहे..

काम सोडून हाच विचार चालू आहे :-))

३. बोट, पहाड, वाढ.
-
डोंगर पोखरून उंदीर काढणे

बरोबर आहे का? पण एकच शब्द जुळतोय..

गवि's picture

27 May 2020 - 10:49 am | गवि

अवयव, भंग, प्राणी

शिंग मोडून वासरांत शिरणे

किंवा

वासरांत लंगडी गाय शहाणी

??

कुमार१'s picture

27 May 2020 - 11:07 am | कुमार१

गवि,

“शिंग मोडून वासरांत शिरणे” हे पर्यायी उत्तर म्हणून योग्य.
(फक्त ३ शब्दच सूत्र म्हणून दिलेले असल्यामुळे).

माझे उत्तर होते :
एक पाय मोडल्याने गोम लंगडी होत नाही.

गणेशा's picture

27 May 2020 - 9:53 am | गणेशा

२. अवयव, भंग, प्राणी

->
बैल गेला आणि झोपा केला..

?

कुमार१'s picture

27 May 2020 - 10:12 am | कुमार१

नाही, दोन्ही चूक .

२ मधला प्राणी 'छोटासा' आहे !
३ मध्ये प्राणी नाहीच .

मला वाटलेच होते चूक असेल..
बघतो..

एक विनंती.. शनिवार रविवारी साठी स्पेशल असे काही नवीन आठवून ठेवा.. आता काम करताना इकडे पूर्ण लक्ष देता येईना.. आणि तिकडे हि नकोच वाटते आहे म्हणा :-)))

प्रयत्न करतो..किंवा रिप्लाय वाचतो..

गणेशा's picture

27 May 2020 - 10:46 am | गणेशा

४. कप्पा, दाम, सम्राट.

मला माहीत आहे हे पण उत्तर चुकेल..
पण चुकलो तरी मज्जा येते आहे.. माझे विचार असेच का फिरतात चुकीच्या दिशेने माहीत नाही..

->

राजा तीन्ही जगाचा.. आई विना भिकारी...

कुमार१'s picture

27 May 2020 - 11:09 am | कुमार१

चूक.
हरकत नाही. तुम्ही प्रयत्न करताय याचा आनंद आहे !

Prajakta२१'s picture

27 May 2020 - 6:51 pm | Prajakta२१

३. अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होत नाही (हे गूगल वर शोधले)

५. रामायण वाचून विचारतो कि रामाची सीता कोण?

किंवा अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ?
सगळे रामायण सांगितल्यावर विचारतो कि रामची सीता कोण?

१.हातचे सोडून पळत्याच्या मागे धावणे ?????
४.राजा बोले दल हले / दाम करी काम बीवी करी सलाम /समर्थाघरचे श्वान त्याला सर्वही देती मान
ह्यात एकेका म्हणीत एकेक शब्द येतोय
कप्पा -खण ह्याच्याशी related नाही सापडते

उत्तर देताना मुळ प्रश्न पण द्या ना.. म्हणजे स्क्रोल करावे लागणार नाही की 1. काय होते आणि 2. काय होते..

धन्यवाद

कुमार१'s picture

27 May 2020 - 7:21 pm | कुमार१

. करंगळी सुजली म्हणजे काय डोंगराएवढी होईल का ?

बाकी चूक.
कप्पा >>> हा वस्त्रालाही असू शकतो , असा विचार करा !
छान प्रयत्न.

Prajakta२१'s picture

27 May 2020 - 7:21 pm | Prajakta२१

१. शरीर, नकार, दौड.-हातचे सोडून पळत्याच्या मागे धावणे ?????

२. अवयव, भंग, प्राणी-हे सांगितलेच आहे

३. बोट, पहाड, वाढ.-अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ?

४. कप्पा, दाम, सम्राट.- राजा बोले दल हले / दाम करी काम बीवी करी सलाम /समर्थाघरचे श्वान त्याला सर्वही देती मान
ह्यात एकेका म्हणीत एकेक शब्द येतोय
कप्पा -खण ह्याच्याशी related नाही सापडते

५. कलत्र, ईश्वर, ती.-सगळे रामायण सांगितल्यावर विचारतो कि रामची सीता कोण?

कुमार१'s picture

27 May 2020 - 7:28 pm | कुमार१

५. कलत्र, ईश्वर, ती.-सगळे रामायण सांगितल्यावर विचारतो कि रामची सीता कोण?

>>>>> राम-सीतेचे युग नको ! 'घरची' आणि 'दारची' या दिशेने बघा.

४.एक नूर आदमी दस नूर कपडा ?

कुमार१'s picture

27 May 2020 - 7:43 pm | कुमार१

नाही
मराठी म्हण आहे !

अवांतर - तुम्ही कुमार1 वरून शब्दांचा जादुगार हे नाव घेतले तर जास्त समर्पक होईल..

कुमार१'s picture

27 May 2020 - 8:01 pm | कुमार१

काय राव,
ते शब्दांचे मोती हा प्रांत तर तुमचाच !

गणेशा's picture

27 May 2020 - 9:18 pm | गणेशा

हा हा, तुम्ही जादुगारच..

बाकी मी हारलो..
उत्तरांची वाट पाहीन..

शनिवार रविवारी पण खास राहूद्या काही असे जमल्यास...

४. कप्पा, दाम, सम्राट-खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा (गूगल बाबा कि जय !) ????????
खिशाच्या हिंट बद्दल धन्यवाद

कुमार१'s picture

28 May 2020 - 6:16 am | कुमार१

४ अगदी बरोबर, मस्त !

कुमार१'s picture

4 Jun 2020 - 7:52 am | कुमार१

१. शरीर, नकार, दौड >>
अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ .
.......
५. कलत्र, ईश्वर, ती
घरची म्हणती देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा.

धन्यवाद !

पाचवी म्हण तर मी पहिल्यांदा ऐकली :-))

कलत्र म्हणजे काय?
मी उगाच काळ असा अर्थ घेतलेला

कुमार१'s picture

4 Jun 2020 - 8:51 am | कुमार१

कलत्र म्हणजे काय?

बायको

कुमार१'s picture

30 May 2020 - 2:32 pm | कुमार१

नवा खेळ:

यात तुम्हाला सहा चित्रपटांची नावे ओळखायची आहेत हे सर्व चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहेत. क्रमांक १ व २ मराठी, ३ व ४ हिंदी आणि ५ व ६ इंग्लिश भाषिक चित्रपट आहेत. त्यांचे कथानक असे आहे:

१. जात, वर्ग व लिंगभेदाने बरबटलेल्या भारतीय समाजाचे चित्रण. तळागाळातून वर आलेला तरुण, त्याचे खेड्यातून महानगरातले स्थलांतर आणि त्याला आपलं अस्तित्त्व टिकविण्यासाठी कोणत्या दिव्यांचा सामना करावा लागतो, याचे उत्तम चित्रण. या तरुणास पुढे मोठा राष्ट्रीय पुरस्कार.

२. एक कुस्तीगीर, गरीब घरातला, मूकपटापासून अभिनयास सुरवात, पुढे चित्रनिर्माता आणि खूप श्रीमंत झालेला माणूस. त्याचे चित्रण.
………………..

३. एक जोडपे. आर्थिकदृष्ट्या समृद्ध. भारतातील खेडी सुधारायचा ध्यास घेतलेले. तंत्रकुशल. कमी खर्चातील सोप्या विद्युत जनित्राची निर्मिती. स्वयंसेवी कार्यास वाहून घेतलेले.

४. भारतातील नैसर्गिक प्रकोप ही सत्यघटना. त्याच्यात भर घालून आंतरधर्मीय व्यक्तींची प्रेमकथा. अर्थातच पुढे प्रचंड अडथळे. सुखी शेवट नाही.
.....................

५. ‘वाल्याचा वाल्मिकी’ झाला हे सूत्र. ही व्यक्ती मोठे आर्थिक घोटाळे करण्यात तरबेज आणि तोतयेगिरी. तोतया भूमिकांची व्याप्ती स्तिमित करणारी. पुढे तुरुंगवास. शिक्षा भोगल्यावर चक्क सरकार दरबारी मानाची नोकरी !

६. एक अपहरण. शोधण्यास पोलिसांचे अपयश. एका महिलेने स्वतःच शोधमोहीम हाती घेणे. त्यातून एका बेटावरील अनेक वेश्यांचे खूनसत्र उघडकीस येणे.

चांदणे संदीप's picture

30 May 2020 - 2:36 pm | चांदणे संदीप

३. स्वदेस

५. कॅच मी इफ यू कॅन

बाकी चित्रपटांबाबत जाणून घेण्यास उत्सुक आहे.

सं - दी - प

कुमार१'s picture

30 May 2020 - 2:46 pm | कुमार१

३. स्वदेस

५. कॅच मी इफ यू कॅन
...दोन्ही बरोबर

प्रथम वाचल्यावर एक पण नाव लक्षात आले नाही... विचार करतो

२. हरिशचंद्राची फॅक्टरी वाटत आहे आता तरी.

गणेशा's picture

30 May 2020 - 2:50 pm | गणेशा

४. केदारनाथ

कुमार१'s picture

30 May 2020 - 2:52 pm | कुमार१

२ चूक
४ बरोबर.

Prajakta२१'s picture

30 May 2020 - 5:33 pm | Prajakta२१

१. नटरंग ?

३. स्वदेस ---पण त्याच्यात ते जोडपे नंतर बनते आणि खेडी नाहीतर एकच खेडे सुधारतात तंत्रकुशल फक्त शाहरुख खान दाखवलं आहे हिरोईन शिक्षिका असते

नटरंग मला पण वाटले होते, पण शहर वगैरे बसले नाही फिट

कुमार१'s picture

30 May 2020 - 5:51 pm | कुमार१

प्राजक्ता,
स्वदेस बद्दल सहमत. मी खरी घटना जास्त लिहिली ! नंतर सुधारणा लिहीण्यास आलो होतो, पण त्याच्या आत बरोबर उत्तर आलेले होते.

क्रमांक २ च्या नायकाची ‘खरी’ माहिती थोडी वाढवतो:

आधी कामगार >> अभिनेता >> चित्रनिर्माता >>मुंबईत ऐशोआरामी जीवन >> आर्थिक उतरण व गरीबी

२. एक अलबेला -(भगवानदादांवर )

मला माहित नाही हा सिनेमा.. पहायला पाहिजे..

अवांतर :
बायोपिक मध्ये आपला सगळ्यात आवडता पिक्चर आहे, भाग मिल्खा भाग..
कधी ही लागला की पाहतो

अति अवांतर :

कुमार सर,
तुम्ही मी म्हतारा व्हायला लागलो आहे याची पण जाणीव करुन दिली .. समोर असते पण आठवतच नाही काही :-))

कुमार१'s picture

30 May 2020 - 6:35 pm | कुमार१

तुम्ही मी म्हतारा व्हायला लागलो आहे याची पण जाणीव करुन दिली

अहो, तुम्हीच नाही फक्त. आपल्या बहुतेकांचे असेच होते !
कोडी तयार करून मेंदूला तरुण करत राहायचे ....

कुमार१'s picture

30 May 2020 - 6:00 pm | कुमार१

क्या बात है,
२ अगदी बरोबर !

Prajakta२१'s picture

30 May 2020 - 6:01 pm | Prajakta२१

६. the सायलेन्स ऑफ the lambs ?? (गूगल वरून )

कुमार१'s picture

30 May 2020 - 6:03 pm | कुमार१

६ चूक.

कुमार१'s picture

30 May 2020 - 6:11 pm | कुमार१

६ सत्य घटनेवर आधारित आणि
वेश्यांचे खूनसत्र...

सर टोबी's picture

30 May 2020 - 7:21 pm | सर टोबी

डॉ. तात्या लहाने?

कुमार१'s picture

30 May 2020 - 7:33 pm | कुमार१

जातीभेदाने पोळलेली व्यक्ती

कुमार१'s picture

31 May 2020 - 1:40 pm | कुमार१

आता दोनच उरली आहेत. म्हणून थोडी भर:

. हे दलित लेखनावर आधारित.
६. हा २०२० मधील चित्रपट.

गणेशा's picture

31 May 2020 - 5:44 pm | गणेशा

मी हारलो ...

Prajakta२१'s picture

31 May 2020 - 6:06 pm | Prajakta२१

मी पण

६. abducted ?????????पण स्टोरी जुळत नाहीये एवढी
१. डॉ बाबासाहेब आंबेडकर ???

कुमार१'s picture

31 May 2020 - 6:10 pm | कुमार१

१. बलुतं >>> अत्याचार हा चित्रपट.

६. lost girls.
........धन्यवाद !

Prajakta२१'s picture

31 May 2020 - 6:24 pm | Prajakta२१

धन्यवाद

कुमार१'s picture

31 May 2020 - 6:54 pm | कुमार१

या खेळात भाग घेतलेल्या सर्वांचेच अभिनंदन आणि धन्यवाद. मजा आली.

साधारणपणे सध्या कायप्पावर फिरणारी कोडी ही तशी ‘एक छाप’ प्रकारची असतात. म्हणून इथे कोडी देताना जरा विचार करून वेगळ्या पद्धतीची केली. जरी उत्तर आले नाही, तरी सोडविण्याच्या प्रक्रियेतच मजा येते.

इथे भाग घेणारे आपण सर्व भाषादर्दी आहातच. आपणही असे खेळ तयार करून जरूर द्या.

गणेशा's picture

31 May 2020 - 9:22 pm | गणेशा

__^__

खालील कोड्यातीला सर्व शब्द मु या अक्षराने सुरु होणारे रोजच्या बोलीभाषेतले सोपे मराठी शब्द आहेत. इतके सोपे की कदाचित मला कोणत्याच शब्दाचे उत्तर सांगायची गरज पडणार नाही. तेव्हा नक्की प्रयत्न करा....

मु १ – चेहरे पट्टीची स्वच्छता, सहसा सकाळी उठल्या नंतर करतात

मु २ – पुण्यातून वहाणार्‍या दोन नद्या

मु ३ – भिजत घालून नंतर भाजलेला तांदूळ

मु ४ – ज्ञानदेवांची बहिण

मु ५ – वाचा नसलेला, बोलता येत नसलेला

मु ६ – उंदीर

मु ७ - विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन लिहिणारा

मु ८ – किरीट टोप राजाचे शिरस्त्राण

मु ९ – सोवळ्यात नेसायचे रेशमी वस्त्र

मु १० – अग्रेसर प्रधान किंवा प्रमुख

मु ११ – मोठा कळा किंवा कलिका किंवा घोड्याच्या कपाळावर जाईच्या कळीप्रमाणे असलेला भोवरा,

मु १२ – जोंधळा किंवा बाजरी यांच्या मध्ये पेरलेले मुग किंवा अशा तर्‍हेचे दुसरे धान्य

मु १३ – मोठी मुंगी, डोंगळा

मु १४ – उपनयन, व्रतबंध

मु १५ – हाताची पाचही बोटे एकत्र केल्यावर होते ती

मु १६ – सापांचा शत्रू

मु १७ – एका उपनिषदाचे नाव

मु १८ – राजकारणी, धुरंधर कारभारी

मु १९ – कर्जाऊ दिलेली मूळ रक्कम

मु २० – भात एका विशिष्ठ आकारात वाढण्या साठी वापरले जाणारे भांडे

मु २१ – मोहोर, शिक्का, छाप

मु २२ – विशिष्ठ सांकेतिक खुणेनी लिहून ठेवलेले मुल ध्वनी

मु २३ सुळे नसलेला हत्ती

मु २४ एकाही शब्द न बोलता केवळ हावभाव आणि शारीरिक हलचाल करून सादर केलेली कथा

मु २५ झाडाचा सर्वात खालचा भाग

पैजारबुवा,

कुमार१'s picture

1 Jun 2020 - 2:53 pm | कुमार१

मु १ – चेहरे पट्टीची स्वच्छता, सहसा सकाळी उठल्या नंतर करतात >>> मुखमार्जन
मु ४ – ज्ञानदेवांची बहिण >>> मुक्ताबाई

मु ५ – वाचा नसलेला, बोलता येत नसलेला >> मुका
मु ६ – उंदीर >>मूषक

मु ८ – किरीट टोप राजाचे शिरस्त्राण : मुकुट
मु ९ – सोवळ्यात नेसायचे रेशमी वस्त्र >> मुकटा
मु १० – अग्रेसर प्रधान किंवा प्रमुख >> मुख्यमंत्री

मु १३ – मोठी मुंगी, डोंगळा > मुंगळा
मु १४ – उपनयन, व्रतबंध >मुंज

मु १५ – हाताची पाचही बोटे एकत्र केल्यावर होते ती > मूठ
मु १६ – सापांचा शत्रू >मुंगुस

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jun 2020 - 3:12 pm | ज्ञानोबाचे पैजार

मु १० – अग्रेसर प्रधान किंवा प्रमुख >> मुख्यमंत्री

हे उत्तरही बरोबर आहे पण हे विषेशनाम झाले पण या अर्थाचा दोन अक्षरी शब्द अपेक्षितत होता.

पैजारबुवा,

मु १० – अग्रेसर प्रधान किंवा प्रमुख >> मुख्यमंत्री

हे उत्तरही बरोबर आहे पण हे विषेशनाम झाले पण या अर्थाचा दोन अक्षरी शब्द अपेक्षितत होता.

>> मुख्य ???

१९. मुद्दल ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Jun 2020 - 11:24 am | ज्ञानोबाचे पैजार

दोनही उत्तरे बरोबर आहेत

पैजारबुवा,

कुमार१'s picture

1 Jun 2020 - 6:01 pm | कुमार१

१८ मुत्सद्दी
२० ? मुदपात्र
२१ मूस

२३ मुकणा
२४ मुकाभिनय

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Jun 2020 - 8:35 am | ज्ञानोबाचे पैजार

२० चे जरा उत्तर वेगळॅ आहे तुम्ही बरेच जवळ आहात
२३ मुकाणा किंवा मुकणा दोन्ही बरोबर आहेत

पैजारबुवा,

पलाश's picture

1 Jun 2020 - 6:31 pm | पलाश

२० मुदाळं
०२ मुळामुठा
०३ मुरमुरा
२१ मुद्रा

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Jun 2020 - 8:32 am | ज्ञानोबाचे पैजार

सगळी उत्तरे बरोबर

पैजारबुवा,

पलाश's picture

1 Jun 2020 - 6:39 pm | पलाश

२२ मुळाक्षरे
२५ मूळ

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Jun 2020 - 8:36 am | ज्ञानोबाचे पैजार

ही पण दोन्ही बरोबर

पैजारबुवा,

कुमार१'s picture

2 Jun 2020 - 10:20 am | कुमार१

१७. मुक्तिकोपनिषद
..आता ११ , १२ सांगून टाका !
मग मी पुढचे कोडे देतो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Jun 2020 - 11:17 am | ज्ञानोबाचे पैजार

मु ११ – घोड्याच्या कपाळावर जाईच्या कळीप्रमाणे असलेला भोवरा, मोठा कळा किंवा कलिका – मुकुल
मु १२ – जोंधळा किंवा बाजरी यांच्या मध्ये पेरलेले मुग किंवा अशा तर्हेचे दुसरे धान्य – मुगाण

मु या शब्दापासून सुरु होणारी दोन उपनिषदे आहेत १ गुरु आणि शिष्य यांच्यातला संवाद असलेले मुंडकोपनिषद आणि दुसरे हनुमान व राम यांच्या संवादातले मुक्तिकोपनिषद

सर्व खेळाडूंचे अभिनंदन आणि आभार

पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Jun 2020 - 11:31 am | ज्ञानोबाचे पैजार

मु १ – चेहरे पट्टीची स्वच्छता, सहसा सकाळी उठल्या नंतर करतात – मुखमार्जन

मु २ – पुण्यातून वहाणार्या नद्या- मुळा, मुठा

मु ३ – भिजत घालून नंतर भाजलेला तांदूळ – मुरमुरा

मु ४ – ज्ञानदेवांची बहिण - मुक्ताबाई

मु ५ – वाचा नसलेला, बोलता येत नसलेला – मुका

मु ६ – उंदीर – मुषक

मु ७ - विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन लिहिणारा – मुकुंदराज

मु ८ – किरीट टोप राजाचे शिरस्त्राण – मुकुट

मु ९ – सोवळ्यात नेसायचे रेशमी वस्त्र – मुकटा

मु १० – अग्रेसर प्रधान किंवा प्रमुख – मुख्य

मु ११ – घोड्याच्या कपाळावर जाईच्या कळीप्रमाणे असलेला भोवरा, मोठा कळा किंवा कलिका – मुकुल

मु १२ – जोंधळा किंवा बाजरी यांच्या मध्ये पेरलेले मुग किंवा अशा तर्हेचे दुसरे धान्य – मुगाण

मु १३ – मोठी मुंगी, डोंगळा – मुंगळा

मु १४ – उपनयन, व्रतबंध, - मुंज

मु १५ – हाताची पाचही बोटे एकत्र केल्यावर होते ती – मुठ

मु १६ – सापांचा शत्रू – मुंगुस

मु १७ – एका उपनिषदाचे नाव – मुंडक, मुक्तोपनिषद आणि तिसरे मुद्गल (मु द ग ल) उपनिषद

मु १८ – राजकारणी, धुरंधर कारभारी – मुत्सद्दी

मु १९ – कर्जाऊ दिलेली मूळ रक्कम – मुद्दल

मु २० – भात एका विशिष्ठ आकारात वाढण्या साठी वापरले जाणारे भांडे – मुदाळ

मु २१ – मोहोर, शिक्का, छाप – मुद्रा

मु २२ – विशिष्ठ सांकेतिक खुणेनी लिहून ठेवलेले मुल ध्वनी - मुळाक्षरे

मु २३ सुळे नसलेला हत्ती – मुकाणा

मु २४ एकाही शब्द न बोलता केवळ हावभाव आणि शारीरिक हलचाल करून सादर केलेली कथा - मुकनाटय

मु २५ झाडाचा सर्वात खालचा भाग – मुळ

पैजारबुवा,

कुमार१'s picture

2 Jun 2020 - 12:00 pm | कुमार१

खाली प्रत्येक प्रसिद्ध मराठी लेखकाचे एक वाक्य दिलेले आहे. त्यावरून तुम्ही संबंधित लेखक ओळखावा. (लेखक शोधायला मदत म्हणून सर्व लेखकांची काही वैशिष्ट्ये वाक्यांच्या शेवटी देत आहे. अर्थातच ती वाक्यांच्या क्रमानुसार नाहीत. एक वैशिष्ट्य एकाच लेखकासाठी आहे).

वाक्ये:

१. या देशावर तीनच शब्दांचे राज्य तीन तपांवर चाललं आहे – चर्चा, मोर्चे आणि खुर्च्या.
२. फक्त एखाद्या निसर्गसौंदर्याचं ‘पर्यटनस्थळ’ झालं, की तो सरकारी निसर्ग निर्जीव, कागदी किंवा फिल्मी होऊन जातो.

३. या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्य वृत्तपत्र विकण्यापुरतं आहे. वृत्तपत्रात सत्य तेवढं लिहिण्याएवढं नाही.
४. झोपडपट्टी ही माणसांचा जनावरे बनवण्याचा प्रचंड कारखाना आहे.

५. कादंबरी एखाद्या प्रचंड ऑर्केस्ट्रासारखी असते, तर कथा सोलो वाद्यासारखी.
६. संस्था नावारूपाला आल्या की संस्थांची संस्थानं होतात आणि खुर्च्यांची सिंहासनं होतात.

७. माणसांनी थोडे तरी माणसांसारखे असावे. थोडं तरी नेक, थोडं तरी ताठ आणि गरम रक्ताचे.
……………..
(इथे ज्यांना खालील माहिती न बघताच उत्तर येत असेल, त्यांनी जरूर द्यावे ! )
......
........

लेखकांची वैशिष्ट्ये ( वाक्यांच्या क्रमानुसार नाहीत) :

• यांची विचारधारा कामगारधार्जिणी.
• खूप जंगलप्रेमी.
• साहित्यातील अत्युच्च पुरस्कारप्राप्त.

• हे प्रसिद्ध शहरी कथालेखक.
• सडेतोड व व्यवहारदक्ष म्हणून प्रसिद्ध. साहित्य प्रकाशन मर्यादित.

• कथा- कादंबरीपेक्षा नाटकात अधिक रमलेले.
• स्वतःच्या व्यावसायिक शिक्षणावर चरितार्थ न करता लेखक म्हणून कारकीर्द.
……………………………………………………

इतके सगळे सुंदर चालले आहे.. आणि इकडे आम्ही कामात प्रचंड busy.. वेळ देता येईना..

शनिवार रविवार साठी पण ठेवा जपून राव

धन्यवाद...

कुमार१'s picture

2 Jun 2020 - 6:26 pm | कुमार१

देऊ की नवे काही !
तुम्हाला आता पण येणार हो....

अहो, माझे वाचन मर्यादित..

काम खुप असल्याने आता वेळ देता येईना.. आज share मार्केट मुळे काम मागे ठेवले तर 11 वाजतील आज त्याला :-))

काय करणार.. मजबुरी...

पण 15 मिनटात दिला प्रतिसाद.. ब्रेक घेऊन..

शब्दांच्या जादूगाराला सलाम :-))