नास्तिक चळवळ : काळाची गरज ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
8 Apr 2018 - 10:08 am
गाभा: 

राम राम मंडळी...! मंडळी, काल एक बातमी वाचनात आली. ”नास्तिक कुणालाच नको असतात” बातमी वाचत गेलो आणि मग नास्तिक चळवळ चालवणा-या मंडळींबद्दल मिपावर काथ्या कुटला पाहिजे असं वाटलं. नासिक मधे नुकताच नास्तिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, पुण्यातही नास्तिकांनी एकत्र येऊन ट्रीप आयोजित केली होती. पुण्यातली मंडळी दर पंधरा दिवसाला भेटतात आणि काल शनिवारी मुंबईत नास्तिक परिषद झाली. नास्तिक चळवळ ही काही नवीन नाही. आपल्याकडे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत अनेकांनी बुद्धीप्रामाण्याची चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. युरोपातही सॉक्रेटीस, प्लेटो, अ‍ॅरीष्टॉटल ही नावं आपल्याला माहिती आहेतच, तरीही रोजच्या जीवनात बुद्धीप्रामाण्य राहीलं नाही. '' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात.

मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही. बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणार्‍या लोकांची संख्या खूप आहे, आणि ती भविष्यात वाढणार असं या चळवळ चालविणार्‍या लोकांची मतं आहेत. त्याचबरोबर धर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध हाही या चळवळींचा उद्देश आहे. कुठे काही धर्मविषयक बोलल्या गेलं की कायदेशीर प्रक्रिया सुरु होते आणि त्याचा त्रास चळवळीतल्या लोकांना होतो त्याबाबतही त्यांची एक भूमिका आहे. नास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणे त्यांच्या नास्तिक मेळाव्यांचा उद्देश असतो. नास्तिक चळवळ चालविणार्‍या मंडळींचे वॉट्सॅप गृप आहेत. अनेक गोष्टींचे ते आदानप्रदान करतात. भेटतात. एकमेकांच्या विचारांना सपोर्ट करतात.
नास्तिक चळवळ
मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे.
(मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

9 Apr 2018 - 2:33 pm | पगला गजोधर

मज्जाच आहे. कळतंय पण वळत नाही.

कदाचित, "बिथरल्यामुळे" असें होत असावें त्यांना (ज्यांना असं होतंय त्यांना)...

बिटाकाका's picture

9 Apr 2018 - 2:55 pm | बिटाकाका

आता बघा -
"अमुक धर्माला बडवले तर ते असते धर्मनिरपेक्षता "
तर
तमुक धर्माला बडवले तर ते असते धर्मांधता"

पडतो काही फरक? म्हणून म्हणालो - कळतंय पण वळत नाही.

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2018 - 3:00 pm | श्रीगुरुजी

सोडून द्या हो. त्यांची खरी मळमळ आतापर्यंत लक्षात आली असेल ना. या धाग्यावर येऊन सुद्धा *गला गजोधर!

डोक्यातली *ष्ठा अशी चांदण्यात का टाकता?
लैच वैयक्तिक *गायला लागलात गुरुजी. तुम्ही तरी लेव्हल सोडू नकात.

देशात लेवलस्वातंत्र्य फक्त तुमच्यासारख्या लोकांनाच आहे का?

राही's picture

9 Apr 2018 - 4:17 pm | राही

तसेच विष, गरळ, पिंका, थुंकी असे शब्द लेखनात saatatyaane दिसू लागले की वाचनातले स्वारस्य निघून जाते.

पैसा's picture

9 Apr 2018 - 4:22 pm | पैसा

जातीय तेढ निर्माण करणारे विखारी प्रतिसाद चालतात का?

बिटाकाका's picture

9 Apr 2018 - 4:39 pm | बिटाकाका

सिलेक्टिव्ह रिडींग आणि सिलेक्टिव्ह बॅशिंग केलं तर चालून जातात.

राही's picture

9 Apr 2018 - 4:36 pm | राही

तसेच विष, गरळ, पिंका, थुंकी असे शब्द लेखनात saatatyaane दिसू लागले की वाचनातले स्वारस्य निघून जाते.

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2018 - 4:41 pm | श्रीगुरुजी

फक्त मला बोलण्याऐवजी, सुरूवात कोणी केली आणि त्यावर टाळ्या कोणी पिटल्या ते आधी पहा. एकतर्फी दोषारोप करू नका.

विशुमित's picture

9 Apr 2018 - 2:24 pm | विशुमित

वरच्या लेवल वाले खरेच अशे उच्च विचार राखून आहेत का हा संशोधनाचा भाग आहे.
खाली पर्यंत काय झिरपून द्यायचे याचे गेमप्लॅन पण समजणे अवघड आहे.
ठराविक स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांच्या कारवायांकडे सपशेल दुर्लक्ष तर केले जात नाही ना? त्यांना आवरायला लगेच कोणी पुढे येताना दिसत नाही. खूप गाजावाजा झाल्यावर वन लायनर उल्लेख केला जातो.
पूर्वग्रहाने कोणी धर्माला बडवत नाहीत, त्याला बदनाम करणाऱ्याला बडवत असतात.

बिटाकाका's picture

9 Apr 2018 - 2:53 pm | बिटाकाका

वरच्या लेवल वाले खरेच अशे उच्च विचार राखून आहेत का हा संशोधनाचा भाग आहे.

हा संशय येतो याच्यातच बऱ्याच गोष्टी सामावलेल्या असतात.
**********************************
हरदासाची कथा मूळ पदावर असे नको व्हायला. एका विशिष्ट धर्माला सरसकट झोडपाण्यापासून चर्चेची सुरुवात झाली होती याची आठवण करून देतो.

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2018 - 5:42 pm | श्रीगुरुजी

१२:१४ pm ला आलेल्या या प्रतिसादात अजूनपर्यंत कोणाला काहीही वावगे वाटलेले नाही. परंतु ३:०० pm ला दिलेल्या माझ्या प्रतिसादाविरोधात लगेच सूर उमटले.

सिलेक्टिव्ह साधनशुचिता?????

पैसा's picture

9 Apr 2018 - 5:57 pm | पैसा

असल्या विदंबनासाठी बोका ए आझम ban झाला होता. तुम्ही पण मागणी करा. हाकाना का. नाई ऐकले तर प्रत्येक ठिकाणी ट्रॉल अलर्ट लिहीत चला.

सुबोध खरे's picture

9 Apr 2018 - 12:34 pm | सुबोध खरे

यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत,
ती कशाने तरी ठेचावित,
कुणालातरी द्यावित,
(म्हणजे)
काहीतरी नक्की होईल.

अवांतर बद्दल क्षमस्व. *उत्तरदायित्वास नकार लागू.

घटं भिंद्यात पटं छिन्द्यात, कुर्यात रासभ रोहणं|
येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो S भवेत|

विशुमित's picture

9 Apr 2018 - 12:52 pm | विशुमित

कृपया श्लोकाचा अर्थ सोप्या शब्दात मराठीत सांगता का ?

पैसा's picture

9 Apr 2018 - 12:59 pm | पैसा

मला वाटले शाळेत ८ वी का ९ वी ला संस्कृतच्या पुस्तकात होता तेव्हा बहुतेकांना माहीत असेल. पण असो, सांगते.

(जवळची) मडकी फोडा, कपडे फाडा, गाढवावर स्वार व्हा. या त्या कोणत्याही प्रकारे प्रसिद्ध माणूस व्हावे हे महत्त्वाचे.

या धाग्यावर तुमचे प्रतिसाद आवडले आहेत हे इथेच सांगते.

मी ८-९ वी मध्ये संस्कृत विषय घेतला नव्हता.

पैसा's picture

9 Apr 2018 - 6:10 pm | पैसा

स्कोअरिंग म्हणून घ्यायला कोणी सुचवले नाही का! संस्कृत अगदी सोपी भाषा आहे. बरेच शब्द कानावरून गेलेले असतात.

विशुमित's picture

9 Apr 2018 - 6:17 pm | विशुमित

कोटा थोडा होता आणि शिक्षकांच्या पोरांनी त्यावर डल्ला मारला होता. त्यात हिंदीचे शिक्षक माझे फेव्हरेट होते.
हिंदी-संस्कृत वाल्यांपेक्षा पुयुअर हिंदी मध्ये मला जास्त मार्क्स होते. असो..

या मूर्खांनी प्लॅकार्ड्स पण शास्त्रीय भाषेत लिहिले नाहीत.
सगळेच नाशिककर नास्तिक आहेत असं काहीतर सूचित होत आहे.

दीपक११७७'s picture

9 Apr 2018 - 2:18 pm | दीपक११७७

पण ते तर नास्तिक आहेत, म्हणजेच सत्याचा शोध केवळ त्यांनाच लागलेला आहे, मग ते मुर्ख कसे असतील?

ह्यांच्यापैकी कोणाला काही घंटा शोध लागलेला नाही.
===========================
सत्याचं दर्शन असोच, "कोणतंही एक" सत्य विधान कोणाही नास्तिकाला लिहिता, बोलता येत नाही. बाकी जगत्कारण लैच पुढची गोष्ट आहे.

पुंबा's picture

9 Apr 2018 - 2:47 pm | पुंबा

नास्तिकांनी आपल्या विचारप्रक्रियेला अधिकाधिक निर्दोष बनवण्यासाठी, विचारमंथन करून विधायक काम उभे करण्यासाठी एकत्र येण्याला समर्थन व शुभेच्छा. मात्र, या चळवळीचा पंथ होऊ देऊ नये व नास्तिकांची निराळी कर्मकांडे तयार होऊ देऊ नयेत यासाठी डोळ्यात तेल घालून दक्ष रहावे असे सुचवावेसे वाटते.

अज्ञेयांनीदेखिल अश्या चळवळी सुरू कराव्यात. मी आणि माझे ३-४ मित्र यासंदर्भात चर्चा करत असतो, मात्र अज्ञेयवादी विचारांना वाहिलेले बृहद व्यासपिठ असेल तर सहभागी व्हायला आवडेल.

बाकी, प्लेटो, सॉक्रेटिस, अ‍ॅरिस्टोटल तिघेही नास्तिक नव्हते. आस्तिकच होते. विवेकवादी मात्र निश्चित होते असे म्हणावे लागते.

पैकी प्लुटो गांजा ढोसणारा विवेकवादी असावा.

पुंबा's picture

9 Apr 2018 - 6:01 pm | पुंबा

प्लुटो कोण?
गांजा कसा ढोसतात?
कुणीतरी प्लुटो गंजाडा होता किंवा कसे याचा इथे काय संबंध?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Apr 2018 - 4:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>नास्तिकांनी आपल्या विचारप्रक्रियेला अधिकाधिक निर्दोष बनवण्यासाठी, विचारमंथन करून विधायक काम उभे करण्यासाठी एकत्र येण्याला समर्थन व शुभेच्छा. मात्र, या चळवळीचा पंथ होऊ देऊ नये व नास्तिकांची निराळी कर्मकांडे तयार होऊ देऊ नयेत यासाठी डोळ्यात तेल घालून दक्ष रहावे असे सुचवावेसे वाटते.

मूळ विषयावर प्रतिसाद असल्याने प्रतिसादातील विचार नोंद घेण्यासारखा आहे, धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

10 Apr 2018 - 11:49 am | प्रकाश घाटपांडे

नास्तिकांनी आपल्या विचारप्रक्रियेला अधिकाधिक निर्दोष बनवण्यासाठी, विचारमंथन करून विधायक काम उभे करण्यासाठी एकत्र येण्याला समर्थन व शुभेच्छा. मात्र, या चळवळीचा पंथ होऊ देऊ नये व नास्तिकांची निराळी कर्मकांडे तयार होऊ देऊ नयेत यासाठी डोळ्यात तेल घालून दक्ष रहावे असे सुचवावेसे वाटते.

कर्मकांडाची सुरवात ही सुव्यवस्थेसाठी निर्माण झालेले प्रोटोकॉल अशी होते.नंतर त्यातील समयोचितता नाहीशी झाली तरी गतानुगतिकता म्हणून चालू राहून त्याचे कर्मकांड होते. अस्तिक व नास्तिक यात एक मोठा स्पेक्ट्रम आहे. सर्व नास्तिकांना ही एका वर्गात टाकता येणार नाही व अस्तिकांनाही. नास्तिकांनाही प्रतिक लागतात. लोगो,फोटो,घोषवाक्ये यातून ते व्यक्त होताना दिसतात.अमूर्त गोष्टीला मूर्त करण्यासाठी काही प्रतिके लागतात. हम होंगे कामयाब हे पुरोगामी कार्यक्रमात म्हटले जाणारे स्फ्रूतीगान हे भाबडा का होईना आशावाद व्यक्त करतो.
या किंवा अशा संपुर्ण धाग्यात मानवी मन या गोष्टीचा वैज्ञानिक दृष्टीने केलेला विचार हा मुद्दा आलेला नाही. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला काही गोष्टींचे नव्याने आकलन होत असते. ही अनएंडिंग प्रोसेस आहे.

arunjoshi123's picture

9 Apr 2018 - 6:16 pm | arunjoshi123

नास्तिकतेच्या सर्वसाधारणपणे दोन पायर्‍या, अवस्था, विधा आहेत.
१. तांत्रिक नास्तिकता: म्हणजे ईश्वर नसण्याच्या भौतिक सत्याचे ज्ञान असणे. ईश्वर नसल्याचे ज्ञान कोणास असेल तर तो ईश्वरप्रणित, धर्मसंस्थाप्रणित जितकी काही अमंगल, अर्थहिन, अन्यायी आहे त्याच्यापासून दूर असेल. नास्तिकांनी कोणत्याही बाबीच्या अनस्तित्वाच्या सिद्धतेची पद्धती शोधली पाहिजे वा पुढे आणली पाहिजे आणि आपला अनुयायीवर्ग वाढवला पाहिजे. परिपक्व अज्ञेय लोकांना चर्चांचा जज/ मेडिएटर बनवून त्यांनी अस्तिकांच्या सर्व प्रकारच्या तांत्रिक अस्तित्वाच्या मुद्द्यांचे खंडन केले पाहिजे. याशिवाय ईश्वराच्या अस्तित्वाच्या मुद्द्याचे खंडन म्हणजे केवळ रामाचे, अल्लाचे, गणपतीचे, इ चे खंडन नसते. ईश्वराच्या सर्व प्रकारच्या कल्पना ज्या विविध मानवसमूहांत आहेत त्या सर्वांचे खंडन केले पाहिजे.
२. सामाजिक नास्तिकता: आपल्या सर्व मानवी संस्कृतींत काही मानवी मूल्यांचा विकास झाला आहे. या मूल्यांस ईश्वरप्रणित वा धार्मिक आधार सोडला तर अन्य कोणताही आधार नाही. उदा. कोणी पत्नीशी एकनिष्ठ राहायची (वा तिने राहायची) अजिबात गरज नाही. एखाद्याने सत्यच बोलावे असे काही नाही. पचेल तितके फायद्याचे खोटेच बोलावे असे देखील तत्त्व पाळता येते. ही सर्व अनावश्यक अनाधार मूल्ये पाळण्याचे एक तर्कहिन कारण म्हणून आस्तिक लोक ईश्वरास पुढे करतात. विश्वाची रचना, मनुष्याची रचना, मनुष्याची अंतःप्रेरणा या सर्वाचे दाखले देत लोकांना सांस्कृतिक मूल्ये पाळायला लावतात. नास्तिकांना अर्थातच आरंभापासूनच विश्व नास्तिक असते तर आपली मूल्ये काय राहीली असती आणि का हे सांगीतले पाहिजे. समाजात, अध्यात्म, धर्म, अर्थ, कुटूंब, देश, व्यवसाय, कला, देहसेवा, इ इ अनेक प्रकारचे मूल्यस्तर आहेत. यातला कोणताही एक स्तर काढला तर समस्या येईल. उदा. अर्थ स्तर काढला तर व्यवहार कसे करावेत हे कळणार नाही. त्याच प्रमाणे धर्म हा स्तर काढला तर माणसाची व्यक्तिगत, अन्यव्यक्तिगत आणि सामाजिक मूल्ये काय असावीत हा प्रश्न उभा राहतो. तसा ईश्वराचा आणि मूल्यांचा अजिबात संबंध नसेल, पण तसं मानलं जातं. सध्यातरी मानलं जातं. मग धर्म नावाची गोष्ट नसताना लोकांनी कोणती मूल्ये बाळगली पाहिजेत आणि याचा आधार काय हे नास्तिकांनी सप्रमाण लिहून ठेवले पाहिजे. एक सर्वस्पर्शी फ्रेमवर्क बनवून ठेवले पाहिजे. आजघडीला तरी भारतीय घटना मला खरे बोल कि खोटे हे सांगत नाही. १२ वर्षे विज्ञान शिकलो असलो तरी कुठे चांगल्या वागण्याचा वा खरे बोलण्याचा नियम आढळला नाही. मी अस्तिक असलो, धार्मिक असलो आणि ईश्वरवादी असलो तरी धर्माच्या मूल्यांचे जोखड मला असह्य वाटते नि ते मी बरेचदा तोडत असतो. आणि मला पूर्ण खात्री आहे कि ज्यावेळी मला देव, धर्म आणि मूल्ये फुकाचीच आहेत असा अविष्कार होईल तेव्हा मी बेबंदपणे पण सुरक्षितपणे स्वार्थ साधत राहीन. तेच मला एक साधार नास्तिकी फ्रेमवर्क मिळालं तर आज जसा आर्बिट्ररी देव मानतो तसं ते फ्रेमवर्क मानेल.
----------------------------
आजची विधीपालिका आणि न्यायपालिका हेच सामाजिक फ्रेमवर्क ठरवताना धर्माचा आधार घेत नाहीत. हा एक नास्तिकी प्रयोगच आहे. या प्रयोगात विविध भूमिका मांडणारांच्या भूमिका या "न्यायसंगत" म्हणून मांडल्या जाताना दिसतच नाही. सर्वत्र स्वार्थगटांचा कोलाहल दिसतो.
परवा विवाहांतर्गत बलात्कारांवर एक चर्चा ऐकत होतो. एक गट म्हणत होता हा गुन्हा आहे इतकं तरी मान्य करा. दुसरा कि समजा मान्य केलं तरी सिद्ध कसं करणार? तिसरा - सिद्ध कसं करायचं ते असो, पण अगोदर त्याला गुन्हा तरी म्हणा. चौथा - याचा दुरुपयोग केला तर? कसं ओळखणार कि संमती होती कि जबरदस्ती? पाचवा - दुरुपयोग होणार म्हणून काय अन्याय निवारणाचे कायदेच करायचे नाहीत? सहावा - पण याने स्त्रीयांना ब्लॅकमेलींगची पावर मिळेल जी ती पिळवणू़कीसाठी वापरतील. सातवा - या कायद्याने पुरुषांवर अन्याय व्हायला चालू होणार. एकजण - कायदा तुमच्या बेडरूममधे कुठपर्यंत घुसणार?
ही मंडळी विवेकवादावर आधारित योग्यायोग्यातेचा पुनराविष्कार करत आहेत. हे थोडं कठीण आहे. नास्तिकांनी अशा सर्व समस्यांत एक सर्वांस समाधान देईल अशी भूमिका घ्यायला हवी. ती लोकांस आवडू लागेल, तसतसा नास्तिकवादाचा अनुयय वाढेल.

इष्टुर फाकडा's picture

9 Apr 2018 - 8:04 pm | इष्टुर फाकडा

नास्तिक चळवळ- काही हरकत नाही. समविचारी लोकांनी एकत्र जमून आपल्या विचारांना समर्थन मिळवण्यात काही गैर नाही. फक्त ती 'काळाची गरज' वगैरे मला शहाजोगपणा वाटतो. जिथे कमी तिथे आम्ही हा अप्रोच ठेवून काम केलं कि भविष्यात मागे बघताना कळेल ती गरज होती कि नाही ते. बाकी 'चळवळ' हि कशाच्यातरी विरोधात होते हे गृहीत धरलं कि उद्देश नेमका काय आहे यावर प्रश्न येऊ शकतात. अंतिम उद्देश लोककल्याण हा असेल तर त्यांनाच विरोध करून काय साध्य होणार? संवाद साधण्याआधीच मी बरोबर आहे आणि तुला शहाणा करून सोडायला आलोय असा आवेश असेल तर वाद होईल, मनोरंजन होईल. बाकी शून्य.

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2018 - 8:42 pm | श्रीगुरुजी

मला एक समजलं नाही. फार पूर्वीच आस्तिकांचा पराभव झालेला असून नास्तिकांचा विजय झालेला आहे. असे असताना नास्तिकांची आस्तिकांविरूद्ध चळवळ करण्याची काय गरज आहे आणि निर्विवाद विजय झालेला असून सुद्धा वारंवार नास्तिकतेचा प्रचार का करावा लागतो?

बांधव म्हणजे ज्यांच्याशी आपला अनुबंध असतो ते. या देशांतील सर्वांची जात भारतीय आहे असे मी मानतो. त्यामुळे सर्व भारतीय, आबालवृद्ध स्त्री-पुरुष, तृतीयपंथी माझे ज्ञातिबांधव आहेत. शालेय पुस्तकातील शपथेत असेच अभिप्रेत आहे. सर्व सज्ञान व्यक्तींना हे ठाऊक असावे अशी अपेक्षा होती. बांधव म्हणजे केवळ भाऊ समजणे हे अज्ञानदर्शक आहे.

बांधव म्हणजे केवळ भाऊ समजणे हे अज्ञानदर्शक आहे.

याच न्यायानं ईश्वर म्हणजे केवळ मेंदू कीडवणारा हे देखील फार ज्ञानदर्शक नाही.

पगला गजोधर's picture

9 Apr 2018 - 10:42 pm | पगला गजोधर

याच न्यायानं ईश्वर म्हणजे केवळ मेंदू कीडवणारा हे देखील फार ज्ञानदर्शक नाही.

सहमत,
ईश्वर नावाचा चित्रपट ही आहे ( अनिल कपूरचा बहुतेक)

खूप छान चित्रपट आहे तो.

पगला गजोधर's picture

9 Apr 2018 - 11:57 pm | पगला गजोधर

अतः ईश्वरम इति मनुष्यस्य मनोरंजनार्थ साधनम खलु:

तुम्ही नास्तिकंय ना? तुमचे विचार लै कोते असणार.
ईश्वराला मनुष्याचे मनोरंजनच करायलाच काय मनुष्याच्या बृहदांत्रातील एक हायड्रोजन सल्फाइड बनवणारा बॅक्टेरिया म्हणून देखील वास करायला (मंजे राहायला) तितक्याच निष्ठेने आवडत असते. प्रतिष्ठेचे रोल घ्यायची उंदीरस्पर्धा त्याच्याकडे नसते.

यनावालाजी
म्हणजे तुम्ही जे प्रतिज्ञे त आहे म्हणून हा माझा अधिकार आहे वगैरे म्हणतात त्याला काही हरकत नाहीये
पण प्रतिज्ञा उद्या कोणा दुसर्‍या सरकारने एडिट केली , मूळात राष्ट्रवाद एक भंपक म्हणजे अमुक अमुक इतका भौगोलिक भाग, त्याला मी माझी श्रद्धा वाहतो,
मग त्यामागुन परंपरांचा मी पाईक राहील हे सर्व शाळकरी चाइल्डीश च नाही का ?
म्हणजे मी स्वतः प्रत्येक परंपरेचे क्रिटीकल इन्वेस्टीगेशन करेल विश्लेषण करेल कट एडिट करुन जे काय शेवटी उरेल ते स्वीकारेल हे अधिक वैज्ञानिक मार्गाने सत्यान्वेषी मार्गाने जाणे आहे यात अल्टीमेट ह्युमन फ्रिडम चा मुद्दा आहे भारत वा टिम्बकटु वा घाना देशाच्या कुठल्या सरकारच्या कोणीतरी लिहुन दिलेल्या प्रतिज्ञे प्रमाणे मी चालेल , कुठल्या तरी परंपरांचा ब्लाइंड फॉलोअर बनेल पाईक वगैरे होण्याचा प्रयत्न करेल यात काही अर्थ दिसत नाही.
म्हणजे मुळ परंपरा किंवा एखादा विचार किते श्रेष्ठ कनिष्ठ आहे त्याची या वरील सर्व बाबींशी काहीही संबंध नाही की तो कोण्या गर्व्हमेंट ने स्वीकारलेला आहे.
उदा. सौदी अरेबिया च्या सरकारने काही स्त्री संदर्भात परंपरा पाळलेल्या आहेत व एखादा सौदी माणुस असे समर्थने करेल ब्लाइंड तर ते जसे चुकीचे ठरेल तसे
मुळात राष्ट्रवादही तुम्ही विदाउट क्रिटीकल इन्वेस्टीगेशन केल्याशिवाय स्वीकारणे ....
असो

श्रीगुरुजी's picture

10 Apr 2018 - 8:38 am | श्रीगुरुजी

शाळेतील प्रतिज्ञेतील २-३ वाक्यात आपल्याला सोयिस्कर असे काहीतरी लिहिले आहे म्हणून मी नास्तिकतावादाचा प्रचार करतो ही अत्यंत बालिश भूमिका आहे. त्या प्रतिज्ञेत इतर अनेक गोष्टी आहेत. त्याकडे मात्र सोयिस्कर दुर्लक्ष केले आहे. कोणत्यातरी वृत्तपत्रात काहीतरी छापून आल्यावर, वृत्तपत्रात छापले गेले म्हणजे ते खरेच असले पाहिजे अशी बाळबोध भूमिका घेणे, शालेय जीवनातील प्रतिज्ञेचा संपूर्ण अर्थ समजून न घेता स्वतःला सोयिस्कर अशी १-२ वाक्ये उचलणे, जीवनात ९९.९९% प्रसंगात स्वतः अंधश्रद्ध असताना इतरांच्या श्रद्धेवर कोरडे ओढणे असल्या दांभिक भूमिकेमुळेच या तथाकथित नास्तिक/बुद्धीप्रामाण्यवादी/विज्ञानवादी मंडळींचे ढोंग कायमच उघडे पडत गेले आहे.

मार्मिक गोडसे's picture

9 Apr 2018 - 11:29 pm | मार्मिक गोडसे

तेलगू सिनेमा स्वाती मुथ्यमचा रिमेक होता तो. कमल हसनच्या अभिनयासाठी तरी तो सिनेमा पहाच. आवडेल तुम्हाला.

माझ्याकडे नास्तिक चळवळ वाढवण्याचे उपाय काही तगडे उपाय आहेत , इकडे टंकावे का ??

अंतरा आनंद's picture

10 Apr 2018 - 8:18 am | अंतरा आनंद

धर्माच्या अतिरेकी बाजारावर नास्तिकतेचा तो़डगा, या अर्थाने नास्तिकता ही काळाची गरज आहेच.
एकेकाळी मी भाविक होते. आता माझ्या विचारांचा प्रवास विचारी भाविकतेकडून नास्तिकतेकडे चाललेला आहे. या प्रवासातलं एक वळण म्हणून कुतूहलापोटी मी मुंबईतल्या नास्तिक परिषदेला गेले. प्रमुख वक्ते होते, अजित अभ्यकंर आणि राजीव साने.
नास्तिकता ही स्वत:च्या कृत्याला स्वत: जबाबदार रहायला शिकवते. जगातला ’कोणताही’ धर्म संपूर्ण मानवजातीचा विचार न करता ठराविक म्हणजे धर्माच्या आज्ञा पाळणार्‍या (एकेश्वरवादी धर्मांनुसार) वा कर्मफलाने ईश्वरच्या जवळच्याचा विचार करतो, हे अजित अभ्यकंर यांच्या मांडणीचं सूत्र होतं. जैन आणि बुद्ध धर्म हे नास्तिकतावादी धर्म आहेत असं म्हटलं जातं. पण कर्मसिद्धांत हा या दोन्ही धर्मात मानला जात असल्याने ते धर्मही खर्‍या अर्थाने नास्तिकतेचा पुरस्कार करणारे आहेत अस म्हणता येणार नाहीत. धर्म ही अफूची गोळी आहे म्हणजे धर्म हे पेनकिलर आहेत. त्यामुळे धर्माचरणाने प्रश्न बोथट करण्यापेक्षा प्रश्नांना उत्तरं शोधण्याची गरज आहे आणि राहिल.
राजीव साने यांनी नेहमीच्या पद्धतीने, चटकदार वाक्य, उदाहरणं यांची सरमिसळ करत काही मुद्दे मांडले. विषय होता, धार्मिकतेतून इहवादाकडे. यामध्ये त्यांनी भाविक आणि धर्मसत्ता यांच्या मध्ये फरक करणं आवश्यक असल्याचं सांगीतलं. भाविक हा धर्मसत्तेला बळकट करत असतो. त्याच्या मानसिक, सामाजिक गरजा राहतीलच तसे धर्म राहतील . मग मुख्य आवश्यकता आहे ती त्यांचं धर्मावरचं मानसिक अवलंबित्व कमी करण्याची. त्यासाठी मानसोपचार हा एक घटक आहे, त्यावर ते बोलले. एक त्यांनी मांडलेला मुद्द्दा, जो मला अतिशय आवडला तो म्हणजे मिथकांचं मिथ्यापण दाखवताना मिथकांना थेट नाकारण्यापेक्षा त्यांची मूल्यचिकित्सा करण्याचा.
"निरपेक्ष आनंद, वासनारहित सौदर्य, सुकून(ब्लिस), धन्यवाद देण्याची गरज, सन्मार्गच घेतला याचा धन्यभाव, आश्चर्य-कौतुक, शुचिता-पावित्र्य, आदर-जोडलेपणा, साक्षीभाव मोकळेपणा, रितेपण नव्हे तर भरलेपण, म्यूच्युअलटीतून येणारी इंटिमसी, आत्ताच्या वास्तवाचा काच सोडून येणारी क्रियेटिव्हिटी याही गोष्टी हव्या आहेत. नैतिकता ही फक्त कर्तव्यांपर्यंत पोहोचते. पण कर्तव्यातीत सद्गुण म्हणजेच औदार्य, करुणा, मुदिता, क्षमा, अनसूया हे जोपासायला मनोवस्था आत्मीयतेची लागते. ती ठरवून आणता येत नसली तरी तिला येऊ देणे ‘लेट’ याकरता स्वागतशील असावे लागते. मानसोपचार हा फक्त विकारग्रस्तता घालवण्यापुरता पुरेसा नसून आंतरिक उन्नतीसाठी पुढे नेला पाहिजे.", हा त्यांचा मला आवडलेला अजून एक विचार.
मिपावरील प्रा. य. ना वालावलकर यांना या परिषदेत चार्वाक २०१८ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकवताना विद्यार्थ्यांच्या मनातले अनेक गैरसमज कळायला लागले त्यातून विवेकवादी विचार मांडण्याकडे ते वळले अ़सं त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सांगीतलं. यातूनच आपलं लिखाण सुरू झालं असलं तरी आपण म्हणावं असं काहिही कार्य केलं नसताना हा पुरस्कार बहुदा आपल्या वयाच्या जेष्ठत्वाकडे पाहून दिला असावा असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं. इथे कितीही राळ उडवली गेली तरी संयमाने आणि जिद्दीने ते आपले विचार मांडत राहतात. तिथेही त्यांचा नम्रपणा उठून दिसत होता. येत्या काळात जगातील नास्तिकांची संख्या वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दाभोळकरांच्या हत्त्येनंतर विचारांनी नास्तिक असलेल्यांना एकत्र येण्याची गरज भासू लागली. त्यातून हे मेळावे सुरू झाले. त्यामागे नास्तिक हा पंथ निर्माण करावा असा काहिही उद्देश नाही, असं या परिषदेच्या सदस्यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केलं होतंच. खरंतर नास्तिक हे एकांडे शिलेदार असतात. ते बरेचदा ज्या सडेतोडपणे विचार मांडतात त्यामुळे ते उद्धट वाटतात. म्हणून आपल्या विचारांना साथ मिळावी त्यातून विचार अधिक सुस्पष्ट होत जावेत असे उद्देश असे मेळावे/ परिषदा घेण्यामागे असतात. राजीव साने यांनी "धार्मिक बाबतीत मूल्यचिकित्सा आणि त्यातून इहवादाकडे वळवण्यासाठी नास्तिकांनी प्रयत्न करण्याची गरज" अधोरेखीत केली होती त्याबाबतही, अश्या तर्‍हेने कोणाची मतं बदलण्यासाठी प्रयत्न करणं हे माझ्या पद्धतीत बसत नसल्याचंही सहस्त्रबुद्धे या अजून एका संस्थापक सदस्यांनी आभारप्रदर्शनात सांगीतलं.
भारतीय तत्वज्ञान आणि नऊ दर्शनं यांनी नास्तिकता आणि निरीश्वरवादाचा पुरस्कार केला आहे. त्यामुळे आस्तिकता नको म्हणताना ही दर्शने आणि तत्वज्ञान हे स्वाकारार्ह असल्याचही दोन्ही वक्त्यांनी सांगीतलं.
धार्मिक जसे कंठशोष करून, कर्णे लावून आपापल्या दैवतांचे गुण ऐकायची, किंवा प्रार्थनेला चलण्याची (अजान) सक्ती करतात त्याप्रमाणे इथले कोणीही नास्तिकता लोकांच्या गळी उतरवण्यासाठी आसुसलेले नव्हते. अतिभाविकता तुमच्या अडचणी गालिच्याखाली सारत उत्तमतेचा आभास निर्माण करते, या गोष्टीला बहुसंख्य नास्तिकांचा विरोध असतो. भावनेवर आधारीत राजकारण करणारे, किंवा धार्मिकतेच्या बाजाराचा फायदा घेणारे यांचा भर धार्मिकता ही अतिभाविकतेकडे घेऊन जाण्यावर असतो.
नास्तिकता ही कोणत्याच धर्माच्या विरोधात नाही. खरं तर नास्तिकांतले अर्धेजण तरी आपापल्या धर्माच्या अवडंबराला, (कोणताही) धर्म रस्त्यावर आणल्याने होत असलेल्या सक्तीच्या गैरसोईला कंटाळलेले असतात. तेव्हा ह्या गोष्टी कमी झाल्या तर नास्तिक आपले नास्तैक्य आपल्या मनात बाळगतील. कारण मुळातच जगा आणि जगू द्या हे त्यांचं तत्व असतं. म्हणून नास्तिकांवर झोड उठवण्यापेक्षा आस्तिकांनी आपापल्या धर्मातील अवडंबरं, धार्मिक विधी (किमान त्यात सहभागी नसणार्‍यांना तरी) कमीत कमी त्रास देणारे कसे होतील याकडे लक्ष देऊन त्याबाबतीत प्रबोधन केलं आणि आपल्या हळव्या भावनांची आपणच वास्तववादी चिकित्सा केली तर अश्या मेळाव्यांची गरज उरणार नाही.

श्रीगुरुजी's picture

10 Apr 2018 - 9:03 am | श्रीगुरुजी

धर्माच्या अतिरेकी बाजारावर नास्तिकतेचा तो़डगा, या अर्थाने नास्तिकता ही काळाची गरज आहेच.

अजिबात गरज नाही. धर्माचा बाजार, धर्मात घुसडलेल्या वाईट गोष्टींचे उच्चाटन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी नास्तिकतेची अजिबात गरज नाही.

धर्म ही अफूची गोळी आहे म्हणजे धर्म हे पेनकिलर आहेत.

नास्तिकता ही तर हेरॉईनपेक्षाही जास्त अंमली आहे आणि ती पेनगिव्हर आहे.

मग मुख्य आवश्यकता आहे ती त्यांचं धर्मावरचं मानसिक अवलंबित्व कमी करण्याची. त्यासाठी मानसोपचार हा एक घटक आहे, त्यावर ते बोलले.

बापरे, म्हणजे राजीव सानेंच्या मते भाविक हे मनोरूग्ण आहेत तर. नास्तिकवाद्यांचा हाच उर्मटपणा डोक्यात जातो. मानसोपचारांची खरी गरज नास्तिकवाद्यांनाच आहे.

इथे कितीही राळ उडवली गेली तरी संयमाने आणि जिद्दीने ते आपले विचार मांडत राहतात.

हिट अ‍ॅण्ड रन असे अनेकांचे यशस्वी धोरण असते.

खरंतर नास्तिक हे एकांडे शिलेदार असतात. ते बरेचदा ज्या सडेतोडपणे विचार मांडतात त्यामुळे ते उद्धट वाटतात.

नास्तिक त्यांच्या सडेतोडपणामुळे उद्धट वाटत नसून त्यांच्या अहं ब्रह्मास्मि दंभामुळे व आस्तिकांना मूर्ख व तुच्छ लेखण्याच्या दर्पामुळे उद्धट वाटतात. खरं तर ते नुसते उद्धट वाटत नसून ते उद्धट आहेतच. नास्तिकांनी लिहिलेले कोणतेही लेख वाचा. बहुसंख्य लेखात आस्तिकांचा अंधश्रद्ध, मूर्ख, मेंदूला गंज चढलेले अशा शब्दात उपहास केलेला असतो. असा उपहास करणारे आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातील ९९.९९% प्रसंगात अंधश्रद्ध असतात व त्याची त्यांना जराही खंत वाटत नाही.

धार्मिक जसे कंठशोष करून, कर्णे लावून आपापल्या दैवतांचे गुण ऐकायची, किंवा प्रार्थनेला चलण्याची (अजान) सक्ती करतात त्याप्रमाणे इथले कोणीही नास्तिकता लोकांच्या गळी उतरवण्यासाठी आसुसलेले नव्हते.

कमाल आहे. साधं मिपाचं उदाहरण घेतलं तर आस्तिकता/नास्तिकता या विषयावर किती आस्तिकांनी व किती नास्तिकांनी लेख पाडलेत याचा जरा शोध घ्या. नास्तिकतावादी सातत्याने लेख पाडत असतात. गणेश विसर्जनाच्या दिवशी अंनिसचे फलक लावून नदीकाठावर गर्दी करणारे आस्तिक असतात का? जसे आस्तिक कर्णे वगैरे लावतात तसेच नास्तिकही वेगळ्या पद्धतीने आपले विचार इतरांच्या गळी उतरविण्यासाठी आसुसलेले असतात.

अतिभाविकता तुमच्या अडचणी गालिच्याखाली सारत उत्तमतेचा आभास निर्माण करते, या गोष्टीला बहुसंख्य नास्तिकांचा विरोध असतो. भावनेवर आधारीत राजकारण करणारे, किंवा धार्मिकतेच्या बाजाराचा फायदा घेणारे यांचा भर धार्मिकता ही अतिभाविकतेकडे घेऊन जाण्यावर असतो.

तुमच्या सर्व अडचणींसाठी आस्तिकताच कारणीभूत आहे व त्यावर नास्तिकता हाच एकमेव उपाय आहे असा आभास अतिनास्तिकता निर्माण करते.

नास्तिकता ही कोणत्याच धर्माच्या विरोधात नाही.

LLRC

खरं तर नास्तिकांतले अर्धेजण तरी आपापल्या धर्माच्या अवडंबराला, (कोणताही) धर्म रस्त्यावर आणल्याने होत असलेल्या सक्तीच्या गैरसोईला कंटाळलेले असतात. तेव्हा ह्या गोष्टी कमी झाल्या तर नास्तिक आपले नास्तैक्य आपल्या मनात बाळगतील.

रस्त्यावर धर्म आणण्यावर बंदी आणण्यासाठी धर्मावरच बंदी आणणे म्हणजे डोक्यात उवा झाल्यावर मुंडके उडविण्यासारखे आहे.

कारण मुळातच जगा आणि जगू द्या हे त्यांचं तत्व असतं.

तसं असेल तर तुम्ही तुमची नास्तिकता पाळा आणि आस्तिकांना त्यांची आस्तिकता पाळू दे. सातत्याने लेख पाडून नास्तिकतेचा प्रचार आणि आस्तिकतेवर आघात कशासाठी?

म्हणून नास्तिकांवर झोड उठवण्यापेक्षा आस्तिकांनी आपापल्या धर्मातील अवडंबरं, धार्मिक विधी (किमान त्यात सहभागी नसणार्‍यांना तरी) कमीत कमी त्रास देणारे कसे होतील याकडे लक्ष देऊन त्याबाबतीत प्रबोधन केलं आणि आपल्या हळव्या भावनांची आपणच वास्तववादी चिकित्सा केली तर अश्या मेळाव्यांची गरज उरणार नाही.

आस्तिकांवर झोड उठविण्याऐवजी नास्तिकांनी स्वयंचिकित्सा करून आपला अहंभाव, दांभिकता व वैचारिक ढोंग बंद केले तर नास्तिकांना उत्तर देण्याची आस्तिकांना गरजच पडणार नाही.

अभ्या..'s picture

10 Apr 2018 - 10:01 am | अभ्या..

वाहह गुरुजी
आवडला मुद्देसूद प्रतिसाद.
नास्तिकता हा शुद्ध कांगावा वाटावा इतका केविलवाणा झालाय. त्याने नास्तिकांचा त्रागा अधिक वाढलाय.

बिटाकाका's picture

10 Apr 2018 - 10:54 am | बिटाकाका

आवडला गेलेला आहे प्रतिसाद!

विशुमित's picture

10 Apr 2018 - 12:23 pm | विशुमित

<<<अजिबात गरज नाही. धर्माचा बाजार, धर्मात घुसडलेल्या वाईट गोष्टींचे उच्चाटन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी नास्तिकतेची अजिबात गरज नाही.>>>
==>> हे उच्चाटन कसे करणार? बघा आमच्याकडे लग्न झाल्यावर सोळाव्याची पूजा झाल्यानंतर जागरण गोंधळ करावे लगते. काहींचे गॉड असते काहींचे तिखट. आता आमचे कुटुंब जवळपास माळकरी पण आमच्या परंपपरेनुसार जागरण तिखट लागते. मानतेनुसार गॉड केले तर कुलदेवतेला रुजू होत नाही. गुरुजींनी (काका) सांगितले की काही नाही कणकेचा बोकड मंत्रउपचार करून बळी दिला तर चालू शकतो. पण देव आहे (सगुण-निर्गुण म्हणा) या संकल्पनेमुळे मन (आणि सगे सोयरे) मानायला तयार नसते ना. अशा वेळेस काय करावे?
=======
<<< नास्तिकता ही तर हेरॉईनपेक्षाही जास्त अंमली आहे आणि ती पेनगिव्हर आहे.>>>
==>> पेनगिव्हर पेक्षा भीतीदायक आहे असे वाटते.
=========
<<<भाविक हे मनोरूग्ण आहेत तर. नास्तिकवाद्यांचा हाच उर्मटपणा डोक्यात जातो. मानसोपचारांची खरी गरज नास्तिकवाद्यांनाच आहे.>>>
==>> भाविक मनोरुग्ण नसले तरी नास्तिकांपेक्षा पोससेसिव्ह असतात. तुम्ही माझ्या मते शहरात राहता म्हणून सहसा कोणी आस्तिक दुसर्यांना उपदेश करायला जात नाही पण गावाकडे माळकरी झालेले बिगरमाळकरीला इतके उपदेश देत असतात की तो पकुण जातो. माळकरी लोकांना विशेष सन्मान/आदर/विश्वास असतो, भले ते अस्सल जीवनात कसे ही वागोत.
कोणी कीर्तनकार जेव्हा बिगर माळकरी सगळे बावळट अशी अवहेलना करतो तेव्हा ते सुद्धा खूप डोक्यात जातात. बाकी सासू सुनेच्या कथा एकदमच मणघडत आणि सुरस असतात. आता यात कीर्तनकारांचा दोष असे जरी म्हंटले तरी वरून खाली त्यांच्या पर्यंत तेच झिरपले असते. लोक कीर्तनकारांना धर्माचे एक पाईक आणि प्रचारक म्हणून विश्वास ठेवत असतात. इतर बाबा बुवा आचार्य, काका गुरुजी हे देखील कमी अधिक प्रमाणात हेच सांगत असतात. याला कंट्रोल कोण करणार?
========
<<<नास्तिक त्यांच्या सडेतोडपणामुळे उद्धट वाटत नसून त्यांच्या अहं ब्रह्मास्मि दंभामुळे व आस्तिकांना मूर्ख व तुच्छ लेखण्याच्या दर्पामुळे उद्धट वाटतात. खरं तर ते नुसते उद्धट वाटत नसून ते उद्धट आहेतच. नास्तिकांनी लिहिलेले कोणतेही लेख वाचा. बहुसंख्य लेखात आस्तिकांचा अंधश्रद्ध, मूर्ख, मेंदूला गंज चढलेले अशा शब्दात उपहास केलेला असतो. असा उपहास करणारे आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातील ९९.९९% प्रसंगात अंधश्रद्ध असतात व त्याची त्यांना जराही खंत वाटत नाही.>>>
==>> माझ्या पाहण्यात ही सर्व लक्षणे आस्तिक लोकांत जास्त प्रमाणात आढळतात.
=======
<<<तुमच्या सर्व अडचणींसाठी आस्तिकताच कारणीभूत आहे व त्यावर नास्तिकता हाच एकमेव उपाय आहे असा आभास अतिनास्तिकता निर्माण करते.>>
==>> माझ्या मते "तुमच्या सर्व अडचणींसाठी नास्तिकताच कारणीभूत आहे व त्यावर आस्तिकता हाच एकमेव उपाय आहे असा आभास अतिआसस्तिकता निर्माण करते. घरात, देवळात, समाज्यात, प्रवचन कीर्तनात हेच ऐकायला मिळते आहे.
======
<<<रस्त्यावर धर्म आणण्यावर बंदी आणण्यासाठी धर्मावरच बंदी आणणे म्हणजे डोक्यात उवा झाल्यावर मुंडके उडविण्यासारखे आहे.>>>
==>> मी जर स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून पाहिले तरी मला फक्त एकच प्रश्न पडतो "मी कोण आहे". जाती धर्म वगैरे मग सगळे गौण वाटायला लागते. या प्रश्नाचे कोणाला उत्तर विचारायला जावे तरी जवळपास सगळेच धार्मिक ग्रंथातील दाखले देऊन थातुरमाथुर उत्तरे देताना दिसतात. मला वाटते सामन्याला परवडेल असे जिथे खरे अध्यात्म शिकवले जाईल असे अभ्यास वर्ग असले पाहिजेत मग. तुमच्या माहितीत असेल तर कृपया सुचवा. घरदार सोडायला लावू नका फक्त.
=====
<<<तसं असेल तर तुम्ही तुमची नास्तिकता पाळा आणि आस्तिकांना त्यांची आस्तिकता पाळू दे. सातत्याने लेख पाडून नास्तिकतेचा प्रचार आणि आस्तिकतेवर आघात कशासाठी?>>>
==>> अस्तिकतेचा प्रचार करण्यासाठी गावोगावी सप्ताहाचे अवडंबर माजले आहे. सनातन, हरे कृष्णा वाले लोक वेगवेगळ्या यात्रा जत्रेत त्यांचे पोस्टर/पुस्तक घेऊन उभे असतात. दत्त स्थान असणारे पौर्णिमेला वाऱ्या घालायला फरक पडतोय असा प्रचार करत असतात. नास्तिकते वाले आताशी कुठे शहरातील कुठल्या कोपऱ्यात वर्षातून एखाद दुसरा संमेलन करताना आढळतात. त्यात त्यांना पुरस्कार वगैरे देण्यासाठी तुम्हा आम्हा आस्तिक लोकांच्या मतानुसार योग्य पैलवान सुद्धा मिळत नाही. मला वाटते आस्तिक लोकांकडे वैचारिक quality आणि quantity असताना घाबरायचे काही कारण नसावे.
=====
<<<आस्तिकांवर झोड उठविण्याऐवजी नास्तिकांनी स्वयंचिकित्सा करून आपला अहंभाव, दांभिकता व वैचारिक ढोंग बंद केले तर नास्तिकांना उत्तर देण्याची आस्तिकांना गरजच पडणार नाही.>>>
==>> vice versa पण हवे होते. असो...

पगला गजोधर's picture

10 Apr 2018 - 12:38 pm | पगला गजोधर

माझ्या पाहण्यात ही सर्व लक्षणे आस्तिक लोकांत जास्त प्रमाणात आढळतात.

इथे तुमच्या म्हणण्याची किंवा विचारांची फिकीर आहे कोणाला ?
आम्ही जरी विष गरळ युक्त शब्द वापरले तरी ते तुम्ही अमृतासमान वाटून घ्यायला हवेत.
ही गल्ली आमच्या पिताश्रीनी आम्हाला लग्नात आंदण म्हणून दिल्याने, या गल्लीत आम्ही म्हणू तीच पूर्व.

तुम्हास नाही अर्थच कैसा ?
आम्ही लावू अर्थ तैसा ।।
शारीरिक वय नका विचारू ..
बाळलीला आमच्या पूज्य जैसा

---
स्त्रीमर्जी

आणि हो
आमची नवी स्वाक्षरी करतो

ट्रोल अलर्ट

श्रीगुरुजी's picture

10 Apr 2018 - 8:05 pm | श्रीगुरुजी

हे उच्चाटन कसे करणार? बघा आमच्याकडे लग्न झाल्यावर सोळाव्याची पूजा झाल्यानंतर जागरण गोंधळ करावे लगते. काहींचे गॉड असते काहींचे तिखट. आता आमचे कुटुंब जवळपास माळकरी पण आमच्या परंपपरेनुसार जागरण तिखट लागते. मानतेनुसार गॉड केले तर कुलदेवतेला रुजू होत नाही. गुरुजींनी (काका) सांगितले की काही नाही कणकेचा बोकड मंत्रउपचार करून बळी दिला तर चालू शकतो. पण देव आहे (सगुण-निर्गुण म्हणा) या संकल्पनेमुळे मन (आणि सगे सोयरे) मानायला तयार नसते ना. अशा वेळेस काय करावे?

कोणत्या तरी पिढीतून कोणी तरी सुरूवात करावी लागते. त्याशिवाय उच्चाटन होऊ शकणार नाही.

भाविक मनोरुग्ण नसले तरी नास्तिकांपेक्षा पोससेसिव्ह असतात. तुम्ही माझ्या मते शहरात राहता म्हणून सहसा कोणी आस्तिक दुसर्यांना उपदेश करायला जात नाही पण गावाकडे माळकरी झालेले बिगरमाळकरीला इतके उपदेश देत असतात की तो पकुण जातो. माळकरी लोकांना विशेष सन्मान/आदर/विश्वास असतो, भले ते अस्सल जीवनात कसे ही वागोत.
कोणी कीर्तनकार जेव्हा बिगर माळकरी सगळे बावळट अशी अवहेलना करतो तेव्हा ते सुद्धा खूप डोक्यात जातात. बाकी सासू सुनेच्या कथा एकदमच मणघडत आणि सुरस असतात. आता यात कीर्तनकारांचा दोष असे जरी म्हंटले तरी वरून खाली त्यांच्या पर्यंत तेच झिरपले असते. लोक कीर्तनकारांना धर्माचे एक पाईक आणि प्रचारक म्हणून विश्वास ठेवत असतात. इतर बाबा बुवा आचार्य, काका गुरुजी हे देखील कमी अधिक प्रमाणात हेच सांगत असतात. याला कंट्रोल कोण करणार?

गावाकडे तसेही दुसर्‍यांच्या वैयक्तिक जीवनात लक्ष घालणारे बरेच जण आढळतात. शहरात याचे प्रमाण कमी आहे. शहरात बर्‍याच ठिकाणी शेजारी काय करतात यात फारसे कोणी लक्ष घालत नाही. गावाकडे मात्र चौकशा खूप असतात. या मानसिकतेतूनच माळकर्‍यांचे उपदेश होत असावेत.

माझ्या पाहण्यात ही सर्व लक्षणे आस्तिक लोकांत जास्त प्रमाणात आढळतात.

माझ्या पाहण्यात अशी उदाहरणे नाहीत. नास्तिकांनाच आपल्या नास्तिकतेचा उदोउदो करायचा असतो. त्यामुळेच नास्तिकता परीषद, पुरस्कार, नास्तिकतेवर परीसंवाद, माध्यमातून लेख पाडणे असले प्रकार मोठ्या प्रमाणात दिसतात. अगदी मिपाचंच उदाहरण घेतलं तर इथे नास्तिकतेचा उदोउदो करणारे, श्रद्धावानांवर कोरडे ओढणारे किती लेख आहेत आणि आस्तिकता, आध्यात्मिकता इ. चा उदोउदो करणारे किती लेख आहेत याचे प्रमाण पाहिले तर याचे प्रत्यंतर येईल.

माझ्या मते "तुमच्या सर्व अडचणींसाठी नास्तिकताच कारणीभूत आहे व त्यावर आस्तिकता हाच एकमेव उपाय आहे असा आभास अतिआसस्तिकता निर्माण करते. घरात, देवळात, समाज्यात, प्रवचन कीर्तनात हेच ऐकायला मिळते आहे.

सर्व अडचणींसाठी नास्तिकताच कारणीभूत आहे व आस्तिकता हाच सर्व अडचणींवर उपाय आहे असे सांगणारे चुकीचे सांगत आहेत.

मला वाटते सामन्याला परवडेल असे जिथे खरे अध्यात्म शिकवले जाईल असे अभ्यास वर्ग असले पाहिजेत मग. तुमच्या माहितीत असेल तर कृपया सुचवा. घरदार सोडायला लावू नका फक्त.

असे वर्ग कोठे चालतात याची मला कल्पना नाही.

अस्तिकतेचा प्रचार करण्यासाठी गावोगावी सप्ताहाचे अवडंबर माजले आहे. सनातन, हरे कृष्णा वाले लोक वेगवेगळ्या यात्रा जत्रेत त्यांचे पोस्टर/पुस्तक घेऊन उभे असतात. दत्त स्थान असणारे पौर्णिमेला वाऱ्या घालायला फरक पडतोय असा प्रचार करत असतात. नास्तिकते वाले आताशी कुठे शहरातील कुठल्या कोपऱ्यात वर्षातून एखाद दुसरा संमेलन करताना आढळतात. त्यात त्यांना पुरस्कार वगैरे देण्यासाठी तुम्हा आम्हा आस्तिक लोकांच्या मतानुसार योग्य पैलवान सुद्धा मिळत नाही. मला वाटते आस्तिक लोकांकडे वैचारिक quality आणि quantity असताना घाबरायचे काही कारण नसावे.

सप्ताह, उत्सव, काकडआरती, वारी इ. गोष्टी अनेक शतकांपासून सुरू आहेत. सनातन, हरे कृष्णावाले इ. तिथे जमलेल्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी येतात. ज्याप्रमाणे जत्रेच्या ठिकाणी अनेक तात्पुरती दुकाने लागतात, तसेच हे सुद्धा तिथे आपली पुस्तके वगैरे खपविण्यासाठी येतात.

vice versa पण हवे होते. असो...

निश्चितच

शाम भागवत's picture

10 Apr 2018 - 10:44 pm | शाम भागवत

मला वाटते सामन्याला परवडेल असे जिथे खरे अध्यात्म शिकवले जाईल असे अभ्यास वर्ग असले पाहिजेत मग. तुमच्या माहितीत असेल तर कृपया सुचवा. घरदार सोडायला लावू नका फक्त.

जीवनविद्या मिशन असे क्लासेस घेते. पुस्तके पण चांगली आहेत. मी कधी क्लासला गेलो नाही. पण सगळी पुस्तके वाचून झाली. अंदाजे ३० असावीत. अध्यात्म शिकायचे म्हणजे नक्की काय करायचे याचा पाया खूप चांगला तयार होतो.

पुस्तकांना आणखीन एक पर्याय आहे. त्यांचा २६ व्हीडिओंचाही एक संच आहे. एक तासाचा एक याप्रमाणे फक्त २६ तासात जवळजवळ सर्व पुस्तकांचा सारांश आपल्याला कळून याचा अभ्यास आणखीन करायचा की नाही वगैरे निर्णय आपण घेऊ शकतो.

मात्र मी या मिशनशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसल्याने जास्त माहिती साठी प्रत्यक्ष संपर्क करणेच योग्य होईल. फक्त मी जे केले त्या अनुभवाच्या आधारावर वरील सुचवणी करत आहे.

हे ते वामनराव पै बी.ए. ( ही पदवी इतक्या कौतुकाने लावलेली फार क्वचितच पाहायला मिळते आणी ती श्री श्री या प्रीफ्रिक्स सारख बी.ए. हे सफीक्स गमतीदार आहे. )
आणी त्यांची पंचलाइन पण भारीये " तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार "
गुरुजी सरकारी नोकरीत होते अशी जुजबी माहीती आहे. त्यांच्या व्याख्यानात एक गमतीचा भाग असा होता की जीवनवीद्या असे म्हणते जीवनवीद्या तसे म्हणते
म्हणजे लेखन निर्मिती सर्व यांचीच पण मी म्हणतो ऐवजी जीवनविद्या काय म्हणते बघा अशी शैली
छान आहे

पगला गजोधर's picture

12 Apr 2018 - 7:37 pm | पगला गजोधर

पुण्यात वडापाव खाताना यांची खूप आठवण यायची ब्वा !

राही's picture

12 Apr 2018 - 4:53 pm | राही

प्रतिसाद नेहमीप्रमाणेच आवडला.
आस्तिक लोक (येथे देवधर्म- कर्मकांड मानणारे इतकाच सीमित अर्थ आहे) इतरांवर देव मानण्याची आणि कर्मकांडाची सक्ती करीत असतात. धाक दाखवत असतात. अमुक कुलाचार केला नाही म्हणून अमुक वाईट गोष्ट घडली असे टुमणे लावून ब्कॅकमेल करत असतात. एक गरोदर मोलकरीण सांगत होती की तिच्या सासूने मंगळवारी गणपतीची उपासना आणि उपास करायला सांगितले. मुलगा होण्यासाठी! सामान्य जनांत अंधश्रद्धा आणि आस्तिकता हातात हात घालून वावरतात. अलीकडे अनेक प्रकारची कर्मकांडे, उपासतापास , पदयात्रा यांचे महत्त्व वाढवले गेले आहे. सतत पालख्या, पदयात्रा निघत असतात. शंभर रुपयात शिर्डीला जेवणचहापाण्यासकट नेऊन आणणारी अनेक मंडळे निघाली आहेत. एका वेळेस वीसबावीस बसेसचा तांडा निघतो. अनेकदा अपघात होतात. लोकांना आपल्या बाजूने वळवण्याचा हा राजमार्ग झाला आहे. सणउत्सवांचे बाजारीकरण आणि राजकारण होते आहे. या सर्वात वेद, धर्मशास्त्रे, दर्शने, उपनिषदे यांचे काहीच काम नसते. या ग्रंथांत काहीही सांगितलेले असो किवा नसो, सर्वसामान्यांशी त्याचा संबंध नसतो. हे जे त्यांचे आचरण आहे, तोच खरा धर्म अथवा आराधना अशी त्यांची पक्की समजूत असते. ओळखीतले एक कुटुंब आहे. मुलगा प्राथमिक स्थितीतला जडबुद्धी (कमी बुद्ध्यांक असलेला) आहे. त्यांनी एका सुप्रसिद्ध बापूंकडे त्याला सेवेस लावले. त्याला काम मिळाले. कोणते तर येणाऱ्या शेकडो भक्तांची पादत्राणे सांभाळण्याचें. त्या मुलाला मंदमतींच्या खास शाळेत घालावे असे सांगून झाले होते. पण अनेक व्रतेवैकल्ये, दर पंधरवड्याला सत्यनारायणपूजा यातच ते कुटुंब गुंतून राहिले. असो. अशी अनेक उदाहरणे प्रत्यही अनेकांना दिसत असतील. आस्तिकता आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा अगदी पुसट असते.
या बाबतीत समाजप्रबोधन व्हायला हवे असे माझे वैयक्तिक मत आहे.

बिटाकाका's picture

12 Apr 2018 - 5:33 pm | बिटाकाका

थोडक्यात काय आस्तिक आईबापांच्या पोटी जन्माला आलेल्या मतिमंदांच्या शाळेत जाणाऱ्या जडबुद्दी मुलांची संख्या शून्य आहे.
------------------------------------------
थोडक्यात काय अंधश्रद्धा आणि आस्तिकता यातील अगदी पुसटशी सीमारेषा हि फक्त नास्तिकांना दिसते.
------------------------------------------
असो.

हे जे त्यांचे आचरण आहे, तोच खरा धर्म अथवा आराधना अशी त्यांची पक्की समजूत असते. ओळखीतले एक कुटुंब आहे. मुलगा प्राथमिक स्थितीतला जडबुद्धी (कमी बुद्ध्यांक असलेला) आहे. त्यांनी एका सुप्रसिद्ध बापूंकडे त्याला सेवेस लावले. त्याला काम मिळाले. कोणते तर येणाऱ्या शेकडो भक्तांची पादत्राणे सांभाळण्याचें.

तुमच्या दिलेल्या उदाहरणातील मुलगा बिचारा मंदबुद्धी आहे. त्याचा विषय एकवेळ बाजुला ठेवा.
हे पादत्राणे सांभाळण्याच काम जे आश्रमांमध्ये दिल जात. घेतल जात हा सर्वच प्रकार फारच रोचक आहे. त्याच्या काही शेड्स अशा असतात
१-
बघा बघा आमच्या आश्रमात तो इतका मोठा माणुस इतका श्रीमंत इतका ग्रेट पण इथे त्याला काय काम दिलय बघा तर देनेवालेके बाजुसे आम्ही त्याल्ल तुमच्या मटेरीयलीझम ला तुमच्या अचीव्हर ला किती वाकवला हा दृष्टीकोण आमच्या कडे अहंकार ठेचुन मिळतो. आमच्याकडे अहंकार वितळवुन देण्याची १००$ गॅरंटी
२-
दुसरीकडुन घेणारा डबल मॅसोचिस्टीकली ( नम्रतेतला टोकाचा अहंकार ज्या नम्रतेपेक्षा अहंकार परवडला ) ते तेज चेहर्‍यावर ठेवुन जोडे सांभाळतांना दिसतो. त्यातही हा "सीन" च असतो तो केवळ ठराविक वेळेसाठीच असतो. त्यात त्यांचा " बघा लेको मी किती नम्र आहे क्या तुमने देखी ऐसी नम्रता " असे वाजवुन ठणकावुन दाखवुन देतो.

- या नुसत्या दोन्ही बाजुनी विन विन सिच्युएशन नाहीत थर्ड डायमेन्शन ने आउटसायडर्स आकर्षित होतच असतात. नही साला नेने नही कही पर यहीपेच जस्टीस मिलेगा रे बाबा देख सब गधे घोडे बराबर है बापु के दरबार मे बाहेरच्या जगातला अन्याय बाहेरचा ताप सर्व सर्व झटक्यात संपुन एक न्यायशीर कम्युन ची तुरंत स्थापना
ज्यात काही काळ तुम्ही गुंगत गुंगीत फिरा मग तुम्ही रीचार्ज झाल्यावर " जा आता पुन्हा "बाहेर" जगुन ये बेटा/

आश्रमांमध्ये टाइम सेन्स जबरदस्त असतो. आश्रम आश्रम अध्यात्म अध्यात्म खेळत असलेल्या सर्व रंगकर्मींचे "बाहेर च्या " जगाचे भान जबरा असते. विकएन्ड ला ड्रेस चेंज , खाना चेंज , रुटिन चेंज मात्र बाहेरच्या लाइफ ला "जपुन " च बर का. मग पुन्हा नॉर्मल पुन्हा वीकएकंड
होत काय की गुंगीत मजेत जगत लाइफ पास होउन जाते. मध्येच कधी तरी हे सर्व चुकवत चुकवत राहेले तरी क्रुर जींदगी एखाद्या बेसावध क्षणी आपला क्रुर चेहरा दाखवुन विकट हास्य करतेच तेव्हा त्या क्षणाला एक संधी असते
भ्रमाचा त्याग करण्याची पण म्हणतात ना
माय है भइ माया महाठगिनी
४-

राही's picture

12 Apr 2018 - 8:59 pm | राही

आपण म्हणता तशी खरोखरच ' विन विन' सिट्युएशन असते.
मी वर दिलेल्या low I.Q.वाल्या मुलाच्या बाबतीत जोडे सांभाळण्यासाठी त्याला प्रत्येक चप्पलजोडामागे एक रुपया आकारण्याची परवानगी दिली गेली होती आणि काही दिवस प्रत्येक प्रवचनात त्याची बख्खळ कमाई झाली. आईवडील खूश. त्या जोरावर त्याचे लग्नही करून दिले गेले. नंतर प्रवचनेही कमी झाली आणि गर्दीही. बायकोनेही घटस्फोट मागितला. आस्तिकता आणि गुरू- बाबा वरील श्रद्धा कोणत्या थराला जाऊ शकते हे दाखवण्यासाठीच एव्हढे तपशीलवार लिहिले.

आस्तिकता आणि गुरू- बाबा वरील श्रद्धा कोणत्या थराला जाऊ शकते हे दाखवण्यासाठीच एव्हढे तपशीलवार लिहिले.

कोणतीही गोष्ट कोणत्याही स्तराला जाऊ शकते. अशा प्रत्येक प्रकारच्या अतिरेकाची अनेक उदाहरणे देता येतात.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Apr 2018 - 10:15 am | प्रकाश घाटपांडे

अगदी सहमत आहे.
समाजप्रबोधन हा लांवचा पण परिणामकारक मार्ग आहे. पण तो क्रांतीकारी म्हणून नव्हे तर उत्क्रांती कारी म्हणून वापरला गेला पाहिजे. माझ्यामते श्रद्धा व अंधश्रद्धा यात काही फरक नाही. यनावालांच्याच भाषेत सांगायच झाल तर एक दोन अक्षरी व दुसरा चार अक्षरी शब्द आहे एवढाच फरक.
अंधश्रद्धांची प्रतवारी व वर्गवारी केली पाहिजे. आमचे मित्र राजीव साने म्हणतात की अंधश्रद्धा निर्मूलन या शब्दापेक्षा अंधश्रद्धा निवारण हा शब्द योग्य आहे. निर्मूलन हे समूळ उच्चाटन असते.
अंधश्रद्धा या केवळ अगतिकता अज्ञान संस्कार यातून येत नाही. ती तर कारणे आहेतच पण त्या टिकून राहण्यामागे जैविक कारण देखील आहे हे विसरता कामा नये. अनेक वेळा देत असलेला दुवा पुन्हा एकदा देतो. मेंदुच्या मनात या सुबोध जावडेकरांच्य पुस्तकातील अंधश्रद्ध व मेंदुविज्ञान हे प्रकरण

प्रसाद गोडबोले's picture

10 Apr 2018 - 9:15 am | प्रसाद गोडबोले

लोल !

आता मात्र मजा यायला लागली ह्या धाग्यावर =))))

ह्या लोकांना खरेच स्वतःचा मुद्दा नक्की काय आहे हे स्वतःला तरी ठावुक आहे की नाही देव जाणे . एक जण म्हणतोय की नास्तिकस्ता म्हणजे देव नाकारणे , एक म्हणातोय देव नाकारा पण तत्त्वज्ञान स्विकारा , एक म्हणतोय की नास्तिकता धर्माविरुध्द नाही ! काय चेष्टा लावलीये ....लोल !!

नास्तिकता ही कोणत्याच धर्माच्या विरोधात नाही. खरं तर नास्तिकांतले अर्धेजण तरी आपापल्या धर्माच्या अवडंबराला, (कोणताही) धर्म रस्त्यावर आणल्याने होत असलेल्या सक्तीच्या गैरसोईला कंटाळलेले असतात. तेव्हा ह्या गोष्टी कमी झाल्या तर नास्तिक आपले नास्तैक्य आपल्या मनात बाळगतील. कारण मुळातच जगा आणि जगू द्या हे त्यांचं तत्व असतं. म्हणून नास्तिकांवर झोड उठवण्यापेक्षा आस्तिकांनी आपापल्या धर्मातील अवडंबरं, धार्मिक विधी (किमान त्यात सहभागी नसणार्‍यांना तरी) कमीत कमी त्रास देणारे कसे होतील याकडे लक्ष देऊन त्याबाबतीत प्रबोधन केलं आणि आपल्या हळव्या भावनांची आपणच वास्तववादी चिकित्सा केली तर अश्या मेळाव्यांची गरज उरणार नाही.

हा पॅरा म्हणाजे स्वमतांधतेचे क्लासिक उदाहरण आहे , ह्यात थोडेसे बदल करुन लिहिलेला खालील पॅरा वाचा =))))

आस्तिकता ही कोणत्याच विचारसरणीच्या विरोधात नाही. खरं तर आस्तिकांतले जवळपास सर्वच्यासर्व जण आपापल्या धर्माच्या श्रध्देच्या उपासनेच्या आनंदात मग्न असतात , पण नास्तिक लोक उगाचच जिथेतिथे माझीच लाल , अन बाकीचे अज्ञानमुलक असमंजस अन मीच काय तो शहाणा असे अवडंबर माजवत असतात. तेव्हा ह्या गोष्टी कमी झाल्या तर आस्तिक आपले आस्तैक्य आपल्या मनात बाळगतील अन संविधानिक मर्यादेत स्वतःचे धर्मस्वातंत्र्य उपभोगतील. एकदा नास्तिकांचे फुटकळ लेख मिपावर यायचे बन्द झाल्यावर कोण आस्तिक कशाला अन कुठे प्रतिसाद द्यायला येईल. कारण मुळातच जगा आणि जगू द्या हे त्यांचं तत्व असतं. म्हणून आस्तिकांवर झोड उठवण्यापेक्षा नास्तिकांनी आपापल्या तील किडे सोशलमिडीवर सोडायचे बंदकरुन आस्तिकांना डिवचण्याचे प्रकास कमीत कमी त्रास देणारे कसे होतील याकडे लक्ष देऊन त्याबाबतीत प्रबोधन केलं आणि आपल्या हुच्च सर्वज्ञ स्वमतांधतेचे लाल रंगाचे डबे स्वतःपुरते मर्यादित ठेवले कि अश्या काथ्याकुटांची गरज उरणार नाही.

!!!

मी आधीच म्हणल्याप्रमाणे कोणत्याच आस्तिकाने अमुक व्रत करा अन तमुक पुजा करा असले लेख मिपावर पाडल्याचे कैकवर्षात दिसले नाहीये , (फार पुर्वी कोणेतरी कोकिळाव्रत म्हणुन काहीतरी लिहिले होते त्याची पार कोकिळा करण्यात आली होती त्या धाग्यावर =))) , उलट नास्तिक लोकच अर्धवट वाचनातुन बनवलेल्या अर्धवट ज्ञानावरुन खुस्पट काढणारे अन वातावरण गढुळ करणारे लेख सतत अन वारंवार पाडत आहे ! वरुन पुरोगामित्वाचे लाल डबे फ्री फ्री फ्री !!

नास्तिकलोकांमध्ये " मीच एक शहाणा , मीच म्हणतो ते खरे , ते न मानणारे काफीर" ही असली अब्राहमिक वृत्ती आली आहे जी की संपुर्ण कलहाचे कारण आहे ! तीच फक्त "इयं विसृष्टिर्यत आबभूव यदि वा दधे यदि वा न |यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्त्सो अङ्ग वेद यदि वा न वेद ॥७॥" अशी अर्थात स्वतःच्या ज्ञानालाही scope for doubt and improvement झाली तर हा कलह थांबेल असा आमचा एक अंदाज आहे !!

===================================
ए बारक्या , एक प्लेट सेव फरसाण अन पाव जोडी घे रे !!

प्रसाद गोडबोले's picture

10 Apr 2018 - 9:23 am | प्रसाद गोडबोले

आणि हो , हे एक राहिलेच

मिपावरील प्रा. य. ना वालावलकर यांना या परिषदेत चार्वाक २०१८ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ह्या निमित्ताने त्याला इथे , आजच्या आस्तिकनास्तिकपाव वर आणि पुर्वाश्रमीच्या मिसळपाववर नेवाळे २०१८ पुरस्कार प्रदान करावा असा प्रस्ताव मी मिपावर मांडत आहे

=))))

राही's picture

12 Apr 2018 - 5:01 pm | राही

"ह्या निमित्ताने tyaalaa इथे , आजच्या आस्तिकनास्तिकपाव वर आणि पुर्वाश्रमीच्या मिसळपाववर नेवाळे २०१८ पुरस्कार प्रदान करावा असा प्रस्ताव मी मिपावर मांडत आहे.
का बरे जाणून बुजून एकवचन? तुच्छता आणि तिरकसपणा आस्तिकानाच नव्हे तर कोणाही ज्न्यानी व्यक्तीस शोभादायक नाही. असो. व्यक्ती आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा आहेच.

परस्परसन्मानाचे संकेत पाळावेत हे पटतं खरं. पण यनांस त्यांच्या अर्हतेपेक्षा अनेक पटींनी उत्तम संबोधले जाते. यना हे व्यक्तिगत उल्लेख करून अतिशय सभ्य भाषा वापरतात मात्र एका विशीष्ट वर्गाचा उल्लेख करतात ते अत्यंत हिन दर्जाची, हिणकस, असंसदीय, चूकीची आणि त्वेषात्मक भाषा वापरतात. या वर्गाचं नीच मूल्ये असल्याचं पूर्वीचं कोणतेही रेप्यूटेशन नाही.
=================================
धिस रेसिप्रोकेशन इज जस्टीफाइड अनलेस प्रिवियस टेक्स्ट इज मॉडरेटेड.

arunjoshi123's picture

10 Apr 2018 - 10:59 am | arunjoshi123

आस्तिकता ही कोणत्याच विचारसरणीच्या विरोधात नाही. खरं तर आस्तिकांतले जवळपास सर्वच्यासर्व जण आपापल्या धर्माच्या श्रध्देच्या उपासनेच्या आनंदात मग्न असतात , पण नास्तिक लोक उगाचच जिथेतिथे माझीच लाल , अन बाकीचे अज्ञानमुलक असमंजस अन मीच काय तो शहाणा असे अवडंबर माजवत असतात. तेव्हा ह्या गोष्टी कमी झाल्या तर आस्तिक आपले आस्तैक्य आपल्या मनात बाळगतील अन संविधानिक मर्यादेत स्वतःचे धर्मस्वातंत्र्य उपभोगतील. एकदा नास्तिकांचे फुटकळ लेख मिपावर यायचे बन्द झाल्यावर कोण आस्तिक कशाला अन कुठे प्रतिसाद द्यायला येईल. कारण मुळातच जगा आणि जगू द्या हे त्यांचं तत्व असतं. म्हणून आस्तिकांवर झोड उठवण्यापेक्षा नास्तिकांनी आपापल्या तील किडे सोशलमिडीवर सोडायचे बंदकरुन आस्तिकांना डिवचण्याचे प्रकास कमीत कमी त्रास देणारे कसे होतील याकडे लक्ष देऊन त्याबाबतीत प्रबोधन केलं आणि आपल्या हुच्च सर्वज्ञ स्वमतांधतेचे लाल रंगाचे डबे स्वतःपुरते मर्यादित ठेवले कि अश्या काथ्याकुटांची गरज उरणार नाही.

हे जे स्फुट रुपांतर आहे ते (म्हणजे याचं मूळ ल्लेखन) नास्तिकाचं एक क्लासी वर्णन आहे. ते कसे आपल्याकडे थोरपणा घेत असतात. स्वस्तुतीमधे कशी त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते याची मार्कस यांनी मस्त मज्जा घेतली आहे.

क्लास अपार्ट.

प्रतिसाद आवडला
यनावाला यांच्या विषयी आदर आहेच. पण आक्षेपही आहे तो असा
की ते एका मर्यादेपर्यंतच क्रिटीकल इन्व्हेस्टीगेशन करतात
त्यांच्यातला सत्यान्वेषक त्या बिंदुवर थांबतो त्या नंतर त्यांच्यातला सुधारक हा त्यांच्यातल्या सत्यान्वेषकावर हावी होतो.
मग ते गृहीतकांवर विसंबुन मांडणी करतात. उदा. राष्ट्रवाद त्यांनी पुर्णपणे विदाउट इन्व्हेस्टीगेशन स्वीकारलेला दिसतो असे प्रथमदर्शनी तरी वाटते.
दुसर त्यांची टेक्नीक
एथोज पॅथोज लोगोज हा क्रम आदर्श आहे अधिक प्रभावी आहे ते सरळ लोगोज पासुन सुरुवात कर तात
ते इथे मिसळपाववर तरी इतर कुठल्याच धागा विषयात त सहभागी होत नाहीत कधीच , स्वतः ही नास्तिकता सोडुन इतर विषयावर लिहीत नाहीत.
इतर ठिकाणी लिहीलेले आहे इथे नाही. सांगायचे असे की तुम्ही अगोदर एथोज ने कनेक्ट व्हा हे गरजेचे आहे.
ते एखाद्या एलियन सारखे इतरांना कदाचित भासत असावेत
कोणीतरी फार दुरवरुन येतो इतर कुठेच इमोशनली कनेक्ट नाही काहीतरी बॉम्ब ( इमोशनल सांस्कृतिक म्हणा ) टाकुन जातो
त्याने हेट्रेड विरोधभाव विनाकारण निर्माण होतो, गोंगाट इतका वाढतो की जे कोणी रीसेप्टीव ओपन असतील नविन वेगळ्या विचारासाठी ते ही
डिस्टर्ब होतात
मला इतकच म्हणायच आहे की त्यांनी स्ट्रॅटेजी बदलावी अधिक ह्युमन अधिक मोकळी अधिक भावपुर्ण करावी अंगिकारावी
असे मला आपले सुरुवातीपासुन वाटते
अनेकांना यनावाला म्हणजे काहीतरी भयंकर माणुस वाटतो कदाचित

यनावालांनी आपण सर्वज्ञ आहोत असा दावा कधी केला आहे? त्यांच्या चिकित्सेला मर्यादा असणारच. किंबहुना त्यांची आस्तिकता-नास्तिकता संदर्भातील मांडणी त्यांच्या या विषयावर केलेल्या चिकित्सेचाच परिपाक असावी. त्यांनी इतर कुथल्यातरी बाबतीत घेतलेल्या भुमिकेतील(जसे राष्ट्रवाद) कच्चे दुवे त्यांच्या आस्तिकता-नास्तिकता या विषयवरील मतांना कसे निष्प्रभ करतात?
दुसरे एक, या धाग्यावर अवांतर ठरेल असे, राष्ट्र ही संकल्पना चिकित्सातीत असू नये याच्याशी सहमत आहे. मात्र, इतर अस्मिता टोकदार न होऊ देण्यासाठी स्थीर समाज उभा रहावा यासाठी राष्ट्राची चौकट अतिनिकडीची असते असे सध्या तरी दिसते. राष्ट्र ह्या संकल्पना थोडी विसविशीत झाली की आतापर्यंत तरी असे आढळले आहे की इतर अस्मिता टोकदार होतात, त्या अस्मितांचे रिलिजन्स बनतात. अरब मुस्लिम राष्ट्रांत धर्म असेल किंवा तमिळनाडूत भाषा असेल किंवा अमेरिकेत कॅपॅटलिझम असेल. एकसंधत्व निर्माण करण्यासाठी राष्ट्र नावाच्या फिक्शनवर विसंबून राहावे लागते. अर्थात राष्ट्रवादाचा रिलिजन होऊन मग त्याची देखिल कर्मकांडे होतात व बहुसंख्याकांना अंकित करण्यासाठी राष्ट्रवाद वापरला जातो असे म्हणता येईल. बराच गुंतागुंतीचा असा हा विषय आहे, मला नीट मांडता येत नाहीये खरं तर.

त्यांच्यातला सत्यान्वेषक त्या बिंदुवर थांबतो त्या नंतर त्यांच्यातला सुधारक हा त्यांच्यातल्या सत्यान्वेषकावर हावी होतो.

+१
==========================

ते इथे मिसळपाववर तरी इतर कुठल्याच धागा विषयात त सहभागी होत नाहीत कधीच , स्वतः ही नास्तिकता सोडुन इतर विषयावर लिहीत नाहीत.
इतर ठिकाणी लिहीलेले आहे इथे नाही.

आय थिंक धिस इज ओके. असं असलं तरी व्यक्तिगत जीवनात त्यांना एक सामान्य व्यक्ती म्हणून कल्पणं सोपं आहे.
====================

ते एखाद्या एलियन सारखे इतरांना कदाचित भासत असावेत

नि

अनेकांना यनावाला म्हणजे काहीतरी भयंकर माणुस वाटतो कदाचित

असं काही नाही. ते आपल्यासारखेच नि सज्जन असावेत असं कल्पणं अजिबात अवघड नाही.
--------------------
पाश्चात्य माध्यमांत स्व चं जे नास्तिकी चिंतन असतं ते कधी कधी अंगावर काटा आणतं. यना अजिबात असलं काही करत नाहीत.
त्यांचेवर नको ते आरोप नको.
======================================
कोण्या ही आस्तिकाने ईश्वररहित विश्वाची संकल्पना समजून सांगायला पाहिजे. हे यना अजिबात करत नाहीत. नसलेला कायदा पाळायचा गचाळ आग्रह करत लेख पाडत बसतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2018 - 10:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अंतरा आनंद आपल्या प्रतिसादाने माझ्या धाग्याचं सार्थक झालं. धन्स.....!

आणि प्रा. य. ना वालावलकर यांना या परिषदेत चार्वाक २०१८ पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याबद्दल त्यांचं मन:पूर्वक अभिनंदन करतो...!

-दिलीप बिरुटे

मिपावरील प्रा. य. ना वालावलकर यांना या परिषदेत चार्वाक २०१८ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आता बोला.काय अवस्था येऊन ठेपलीय नास्तिकतेवर! दुसरा कोणी मिळाला नाही का? आपल्या मिपावरच यनांना हजारदा चित करतील इतके उत्कृष्ट नास्तिक आहेत.
यनांना काहीतरी वैचारिक लेवल आहे का? मी त्यांना मागच्या ६-७ धाग्यांवर कितीतरी प्रश्न केलेत, त्या उत्तरांतील छछोरता पाहून चार्वाकाबद्दल कीव येतेय.
==================================
तसे राजीव साने पण कंसेप्च्यूअली गंडलेलेच आहेत, पण त्यांचं पॉप्यूलर अपिल थोडं जास्त आहे. ते बरेच अस्पेक्ट कवर करतात, पण अजून तरी फ्रेमवर्क बद्दल बोलताना आढळले नाहीत.
=============================================
बाय द वे यना, वयाने ज्येष्ठ आहात म्हणून पुरस्कार देणे- मिळणे हे धार्मिक वर्तन झालं. अशाच तर प्रकारे घाणेरड्या धार्मिक परंपरा रुजतात.

खरं तर नास्तिकांतले अर्धेजण तरी आपापल्या धर्माच्या अवडंबराला,

नास्तिकांचा पण आपापला धर्म असतो का? लोक धार्मिक नि नास्तिक एकत्र असतात का? काय चाललंय काय?
सॉलिड कंफ्यूज करतात राव हे लोक!

"निरपेक्ष आनंद, वासनारहित सौदर्य, सुकून(ब्लिस), धन्यवाद देण्याची गरज, सन्मार्गच घेतला याचा धन्यभाव, आश्चर्य-कौतुक, शुचिता-पावित्र्य, आदर-जोडलेपणा, साक्षीभाव मोकळेपणा, रितेपण नव्हे तर भरलेपण, म्यूच्युअलटीतून येणारी इंटिमसी, आत्ताच्या वास्तवाचा काच सोडून येणारी क्रियेटिव्हिटी याही गोष्टी हव्या आहेत. नैतिकता ही फक्त कर्तव्यांपर्यंत पोहोचते. पण कर्तव्यातीत सद्गुण म्हणजेच औदार्य, करुणा, मुदिता, क्षमा, अनसूया हे जोपासायला मनोवस्था आत्मीयतेची लागते. ती ठरवून आणता येत नसली तरी तिला येऊ देणे ‘लेट’ याकरता स्वागतशील असावे लागते. मानसोपचार हा फक्त विकारग्रस्तता घालवण्यापुरता पुरेसा नसून आंतरिक उन्नतीसाठी पुढे नेला पाहिजे."

वाह! फार आवडले..
यनावालांचे अभिनंदन.

राजीव साने यांनी "धार्मिक बाबतीत मूल्यचिकित्सा आणि त्यातून इहवादाकडे वळवण्यासाठी नास्तिकांनी प्रयत्न करण्याची गरज" अधोरेखीत केली होती त्याबाबतही, अश्या तर्‍हेने कोणाची मतं बदलण्यासाठी प्रयत्न करणं हे माझ्या पद्धतीत बसत नसल्याचंही सहस्त्रबुद्धे या अजून एका संस्थापक सदस्यांनी आभारप्रदर्शनात सांगीतलं.

सहस्रबुद्धेंचेसुद्धा अभिनंदन..

इथे कितीही राळ उडवली गेली तरी संयमाने आणि जिद्दीने ते आपले विचार मांडत राहतात.

हे एक तद्दन निर्बुद्ध विधान आहे. कोणत्याही सामाजिक मंचावर केलेल्या विधानांवर लोकांनी प्रश्न विचारले तर त्यांची उत्तरे द्यायची असतात. माझं तितकं ज्ञान नाही अशा सफाया देण्याऐवजी असले विषयच छेडायचे नाहीत. राळ उडवणे म्हणजे भलते सलते अर्थ काढून प्रपागंडा करणे. यनांच्या एकाही वाक्याचा कोणी भलता अर्थ काढलेला नाही.
उलट यनांनी त्यांच्या अज्ञानातून, संस्कारांमुळे, जे काय ते, सश्रद्ध लोकांबद्दल जी अवार्च्य विशेषणे वापरली आणि त्यावर मिपाकर नास्तिक जसे मूग गिळून गप्प आहेत ती नास्तिकी चळवळ कोण्या उपटसुंभाच्या हाती पडत आहे याची नांदी आहे.
समजा अस्तिक, सश्रद्ध लोकांनी त्यांच्या बौद्धिक, ज्ञानिक, वैचारिक, इ इ मर्यादांमुळे स्वीकारलेली विचारसरणी चूक जरी असली तरी त्यांना संबोधण्याची एक संसदीय पद्धत असते. अशा बेजबाबदार लोकांना पुरस्कार देणे, वर विनम्र म्हणणे वर त्यांना प्रश्न विचारणारांना राळ ऊडवणारे म्हणजे अति आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2018 - 11:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नमस्कार मंडळी, साहित्य समाजाचा आरसा असतो असं आम्ही एक पारंपरिक वाक्य नेहमी वापरतो. त्यात जरासा बदल करुन म्हणतो की मिपा समाजाचा आरसा आहे, समाजात जे जे दिसतं त्याचं चित्रण इथे उमटतं. नास्तिक चळवळीच्या निमित्ताने समाजमनाचं प्रातेनिधिक प्रतिसाद इथे बघायला मिळाले. रुढीप्रिय सामान्य लोकांचा रोष, आक्रोश, चीड, त्रागा आणि भाषेवरील गेलेलं भान इथे अनेक प्रतिसादांतून दिसलं. देवाळू का देव खतरेमे पडल्याप्रमाणे त्याच्यासाठीचे अनेक युक्तीवाद इथे चर्चील्या गेले. अनेक विचार नसलेल्या देवाळुंच्या झुंडी इथेही दिसून आल्या. विज्ञानाला अनेक शोध लागले नाहीत पासून देवाचा शोध लागल्याच्या आनंदातले प्रतिसादही मजा देऊन गेले. अनेकांनी चळवळींचं स्वागत केलं, काही अपेक्षा चळवळींकडून व्यक्त केल्या. नास्तिकत्व म्हणजे काय याबद्दलही अगदी शेवटी काही प्रतिसाद दिसले. नास्तिक परिषदेतील सहभागी झालेले अंतरा आनंद यांचा एक उत्तम प्रतिसाद आणि प्रा.य.न.वालावलकर यांना २०१८ चा चार्वाक पुरस्कार मिळाल्याची बातमी मला धाग्याचा आनंद देऊन गेला बाकी, प्रतिसादचर्चेच्या निमित्ताने काही गोष्टींचा उहापोह करावा वाटला.

काही प्रतिसादात चक्रधर स्वामींच्या महानुभाव संप्रदायाबद्दल काही टीपा दिसून आल्या. या पंथाने खरंच काहीएक बदल करण्याचा प्रयत्न केला. एक गोष्ट खरी आहे की पारंपरिक उपासना आणि अवडंबरच्या निमित्ताने एक वेगळा पंथ म्हणून महानुभाव संप्रदायाचा विचार केला तरी अनेक गोष्टी त्यांनी त्यात मानल्या ज्यात पंचकृष्ण आणि सुत्रपाठ हा एक भाग आहेच. देवताभक्तीबरोबरच त्यांच्या प्रित्यर्थ होणारे तीर्थक्षेत्र, व्रतदान, रुढ मार्ग चक्रधरांनी निषिद्ध ठरविले, इतकेच काय व्यक्तीची निष्ठा अनेक ठिकाणी विभागणारे अनेक प्रकारचे धर्म, ग्रामधर्म, जातीधर्म, कुलधर्म चातुवर्ण, हे सर्व चक्रधरांनी अमान्य केले. विषमता निर्माण करणारा धर्म त्यांना मान्य नव्हता, हे स्पष्ट दिसते. देवाळू संप्रदाय त्यांनी पूर्ण नाकारला नाही. आणि लोकांनाही त्यातला अवैदिकता, वर्णाश्रम विरोध, मुर्तीपुजेला प्रतिबंध, दैवतांचा अधिक्षेप, जातीभेदाला अमान्यता, या गोष्टी तत्कालीन समाजमनाला मान्य न होणाया होत्या त्यामुळे तो काळ पाहता पंथ अप्रिय झाला असे म्हणावे लागते.

इतिहासात डोकावल्यावर असे दिसते की, पारंपरिक देव धर्म आणि संस्कृती नाकारुन नव्या पंथाचे अनेक प्रयत्न झाले. मुर्तीपूजा नाकारुन पाद्य पुजा करणारा दत्त संप्रदाय आपणास दिसतो. परंतु त्याला कारण त्यावेळची सत्ता होती असे दिसते. यादवांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर अडीचशे वर्ष हिंदु धर्माला फ़ार मोठी शिथीलता आली होती. देवळांची मोडतोड, तीर्थक्षेत्रांचा विंध्वस, जत्रा, उत्सव यांना प्रतिबंध अशामुळे लोक गोंधळुन गेलेले होते. मुस्लीम राजवटीचे सर्व काही चांगले वाटू लागले होते. चढाव, दाढी वगैरे ठेवणे, मुस्लीम पेहराव करणे, अगदी मराठी स्त्रीयांनी गोशा पडद्याच्या चाली उचलल्या, आडनावं अनेकांनी बदलून घेतली मुस्लीम गुरु करु लागले, पिरांना नवस करु लागले, उरुसात हिंदू नाचू लागले. दत्तासारख्या हिंदु दैवताला मलंग वेषात कुत्री बरोबर घेऊन फिरावे लागले हे सर्व हिंदु धर्माला शिथीलता आल्यामुळे झालेले आपणास इतिहासात दिसते.

आता काळ बदलला आहे, आपल्या सोयीप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे देव धर्म परंपरा त्यातले अडचणीचे मार्ग वगैरे टाळून नास्तिक चळवळ सुरु झालेली दिसते. आज नास्तिक चळवळीला पारंपरिक विचारधारेचा विरोध, राजसत्तेचा समाजमनावरील प्रभाव जसा अड्सर असेल तसा पारंपरिक सनातनी विचारांचा प्रभाव सुद्धा अशा चळवळींना मारक ठरण्याची शक्यता आहे. आज तरी या चळवळींनी फ़ार मोठा पल्ला गाठलेला नाही, मात्र भविष्यात ही चळवळ फोफावेल अशी आशा करुया. आजूबजूची काही भयानता पाहता, नास्तिक चळवळ ही काळाची गरज असणार आहे, असं माझं व्यक्तीगत मत आहे.

बाकी, माझ्याक्डून चर्चा इथे थांबवत आहे. आपणास चर्चेची दारं खुली आहेत. माझ्याकडून नाशिककरांच्या, पुणे, मुंबैच्या नास्तिक चळवळीला तहेदिलसे शुभेछा. चर्चेत सर्व सहभागी मिपाकरांचे विशेषतः विषयावर मुळ विषय समजून प्रतिसाद लिहिणार्‍या सर्व मिपाकरांचे, वाचकांचे, संपादकांचे, मालकांचे मनपूर्वक आभार मानतो. :)

-दिलीप बिरुटे
(आभारी) :)

विशुमित's picture

10 Apr 2018 - 12:31 pm | विशुमित

उत्तम प्रतिसाद सर..
वाचनखूण म्हणून साठवत आहे.

श्रीगुरुजी's picture

10 Apr 2018 - 1:11 pm | श्रीगुरुजी

आता काळ बदलला आहे, आपल्या सोयीप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे देव धर्म परंपरा त्यातले अडचणीचे मार्ग वगैरे टाळून नास्तिक चळवळ सुरु झालेली दिसते. आज नास्तिक चळवळीला पारंपरिक विचारधारेचा विरोध, राजसत्तेचा समाजमनावरील प्रभाव जसा अड्सर असेल तसा पारंपरिक सनातनी विचारांचा प्रभाव सुद्धा अशा चळवळींना मारक ठरण्याची शक्यता आहे. आज तरी या चळवळींनी फ़ार मोठा पल्ला गाठलेला नाही, मात्र भविष्यात ही चळवळ फोफावेल अशी आशा करुया.

गंमत आहे. कालच हे म्हणाले होते की फार पूर्वीच आस्तिकांचा दारूण पराभव झालेला असून नास्तिकांचा दणदणीत विजय झाला आहे. पण आज म्हणताहेत की "आज तरी या चळवळींनी फ़ार मोठा पल्ला गाठलेला नाही, मात्र भविष्यात ही चळवळ फोफावेल अशी आशा करुया.".

वैचारिक गोंधळ असाच असतो का?

गुरुजी ते जे काय म्हणतात ते "ते म्हणतात म्हणून" सत्य असतं. हे लोक काहीही म्हणतात आणि ते सर्व सत्य आणि इष्ट मानायचं.
-----------------------
मी वर जो एक धाग्याच्या मूळ विषयावर म्हणून प्रतिसाद दिला आहे तो यांना झेपलेला पण दिसत नाही. त्यावर यांना भाष्य देखील करावं वाटलं नाही यातच यांचा सगळा बुद्धीप्रामाण्यवाद दिसून येतो.

नास्तिकांचा धर्माभ्यास सखोल असतो याचा प्रत्यय आणून देणारा प्रतिसाद.

प्रकाश घाटपांडे's picture

10 Apr 2018 - 12:08 pm | प्रकाश घाटपांडे

य.ना वालावलकरांची चार्वाक पुरस्कारासाठी निवड ही अत्यंत उचित आहे. कठोर नास्तिक म्हणून जालावरील मंडळींना त्यांचा परिचय आहेच. सगळ्यांची मते ही सारखी असणार नाहीच. मतभिन्नतेचा आदर आहेच. यनावालांची सर्व मते कुणाला पटतील असे नाहि. तो भाग अंशात्मक असतो. यनावालांच्या मताशी सहमत असणारे अनेक लोक आहेत त्यांचा आक्षेप मतांपेक्षा मते व्यक्त करण्याच्या पद्धती विषयी. आक्रमते विषयी आहे. अंनिस ची सुरवात ही मानवीय नास्तिक मंच अशा नावाने झाली होती. पण ती तशा पद्धतीने रुजेना म्हणून बदल केला व अंधश्रद्धा निर्मूलन समिती असे नाव धारण केले. तसेच धोरणात ही बदल केले.

arunjoshi123's picture

10 Apr 2018 - 12:29 pm | arunjoshi123

कठोर नास्तिक म्हणून

नास्तिक कठोर (मंजे कट्टर) असतो तरी का?
----------------------
यनावालांना चार्वाक पुरस्कार देणे म्हणजे चार्वाकाला बदनान करणे आहे या कठोर मताचा मी झालो आहे.

यनावालांची सर्व मते कुणाला पटतील असे नाहि.

सर्व मते कुणाचीच कुणाला पटत नसतात.
पण नास्तिकी प्रतिष्ठेला बट्टा लावतील इतकी विचित्र मते मांडायची नसतात.

पगला गजोधर's picture

10 Apr 2018 - 12:42 pm | पगला गजोधर

पण नास्तिकी प्रतिष्ठेला बट्टा लावतील इतकी विचित्र मते मांडायची नसतात.

नास्तिकांनाही प्रतिष्ठा असू शकते म्हणता ??

__
ट्रोलअलर्ट

प्रतिष्ठा काही अस्तिक, वा अज्ञेय लोकांची मालमत्ता नाही.
=========================
बा द वे, मिपावरील लेखपाडू नास्तिक मंडळी नास्तिकवादाला सरळ बदनाम करत आहेत. जगभरात नास्तिक लोक अस्तिकांना हादरवून सोडणारे प्रश्न विचारतात. इथली मंडळी पूर्वघोषी आहे.

गब्रिएल's picture

10 Apr 2018 - 1:10 pm | गब्रिएल

मिपावरील लेखपाडू नास्तिक मंडळी नास्तिकवादाला सरळ बदनाम करत आहेत. जगभरात नास्तिक लोक अस्तिकांना हादरवून सोडणारे प्रश्न विचारतात. इथली मंडळी पूर्वघोषी आहे.

हैला, बोला तो क्या बोला, अजोभाय ! यक्दम बैलका डॉळाचा. =))

प्रकाश घाटपांडे's picture

10 Apr 2018 - 1:22 pm | प्रकाश घाटपांडे

पण नास्तिकी प्रतिष्ठेला बट्टा लावतील इतकी विचित्र मते मांडायची नसतात.

पण त्यांनी ते मांडणे हे त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा भाग आहे.आपल्याला पटणे न पटणे हा आपल्या स्वातंत्र्यचा भाग आहे. आणि नास्तिकी विचारांमधे विभिन्न छटा असतातच की! त्या अस्तिकांमधेही असतात.

अभिव्यक्तिस्वातंत्र्य कशाला आणायचं मधे? कोण म्हणतंय त्यांना विशिष्ट विचार मांडायचं स्वातंत्र्य नाही म्हणून? पण पुरस्कार, तो हि थेट चार्वाकाच्या नावाचा, द्यायला काही आगा पिछा बघावा कि नको?

श्रीगुरुजी's picture

10 Apr 2018 - 3:10 pm | श्रीगुरुजी

असले पुरस्कार 'अहो रूपम् अहो ध्वनीम्' प्रकारातील असतात का?

पगला गजोधर's picture

10 Apr 2018 - 3:44 pm | पगला गजोधर

"बाबा वाक्यं प्रमाणाम् " या प्रकारातील नसतात.

प्रकाश घाटपांडे's picture

10 Apr 2018 - 4:22 pm | प्रकाश घाटपांडे

अहो चार्वाकाच्या नावाने दिला म्हणूनच तो उचित वाटतो.त्यांनी नास्तिकते च्या प्रसाराचे काम हिरीरीने केले नाहि का? तो काही विवेकचूडामणी पुरस्कार नाहीये.

माझा जो काही जालावरचा अनुभव आहे त्यामधे आपले सारे प्रतिसाद संतुलित आढळले आहेत. तुम्ही स्वतःस नास्तिक मानता का नाही माहीत नाही, पण मानत असताल तर तुम्हाला चार्वाक पुरस्कार द्यायला हरकत नाही. तुमचं ज्ञान खूप आहे. भाषा अतिशय नम्र आहे. तुमच्याशी होणारा संवाद अत्यंत अर्थपूर्ण असतो. तुमचं लॉजिक पण सॉलिड असतं. शक्यतो बायस नसतात.
----------------------------
यनांची नास्तिकता प्रामाणिक आहे म्हणून तुम्ही पुरस्कारचं समर्थन, इ करत असाल, पण प्रकाशजी ये सरासर गलत है। यना डजन्ट नो अ‍ॅनिथिंग अबाउट एथिझम.

प्रकाश घाटपांडे's picture

10 Apr 2018 - 4:27 pm | प्रकाश घाटपांडे

बहसंख्यासाठी 'ईश्वर' हा सगळ्यात स्वस्तातला सायकियाट्रिस्ट आहे. काही लोकांना काही वेळा आपले मानसिक आरोग्य व सदसदविवेक्बुद्धी जागृत ठेवण्यासाठी ईश्वर नावाच्या संकल्पने ची गरज लागते. काहींना ती अजिबात लागत नाही. गरज वाटली तर वापरायची नाही गरज वाटली तर नाही वापरायची शिंपल आहे. मला त्याचा थेट विवेकी असण्याशी काही संबंध वाटत नाही.

पगला गजोधर's picture

10 Apr 2018 - 4:32 pm | पगला गजोधर

आपले मानसिक आरोग्य व सदसदविवेक्बुद्धी जागृत ठेवण्यासाठी ईश्वर नावाच्या संकल्पने ची गरज लागते.

.
हे ५०% विधान आहे, उरलेले
आपली जागृत सदसदविवेक्बुद्धी दमन करून आंधळी ठेवण्यासाठी ईश्वर नावाच्या संकल्पने ची गरज लागते.

जगातील अनेक एथनिक क्लीन्सिंग ची उदा आहेत...

जगातील अनेक एथनिक क्लीन्सिंग ची उदा आहेत...

अस्तिक लोकांनी केलेली?
========================
जगातल्या सर्व वांशिक हत्या केवळ आणि केवळ नास्तिक लोकांनी केलेल्या आहेत. आणि करोडोनी केलेल्या आहेत.
=========================
सबब नास्तिकतेचा पुळका आलेल्यांनी अगोदर नास्तिकतेचा इतिहास वाचावा.

पगला गजोधर's picture

10 Apr 2018 - 4:45 pm | पगला गजोधर

जगातल्या सर्व वांशिक हत्या केवळ आणि केवळ नास्तिक लोकांनी केलेल्या आहेत.

जे तथाकथित आस्तिक लोकं एथनिक क्लीन्सिंगच्या नावाखाली हत्याकांड करतात,
"त्यांना" तुम्ही सरळ "नास्तिक" म्हणून प्रॉडाक्ट लेबल चेंज करून खपवत आहात, तर धन्य आहे तुम्ही सर.
बा द वे "एका हातात पवित्र पुस्तक व दुसऱ्या हातात तलवार" लोकांना तुम्ही धर्मावर निष्ठा असलेले आस्तिक मानतात का ?
नै तुमचा व श्रीगुरुजींच्या फार विशेष लळा आहे त्या लोकांबद्दल...

ही सगळी पैदावळ नास्तिक आहे. आणि त्यांचा खुनशीपणा आणि नास्तिकपणा योगायोगाने नव्हते. त्यांच्या वर्तनाची प्रेरणाच नास्तिकता होती.
http://listverse.com/2010/06/05/10-people-who-give-atheism-a-bad-name/

श्रीगुरुजी's picture

10 Apr 2018 - 5:57 pm | श्रीगुरुजी

जगातल्या सर्व वांशिक हत्या केवळ आणि केवळ नास्तिक लोकांनी केलेल्या आहेत. आणि करोडोनी केलेल्या आहेत.

अगदी बरोबर. पण एक अपवाद आहे. तो म्हणजे शांततेच्या धर्मातील आस्तिक.

प्रसाद गोडबोले's picture

10 Apr 2018 - 7:21 pm | प्रसाद गोडबोले

चला , ह्या धाग्याच्या निमित्ताने परत एकदा प्रतिसाद संपादन सुरु झाल्याचे दिसले !

तर्री संपली , एक्स्ट्रा सेव फरसाण अन पाव खाऊन पोट ही भरले ! आता थंडगार ताक मागवुयात !
आस्तिकनास्तिकपाव संपुन मिसळपाव (काही काळापुरते का होईना पण) परत सुरु झाले असे मानायला हरकत नाही :)

-
मार्कस ऑरेलियस
vi veri veniversum vivus vici

पगला गजोधर's picture

11 Apr 2018 - 8:15 am | पगला गजोधर

भुंकुन काम होत नसेल, तर चावा घ्यावा लागतो.

गाय मारणार्याला अटकाव केला नाही तर, नंतरच वासरे मारली जातात.

(मार्कस ऑरेलियस तुमच्यासाठी ही प्रतिक्रिया नाही,
दुसऱ्या/ री साठी आहे)

गामा पैलवान's picture

10 Apr 2018 - 9:11 pm | गामा पैलवान

बाकी कायपण म्हणा आपल्याला नास्तिकांच्या फलकांवरचं अक्षरवळण ( = फॉण्ट ) लै आवडलं. सनातन प्रभात सारखं वाटतंय!

-गा.पै.

ब्राइट्स अथेइस्ट कोन्फरन्स मध्ये झालेल्या व्याख्यानांचा दुवा रोचक आहे

https://www.facebook.com/Wethebrights/videos/889730854485089/

राजीव सानेंचा याच संदर्भातील लेखाचा दुवा

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=2061815880811358&id=10...

इंटरेस्टींग आहे अवश्य बघा वाचा

दीपक११७७'s picture

10 Apr 2018 - 11:57 pm | दीपक११७७

तर्कशुद्ध वाटतं नसलं तरी लोकं धर्माला-प्रथेला का चिटकुन राहतात, नास्तिकं का होतं नाहीत, हे कळेल या लेखा वरुन.

सुबोध खरे's picture

11 Apr 2018 - 7:02 pm | सुबोध खरे

बरंचसं ( कदाचित सगळंच) डोक्यावरून गेलं.
पण प्रतिसाद वाचून करमणूक मात्र छान झाली.

स्वधर्म's picture

12 Apr 2018 - 11:56 pm | स्वधर्म

चर्चा चांगली रंगली अाहे. दोन्ही बाजूंकडून जी हमरीतुमरी सुरू अाहे, ते पाहून एक विचार मनात अाला.
मला असे वाटते, की श्रध्दावान असणे किंवा नसणे असा लेख हवा होता. श्रध्दा या शब्दाला एक सकारात्मक रंग अाहे, पण तूर्त मला अाधिक चांगला शब्द सुचत नाही, म्हणून ‘प्रश्नच न विचारण्या एवढा, शंकाच न येण्याएवढा अभंग विश्वास’ असा बिनरंगी अर्थाने मी श्रध्दा हा शब्द खाली वापरलाय.

ज्या अास्तिकांवर कोरडे अोढले जात अाहेत, त्यांचे धर्माशी किंवा देवाशी किंवा परंपरांशी फक्त एकच नाते अाहे, ज्यामुळे त्यांना दुसर्या बाजूवर तुफानी हल्ला चढवलाय. पण गंमत म्हणजे नास्तिकांचेही या गोष्टी ‘नाहीतच’ या भावनेशी नेमके तेच नाते दिसते अाहे! हे नाते म्हणजे श्रध्दा! याच लेखात एके ठिकाणी अजो यांनी अशी प्रतिक्रिया दिली अाहे, की जगातले अनेक मानवसंहार नास्तिकांनी केले. खरेही अाहे ते, पण ते संहार खरे तर अनुयायांच्या नेत्यांनी सांगितलेल्या कल्पनांवर असलेल्या श्रध्देमुळे अनुयायांनी केले. उदा. नाझी किंवा माअोवादी साम्यवादी अनुयायांची त्यांच्या तत्वांवर जी श्रध्दा होती, ती तंतोतंत प्रचंड हत्याकांडे, छळ इ. करणार्या धार्मिक मूलतत्ववाद्यांसारखीच होती. फक्त श्रध्देचा विषय वेगळा होता. नाझी किंवा माअोवादी यांचे अाचरण धार्मिक नसले तरी ते प्रचंड पोथीनिष्ठ, अापल्या नेत्यांवर, त्यांच्या उपदेशांवर एखाद्या निस्सिम ईश्वरोपासकाएवढीच श्रध्दा ठेवणारे होते अन् एकदा हा श्रध्देचा (इथे मात्र खरोखरच वेगळा शब्द हवा होता) विषाणू अात शिरला, की तो काहीही करवू शकतो. त्या अर्थाने नाझी, साम्यवाद, नास्तिकता हेही धर्मच अाहेत.
मला स्वत:ला प्रश्न पडतो, की माणूस हा इतका क्षुल्लक शारिरिक, मानसिक, बौध्दिक क्षमता व मर्यादित अायुष्य असलेला प्राणी अाहे अाणि जग हे इतकं अाफाट गुंतागुंतीचं, अनेक चलांनी (व्हेरिएबल्स) चालणारं अाहे, की कोणीही संत, नेते, धर्मग्रंथ झाले तरी त्यांना हा सगळा व्यवहार ‘अाकळणे’ शक्य नाही. असे असताना कसे काय कुणाला वाटू शकते की माझा धर्म, विचारधारा, संस्कार, परंपरा, संस्कृती ही श्रध्दा ठेवण्याइतकी परिपूर्ण असेल? त्यातली तत्वे त्रिकालाबाधित सत्य असू शकतील? त्यामुळे इथे तावातावाने वाद घालणार्या दोन बाजू दिसत असल्या तरी मला ते अगदी एकसारखे वाटतायत - श्रध्दावान!

प्रकाश घाटपांडे's picture

13 Apr 2018 - 10:18 am | प्रकाश घाटपांडे

+१

विशुमित's picture

13 Apr 2018 - 10:49 am | विशुमित

+१

पुंबा's picture

13 Apr 2018 - 11:39 am | पुंबा

संपूर्ण सहमत.

?

स्वधर्म's picture

13 Apr 2018 - 12:27 pm | स्वधर्म

अभंग विश्वास, म्हणजे जो सहसा भंग पावत नाही, त्या विश्वासाच्या विपरीत नविन माहिती मिळाली तरी, असा अर्थ मला अभिप्रेत होता. निष्ठा हा शब्द जर तोच अर्थ दर्शवत असेल, तर चालू शकेल. पण तो मला जरासा कृती करायला लागणारी उर्जा पुरवणारा शब्द वाटतो अाणि विश्वास हा बराचसा मनाची किंवा अाकलनाची स्थिती दाखवणारा शब्द वाटतो. शब्द एक असोत, पण तुंम्हाला मी काय म्हणतोय ते समजले असावे.

शाम भागवत's picture

13 Apr 2018 - 1:23 pm | शाम भागवत

आल लक्षात.
निष्ठा शब्द नाही चालणार.

दॄढ विश्वास चालेल.

राही's picture

13 Apr 2018 - 12:31 pm | राही

नात्सी हे क्रिस्टिअन धर्माला सर्वश्रेष्ठ मानणारे आणि पराकोटीचे वंशश्रेष्ठत्ववादी होते. कम्यूनिस्ट हे धर्म मानीत नाहीत हे नात्सींकडून घडलेल्या कम्यूनिस्टांच्या हत्येचे एक कारण होते. नात्सींचा ज्यूद्वेष कुप्रसिद्ध आहे. आर्यरक्ताचा त्यांना टोकाचा दुरभिमान होता. या विचारधारेला नास्तिक कसे मानता येईल? धर्माच्या नावावर नरसंहार करणाऱ्यांमध्ये नात्सींचे नाव ठळकपणे उठून दिसते

या प्रतिसादात जे एकूण अज्ञान आहे ते कोणत्याही निष्पक्ष इतिहासकारास कायमचे कोमात घालील.
======================================
१. नाझींनी अगोदर कमुनिस्ट नसलेल्या पश्चिम आशियातल्या ख्रिश्चन देशांवर हल्ला केला, त्यांना जिंकले तेव्हा त्यांना खुरापत करायला रशिया उरला होता. (युके बेट असल्यामुळे, स्विटझर्लँड उंच असल्यामुळे, इ ते वाचले पण हल्ल्यांनी भंड आणलाच होता.).
१.१ मुळात तुम्ही हे विसरताय की नास्तिक होते म्हणून (हो ते अगदी अस्संच आहे.) हिटलर, मुसोलिनी, आणि स्टॅलिन यांचा लिखित सहकार्याचा करार होता. जपानचा राजा स्वतःच देव आहे म्हणे हा एक वेगळा भाग आहे. पण हे सगळे तथाकथित आभाळातला देव नाकारणारे होते.
१.२ दुसर्‍या महायुद्धात देव न मानणार्‍या दानवांचा पराभव झालेला आहे.
१.३ जे धार्मिक विरोधक असतात त्यांना तो नावडता धर्म "आपल्या घरी" नको असतो. वा धर्मांतर करायचं असतं. ख्रिश्चन तर ऑब्सेस्ड असतात यासाठी. हिटलरचं तसं नव्हतं. त्याला ज्यूंना तिकडे अरबास्तानात पाठवायचं नव्हतं. ख्रिश्चन तर करायचंच नव्हतं. फक्त मारून टाकायचं होतं.
१.४
=================================
२. हिटलर ख्रिश्चन धर्माचा पक्का द्वेष्टा होता. पण नास्तिकांची चलती असल्यामुळं असं म्हणता येत नाही. काय म्हणता येतं ते पहा.
https://en.wikipedia.org/wiki/Religious_views_of_Adolf_Hitler

the wide consensus of historians consider him to have been irreligious, anti-Christian, anti-clerical and scientistic.[1]

भाषांतर
अधिकांश इतिहासकारांच्या मते हिटलर हा अधार्मिक, ख्रिश्चन धर्माचा विरोधक, पुजार्‍यांचा विरोधक, आणि ज्यू-द्वेष्टा होता
-------------
लक्षात घ्या इथे ख्रिश्चन विरोधक असा शब्द वापरला आहे.
========================================
हिटलर नास्तिक नव्हता आणि असला तरी नास्तिकता त्याच्या हिंसेमागची प्रेरणा नव्हती हे सिद्ध करायला धडपडणारी पुस्तके हौशी नास्तिकांनी टनांनी पाडली आहेत आणि त्यांना कुत्रे भीक घालत नाही.
============================================
सोशल डार्विनीझम आणि युजेनिक्स बद्दल कधी वाचा. धर्म (म्हणजे पाद्री लोक) जगातल्या अनेक वंशांच्या प्राणांची करुणा भाकत तेव्हा नास्तिक लोक ती न जुमानता ते वंश नष्ट करत. या डार्विनवाद्यांचा एवढा पगडा होता कि हार्वड आणि स्टँफर्ड या त्यांनी काढलेल्या विद्यापीठांत मुलाखती न घेता कवट्यांची मोजमापे घेऊन प्रवेश देत. अनेक युजेनिक्सवादी हिटलरच्या अत्यंत जवळचे होते नि त्यांचे मते अनेक निकृष्ट स्पसिस जगातनं नष्ट व्हायला हव्या होत्या. हिटलर, इ स्वतःचे मते आणि तत्कालीन जर्मन आणि अनेक युरोपीयन शास्त्रज्ञांचे मते अजिबात क्रूर इ नव्हते. पोल्ट्रीतल्या कोंबड्या मारणारी माणसं बाईट असतात का?

arunjoshi123's picture

13 Apr 2018 - 3:25 pm | arunjoshi123

आणि पराकोटीचे वंशश्रेष्ठत्ववादी होते.

आणि याला आस्तिकांशी नि धर्माशी जोडणे पराकोटीचे डोके फिरवणारे आहे.
----------------------------------
युरोपात वंश (रेस) हा शब्द १८०० (कि १७००) पूर्वी नव्हता. असला तरी माणसांचे सोडून बाकीचे प्रकार सांगायला वापरला जात असे.
त्यानंतर डार्विन साहेबांनी सजीवांचे वर्गीकरण केले तेव्हा हा शब्द वापरला. सर्वायवल ऑफ फिटेस्ट चे बरेच अर्थ काढले गेले. त्यात एक "अधिकृत" अर्थ होता कि युरोपीय लोक सर्वात सुस्थितीत आहेत तर ते सर्वात श्रेष्ठ असावेत.
यात दोन समस्या निर्माण झाल्या:
१. नेहमी प्रत्येक युरोपीय विद्वान भारतीय साहित्यास कोट करत असे इतकी भारतीय ज्ञानाची जगन्मान्यता होती.
२. भारत अगदी अलिकडेपर्यंत प्रचंड श्रीमंत देश होता.
भारतीयांना जातींचा गंड देणे आवश्यक होते म्हणून आणि य दोन गोष्टींवर उपाय म्हणून आर्यन इव्हेजन थेरी काढण्यात आली. आणि काही सवर्ण भारतीयांना ओके करण्यात आले.
--------------------
लवकरच वंश हा कंसेप्ट फोफावला. चर्चने भूमिका घेतली कि हि "आपल्यासारखीच माणसे" आहेत तेव्हा येन केन प्रकारे त्यांना ख्रिश्चन बन्वू. पण शास्त्रज्ञांना/नास्तिकांना या रेसेसची म्मनुष्य म्हणून कदर नव्हती. सजीव म्हणून होती.
===============================
कृपया अज्ञानातून उपजलेला, नास्तिकांचे पाप झाकणारा, धर्मविरोधी अपप्रचार थांबवा.

राही's picture

13 Apr 2018 - 4:40 pm | राही

आपले डोके फिरत असेल तर त्याला माझा नाइलाज आहे. डार्विनला मध्ये आणण्याचे कारण नव्हते. सर्वाय्वल ऑफ फिटेस्ट ची संकल्पना काळाच्या ओघात टिकून राहून काही बदलांसह टिकून राहिली आहे. विकीच्या अनेक लिंका आहेत. आपण म्हटल्याप्रमाणे टनावारी साहित्य लिहिले गेले आहे. विकीवर सोयीस्कर लिंका बाजूने आणि विरुद्ध अशा अनेक असतात.
आर्यन इनवेजन थिअरी जरी मागे पडली असली (अजूनही इनवेजन ऐवजी माय्ग्रेशन शब्द वापरून भाषाशास्त्रज्नांमध्ये त्यावर वादविवाद चालतात.) तरी ती भारतीयांना जातिगंड देण्यासाठी खोडसाळपणे निर्माण केली गेली हे म्हणणे बरोबर नाही.या माय्ग्रेशनला पुरातत्वाचा आधार अजूनपर्यंत मिळालेला नसला तरी लिंग्विस्टिकचा आधार आहे. त्यावरूनच मुख्यत: ती मांडली गेली.
धार्मिक मूलतत्ववादी आपल्या धर्माच्या लोकांनासुद्धा मारत सुटतात हे नेहमीचे आहे. किंबहुना आपल्याच धर्मामधला विचारभेदही त्यांना सहन होत नाही. आम्ही सांगू तोच देव आणि तोच धर्म अशी त्यांची भूमिका असते. असो. ललितलेखनाखेरीज इतर विषयांवर आपल्याशी चर्चा कधीच थांबवली आहे. आपले ललित लेखन वारंवार वाचावयास मिळावे ही शुभेच्छा.

ललितलेखनाखेरीज इतर विषयांवर आपल्याशी चर्चा कधीच थांबवली आहे.

आपली नास्तिकी अस्मिता अवाजवी आहे. असो.

स्वधर्म's picture

13 Apr 2018 - 6:17 pm | स्वधर्म

अापल्या चर्चेत अास्तिकता ही देव अाणि धर्माच्या बाबतीत अाली अाहे. त्या अर्थाने नाझींनी जे क्रूरकर्म केले ते देवाच्या किंवा धर्मावरील श्रध्देपायी केले असे मानता येणार नाही. काही नाझी धार्मिक असतीलही कदाचित, पण बायबल किंवा येशूची अाज्ञा म्हणून त्यांनी संहार केला नाही. त्यांचा ज्यू द्वेष हा वंशश्रेष्ठत्वावरील श्रध्देतून अाला होता अाणि तीच त्यांची हत्याकांडामागची प्रेरणा होती. इतक्याच मर्यादित अर्थाने ते नास्तिक होते असे म्हणायचे होते. बाकी त्यांची वंशश्रेष्ठत्वावरील श्रध्दा ही एखाद्या धार्मिक मूलतत्ववाद्यासारखीच होती. असो, माझा मूळ मुद्दा अास्तिक-नास्तिक ऐवजी श्रध्दा असलेले व नसलेले याबाबत अाहे. या दृष्टीकोनातून बघितले तर खूप रंजक वर्तणूक पहायला मिळते.

प्रदीप's picture

13 Apr 2018 - 7:43 pm | प्रदीप

.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

13 Apr 2018 - 5:25 pm | हणमंतअण्णा शंकर...

शिळ्या कढीला ऊत आणणारी चर्चा.

त्यापेक्षा हेमंत राजोपाध्यांचे लोकरंग मधील सदर वाचा.

वेळेची बचत आणि ज्ञानात भर.

पुंबा's picture

13 Apr 2018 - 5:34 pm | पुंबा

++११
सदर सदर उत्कृष्ट आहे केवळ..
खुपदा थांबून, विचार करून जरा अदमास घेऊन पुन्हा वाचावे लागते. जबरदस्त लिहितात राजोपाध्ये.

गामा पैलवान's picture

14 Apr 2018 - 2:34 am | गामा पैलवान

नास्तिक कोणाला म्हणायचे आणि नास्तिक पना म्हणजे काय ह्या विषयी. च नास्तिक लोकांत गोंधळाचे वातावरण आहे.

नास्तिक जाणून बुजून स्वतःला बुध्दी pramanyavadi, विज्ञान निष्ट असली विशेषण लावून घेतात.
नास्तिक पना आणि वरील दोन्ही गोष्टी ह्याचा तरी मला कुठेच संबंध दिसला नाही.
चोकस वृत्ती आणि अण्यात गोष्टी विषयी कुतूहल हाच विज्ञानाचा पाया आहे.
त्या साठी नास्तिक असण्याची गरज नाही अस्तिक लोक सुद्धा चोकास आणि चिकिस्तक वृत्तीचे असतात.
आता पर्यंत जे शोध लागले आहेत त्या मध्ये काही अपवाद सोडले तर आस्तिक लोक च जास्त आहेत.
देव किंवा ईश्वर न मानने म्हणजे नास्तिकता आहे का?
धर्म न मानने म्हणजे नास्तिकता आहे का?
असे असेल तर गोंधा
भारता मधील उद्योग क्षेत्रातील यशस्वी सर्व उद्योगपती मध्ये जास्त भरणा अस्तीक लोकांचाच आहे देव मानल्या मुळे त्यांचे काहीच नुकसान झाले नाही .
तशीच परिस्थिती सर्व क्षेत्रात आहे.
मग हे नास्तिक लोक आस्तिक लोकांना देवाच्या भरवश्यावर राहणारे व प्रयत्न n करणारी लोक अशी व्याख्या आस्तिक लोकांची का करतात.
एक ठराविक धर्म ईश्वराचे अस्तित्व मान्य करत नाही त्याच धर्माचा छुप्या पद्धतीने समर्थन करण्याचा एक छुपा अजेंडा नास्तिक लोकांचा आहे अशी खूप लोकांना rast shanka aahe

चौकस२१२'s picture

23 Feb 2020 - 9:28 am | चौकस२१२

"मग हे नास्तिक लोक आस्तिक लोकांना देवाच्या भरवश्यावर राहणारे व प्रयत्न n करणारी लोक अशी व्याख्या आस्तिक लोकांची का करतात."
जेव्हा जेवहा "अस्तिकाला" विचारले कि बाबारे हे असे का? किंवा जरा समजावून सांग...काही तर्क आहे का मागे .. तर बरेचदा यावर अगम्य उत्तरे मिळतात
- हे असेच असते विश्वास ठेवा
- अनेक पिढ्या असे चालत आहे म्हणून सत्य असलेच पाहिजे
- तुम्ही असे का विचारता म्हणजे तुम्ही नास्तिक आणि धर्म विरोधी आहत
असे धुडकावून दिले जाते
या पेक्षा हि वाईट म्हणजे समोर असेलेली जिवंत माणसाचं प्रामाणिक प्रयत्नावर शंका घेतली जाते.. उदाहरण एखादी व्यक्ती नोकरी शोधात आहे प्रयत्न चालू आहेत आणि यश येत नाही तर त्याला जर कोणी " श्रद्धाळू" म्हणाला कि " असरे बघ तू अमुक अमुक नबाब ला गुरु मानले नाहीस / अमुक ठिकाणी प्रार्थना केली नाहीस " म्हणून असे
मग तो बेकार असलेलं आधीच वैतागलेला माणूस चिडतो आणि विचार करतो आरे माझ्य प्रयत्नांना काही किंमत आहे कि नाही ?

माझा तरी असा अनुभव आहे कि लहानपणी सर्वसाधारण मध्यमवर्गिय मराठी हिंदू कुटुंबात जे संस्कार, घरातील मर्यादित कर्मकांड यात वावरलो.. तरी जसे वय आणि अनुभव वाढत गेला तसे " इंग्रजीत ज्याला agnostik " म्हणतात त्याकडे तशी वृत्ती झाली.. आणि जरी अगदी करमाड नास्तिक नसलो तरी अस्तिकतेचा उबग आणि त्यातील फोल पण जाणवू लागला... पण त्याचा बरोबर एक राजकीय आणि सामाजिक अभयास म्हणून कि काय धर्म / सर्वधर्मसमभाव यातील रस वाढत गेला

चौकस२१२'s picture

23 Feb 2020 - 9:13 am | चौकस२१२

-कर्मकांडात अडकू नये
-समाजाला आणि स्वतःला आनंद देणाऱ्या आणि दुसऱ्याला त्रास ना होणाऱ्या प्रथा पाळाव्यात त्या करिताना निसर्गाचे नुकसान होणार नाही याची काळजी घावयी
- जमेल तसे तर्क वापरून जगावे
पण हे करताना बरेचदा चांगला आणि वाईट यात एक धूसर सीमारेषा असते / येते आणि ती कुठे आहे किंवा नाही हे ठरवणे कठीण होते
उदाहरणार्थ
- करोडो चा कारभार असणाऱ्या "बुवा" लोकांना/ इवजल्लिकल ख्रिस्ती चर्चेस ( मुख्य धारावही चर्च नाही तर "स्वतःचाच ब्रँड काढलेले चर्च नावाचे उद्योग) मी कडाडून विरोध करतो पण त्याच वेळेला एक मनात शंकेची पाल चुकचुकते ती म्हणजे असा या "बुवा बिझिनेस " मुळे लोक अंधश्रदेहपोटी का होईना जे पैसे गोळा करतात त्यातून काहीतरी समाजउपयोगी काम होत असेल कि !
- सार्वजनिक उत्सव सार्वजनिक ठिकाणी करूच नयेत असा नास्तिक पण जसा चुकीचा वाटतो तसेच या उत्सवमुळे कधी कधी त्रास होतोही आणि नासिर्गिक संपत्तीचे नुकसान आणि गैरउपयोग होतो ते हि चुकीचे हे हि पटते ..

दुर्दैव ( याला नास्तिक शब्द सापडत नाहीये ) असं कि लोक टोकालाच जातात...

चौकससेठ, तुम्ही योग्य मांडणी करत आहात. (काही मुद्दे पुसट आणि संधिग्ध असूनही )आभार.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

23 Feb 2020 - 10:31 am | चौकस२१२

एकाच वेळी चारही बाजूंनी विचारांची गर्दी + लिखाणाची घाई + देवनागरी टंकलेखांत "आपोपाप" शब्द घुसडले जातात ( मी ज्या ठिकाणाहून लिहून इथे चिकटवतो तिथे)
आणि एकूण तपासायचा आळस आणि त्यातून होणारे असंख्य ध चे मा ! ( आता हे लिहिताना बघा आळस चाय ऐवजी "आलास " झाला होतं

चौकस२१२'s picture

23 Feb 2020 - 9:16 am | चौकस२१२

म्हणजे असं कि मंदिर झाले काय कि नाही यात माझ्यसारख्याला काहीही फरक पडत नाही कारण मी तसा नास्तिक आहे असे म्हणूयात
पण एक सामाजिक न्याय म्हणून हिंदूंच्या मनातील हे मंदिर झाले पाहिजे याला माझा पाठिंबा आहे मग मी आस्तिक कि नास्तिक?

माहितगार's picture

23 Feb 2020 - 12:09 pm | माहितगार

मुर्ती अथवा मंदिरात देव न बघता केवळ सांस्कृतिक ठेवा बघणारी व्यक्ती सकारात्मक नास्तिक असू शकते.

शा वि कु's picture

23 Feb 2020 - 6:35 pm | शा वि कु

नास्तिक जन अतिरेकी असतात, नास्तिक जन तर्काधारावर लोकांच्या आनंदावर विरजण आणतात, यात अडकून नास्तिकत्वाची चळवळ पाहू नये. प्रत्येक व्यक्तीने आपापल्या तर्कावर देव असतो का नसतो यावर उत्तर शोधावं.
नास्तिकांचा गट सुद्धा धर्म या कल्पनेच्या विरोधात असेलच असं नाही. अनेक नास्तिक सुद्धा धर्म ही संकल्पना आता value addition देत नाही, जर धर्माचे काहीही उपयोग कुठल्याही काळात होते, तर ते आता संपले आहेत असं बोलायला बरेचशे नास्तिकही बिचकतात. त्यांचा तर्क केवळ देवाचे अस्तित्व अमान्य करून का थांबतो काय माहीत !

Rajesh188's picture

23 Feb 2020 - 9:31 pm | Rajesh188

देव ही संकल्पना जशी सिद्ध करता आली नाही तसेच देव नाही हे सुद्धा सिद्ध करता आलेलं नाही.
पण देव नाकारला तरच विज्ञान पुढे जावू शकत म्हणून विज्ञान ती संकल्पना नाकारते गरज म्हणून तसे गृहीत धरणे गरजेचं आहे.
जड स्वरूप आणि सुध्म स्वरूप ह्या दोन्ही स्वरूपाचा अभ्यास केला तर परत एकच पातळीवर येतात मग ते सजीव असू नाही तर निर्जीव.

चौकस२१२'s picture

24 Feb 2020 - 2:14 pm | चौकस२१२

माझं आणि हिंदू धर्माचे , आस्तिक/ नास्तिकतेचं नातं १०५ आहे म्हणजे असे कि बाहेरून अन्याय होत असेल तर कौरव पांडव एकत्र १०५, परंतु अंतर्गत १०० वेगळे ५ वेगळे असे
हिंदू समाजावर ( धर्म हा समाज असे मानून ) कारण नसताना जो अति दाव्यानी या समाजाला आणि देशाला त्रास दिला आणि देत आहेत त्याचाशी लढताना मी हिंदुत्ववादी होतो
पण ते झाल्यावर जर इतर कडव्या भक्त हिंदुत्ववाद्यांच्या पंक्ती ला बसलो तर त्यांना माझे विचार डावे वाटतील इतकी मला त्यान्चाय धार्मिकते बद्दल आणि कर्मठते बद्दल चीड असते. काय बिघडतं नाही केली तर ? आज कोट्यवधी लोक जगात हे मानत नाहीत आणि त्यांच्याही जीवनात तशीच सुख आणि दुःख असतात कि..
पूजा घालून जर सगळे सुजलाम सुफलाम होत असते तर आज भारतात एवढे प्रश्न नसते?

आस्तिक नास्तिकतेचं उदाहरण द्यायच झालं तर ..
फर्ग्युसन महाविद्यालयात पूजा का ठेवली असे म्हणणाऱ्याना मी वैचारिक रित्या ठोकून काढेन
( जरी मनात हे पटत असलं कि पूजा नाही केली तरी चालेल) आणि त्याच श्वासात मी पूजेचे समर्थन करणाऱ्यांना हे कडवे पणाने विचारेंन कि कशाला पाहिजे पूजा ?

थोडक्यात काय दोन्ही कडून मार मिळतो

प्रकाश घाटपांडे's picture

25 Feb 2020 - 8:58 am | प्रकाश घाटपांडे

थोडक्यात काय दोन्ही कडून मार मिळतो

याच कारण लोकांना द्वैतात अडकायला आवडत. जर तुम्ही आमच्या बाजूचे नसाल तर तुम्ही त्यांच्या बाजूचे आहात हे बुद्धीमांद्य सर्रास पहायला मिळते.

माहितगार's picture

24 Feb 2020 - 2:30 pm | माहितगार

प्राडॉ सरांचे अभिनंदन केले पाहीजे. धागा चर्चा दिडवर्षानंतरही चालू आहे यातच धाग्याच्या उद्दीष्टाचे यश सामावले आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Feb 2020 - 8:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवाळू लोकांची कृपा दुसरं काय ? ;)

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

26 Feb 2020 - 10:02 am | माहितगार

=)) हे बरंय सर,

कांदा टोपलीत ठेवणार्‍यास कांदा टोपलीत ठेवण्याचा आणि टोपलीतल्या कांद्यात देव नाही म्हणायाचे याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच आणि त्याचा आदरही केला पाहीजे.

आपण टोपलीत कांदा ठेऊन द्यायचा, त्यावर फुले वाहील्याचे क्रेडीट फुले वाहत राहणार्‍यांना द्यायचे हे ही ठिकच. पण प्रथम कांदा टोपलीत कुणी ठेवला आणि कांदा टोपलीत ठेवणार्‍याच्या क्रेडीटचे काय ? म्हणून आम्ही आपणासच या धाग्याचे (कांद्याचे) आद्य प्रवर्तक म्हणून अभिनंदनाचे पहिले अधिकारी समजतो. :))

टोपली = मिपा
नास्तिक धागा = कांदा
फुले = प्रतिसाद (फुलांचे वर्गीकरण या प्रतिसादात अनावश्यकते मुळे केलेले नाही :) )

वामन देशमुख's picture

26 Feb 2020 - 9:56 am | वामन देशमुख

जगभरातील काफिरांना त्यांच्या अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी आस्तिकत्व अत्यावश्यक आहे.

माहितगार's picture

26 Feb 2020 - 10:33 am | माहितगार

ते कसे बरे ?

१) असे समजून चला की जगात देव नाहीच तर काफीर त्यांच्या अस्तीत्वाची लढाई लढले नसते, की लढू नये ?

२.१) समजा देव आहे, पण काफीरांवरील अन्यायाकडे दुर्लक्ष करुन काफीरांना त्यांची लढाई करण्यास त्यांनाच भाग पाडतो. देव असे का वागतो ?

२.२) देव काफीरांवरील अन्यायाकडे दुर्लक्ष करत असेल, आणि देव बरोबर असेल तर अन्याय करणारे बरोबर आहेत आणि ते अन्याय नसून देवाची कृपा आहेत असे होत नाही का ?

२.३) जर देवच अन्यायाला न्याय म्हणत असेल तर नास्तिकांनी देवा विरुद्ध तक्रार का करु नये ?

२.४) जर आस्तीक काफीर आणि नास्तिक काफीरांना एकाच अन्याया विरुद्ध लढायचे असल्यास दोघांनी एकत्र का लढू लय ?

२.५) अन्याया विरुद्ध एकत्र लढण्यासाठी नास्तिक काफीरांवर आस्तिकतेची अट का लादावी ? अशा अटी लादून खरी अस्तिकता साढली जाऊ शकते का ?

( मी अज्ञेय आहे आस्तिक आणि नास्तिक दोन्ही बाजूतील सकारात्मकता उचलून धरतो, जिथे साशंकता, प्रश्न चिन्हे आहेत तेही उभी करतो माझा दृष्टीकोण नीर-क्षीर विवेकाने बाळ वाचवावे आणि न्हाऊचे पाणी फेकावे असा आहे दृष्टीकोण नमूद करण्याची कारण माझ्या प्रश्नांमुळे माझ्याबद्दल व्यक्तिगत टिकाकरण्या एवजी उपस्थीत केलेल्या शंकाना उत्तरे मिलून हेल्दी चर्चा व्हावी असा आहे.)

माहितगार's picture

26 Feb 2020 - 10:48 am | माहितगार

* का लढू लय ? > का लढू नये ?
* अस्तिकता साढली जाऊ शकते का ? >अशा अटी लादून खरी अस्तिकता साधली जाऊ शकते का ?

शा वि कु's picture

26 Feb 2020 - 10:13 pm | शा वि कु

एकत्र राहावे इथपर्यंत मान्य केले जाऊ शकते. आस्तिकत्वाची काय गरज ?
आणि धर्मातल्या त्रुटींवर बोटं पडून पडून, वैचारिक ढवळाढवळ होऊन सर्वच धर्मापासून दूर होतील , हे जास्त चांगले नाही का होणार ?

नास्तिकाने तो नास्तिक आहे असे न सान्गता प्रबोधन करावे , त्याच फायदा होइल , तसेच आस्तिकाने पन प्रबोधन करताना थोडी समज दाखवावी नाहितर इन्दुरिकर महाराज होतो. इन्दुरिकर महाराज चान्गले प्रबोधन करतात पन त्यानि धर्म्ग्रन्थाचा आधार घेत अन्धश्रधा पसरवल्या आणि पत कमी करुन घेतली.आणि काही लोक त्यान पाठिम्बा पन देतात.

प्रयोग करा त्याचा रिझल्ट बघा आणि नंतर सांगा अंध श्रद्धा आहे ते

शा वि कु's picture

26 Feb 2020 - 10:26 pm | शा वि कु

डार्विनने पण फक्त पुंगी सोडायला हवी होती, की कायतर नॅचरल सिलेक्शन नावाचा प्रकार असतो. आणि त्याला खोटं म्हणल्यावर म्हणायला हवं होतं की प्रयोग करून बघा.
नाही तसे इंदुरीकर महाराज हे वैद्यकशास्त्रातील मोठे नामवन्त आहेत. त्यामुळे प्रयोग तर व्हायालाच हवेत.
टिप: आधुनिक विज्ञान आपल्याला हवंय का नको एकदा फडशा पाडला जाऊदे. निदान जिथे परस्परविरोध आहे तिथेतरी. डायबिटीस,पोलिओ निर्मूलन, अँटिबायोटिक वगैरे लक्षात असुद्या.

विज्ञान ला उच्च पातळीवर घेवून येणारे किती महान संशोधक हे आस्तिक होते.
आणि त्यांचा विज्ञान च्या प्रगतीत सक्रिय सहभाग होता त्यांनी नवीन नवीन शोध लावले आहेत फक्त तोंड पाटीलकी केलेली नाही.
आस्तिक विज्ञान वादी नसतात हा प्रचार नास्तिक लोक (फक्त भारतातील) का करतात.
फक्त अहंकारातून.

आधी इंदुरीकर महाराजांचे वाक्य हे प्रगत समाजामध्ये, विज्ञाननिष्ठ समाजामध्ये उच्चारले जावे का आणि त्याचे समर्थन ( आणि justification) व्हावे का ?

आणि थोर शास्त्रज्ञ आस्तिक होते, हे खरे आहे. तितकेच थोर शास्त्रज्ञ नास्तिक सुद्धा होते. re.- स्टीफन हॉकिंग चे शेवटचे पुस्तक
Brief answers to the big queastion यात त्याने देवाच्या अस्तित्वाची कुठलीही शक्यता नसल्याच प्रतिपादन केले आहे. पण मी तो नास्तिकत्वासाठी दाखला म्हणून देत नाहीये, कारण हा प्रश्न प्रत्येकाने आपापला तर्क वापरून उत्तर काढायचा आहे. ज्यावर कधी विचार केला नाही त्यावर विचार व्हावा इतकीच इच्छा आहे.

हो , बरेच शास्त्रज्ञ आस्तिक होते, पन त्यातल्या किती जणानी देवावर सन्शोधन किंवा देवाचा शोध घेतला ते पन सांगा.

चौकस२१२'s picture

27 Feb 2020 - 6:49 pm | चौकस२१२

भारताबाहेर सुद्धा हि चर्चा असते .. कॅथलिक शाळेत ( कि ज्यांना सरकारी शाळांप्रमाणेच सरकारी अनुदान मिळते) तिथे डार्विन सिद्धांत शिक्ववच लागतो पण ते त्यांच्या मालकांना ( चर्च ) ला पटलेले नसते त्यामुळे नाईलाजाने दोन्ही सांगतात जग उत्क्रातींतून निर्माण झाले हे हि आणि प्रभू ने बनवले हे हि... म्हणजे पोरं गोंधळतात

आधी आस्तिक लोक म्हणूदेत तर इंदरीकर महाराज जे म्हणातात त्यात तथ्य आहे मग करु प्रयोग..तुम्ही सांगा तुमचा ह्यावर विश्वास आहे का ..आणी हे अंधश्रद्धा आहे हे समजण्या इतके सुज्ञ आम्ही आहोत आणी तुम्ही ही असाल हा विश्वास आहे..

अजून एक, नास्तिक असावेत का नसावेत ह्यावर माझे काही ठाम मत नाही, पन अशा अंधश्रद्धाना कोनी थारा देऊ नये.. आणी केवळ आस्तिक आहे म्हणून ह्यावर पन विश्वास ठेवावा असे तुम्हाला वाटत असेल तर नास्तिका असलेले बरे नव्हे का?

Rajesh188's picture

27 Feb 2020 - 12:52 pm | Rajesh188

Indorikar जे बोलले त्याला आधुनिक विज्ञान मान्यता देत नाही हे मला माहीत आहे.
त्यांच्या बोलण्याला शास्त्रीय आधार नाही हे सर्वानाच माहित आहे जे आस्तिक आहेत.
पण ते दाखले पुरातन आहेत.
पण त्यांच्या विरोधात ज्या प्रवृत्तीचे लोक प्रचार करू लागले त्यांचे टार्गेट हे indorikar नव्हतेच त्याचा वापर करून ते हिंदू धर्माला टार्गेट करत होते हे उघड आहे .
आणि त्या मुळेच indorikar चे समर्थन करणे हाच पर्याय योग्य होता.
ज्यांनी मोर्चे काढले,tv var ज्ञान
पाजळले ते खरोखर चे समाज कार्यकर्ते किंवा समाजाचे भले करणारी लोक नाहीत हे पण सर्वांना माहीत आहे.

Rajesh188's picture

27 Feb 2020 - 1:05 pm | Rajesh188

पुरातन काळी जसे लोकांना विश्व समजले तसे त्यांनी लिहाल.
तसेच जे indorikar जे बोलले ते पुरातन ग्रंधा वर तेव्हा जे लोकांना समजले तसे त्यांनी मांडले आहे.
ते ज्ञान आता टाकावू झाले असेल ह्याचा अर्थ हा नाही ती पुरातन लोक विज्ञान वादी नव्हते त्यांचे कष्ट तुम्ही नाकारू शकत नाही किंवा त्या वर टीका सुद्धा करू शकत नाही.
उद्या ह्या stephan hacking ह्यांचे संशोधन चुकीचे आहे असे सिध्द झाले तर आपण स्टीफन ना मूर्ख समजू शकत नाही.
असा विचार करा.

शा वि कु's picture

27 Feb 2020 - 9:32 pm | शा वि कु

तसेच जे indorikar जे बोलले ते पुरातन ग्रंधा वर तेव्हा जे लोकांना समजले तसे त्यांनी मांडले आहे.
ते ज्ञान आता टाकावू झाले असेल ह्याचा अर्थ हा नाही

माझ्या मते जर हे सम विषम आकड्यांचे तत्व शास्त्रात आहे, तर ते आता टाकाऊ झालेच आहे. जे तत्व विज्ञान स्पष्टपणे चुकीचे म्हणतो ते जर अजूनसुद्धा आपण बरोबरच म्हणणार आहे, तर हा एक प्रकारचा दुटप्पी पणा आहे. उदा- कॅन्सर झाल्यावर केमोथेरपी आणि रेडिएशन सोबत गोमूत्र आणि अंगारे धुपारे करणे आणि श्रेय अवैज्ञानिक गोष्टींना देणे.

चौकस२१२'s picture

27 Feb 2020 - 6:57 pm | चौकस२१२

पण त्यांच्या विरोधात ज्या प्रवृत्तीचे लोक प्रचार करू लागले त्यांचे टार्गेट हे indorikar नव्हतेच त्याचा वापर करून ते हिंदू धर्माला टार्गेट करत होते हे उघड आहे .
हाच तर्क पटला.. उदाहरण पिके या चित्रपणाचा मूळ हेतू अंधश्रद्धा उघडकीला आणणे हा होता हे पटलेच होते पण एकूण फक्त "हिंदू धर्मातीलच " अंधश्रद्धा या "कलाकार" माणसांना का दिसते म्हणून माझ्यासारखा नास्तिकतेकडे झुकणार केवळ जन्माने हिंदू असलेला पण त्या दिग्दर्शकाच्या विरुद्ध बोलला पण तसे केले कि "बघा हा अजून एक मनुवादी" असे हिणवले जाते . असे दिगदर्शनक विरळाच कि ज्यांनी इतर धर्मातील चुकीच्या प्रथांवर प्रकाश टाकणारे चित्रपट / नाटक निर्माण केले! halala हा मराठी चित्रपट मात्र अपवाद

Rajesh188's picture

26 Feb 2020 - 2:04 pm | Rajesh188

आधुनिक विज्ञान च कथित पुरोगामी लोकांना उघडे पाडेल.
आणि पश्चिमात्य देश जे खरे आधुनिक युगाचे जनक आहेत तेच ह्यांना नागडे करतील.
भारतीय हिंदू द्वेशी पुरोगामी ह्यांचे काहीच योगदान नाही आधुनिक विण्यान मध्ये.
त्यांची बिना पुराव्याची बकवास ऐकण्याची काही गरज नाही

गामा पैलवान's picture

26 Feb 2020 - 7:23 pm | गामा पैलवान

Rajesh188,

'आधुनिक विज्ञान च कथित पुरोगामी लोकांना उघडे पाडेल', हे ठीक वाटतंय. पण 'पश्चिमात्य देश जे खरे आधुनिक युगाचे जनक आहेत तेच ह्यांना नागडे करतील' हे विधान काही पटलं नाही. कारण की पाश्चात्य देश आधीच दोन महायुद्धांच्या आगीत होरपळलेले आहेत. आज त्यांना स्वत:च्याच समस्या भारी झाल्या आहेत. ते कशाला भारतातल्या पुरोगाम्यांच्या मागे लागतील!

आ.न.,
-गा.पै.